भरली मिरची

वल्लरी's picture
वल्लरी in पाककृती
13 Dec 2008 - 10:02 pm

खरं तर ही रेसीपी शाल्मली पासुन प्रेरीत होऊन केली आहे...
पण भेंडी एवजी मिरची वापरली आहे...

साहित्य :-
मिरची नेहमीच्या नाही थोड्या जाड्या स्वच्छ धुवुन ,उभ्या चिरून
चण्याच्या डाळीचं पीठ -पाव वाटी
ओले खोबरं - १ वाटी
दाण्याचा कुट-४ चमचे
धने -जिरे पावडर , गरम मसाला, लाल तिखट, हळद -१ चमचा प्रत्येकी
चिंच-गु़ळ कोळ
मीठ - चवीनुसार

कृती :-
वरील सर्व साहित्य एका बाऊल मध्ये घेऊन नीट मिक्स करावे नि उभ्या चिरलेल्या मिरच्यांन मध्ये भरावे.
खालील प्रमाणे भरलेल्या मिरच्या दिसतील

आता फ्राय पॅन मध्ये थोडे तेल घालुन मिरच्या शॅलो फ्राय करुन घेणे.

वरण-भात-तुप-लोणचे-पापड नी भरली मिरची वा!!! काय बेत आहे... ;;)

प्रतिक्रिया

प्राजु's picture

13 Dec 2008 - 10:06 pm | प्राजु

फोटोच असा जबरदस्त आहे... बघूनच पाणी सुटलं तोंडाला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चकली's picture

13 Dec 2008 - 11:07 pm | चकली

फ़ोटो आणि रेसिपी दोन्ही छान

चकली
http://chakali.blogspot.com

वल्लरी's picture

14 Dec 2008 - 8:09 am | वल्लरी

धन्यवाद प्राजु नी चकली ताई...:)

स्वाती राजेश's picture

13 Dec 2008 - 11:28 pm | स्वाती राजेश

काय मस्त बेत केला आहेस..
आताच वरण भात घेऊन त्यावर तूप घालून, तू केलेली भरली मिरची खावीशी वाटते...:)
मस्त फोटो, आणि रेसिपी...

वल्लरी's picture

14 Dec 2008 - 8:12 am | वल्लरी

स्वाती ताई,
हाच बेत होता गं जेवणात..वरण-भात-तुप-लोणचे नी भरली मिरची ...

विसोबा खेचर's picture

14 Dec 2008 - 12:28 am | विसोबा खेचर

ख ल्ला स..!

अन्य शब्द नाहीत..!

आपला,
(मिची प्रेमी) तात्या.

वल्लरी's picture

14 Dec 2008 - 8:14 am | वल्लरी

:)

विनायक प्रभू's picture

14 Dec 2008 - 12:50 pm | विनायक प्रभू

असेच म्हणतो

सहज's picture

16 Dec 2008 - 10:44 am | सहज

ख ल्ला स

रेवती's picture

14 Dec 2008 - 2:00 am | रेवती

म्हणजे जरा जाडसर पण आपण नेहमी फोडणी केल्यावर त्यात घालतो त्याच का?
करून बघायलाच हव्यात.
फोटूमुळे तर लग्गेच कराव्याश्या वाटताहेत.

रेवती

वल्लरी's picture

14 Dec 2008 - 8:08 am | वल्लरी

रेवती ताई,
ह्या नेहमीच्या फोडणीत घालतो त्या मिर्च्या नाहीत गं....
ह्या मिर्च्या थोड्या जाडसर,लांब नी पोकळ असतात भरण्यासाठीच वापरत असावेत बहुतेक..

शंकरराव's picture

14 Dec 2008 - 3:13 am | शंकरराव

जबरदस्त .....
फोटो पाहून तोंडातून आर्धा लिटर लाळ गळाली ....

वल्लरी's picture

14 Dec 2008 - 8:13 am | वल्लरी

:)

आजानुकर्ण's picture

14 Dec 2008 - 8:49 am | आजानुकर्ण

भरलेली मिरची हा प्रकार खाऊन खूप दिवस लोटले. फोटो पाहून त्या आठवणी जाग्या झाल्या. ही मिरची चपाती आणि मुगाच्या डाळीच्या लसूण-खोबरे फोडणी घातलेल्या आमटीबरोबरही फार छान लागते.

सुरेख पाककृती.

आपला
(झणझणीत) आजानुकर्ण

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Dec 2008 - 10:55 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

हं, आजानुकर्णाचा मेन्यू करुन बघायला हवा एखाद दिवशी!
मिरची झकासच!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Dec 2008 - 8:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडली !

पांथस्थ's picture

14 Dec 2008 - 9:40 am | पांथस्थ

एकदम झक्कास आहे. वरण-भाता बरोबर मस्तच लागणार. जमले तर आज करायला हवी!

फोटू मस्त आहे.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

वल्लरी's picture

14 Dec 2008 - 11:07 am | वल्लरी

धन्यवाद आजानुकर्ण ,बिरुटे सर, आणि पांथस्थजी

पांथस्थ's picture

16 Dec 2008 - 10:19 am | पांथस्थ

हे घ्या फोटू (सुगरणीच्या परवानगीने टाकत आहे - मंडळ आभारी आहे) -

१. मसाला आणि मिरच्या

२. तेल गरम करुन हिंग परतुन घेतले

३. मिरच्या परतुन घेतल्या

४. एक हलकी वाफ

५. गरमा गरम मिरच्या तयार

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...

वल्लरी's picture

16 Dec 2008 - 10:31 am | वल्लरी

धन्यवाद पांथस्थ.....
पाकृ ला तुमच्या विशिष्ट/खाशी पध्द्तीने सजवल्या बद्द्ल.... :)

अवलिया's picture

14 Dec 2008 - 11:46 am | अवलिया

हाय हाय मिरची

लय भारी

-- अवलिया

अवलियाची अनुदिनी

मदनबाण's picture

16 Dec 2008 - 10:42 am | मदनबाण

सॉलिड... :)

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

वेताळ's picture

16 Dec 2008 - 10:57 am | वेताळ

मिरच्या खायला मलाही खुप आवडतात. वडापाव,भेल किंवा सामोसा तळलेल्या मिरच्या शिवाय खाणे ही कल्पनाच सहन होत नाही.बाकी भरलेल्या मिरच्या कधी खाल्ल्या नाहित तेव्हा हे पण आता करावे लागणार.
पाथंस्थ्या किचन सोडुन बाहेर कधी जातोस का रे तु?मस्तच फोटो दिले आहेस.
वेताळ

सायली पानसे's picture

16 Dec 2008 - 1:00 pm | सायली पानसे

जेवायला कधी येउ ते सांग? नुसती फोटो ने पोट भरत नाही ग....