चीनी कम

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
26 Jun 2015 - 11:49 pm

आजवर भारतीय उपखंडामधे(सार्क) केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या रस्सीखेचीलाच फार महत्त्व मिळे पण भारताने आपल्या पश्चिमेकडून आता थोडे पूर्वेकडे पाहणेही आवश्यक आहे असे प्रतिपादन केले जाऊ लागले. पूर्वीच्या सरकारने त्याचे वर्णन लूक-ईस्ट पॉलिसी असे केले होते. सध्या त्यापुढे एक पाऊल जावून अ‍ॅक्ट-ईस्ट पोलिसीचा बोलबाला आहे. पंतप्रधानांच्या मंगोलिया, बांगलादेश भेटीनंतर याला पुन्हा दुजोरा मिळाला आहे. पूर्वेकडे सर्वात महत्त्वाचा देश म्हणजे चीन..

काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचली चीनमधे चीनमधल्या घडामोडींकडे आम्हाला अधिक डोळसपणे पहायला हवे.

गेली काही वर्षे चीनवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. सलग तिसर्‍या वर्षी ही बातमी आम्ही पाहतो आहोत. चीनच्या शिनजियांग या सीमावर्ती भागापुरते हे मर्यादित नसून बाकी भागातही याचा प्रसार होतो आहे. इतक्यातच झालेल्या काही जखमांतून अद्याप सावरलेला नाही. तात्पर्य अस्वस्थता कायम आहे.

पाकिस्तानबाबत आपण बरीच चर्चा करतो. चीनबाबत फारशी माहिती मिळत नाही. त्यामुळे कुणाला चीनबद्दल अधिक माहिती असेल तर द्यावी.


एक बूच - याबाबत फक्त माहिती हवी आहे. फर्स्ट हँड असेल तर उत्तम.
'चीन कसा ग्रेट आहे' हे घरात बसून दिलेले प्रमाणपत्र नको आहे...

चीन हा आमच्या उत्सुकतेचा विषय आहे. वर्तमानपत्री धागे काढणे हा हेतु नसून अधिक माहिती मिळवणे हा हेतु आहे हे सूज्ञांनी ध्यानात घेतले असेलच.

धोरणविचार

प्रतिक्रिया

आशु जोग's picture

27 Jun 2015 - 11:13 am | आशु जोग

मंगोलिया इ विषय नंतर

आशु जोग's picture

28 Jun 2015 - 9:05 pm | आशु जोग

. Testing karu rahilo

dadadarekar's picture

28 Jun 2015 - 10:37 pm | dadadarekar

तीन व्व्ळेला बंदी घातली ना ?

आता आणि एक वर्ष थांबा. परत बंदी घालतील.

एकदा बंदी करुन भागलं नाही का ?

तीन वेळेला बंदी हे विधान २१ वेळा प्रुथ्वी नि:क्षत्रीय केली , या विधानाइतकेच हास्यास्पद आहे.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 Jun 2015 - 11:29 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

२१ वेळा नि:क्षत्रिय करताना काही पॅरासाईट्सना विसरले बहुतेक.

आशु जोग's picture

29 Jun 2015 - 10:03 pm | आशु जोग

आपला मुद्दा विचारणीय आहे

होबासराव's picture

29 Jun 2015 - 12:34 pm | होबासराव

चिमणराव येक नंबर :)

होबासराव's picture

29 Jun 2015 - 9:26 pm | होबासराव

आम्हाला अधिक डोळसपणे पहायला हवे, गेली काही वर्षे चीनवर आम्ही लक्ष ठेवून आहोत, तिसर्‍या वर्षी ही बातमी आम्ही पाहतो, चीन हा आमच्या उत्सुकतेचा विषय आहे

मग काय ठरलय तर सूज्ञांच ?

आशु जोग's picture

1 Jul 2015 - 8:54 pm | आशु जोग

पानाच्या अगदी खालची बातमी पहावी

चीनच्या काही भागात दहशतवादाचा धोका