धनी

अविनाश कुलकर्णी's picture
अविनाश कुलकर्णी in दिवाळी अंक
26 Oct 2015 - 11:02 am

.
.
................................
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
सखे काय सांगू.
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली

घेता मिठीत त्याने,आग अंगास लावली
अधराने अधरावर प्रेम कविता कोरली
सुटले भान पदराचे, गळून पडली चोळी
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली

स्पर्शिता उरोज त्याने,श्वास माझे थांबले,
धुंद मिटल्या नयनी,रम्य स्वप्न तरळले
गात्र गोजिरी स्वप्ने फुलली,ग्लानी आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली

डवरला होता पारिजात,गंध भिने तनूत
शरद चांदणे जणू ,निथळत होते देहात
मोहरला गौर देह,कळ सुखाची आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली

अंगास भिडले अंग,ना दुजाभाव राहिला
कमळात जसा भ्रमर,तसा गात्रात प्रवेशला
वादळी आवेग त्याचा,तनू रतिसुखाने भिजली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली

अधरावर दंतव्रण ,वक्षावर नखक्षते कोरली
तनूत स्वर्ग सुखाची लाटे वर लाट आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
.

दिवाळी अंक २०१५

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

10 Nov 2015 - 10:21 am | टवाळ कार्टा

हायला....भन्नाट....जब्राट...मिपा वयात आलं ;)

प्रसाद गोडबोले's picture

26 Nov 2015 - 2:05 pm | प्रसाद गोडबोले

+१

जातवेद's picture

10 Nov 2015 - 4:26 pm | जातवेद

अगा गागा गागा गं. हा नक्की दिवाळी अंकच आहे ना?

मितान's picture

11 Nov 2015 - 7:39 am | मितान

अश्लील कविता ! टीन एजर ने वहीच्या मागच्या पानावर लिहावी तशी !
याला श्रुंगारिक म्हणायचं असेल तर तद्दन फालतू व भिकार !

गणपा's picture

11 Nov 2015 - 3:53 pm | गणपा

जराकाही श्रुंगारीक अंगाच आलं की अंगावरुन झुरळ फिरल्यागत वाटतं.
अश्याने मिपा वयात कसं येणार?

'तरुण आहे रात्र अजुनी', 'मालवून टाक दीप' अगदी यांच्या तोडीच नाही म्हणत मी पण अगदीच अश्लील, फालतू भिक्कार नाही वाटली.

धीट, स्पष्ट पण व्हल्गर शब्द न वापरणारी शृंगाररसपूर्ण कविता. गणपाशी सहमत.अश्लील, एक्स्प्लिसिट वाटली नाही.

मनीषा's picture

11 Nov 2015 - 4:40 pm | मनीषा

बोल्ड आणि ब्युटीफुल .. !

नाखु's picture

26 Nov 2015 - 2:15 pm | नाखु

किमान शब्दात कमाल आशय..

कवीता आणि प्रतीसाद याला +११

नूतन सावंत's picture

11 Nov 2015 - 5:22 pm | नूतन सावंत

शीर्षक वाचून फसगत झाली.

पीशिम्पी's picture

11 Nov 2015 - 5:59 pm | पीशिम्पी

शृंगाररसपूर्ण कविता, खुप संयमित आहे.

चांदणे संदीप's picture

26 Nov 2015 - 1:36 pm | चांदणे संदीप

कुंकवाच्या धन्यानं

या नाते-संबधाची काव्याने नेहमीच उपेक्षा केली आहे!
सदानकदा सखा/साजण/तो/अनामिक/मैतर अशा शब्दातून "धनी" कधीच ध्वनित होत नव्हता.

ही "नैतिक" प्रणयराधना! हा खरा प्रणयचित्कार!

वा! कविता आवडली!

धन्यवाद,
Sandy

अनिरुद्ध.वैद्य's picture

26 Nov 2015 - 1:42 pm | अनिरुद्ध.वैद्य

दिवाळी अंक मोठे झाले. कविता जमलिये!

प्रभाकर पेठकर's picture

26 Nov 2015 - 2:20 pm | प्रभाकर पेठकर

श्रुंगारीक काव्य. सुंदर आहे.

गोंडस भावनांच्या मागे लपून शारीरिक रतीक्रिडेचेच वर्णन आहे जे जरा बटबटीत वाटले. पण असो. तेव्हढा किंचितसा दोष वगळता कविता सुंदर आहे. मिसळपाव पेक्षा 'आवाज' आणि 'जत्रा' मासिकात चपखल बसली असती.

नि३सोलपुरकर's picture

26 Nov 2015 - 2:24 pm | नि३सोलपुरकर

अरेचा,
परवाच एक धागा आला होता ,"मिपाकरांचे वय काय " असा काहीसा उपरोक्त दिवाळी अंकावरून , मला वाटते प्रश्न उपस्थित केलेल्यांनी एकतर हा दिवाळी अंक पुर्ण वाचला नसेल ..आणी वरील कविता वाचल्यानंतर आपले मत बदलले असेल.