मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मसाला आम्लेट-पोळी रोल

पांथस्थ · · पाककृती
साहित्यः १. अंडी २. बारीक चिरलेला कांदा ३. चिरलेला टोमॅटो आणि मश्रुम्स ४. बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर ५. हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ कृती: १. कांदा, टोमॅटो, मश्रुम्स, मिरची आणि कोथिंबीर मिक्सिंग बोउल (मी बीर मग वापरला आहे!) घ्यावे २. थोडी हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ टाकावे. ३. हे सगळे जिन्नस चांगले हलवुन एक मिनीट तरी तसेच ठेवावे (मसाला छान मुरतो) ४. ह्या मिश्रणा मधे अंडे फोडावे. ५. अंड आणि मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्रित होण्यासाठी २-३ मिनीटे रगडमपट्टि हलवावे (ह्यामुळे ऑम्लेटहि मस्त मऊ होते) ६. नचिकटणार्‍या सपाट तव्यावर तेल कडकडित गरम करावे. ७. गरमा गरम तव्यावर हे मिश्रण समपातळित ओतावे (जास्त जाडहि नको आणि अगदि पातळहि नको) ८. जरावेळाने (तवा किती गरम होता आणि आच कशी आहे ह्यावर अवलंबुन) ऑम्लेट पलटावे आणि वरच्या बाजुनेहि परतुन घ्यावे. ९. आता ऑम्लेट खाली पोळी सरकवा़वी आणि पोळी शेकली जाण्याकरता थोडे तेल सोडावे. (पोळी थोडि कुरकुरित छान लागते). १०. तव्यावरच हळुहळु पोळी दुमडुन रोल करावा आणि तसाच राहाण्याकरता थोडा हलकेच दाबुन परतुन घ्यावा. ११. गरमा गरम ऑम्लेट-पोळी रोल तयार!!! --- वैविध्यः * इथे शिळी पोळी वापराल्यास आणखी चवदार रोल * अंड्यावर चीझ किसले तर लज्जतदार रोल * पोळीला आतल्या बाजुने चटणी लावल्यास झणझणीत रोल --- सोपी पाकृ. झटपट तयार. विवीधता शक्य. तेव्हा मंडळी पाकृ करुन बघा आणि तुमचे अनुभव कळवा. (१६ अंडी रोज कशी खाता येतात असा प्रश्न पडलेला*) पांथस्थ. (* आमिरने "गजनी" साठी शरीर कमावण्यासाठी केलेल्या उपद्यापांपैकी एक म्हणजे त्याचा आहार. रोज सोळा अंडी म्हणे, अर्धा किलो चिकन इ. असे केले तर आमचे फक्त पोटाचे स्नायु वाढणार. असो.)

वाचन 8588 प्रतिक्रिया 0