शिवजयंती हायजँक ????

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
21 Aug 2015 - 1:14 pm
गाभा: 

महाराष्ट्र-भूषण पुरस्कारावरून आजूबाजूला एवढा गदारोळ उठलेला होता, त्यामुळे मी ठरवलं होत की एक मिपाकर म्हणून आपण त्या वादात पडायचं नाही, तर शिवरायांना सामान्य जनतेपर्यन्त कोणी पोहोचवण्याची सुरुवात केली व का ?, हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते. त्यावेळीसुद्धा मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला. त्यांच्यातल्या महाराजांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती पोटी महाराष्ट्राच्या राजाबद्दलची अस्मिता म्हणूनच १९ फेब्रुवारी १८६९ साली पहिली शिवजयंती पुणे येथे सुरू केली ती १८९० च्या आसपास निधन होईपर्यंत चालू होती. शिवरायांच्या प्रेरणेने महात्मा फुल्यांनी समाजकार्य सुरू केले होते. ते अस्पृश्यतेच्या रूढीवर प्रहार करू लागले होते. त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरू केल्या. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृती सुरू केली. पण सांगा बरे, आज तुम्हाला प्रश्न विचारला कोणी "शिवजयंती कोणी सुरु केली ?", तर चटकन त्याचे उत्तर काय बरे येते तुमच्या डोळ्यापुढे ?
आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते.

माझ्या वैयक्तिक मते आजपासून ६०-७० वर्षांनी, "शिवजयंती कोणी सुरु केली ?" या प्रश्नाचे उत्तर 'बाबासाहेब पुरंदरे' असे मिळाले तर त्यावेळी काहीही वावगे वाटणार नाही कदाचित…

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

21 Aug 2015 - 1:18 pm | कपिलमुनी

वैयक्तिक मते

मग असू द्या !

बाकी सध्या मिपावर नमो- केजरी मागे पडून शिवाजी महाराज हा विषय सेलेबल झाला आहे हे नमूद करतो

मंदार कात्रे's picture

21 Aug 2015 - 1:27 pm | मंदार कात्रे

'कुळवाडीभूषण' याचा अर्थ काय?

मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला.>

याखेरीज इतर काही केले नाही असे म्हणायचे आहे का? चार मुघल पादशाह्यान्चा बीमोड करून औरन्गजेबाच्या हतावर तुरी देवुन हिन्दवी स्वराज्य स्थापन करणे हा छत्रपती शिवरायांच्या आअयुश्यातील महत्त्वाचा भग वाटत नाही का?

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 1:43 pm | पगला गजोधर

'कुळवाडीभूषण' याचा अर्थ काय?

शेतकर्यांचे भुषण

याखेरीज इतर काही केले नाही असे म्हणायचे आहे का? चार मुघल पादशाह्यान्चा बीमोड करून औरन्गजेबाच्या हतावर तुरी देवुन हिन्दवी स्वराज्य स्थापन करणे हा छत्रपती शिवरायांच्या आअयुश्यातील महत्त्वाचा भग वाटत नाही का?

आहे ना जरूर महत्वाचा भाग आहे. पण ते important पार्ट आहे, Only पार्ट नाही . (म्हणजे (फक्त पातशाही नाश करणे ) तेवढंच नाही)

आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते.

हेही ध्यानात घ्यावे..

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 2:41 pm | पगला गजोधर

भिडस्त भारी । साबडा घरीं ॥
प्रिय मधुरी । भाषण करी ॥
मोठा विचारी । वर्चड करी ॥
झटून भारी । कल्याण करी ॥
आपासोयरीं। ठेवी पदरीं ॥
लाडावरी । रागावे भारी ॥

- महात्मा फुले!

हेमंत लाटकर's picture

24 Aug 2015 - 11:21 am | हेमंत लाटकर

१८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली.

हा उतारा संभाजी ब्रिगेडच्या लेखातून घेतलेला दिसतोय.

वेल प.ग.ंनी माहिती कुठून घेतली ते माहित नाही ते तेच सांगू शकतील. मराठी विश्वकोशात सत्यशोधक समाजातील
लोखंडे, नारायण मेघाजी यांच्या दीनबंधूने (नियतकालिक) रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज उठविला अशी नोंद आहे असे दिसते. संदर्भ: मराठी विश्वकोशावरील लोखंडे, नारायण मेघाजी लेखाची चव्हाण, रा. ना. यांनी लिहिलेली नोंद २४ ऑगस्ट २०१५ रोजी सकाळी ११ वाजून ४५ मिनीटांनी जशी पाहिली

पगला गजोधर's picture

19 Feb 2016 - 9:19 am | पगला गजोधर

हे सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते होते व महात्मा ज्योतिबा फुलेंचे अनुयायी सुद्धा.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

24 Aug 2015 - 12:04 pm | फुलथ्रॉटल जिनियस

त्यांनी सत्य लिहिले आहे ,लाटकर.प्रतिवाद करता येत नाही म्हणुन ब्रिगेडी वगैरे विशेषंण लावने सोडुन द्या.

सुबोध खरे's picture

21 Aug 2015 - 1:28 pm | सुबोध खरे

जाता जाता हे पण सांगून टाका कि गणेशोत्सव कुणी चालू केला आणी गणपती हा देव आहे हा शोध कुणी लावला?
श्री लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणी गणेशोत्सव हे उत्सव "सार्वजनीक" स्वरुपात सुरुवात केले असा इतिहास आम्ही शिकलो. याचा अर्थ हे दोन्ही उत्सव अगोदर सुद्धा चालू होतेच. लोकांमध्ये जागृती व्हावी लोकांन एकत्र आणावे आणी हे काम इंग्रज सरकारच्या डोळ्यात येणार नाही अशा तर्हेने व्हावे अशा सद्हेतूने लोकमान्य टिळकांनी दोन्ही उत्सव चालू केले असा इतिहास आम्ही शिकलो.
जर ब्रिगेडी लोकांना इतिहासाचे पुनर्लेखन करायचे असेल आपल्या चश्म्याने तर त्याच्या सारखी दुर्दैवाची गोष्ट दुसरी नसावी. ते लोक किती खालची पातळी गाठू शकतात याचा विक्रम रोज मोडला जात आहे.
आपला हेतू तो नसावा अशी अपेक्षा करतो.

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 1:33 pm | पगला गजोधर

"शिवजयंती कोणी सुरु केली ?" असा प्रश्न होता सर.

"सार्वजनिक गणेशोत्सव कोणी सुरु केला ?" असा नव्हता.

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 2:37 pm | पगला गजोधर

जयंतराव श्रीधर टिळक (टिळकांचे नातु) यानी “मी जयंत टिळक” नावाच पुस्तक लिहल व पदमगंधा प्रकाशनाने तो प्रकाशीत केला. या पुस्तकात जयंतरावनी लिहुन ठेवलय. “ माझ्या आजोबानी शिवजयंती पुढे आणली”.

आधी प्रश्न नक्की ठरवा ना गजोधर भैय्या.

शिवजयंती कोणी सुरु केली ?
सार्वजनिक शिवजयंती कोणी सुरु केली ?
शिवजयंती कोणी पुढे आणली ?

गोंधळ आहे... नक्की कशाचे उत्तर हवय ?

अवांतर: तुमचे नाव पाहिले कि राजू श्रीवास्तव चा गजोधर आठवतो. ह घ्या.

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 5:20 pm | पगला गजोधर

'शेतकऱ्यांच हित पाहणारा राजा' आणि अश्या राजाचे हे लोकहितकारी प्रतिमा साजरी करण्यासाठी केला जाणाऱ्या शिवजयंती उत्सवांच हायज्याक कधी होऊन ते , लोकांसमोर 'कट्टर हिंदू राजा' अशी प्रतिमा साजरी करण्यासाठी केला जाऊ लागला ?

अवांतर: हो जवळपास तसाच आहे मी (मूर्ख, अल्पबुद्धी, येड्च्याप ( माझी मत पाहून लोकांनी मला बोल लावण्याआधी मी स्वतःला पगला म्हणून जाहीर केलंय ) ) फक्त तो गजोधर युपी बिहारी होता, मी मराठी आहे.
;)

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Aug 2015 - 5:33 pm | अनिरुद्ध.वैद्य

म्हणजे नेमक काय? की फक्त कट्टर कट्टर करत ओरडत राहायचं? मुस्लिम राज्यकर्त्यांनी जशी पराजीतांच्या कत्तली केल्या किंवा गावे जाळली वा मंदिरे फोडली तसलं काही राजांनी केलं नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे.

कोणत्याही इतिहासकारांनी तस काहीही लिहील नाही. मग हा अट्टाहास का?

ती जयंती छत्रपतींची, जाणत्या राजांची ओळख व्हावी म्हणून फुल्यांनी सुरु केली. त्याच जयंती उत्सवास अन्यायाविरुद्ध आणि परकीय सत्तेविरुद्ध लढणारा राजा म्हणून जागृती व्हावी म्हणून टिळकांनी सुरु केली.

ह्यातून कट्टर हिंदू राजा हा शोध कोणी लावला आणि कसा लावला हे कळत नाही.

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 5:46 pm | पगला गजोधर

ह्यातून कट्टर हिंदू राजा हा शोध कोणी लावला आणि कसा लावला हे कळत नाही.

किंवा
शेतकऱ्यांचे हित साधणारा राजा हि प्रतिमा कोणी पद्धतशीरपणे पुसट करून ठेवली हेही कळत नाही.

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Aug 2015 - 6:07 pm | अनिरुद्ध.वैद्य

शेतकऱ्यांचे हित साधणारा राजा हि प्रतिमा कोणी पद्धतशीरपणे पुसट करून ठेवली हेही कळत नाही.

>>

प्रजेचे हित जाणणारा - जाणता राजा … म्हणजे तेच नव्हे का?

की तुम्हाला फक्त शेतकरीच म्हणायचे आहे?

काळा पहाड's picture

22 Aug 2015 - 5:41 pm | काळा पहाड

(१) काही काही ब्राम्हण शेतकरी असतात (२) सगळेच शेतकरी मराठा नसतात आणि (३) ब्राम्हण शेतकर्‍यांना पाण्यात पहात नाहीत - हे गजोधर साहेबांना सांगायला हवं. प्रतिमा पुसट करण्यासाठी यातलं काही तरी खरं नसायला हवं. महाराज ब्राम्हण सोडून सगळ्यांचे राजे होते आणि ब्राम्हणांनी काहीतरी कट करून त्यांना हिंदूंचा राजा 'बनवलं' हेच जर म्हणणं असेल तर तसं करण्यासाठी इतिहासात राजांची कमी होती काय? पहिला बाजीराव चालला नसता का? बाकी २०० वर्षं शेतकरी काय करत होते म्हणे?

'लोकवाङमय गृह' प्रकाशनाचे आहे. त्यातील ओळी

छत्रपतींविषयी समाजात वेगवेगळय़ा प्रकारचे गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं आणि गेली अनेक वर्षं केलं जात आहे. शिवरायांच्या हयातीतच त्यास प्रारंभ झाला होता, ही बाब तर सर्वश्रुतच आहे. पण पानसरे यांनी त्या सर्व समज-गैरसमजांना सज्जड पुराव्यानिशी छेद देत, त्यातून हा `जाणता राजा' कसा सर्व समाजाचा आणि विशेषत: `आम आदमी'चा राजा होता, ते दाखवून दिलं आहे.

शेतकर्यांचा राजा, छत्रपति शिवाजी महाराज की जय !

सुबोध खरे's picture

19 Feb 2016 - 9:38 am | सुबोध खरे

मग बाकी बलुतेदार किंवा इतर व्यावसायिक यांचे ते राजे नव्हते? आम्ही तर असे वाचले होते कि ते सर्व प्रजेचे राजे होते. शिवरायांना एकाच जातीचे म्हणून कुंठीत करण्याचा हा अट्टाहास कशासाठी?
(वादासाठी गोब्राम्हण प्रतिपालक सोडून द्या)

पगला गजोधर's picture

19 Feb 2016 - 10:10 am | पगला गजोधर

शिवरायांना एकाच जातीचे म्हणून कुंठीत करण्याचा हा अट्टाहास कशासाठी?

'शेतकर्यांचा राजा' यामधे तुम्हाला जात कुठे दिसली.

मग बाकी बलुतेदार किंवा इतर व्यावसायिक यांचे ते राजे नव्हते?

'शेतकर्यांचा राजा' म्हणजे, 'बाकी बलुतेदार किंवा इतर व्यावसायिक यांचे ते राजे नव्हते?' असा जावईशोध आपण कशाच्या बळावर लावला ?

टवाळ कार्टा's picture

19 Feb 2016 - 12:20 pm | टवाळ कार्टा

मग "रयतेचा राजा" असे का म्हणू नये? फक्त "शेतकर्यांचा राजा" म्हटले तर बाकीच्या लोकांतल्या काही हलक्या मनांच्या लोकांना का दुखवावे? उग्गीच्च?

म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते.

किती बिनबुडाचे फेकायचे याला लिमिट पाहिजे. राजाराम छत्रपती वारले १७०० साली. त्यानंतर त्यांच्या समाधीचा उत्सव सुरू असल्याचे अस्सल पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराजांच्या समाधीचाही उत्सव नक्कीच साजरा होत असला पाहिजे, किमान १८१८ पर्यंत- जेव्हा इंग्रजांच्या स्वाधीन गड करावा लागला तेव्हा. आणि रोचक गोष्ट म्हणजे रायगडाचा शेवटचा किल्लेदार होता शेख अबुद नामक मुसलमान.

ते एक असो, १८६०-७० च्या सुमारास सातारच्या कुणी भोसल्याने तिथे जाऊन खजिन्याच्या आशेने कुदळ मारली असा उल्लेख गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत आहे. ज्यांना ही सातारच्या गादीची बदनामी वाटते किंवा अजून काही, त्यांनी दुर्गभ्रमणगाथा या पुस्तकावर बंदीची मागणी करावी आणि गोनीदांबद्दल टिपिकल पातळी सोडून लेख लिहावेत अशी विनंती आहे.

त्यामुळे फुल्यांपर्यंत या समाधीची कुणालाही माहिती नव्हती हे विधान अतिशय निराधार आहे. दुर्गभ्रमणगाथेतले अजूनही काही उल्लेख बघावेत. कुणी सिंक्लेअर नामक इंग्रज अधिकारी तिथे जाऊन आला आणि त्याने समाधी पाहिली आणि इतक्या महान राजाच्या समाधीकडे असे दुर्लक्ष केल्याबद्दल लै श्या घातल्या, थोडी डागडुजी वगैरे केली कदाचित. नंतर टिळक आले आणि त्यांनी सगळीकडे प्रसार करून सुळे नामक इंजिनियरकडून समाधी पुन्हा बांधून घेतली.

फुल्यांचा उल्लेख मी वाचला होता पण नक्की कुठल्या पुस्तकात ते विसरून गेलो. तस्मात पगला गजोधर यांनी पुस्तकाचे नाव सांगावे अशी विनंती.

प्रसाद गोडबोले's picture

21 Aug 2015 - 2:00 pm | प्रसाद गोडबोले

तुम्हाला निवडणुकीत उभे रहायचे नाहीये ना म्हणुन तुम्ही असे स्पष्ट बोलु शकता पण ज्यां बिचार्‍यांन्ना निवडणुक लढवायची आहे त्यांच्या हातातुन मुद्दे असे का बरे हिसकावुन घेता ?

-

बॅटमॅन's picture

21 Aug 2015 - 2:05 pm | बॅटमॅन

हा हा हा =)) बिच्चारे उमेदवार =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Aug 2015 - 11:33 pm | डॉ सुहास म्हात्रे

नायतर काय ? राज्कारणात राज्कारण करायचं असतं. राज्कारणात खरं बोलायचं काम नाय वो गोथामकर ! =))

नाखु's picture

25 Aug 2015 - 11:31 am | नाखु

बॅट्याचे म्हणून कुणी अपहरण करीत नाही.

खंडणीपेक्षा त्याला सांभाळायचा त्रास मोठा आणि ठेऊन घ्या तुमच्याकडेच त्याचे पैसे देतो (पाहीजे तर) असे म्हणतात हे लोक !!!

खुलासेदार नाखु

माहितगार's picture

21 Aug 2015 - 2:18 pm | माहितगार

हा सिंक्लेअर कोणता असेल ? एक दोन गूगलात शोधणे अवघड गेले. सिंक्लेअर चे रोमन लेखन Sinclair असेल तर बहुधा ते स्कॉटीश क्लॅन आणि आडनाव दिसते आहे.

स्कॉटिशच असावा. ब्रिटिश काळात अनेक स्कॉटिश लोक भारतात आले होते. पण नक्की कोण, कुठला हे माहिती नाही. बहुधा जिल्ह्याच्या गॅझेटिअरवरून गोनीदांनी ही माहिती घेतली असावी असे वाटते, ते चेकवले पाहिजे.

माहितगार's picture

21 Aug 2015 - 2:41 pm | माहितगार

हम्म आपण म्हणता तसे कदाचित गॅझेटीयर मध्ये माहिती मिळणे सोपे जाईल

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 2:25 pm | पगला गजोधर

१. 'हर्मिस प्रकाशना'ने प्रकाशित केलेले 'कुळवाडीभूषण शिवराय' हे पुस्तक
२. महात्मा जोतीरावांचे समग्र साहित्य : छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा (१८६९),
बाकीचे दुवे शोधायाला थोड जड जातंय पण मी देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.

सर्वप्रथम महात्मा फुलेंनी १८६९ साली शिवजयंती साजरी केली होती व त्याची नोंद ब्रिटीशकालीन पोलिसांच्या कार्यलयात आहे.

बॅटमॅन's picture

21 Aug 2015 - 2:41 pm | बॅटमॅन

धन्यवाद.

बाकी २०० वर्षांत शिवरायांची कुणालाही आठवण उरलेली नव्हती हा दावा फोल आहे हे सिद्ध झालेले आहेच.

धडपड्या's picture

21 Aug 2015 - 6:48 pm | धडपड्या

आपण आवळस्करांचे, "रायगडाची जीवनकथा" हे पुस्तक वाचले आहे का? यात फुल्यांचा कोठेही उल्लेख नाही.. त्यांच्या अभ्यासानुसार, १८८३ मध्ये एक ब्रिटिश महिला पहिल्यांदा तेथे गेली... १८८५ मध्ये मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेंपल, रेव्हेन्यु कमिश्नर क्रॅाफर्ड, कॅप्टन पीट वगैरे मंडळी तेथे गेली. तेव्हा टेंपलने समाधीच्या दुरुस्तीच्या सुचना दिल्या, व कुलाब्याच्या कलेक्टर ला पत्र लिहीले असा उल्लेख आवळस्कर करतात..

१८८७ मध्ये कोणी लॅार्ड रे ने समाधिसाठी दरसाल ५ रु सरकारी मदत मिळवून दिली.. त्यानंतर एकदम १९९५ मध्ये टिळकांनी अग्रलेख, सभा वगैरेंना सुरुवात केली.. या नंतच्या घडामोडींमध्येही फुल्यांचा कोठेच उल्लेख नाही..

माझ्यामते फुले हे काही एवढे दुर्लक्षणीय नक्किच नव्हते, की त्यांच्या भेटीचा कोणत्याच प्रकारचा उल्लेख सापडणार नाही, किंवा असा उल्लेख दडवून कोणाला कोणताच लाभही नसावा...

अस्वस्थामा's picture

21 Aug 2015 - 2:58 pm | अस्वस्थामा

बॅट्या, तू मिथबस्टर म्हणून एक सिरीज सुरु भाउ.. कारण अशा खूप सार्‍या गोष्टी आहेत की त्या पूर्वी वर्तमानपत्रात वगैरे लिहून आल्यात, पुस्तकात छापून आल्यात म्हणून लोकांनी विश्वास ठेवून, सांगून वगैरे आता प्रस्थापित झाल्यात. जर अशा गोष्टींना आताच नवीन माध्यमात तरी स्पष्ट केले नाही तर त्या तशाच प्रस्थापित म्हणून सुरु राहतील. त्यावर ज्याला जे माहित असेल ते त्यावर सांगतील आणि तुझे चूक असेल तर दुरुस्त करता येईल अथवा इतरांना त्यांचे फॅ़क्ट्स पण सुधारता येतील.

(हा कळकळीचा आणि शिरेस सल्ला आहे.)

सुदैवाने काहीजणांनी आलरेडी हे काम केलेले आहे.

एक उत्तम ब्लॉग खालीलप्रमाणे.

www.kaustubhkasture.in

अस्वस्थामा's picture

21 Aug 2015 - 6:51 pm | अस्वस्थामा

तुझाच है कय हा "ब्लोग" ? ;)

बॅटमॅन's picture

21 Aug 2015 - 7:47 pm | बॅटमॅन

नाय बा. तो मी न्हवेच. :)

विकास's picture

21 Aug 2015 - 7:55 pm | विकास

खूपच छान आहे हा ब्लॉग!

अनेक धन्यवाद.छान ब्लाॅग आहे.

हेमंत लाटकर's picture

22 Aug 2015 - 5:29 pm | हेमंत लाटकर

बॅटमॅन तुम्ही सुचविलेला ब्लाॅग www.kaustubhkasture.in छान वाटला. यातील शनिवाड्यावरील माहिती छान वाटली. धन्यवाद!

हेमंत लाटकर's picture

22 Aug 2015 - 6:27 pm | हेमंत लाटकर

अस्वथामा म्हणजे महाभारतातील घृणायुक्त पात्र ज्याने पांडवाच्या 5 पुत्रांचा झोपेत वध केला. दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले. ज्याने बाम्हणांचे नाव खराब केले. सर्व बाम्हण (मी सुद्धा) अस्वथामा पात्राचा निषेधच करतील. अशा पात्राचे नाव तुम्ही मिपा/ऐसी अक्षरे साठी सदस्य म्हणून वापरले. धन्य आहे तुमची.

प्यारे१'s picture

22 Aug 2015 - 6:36 pm | प्यारे१

हेमंत लाटकर आगे बढो, हम आपके साथ है!

ह्या लोकांना चांगला धडा शिकवलाच पाहिजे.
एक तर १३ व्या महिन्याचा बोनस खाल्ला ते खाल्ला आमचा आणि आता हे असं काहीही.

हे असं चालणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही.

हेमंत लाटकर's picture

22 Aug 2015 - 8:00 pm | हेमंत लाटकर

आघी आगे बढो म्हणायचे आणि वेऴ आली की मागच्या मागे पळायचे. ha! ha!

प्यारे१'s picture

22 Aug 2015 - 8:16 pm | प्यारे१

बस्स क्या बावा....?
आप आगे तो बढो. आप इधरीच झगडा कर्ते बैठे बोले तो आगे कैसे और कब बढोगे?

हेमंत लाटकर's picture

22 Aug 2015 - 10:35 pm | हेमंत लाटकर

एक तर १३ व्या महिन्याचा बोनस खाल्ला ते खाल्ला आमचा आणि आता हे असं काहीही.

अजून तो विषय संपलेला नाही, त्यावर विचार चालु आहे,

हे असं चालणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही.

या वाक्याचा अर्थ काय आहे, कोणाला उद्दशूम आहे.

पैसा's picture

22 Aug 2015 - 7:55 pm | पैसा

नीट वाचत जा! अस्वस्थामा आहे तो, अश्वत्थामा नाही.

हेमंत लाटकर's picture

22 Aug 2015 - 8:10 pm | हेमंत लाटकर

अहो दादा dusyodhankivyatha.blogspot.com/2010 ब्लाॅग वाचा आणि सांगा अस्वस्थामा व अस्वत्थामा नाव एक आहे का वेगवेगळे आहे.

पैसा's picture

22 Aug 2015 - 8:24 pm | पैसा

हसून मेले! मी महाभारत वाचते. तुम्ही पण इकडचे तिकडे वाचण्यापेक्षा तेच वाचत जावा प्लीज! आणि तो ब्लॉग बघितला. त्याने अस्वथामा असे तिसरेच आणि तेही चुकीचे लिहिले आहे. तशाही त्या ब्लॉगवरच्या शुद्धलेखनाच्या चुका बघून जास्त काही वाचायचं धाडस झालं नाही. =))

हेमंत लाटकर's picture

22 Aug 2015 - 9:26 pm | हेमंत लाटकर

ताई मी गुगलवर चेक केले अस्वस्थामा, अस्वथामा आणि अस्वत्थामा हे तिन्ही नावे महाभारतातील द्राेणाचार्य पुत्र अस्वत्थामासाठीच वापरला आहे. ज्याने द्रोपदीच्या 5 ही पुत्रांचा झोपेत वध केला. हा ब्लाॅग वाचा. indianthefriendofnation.blogspot.com/..

प्यारे१'s picture

22 Aug 2015 - 9:29 pm | प्यारे१

तुम्ही बरोबर आहात.

पैसा काकू हो म्हणा ओ. नवीन लेखकांना प्रोत्साहन द्या की जरा.

पैसा's picture

22 Aug 2015 - 9:35 pm | पैसा

लाटकर साहेब बरोबर. पण कृपया आणखी ब्लॉग्जच्या लिंक्स देऊ नका!

gogglya's picture

26 Aug 2015 - 2:27 pm | gogglya

लिंक आवर !

त्या तुम्हाला काका म्हणत आहेत, तुम्ही त्यांना दादा म्हणताय, त्या आहेत ताई, आणि दादा तर अजून भलतेच (लई फ्यॅमस माणूस). लई कंफुजन झालंय बघा :) (लई दिस झालं दादा काय दिसंनात? :) उडाले का काय भुर्रर्र )

अस्वस्थामा's picture

24 Aug 2015 - 4:30 am | अस्वस्थामा

अस्वथामा म्हणजे महाभारतातील घृणायुक्त पात्र ज्याने पांडवाच्या 5 पुत्रांचा झोपेत वध केला. दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले. ज्याने बाम्हणांचे नाव खराब केले. सर्व बाम्हण (मी सुद्धा) अस्वथामा पात्राचा निषेधच करतील. अशा पात्राचे नाव तुम्ही मिपा/ऐसी अक्षरे साठी सदस्य म्हणून वापरले. धन्य आहे तुमची.

ओ काका.. चूक दाखवली म्हणून इतकं व्यक्तिगत व्हायची कै गरज ?
मी काय पण आयडी घेईन (बादवे ते अस्वस्थ आत्मा = अस्वस्थात्मा असे अपेक्षित होते. सुरुवातीच्या दिवसात एका संस्थळावर चुकून असे लिहिले गेले म्हणून तसेच वापरतोय. पण असो), हिटलर घेईन नै तर सावरकर घेईन नै तर भीमराव नै तर अजून काही.! तुमाला काय करायचंय?

घ्या तुमचा १३व्या महिन्याचा पगार राव आणि डोकं खाऊ नका..
एक चुकलेलं गणित दुरुस्त करुन दिलं तर हा आयडी "बदले की आग" मध्ये इथे पेटतोय उगी. कैच्या कै.

दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले. ज्याने बाम्हणांचे नाव खराब केले. सर्व बाम्हण (मी सुद्धा) अस्वथामा पात्राचा निषेधच करतील.

पहिली गोष्ट म्हणजे जरी अश्वत्थाम्याच्या नावावरुन प्रेरित असलं तरी ते नाव मी घेतलेलं नाही (आणि तसंही ते अस्वथामा नाहीय!)

मी ब्राह्मण (की ब्राम्हण ते तुम्ही इतर ब्रह्मवृंदास विचारुन ठरवा) असेन नसेन पण त्याचा इथे काहीही संबंध नाही. तुम्ही त्याच्यावरुन मला जज करण्याचादेखील शष्प संबंध नाही. या धाग्यावर देखील या प्रतिसादाचा काही संबंध नाही.!
इथे जात काढायचा काय संबंध.. ??

असल्या पोकळ अभिमानी लोकांनी तर सगळं वातावरण दुषित करुन ठेवलंय सगळं.. :\
निषेध करायला अनेक दुराचारी, भ्रष्टाचारी सर्व जाती-जमाती,धर्मातले पुरेसे लोक आजूबाजूला आहेत. त्यांचा करा. त्यांच्या तोंडावर करा. व्यासांनी निर्मिलेल्या अथवा हजारो वर्षांपूर्वीच्या इतिहासातल्या (तुम्हाला काय हवे ते घ्या) एका पात्राबद्दल निषेध करुन काय होणारेय.

अशा पात्राचे नाव तुम्ही मिपा/ऐसी अक्षरे साठी सदस्य म्हणून वापरले. धन्य आहे तुमची.

एक तुमची चूक सांगणारा प्रतिसाद काय दिला तर तुम्ही पार इतर धाग्यांवर येऊ येऊ माझ्या आयडीबद्दल आणि त्याच्यावरुन माझ्याबद्दल लिहू पाहताय !! खरंच धन्य आहे तुमची.

[हा माझा तुम्हाला पहिला आणि शेवटचा व्यक्तिगत पिंकेवरचा साध्या शब्दातला प्रतिसाद राहील, यापुढे धाग्यासंदर्भात मुद्दे मांडावेत, प्रतिवाद करावेत, जमत नसेल तर वाचन करावे. मनाजोगते प्रतिसाद नै आले तर उगी माझ्याच नव्हे कोणाच्याच बाबतीत व्यक्तिगत होऊ नये. आपले बाहेरच्या जगातले अहं इथे आणू नयेत. व्यक्तिगत उतरलात तर आधी इग्नोर मारण्यात येईल आणि नंतर (जौ दे, इग्नोरच मारेन!) याची नोंद घ्यावी.]

हेमंत लाटकर's picture

24 Aug 2015 - 8:27 am | हेमंत लाटकर

मी हे तुम्ही माझ्या धाग्यात चुक दाखवली म्हणून लिहले नाही तर तुम्ही टिकोजीराव म्हणाले म्हणून विनोदात लिहले. आयडी घेणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. पण आयडी घेताना चांगले असले तर बरे वाटते. टिळक, सावरकर, भीमराव हे चांगले वाटते जर हिटलर, दुर्याधन, हे घेतले तर वाईट वाटते. तुम्ही जो आयडी घेतला आहे ताे अस्वस्थामा (अस्वस्थ+आत्मा) हे इतके डीप मघ्ये बघेल सहज बघेल. अस्वस्थामा, अस्वथामा, अस्वत्थामा ही तीनही नावे द्रोणाचार्य पुत्र अस्वत्थामाचीच माहिती गुगल वर दाखवतात.

दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले . या वाक्याचा अर्थ मी जात काढण्यासाठी केला नाही तर एका ब्राम्हण गुरूचा मुलगा असूनही असे हीन काम केले म्हणून लिहले बाकी नाही. बी पाॅझिटिव्ह.

शलभ's picture

24 Aug 2015 - 1:34 pm | शलभ

हा हा हा..;)

अस्वस्थामा's picture

24 Aug 2015 - 2:30 pm | अस्वस्थामा

मी हे तुम्ही माझ्या धाग्यात चुक दाखवली म्हणून लिहले नाही तर तुम्ही टिकोजीराव म्हणाले म्हणून विनोदात लिहले.

हेच ते बदले की आग..!! आणि ते तिथेच लिहायचेत या दुसर्‍या धाग्यावर अवांतर कशाला ? तसाही तो विनोद असेल तर तुमच्या विनोदबुद्धीस _/\_.

आयडी घेणे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे.

हे तुमच्या लक्षात आल्याबद्दल धन्यवाद.

पण आयडी घेताना चांगले असले तर बरे वाटते. टिळक, सावरकर, भीमराव हे चांगले वाटते जर हिटलर, दुर्याधन, हे घेतले तर वाईट वाटते.

मला वाटतं हा ज्याच्या त्याच्या बघण्याचा दृष्टीकोन आहे. मी अमुक आयडी घेतला म्हणून अमुक होतो असे नव्हे. उद्या तुम्ही "जोकर" आयडी घेतलात म्हणून तुमच्या विनोदास लोक हसतील असेही नव्हे. तेव्हा "डोळे उघडा, बघा नीट".

अस्वस्थामा, अस्वथामा, अस्वत्थामा ही तीनही नावे द्रोणाचार्य पुत्र अस्वत्थामाचीच माहिती गुगल वर दाखवतात.

प्रथमतः माझे आयडी नाम गुगलून पाहिल्याबद्दल धन्यवाद. मी पण ते कधी केले नव्हते. ;)
खुसपट काढायला का होईना पण तुम्ही ते केल्याबद्दल आभारच मानले पाहिजेत. पण त्याचबरोबर जे गुगल सांगतो ते "बाबा वाक्यं प्रमाणं" नसतंय हो.. लई कचरा असतोय. जरा लॉजिक लावावं लागतंय काय चूक काय बरोबर ते शोधायला. तस्मात तुम्हाला आढळलेले उल्लेख बरोबर आहेत असे म्हणवत नाही.
बाकी तुम्हाला इतरांनी सांगितलेच आहे आणि सूज्ञास अधिक सांगणे न लगे. :)

दोणाचार्याचा (ब्राम्हण गुरूचा) पुत्र असूनही हे कृत्य केले . या वाक्याचा अर्थ मी जात काढण्यासाठी केला नाही तर एका ब्राम्हण गुरूचा मुलगा असूनही असे हीन काम केले म्हणून लिहले बाकी नाही.

"ब्राम्हण गुरूचा मुलगा असूनही" इथे तुमचा छुपा जातीयवाद दिसत नाही काय ? दुसर्‍या कुठल्या जातीचा असता तर चालले असते काय तुम्हाला ? की "ब्राह्मण श्रेष्ठ " म्हणून त्याने जे केले ते तुम्हाला खटकतेय ? मग आईचे मुंडके उडवणार्‍या परशुरामाबद्दल तुमची मते जहालच असतील. नै का ? (इथे अवांतर नको! जस्ट उदा. आहे)
कुणीही चुकीचे काम केले तर (किंवा तुम्हाला असे वाटत असेल तर) त्याचा निषेध करायला हवा, फक्त ब्राह्मण आहे म्हणून नव्हे.
तुमचा जातीयवाद स्पष्ट दिसतोय आणि त्याचा निषेध केला गेला पाहिजे असे वाटते..

बी पाॅझिटिव्ह.

तो आमचा रक्तगटच आहे तेव्हा चिंता नसावी.
परंतु एक सांगावेसे वाटते.
कोणतेही किंतु न बाळगत वावरा ना तुम्ही. जालावर बाहेरचे तुमचे मान-अपमान, जाती, धर्म बाहेरच ठेवून या. ही चांगली संधी आहे, एक वेगळा "अवतार" म्हणून सगळ्याच गोष्टींकडे पहायची. वेगळे दृष्टीकोन आजमवायची. इथे एखाद्या तज्ञापासून ते शेंबड्या पोरांपर्यंत सगळेच आहेत. आणि कोणीही कोणाला कशाही बद्दल बेधडक विचारु शकतो, वाद घालू शकतो. एरवी लोक तोंडावर जे स्पष्ट बोलणार नाहीत ते इथे बोलतायत तर त्याबद्दल या सुविधेचे आभारच मानले पाहिजेत की त्याचा राग मनात घेऊन या संस्थळाचे संस्थळावर, या धाग्याचे त्या धाग्यावर उट्टे काढायचे? हे कशाला ?

असो, तुम्हीच "मोठे व्हा" काका.

(तुम्हाला काका म्हणतोय म्हणून आम्हाला शेंबडे पोर समजू नये, "काका")

हेमंत लाटकर's picture

24 Aug 2015 - 4:26 pm | हेमंत लाटकर

अस्वस्थामा साष्टांग नमस्कार. यापुढे तुमच्या सुचना जरूर पाळेल. (हे सर्व वाद निवळण्यासाठी भिऊन नव्हे)

परशुरामाने आईचे मुंढके उडवले ते वडिलांची आज्ञा मोडू नये म्हणून त्याबरोबर परशुरामाला वडिलांचे (जमदग्नींचे) योगसामर्थ माहित होते ते आई रेणूकेला परत जिवंत करतील.

माहीती असताना चुकीचे कृत्य केले तरीही ते बरोबर ? अजब तर्कशास्त्र आहे आपले! __/\__

काळा पहाड's picture

25 Aug 2015 - 12:27 am | काळा पहाड

मी पण तुम्हाला अश्वत्थामाच समजत होतो. मला वाटलं "अस्वस्थ अश्वत्थामा" अशी काही तरी फोड असेल.

इरसाल's picture

24 Aug 2015 - 2:01 pm | इरसाल

आता त्यांना "शष्प" चा अर्थ पण सांगुन टाका नाय्तर त्यासाठी नव्या ब्लॉगची लिंक चिकटवतील !

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Aug 2015 - 4:57 pm | अनिरुद्ध.वैद्य

पैल्या धा परतीसादात अशी मारामारी करून अख्या कुस्तीचा मजा घालवल्याबद्दल णीषेध.
आस फुस्स करतात होय? तुमी येक्दामस हारवी द्येंत याक्ट लावून सर्वा लोकांना आत टाकून दिले ;)

अवांतर: गो नि दांडेकरांचे पुस्तक वाचून महात्मा फुल्यांनी खरच शोधली का असे वाटून गेले होते.

श्रीरंग's picture

22 Aug 2015 - 5:53 pm | श्रीरंग

गोनिदा म्हणजे "दांडेकर" ना? मग त्यांनी.. सॉरी.. त्यानी लिहिलेलं सर्वच सपशेल खोटं, आणी महाराजांविषयी बदनामीकारकच असणार. लोकमान्य टिळक हेदेखील एखादं काल्पनीक पात्र असेल कदाचित. किंवा अस्लेच खरे, तर बाळ गंगाधर टिळक लोकमान्य नक्कीच नसणार. त्यांच्या जातीच्या इतिहास संशोधकांनी ही खोटी पदवी चिकटवली असणार त्यांना.. सॉरी.. त्याला.

मालोजीराव's picture

23 Aug 2015 - 11:17 pm | मालोजीराव

शिवचरित्रमाला मध्ये बाबासाहेबांनी डिटेल रेफरन्स दिलाय फुल्यांचा....मधल्या काळात नरकेंनी फुल्यांच्या समाधीला भेट दिल्याच्या नोंदी शोधल्या आहेत

समाधीची दुरवस्था जेम्स डग्लस मुळेच खर्या अर्थाने सर्वांसमोर आली,त्यानेच शासकीय यंत्रणा हलवली असे माझे वैयक्तिक मत आहे

1
.
.
.
1
.
.
.
इतिहासाचार्य राजवाडे यांच्या १९१० सालच्या एका निबंधातील हे उतारे आहेत. निवडक लेख या समन्वय प्रकाशन कोल्हापूर च्या पुस्तकात २६३ २६४ या पानांवर हे वाचता येईल. यापेक्षा जुने उल्लेख कुठे वाचले असतील तर जरूर द्या. म. जोतीराव फुले यांना त्यांचे योग्य श्रेय मिळालेच पाहिजे. राजवाड्यांनी या निबंधात कोणा सकपाळचा उल्लेख केला आहे, पण शिवजयंती उत्सव राजवाडे म्हणतात त्यापूर्वी २५ वर्षे पुण्यात सुरू असेल तर त्यांना माहीत नव्हते असे होणार नाही. अशा परिस्थितीत म. फुल्यांचा या निबंधात उल्लेख नाही हे आश्चर्यकारक वाटले. कारण राजवाडे म. फुल्यांचा उल्लेख चुकीने किंवा आकसाने टाळणे शक्य नाही.

ज्योतिराव फुल्यांना महात्मा पदवी कुणी दिली होती? त्यांनी ब्रिटीशांना विरोध वगैरे केला होता का?
त्यांची समाज सुधारणा आणि शिक्षण (विशेषत: स्त्री) क्षेत्राताली कामगिरी असाधारण असली तरी इतर मुद्दे पटण्या सारखे आहेत का? शिक्षण क्षेत्र किंवा समाज सुधारणा सुद्धा इंग्रजांच्या पठडीत राबवण्याचा प्रयत्न होता का?

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 3:13 pm | पगला गजोधर

महात्मा फुलेंना महात्मा पदवी कोणी दिली असे विषय काढून धागा कृपया भरकटवु नका.
(तुमच्या माहितीसाठी, मुंबईतील कामगार चळवळीचे प्रणेते लोखंडे यांनी ती दिली, आचार्य अत्रेंनी केलेला चित्रपट पहा महात्मा फुल्यांवरचा. )
अवांतर : कृपया वरील प्रतिसादाला प्रत्युतर म्हणून 'लोकमान्य', 'स्वातंत्र्यवीर' या पदव्यांचे उगमस्थानाबाबतीत नस्त्या चौकश्या सुरु करू नका.

राजवाडेंच्या उपरोक्त लेखनातील "शंभूमहादेवास शिवाजी, शिवाजीचे पुर्वज, शिवाजीचे वंशज यांची राउळे आहेत." या उल्लेखातील शंभूमहादेव हे ठिकाणाचे नाव आहे का ? तसे असल्यास हे ठिकाण कोठे आहे ?

पैसा's picture

21 Aug 2015 - 3:09 pm | पैसा

शिखर शिंगणापूर असावे. मी तिथे गेलेली नाही त्यामुळे नक्की सांगू शकत नाही. पण शिखर शिंगणापूरचाच उल्लेख शंभूमहादेव असा करतात.

माहितगार's picture

21 Aug 2015 - 3:20 pm | माहितगार

ओह ओके तुम्ही म्हणता ती शक्यता बरोबर वाटतीए. मिपाकरात दुजोरा देऊ शकतील असे अजून कुणी जाणकार आहेत का ?

मला वाटतं तेच असावं. आमच्या घरातले जातात दर वर्षी.
आणि उदयनराजेंची खासगी मालमत्ता आहे.

मराठी विकिपीडियावरील सध्याची नोंद खालील प्रमाणे आहे.

शंभू महादेव हे भोसले घराण्याचे कुलदैवत असल्याने मालोजीराजे भोसले आपल्या परिवारासह देवदर्शनासाठी येथे येत. पाण्याच्या दुर्भिक्षेमुळे भाविकांचे होणारे हाल पाहून मालोजी राजांनी येथे इ.स. १६०० साली एक मोठे तळे येथे बांधले, त्यास पुष्करतीर्थ असे म्हणत; त्यालाच आता शिवतीर्थ म्हणतात. पूर्वीचे देऊळ पडल्यामुळे १७३५ मध्ये शाहू महाराजांनी सध्याचे देऊळ बांधले. १९७८ मध्ये त्याचाही जीर्णोद्धार झाला. दक्षिणेतील रामस्वामी नावाच्या एका स्थापत्यतज्‍ज्ञाकडून शिखराची व मंदिराची डागडुजी करून त्यांना आकर्षक रंग देण्यात आला आहे.

हि नोंद बहुधा शिखर शिंगणापूरच्या मुख्य शंभू महादेव मंदिरा बाबत असावी. राजवाड्यांनी राऊळे आहेत असा अनेकवचनी उल्लेख केला आहे. शिखर शिंगणापूरास भोसले घराण्याची शंभू महादेवा शिवाय इतरह मंदिरे आहेत का ?

कपिलमुनी's picture

21 Aug 2015 - 2:40 pm | कपिलमुनी

यांपैकी कोणीही शिवजयंती चालू केली असेल त्याने काय फरक पडतो ? महराष्ट्राच्या जडणघडणी मध्ये दोघांचा वाटा आहे.

आज तुम्हाला प्रश्न विचारला कोणी "शिवजयंती कोणी सुरु केली?", तर चटकन त्याचे उत्तर काय बरे येते तुमच्या डोळ्यापुढे ?

ज्याच्या त्याच्या ज्ञानावर अवलंबून आहे. इथे अमोल कोल्हेचा फोटो लावून शिवजयंती करणारी मंडळे आहेत.
आणि शिवजयंती कोणी सुरू केली हा प्रश्नच फसवा आहे. कारण शिवजयंती चा "उत्सव" हा टिळकांनी सुरू केला.
त्यापूर्वी कदाचित फुलेंनी तो उत्सव सुरु केला असेल मग त्याच्या योग्य नोंदी शोधून तो इतिहास सुधारला पाहिजे.
ज्याप्रमाणे गणेशोत्सव पूर्वी घरोघर असायचा पण सार्वजनिक उत्सव टिळकांनी सुरू केला.

इतिहास ही नवनवीन संशोधनाने बदलणारी गोष्ट आहे. त्यामध्ये श्रेयवाद किंवा अभिमान याला स्थान नसते.

पैसा's picture

21 Aug 2015 - 2:44 pm | पैसा

सहमत आहे.

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 3:07 pm | पगला गजोधर

शिवाजी महाराज शेतकऱ्यांचे हितकारी धोरण ठेवणारा राजा, आणि शिवजयंती निम्मित सरकारने करोडो अब्जो रुपये खर्चून
अरबी समुद्रात पुतळा उभारण्यापेक्षा, छोटी छोटी अनेक धरणे तळी निर्माण करावी. शिवजयंती निम्मित धरणातला गाळ काढणे किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग असे उपक्रम राबवावे… असं मला म्हणायचं

मास्टरमाईन्ड's picture

21 Aug 2015 - 3:12 pm | मास्टरमाईन्ड

अरबी समुद्रात पुतळा उभारण्यापेक्षा, छोटी छोटी अनेक धरणे तळी निर्माण करावी. शिवजयंती निम्मित धरणातला गाळ काढणे किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग असे उपक्रम राबवावे… असं मला म्हणायचं

खरंच हे गरजेचं आहे.

बॅटमॅन's picture

21 Aug 2015 - 3:20 pm | बॅटमॅन

लैच अपेक्षा तुमच्या.

अन स्मारकच करायचं तर शेप्रेट पुतळ्याची तरी गरज काय? आहे ते गडकिल्ले नीट जपले तरी लै झालं. त्यांच्याच कामात भ्रष्टाचार होतोय कोट्यवधींचा, दोन छोटी तळी साफ केल्यावर हजार घनमीटर वाळू उपसल्याचे आकडे दाखवतात...काय बोलावं तितकं थोडंच आहे.

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 3:31 pm | पगला गजोधर

जनतेने, महाराज्यांचे नाव घेऊन-आपली तुंबडी भरणाऱ्या राजकारण्यांना, आठवण करून द्यावी,
की राजांचे स्वराज्य 'जय कुळवाडी जय मावळे' (जय जवान जय किसान च्या चालीवर) धोरणावर होते.
इकडे आपल्या बापजाद्याची जयंती पुण्यतिथी ग्रेगोरिअन कॅलेंडर प्रमाणे साजरी करणार, मात्र महारांजांची
जयंती पुण्यतिथी मात्र तिथीप्रमाणेच साजरी करा म्हणून जनतेला वेठीस ठेवणार।

फुलथ्रॉटल जिनियस's picture

21 Aug 2015 - 3:39 pm | फुलथ्रॉटल जिनियस

छान प्रतीसाद,महाराष्ट्रातल्या एका कथीत ईतिहासकाराने ,ज्याने म्हणे
आयुष्य वेचले आहे शिवप्रचारासाठी ,त्यानेच हा तिथिचा घोळ घातला आहे.
साळगावकरांना तिथी सुचवली आणी राज्य सरकारला तारीख कळवली,अश्या लोकांचा उदोउदो करण्यात लोक आपला वेळ खर्ची .

अहो फूल्ल थ्रो टल्ल … बाबासाहेबांनी फक्त शिवजन्मादिवशी कोणती ग्रेगोरियन तारीख असेल याचे संशोधन केले.
त्यांनी कधी असे म्हणले कि "त्त्या ग्रेगोरियन तारखेलाच शिवजयंती साजरी करा" असेल तर त्याचे पुरावे दाखवा.

राजकारण्यांनी त्याचा वापर वाद घालायला केला.
नावात जीनियस लिहिता तसे कधीतरी थोडे डोके पण चालवून दाखवा ना

llपुण्याचे पेशवेll's picture

21 Aug 2015 - 3:41 pm | llपुण्याचे पेशवेll

अग्गदी खरे बोललात पगला गजोधर साहेब.
पण बापजाद्याची पुण्यतिथी माझ्या माहिती नुसार सर्वत्र तिथीनेच 'साजरी' करतात. ती सुधा वर्षातून २ दा. एकदा तिथिला आणि एकदा पक्षाला.
आपलं तर म्हणणं आहे की सगळीकडे ग्रेगोरीयन लावून मस्तं पैकी हॅलोवीनला दिवाळी साजरी करावी आणि ख्रिसमसला राम + कृष्ण यांची जयंती. खेळ खल्लास.

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 3:46 pm | पगला गजोधर

जरा २३ जानेवारी व १७ नोव्हेंबर या तारखांविषयी जर्रा रिसर्च करा बरे.

प्यारे१'s picture

21 Aug 2015 - 3:52 pm | प्यारे१

राजकारणी जिथं तिथं राजकारण करतात. त्यांचं मरु दे. आणि मुळात
1.ग्रेगोरियन पद्धत प्रचलित झाल्यानं नेत्याच्या जन्म मृत्यु च्या तारखा लक्षात असतील तर काय चूक आहे?
2.महाराजांच्या काळी तिथी प्रचलित होती त्यामुळे तीच पुढे सुरु राहावी अशी मागणी करण्यात काय चूक आहे?

फुलथ्रॉटल जिनियस's picture

21 Aug 2015 - 2:42 pm | फुलथ्रॉटल जिनियस

नंतर टिळक आले आणि त्यांनी सगळीकडे प्रसार करून
सुळे नामक इंजिनियरकडून समाधी पुन्हा बांधून घेतली.>>>>>>>>किती फेकाफेकी करावी यालाकाही लिमिट? महात्मा फुले यांनी समाधीची डागडुजी केली व शिवजयंती उत्सव पहिल्यांदा सुरु केला,
टिळक हे राजकारणी आणि फुले विरोधक अस्ल्याने फुल्यांच्या निधनानंतर त्यांनी धुर्तपणे शिवजयंतीचे क्रेडीट लाटायला सुरुवात केली,तत्कालीन मिडीया जात्यांध लोकांच्याच ताब्यात अस्ल्याने त्यांनीही टिळकांना खोटे क्रेडीट द्यायला सुरुवात केली.

शिवसमाधी टिळकांनी पुन्हा एकदा बांधवून घेतली आणि दणक्यात शिवाजीउत्सव वाढवला हे खोटे असेल तर पुरावे द्या.

कपिलमुनी's picture

21 Aug 2015 - 2:51 pm | कपिलमुनी

तुम्ही पण पुरावे फेका की ! लाजू नका
कोणी अडवला आहे.
शेवटी आम्हाला टिळक काय आणि फुले काय सारखेच!
फरक तुम्हालाच पडतो.

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 3:02 pm | पगला गजोधर

मूळ मुद्दा असा आहे 'शेतकऱ्यांच हित पाहणारा राजा' आणि त्याचा उत्सव (असे उत्सवाचे स्वरूप), तर आजचे नवीन 'कट्टर हिंदू राजा' असे उत्सवाचे स्वरूप आले आहे काय ? यासाठी उहापोह करा …

श्रीगुरुजी's picture

21 Aug 2015 - 2:57 pm | श्रीगुरुजी

>>> महात्मा फुले यांनी समाधीची डागडुजी केली व शिवजयंती उत्सव पहिल्यांदा सुरु केला,

जोतिबा फुल्यांनी सुरू केलेल्या शिवजयंतीच्या मिरवणुकीत नानासाहेब नेफळे दांडपट्टा, भाला-बरची आणि लेझीम खेळत होते असा तत्कालीन ब्रिटिश गॅझेटिअरमध्ये उल्लेख आहे.

श्रीगुरुजी उपरोधानी लिहिताय का खर म्हणताय ? (विकिपीडियात अशी एंट्री घ्यावी का नको असा प्रश्न पडतो !)

माहितगार म्हणजे माहितीने दुसर्‍याला गार करणारा, स्वतःच गार होणारा नव्हे =))

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 3:57 pm | पगला गजोधर

तुम्ही 'माहिती' द्यायची अंन आम्ही 'गार' व्हायचं ………।
हे असं ठरलंय की नै ?

माहितगार's picture

21 Aug 2015 - 4:22 pm | माहितगार

==)) कै विचारू नका आमच्या सारखेच लोक आहेत म्हणून १८५७च्या नानासाहेब पेशव्यांचे नाव मराठी विकिपीडियात पहिल्या नानासाहेब पेशव्यांकडे स्थानांतरीत होऊ शकते. श्रीगुरुजी कोणत्या नानासाहेबांबद्दल लिहिताहेत हे माहितच नसलेल्यांकडून या नानासाहेबांची भर पडली मराठी विकिपीडियावर कुणाकडून पडल्यास विचारावयास नको :) संभाजी महाराजांच्या काकांच्या नावाचे लेखाचा दुवा तुम्हाला त्यांच्या पुतण्याच्या लेखावर नेऊन पोहोचवू शकतो. पब्लिकला आयती माहिती पाहिजे असते नेमकेपणाशी कै देणेघेणे नसते :(

....माईने नानाला सुहास्य वदनाने पंचारतीने ओवाळून औ़क्षण केले होते त्यामुळे नान्याच्या अंगावर मूठ्भर मांस वाढले व त्यांस दांडपट्टा, भाला-बरची आणि लेझीम खेळण्याचे स्फुरण चढले. याचादेखील उल्लेख असावा असा आपला माझा अंदाज.

इरसाल's picture

21 Aug 2015 - 3:09 pm | इरसाल

हेडिंग मधे असणार्‍या हाय जँक वरुन मला मोंजी का बरे वाटत आहात.

मास्टरमाईन्ड's picture

21 Aug 2015 - 3:10 pm | मास्टरमाईन्ड

धागा परत ब्राम्हण आणी ब्राम्हणेतर या विषयाकडेच वळ्तोय की काय?
म. फुल्यांना महात्मा किंवा लो. टिळकांना लोकमान्य पदवी कुणी दिली हे शोधण्यात काय हशील आहे? (आता मिपावर असणार्‍यांपैकी कुणीही त्यावेळेस कळत्या वयात असण्याची शक्यता दुरापास्तच आहे.)
आपल्याला वैयक्तिकरित्या एखाद्या "महात्मा" किंवा "लोकमान्य" किंवा आणखीन कुणीतरी मान्य नसतील पण त्यांच्याबद्दल मिपा सारख्या सार्वजनिकरित्या खुल्या असलेल्या व्यासपीठावर काहीतरी शंकास्पद टंकून आग पेटती ठेवणं एवढ्याच हेतूनं हे होत असेल तर _/\_

एक गोष्ट तर १००% खरी आहे की
सगळेच ब्राम्हण "जात्यंध" नसतात / नाहीत
तसेच सगळेच ब्राम्हणेतर "ब्रिगेडी" नसतात / नाहीत

मग कशाला कुटायचा काथ्या या विषयावर?
कायतरी इंट्रेष्टींग ष्टोर्‍या ल्ह्या. आमी वाचताव.

पैसा's picture

21 Aug 2015 - 3:12 pm | पैसा

अति अवांतरः हायजँक चा उच्चार कसा करायचा? मोजी कथा वाचल्या पण अजून सवय होत नाही.

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 3:18 pm | पगला गजोधर

अनुनासिकस्वरात करावा.
;) हळू घ्या.

माहितगार's picture

21 Aug 2015 - 5:26 pm | माहितगार

शिवजयंती उत्सवाचे इतिहास विषयक काही संदर्भ गूगल बुक्सवरील नारायण कुलकर्णी यांनी लिहिलेल्या चॅप्टर ६८ मध्ये दिसत आहेत.(इंग्रजी मजकुर) काही पाने पेड रिडर्स साठी राखीव दिसतात त्यामुळे सारीच पाने वाचता नाही आली. जिज्ञासूंनी या ग्रंथातून काही माहितीवर प्रकाश पडतो का ते पहावे.

माहितगार's picture

21 Aug 2015 - 6:51 pm | माहितगार

Anant V. Darwatkar यांच्या पुस्तकात "James Douglas, an English man investigated the Tomb of Shivaji Maharaja at Raigad, which was virtually forgotten after the death of Shahu Maharaja 1 st," असे वर्णन येते आहे. हा James Douglas बहुधा प्रवासी लेखक होता. त्याने त्याचे प्रवास वर्णन १८८३ मध्ये प्रकाशीत केले असावे ते अर्काईव्ह डॉट ऑर्ग वर या दुव्यावर असावे. त्याने शिवाजी महाराजांच्या समाधीकडे होत असलेल्या दुर्लक्षाकडे अधीक लक्ष वेधले असावे. पण समाधीची कल्पना महात्मा फुल्यांना आधी पासूनच माहित असल्याची शक्यता इतर संदर्भांवरून दिसते आहे.

पैसा's picture

21 Aug 2015 - 8:46 pm | पैसा

त्यातही म. फुले लिखित शिवाजी महाराजांच्या पोवाड्याबद्दल लिहिले आहे. मात्र शिवजयंती उत्सव १५-१६ एप्रिल १८९६ ला टिळकांच्या प्रेरणेने सुरू झाला असे नि:संदिग्ध शब्दात लिहिले आहे. तसेच समाधी आणि जगदीश्वर देवळाच्या दुरुस्तीसाठी टिळकांनी काय काय केले ते लिहिले आहे. म. फुल्यांनी दुरुस्ती करवली असे कुठे दिसले नाही. त्यापूर्वी इंग्रज सरकारतर्फेच समाधीच्या देखभालीसाठी काही क्षुल्लक रक्कम दिली जात होती असे दिसते. कोल्हापूरच्या महाराजांनी सहानुभूती दाखवली मात्र पैशांची मदत दिली नाही. सयाजीराव गायकवाड यांनी १००० रुपयांची मदत दिली असा उल्लेख सापडला.

माहितगार's picture

22 Aug 2015 - 8:03 am | माहितगार

टिळक विषयक स्वांत्र्योत्तर काळातील विश्लेषणांमध्ये एक घटक तेवढा लक्षात घेतला जात नसावा तो म्हणजे ब्रिटीश कालीन ब्रिटीष धार्जीणी अँग्लो इंडीयन इंग्रजी वृत्तपत्रे. आज तत्कालीन अँग्लो इंडीयन इंग्रजी वृत्तपत्रे भारतात अस्तीत्वात नसल्यामुळे त्यांच्याकडे आजच्या विश्लेषणकर्त्यांचे दुर्लक्ष होत असावे परंतु टिळकांच्या काळात ती वृत्तपत्रे ब्रिटीश दृष्टीकोणांचे प्रतिनिधीत्व करत असत. केसरी मराठातील अग्रलेखांच्या माध्यमातून टिळकांचा एक संवाद जसा एतदेशीयांशी होत होता तसा त्यांचा दुसरा संवाद म्हणा रोख म्हणा अँग्लो इंडीयन इंग्रजी वृत्तपत्रातील न पटणारे दृष्टीकोणांशी सामना करण्यावर होता.

शिवाजी महाराजांच्याकडे महात्मा फुल्यांचे लक्ष गेले ते शेतकर्‍यांचा नायक म्हणून. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा शोध घेतला जाऊ लागला होता. १८८३ मध्ये कुणी जेम्स डग्लस नामक प्रवास वर्णनकाराने मुंबईतील इंग्रजी वृत्तपत्राकडे पत्र पाठवून शिवाजी महाराजांच्या समाधीच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. जेम्स डग्लस हा ऐतिहासीक परिसरांना भेटी देणारा ब्रिटीश प्रवासी असल्यामुळे इतर राज्यकर्त्यांच्या समाधी (टोंब) च्या मानाने शिवाजी महाराजांच्या समाधीचे अस्तीत्व जाणवले नसणे सहाजिक आहे. बहुधा या इंग्रजी वृत्तपत्रीय चर्चेची दखल घेऊन कुणा मराठी माणसाने केसरी वृत्तपत्राचे लक्ष शिवाजी महाराजांच्या समाधीकडे वेधले त्यानंतर मात्र केसरीकारांनी समाधी जीर्णेद्धाराचा विषय चांगलाच मनावर घेतला. कारण लोकमान्यांना शिवाजी महाराज त्यांच्या समोरच्या तरूणाईसाठी आदर्श राष्ट्रपुरुष म्हणून उभे करावयाचे होते. त्या काळात ब्रिटीशांची राजधानी कलकत्त्यास होती. टिळकांच्या भाषणांचे लेखांचे अनुवाद ज्या वेगाने त्या काळातील इतर भारतीय भाषातून केले जात ते पाहून स्मितीत व्हावयास होते तसे ते बंगालीतही केले जाऊन प्रसारीत केले जात. टिळक महाराष्ट्रातल्या कुणाचे नेते होते का नव्हते हा वाद क्षुल्लक एवढ्यासाठी आहे की टिळक राष्ट्रीयस्तरावर नेते म्हणून स्विकारले गेले होते, शिवजयंती टिळकांना राष्ट्रीयस्तरा पर्यंत न्यावयाची होती कारण टिळकांचा उद्देश सरळ सरळ राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणे असा राजकीय होता. टिळकांनी जसे शिवजयंती उत्सवाचे प्रस्थ राजकीय उद्देशाने राष्ट्रीयस्तरा पर्यंत वाढवताहेत हे लक्षात आल्यानंतर, टिळकांच्या राजकारणापासून मुस्लीमांना वेगळे पाडण्यसाठी शिवाजी महाराजांच्या उत्सवामागे टिळकांचे हिंदुत्वाचे राजकारण असल्याची जावईशोध टिका ब्रिटीश धार्जीणी इंग्रजी वृत्तपत्रे करावयास लागली तेव्हा टिळकांनी शिवाजी हे मुस्लीम असते तरीही मी त्यांचा राष्ट्रीय नेता म्हणून उत्सव केला असता हे त्यांच्या भाषणातून सांगीतलेच सोबतच IS SHIVAJI NOT A NATIONAL HERO ?? हा मराठात अग्रलेख लिहून ब्रिटीश धार्जीणी इंग्रजी वृत्तपत्रांनी पेरलेल्या दुहीच्या बिजाला उत्तर दिले. त्या अग्रलेखाचा समारोप करताना लोकमान्य म्हणतात "It was only in conformity worth the political circumstances of the country at the time Shivaji was born in Maharashtra. But a future leader may born anywhere in India who knows even may be a Mohamedan . That is the right view of the question and we do not think that the Anglo Indian writers can succeed in diverting our attention from it."

अवांतर: एपीजे अब्दुल कलाम गेल्या नंतर सर्व भारतीयांनी एक दिलाने त्यांना आदरांजली वाहिली ते पाहून त्या दिवशी लोकमान्यांच्या वर नमुद केलेल्या अग्रलेखाची आठवण झाली.

दत्ता जोशी's picture

21 Aug 2015 - 5:39 pm | दत्ता जोशी

हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली>>>>>>>>>> विथ ड्यू रिस्पेक्ट टू महात्मा ज्योतिबा फुले............ म्हणजे महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या आधी शिवाजी महाराजांच्या चरित्र / समाधी स्थळ इ. माहिती कोणालाच नव्हती का? मग म. फुल्याना हि माहिती कोठून मिळाली? फुले इतिहास संशोधक होते का? त्यांनी कोणकोणती कागदपत्रे अनु पुएअवे तपासले? ते त्यांना कोणी दिले? का असा म्हणता येईल कि शिवाजी महाराजांचे चरित्र इत्यादी स्वतःला हवा तसा लिहिण्याचा प्रकार तेव्हा पासून सुरु आहे?

पगला गजोधर's picture

21 Aug 2015 - 5:59 pm | पगला गजोधर

१८८० साली जोतिराव पुण्यातून चालत रायगडावर गेले. तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत साफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८०साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत. १८९३ साली गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन टिळकांनी त्याचे चळवळीमध्ये रूपांतर केले. त्यांना शिवजयंतीचेही महत्त्व वाटत होते. म्हणूनच पंधरा वर्षे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात टिळक जातीने उपस्थित राहिले. आणि आपला सहभाग देऊन त्यांनी हा उत्सव आणखी मोठा केला.

१८८२ साली टिळक-आगरकरांना शिवाजी महाराजांच्या वंशजाबद्दल केलेल्या लेखनासंदर्भात एका खटल्याला सामोरं जावं लागलं. त्यावेळी त्यांना डोंगरीच्या तुरुंगात राहावं लागलं. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाचे खजिनदार रामशेठ बापुशेठ उरवणे यांना रूपये दहा हजार रोख घेऊन जामिनासाठी मुंबईला पाठविलं. आपल्या जामिनासाठी जोतिरावांनी ही धडपड केल्याचे खुद्द टिळक आगरकरांनी ‘केसरी’मध्ये नमूद केली आहे. टिळक-आगरकर तुरुंगातून सुटल्यावर सत्यशोधकांनी त्यांची वाजतगाजत मिरवणूक काढली, सत्कार करून मानपत्र दिले. हे मानपत्र ‘केसरी’मध्ये छापून आलं. उरवणे यांच्या मृत्युनंतर खुद्द टिळकांनी या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा पोलिस खात्याचे अहवाल, सत्यशोधक चळवळीचे दस्तावेज, पुरावा लेखागारातील कागदपत्रे आणि सत्यशोधक माधवराव बागल यांनी १९३३ साली सत्यशोधक समाज हिरक महोत्सव ग्रंथात केलेले लेखन, हे सर्व दस्तावेज असे सांगतात की, जोतिरावांनी १८८० साली देशात सर्वप्रथम शिवसमाधी शोधणं, तिचे सुशोभिकरण करणं आणि शिवजयंती उत्सव सुरू करणं, अशी महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कामे केलेली आहेत.

जामिन आणि मानपत्र याबाबतची नोंद तर खुद्द टिळकांनी केली आहे. तेव्हा आज आपण असे म्हटले पाहीजे की, शिवजयंती सुरू करणारे जोतिराव आहेत आणि ती मोठी करण्यात लोखंडे आणि लोकमान्य टिळक यांचा महत्त्वाचा वाटा आहे.

संदीप डांगे's picture

21 Aug 2015 - 6:12 pm | संदीप डांगे

काय गजोधर साहेब,

ट्यार्पीची हौस फिटली का नाय?

अजून बरेच विषय आहेत.

स्त्री-पुरुष, मांसाहारी-शाकाहारी, अमेरिका-भारत, इंग्रजी-मराठी, आध्यात्मिक-वैज्ञानिक, पुणे-इतर, .................................... बहरपहुर हायेत. प्रत्येक धाग्यावर शंभर नक्की कमीत कमी. त्यातले तुमचेच पन्नास. और बोलो..?

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Aug 2015 - 6:18 pm | अनिरुद्ध.वैद्य

!

अनिरुद्ध.वैद्य's picture

21 Aug 2015 - 6:18 pm | अनिरुद्ध.वैद्य

!

कपिलमुनी's picture

21 Aug 2015 - 6:42 pm | कपिलमुनी

कथेवर मिपाकर प्रतिसाद देईनात , म्हणून शॉर्टकट ;)

dadadarekar's picture

21 Aug 2015 - 11:33 pm | dadadarekar

ज्या व्यक्ती १९४७ नंतर हयात होत्या / आहेत त्यानाच भारतरत्न मिळते.

असे लिमिट आवश्यक आहे.

अन्यथा , कालिदास , शिवाजी महाराज , जिजाऊ , प्रभू रामचंद्र , व्यासमुनी , अकबर , ख्वाजाजी ....... प्रचंड मोठी यादी होइल

अरे रे किती तो गोंधळ. १६८० नंतर २०० वर्षे काहीच झाले नाही म्हणजे नक्की काय? १७०७ पर्यंत रायगडावर मोगल किल्लेदार होता. त्यानंतर जंजिरेकर सिद्दीने गड ताब्यात घेतला. शाहू महाराजांच्या हाती आला तो बाजीराव पेशव्याच्या काळात. शाहू महाराजांना गड स्वतः पाहण्याची खूप इच्छा होती पण काही कारणाने ते राहून गेले. मग गड पोतनीसांच्या ताब्यात होता. तो १७७२ साली पेशव्याने लढून ताब्यात घेतला. या सर्व काळात जेंव्हा गड मराठ्यांच्या ताब्यात होता त्या काळात पेशवे दफ्तरात गडाच्या व्यवस्थेबाबत अनेक कागद आहेत. 'रायगडच्या सिंहासनाची आणि समाधीची पेशवेकालीन व्यवस्था' असे एक पुस्तकही त्यावर आधारित आहे. त्यात साफसाफ लिहिले आहे की सिंहासन नेहेमी मूल्यवान कापडाने अछ्छादलेले असे. राज्याभिषेकाच्या दिवशी आणि गडाच्या देवताच्या साठी दर वर्षी एक उत्सव होई. त्या दिवशी गडाचे सारे मानकरी एकत्र सिंहासनाला मुजरे घालत. ज्या वेळी काही कारणाने उत्सव झाला नाही त्या वेळी 'उपद्रव' होई. मग त्यासाठी एक रेडकू नाहीतर बकरे देवापुढे बळी दिले जात असे. त्यासाठी झालेला खर्च मुळ अस्सल कागदात नमूद आहे. १८१८ साली इंग्रजी तोफांच्या मार्याने राजांचा राहता वाडा जळाला, गडावर एकहि इमारत उभी उरली नाही. सर्व मानकरी हत्यारासकट गड उतरले (दुसर्या बाजीरावाची बायको वाराणसीबाई हिच्या बरोबर एकही मराठा शिपाई गडावर नसला पाहिजे याला किल्लेदार शेख अबुद जामीन). त्यामुळे हा उत्सव बंद पडला. तो नंतर फुल्यांनी चालू केलाही असेल, पण या एकाच गोष्टीचा उल्लेख करून बाकी इतिहास खोटा असे म्हणणे म्हणजे आपल्याला सोयीस्कर तेवढ्याच गोष्टी उचलण्याचे उदाहरण आहे. असो, ज्यांना इतिहास माहित करून घायचा असेल ते वाचतील, वाद घालायचा तर काय कशावरही घालता येईल.

माहितगार's picture

22 Aug 2015 - 9:24 am | माहितगार

'रायगडच्या सिंहासनाची आणि समाधीची पेशवेकालीन व्यवस्था' प्रकाशन आणि लेखक कोण आणि प्रताधिकार(कॉपीराइटस्थिती माहिती असेल तर द्यावी) . कॉपीराइट संपला असेलतर ग्रंथ स्कॅन करून आंतरजालावर उपलब्ध केला जावा असे वाटते.

जयंत कुलकर्णी's picture

22 Aug 2015 - 8:00 am | जयंत कुलकर्णी

पग,
आपल्या लेखातील शेवटचे वाक्य संपादकांना सांगून काढावयास सांगणे. खरं म्हणजे त्याचे आवश्यकताच नव्हती. आणि शेवटी तुम्ही जो प्रश्न विचारलाय त्याचे उत्तर तुम्हीच दिले आहे...त्यामुळे या लेखाचे प्रयोजन शेवटच्या वाक्यात दडले आहे असा संशय येतो.... असो..कृपया असे करु नये...

खरा इतिहास जाणण्यासाठी ते टाईम मशीन असायला पाहिजे होते.पण मला वाटते काळाच्या मागे म्हणजे भूतकाळात जाणे scientifically अशक्य आहे.तेव्हा हे अध्यात्मिकदृष्ट्या शक्य आहे.म्हणजे योगी होऊन सिद्धी प्राप्त करणे आणि भूत-भविष्य जाणणे वगैरे.पण आता सिद्धी प्राप्त करणे कठीण आहे बुवा.

विकास's picture

22 Aug 2015 - 8:41 am | विकास

काळाच्या मागे म्हणजे भूतकाळात जाणे scientifically अशक्य आहे

म्हणूनच सामान्य माणसाचे कर्तव्य असते की काळा बरोबर पुढे जाणे आणि स्वत:चा/कुटूंबियांचा उत्कर्ष करणे. आणि समाजातिल नेत्याचे काम असते की पुढील काळाचा विचार करून समाज एकसंघ होईल असे आचार विचार करणे...फूट कशी पाडता येईल त्याचा नाही.

विंदांच्या भाषेतः

इतिहासाचे अवघड ओझे, घेऊन डोक्यावर ना नाचा
करा पदस्थल त्यावर आणिक चढून त्यावर भविष्य वाचा!

माहितगार's picture

22 Aug 2015 - 8:59 am | माहितगार

विंदांच्या भाषेतः

इतिहासाचे अवघड ओझे, घेऊन डोक्यावर ना नाचा
करा पदस्थल त्यावर आणिक चढून त्यावर भविष्य वाचा!

मस्त !!

दत्ता जोशी's picture

22 Aug 2015 - 10:06 am | दत्ता जोशी

एकाच गोष्टीचा उल्लेख करून बाकी इतिहास खोटा असे म्हणणे म्हणजे आपल्याला सोयीस्कर तेवढ्याच गोष्टी उचलण्याचे उदाहरण आहे
टिळ्कन्नच्य शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिक रित्या करण्या मागे एक आणि एकच हेतू होता, तो म्हणजे लोकांनी एकत्र यावे, सभा चर्चा व्हाव्यात आणि स्वातंत्र संग्रामाला हातभार लागावा. त्याकाळी लोक एकत्र आले कि इंग्रज सरकारचे कान टवकारले जायचे. सार्वजनिक सभांवर बंधने होती. शिवजयंती उत्सवासाठी टिळक स्वतः महाराष्ट्रात ठिकठिकाणी जावून सभा घेत. लोकांना उद्बोधन करीत आणि युवकांना प्रेरित करीत हे जगजाहीर आहे. हे उत्सव करून टिळकांना कोणतेही श्रेय लाटायचे नव्हते कि मतदारांना प्रभावित करून कोणती निवडणूक लढवायची नव्हती. पण आता जो वाद होतो आहे तो फक्य्त टिळक ब्राह्मण होते म्हणून कोणतेही श्रेय त्यांना मिळू न देणे, युगपुरुषांची नावे घेवून ठराविक समाजाला भावनिक फुंकर घालणे आणि मतांचे द्रुविकरण करणे हेच आहे यात कोणालच तिळभरही शंका नाही. पण हळूहळू समाज सुशिक्षित होतो आहे. आणि असल्या माकड चेष्टांना भीक घालत नाही हे महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी दिसून आले.

पैसा's picture

22 Aug 2015 - 10:28 am | पैसा

सरकार भक्कमपणे पाठीशी होते म्हणून ते झाले. नाहीतर अवघडच होते. लोक सहसा इथे तिथे जे १०० वेळा ठासून सांगितले जाते त्यावर विश्वास ठेवतात. टिळकांना बोलून संपले नाही म्हणून मग आता आगरकरांचे स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणांविषय कार्य नाकारले जात आहे. तसले उद्गार असलेली एक मुलाखत एका हुच्चभ्रू संस्थळावर खपवलेली बघून भयानक संताप झाला होता. पण विवेकाचा आवाज हळूहळू क्षीण पडणार आणि प्रचारक सांगतील तोच सोयीस्कर इतिहास "इतिहास" म्हणून खपवला जाणार असे दिसते. ते सहज साध्य झाले नाही तर ऐतिहासिक पुरावे नाहीसे करण्यापर्यंत यांची मजल जाऊ शकते. पाठवा १०० गुंड आणि करा पुन्हा तोडफोड, जाळपोळ. हाकानाका.

दत्ता जोशी's picture

22 Aug 2015 - 11:01 am | दत्ता जोशी

पैसा जी, सरकार खंबीर होतेच पण बहुजनांना भावनिक हूल देवून त्यांच्या ध्रुवीकरणाचा जो प्रयत्न झाला तो यशस्वी नाही झाला असे तुम्हाला वाटत नाही का? बहुजन बहुजन अशी हाकाटी पिटवून सगळ्या महाराष्ट्राला या विरोधात ओढण्याचे राजकारण संपूर्ण फसले. स्वथाही मते संपूर्ण महाराष्ट्राच्या तोंडी घालण्याचे प्रयत्न फोल झाले. दंग करणारे तेच ते मुठभर होते. सर्वसामान्यजनतेने या हाकाटीला भीक नाही घातली त्यांचे करण मला असे वाटते कि या राजकारणाचा आता त्यांनाही कंटाळा येवू लागला आहे.

श्रीगुरुजी's picture

22 Aug 2015 - 1:13 pm | श्रीगुरुजी

http://indianexpress.com/article/opinion/columns/another-shivaji-controv...

निधर्मांधांचे लाडके इतिहासकार यांनी या लेखात खालील वाक्य लिहिले आहे.

Lokmanya Bal Gangadhar Tilak was the first to recall Shivaji’s role in history by organising a Shivaji festival.

शिवजयंतीचा सार्वजनिक उत्सव नक्की कोणी सुरू केला याविषयीचा वाद आता मिटायला हरकत नाही.

श्रीगुरुजी's picture

22 Aug 2015 - 1:14 pm | श्रीगुरुजी

निधर्मांधांचे लाडके इतिहासकार राम पुनियानी यांनी या लेखात खालील वाक्य लिहिले आहे.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

22 Aug 2015 - 2:20 pm | फुलथ्रॉटल जिनियस

पुनियानी आता संघात आहेत ,त्यामुळे ते आता संघिष्ट तत्वज्ञान पसरवत आहेत.

विकास's picture

22 Aug 2015 - 5:51 pm | विकास

हे नक्की कशामुळे म्हणत आहात का? काही दुवा/संदर्भ मिळेल का? का नुसतेच पिल्लू सोडून देयचे? कॉन्फिडन्टली म्हणले की खपून जाईल असे गृहीत धरुन?

फारएन्ड's picture

22 Aug 2015 - 9:33 pm | फारएन्ड

संघ पण छुपा ब्राह्मणविरोधी आहे की काय?
http://www.lokmat.com/storypage.php?catid=17&newsid=7539212

फुलथ्रॉटल जिनियस's picture

22 Aug 2015 - 10:06 pm | फुलथ्रॉटल जिनियस

फारेंड ,दोन राम पुनियानी आहेत, मी व गुरुजी ज्यांच्याबद्दल बोलत आहोत ते वेगळे आणि या लोकमतच्या लिंकमधले वेगळे.

विकास's picture

22 Aug 2015 - 11:06 pm | विकास

वेगळ्या पुनियानींची माहिती /दुवा द्या. माझ्या माहितीप्रमाणे या संदर्भात एकच राम पुनियानी आहेत...

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2015 - 1:19 pm | श्रीगुरुजी

>>> पुनियानी आता संघात आहेत ,त्यामुळे ते आता संघिष्ट तत्वज्ञान पसरवत आहेत.

फिदीफिदी!

नानांनी नवीन जावईशोध लावला. नाना जपून हं. राम पुनियानी तुमच्यावर बदनामीचा दावा दाखल करून बिनभाड्याच्या घरात पाठवतील आणि तुम्ही खडी फोडायला आत गेलात की माईंचे हाल कुत्रा खाणार नाही.

अवांतर - राम पुनियानी हे निधर्मांध आहेत. ते संघाचे कट्टर विरोधक आहेत. ते कधीच संघात नव्हते आणि नाहीत.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

24 Aug 2015 - 2:15 pm | फुलथ्रॉटल जिनियस

पुनियानी संघाचेच आहेत हो! पुरोगामी चळवळी हायजॅक करण्यासाठी संघ अशी लोकं नेमतात,बायदवे तुम्ही कोणत्या पुनियानींबद्दल बोलत आहात?

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2015 - 2:36 pm | श्रीगुरुजी

नाना,

वेड पांघरून माईंच्या माहेरी, कुरसुंगीला, निघालात काय?

राम पुनियानी ही एकच व्यक्ती आहे. हे त्यांचे प्रोफाईल - https://en.wikipedia.org/wiki/Ram_Puniyani

हे कट्टर संघविरोधी, हिंदुत्ववादी संघटनाविरोधी, मुस्लिम लांगूलचालक, निधर्मांध इ.इ. आहेत. त्यांचा संघ विरोध जगजाहीर आहे.

हे पहा त्यांचे वर्णन -

He is involved with human rights activities, communal harmony and initiatives to oppose the rising tide of fundamentalism in India. He is associated with the organisations All-India Secular Forum, Center for Study of Society and Secularism

He is associated with various secular initiatives and has been part of various investigation reports on violation of human rights of minorities. Has been part of an Indian People's Tribunal that investigated the violation of rights of minorities in Orissa and Madhya Pradesh, His approach and views have also been criticised as anti Hindu.

हा त्यांचा लेख वाचा.

https://www.facebook.com/ram.puniyani/posts/10151672703408779

बाबरी मशीद प्रकरणावरून त्यांनी संघाला कायम झोडपले आहे. ते मोदींचे कट्टर विरोधक आहेत. मुस्लिमांविषयी त्यांना कळवळा आहे. या लेखातील खालील परिच्छेद अत्यंत बोलका आहे.

In the next elections RSS is going to use multiple strategies. One, to polarize the society through violence and through keeping alive the issue of Ram temple. Second it is going bank heavily on twin propaganda around Modi, the Gujarat model of development and Modi’s own leadership qualities, i.e. his autocratic style of functioning. For this purpose if Modi is talking about development and toilets it is again a very clever mover. Modi built himself up by polarizing the Gujarat society through post Godhra carnage. During all these years he played the subtle Hindutva agenda of marginalizing the minorities, as is evident in the prevalent conditions in Gujarat. Having consolidated this polarization as a state policy, he changed gears. As the Gujarat society got polarized due to this carnage, his tune was changed to the one of development. This development claims have been punctured by the statistics from various sources. The latest one being that every third child in Gujarat is malnourished. This is the revelation of the findings of the Comptroller and Auditor General. So many other statistics have burst the myth of Gujarat development.

आणि अशा कट्टर संघविरोधकाला आणि मोदीविरोधकाला तुम्ही संघाचा माणूस म्हणता? ठीक आहात ना?

फुलथ्रॉटल जिनियस's picture

24 Aug 2015 - 4:12 pm | फुलथ्रॉटल जिनियस

बरोबर, हेच ते पुनियानी, आता ते संघाचे प्रशंसक झाले आहेत.त्यामुळे त्यांनी टिळकांना शिवजयंतीच क्रेडिट दिले आहे.

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2015 - 8:01 pm | श्रीगुरुजी

>>> बरोबर, हेच ते पुनियानी, आता ते संघाचे प्रशंसक झाले आहेत.त्यामुळे त्यांनी टिळकांना शिवजयंतीच क्रेडिट दिले आहे.

काहीही फेकू नका नाना. ते कधीपासून संघाचे प्रशंसक झाले? त्यांनी संघाची प्रशंसा केली आहे याचे काही पुरावे आहेत का? निधर्मांधांना एक वाईट व्यसन आहे. आपल्या विचारांविरूद्ध जे बोलतात, कृती करतात ते संघिष्ट असल्याचा शिक्का लगेच निधर्मी मारतात.

मी दिलेल्या लेखातील खालील उतारा राम पुनियानींची विचारधारा ओळखण्यास पुरेसा आहे हा लेख फक्त ४ दिवसांपूर्वी लिहिलेला आहे. २० ऑगस्ट २०१५ पर्यंत तरी राम पुनियानी संघविरोधक होते. त्यानंतर गेल्या २-३ दिवसात ते संघाचे प्रशंसक झाले असल्यास तसे सिद्ध करावे.

In yet another controversy, just before the 2009 assembly elections, a poster of Shivaji killing Afzal Khan with a knife became the provocation for communal violence in the Dhule-Sangli area, during which one person was killed and a tense atmosphere was created. The poster appeared to suggest that Shivaji was the representative of all Hindus while Afzal Khan was standing in for all Muslims. This is fertile ground for hatred to develop, and the consequent violence polarised the communities, which led to the victory of the communal forces.

(२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मिरज, सांगली व इचलकरंजी भागातल्या तीनही मतदारसंघातून भाजप-सेना युतीचे उमेदवार विजयी झाले होते. त्यांचा विजय हा जातीयवादी शक्तींचा विजय होता आणि या भागात हिंदूंचे प्रतिनिधी असलेल्या शिवाजी महाराजांनी छातीत तलवार खुपसून मुस्लिमांचा प्रतिनिधी असलेल्या अफझलखानाला मारल्याचे पोस्टर लावल्यामुळे जातीय तणाव निर्माण होऊन जातीयवादी शक्ती म्हणजेच सेना-भाजपचे उमेदवार जिंकले असा दावा या पुनियांनी केला आहे. कोणताही संघ प्रशसंक असा दावा करणे आणि असे दोषारोप करणे अशक्य आहे.)

सारांश - तेव्हा नानासाहेब, राम पुनियानी हे संघाचे प्रशंसक कधीपासून झाले आणि त्यांनी संघाची प्रशंसा करायला कधीपासून सुरूवात केली आणि कशी प्रशंसा केली याचे सबळ पुरावे द्या. तसे पुरावे नसतील तर थापेबाजी बंद करा. नाहीतर तुमची थापेबाजी माईंच्या कानावर घालेन.

विकास's picture

24 Aug 2015 - 8:08 pm | विकास

Bang head

अथवा मराठीत म्हणतात तसे... "पालथ्या घड्यावर पाणी" कारण उत्तर मिळणार नाही.

पैसा's picture

24 Aug 2015 - 8:13 pm | पैसा

=))

माहितगार's picture

24 Aug 2015 - 8:54 pm | माहितगार

=))
प्रतिसाद कोणत्या प्रतिसादास आहे माहित नाही पण तुमचं कीट भारी आवडून सोडलंकी हो =))

होबासराव's picture

24 Aug 2015 - 8:12 pm | होबासराव

१) हिंदूंचे प्रतिनिधी असलेल्या शिवाजी महाराजांनी छातीत तलवार खुपसून मुस्लिमांचा प्रतिनिधी असलेल्या अफझलखानाला मारल्याचे
काय बोलावे, लिहावे कहि सुचत नाहि परस्परच महाराजांचि आणि खानाची वाटणी करुन टाकली.
२)शिक्का लगेच निधर्मी मारतात.

हे जे सो कॉल्ड निधर्मि आहेत..जगाच्या पाठिवर शोधुनसुध्दा ह्यांच्या सारखा धर्मांध कोणि सापडणार नाहि.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

24 Aug 2015 - 9:18 pm | फुलथ्रॉटल जिनियस

Bio
Puniyani was born in British India (1945), and raised in a
Hindi speaking Punjabi Khatri business family in the central
Indian town of Nagpur.

गुरुजी , आता बोला,हे पुनियानी नागपुरात जन्मले आहेत ,यांच्यावर लहाणपणापासुनच संघाचे संस्कार झाले आहेत, ते पुरोगामी अस्ल्याचे नाटक करतात.

प्यारे१'s picture

24 Aug 2015 - 9:33 pm | प्यारे१

Truely Genius!
हाय का आवाज????
विकासराव, कीट प्लीज.

विकास's picture

24 Aug 2015 - 11:02 pm | विकास

आज पुनियानींसाठी ढसाढसा रडण्याचा दिवस आहे. इतके वर्षे संघावर टिका केली, द्वेष केला आणि त्याचं फळ काय तर परत आपणच संघाचे?

Crying baby

प्यारे१'s picture

25 Aug 2015 - 12:32 am | प्यारे१

फुलथ्रोटल जीनियस यांचा नागपुरच्या चैत्यभूमीवर ६ किंवा २५ डिसेंबर ला सत्कार घेण्याचा प्रस्ताव मी याठिकाणी ठेवत आहे.

त्या दिवशी राम पुनियानी यांचा फ़ोटो संघाच्या मुख्य कार्यालयातून निघून चैत्य भूमीवर मौलाना दादाद रेकर साहिब यांच्या पाक हातून जीनियसजींना देताना प्रेयर म्हटल्या जातील. ;)

अर्धवटराव's picture

24 Aug 2015 - 9:34 pm | अर्धवटराव

पुनियानी नागपुरात जन्मले आहेत ,यांच्यावर लहाणपणापासुनच संघाचे संस्कार झाले आहेत

नागपूरच्या लोकांवर संघाचे संस्कार... हम्म्म. प्रत्यक्ष नागपूरी लोकांसमोर असं काहि बोलु नका. परिणाम भयंकर होऊ शकतात :)

मृत्युन्जय's picture

25 Aug 2015 - 4:09 pm | मृत्युन्जय

इतका रद्दी प्रतिवाद करुन उगाच आपले घोडे पुढे दामटवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तुमचा जाहीर सत्कार करायला हवा.

पुनियानी नागपुर मध्ये जन्मले म्हणून संघाचे???????????????? तसे असेल तर भाजपेतर पक्षांना नागपुरकरांचे एकही मत नको पडायला? खरे ना? की पडतात ती सगळी मते तात्पुरते नागपुरात स्थलांतरित झालेल्या लोकांची?

श्रीगुरुजी's picture

25 Aug 2015 - 6:53 pm | श्रीगुरुजी

>>> गुरुजी , आता बोला,हे पुनियानी नागपुरात जन्मले आहेत ,यांच्यावर लहाणपणापासुनच संघाचे संस्कार झाले आहेत, ते पुरोगामी अस्ल्याचे नाटक करतात.

वा नाना! आवडलं. आता समजलं माई नानांवर का लट्टू झाल्या होत्या.

नानात नाना, नेफळे नाना,
इतर नाना, करिती ठणाणा!

अस्सल नागपूरकर असलेल्या कवी कै. सुरेश भटांनी संघ-हिंतुत्ववाद्यांचा उल्लेख 'भगवी डुकरे' असा केला होता. आयुष्यभर संघ-हिंदुत्व विरोधी असलेले भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस ए. बी. बर्धन हे सुद्धा नागपूरकर आहेत. या दोघांवर संघाचे संस्कार झाल्याचे आजतगायत लपवून ठेवल्याबद्दल दोघांचाही जाहीर निषेध आणि या दोघांचे संघ कनेक्शन उघडकीला आणण्याबद्दल नानांचा श्री. गोळवलकर गुरूजींचा 'विचारधन' हा प्रसिद्ध ग्रंथ भेट देऊन आणि संघाची काळी टोपी भेट देऊन नागपूरच्या रेशीमबागेत जाहीर सत्कार!

माहितगार's picture

22 Aug 2015 - 8:19 pm | माहितगार

खालील

हे कुटून
kathya

हे चघळून
ऊस

अजून रस येईल काय ते माहित नाही :)

चोथा चघळून दमला असाल तर , विकिमिडीया कॉमन्सच्या वती(सौजन्या)ने हा (ह.) घ्या...

chaha

गरमा गरम चहा !!

माहितगार's picture

22 Aug 2015 - 8:24 pm | माहितगार

@ प.ग. तुमच्या धाग्यावर बिन बुलाये चहाच्या ब्रेकची ऑफर देऊन अवांतरासाठी क्षमस्व. पण प्रतिसाद वाचून थकला असाल तर आमच्या चहाचा ब्रेक घेऊन पुढच्या शतका कडे वाटचाल होऊ द्या. धाग्यास शुभेच्छा.

(ह.घ्या.)

पगला गजोधर's picture

22 Aug 2015 - 11:43 pm | पगला गजोधर

No probs :)

पैसा's picture

22 Aug 2015 - 8:39 pm | पैसा

१०० झाल्याबद्दल पगला गजोधर यांचा सत्कार लकडी पुलावर राजा शिवछत्रपतीची पायरेटेड सीडी देऊन करण्यात येत आहे.

शुभेच्छुकः जेपीची विद्रोही ब्रिगेड

पगला गजोधर's picture

22 Aug 2015 - 11:46 pm | पगला गजोधर

For your courtesy

अभिदेश's picture

24 Aug 2015 - 2:29 am | अभिदेश

प.ग. तुम्ही तुमचा मराठी स्वभाव दखवुन दिला आहे. नुसता वाद घाला , ज्याचा लोकांना कहीही उपयोग नाही. का उगिच वेळ वाया घालवताय... बाबासाहेबांचा विषय संपल्यामुळे तुम्हाला हे दुसरे काहीतरी चघळायल हवे असेल तर गोष्ट वेगळी. मला वाटते की मि.पा. करांनी अश्या विषयांवर प्रतिक्रिया देऊच नये. कित्येक बाबी ह्या अनुन्लेखाने मारायच्या असतात , हि त्यातलिच एक पोस्ट आहे. प.ग. तुम्ही आणि तुमच्या सरख्यांना माझा एकच सल्ला...GET WELL SOON MAAMU...

_मनश्री_'s picture

24 Aug 2015 - 2:47 pm | _मनश्री_

शिवाजी महाराजही गेले
आणि टिळक ,फुले ह्यांना सुद्धा जाउन कितीतरी वर्ष लोटली पण इथे तुम्ही आम्ही बसतो भांडत
ह्यांच्यातल कोणीच कधी अस म्हणाल नव्हत कि आमच्यानंतर भांडत बसा
इतिहास ह्या विषयातून काही प्रेरणादायी शिकण्यापेक्षा इतिहासाचा वापर एकमेकांशी भांडण्यासाठी केला जातो
इतिहासात झालेल्या घटनांवरून बोध घेताना कोणीच दिसत नाही

खर तर ह्या देशाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो असा कि जनता नेत्यांना जाब विचारण्यापेक्षा आपापसात भांडत बसलेत ,
आणि सगळेच नेते जनतेच्या मनात परस्पर द्वेषाची बीजे रोवून स्वतःची पोळी भाजून घेतात
कधी जात पात तर कधी आणखी कुठल्या कारणावरून
ते सगळे बघतात मजा आणि जनता भांडतीये
divide and rule हीच नीती वापरून राज्यकर्ते राज्य करताहेत
मूळ समस्यांवरून लोकांच लक्ष विचलित करतात
भाषिक आणि प्रादेशिक अस्मिता ह्याच्यातच अडकून पडलेत सगळे , हयात नसलेल्या माणसांसाठी भांडायला सगळे पुढे...
खर तर आज आपल्याकडे गरिबी, बेरोजगारी ,प्रदूषण ,वाढती गुन्हेगारी ह्या आणि इतर हजारो समस्या असताना त्या सोडवायच्या राहिल्या बाजूला.......

आणि शिवजयंती ,गणेशोत्सव कशासाठी सुरु केले होते ?
आपापसातील भांडण मिटवून एकत्र येण्यासाठी आणि इथ त्या शिवजयंती वरूनच भांडण

तसही आजकाल शिवजयंती आणि गणेशोत्सव साजरा करतात म्हणजे काय ? वर्गण्या गोळा करून चार रिकामटेकडी टाळकी लाउड स्पिकरच्या भिंती उभारून दारू पिउन धिंगाणा घालणार

अश्या जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा त्या पैशातून काहीतरी समाजोपयोगी करा