शिवजयंती हायजँक ????

पगला गजोधर's picture
पगला गजोधर in काथ्याकूट
21 Aug 2015 - 1:14 pm
गाभा: 

महाराष्ट्र-भूषण पुरस्कारावरून आजूबाजूला एवढा गदारोळ उठलेला होता, त्यामुळे मी ठरवलं होत की एक मिपाकर म्हणून आपण त्या वादात पडायचं नाही, तर शिवरायांना सामान्य जनतेपर्यन्त कोणी पोहोचवण्याची सुरुवात केली व का ?, हा इतिहास तपासून जरा थोडफार माझ्यापरीने पडताळूया, मला अशी माहिती मिळाली की, शिवरायांची महती ओळखणारे पहिले व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा जोतिबा फुले होते. यासाठी १८६९ साली शिवाजी महाराजांची समाधी फुलेंनी समाधी प्रथम शोधली. (जी समाधी पडकी काट्याकुट्यात गडप होती.) यानंतर 27 रुपये वर्गणी गोळ करून समाधीस्थळाची देखभाल केली. म्हणजे शिवाजी राजे गेल्यानंतर २०० वर्षांच्या काळात कोणालाही आठवण नसावी. अफाट कर्तृत्वाच्या समाजरक्षकाची, स्वराज्य उभे करणाऱ्याची याद नसावी, याचे आश्चर्य वाटते. त्यावेळीसुद्धा मूळनिवासी शेतकर्यांच्या जीवनाचे तीन तेरा वाजले होते, म्हणूनच ज्या राजाच्या काळात सुरक्षा, सहकार्य मिळाले होते (कर गोळा करताना शेतकऱयांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही), शेतकऱयांच्या जमिनीची मोजदाद करून नावे करून दिली, शेतकऱ्याच्या भल्यासाठी प्रयत्न केले. शेती, शेतकरी, त्यांचा बैलबारदाना, वृक्षतोड याविषयी जागरूकतेने प्रयत्न केले, शोषणव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी वतनदारी, मिरासदारी संपवली (सैन्यदलाला पगार देणारा असा राजा). त्याची महती जनतेपर्यंत यावी म्हणूनच महात्मा फुल्यांनी प्रयत्न केले. महाराजाच्या गुणांमुळे ज्योतीराव फुले यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख 'शेतकऱ्यांचा राजा' 'कुळवाडीभूषण' असा केला व महाराजांवर, जगातील पहिले मराठी चरिञ -एक हजार ओव्यांचा कुळवाडीभूषण हा पोवाडा रचला. त्यांच्यातल्या महाराजांवरील प्रेम, श्रद्धा, भक्ती पोटी महाराष्ट्राच्या राजाबद्दलची अस्मिता म्हणूनच १९ फेब्रुवारी १८६९ साली पहिली शिवजयंती पुणे येथे सुरू केली ती १८९० च्या आसपास निधन होईपर्यंत चालू होती. शिवरायांच्या प्रेरणेने महात्मा फुल्यांनी समाजकार्य सुरू केले होते. ते अस्पृश्यतेच्या रूढीवर प्रहार करू लागले होते. त्यांनी मुलांमुलींसाठी शाळा सुरू केल्या. प्रबोधनाच्या माध्यमातून समाजजागृती सुरू केली. पण सांगा बरे, आज तुम्हाला प्रश्न विचारला कोणी "शिवजयंती कोणी सुरु केली ?", तर चटकन त्याचे उत्तर काय बरे येते तुमच्या डोळ्यापुढे ?
आजकाल शिवरायांच्या बद्दल आपण परस्परांत संवाद साधताना, 'शिवराय व शेतकरी/शेती' या आस्पेक्टचे मूलगामी महत्व दुर्दैवाने तुलनेने फार कमी लक्षात घेतले जाते, व जो कोणी या अंगाने मांडणी करतो, त्याचाही गंभीरपणे विचार करत नाही कोणी, असे वाटते. एकूणच सर्वच राजकीय शक्तींनी शिवाजी महाराजांना ऐक सेलेबल विषय करून, आपापसात वाटून घेतल्या सारखे दिसते, त्यामुळे महाराजांचे एकूणच सादरीकरण समाजामधे, 'तुळजाभवानीच्या कृपेने' वैगरे सारख्या दैववादी दिशेने जात आहे, असे वाटते.

माझ्या वैयक्तिक मते आजपासून ६०-७० वर्षांनी, "शिवजयंती कोणी सुरु केली ?" या प्रश्नाचे उत्तर 'बाबासाहेब पुरंदरे' असे मिळाले तर त्यावेळी काहीही वावगे वाटणार नाही कदाचित…

प्रतिक्रिया

असंका's picture

24 Aug 2015 - 4:02 pm | असंका

फारच सुंदर!! अगदी नेमके!!

धन्यवाद...

_मनश्री_'s picture

24 Aug 2015 - 4:40 pm | _मनश्री_

आभारी आहे..........

जिज्ञासूंना वाचण्यासाठी अर्काईव्ह डॉट ऑर्गवर रायगडाची जीवनगाथा लेखक शांताराम विष्णु आवळसकर नावाचा एक चांगला संशोधन करून लिहिला गेलेला संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहे. रायगडच्या इतिहासाचा अत्यंत साद्यंत वृत्तांत या ग्रंथात आहे. पेशवे काळातील गडावरील उत्सवांची माहितीही आली आहे. (पेशवे काळातील गडावरील उत्सवांचा वर प्रतिसादांमधून यापुर्वीच उल्लेख केला गेला आहे त्या उल्लेखास हा संदर्भ ग्रंथ दुजोरा देण्यास उपयूक्त ठरावा)

जेम्स डग्लसच्या पुढचीही माहिती सदर संदर्भ ग्रंथातून आली आहे. ग्रंथाची प्रस्तावना पाहता शक्य तेवढे निष्पक्ष आणि संदर्भासहीत लेखन करण्याचा लेखकाचा प्रयत्न असावा असे दिसते. जेम्स डग्लसच्या आधी दिनबंधू या सत्यशोधक चळवळीतील नियतकालीकातून दखल घेतली गेल्याचा उल्लेख मराठी विश्वकोशात आल्याचे वरच्या एका प्रतिसादातून नोंदवलेच आहे. पण समहाऊ शांताराम आवळसकरांच्या ग्रंथात (१९६२) सत्यशोधक समाजाकडून समाधी शोध घेतल्याचा उल्लेख येत नाही. शांताराम आवळसकर इतर प्राचीन दस्तएवजांच्या शोधात एवढे गुरफटले असतील कि हा उल्लेख त्यांच्या पर्यंत पोहोचला नसेल किंवा राहून गेला असेल. इन एनी केस रायगडाच्या अभ्यासकांसाठी बरीच उर्वरीत माहिती देणारा हा एक चांगाला ग्रंथ आहे.

बॅटमॅन's picture

24 Aug 2015 - 5:54 pm | बॅटमॅन

आयला, हे पुस्तक आर्काईव्ह वरती आलं का? एकच नंबर राव. बारातेरा वर्षांपूर्वी मुद्दामहून या पुस्तकाची झेरॉक्स काढून घेतली होती.

पैसा's picture

24 Aug 2015 - 6:26 pm | पैसा

वर उल्लेख आलेल्या नारायण कुलकर्णी आणि वि.का.राजवाडे हे तर समकालीन. त्यांच्या लिखाणातही म. फुल्यांचा उल्लेख कुठे दिसला नाही. हे सगळेच जण अशी चूक अनवधाने करतील का?

फुलथ्रॉटल जिनियस's picture

24 Aug 2015 - 7:37 pm | फुलथ्रॉटल जिनियस

महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली हे राजवाडे आणि कुलकर्नी यांना ठाऊक होते,तरी त्यांनी ते प्रकरन दाबुन ठेवले,याच्या मागची कारणे मला माहीत आहेत .लवकरच इथे ती देईन.

होबासराव's picture

24 Aug 2015 - 7:57 pm | होबासराव

कमाल आहे बॉ तुमच्या मेंदुची, एकाच विषयावर किति परस्पर विरोधी मत व्यक्त केलय तुम्हि. जरा हि लिंक उघडुन पाह्ता का ? तुमचिच प्रतिक्रिया आहे. बहुदा आयडी टॉगल करायला विसरला :)
http://www.misalpav.com/comment/731455#comment-731455

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2015 - 8:04 pm | श्रीगुरुजी

>>> महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवजयंती सुरु केली हे राजवाडे आणि कुलकर्नी यांना ठाऊक होते,तरी त्यांनी ते प्रकरन दाबुन ठेवले,याच्या मागची कारणे मला माहीत आहेत .लवकरच इथे ती देईन.

नाना, आता थापेबाजी पुरे करा.

बाबासाहेब पुरंदरे -
शिवाजीराजा छत्रपती या शब्दांची जादू एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मराठी मनांत पुन्हा शिलगावली गेली. नक्की वर्ष आणि दिवस माहीत नाही. कुठे सापडत नाही. पण थोर महात्मा आपल्या चार सहकारी सौंगड्यांनिशी रायगडावर आला. हाच महात्मा महाराष्ट्राला कळवळून सांगत होता , ' ज्ञान मिळवा. अभ्यास करा. ज्ञानाविण मति गेली , गती गेली , सर्वस्व गेलं. दारिद्यात आणि अपमानात कुजत जगू नका. मराठी पोरीबाळींनो , लेकीसुनांनो तुम्हीही शिका , फुकट राबणारे गुलाम होऊ नका. शेतकऱ्यांनो , कष्टासाठी अन् पोटासाठी कर्तबगारीचा आसूड हाती घ्या. '

या महात्म्याने शिवाजीराजांचं विश्वरूप ओळखलं होतं. हा महात्मा रायगडावर आला. त्याने शिवाजी महाराजांच्या समाधीवर डोकं टेकलं. महाराजांची कीतीर् आणि त्यांचे पोवाडे गाण्याचा जणू संकल्पच सोडून हा महात्मा रायगडावरून उतरला. महात्मा जोतीराव गोविंदराव फुले. ते नेमके केव्हा रायगडावर येऊन गेले , ती तारीख सापडत नाही. पुढच्या काळात लोकमान्य टिळक हे दोन वेळा रायगडावर येऊन गेले. त्यांनी महाराजांच्या समाधीच्या जीणोर्द्धाराचा संकल्पच सोडला. शिवाजी रायगड स्मारक मंडळ या नावाचा ट्रस्ट स्थापन केला. शिवजयंतीचे सार्वजनिक उत्सव देशभर सुरू झालेच होते. अशा सर्व लोकजागरणातून पुन्हा एकदा रायगडाकडे महाराष्ट्राचे लक्ष गेले.

प्रा. हरि नरके -
शिवजयंती सुरू करण्याचे श्रेय सामान्यपणे लोकमान्य टिळक यांना दिलं जातं. १८९५-९६ साली लोकमान्य टिळक शिवजयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला रायगडावर उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमात सहभाग दिला. ही महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. तथापि त्याआधी पंधरा वर्ष म्हणजे १८८० साली पुण्याचे महात्मा जोतिराव फुले हे रायगडावर गेल्याचे आणि तिथे त्यांनी शिवरायांची समाधी शोधून काढल्याचे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध झाले आहेत. १८६९ साली जोतिराव फुल्यांनी मराठी भाषेतील शिवचरित्र (पोवाडा रूपी) लिहून प्रकाशित केले आहे. आणि शिवाजी महाराजांचा अभिमानास्पद वारसा घराघरात पोहोचवला. छपाईची सुरूवात झाल्यापासूनचे मराठीतले हे पहिले शिवचरित्र आहे. जोतिरावांनी सत्यशोधक चळवळीच्या प्रेरणा सांगताना शिवरायांना महत्त्वाचे स्थान दिलेले आहे. जोतिरावांच्या सगळ्या लेखनात, आणि भाषणांमध्ये शिवरायांचा प्राधान्याने उल्लेख आढळतो. त्यांच्या शिवचरित्राच्या आजवर २५ हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. त्याची भाषांतरंही विविध भाषांमध्ये झालेली आहेत. १८८० साली जोतिराव पुण्यातून चालत रायगडावर गेले. तिथे झाडा-झुडपात हरवलेली आणि पालापाचोळ्यात दिसत नसलेली शिवरायांची समाधी जोतिरावांनी मोठ्या कष्टाने शोधून काढली. त्याठिकाणी साफसफाई केली व शिवरायांच्या समाधीवर फुले वाहिली. ही माहिती जोतिरावांनी पुण्यात येऊन सारसबाग जवळ असलेल्या हिराबागेत आयोजित केलेल्या शिवसमाधी विषयक सभेत स्वतः सांगितल्याची नोंद मिळालेली आहे. या सभेत साफळकर स्वामी, गंगारामभाऊ म्हस्के आदी मान्यवर पुणेकरांची भाषणे झालेली होती. त्याच सभेत शिवजयंची उत्सव सुरू करण्याचा विचार जोतिरावांनी मांडला. आणि त्याला सर्वानुमते पाठिंबा देण्यात आला. त्या बैठकीत शिवजयंतीसाठी लोकवर्गणी जमवण्याचा निर्णय झाला. एकूण २७ रूपये त्या सभेत जमले. त्यातील तीन रुपये स्वतः जोतिरावांनी दिले. १८८०साली पुण्यात आणि रायगडावर शिवजयंती उत्सवाची जोतिरावांनी सुरूवात केली. त्यांचे सहकारी कामगार नेते रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईच्या लालबाग आणि परळ या गिरणी कामगारांच्या वस्त्यांमध्ये शिवजयंती उत्सव सुरू केला. हा उत्सव सत्यशोधक मंडळी अतिशय भव्य प्रमाणात करत असत. १८९३ साली गणेशोत्सवाला सार्वजनिक रूप देऊन टिळकांनी त्याचे चळवळीमध्ये रूपांतर केले. त्यांना शिवजयंतीचेही महत्त्व वाटत होते. म्हणूनच पंधरा वर्षे सुरू असलेल्या राष्ट्रीय कार्यक्रमात टिळक जातीने उपस्थित राहिले. आणि आपला सहभाग देऊन त्यांनी हा उत्सव आणखी मोठा केला.

महत्त्वाची माहिती, धन्यवाद.

पैसा's picture

24 Aug 2015 - 7:55 pm | पैसा

हेच नेमके कुठे वाचनात आले नव्हते. महत्त्वाची माहिती आहे.

फुलथ्रॉटल जिनियस's picture

24 Aug 2015 - 8:12 pm | फुलथ्रॉटल जिनियस

छान माहीती ,फक्त हिराबागेत त्या सभेला उपस्थीत असलेल्या स्वामींचे नाव साफळकर नसून चाफळकर असे आहे,ते एक ब्राह्मण गृहस्थ होते.

पैसा's picture

24 Aug 2015 - 8:14 pm | पैसा

तुम्ही ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आहात का? =))

श्रीगुरुजी's picture

24 Aug 2015 - 8:19 pm | श्रीगुरुजी

त्या सभेत नानांकडे पान,सुपारी,तंबाखू ची व्यवस्था होती आणि माई उपस्थित सौभाग्यवती स्त्रियांना हळदीकु़ंकु लावत होत्या असा तत्कालीन ब्रिटिश गॅझेटिअर मध्ये उल्लेख आहे.

माहितगार's picture

24 Aug 2015 - 9:02 pm | माहितगार

उपयूक्त माहिती.

अर्थात हरि नरके सर आणि दिपक टिळक सर दोघांनीही आपापल्या अंतर्गत येणार्‍या संस्थामध्ये साठवलेली सारी ओरीजनल डॉक्यूमेंट्स आंतरजालावर टाकली पाहीजेत असे माझे प्रामाणिक मत आहे.

गुर्जि आम्हि तर हे पण ऐकलय कि तिथे फक्त माई ला मिळालेला मान पाहुन, बबिता द रेकर ने नाना ला जेव्हा तो घरी (दुसर्‍या) आला तो कुंदल कुंदल के मारा था.

dadadarekar's picture

24 Aug 2015 - 8:52 pm | dadadarekar

कार्यक्रम संपल्यावर सतरंज्या घड्या करायला खोटासराव व श्रीमास्तुरे होते.

दोन सतरंज्या अद्यापही गायब आहेत म्हणे.

होबासराव's picture

24 Aug 2015 - 9:05 pm | होबासराव

पानाचि ऑर्डर नाना ला (पानाचि गादी) लगेहाथो... आलेल्या सौभाग्यवती स्त्रियांना हळदीकु़ंकु लावायची जबाबदारी सौ. नाना (प्रथम) म्हण्जे माईने घेतलि होति. कार्यक्रम सुरु होण्यापुर्वि सडा संमार्जन लहानग्या रेकर ने आणि त्याचा सावत्र भाउ हितेष ह्याने सांभाळल होत. कार्यक्रम संपता संपता खुप रात्र झालि होति त्यामुळे मग आवरा आवर करायला नाना ने आपला जेष्ठ पुत्र सचीन आणि टॉप गिअर्ड ला बोलावले होते..सतरंज्या त्यांनी गुंडाळल्या होत्या. हो बरोबर ना त्या दोन सतरंज्याचे पैशे आम्हि दिले भरुन मंडप वाल्याला. कारण नाना चे ते दोन चींधीचोर सतरंजि विकुन मजा करायला गायब झाले होते.
समझता नही है यार्

dadadarekar's picture

24 Aug 2015 - 11:12 pm | dadadarekar

दुसर्‍याच्या सतरंज्यावर कब्जा करायला हिंदू शिकले नाहीत. म्हणूनच एकाच देशात रडत बसलेत.

आमचे हिरवे भाइजान / पांढरे दादा बघा... जगभर च्या सतरंज्या काखोटीस मारून बसलेत.

अतिरेक्याच्या जनाज्याला पंधरा हजार गोळा होतात !

.... हिरव्या सत्रंजीवर बसलेला हिरवा दादाखाँ

पैसा's picture

24 Aug 2015 - 11:23 pm | पैसा

दादुसचा आयडी गुर्जींनी हॅक केला!

होबासराव's picture

25 Aug 2015 - 7:33 pm | होबासराव

अरे मुर्गिचोर मुंगेरीलाल कितने ख्वाब देखते हो दिन मे :))

विकास's picture

24 Aug 2015 - 11:08 pm | विकास

एक जुनी आठवण - माझी नाही, पण कधीतरी वाचलेली!

आणिबाणीच्या काळानंतर जेंव्हा जनता सरकार आले आणि नंतर ते पडणार अशी चिन्हे दिसू लागली, त्या काळात एकदा दिल्ली मधला एक शिवाजी महाराजांचा पुतळा बघत जात असताना अटलजींना खालील ओळी सुचल्या: (चुभूद्याघ्या)

अंधेरेमे लढे शिवाजी, अंधेरेसे लढे शिवाजी
दिल्ली की दुर्दशा देखकर लाज शरम से खडे शिवाजी!

आणि काय करतात..:)) =)) मुर्गिचोर घडी घडी ड्रामा करता है...

स्वयंभु रोज शीवांभु घेणार्‍या सतरंजी चोरुन त्याच्या चड्ड्या शीवणार्‍या मुर्गिचोर मुंगेरीलाल चा फॅन
होबासराव

श्रीगुरुजी's picture

26 Aug 2015 - 2:15 pm | श्रीगुरुजी

चड्ड्या? आम्ही तर ऐकलं की त्यांनी सतरंज्या चोरून त्यांच्या लुंग्या शिवल्या म्हणे!

ज्योतीबा फुले यांनी शिवसमाधीचा शोध लावला हि लोणकढी थाप आहे. १८१८ ते १८८५ या दरम्यान रायगडावर जायची परवानगी न्हवती. गड बंद होता. १८८५ साली रिचर्ड टेम्पल नावाचा अधिकारी गडावर गेला त्याने शिवसमाधी भग्न अवस्थेत पहिली. त्याने नाराजी व्यक्त केली. या वृत्ताला प्रसिद्धी मिळाल्यावर मग सर्व जागे झाले. सातारकर , कोल्हापूरकर यांच्यावर पण निष्क्रियते बद्दल टीका झाली. त्यानन्तर टिळकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झाली. आज आपण जी समाधी पाहतो ती १९२६ साली जीर्णोद्धार केलेली आहे.