साहित्यः
१. अंडी
२. बारीक चिरलेला कांदा
३. चिरलेला टोमॅटो आणि मश्रुम्स
४. बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर
५. हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ
कृती:
१. कांदा, टोमॅटो, मश्रुम्स, मिरची आणि कोथिंबीर मिक्सिंग बोउल (मी बीर मग वापरला आहे!) घ्यावे
२. थोडी हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ टाकावे.
३. हे सगळे जिन्नस चांगले हलवुन एक मिनीट तरी तसेच ठेवावे (मसाला छान मुरतो)
४. ह्या मिश्रणा मधे अंडे फोडावे.
५. अंड आणि मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्रित होण्यासाठी २-३ मिनीटे रगडमपट्टि हलवावे (ह्यामुळे ऑम्लेटहि मस्त मऊ होते)
६. नचिकटणार्या सपाट तव्यावर तेल कडकडित गरम करावे.
७. गरमा गरम तव्यावर हे मिश्रण समपातळित ओतावे (जास्त जाडहि नको आणि अगदि पातळहि नको)
८. जरावेळाने (तवा किती गरम होता आणि आच कशी आहे ह्यावर अवलंबुन) ऑम्लेट पलटावे आणि वरच्या बाजुनेहि परतुन घ्यावे.
९. आता ऑम्लेट खाली पोळी सरकवा़वी आणि पोळी शेकली जाण्याकरता थोडे तेल सोडावे. (पोळी थोडि कुरकुरित छान लागते).
१०. तव्यावरच हळुहळु पोळी दुमडुन रोल करावा आणि तसाच राहाण्याकरता थोडा हलकेच दाबुन परतुन घ्यावा.
११. गरमा गरम ऑम्लेट-पोळी रोल तयार!!!
---
वैविध्यः
* इथे शिळी पोळी वापराल्यास आणखी चवदार रोल
* अंड्यावर चीझ किसले तर लज्जतदार रोल
* पोळीला आतल्या बाजुने चटणी लावल्यास झणझणीत रोल
---
सोपी पाकृ. झटपट तयार. विवीधता शक्य. तेव्हा मंडळी पाकृ करुन बघा आणि तुमचे अनुभव कळवा.
(१६ अंडी रोज कशी खाता येतात असा प्रश्न पडलेला*) पांथस्थ.
(* आमिरने "गजनी" साठी शरीर कमावण्यासाठी केलेल्या उपद्यापांपैकी एक म्हणजे त्याचा आहार. रोज सोळा अंडी म्हणे, अर्धा किलो चिकन इ. असे केले तर आमचे फक्त पोटाचे स्नायु वाढणार. असो.)
प्रतिक्रिया
27 Dec 2008 - 12:08 am | घाटावरचे भट
या रोलमधे जर शिजवलेले चिकनचे तुकडे टाकले (ग्रेव्ही असलेलं चिकन) आणि पुदिना किंवा तत्सम चटणी टाकली तर चव आणखीनच उत्तम लागते असा माझा अनुभव आहे. फक्त चिकनची ग्रेव्ही जरा दाटसर हवी. मी हा रोल करताना फक्त अंडं पलटवत नाही. खालून अंडं साधारण बरं शिजलं की त्याच्यावर डायरेक्ट पोळी टाकतो. त्यामुळे पोळी अंड्याला नीट चिकटते आणि रोल करायला अडचण येत नाही.
27 Dec 2008 - 12:11 am | पांथस्थ
तुम्ही काठी रोल बद्दल बोलत आहात का? तो फारच झकास प्रकार आहे. पुण्यात कपिलाचे काठी रोल थोर आहेत.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
27 Dec 2008 - 1:44 am | घाटावरचे भट
साधारण तसंच. फक्त घरगुती आवृत्ती. काटी रोल मधे तो कपिलावाला भाराभर जिन्नस घालतो. तो रोल खाण्यापेक्षा सांडणार नाही याच्याकडेच जास्त लक्ष द्यावं लागतं. पण चवीला तोड नाही हेच खरं.
27 Dec 2008 - 2:34 am | आजानुकर्ण
कपिला म्हणजे ढोले पा. रस्त्यावरचं म्हणत असाल तर तिथल्यापेक्षा चांगले काटी कबाब व्हिक्टरीशेजारी ऑलिम्पियामध्ये मिळतील. फक्त कळकट टेबले आणि ट्यूबलाईटींचा प्रकाश सहन करावा लागेल
आपला
(कबाबमें हड्डी) आजानुकर्ण
27 Dec 2008 - 2:52 am | घाटावरचे भट
ऑलिंपियासुद्धा ट्राय केलेलं आहे. कपिला जास्त बरं वाटलं. अर्थात् हे वैयक्तिक मत आहे.
27 Dec 2008 - 2:55 am | आजानुकर्ण
मग ठीक आहे. :)
आपला
(ऑलिंपियाप्रेमी) आजानुकर्ण
27 Dec 2008 - 3:10 am | पांथस्थ
असेच म्हणतो.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
27 Dec 2008 - 12:49 am | सुक्या
मी घरी अंड्याचा रोल बनवण्याचा भरपुर प्रयत्न करुन पाहीला आहे. कधी मनासारखा रोल बनलाच नाही. हातगाडीवरच्या रोल ला तोड नाही. मसाला आम्लेट तर नास्त्याला जवळ्पास रोज होत असे. आजकाल जरा वजन वाढल्याने कार्न्फ्लेक्स सारक्या बेचव पदार्थावर भागवावे लागते आहे :-(. आम्लेट मधे मशरुम कधी टाकले नाही. तसे करुन पाहतो.
(खादाड) सुक्या (बोंबील)
आजकाल आमचे अचुक वजन दाखवनारे वजनकाटे खराब झालेत.
27 Dec 2008 - 12:54 am | रामदास
आणि कागदाच्या मागे कृती असं करून नविन वर्षाचं कॅलेंडर बनवावं म्हणतो.
27 Dec 2008 - 1:21 am | भडकमकर मास्तर
खरंच सुंदर फोटो आणि सोप्पी कृती..
मजा आ गया...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
27 Dec 2008 - 2:57 am | आजानुकर्ण
१. अंडे काट्याने/चमच्याने फेटण्याऐवजी एकदा मिक्समधून काढून घ्यावे म्हणजे ऑम्लेट चांगले फुगते
२. अगदी मिनिट दीड मिनिभर तव्यावर एखादे ताट पालथे घालावे म्हणजे वरुन चांगला शेक मिळतो.
आपला
(ऑम्लेटवाला) उद्धव महाराज आजानुकर्ण
27 Dec 2008 - 9:53 am | वेताळ
फोटो देखिल उत्तम दिले आहेत.
वेताळ
27 Dec 2008 - 10:22 am | सुनील
१) अंडे फेटताना त्यात थोडे दूध घालावे, ऑम्लेट चांगले फ्लफी होते.
२) अंडे लवकर शिजते त्यामानाने कांद्याला वेळ लागतो. म्हणून आधी कांदा (आणि मिरच्या व इतर मसाला) आधी परतून घ्यावा मग त्यात अंडे घालावे.
रोल दिसतोय छान आणि शिळ्या पोळ्या संपविण्याचा एक रुचकर प्रकार.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
27 Dec 2008 - 12:59 pm | पांथस्थ
हे माहित होतं...
हि आमच्या ज्ञानात नवीन भर. हे करुन बघणार. धन्यवाद!
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
29 Dec 2008 - 2:55 am | प्राजु
असे मस्त ऑम्लेट पोळी रोल करून घ्यावे... थाळीत ठेवावे, शेजारी लसूण चटणी, मीठ लावून तळलेली मिरची घ्यावी, आणि ताटाभोवती पाणी फिरवून "ओम पांस्थस्थाय नम:" असे म्हणून खाण्यास प्रारंभ करावा..
पांथस्थराव, मला भारतात लवकर यायला लावणार आपण असे दिसते आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 Dec 2008 - 12:13 pm | धमाल मुलगा
पांथस्थ सरकार,
आमची बोटं आत्ताच बंगळूराचं तिकीट काढायला वळवळायला लागली आहेत! :)
नेक्श्ट टैम बंगळूरात आलो की मी, ऍड्या, अभिरत आणि डान्या असे सगळे तुमच्याकडे टोळधाडीसारखे येणार! मग संभालो इस मुसिबत को :)
29 Dec 2008 - 10:51 pm | संदीप चित्रे
मसाला ऑम्लेट आणि गरम गरम चपाती हा माझा आवडता प्रकार आहेच..... आता रोलचाही प्रयत्न करतो :)
धन्यवाद पांथस्थ ... तुमच्या पाकृंतकेच फोटोही रूचकर वाटतात :)
22 Jul 2010 - 10:31 pm | आशिष सुर्वे
आमची बोटं आत्ताच बंगळूराचं तिकीट काढायला वळवळायला लागली आहेत! >>
धम्या, तुझ्या 'टो़ळधाडी'चे स्वागत आहे!!
आमच्या 'बॅचलर्स पॅरेडाईज' चे इन्विटेंशन अजूनही ओपन आहे बर्र का!
बा ड वे, मसाला आम्लेट-पोळी रोल .. झक्कास बर्र का पांथस्थ भाऊ!
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
22 Jul 2010 - 10:44 pm | आमोद शिंदे
काम त मा म!! माझ्या सारख्या अंडाप्रेमींसाठी खेळ खलास!!