मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भरली मिरची

वल्लरी · · पाककृती
खरं तर ही रेसीपी शाल्मली पासुन प्रेरीत होऊन केली आहे... पण भेंडी एवजी मिरची वापरली आहे... साहित्य :- मिरची नेहमीच्या नाही थोड्या जाड्या स्वच्छ धुवुन ,उभ्या चिरून चण्याच्या डाळीचं पीठ -पाव वाटी ओले खोबरं - १ वाटी दाण्याचा कुट-४ चमचे धने -जिरे पावडर , गरम मसाला, लाल तिखट, हळद -१ चमचा प्रत्येकी चिंच-गु़ळ कोळ मीठ - चवीनुसार कृती :- वरील सर्व साहित्य एका बाऊल मध्ये घेऊन नीट मिक्स करावे नि उभ्या चिरलेल्या मिरच्यांन मध्ये भरावे. खालील प्रमाणे भरलेल्या मिरच्या दिसतील आता फ्राय पॅन मध्ये थोडे तेल घालुन मिरच्या शॅलो फ्राय करुन घेणे. वरण-भात-तुप-लोणचे-पापड नी भरली मिरची वा!!! काय बेत आहे... ;;)

वाचन 8920 प्रतिक्रिया 0