राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्या तिसर्या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे.
ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो.
मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते.
या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात?
(डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
प्रतिक्रिया
17 Jun 2015 - 10:45 am | मृत्युन्जय
हितेश हा पैसातैंचा डु आयडी तर नव्हता?
17 Jun 2015 - 11:07 am | टवाळ कार्टा
शक्यता नाकारता येत नाही :)
17 Jun 2015 - 10:47 am | नाखु
काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट वाचायला मिळेल म्हणून धागा उघडला आणि भेंडीची भाजी मिळाली. कसं होणार "ताव-ताव" प्रतिसादींचे. माफ करा ताई तुम्ही सनसनी निर्माण करण्यात लै कमी पडल्या.(रेशीपी पुन्हा लिहून काढा)
"ताव-ताव्"=पानभर आणि त्वेशाने दोन्ही अर्थानी पाहिजे तो घ्या.(जय लोक्शाही,जय मिपा,जय मिपाकर)
याचकांची पत्रे मधून
नाखुस लाह्या-फुटाणे
17 Jun 2015 - 10:52 am | पैसा
अजून काही नावं लिहायची होती. पण नसत्या भानगडीत सापडायला नक्को म्हणून गप बसले. चुरचुरीत, अचाट, अतर्क्य ते सगळं लोकांनी लिहायचं आहे. हम बोलेगा तो...
21 Jun 2015 - 12:06 am | आशु जोग
असे वर्तमानपत्री धागे काढणे हा काही जणांचा हुप्प्यासिद्ध हक्क आहे
पण
तोही हिरावलात त्याबद्दल धन्यवाद !
17 Jun 2015 - 1:16 pm | विशाल कुलकर्णी
काही चुरचुरीत,अतर्क्य्,अच्याट वाचायला मिळेल म्हणून धागा उघडला
नायतर काय राव. पॉपकान आन कोल्डरिन आर्डर करुन आलो व्हतो, आता आर्डर केन्सल करावी लागनार राव :)
17 Jun 2015 - 1:24 pm | खेडूत
ऱ्हांउंद्या. ठिवा जरा.
वाट बगा वाईच. आजून धागे यतायत मागनं !
17 Jun 2015 - 10:52 am | अजया
ललित मोदींना माणुसकी म्हणून मदत केल्या गेली आहे!ते ब्रिटनमध्ये दिवाळखोरी जाहिर करुन गरीब असल्याने स्वतःच्या जेटने पत्नीचं आॅपरेशन नाही झालं मग आहे विमान हाताशी म्हणून जीवाचे पोर्तुगाल करत आहेत.असे कुजकट धागे काढुन गरीब बिचार्या मोदींना,सुष्माबैंना मिपावर टार्गेट केल्याने एक मिपाकर म्हणून शरम वाटल्या गेली आहे!
17 Jun 2015 - 11:00 am | यशोधरा
पैतै यूटू? बरं झालं, आता मीही लवकरच तुझ्या पावलावर पाऊल ठेवून अगदी अस्सेच धागे काढीन! =))
17 Jun 2015 - 11:01 am | मुक्त विहारि
"करूणासिंधू शुषमाजी" ह्या नावाच्या, लेखाची लिंक देत आहे.
http://epaper.loksatta.com/522154/indian-express/16-06-2015#page/7/1
"(डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )"
ह्या बाबत असहमत.
शतकी धाग्यांचा तुम्हाला सोस नाही आणि तुम्ही पळपुटेपणा करणार नाही, हे खर्या मिपाकरांना ठावूक आहे.
17 Jun 2015 - 11:02 am | एस
संपादकांनीतरी असं करू नये. असो.
17 Jun 2015 - 11:07 am | पैसा
आता गंभीरपणे सांगते. जे काही चालू आहे ते मला एक नागरिक म्हणून अजिबात आवडलेलं नाही. मिपावर सामान्य सदस्य म्हणून चर्चा करायचा मला हक्क आहेच. एका बाजूला झुकलेलं लिखाण वाटू नये म्हणून थोडं विनोदी पद्धतीने लिहिलं. पण मला गंभीरपणे यावर चर्चा व्हायला हवी आहे.
17 Jun 2015 - 11:15 am | मुक्त विहारि
ह्या विषयावर गंभीरपणे काय बोलणार?
प्रत्येक पक्षांत अशा काही व्यक्ती असतातच.
भाजपाची "ब्रेन टँक/ थिंक टँक" ह्या विषयावर "सुषमा स्वराज" ह्यांना पाठीशी घालते / की त्यांना पक्ष सोडायला भाग पाडते? हे बघणे रोचक ठरेल.
स्वच्छ कारभार करायला, स्वच्छ पदाधिकारीच ह्वेत, त्याशिवाय "अच्छे दिन" येणार नाहीत, असे वाटते.
बाद्वे,
सोत्रिं बरोबर, चावडीवरच्या गप्पा मारायला जायला हवे.
17 Jun 2015 - 11:27 am | टवाळ कार्टा
मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक यावर उत्तर देतीलच याची खात्री वाटते
रच्याकने - मी असा प्रतिसाद लिल्हा याचा अर्थ मी कोणत्या दुस्र्या पक्षाला समर्थन देतो असा घेउ नये (कै दिवस आलेत...मिपावर सुध्धा असे वाक्य लिहायला लाग्ते तर जे शिकलेले नैत ते कै घंटा बदल्णार)
17 Jun 2015 - 11:31 am | मुक्त विहारि
शिक्षणापेक्षा आणि पैशांपेक्षा, सुसंस्कार महत्वाचे.
(धाग्याने शंभरी गाठावी, ह्या साठी दर १०-१५ मिनिटांनी, प्रतिसाद / उप-प्रतिसाद, टंकणारा) मुवि.
17 Jun 2015 - 11:41 am | नाखु
तुम्ही चावडीवर जाऊ नका सध्या भुजांमध्ले "बळ" ओसरल्याने लेखण्या गंजल्यात (तश्याही त्या काकांवर कधीच चालवाव्या वाटल्या नाहीत्च).
इथेच थांबा गुरुजी आले की उंदीर येतीलच मग काय १०० ची हमी तो पर्यंत डांगे साहेब आणि क्लिंटन ना आवतान धाडा. पानभर प्रतीसादाचे हक्क त्यांचेकडेच आहेत. धागा सजवायचाय, फक्त दांडीया नकोय पै ताईंना.
पिटातील प्रेक्षक
नाखु पन्नाशीकर
17 Jun 2015 - 2:27 pm | अनिरुद्ध.वैद्य
आगरकर - टिळक ह्यांमध्ये झालेला वाद आठवला … आगरकर म्हणायचे की आधी समाज सुधारावा मग स्वराज्य! टिळक उलटे …. आधी स्वराज्य मग समाज सुधारणा …
धाग्याच्या शंभरी मध्ये आम्चेपण योगदान
17 Jun 2015 - 2:32 pm | टवाळ कार्टा
मी आगरकरांच्या बाजूने
17 Jun 2015 - 2:46 pm | खेडूत
''आगरकर - टिळक आज असते तर काय म्हणाले असते?'' यावर एक धागा काढा असे सुचवतो!
17 Jun 2015 - 4:16 pm | अनिरुद्ध.वैद्य
वाचावे लागेल आगरकर आणि टिळक! तेवढा वेळ काढावा लागल्यास सरकार बदलून जायचं :D
17 Jun 2015 - 7:42 pm | यशोधरा
अगदी!
18 Jun 2015 - 12:38 pm | टवाळ कार्टा
राजकिय (अथवा कुठल्याही) विषयाबद्दल मिपावर धागा टाकण्यासाठी वाचावेच लागते हे कोणी सांगितले ;)
17 Jun 2015 - 11:38 am | चिनार
अरे टक्या..मिपावरचे (आंधळे) भाजपसमर्थक ही द्विरुक्ती झाली (जसं पिवळा पितांबर, वटवृक्षाच्या झाडाखाली !). भाजप समर्थक म्हणजे आंधळेच हा ठराव मिपावर (किंवा अन्य कोठेही) न मांडताच पास झाला असल्याचं काहींनी जाहीर केले आहे. तेंव्हा फक्त भाजप समर्थक म्हटले तरी चालेल.
2 Jul 2015 - 11:02 am | llपुण्याचे पेशवेll
मिपावर अथवा अन्य कुठेही, भाजप कींवा कोणाचेहि समर्थक हे अंधच असतात. न्यायीपणाचा जो काही असतो तो फक्त 'तोरा'. :)
त्यामुळे नुसतं समर्थक म्हणण्यास अनुमोदन.
18 Aug 2015 - 12:06 am | सामान्यनागरिक
जरा सांभाळुन रहा. मिपावर कोणी बजरंगदलाचे कार्यकर्ते नाहीत याची खात्री करून घ्या.
तरीसुद्धा खबरदारीचा उपाय म्हणून मोटर सायकलवर एकटे फिरत जाऊ नका(कोणी रमेश कदम मागे असू शकतो).
18 Jun 2015 - 12:38 am | वॉल्टर व्हाईट
चर्चा छान झाली आहे, काही प्रतिसाद माहितीपुर्ण आहेत ते अत्यंत मोलाचे आहेत. हा धागा असा वेगळा काढण्याऐवजी 'सदाहरित बातम्या' प्रकारच्या धाग्यात चालला असता असे वाटले. आता फक्त शिर्षक बदलले तरी जमेल.
17 Jun 2015 - 11:07 am | टवाळ कार्टा
असं करू नये म्हणजे कसं करू नये?
17 Jun 2015 - 11:09 am | अत्रुप्त आत्मा
कुणी? कुणी काढला हा धागा??? हा भाजपचा lowकशाही'चा अपमाण आहे. असे धागे काढणार्यांना स हार च्या वाळवंटात पाच पाच मिनिटे बांधुन ठेवले पाहिजे.
हा आमच्या राष्ट्रीय अस्मितेचा अपमाण आहे..
.......हा आमच्या ...........ह्याचा अपमाण आहे..
..............हा आमच्या ...........त्याचा अपमाण आहे..
हा आमच्या ........................................................... आहे...
.............हा आमच्या ........................................................... आहे...
...........................हा आमच्या ........................................................... आहे...
........................................हा आमच्या ........................................................... आहे...
..........................................................हा आमच्या ........................................................... आहे...
....................................
वरिल जागा प्रतिसादांच्या संख्येकडे डोळा ठेऊन योग्यवेळी - भरल्या जातील.
जय हिंद!
17 Jun 2015 - 11:16 am | मदनबाण
या संबंधी काही बातम्या :-
पतीच्या कबुलीनं सुषमा स्वराज यांना आणखीन एक धक्का
ललित मोदी प्रकरणी वसुंधरा राजे अडचणीत, लंडनमध्ये साक्षीदार राहिल्याचा दावा
स्वराज-मोदींची मागील वर्षी लंडनच्या हॉटेलमध्ये भेट झाली होती : सूत्र
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Aao Raja... ;):-Gabbar Is Back
17 Jun 2015 - 11:20 am | प्रभाकर पेठकर
कांही अभ्यासपूर्ण लेख असणार म्हणून मोठ्या विश्वासाने लेख उघडला आणि सपशेल तोंडघशी पडलो. आता प्रतिसादातून कांही निश्पन्न होते का पाहावे लागणार.
17 Jun 2015 - 11:31 am | पैसा
पण अशा बाबतीत उघडपणे आपण काही बोलू शकत नाही. मुळात अर्णव गोस्वामीकडे या खाजगी ईमेल्स कशा पोचल्या हा गंभीर प्रश्न आहे.
17 Jun 2015 - 12:49 pm | टवाळ कार्टा
पोचल्या का पोहचवल्या गेल्या?? कैपण होउ शकते
17 Jun 2015 - 2:26 pm | हाडक्या
अर्णव हा एक नीच माणूस आहे हे यातून सिद्ध होतेय.
६५ वर्षात प्रथमच एक कर्तबगार परराष्ट्र मंत्री देशाला लाभला असताना असली कृत्ये म्हणजे देशद्रोहच नव्हे काय ? आमचा देशच करंट्यांचा आहे झालं.
(इथे स्वराज यांची एका वर्षातील परराष्ट्र मंत्री म्हणून वेगवेगळ्या देशातील कामगिरी आणि त्याचे वर्णन कल्पावे. आणि हे इथून पुढच्या प्रत्येक प्रतिसादात तुम्हाला सहन करावे लागणार आहे हे आधीच सांगतो. )
17 Jun 2015 - 2:34 pm | काळा पहाड
मी ट्विटर वरून आधीच टाईम्स नाऊ ला अनफॉलो केलेलं आहे आणि आता ते चॅनेल पण काढून टाकतोय. आता तो धागडधिंगा अती झालाय.
17 Jun 2015 - 3:08 pm | कपिलमुनी
ही यादी बघा,
https://en.wikipedia.org/wiki/Minister_of_External_Affairs_(India)
पूर्वी हे पद लाल बहादूर शास्त्री , अटल बिहारी वाजपेयी, यशवंत राव चव्हाण यांनी भूषविले आहे. त्या कर्तबगार आहेतच पण प्रथमच एक कर्तबगार परराष्ट्र मंत्री म्हणण्याचे प्रयोजन कळाले नाही.
( पैसा तै, १०० झाली की पार्टी ;) )
17 Jun 2015 - 11:17 pm | श्रीगुरुजी
सहमत.
या यादीत जसवंत सिंग यांचे देखील नाव हवे.
प्रथमच म्हणजे गेल्या १० वर्षात प्रथमच असे त्यांना म्हणायचे असावे, कारण युपीए च्या काळात सुरवातीला नटवरसिंग, नंतर एस एम कृष्णा व नंतर सलमान खुर्शिद हे परराष्ट्रमंत्री होते.
'ऑईल फॉर फूड' या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात नाव आल्याने नटवरसिंगांना जावे लागले, तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका परीषदेत भाषण करताना कृष्णांनी स्वत:च्या भाषणाऐवजी द. आफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्र्याचे भाषण वाचून दाखवायला सुरूवात केली होती. सलमान खुर्शिद दिग्विजयप्रमाणेच वाचाळतेबद्दलच प्रसिद्ध होते. यांच्या तुलनेत सुषमा स्वराज नक्कीच उजव्या वाटतात.
17 Jun 2015 - 11:21 pm | खटासि खट
सुषमा स्वराज नक्कीच उजव्या वाटतात ?????
17 Jun 2015 - 11:33 pm | श्रीगुरुजी
तशाही त्या उजव्या (उजव्या विचारांच्या पक्षात) आहेतच.
24 Jun 2015 - 12:48 am | रॉजरमूर
जसवंत सिंग आणि कर्तबगार ?
आणि यांची कर्तबगारी काय अझर मसूद आणि त्याच्या साथीदारांना कंधार ला पोचवणे ?
17 Jun 2015 - 11:20 am | चिनार
वरकरणी या प्रकरणाविषयी कळल्यावर हा मिडीयाचा धिंगाणा आहे असे वाटले होते. पण आता वाटते आहे की ही सुषमा स्वराज यांच्या राजकीय जीवनातली मोठी चूक आहे. मानवता असो किंवा काही असो, ललित मोदीसारख्याला मदत करणे निषेधार्ह आहे. सुषमा ताई तुम्ही असे करायला नको होते.
सुषमा स्वराज या माझ्या अत्यंत आवडत्या नेत्या आहेत !
थोडसं अवांतर , आयपीऐल घोटाळा उघडकीस आल्यावर ललित मोदी यांना परदेशात जाऊ का दिले असेल ?
ऐकीव माहितीनुसार, या घोटाळ्यात सामील असलेल्या सगळ्या मोठ्या लोकांविरुद्ध ललित मोदी जवळ पुरावे होते. मोठ्या लोकांमध्ये सर्वपक्षीय नेते आणि काही मोठे उद्योगपती सामील होते. ललित मोदीन्नी स्पष्ट शब्दात ,"मला हात लावाल तर याद राखा, सगळ्यांना अडकवेल" असं धमकी दिली होती. म्हणूनच त्यांना परदेशी पाठवले.
अर्थात ही सगळी ऐकीव माहिती आहे.
17 Jun 2015 - 11:26 am | मुक्त विहारि
म्हणजे सगळा पैशाचा खेळ.
(शंभरी गाठायला (धाग्याने), हा जाणीवपुर्वक दिलेला उप-प्रतिसाद.)
2 Jul 2015 - 11:07 am | llपुण्याचे पेशवेll
स्वराज कौशल हे मोदींच्या १० पैकि ७ कंपन्यांचे लीगल अॅडवायजर आहेत ही गोष्ट अगदीच नवीण नाही. वकिली वर्तुळात ही गोष्ट लोकांना ठावूक होती. बर आयपीएल घोटाळ्यात एकटा ललित मोदी दोषी आणि बाकी धुतले तांदूळ होते का हे ही पाहणे महत्वाचे.
टाइम्स नाऊ ची सेटलमेंट कशावर होते ते पाहणे महत्वाचे.
17 Jun 2015 - 11:26 am | बाळ सप्रे
बा द वे भाजप सत्तेत नसताना स्वराजबाईंनी ललित मोदींना नक्की काय आणि कशी मदत केली??
17 Jun 2015 - 11:32 am | पैसा
काल समजले त्याप्रमाणे जुलै ऑगस्ट २०१४.
17 Jun 2015 - 11:39 am | अनुप ढेरे
ललित मोदी अजून एका परराष्ट्रमंत्र्याला घेऊन बुडणार आहेत. थरूर झाले आता स्वराज. अस्संगाशी संग खुर्चीशी गाठ.
17 Jun 2015 - 11:43 am | पैसा
सुनंदा पुष्करचे काय झाले? आय पी एलमधले खरे गड्डे आहेत त्यांच्यापर्यंत हे सगळे कधी पोचू शकेल असे वाटत नाही.
17 Jun 2015 - 11:55 am | प्रसाद१९७१
पैसा ताई - धाग्याने शंभरी गाठावी ( आणि तशी इच्छा आधीच सांगणे ) म्हणुन प्रत्येक प्रतिसादावर प्रतिसाद देण्याची तुमची आयडीया कौतुकास्पद आहे.
मी पण नक्की मदत करीन
17 Jun 2015 - 12:03 pm | पैसा
धाग्यात सगळेच मुद्दे लिहिणे शक्य नव्हते. जसे मुद्दे येतील तशी चर्चा होईलच.
17 Jun 2015 - 12:12 pm | अनुप ढेरे
थरूरांची खुर्ची तर गेलीच. आयपीएल टीमही गेली. राजकीय कारकिर्द ५-१० वर्ष मागे गेली. आणि सुनंदा पुष्करची टांगती तलवार कायम डोक्यावर रहाणार... हा बराच मोठा फटका आहे.
याबाबतीत स्वराज यांनी केलेली मदत हा नॉन इशु आहे असं वाटतय. आणि याचा परिणामही काही झालेला नाहिये. परिस्थिती जैसे थे आहे. फक्त ललित मोदी पोर्तुगालला जाउन आले. पण त्यांची मुलगी मोदींची वकील असणं, राजेंच यात ओढलं जाणं यामुळे लोकांचा संशय बळावतोय.
बाकी क्वात्रोची आणि अँडरसनची पार्श्वभूमी असणार्यांनी/त्यांच्या समर्थकांनी यावर बोलावं हे रोचक आहे.
17 Jun 2015 - 1:26 pm | आनंदी गोपाळ
लोकसत्तेतल्या लेखातले काही वाक्ये इथे टंकतो :
या परराष्ट्रमंत्र्यांनी - ज्यांचे सरकारच मुळात भ्रष्टाचार काळा पैसा खणून काढण्याची शपथ घेत सत्तेवर आले आहे - त्यांनी देशाच्या आर्थिक गुन्हेगाराला 'मानवतावादी' दृष्टीकोणातून मदत करताना देशाचे धोरण बदलले. ते करताना त्यांनी अर्थ वा गृहखात्याला विचारातही घेतले नाही. पण औचित्याचे काय हा प्रश्न शिल्लक राहतोच. हा प्रश्न खरे तर भाजप व संघानेच विचारायला हवा. परंतू ते काँग्रेसच्या भ्रष्ट आचाराकडे बोट दाखवत आहेत. काँग्रेसने जे खाल्ले तेच तुम्हीही खाणार असाल, तर मग फर्क काय तुमच्यात आणि त्यांच्यात? या सवालावर कट्टर अतिराष्ट्रवादी पांघरूण घालणे शक्य आहे...
17 Jun 2015 - 2:14 pm | बाळ सप्रे
हेच म्हणतो !!
17 Jun 2015 - 2:16 pm | अनुप ढेरे
ललित मोदीला इंग्लंडातून पोर्तुगालला जौ द्या असं सांगणे आणि गुन्हेगाराला भारतातून पळून जायला मदत करणे हे सारखं आहे असं म्हणत असाल तर अवघड आहे. यात नक्की काय तोटा झाला भारताचा किंवा कोणावर काय अन्याय झाला हे थोडं विस्कटून सांगणार का?
17 Jun 2015 - 3:08 pm | श्रीगुरुजी
>>> त्यांनी देशाच्या आर्थिक गुन्हेगाराला 'मानवतावादी' दृष्टीकोणातून मदत करताना देशाचे धोरण बदलले. ते करताना त्यांनी अर्थ वा गृहखात्याला विचारातही घेतले नाही. पण औचित्याचे काय हा प्रश्न शिल्लक राहतोच.
नक्की कोणते धोरण बदलले? आधी कोणते धोरण होते आणि आता त्यात काय बदल झाला? आधीच्या धोरणामुळे देशाचा नक्की कोणता व किती फायदा होत होता? या बदलामुळे देशाचे नक्की कोणते व किती नुकसान झाले?
17 Jun 2015 - 3:15 pm | कपिलमुनी
एका गुन्हेगाराला मदत करत असताना , किंवा एका गुन्हेगाराची विनंती आली असताना देशाच्या परराष्ट्र खात्यास कळविणे औचित्यपूर्ण ठरले असते.
"एखाद्या गुन्हेगाराला परस्पर मदत करणे आणि ते लपवून ठेवणे" हे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे .
बाकी औचित्याचे काय? ह्याला तुम्ही पुन्हा एकदा बगल दिली आहे.
17 Jun 2015 - 3:26 pm | श्रीगुरुजी
>>> एका गुन्हेगाराला मदत करत असताना , किंवा एका गुन्हेगाराची विनंती आली असताना देशाच्या परराष्ट्र खात्यास कळविणे औचित्यपूर्ण ठरले असते.
त्या स्वतःच परराष्ट्रमंत्री आहेत. त्यांनी काय स्वतःलाच पत्र लिहायला हवे होते का?
>>> "एखाद्या गुन्हेगाराला परस्पर मदत करणे आणि ते लपवून ठेवणे" हे चुकीचे आणि बेकायदेशीर आहे .
मोदीला नक्की कोणती मदत केली? मोदीला इंग्लंडने प्रवासासाठी कागदपत्रे देण्याबद्दल कोणताही निर्णय घेतला तरी त्यामुळे द्विपक्षीय संबंधांवर परीणाम होणार नाही असे सांगणे म्हणजे गुन्हेगाराला मदत होते का? केवळ एका व्यक्तीवर दोन देशांमधील संबंध अवलंबून असतात का? पूर्वी इंग्लंडने भारतात वाँटेड असलेल्या अनेक अतिरेक्यांना व गुन्हेगारांना आश्रय देऊन भारताची प्रत्यार्पणाची मागणी धुडकावून लावली होती. त्यावळी द्विपक्षीय संबंधांवर किती परीणाम झाला होता? मोदीला प्रवासाची कागदपत्रे दिल्यास द्विपक्षीय संबंधांवर परीणाम होईल अशी भूमिका घेणे हे अत्यंत हास्यास्पद होते. सुषमा स्वराजांनी फक्त ही हास्यास्पद भूमिका खोडून काढली इतकेच. असे होण्यात मोदीला कणभरही मदत झालेली नाही.
मोदी अजूनही भारतात वाँटेड आहे, त्याच्यावरील गुन्हे कायम आहेत आणि इंग्लंड कोणत्याही परिस्थितीत त्याला भारताच्या हवाली करणार नाही हे नक्की.
>>> बाकी औचित्याचे काय? ह्याला तुम्ही पुन्हा एकदा बगल दिली आहे.
जे झाले त्याच्यात काहीही अनुचित झालेले नाही.
17 Jun 2015 - 3:38 pm | कपिलमुनी
एकट्या सुषमा स्वराज्य म्हणजे सर्व परराष्ट्र खात आहे का ?
या मधे सचिव असतात अधिकारी असतात त्याना अंधारात का ठेवले ?
आणि सदर मनुष्य गुन्हेगार असताना , एक गुन्हेगार आपणासोबत संपर्क ठेवुन आहे तर त्याची माहिते गृह आणि अर्थ खात्यास द्यायला हवी. यूपीए सरकारने जर ट्रॅव्हल डॉक्युमेंट देण्यास मनाई केली असेल आणि ती स्वराज यांनी त्यांच्या अधिकारामध्ये ( त्यांना नक्कीच तो आहे ) कॅन्सल केली असेल तर त्याचे डॉक्युमेंटेशन हवे.
जर "हास्यास्पद भूमिका खोडून काढली" तर तसे जाहीर करायला हवे जेणे करून अधिकार्यांनाही कळेल इतर खात्यानांही कळेल .
चुपके चुपके कारभार कशाला??
17 Jun 2015 - 11:09 pm | श्रीगुरुजी
सुषमा स्वराज म्हणजे संपूर्ण परराष्ट्र खाते नव्हे. परंतु परराष्ट्र खात्याचे सचिव आणि अधिकारी यांना त्यांनी अंधारात ठेवले होते याची खात्री आहे का? मुळात हा इश्यूच नाही. मोदीला परदेशी जायची इंग्लंडने परवानगी द्यावी अशी कोणतीही शिफारस केलेली नाही सुषमा स्वराजांनी केलेली नाही. इंग्लंडने नियम व कायद्यानुसार त्याच्या अर्जाचा विचार करावा व निर्णय घ्यावा. जो काही निर्णय असेल त्यामुळे द्विपक्षीय संबंधात फरक पडणार नाही असेच त्यांनी लिहिले होते. समजा त्यांनी सचिवांना व अधिकार्यांना अंधारात ठेवले होते असे क्षणभर गृहीत धरू या. पण ही गोष्ट इतकी किरकोळ व बिनमहत्त्वाची आहे की ती सचिवांना/अधिकार्यांना समजून्/न समजून काहीही फरक पडला असता असे वाटत नाही.
मुळात मोदीच्या बाबतीत असे नक्की काय घडले होते ज्यामुळे मोदीला इंग्लंडबाहेर जाऊन देऊ नका अन्यथा आपल्या संबंधांवर परीणाम होईल असा इशारा युपीए सरकारला द्यावासा वाटला? युपीए सरकारने या इशार्यामागची कारणमीमांसा जनतेला कधीच सांगितलेली नाही. मोदी हा अमानुल्ला खान किंवा जगजितसिंग चौहान किंवा लिट्टे संघटनेपेक्षा खतरनाक गुन्हेगार होता का? ललित मोदी या एका व्यक्तीवर दोन देशातील संबंध अवलंबून असतात का?
>>> आणि सदर मनुष्य गुन्हेगार असताना , एक गुन्हेगार आपणासोबत संपर्क ठेवुन आहे तर त्याची माहिते गृह आणि अर्थ खात्यास द्यायला हवी.
तशी ती दिली असेल सुद्धा. नक्की कोणाला यबद्दल खात्रीशीर माहिती आहे का?
>>> चुपके चुपके कारभार कशाला??
यात कोणताही कायदा मोडलेला नाही किंवा आऊट ऑफ वे जाऊन, नियम मोडून मदत केलेली नाही. मुळात ही गोष्टच इतकी किरकोळ व बिनमहत्त्वाची आहे की जगाला हे सर्व ओरडून सांगण्याची त्यांना गरज वाटली नसावी. २-३ दिवसांपूर्वी पहिल्यांदा याविषयी वाहिन्यांवर बातम्या येत होत्या तेव्हा इतक्या फालतू गोष्टीला इतके कव्हरेज मिळाल्याचे पाहून आश्चर्य वाटत होते.
19 Jun 2015 - 1:47 pm | मंदार दिलीप जोशी
भ्रष्टाचार इज अ ग्लोबल फेनोमेना असं म्हटलं की झालं, नै का?
17 Jun 2015 - 2:10 pm | काळा पहाड
मुलगी सज्ञान आहे. आणि तिनं कुणाचं वकीलपत्र घ्यावं हा तिचा प्रश्न आहे. दोन सज्ञान व्यक्तींमध्ये असणार्या नात्यामुळं एका व्यक्तीच्या कार्यांबद्दल दुसर्या व्यक्तीला जबाबदार धरता येत नाही. कायद्यानं नाही, औचित्यानं सुद्धा नाही. किंबहुना सुषमा स्वराज यांनी जरी त्यांचं वकीलपत्र घेतलं असतं (त्या मंत्री नसताना) आणि नंतर जर त्या मंत्री झाल्या असत्या तरी त्यांना जबाबदार धरता येत नाही. हां, मंत्री असताना वकीलपत्र घेता येत नाहीच.
मोदींची पत्नी राजेंची ३० वर्षांपासून मैत्रीण आहे. तिला राजेंनीच ऑपरेशन साठी दाखल केलं होतं. हा कसा गुन्हा होवू शकतो? ललीत मोदींची पत्नी = ललीत मोदी असं तर नाहीये ना?
17 Jun 2015 - 2:19 pm | टवाळ कार्टा
हाच न्याय कसाबचे वकिलपत्र घेणार्याला अथवा अतिरेक्यांची वकिलपत्रे घेणार्यांना सुध्धा लागू होतो का?
17 Jun 2015 - 2:25 pm | काळा पहाड
हो.
17 Jun 2015 - 2:33 pm | टवाळ कार्टा
आणि तो खाप पंचायतवाल्या केसमधला लॉयर? ज्याने टीव्हीवर मुक्ताफळे उधळलेली
17 Jun 2015 - 2:41 pm | काळा पहाड
एकतर मला ह्या खाप पंचायत वाल्या प्रकाराबद्दल माहिती नाही. पण भारतीय कायद्या नुसार एखाद्याचं वकीलपत्र घेता येत नाही असा नियम नाही. प्रत्येकाला वकीलाचा अधिकार आहेच. भारतीय कायद्यानुसार दावूद इब्राहीमला / लख्वीला सुद्धा वकील घेण्याचा व एखाद्या वकीलाला त्याचं वकीलपत्र घेण्याचा अधिकार आहे. तुम्हाला याच्यात आश्चर्य कशाचं वाटतंय?
टीपः हां याचा अर्थ सगळ्याच गुन्हेगारांना (आणि खासकरून देशद्रोही अतिरेक्यांना) कोर्टापर्यंत पोचू द्यावं असा होत नाही. पण ते अलाहिदा.
17 Jun 2015 - 2:34 pm | अनिरुद्ध.वैद्य
कसाबचा काय संबंध?
17 Jun 2015 - 2:45 pm | टवाळ कार्टा
http://www.misalpav.com/comment/708080#comment-708080
हे वाचले नै का? कसाबचा संबंध नैच कुठे
17 Jun 2015 - 4:19 pm | अनिरुद्ध.वैद्य
नैच समजल :(
17 Jun 2015 - 2:39 pm | हाडक्या
याचे उत्तर होच असेल, फक्त मग आपल्याकडचे "काही" लोक, त्यांना (पक्षी: वकिलांना) भर चौकात हाल हाल करुन मारु इच्छित असतील इतकेच (संधी मिळाली तर करतील का कै म्हैत).
17 Jun 2015 - 2:41 pm | श्रीगुरुजी
पूर्वी राम जेठमलानींनी इंदिरा गांधी खून खटल्यातील आरोपी, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी, संजय दत्त इ. चे वकीलपत्र घेतले होते.
कपिल सिब्बलांनी चंदिगड उच्च न्यायालयातील भ्रष्ट न्यायाधीश रामस्वामी, गोव्यातील कुख्यात तस्कर चर्चिल आलेमाव, बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन इ. चे वकीलपत्र घेतले होते.
पूर्वी जेटलींनी चिंदंबरमचे वकीलपत्र घेतले होते.
17 Jun 2015 - 2:19 pm | अनुप ढेरे
यात गुन्हा घडला आहे असं मी म्हणत नाहीच्चे. या सबंधांमुळे इथे काहितरी पाणी मुरतय असा संशय कोणालाही येईल आणि तो अस्थानी नसेल. सज्ञान वकील वगैरे केवळ तांत्रिक बाबी आहे. आई परराष्ट्र मंत्री असताना एखाद्या वकिलाने इमिगेशनच्या केसेस घेणं यात कॉन्फ्लिक्ट ऑफ ईटरेस्ट ची शंका येणं स्वाभाविक आहे. (पण बहुधा वकील फक्त ऑगस्ट २०१४ पर्यंत होत्या त्या)
17 Jun 2015 - 12:09 pm | सव्यसाची
माझ्या माहितीप्रमाणे थरूर मनुष्यबळ विकास राज्यमंत्री होते.
17 Jun 2015 - 12:17 pm | अनुप ढेरे
आयपीएल प्रकरणाआधी परराष्ट्रराज्यमंत्री होते.२०१२ मध्ये परत मंत्री बनले ते 'एचार्डी'मधे
विकीवरून
17 Jun 2015 - 12:29 pm | सव्यसाची
धन्यवाद. माहिती दिलेबद्दल & माझी चूक दुरुस्त केल्याबद्दल. :)
17 Jun 2015 - 11:56 am | आकाश कंदील
मला असे वाटते कोन्ग्रेस कडे आता मुद्देच उरले नसावेत. म्हणून हे असे जनतेशी कमी जवळीक असलेले मुद्दे ते मांडत आहेत. काल कोग्रेस् च्या आनंद शर्मां ललित मोदी ची तुलना चक्क मुंबई बॉम्ब स्पोट खटल्यातील आरोपी दाउद इब्राहीम बरोबर करत होते. माला वाटते ह्या मुद्या पेक्षा भाजपला घेरायला बाकी बरेच मुद्दे आहेत जसे कि जमीन अधिग्रहण, बुलेट ट्रेन, गंगा सफाई इत्यादी. खरे सागतो पैसा तैनी हा धागा काढला म्हणून मी लिहिले नाहीतर हल्ली मी बातम्या मधे हा विषय आला तर सरळ च्यानल बदलतो.
17 Jun 2015 - 12:05 pm | पैसा
हे प्रकरण आताच उघडकीला का आले? हा प्रश्न आहेच. म्यानमारमधील अतितेक्यांवरील कारवाईची चर्चा संपली नाही तोच हे प्रकरण उघडकीला आले.
2 Jul 2015 - 12:10 pm | llपुण्याचे पेशवेll
आणि हो एका बाजूला अभिषेक मनू सिंघवी भाजपाचा समाचार घेत असताना सूरजेवाला मात्र 'मम्मामॅडम'च्या नावाबद्द्ल छोट्या मोदींची मोठ्या मोदींना मदत वगैरे म्हणत होते. असो.
17 Jun 2015 - 12:07 pm | सव्यसाची
या प्रकरणात गोष्टी आहेत. १. Legality २. Propriety
आता कायदेशीर बाजूने कदाचित बरोबरही असेल असे म्हणायला वाव आहे कारण सुरुवातीला विरोधकांनी राजीनामा मागताना 'नैतिक मुद्द्यावरून राजीनामा द्या' असे म्हटले होते. काल कि परवा कॉंग्रेस ने गुन्हा नोंदवा वगैरे अशी भाषा सुरु केली. मला कायदा तितपत कळत नाही पण यात गुन्हा कोणता आणि काय नोंदवायचा हे समजले नाही. तसेच कॉंग्रेस ने सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी अशी मागणी केली. पण कॉंग्रेस ला वाटते आहे सर्वोच्च न्यायालयाने सुओ मोटो कार्यवाही करावी. मला वाटत नाही कि ते होईल. बरेच प्रोटोकॉल पाळले गेले नाहीत (जसे कि कॉंग्रेस ने केलेला आरोप : लंडन मध्ये भारतीय राजदुताशी चर्चा न करता निर्णय घेतला वगैरे) असे जरी विरोधकांचे म्हणणे असेल तरी यात कायदा कोणता पाळला गेला नाही हे समजले नाही. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या ही केस किती बळकट आहे याबद्दल काही सांगता येत नाही. दुसरा एक मुद्दा आला कि ललित मोदींच्या पासपोर्ट ची केस दिल्ली उच्च न्यायालयात सुरु होती. त्यावेळी हा निर्णय घेणे चुकीचे होते. त्याला उत्तर असे आले कि एप्रिल २०१४ मधेच ह्या केस चे आर्ग्युमेंट संपुष्टात आले होते आणि ऑर्डर रिजर्व केली होती. त्यामुळे नवीन सरकारने कोर्टात जाऊन आपले मत बदलले असे झाले नाही. पुढे ऑगस्ट मध्ये त्यांचा पासपोर्ट त्यांना परत मिळाला आणि पासपोर्ट काढून नाही घ्यायला पाहिजे होता असे कोर्टाने जजमेंट मध्ये म्हटल्याचे कळते आहे.
ललित मोदींना कोणतेही travel document द्यायला युपीए ने विरोध करताना जे कारण युके ला दिले ते होते कि आपल्या द्विपक्षीय संबंधाना हानी पोहोचेल. सुषमा स्वराज यांनी युके ला सांगितले कि तुमच्या कायद्यानुसार जे असेल ते करा, द्विपक्षीय संबंधांवर फरक पडणार नाही. वरकरणी पाहता एका माणसामुळे दोन देशांमधील संबंध संपुष्टात वगैरे नाही यायला हवेत आणि त्यामुळे सुषमा स्वराज यांनी केले ते बरोबर केले असे वाटेल. परंतु त्यानंतर ललित मोदी - सुषमा स्वराज यांचे संबंध खूप जुने आहेत आणि यामागे काही quid pro quo तर नाही ना अशी शंका सगळ्यांनी विचारायला सुरुवात केली आहे.
युपीए सरकारने स्वतः ललित मोदींचे extradition करायला नको असे ठरवल्याची बातमी काल आउटलूक मध्ये आली होती. हे प्रकरण आता इतके गुंतागुंतीचे झाले आहे कि प्रत्येक गोष्टीवर दोन्ही बाजू आपले आपले पुरावे देत आहेत आणि त्यामुळे नवीन लोकांची नावे, नवीन प्रकरणे बाहेर पडत आहेत.
कालच वसुंधरा राजे यांचे एक 'प्रतिज्ञा पत्र' समोर आले. पण ते 'प्रतिज्ञापत्र' वाचून मला बोधच होईना. आपण प्रतिज्ञापत्र दिले तर stamp असतो किंवा प्रत्येक पानावर सही करतो पण इथे तसे काहीच नाही. त्या कागदाच्या मागे 'file copy' असा watermark आहे आणि खाली २-४ ओळींचा मसुदा आहे. ते खरे आहे कि खोटे यावर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता हे प्रकरण राजस्थान मध्ये सरकले आहे.
Blue corner notice वरून पण एक प्रकारचे वादळ उठले आहे. इंटरपोल ने BCN नाही असे सांगितले तर युपीए म्हणते आहे कि BCN आहे. शेवटी काल अरुण जेटली यांनी स्पष्ट केले कि रेवेन्यु विभागाकडून Light Blue corner notice जारी केली होती.
या सगळ्या गोष्टींमध्ये एक महत्वाची गोष्ट हि आहे कि अजूनही पंतप्रधान काहीही बोलले नाहीत. राजनाथ सिंग यांचे प्रकरण समोर आले होते तेव्हा पंतप्रधानांनी स्वतः येउन बाजू स्पष्ट केली होती. पण आता ते अजून नाही घडले. काल पहिल्यांदाच अरुण जेटली यांनी सुषमा स्वराज यांची बाजू घेतली. त्यामुळे सुषमा स्वराज राजीनामा देतील किंवा तो घेतला जाईल असे 'सध्या' वाटत तरी नाही. पुढे काय होईल ते पाहूयात!
17 Jun 2015 - 12:22 pm | पैसा
माहितीपूर्ण प्रतिसाद.
17 Jun 2015 - 12:31 pm | बॅटमॅन
मस्त प्रतिसाद!!! बरेच काही उलगडून सांगणारा. धन्यवाद!
17 Jun 2015 - 2:46 pm | अनिरुद्ध.वैद्य
फार छान आणि सविस्तर लिहिलेत, माहितीसाठी धन्यवाद! एकंदरीत सगळेच गुंतलेले आहेत आणि ललित मोदी अडचणीत आलेत तर सगळ्यांना त्रास होईल असे दिसतेय…
17 Jun 2015 - 4:27 pm | चिगो
मान्य.. एका व्यक्तीला मानवीय वा इतर कूठल्याही कारणाने संबंधित देशाने त्यांच्या कायद्यानुसार मदत केल्यास आमची हरकत नाही, हे म्हणणे ह्यात काही चुक नाही.. बाकी आयपीएल आणि त्यातला सगळा सावळागोंधळ पुर्वीच्या सरकारच्या काळातच आणि मला वाटतं, पवारसाहेब बीसीसीआय मध्ये असतांनाच झाला होता.. आता उगाच मोरल हायग्राऊंड घेण्यात अर्थ नाही..
Quid Pro Quoचा प्रश्न तेव्हा येतो जेव्हा स्वराज ह्यांनी ललित मोदीला कुठलीही Out of the way जाऊन मदत केली तर.. जर कुठल्याही इतर भारतीय नागरीकबद्दल जी भुमिका त्यांनी घेतली असती तीच जर त्यांनी मोदीच्या बाबतीत घेतली तर त्यात काही चुक आहे, असं मला तरी वाटत नाही.. Caeser's wife should be above all suspicion हे जरी मान्य असलं तरी फक्त कौटुंबिक संबंध आहेत म्हणून just to be above suspicion त्यांनी संबंधित व्यक्तीला मदत करु नये असं मी म्हणणार नाही..
17 Jun 2015 - 12:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
कोणाही नेत्याला मखरात बसवून पूजा करणे आणि मुख्य म्हणजे ते डोळे बंद करून सतत करत राहणे हे बुद्धिच्या कमतरतेचे लक्षण होय. परंतु, बर्याचदा तसे करणारेही बुद्दु नसून काहीतरी व्यक्तीगत स्वार्थ साधण्यासाठी तसे करत असतात.
नेत्यांच्या वचकात राहणार्या जनतेपेक्षा नेत्यांवर सतत वचक ठेवणार्या जनतेला जास्त चांगली लोकशाही मिळते.
सगळे नेते म्हणजे स्खलनशील माणसेच. संत मंडळींच्या जिवनातही एखादा काळा क्षण येऊन गेलेला आहे. त्यामुळे कोणी १००% पांढरा नी कोणी १००% काळा असे होऊ शकतच नाही. सगळे करड्या रंगांच्या छटा घेऊन असतात. तात्कालिक परिस्थिती पाहून त्यातल्या त्यात पांढर्या रंगाकडे झुकणारे नेते निवडत राहणे हेच जनतेच्या हातात असते... आणि लोकशाही ती संधी तरी लोकांना मिळते, इतकेच !
स्वच्छ प्रतिमा बाळगणार्या नेत्यांच्या आयुष्यात काही गैरसोईचे प्रसंग असणे हे काही अपवादात्मक नाही. पण पकडले गेल्यावर ही त्याबाबत शिक्षा न होणे चांगले लक्षण नाही. मात्र शिक्षा न झाल्यास ते काही जगातले पहिले उदाहरण नसेल... ही दुर्दैवी पण सत्य वस्तूस्थिती आहे !
17 Jun 2015 - 12:23 pm | पैसा
याबद्दल काय म्हणाल?
19 Jun 2015 - 6:34 pm | डॉ सुहास म्हात्रे
राजकारण, व्यापार, समाजकारण, किंबहुना कोणतेही '-कारण' करताना कळत-नकळत, प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष छोट्याछोट्या गोष्टी सगळ्यांच्याच हातून घडतात. मात्र धडधडीत बेकायदेशीर अथवा अनैतिक गोष्टी नकळत होत नाहीत. त्या न टाळणे म्हणजे बनेलपणा करणे होय.
एखादी व्यक्ती वरच्या पदाला पोहोचल्यावर तिचे विरोधकही तेवढेच वरच्या स्तराचे (आणि पोचलेले) असतात आणि ते त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी भूत व वर्तमानातल्या 'राईचा मेरु पर्वत' आणि 'मेरु पर्वताची राई' करण्यात कसूर करणार नाहीत हे नक्की !
शेवटी जो जिंकतो तो नंतर आपल्याला सोईचा इतिहास आणि आपले समर्थन करणारे नीतीमत्तेचे नियम बनवतो.
याला जीवन ऐसे नाव ! बघुया कोण जिंकते ते ;)
19 Jun 2015 - 4:28 pm | गुलाम
सुंदर प्रतिसाद!! हा प्रतिसाद भारताच्या जवळजवळ कोणत्याही राजकीय घटने/व्यक्तीसाठी लागू होईल.
19 Jun 2015 - 6:49 pm | काळा पहाड
नेत्यांना माणसे म्हटल्याबद्दल निषेध. नेते (सगळ्याच पक्षातले) आणि त्यांचे समर्थक यांच्या डोक्याचं उद्घाटन बंदुकीच्या दस्त्यानं ठेचून करावं एवढीच त्यांची लायकी आहे. तेव्हा कृपा करून राजकारणी लोकांना माणसाचा रंग देवू नये ही नम्र विनंती.
17 Jun 2015 - 12:12 pm | वगिश
भाजपा जर कॉंग्रेस ने ही असेच केले होते असे समजून आरोप उडवून लावत असेल तर हे साफ चुकीचे आहे. हे म्हणजे "आधीचा साहेब ५ तास झोपा काढत होता मग मी दोनच तास काढल्या तर काय बिघडले?" असे झाले. हे अनैतिकच आहे (बेकायदेशीर आहे की नाही तो वेगळा मुद्दा).
अशा गोष्टी भाजपा विषयी जनमानसात अविश्वास निर्माण करू शकतात. भजपा ने व समर्थकन्नि (मिहि एक) आपल्या चुकिन्चे समर्थन कॉंग्रेस कडे बोट दाखवून करू नये.
17 Jun 2015 - 12:13 pm | पुण्याचे वटवाघूळ
संघिष्ट भाजपमधील पुरूषप्रधान संस्कृतीतून सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे या स्त्री नेत्यांना एलिमिनेट करायला नागपुरातूनच हा डाव खेळला गेला आहे असे कुणा फेमिनिष्टाने म्ह्णायची वाट बघत आहे.
17 Jun 2015 - 12:24 pm | खेडूत
हा!हा!
ही काडी जरा बरीय!
17 Jun 2015 - 12:37 pm | बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
17 Jun 2015 - 12:43 pm | सुधीर
किर्ती आझादांच्या #अस्थीओकासाप ट्विटमुळे काल तशा नसत्या शंका-कुशंकांना काल जोर चढला होता.
17 Jun 2015 - 12:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
किती करायचेत? टार्गेट बोला तुम्हाला डिस्काउंट.
17 Jun 2015 - 12:41 pm | अजया
=))=))
17 Jun 2015 - 12:47 pm | मृत्युन्जय
लोकसत्तातला लेख काही बाबी वगळता चांगला आहे.
स्वराज आणि मोदी यांचे डोळ्यावर येण्याइतपत हितसंबंध आहेत. असे हितसंबंध जपताना बर्याच वेळा काही फेवर केले जातात. त्यात नविन असे काही नाहिच. पण या केसमध्ये हे हितसंबंध ज्याच्याशी आहेत त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप आहेत, तो एक फरारी गुन्हेगार आहे आणि काही कायदेशीर किंवा तांत्रिक बाबींमुळे अजुन ब्रिटनने त्याला भारताच्या हवाली केलेले नाही (अर्थात ब्रिटन बरोबर आपला गुन्हेगार हस्तांतरणाचा करार असतानाही ते मोदीला आपल्या ताब्यात देय नसतील तर त्याचा अर्थ स्पष्ट आहे की मागचे आणि हे सरकार जाणुनबुजुन काही लूपहोल्स ठेवत आहे किंवा ब्रिटन सरळसरळ त्या करारालाच आव्हान देतो आहे आणि भारत सरकारच्या कायदेशीर मागण्यांना जुमानत नाही आहे म्हणजेच तो भारताच्या सार्वभौमिक सरकारला आवाहन देतो आहे जे युपीएच्या काळात शक्य होते किंबहुना फक्त तेवढेच शक्य होते पण आक्रमक परराष्ट्र धोरण राबवणार्या भाजपा सरकारला हे जमत नाही हे मान्य होण्यासारखे नाही). अश्या गुन्हेगाराला आपले राजकीय वजन वापरुन काही फेव्हर्स मिळवुन देण्यामागे स्वराज यांचे खाजगी हितसंबंध गुंतले आहेत असे आरोप होणारच. माझ्या मते मोदी अजुन भारतात आलेला नाही हाच मुख्य मुद्दा आहे.
या प्रकरणाचीच दुसरी बाजू अशी की मोदींना त्यांच्या कॅन्सरग्रस्त पत्नीला भेटण्यासाठी आणि त्यासंदर्भात काही कागदपत्रांची पुर्तता करण्यासाठी पोर्तुगाल ला गेले होते. तुमच्या माझ्या पैकी कोणी अश्या अधिकारिक जागेवर असले असते तर आपण काय केले असते?:
१. मोदीला पोर्तुगाल ला जाताच येउ नये आणि बायकोला भेटताच येउ नये यासाठी प्रयत्न केले असते? यातुन कदाचित काही लोकांना आसुरी आनंद झाला असता पण भारताचा नक्की काय फायदा झाला असता कळत नाही.
२. काहिच केले नसते. मरेना का मोदी आणि त्याची बायको म्हणुन शांत बसलो असतो.
३. त्याला पोर्तुगालचा परवाना द्या पण त्याहुन आधिक काही नाही असे मानवतावादी दृष्टीकोनातुन सांगितले असते (जे सुषमा स्वराज यांनी त्यांच्या अखत्यारित केले)
सुषमा स्वराज यांनी स्वतःच्या पदाचा उपयोग करुन त्यांच्या मर्जीतल्या ललित मोदीला पोर्तुगालला जायचा परवाना मिळवुन दिला. असे करताना त्यांनी कुठलाही कायदा मोडलेला नाही. त्यांनी त्यांचा शब्द खर्ची घातला. हा शब्द मानवतावादी दृष्टीकोनातुन खर्ची न घालता केवळ मैत्रीखात्यात खर्चा घातला असता तर तो नक्कीच गंभीर नैतिक अपराध ठरला असता. सद्यस्थितीत तो तसा ठरत नाही. यात काहिच चुकीचे वर्तन झाले नाही असे नाही पण बेकायदेशीर देखील काही झालेले नाही. अधिकारिक पदाचा गैरवापर झालाच असे म्हणवत नाही पण एका गुन्हेगारावर फेव्हर करणे नैतिकदृष्ट्या कितपत योग्य आहे हे देखील कळत नाही. अर्थात भारतीय न्यायालयीन कक्षेबाहेर असलेल्या अश्या घटनांमध्ये निर्णय घेणे अर्थात परराष्ट्रखात्याच्या अखत्यारित येते. असा निर्णय सुषमा स्वराज यांनी स्वतःच्या सदसदविवेक्बुद्धीला धरुन घेतला असाबा अशी शंका घ्यायला जागा आहे पण त्यांचे खाजगी हितसंबंध लक्षात घेता त्यांचे अधिकारक्षेत्र बाजुला ठेवुन त्यांनी हा निर्णय पंतप्रधान कार्यालयाला घ्यायला लावला असता तर बरे झाले असते.
लोकसत्तेने उपस्थित केलेला औचित्याचा मुद्दा (अर्थ आणि गॄह खात्याला विश्वासात घ्यायच्या मुद्द्यावरुन) कितपत योग्य आहे त्याबद्दल शंका आहे. परराष्ट्रखात्याच्या अखत्यारित येणार्या मुद्द्यांवर गृह खाते काय भाष्य करणार? आणी अर्थमंत्री तर स्वतःच स्वराज यांचे समर्थन करत आहेत. तर मग या मुद्द्यावरुन औचित्याचा भंग झाला असेही म्हणवत नाही.
थोडक्यात सांगायचे तर काहितरी चुकले आहे. नक्की काय ते कुणालाच नीट सांगता येणार नाही. शब्दाशब्दावर बोट ठेवुन "मी इथे चुकले की तिथे चुकले" असे स्वराज यांनी विचारले तर सगळ्यांची तोंडे बंद होतील. पण तरीही एक वाँटेड गुन्हेगार परराष्ट्रमंत्र्यांशी असलेल्या जवळीकीचा फायदा घेउन नसते फेव्हर्स लाटून परदेशात पार्ट्या झोडत असेल तर ते नक्कीच आक्षेपार्ह आहे. शिवाय या संपुर्ण प्रकरणात ललित मोदीला भारतात आणण्यासाठी अजुन भारत सरकारने काहिच केलेले नाही हे देखील डोळ्यावर येण्यासारखे आहे.
17 Jun 2015 - 12:51 pm | सव्यसाची
बऱ्याच बाबी उलगडून सांगणारा प्रतिसाद. धन्यवाद.
17 Jun 2015 - 12:53 pm | काळा पहाड
तुमचा प्रतिसाद माझा प्रतिसाद लिहून झाल्यावर वाचला.
17 Jun 2015 - 3:20 pm | कपिलमुनी
स्वराज यांनी मानवतावादी दृष्टीकोनामधून मदत केली . मान्य .
त्यात त्यांचा वैयक्तीक फायदा नव्हता किंवा देशाचे नुकसानही नव्हते.
फक्त
त्यांनी मोदींच्या हालचालींची माहिती त्या वेळी अर्थ आणि गॄह खात्याला द्यायला हवी होती.
एवढेच वाटते.औचित्याचा मुद्दा इथे उपस्थित होतो
17 Jun 2015 - 4:03 pm | सव्यसाची
मला वाटते मोदींच्या हालचालीची माहिती सगळ्यांनाच होती. लंडन मधील घराचा पत्ता देखील सगळ्यांना ठाऊक होता. त्यांची ट्विटर वरची टाईमलाईन पाहिली तरी कुणालाही कळले असते कि कुठे आहेत ते. जिथे जिथे गेलेत तिथले सगळे फोटो वगैरे कायमच टाकत असतात. त्यामुळे सुषमा स्वराज यांनी सांगितले नाही म्हणून गृह खात्याला कळायचे राहिले असे कधीच नव्हते. (तसेही गृह खात्याचा या संदर्भात काही संबंध आहे असे वाटत नाही. 'इडी' अर्थखात्याच्या अखत्यारीत येते.)
17 Jun 2015 - 4:10 pm | कपिलमुनी
एखादा गुन्हेगाराने तुम्हाला संपर्क केल्यास तुम्ही संबंधित खात्यास कळवणार का?
17 Jun 2015 - 12:52 pm | काळा पहाड
आज ललित मोदींची मुलाखत बघितली. त्यावरून खालील गोष्टी कळल्या.
१. श्री. स्वराज हे ललित मोदी यांचे २२ वर्षांपासून वकील आहेत.
२. कु. स्वराज या ललित मोदी यांच्या ४ वर्षापासून वकील आहेत (त्या टीमच्या पार्ट आहेत).
३. सौ. स्वराज यांचे ललित मोदी यांच्याशी फॅमिली संबंध आहेत.
४. सौ. मोदी या एका प्रकारच्या कॅन्सरने आजारी होत्या. त्यांचे उपचार फक्त पोर्तुगालच्या एका रिसर्च इन्स्टिट्यूट मध्येच (प्रयोगात्मक प्रकारे) होवू शकत होते. ते हॉस्पिटल नाही.
५. या ऑपरेशन साठी श्री. मोदींच्या हस्ताक्षराची गरज नाही.
६. पोर्तुगालला जाण्यासाठी श्री. मोदींना युके डॉक्युमेंटस उपलब्ध करून देवू शकतो कारण ते युके चे नागरिक आहेत.
७. सौ. वसुंधरा राजे या सौ. मोदी यांच्या मित्र मागील ३० वर्षांपासून आहेत. त्यांनीच सौ. मोदींना पोर्तुगालच्या सेंटरमध्ये दाखल केलं.
८. सौ. मोदींचे काही अवयव काढण्यासाठी श्री. मोदींच्या हस्ताक्षराची गरज पडली असती. त्यामुळे श्री. मोदींना पोर्तुगालला जाणं भाग पडलं.
९. यासाठी भारत सरकारच्या परवानगीची गरज नसतानाही (बहुधा प्रत्यार्पणासंबंधी वगैरे इश्श्यूज मध्ये येवून काही अडचण येवू नये म्हणून) श्री. मोदींनी भारत सरकारकडे परवानगी मागितली.
१०. सौ. मोदींच्या जिवासाठी सौ. स्वराज यांनी परवानगी दिली.
वरचं जर खरं असेल तर स्वराज यांचा दोष दिसत नाही.
17 Jun 2015 - 12:57 pm | पुण्याचे वटवाघूळ
ललित मोदी हे युकेचे नागरिक आहेत हे नक्की का? तसे असेल तर सुषमा स्वराज या ट्रॅव्हेल डॉक्युमेन्टसाठी मध्ये पडायचा प्रश्नच येणार नाही. आपल्या नागरिकाला ट्रॅव्हेल डॉक्युमेन्ट द्यावे की नाही हे इंग्लंडचे सरकार भारत सरकारला थोडीच विचारणार आहे?
पण ते इंग्लंडचे नागरिक असतील तर त्यांचा भारतीय पासपोर्ट २०१० मध्ये रद्द होणे आणि ऑगस्ट २०१४ मध्ये कोर्टाच्या आदेशावरून परत बहाल होणे हा प्रकार कसा काय झाला?
17 Jun 2015 - 1:01 pm | टवाळ कार्टा
अश्या छोट्या आणि क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष नस्ते द्यायचे हो ;)
17 Jun 2015 - 1:58 pm | काळा पहाड
नाही या बाबतीत मला खरोखरच काही माहिती नाही. कारण मी हे सगळं तो इंटर्व्ह्यू बघून सांगतोय. एक चुकीची दुरुस्ती, इंटर्व्ह्यू श्री. राजदीप सरदेसाईनी इंडिया टुडे साठी घेतला होता. आणि ज्या प्रकारे ते श्री.मोदींची वाक्यं तोडून किंवा ते बोलत असतानाच मधेच दुसरे प्रश्न विचारत होते, त्यामुळे हे सगळं ऐकून समजून घेणं अवघड होतं. कदाचित ते चुकीचं ही असेल पण श्री. मोदींनी मला सरकारच्या परवानगीची गरज नव्हती हे विधान तसंच युके कोर्टाने त्यांच्यावरच्या केसेस फेटाळून लावल्या असं विधान केल्याचं मी ऐकलं.
17 Jun 2015 - 2:07 pm | सव्यसाची
मलाही हेच वाटले. राजदीप सरदेसाई बोलूच देत नव्हता.
बाकी ललित मोदी यांना रेसिडेन्सी मिळाली आहे कि सिटीझनशिप?
17 Jun 2015 - 2:53 pm | नाखु
श्री. राजदीप सरदेसाईनी ही प्रथा पहिल्यांदा आणली आणि ती वागळे प्रभुतींनी आप्लया कु-मगदूराप्रमाणे पुढे चालिवली आणि आता प्रघात्+पायंडा+अनिवार्यता बनली आहे.
उदा:
प्रश्नकर्ता : सध्या मिपावर राजकारण धाग्यांनी पातळी ओलांडली आहे असे तुम्हाला वाटते का नाही ?
मिपाकरः नाही लगेच असं सांगता येणार नाही ते धाग्या-धाग्यावर... (मध्येच तोडत) पुन्हा प्रश्नकर्ता : हो का नाही तेव्हढेच सांगा.
मिपाकरःनाही
प्रश्नकर्ता :पहा याचा अर्थ असा होतो की पूर्वी मिपावर राजकारण धाग्यांनी पातळी ओलांडली होती आणि अगदी सवंग, उथळ आणि बिनडोक धागे निघत होते असे सिद्ध होते.
मिपाकरः अहो मी असे कुठे म्हटलो.(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत)
प्रश्नकर्ता :नाही आप्ल्याकडे इतका वेळ नाही पुढचा प्रश्न तुम्हाला एकूणच मिपाकरांचा भारतीय राजकारणाविषयीचा दृष्टीकोण कसा वाटतो आश्वासक की निराशाजनक?
मिपाकरःअहो हे एका वाक्यात कसे सांगता येईल कारण वेग्वेगळ्या प्रसंगानुरूप ,विरोधी मत्-मतांतरे असतात..(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत)
प्रश्नकर्ता :नाही आप्ल्याकडे इतका वेळ नाही कसा आहे ते सांगा.
मिपाकरःअलिकडच्या दिल्ली राज्यातील घटना आणि केंद्रातील काही अप्रिय घटना पाहिल्याकी त्या त्या पक्ष विचारधारेला मानणार्या लोकांनाही...(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत)
प्रश्नकर्ता:पहा याचा अर्थ असा होतो की:सध्या एकूणच राजकारणाविषयी मिपावर अगदी निराशाजनक आणि कमालीची उदासीनता आली आहे आणि सर्वांना आता दिल्लीचेच काय भारताचेही कसे होईल याची काळजी वाटत आहे सारे अंध:कारमय आहे.
मिपाकरः अहो मी असे कुठे म्हटलो.(नेहमी प्रमाणे मध्येच तोडत)
प्रश्नकर्ता:तुमच्म मत पाहू आपण विश्रांती नंतर (जाहीरात सपट लोशन्+आज कुछ तूफानी करते है+भू$$$$क बस दो मिनिट) वगैरे.
17 Jun 2015 - 3:01 pm | काळा पहाड
बाकी श्री. ललित मोदींनी जी मुलाखत दिली ती पहाता त्यांचीही पट्टी उच्चारवाचीच होती. म्हणजे दोघेही एकमेकांना तोडत होते. फरक इतकाच की श्री. सरदेसाई क्वीक बाईट आणि भाजप सरकारला गोवता यावं अशी वाक्य मिळावीत म्हणून धडपडत होते तर श्री. मोदींना त्यांचा मुद्दा समजला जात नाहीये हे जाणवून अस्वस्थ होवून ते सरदेसाईंना तोडत होते. बाकी जर मोदींनी असं करण्याऐवजी प्रत्येक वाक्य शांतपणे पण ठामपणे उच्चारलं असतं तर सरदेसाईंना त्यांना तोडणं कठीण गेलं असतं. पण त्यांना बहुधा त्याचा सराव नसावा. ही क्लृप्ती वापरायचं राज ठाकरेंना चांगलंच माहीत आहे.
17 Jun 2015 - 3:17 pm | मृत्युन्जय
ही क्लृप्ती वापरायचं राज ठाकरेंना चांगलंच माहीत आहे.
एक्झॅक्टली. राज ठाकरेंनी एकदा कुठल्यातरी अँकरला असाच झापला होता. बहुधा अर्णब गोस्वामी होता तो.
17 Jun 2015 - 5:32 pm | विनोद१८
नाही, तो अर्णब गोस्वामी नव्हता 'राजदीप सरदेसाई' होता. पोपट केला होता त्याचा, सगळी मिजास उतरवली होती त्याची. नंतर अगदी आज्ञाधारक मुलाप्रमाणे प्रश्ण विचारत होता, तुनळीवर सापडेल ती मुलाखत, बघण्यासारखी आहे.
21 Jun 2015 - 2:56 pm | निनाद मुक्काम प...
काही दिवसांपूर्वी सरदेसाई चे पुस्तक प्रकाशित झाले व वागळे त्यांची मुलाखत घेतली तेव्हा प्रत्येक राजकारण्यांचे अनुभव सांगतांना त्याने राज चा मुलाखतीचा किस्सा सांगितला त्यात
सुरवतीला राज ने ह्यावेळी तुला मी टी र पी मळवून देतो असे सांगू मुलाखत सुरु झाल्यावर सरदेसाई वर तोंड सुख घेतले व ब्रेक दरम्यान विचारले किती झाला टी र पी
असो
17 Jun 2015 - 2:37 pm | श्रीगुरुजी
>>> ललित मोदी हे युकेचे नागरिक आहेत हे नक्की का? तसे असेल तर सुषमा स्वराज या ट्रॅव्हेल डॉक्युमेन्टसाठी मध्ये पडायचा प्रश्नच येणार नाही. आपल्या नागरिकाला ट्रॅव्हेल डॉक्युमेन्ट द्यावे की नाही हे इंग्लंडचे सरकार भारत सरकारला थोडीच विचारणार आहे?
भारताने मोदीचा पासपोर्ट रद्द केल्यावर इंग्लंडने त्याला इंग्लंडचे नागरिकत्व बहाल केले होते. ट्रॅव्हल डॉक्युमेंटसाठी इंग्लंड भारताचे मत जाणून घ्यायचा प्रयत्न करीत होता त्याचे कारण युपीएच्या काळात भारताने "ललित मोदीला इंग्लंडबाहेर जाऊन दिले तर भारत व इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवर परीणाम होईल" असे हास्यास्पद पत्र दिलेले होते.
1 Jul 2015 - 5:48 pm | कपिलमुनी
हे कुठे वाचलेत गुरुजी ?
अजून ललीत मोदी ब्रिटिश नागरीक नाहीये .
1 Jul 2015 - 10:53 pm | श्रीगुरुजी
भारताने त्याचे पारपत्र रद्द केल्यावर तो तिथे कोणत्या देशाचा नागरिक म्हणून राहतोय? इंग्लंडचा का कोणत्यातरी दुसर्या देशाचा? तो तिथे कायदेशीररित्या राहतोय का बेकायदेशीर घुसखोर म्हणून राहतोय?
1 Jul 2015 - 11:04 pm | dadadarekar
तर स्वराज बैचे किंवा भारतीय दूतावासाचे रिकमांडेशन त्याला का हवे होते ?
पारपत्र रद्द करण्याची शिक्षा दिली गेली आहे म्हणजे तो सकृतदर्शनी मोठा गुन्हेगार असणार हे नक्की ... मग स्वराजबाइ व वसुंधराराजे अशा गुन्हेगाराला का मदत करत होत्या ?
2 Jul 2015 - 2:23 am | सव्यसाची
जेव्हा ललित मोदी इथून गेले तेव्हा त्यांचे पारपत्र शाबूत होते. नंतर युपीए सरकारने ते रद्द केले. त्याच्याविरुद्ध उच्च न्यायालयात केस सुरु होती. पण पारपत्र अशा पद्धतीने रद्द होऊ शकत नाही असा कोर्टाने निर्णय दिला. तोपर्यंत तिथल्या सरकारकडे अर्ज देऊन तिथे राहण्याचा काही परवाना मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ती केस तिथल्या कोर्टात पण गेल्याचे समजले. ते तिथले नागरिक अजून झालेत असे वाटत नाही.
2 Jul 2015 - 3:44 am | संदीप डांगे
खरंच या प्रकरणात एवढा सावळा गोंधळ आहे ना की कोणत्याच पार्टीला नक्की काय चाललंय ते माहीत नाही. किंवा सगळ्यांना सगळं माहित आहे पण पब्लिकसमोर तारांबळ उडत आहे. सत्ताधारी, विरोधी, आतले बाहेरचे सगळ्यांना एकत्र गोवणार्या घोटाळ्याचा हा एकमेव नमुना असावा.
2 Jul 2015 - 1:26 pm | सव्यसाची
नक्कीच. खुपच गोंधळ झाला आहे. पण एक गोष्ट स्पष्ट आहे कि ललित मोदी हे कोर्टाने घोषित केलेले फरारी नाहीत. उलट त्यांचा काढुन घेतलेला पासपोर्ट कोर्टाने परत दिला आहे.
काँग्रेसचा हल्ला आता थोडासा भरकटल्यासारखा वाटत आहे. ललित मोदी प्रकरणांवरुन ते आता राजवाड्यावर गेले आहेत. सुषमा स्वराज यांच्या पतीला ललित मोदी बोर्ड वरती घेणार अशी इमेल होती पण कौशल यांनी स्वत:च यासाठी नकार दिला आहे. मग हे प्रकरण तरी आता किती लांबणार कुणास ठाउक? या पद्धतीच्या हल्ल्यावरुन काँग्रेस मध्ये पण थोडीशी कुरुबुर आहे असे दिसते. त्यांच्या मते, ललित मोदी यांच्यावर कॉंग्रेसने लक्ष केंद्रित करायला हवे.
त्यामुळे फक्त सामान्य लोकच गोंधळले नाहीत तर मीडिया आणि विरोधी पक्षही नेमका काय मुद्दा प्रेस करावा याबद्दल गोंधळात आहेत असे दिसते.
2 Jul 2015 - 7:03 am | कपिलमुनी
पारपत्र रद्द केल्यावर नागरीकत्व रद्द होते का ?
2 Jul 2015 - 1:28 pm | श्रीगुरुजी
पारपत्र रद्द केल्यावर नागरिकत्व रद्द होत नाही. वपरंतु परदेश प्रवास शक्य नसतो. तसेच पारपत्रावरील व्हिसा स्टँपिंग रद्द होते. नवीन पारपत्र मिळाल्यास नव्याने व्हिसा घ्यावा लागतो. पारपत्राची मुदत संपल्यावर नवीन पारपत्र घेतले तर मुदत संपलेल्या जुन्या पारपत्रावरील व्हिसा चालू शकतो असं दिसतंय (२ दिवसांपूर्वी फडणविसांचे सचिव प्रवीण परदेशी यांच्या बाबतीत हाच घोळ झाला होता). परंतु पारपत्र रद्द झाल्यावर नवीन पारपत्र मिळाले तर रद्द झालेल्या पारपत्रावरील व्हिसा नव्याने घ्यावा लागतो. (या माहितीतील चूभूदेघे).
ललित मोदींचे पारपत्र रद्द केल्यावर त्यांना ब्रिटनने नागरिकत्व बहाल केले होते असे मी सुरवातीच्या काही लेखात वाचले. ललित मोदींनी मोठ्या प्रमाणावर ब्रिटनमध्ये पैसे गुंतवायचे मान्य केल्याने त्यांना नागरिकत्व बहाल केले होते असे त्या लेखात लिहिले होते. प्रचंड गुंतवणुकीच्या मोबदल्यात इंग्लंड नागरिकत्व देते. भारताने काढलेल्या ब्ल्यू कॉर्नर नोटिसमुळे त्यांना इंग्लंडबाहेर जाता येत नव्हते.
जर मोदींचे पारपत्र भारताने रद्द केले असेल व इंग्लंडने नागरिकत्व किंवा कायमस्वरूपी वास्तव्याचा परवाना दिला नसेल, तर नक्की कोणत्या व्हिसाच्या आधारे ते अजून इंग्लंडमध्ये तळ ठोकून आहेत हे एक गूढच आहे.
3 Jul 2015 - 10:10 am | विकास
त्याला 'leave to remain in UK' status. असे म्हणतात! ललित मोदींंअ आधी युकेत जाऊन बसले. मग युपिए ने त्यांचा पासपोर्ट रद्द केल्यावर त्यांनी हामार्ग स्विकारला. अर्थात त्यांनी एक मिलियन पाउंड तेथे गुंतवलेले आहेत. त्यामुळे त्यांना लवकरच युके नागरीकत्व देण्याची शक्यता आहे.
3 Jul 2015 - 10:18 am | dadadarekar
इस्ट इंडिया कंपनी गाढव होती. दुसर्या देशात जा , युद्ध करा , राज्य करा , पैसा मिळवा .... किती ते श्रम.
त्यापेक्षा परक्या देशातील भ्रष्ट लोकाना तिथला काळा पैसाइंग्ल्लंडात गुंतवायला सांगून नागरिकत्व देणे हा किती सोपा उपाय आहे.
बायद वे , पाकिस्य्तानात ५५ कोटी घातले म्हणुन बापूजीना ठार मारले ते योग्यच आहे , असे गर्वाने मिरवणारा पक्ष भारतातील भ्रष्ट मनुष्य करोडो रुपये इंग्लंडात गुंतवणूक करुन देत असताना मुकाट्याने गप्प बसतो , शिवाय त्यालाच मदतही करतो, हे आश्चर्यजनक नाही का ?
कुठे नेऊन ठेवलाय नथुराम माझा ?
3 Jul 2015 - 5:40 pm | विकास
काही जमलं नाही की काढा नथुरामचे भूत वर.... आणि बोला काहीच्या काही.
कुठल्या पक्षाने गांधीवधाचे समर्थन केले ते सांगू शकाल का?
भारतातील भ्रष्ट मनुष्य करोडो रुपये इंग्लंडात गुंतवणूक करुन देत असताना मुकाट्याने गप्प बसतो
त्याने करदात्याचे पैसे दिले (पक्षी: देशाच्या अर्थसंकल्पिय गंगाजळीतून दिले) का स्वतःच्या खिशातून दिले? जर स्वतःच्या खिशातून कुठे देयचे हे सरकारने ठरवायचे असेल तर तुम्हाला कम्युनिझम हवा आहे असे सरळ म्हणाना. (यात ललित मोदींचे समर्थन करण्याचा प्रश्न नाही. त्याच्या जागी केजरीवाल असले तरी तेच म्हणेन. पण तुम्हाला कम्युनिझम हवा आहे का हा प्रश्न आहे).
(बाय द वे, आता राष्ट्रवादी काँग्रेसपक्षात असलेल्या छगन भूजबळांनी गांधीजींच्या ऐवजी नथुरामचे पुतळे उभारायला हवेत असे म्हणून खळबळ उडवली होती. तरी त्यांना आधी काँग्रेसने आणि नंतर राष्ट्रवादीने जवळ केले. त्यावरून काय ते समजून घ्या).
3 Jul 2015 - 11:46 pm | lakhu risbud
मला एक कळत नाही, संपादक मंडळ या अशा ट्रोल आयडींना मिपावरून तत्काळ उडवून का टाकत नाही ?
अनेक उत्तम धाग्यांवर हे ट्रोल आयडीं कारण नसतांना धुमाकूळ घालत असतात. काही ठराविक सदस्यच परत परत हे घाणेरडे प्रकार करत असतील (त्यांच्या IP Addres वरून हे कळत असेलच) उदा.माईसाहेब, टॉपगीअर्ड,हितेस,नानासाहेब आणि आता हे दरेकर !
तरीही अशा आयडींना तत्काळ का उडवले जात नाही ?
4 Jul 2015 - 6:04 am | dadadarekar
केवळ आमचे विचार तुम्हाला पटत नाहीत म्हणून ?
4 Jul 2015 - 6:54 am | dadadarekar
On 16 April 2010, the representatives of the Kochi franchise complained to BCCI that Lalit Modi had threatened them to give up the franchise. A day after the IPL final on 24 April, BCCI suspended Modi on 22 charges, including bypassing the governing council while taking decisions, not following proper processes, bid rigging, awarding contracts to his friends, accepting kickbacks on a broadcast deal, selling franchises to members of his family, betting and money laundering. Soon after his suspension, Modi moved to London,.
.......... .......
त्यानंतर काँग्रेसच्या काळात आरोप निस्चित करून कारवाईची सुरुवात झाली.
आपल्या पदाचा गैरवापर कर्रुन पैसा मिळवला आहे हे नक्की. अन्रेक आरोप ठेवले गेले त्यातील किमान आठ आरोपात तथ्य आढळले.
इतका पैसा मिळवलेला आहे की साक्षात दाउद खंडणीसाठी धमक्या देऊ लागला ! पोलिसांच्या इन्फॉर्मेशनवर किती का विश्वास नसेना , पण दाउदवर तरी विश्वास ठेवा की राव ! .. :). दाऊद उगाच मागे लागतो काय त्या ललित मोदीच्या ? पोलिसांची कारवाई व दाउद या दोन्ही कारणाने मोदी लंडनला पळाला.
...........
मोदीविरुद्ध जी कमिटी नेमली त्यात काँग्रेस व भाजपाचाही खासदार होता. त्यात मोदी दोषी आढळलेला आहे.. मग आता भाजपाचेच अनेक खासदार मोदीला का सपोर्ट करत आहेत ?
.........
मोदी इंग्लंडात जो पैसा घालणार आहे तो तुमचाआमचा पैसा आहे. त्याचा पगाराचा पैसा नाही.
https://en.m.wikipedia.org/wiki/Lalit_Modi
4 Jul 2015 - 8:34 am | संदीप डांगे
Typing from mobile: sorry for english
BCCI is a private club. Not a public limited company. Modi's money is not government's money. Get your facts right before posting. Don't make a clown of yourself.
4 Jul 2015 - 8:54 am | dadadarekar
BCCI had avoided taxes on its income, claiming exemption as a charitable organization.
सरकार एखाद्या संस्थेला चारिटेबल हा दर्जा देते तेंव्हा त्या संस्थेने मिळणार्या पैशाचा विनियोग लोकांच्या व देशाच्या भल्यासाठी करणे अपेक्षित असते. निदान काँग्रेसच्या काळात तरी असेच अपेक्षित होते.
मोदीभक्तानी स्वतःचा विदूषक करुन घेणे थांबवावे !
https://en.m.wikipedia.org/wiki/Board_of_Control_for_Cricket_in_India
4 Jul 2015 - 9:31 am | dadadarekar
http://m.timesofindia.com/sports/india-in-bangladesh/top-stories/BCCI-no...
.....
The Supreme Court on Thursday said as the Board for Control of Cricket in India (BCCI) enjoys a unique monopoly over the passionately followed game of cricket with the government's tacit understanding, it is discharging public functions and hence comes under the ambit of strict standards of judicial scrutiny.
Busting the myth that BCCI is a private body registered as a society under the Tamil Nadu Societies Registration Act, a bench of Justices T S Thakur and F M I Kalifulla just stopped short of declaring BCCI a government body but said it is answerable to the writ jurisdiction of the high courts.
17 Jun 2015 - 12:53 pm | श्रीगुरुजी
पैसाताई,
शतकी धागे काढण्याची तुमची मनीषा पूर्ण होण्यासाठी मी भरपूर मदत करायला तयार आहे.
________________________________________________________________
हा पहिला प्रतिसाद.
This is a non-issue. हा फुसका बार आहे. यातून काहीही निष्पन्न होणार नाही कारण मुळातच या प्रकरणात काहीही दम नाही.
_________________________________________________________________
अजून सविस्तर प्रतिसाद हवा असल्यास सांगा. तेवढीच शतकाकडे वाटचाल सुकर होईल.
17 Jun 2015 - 1:00 pm | पैसा
पण विनोद बाजूला ठेवू. वर सव्यसाची, मृत्युंजय, काळा पहाड यांच्या प्रतिसादासारखे काही माहिती देणारे जरूर लिहा.
17 Jun 2015 - 1:07 pm | संदीप डांगे
सिग्नल तोडण्याइतका गंभीर गुन्ह्याबद्दल चीरीमीरी घेतली म्हणून पोलीस हवलदाराला आंतरराष्ट्रीय पातळीवर बदनाम करणे.
17 Jun 2015 - 1:14 pm | श्रीगुरुजी
जरा सविस्तर माहिती देतो.
___________________________________________________________________________
भारतात व इतरत्र अतिरेकी कारवाया करणार्या अनेक व्यक्तींना, संघटनांना तसेच भारतात हव्या असलेल्या अनेक गुन्हेगारांना इंग्लंड अनेक वर्षांपासून आश्रय देत आहे.
जम्मू-काश्मिर लिबरेशन फ्रंट या देशद्रोही व अतिरेकी संघटनेचा म्होरक्या अमानुल्ला खान अनेक वर्षे इंग्लंड मध्ये आरामात राहत होता. याच संघटनेने १९८३ मध्ये इंग्लंडमधील भारताचे उपायुक्त रविंद्र म्हात्रे यांचा हत्या केली होती. त्यांच्या स्मरणार्थ नळस्टॉपजवळील पुलाला कै. रविंद्र म्हात्रे पूल असे नाव दिले आहे. अमानुल्ला खानला इंग्लंडने कधीही भारताच्या ताब्यात दिले नव्हते.
खलिस्तान या फुटीरतावादी चळवळीचा संस्थापक डॉ. जगजितसिंग चौहान हा देखील अनेक वर्षे इंग्लंड मध्ये आरामात राहत होता. खलिस्तानवाद्यांनी १९७०,८० आणि ९० च्या दशकात अनेक हत्या केल्या होत्या. चौहानला इंग्लंडने कधीही भारताच्या ताब्यात दिले नव्हते.
लिट्टे या श्रीलंकेतील दहशतवादी संघटनेचे मुख्यालय अनेक वर्षे लंडनमध्ये होते. भारत व श्रीलंकेत या संघटनेवर बंदी असूनसुद्धा लिट्टेचे नेते अनेक वर्षे इंग्लंडमध्ये सुखात राहत होते.
कॅसेट किंग गुलशनकुमारच्या खुनातील मुख्य आरोपी नदीम याला इंग्लंडने आश्रय दिला होता व प्रत्यार्पणास नकार दिला होता. हा भारतात अजूनही वाँटेड आहे.
आयपीएल घोटाळ्यातील प्रमुख आरोप ललित मोदी याला देखील इंग्लंडने आश्रय देऊन नागरिकत्व दिलेले आहे. याला देखील इंग्लंडने भारताच्या ताब्यात दिलेले नाही.
भारत व इंग्लंड यांच्यामध्ये गुन्हेगार प्रत्यार्पणाचा करार नाही. त्यामुळे भारतातील अनेक वाँटेड गुन्हेगार इंग्लंडच्या आश्रयास जातात व इंग्लंड त्यांना कायदेशीर आश्रय देते.
ललित मोदीविरूद्ध भारताने ब्ल्यू कॉर्नर नोटिस जारी केली आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही विमानतळावर तो आढळला तर तो देश त्याला स्थानबद्ध करू शकतो. त्यामुळे मोदी इंग्लंडबाहेर प्रवास करू शकत नाही.
मनमोहन सिंगांच्या काळात भारताने इंग्लंडला असे पत्र लिहिले होते की जर इंग्लंडने मोदीला इंग्लंडबाहेर जाऊन दिले तर भारत व इंग्लंड यांच्या द्विपक्षीय संबंधांवर परीणाम होऊ शकेल. हे पत्र अत्यंत हास्यास्पद आहे. ललित मोदीपेक्षा खतरनाक गुन्हेगार, अतिरेकी इ. इंग्लंडमध्ये सुखाने राहून इकडेतिकडे आरामात फिरत होते तेव्हा या दोन देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर कधीही परीणाम झाला नाही. मग फक्त ललित मोदीला इंग्लंडमधून बाहेर जाऊन दिल्याने या दोन देशांमधील संबंध कसे बिघडतील? दोन देशातील संबंध हे कधीच एका व्यक्तीवर अवलंबून नसतात. असे पत्र देणे हे अत्यंत हास्यास्पद होते.
मागील वर्षी ललित मोदीच्या पत्नीचा उपचारासाठी मोदीला पोर्तुगालला जाणे आवश्यक होते तेव्हा त्याने परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराजांशी संपर्क केला. सुषमा स्वराजांनी त्याला कोणतीही प्रत्यक्ष मदत न करता इंग्लंडला एवढेच कळविले की, मोदीला इंग्लंडबाहेर जाऊन देण्यासाठी तुमचे कायदे, नियम इ. नुसार परवानगीचा निर्णय घ्या. परंतु तुमच्या निर्णयामुळे भारत व इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधावर परीणाम होणार नाही.
इतकेच घडले. म्हणूनच या प्रकरणात फारसा दम नाही. हा फुसका बार आहे.
बादवे - बोफोर्स लाच प्रकरणातील लाभार्थी क्वाट्रोकी याच्याविरूद्ध सुद्धा ब्ल्यू कॉर्नर नोटीस होती. २००६ मध्ये त्याला अर्जेंटिना विमानतळावर स्थानबद्ध करण्यात आले तेव्हा भारतात त्याच्याविरूद्ध न्यायालयात खटला सुरू असूनसुद्धा भारत सरकारने त्याच्या स्थानबद्धतेविषयी न्यायालयाला कळविले नव्हते. उलत युपीए सरकारमधील एका वरीष्ठ मंत्र्याने गुपचुप अर्जेंटीनाला जाऊन त्याच्या सुटकेची खटपट केली होती. भारताने आक्षेप न घेतल्याने यथावकाश तो सुटला. भविष्यात तो अडकू नये म्हणून युपीए सरकारने त्याच्यावरील खटला बंद केला व इंग्लंडमधील त्याच्या बँक खात्यातील गोठविलेले ४० लाख डॉलर्स मोकळे करून त्याला मोठा दिलासा दिला होता.
17 Jun 2015 - 1:31 pm | सव्यसाची
श्रीगुरुजी,
१. माझ्या माहितीप्रमाणे ब्ल्यू कॉर्नर नोटीस इंटरपोल जारी करते. पण इंटरपोल च्या म्हणण्यानुसार अशी नोटीस त्यांनी जारी केली नाही. भारत सरकारने जी नोटीस जारी केली आहे ती 'लाईट ब्ल्यू कॉर्नर नोटीस' आहे.
२. स्थानबद्धतेसाठी रेड कॉर्नर नोटीस असते असे मला वाटते. संदर्भ: https://en.wikipedia.org/wiki/Interpol_notice
17 Jun 2015 - 2:31 pm | श्रीगुरुजी
या बाबतीत माझी माहिती कदाचित पूर्ण बरोबर नसावी. परंतु एक प्रश्न उरतोच. जर मोदीविरूद्ध रेड कॉर्नर नोटीस नव्हती तर त्याला इंग्लंडबाहेर जाण्यासाठी परवानगी का व कोणाची हवी? मुख्य म्हणजे इंग्लंडने त्याला नागरिकत्व बहाल केल्यावर इंग्लंड किंवा भारताच्या परवानगीची गरजच नव्हती.
17 Jun 2015 - 2:38 pm | अनुप ढेरे
तेव्हा तो भारतीय नागरिक होता आणि त्याचा पासपोर्ट रद्द केलेला होता.
17 Jun 2015 - 1:34 pm | खटपट्या
अत्यंत माहीतीपूर्ण प्रतिसाद,
(पैसातैंचा धागा म्हणजे घरचं कार्य. त्यामुळे विषयाची अजिबात माहीती नसताना अशा छोट्या मोठ्या प्रतिक्रीयांनी हातभार लावला जाईल)
जय कोकण
17 Jun 2015 - 1:40 pm | संदीप डांगे
अगदी योग्य माहिती. श्रीगुरुजींशी (बहुधा) पहिल्यांदाच बाय डीफाल्ट सहमत.
ललित मोदीला आंतरराष्ट्रीय पातळीवरचा भयंकर गुन्हेगार समजणार्या आणि दाऊदच्या पातळीवर बसवून ठेवणार्या क्षुद्र लोकांची कीव वाटते.
-(ललीत मोदींसोबत प्रत्यक्ष काम केलेला) एक कॅपिटालीस्ट
17 Jun 2015 - 2:26 pm | श्रीगुरुजी
धन्यवाद!
17 Jun 2015 - 1:28 pm | टवाळ कार्टा
धाग्याची पन्नाशी झाल्यानिमित्त काजूतैंचा सत्कार एक १ पैशाचे नाणे, कमळाचे फूल व क्रिकेटची बॅट देउन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक - समस्त आयपियेल-बापपियेल संघटना
17 Jun 2015 - 2:33 pm | अत्रुप्त आत्मा
@आयपियेल-बापपियेल>> :-D :-D :-D
17 Jun 2015 - 2:54 pm | अनिरुद्ध.वैद्य
:D :D :D
17 Jun 2015 - 3:01 pm | बॅटमॅन
बापपियेल =)) =)) =))
17 Jun 2015 - 4:18 pm | टवाळ कार्टा
ढिस्क्लेमर - हा पीजे माझा नाही, टीव्हीवरच्या एका र ला ट जोडून एक्स्प्रेस्स कॉमेडी करणार्या प्रोग्राममधला आहे...कधीकाळी चुकुन तो प्रोग्राम जबरदस्तीने घरात बघावा लागायचा
17 Jun 2015 - 4:37 pm | खटपट्या
हो बरोबर, अभिजीत चव्हाण याच्या तोंडी होते हे वाक्य...
17 Jun 2015 - 3:15 pm | काळा पहाड
NEW DELHI: External affairs minister Sushma Swaraj on Wednesday reacted angrily to a tweet suggesting she took favours to get her daughter a seat in a medical college through the northeast quota.
"My daughter is a barrister and Oxford graduate. What you say in absolutely false," she replied to the tweet.
The twitter handle 'Soch @pakoed' had insinuated that "Sushma is no stranger to taking and giving favours! Her daughter studied through NorthEast quota in medical college."
Twitterati immediately reacted, wondering at Sushma's impulsive response to a stray tweet. The handle @pakoed was deleted, though its tweet was retweeted by others.
Sushma's twitter supporters urged her not to be hassled by a "dog that barks" and keep up her good work.
17 Jun 2015 - 3:17 pm | श्रीगुरुजी
अवांतर -
"मोदीला इंग्लंडबाहेर जाऊन देण्यासाठी तुमचे कायदे, नियम इ. नुसार परवानगीचा निर्णय घ्या. परंतु तुमच्या निर्णयामुळे भारत व इंग्लंड यांच्यातील द्विपक्षीय संबंधावर परीणाम होणार नाही." असे सुषमा स्वराजांनी मोदीला कोणतीही प्रत्यक्ष मदत न करता इंग्लंडला कळविणे,
आणि
"(नरेंद्र) मोदींना व्हिसा देऊ नये" असे सत्ताधारी व काही विरोधी पक्षातील ६५ खासदारांनी अमेरिकेला काही वर्षांपूर्वी पत्र लिहिणे,
या दोन्हीत काही साम्य वाटते का?
17 Jun 2015 - 3:26 pm | कपिलमुनी
आता ३०० होणार .
17 Jun 2015 - 3:28 pm | श्रीगुरुजी
नक्कीच. पैसाताईंकडून पार्टी लागू.
17 Jun 2015 - 3:46 pm | कपिलमुनी
हा शुद्ध मूर्खपणा होता. घरचे भांडण चव्हाट्यावर नेउ नये इतका कॉमन सेन्स नसलेल्या लोकांचा !
बाकी घरचे भांडण चव्हाट्यावर नेउ नये हा सेन्स त्यांनीही दाखवला नाही आणि यांनीही
17 Jun 2015 - 3:57 pm | खटपट्या
याला बोलतात रामबाण काडी :)
17 Jun 2015 - 4:03 pm | कपिलमुनी
17 Jun 2015 - 11:28 pm | श्रीगुरुजी
भारी! आवडलं.
अजून एक-दोन काड्या टाकतो. ललित मोदी प्रकरणात जितका दम आहे तितकाच या काड्यात आहे.
२०१३ मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान/अध्यक्ष भारताच्या पूर्ण खाजगी दौर्यावर आले होते. हा दौरा अधिकृत/राजनैतिक नसून पूर्ण खाजगी होता. त्यांना अजमेर दर्ग्याला भेट द्यायची होती. दौरा पूर्ण खाजगी असताना सुद्धा परराष्ट्रमंत्री खुर्शिद यांनी त्यांचे जोरदार स्वागत करून अजमेर येथे त्यांची खास व्यवस्था करून मेजवानी दिली होती. आपल्या शत्रूंवर इतकी मेहेरबानी कशासाठी?
२०१३ मध्येच भारताने पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला दौर्यावर बोलाविले होते. त्यातील शेवटचा सामना बघण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या जावेद मियांदादला खास आमंत्रण देऊन लोकांच्या विरोधाला न जुमानता व्हिसा दिला होता. जावेद मियांदाद आणि भारतात मोस्ट वाँटेड असलेला अतिरेकी दाऊद इब्राहीम हे एकमेकांचे व्याही असताना सुद्धा दाऊदशी संबंधित असलेल्या जावेदला भारताचा व्हिसा देऊन त्याला खास आमंत्रण देण्यात आले होते. त्याला भारतात येण्यास विरोध असूनसुद्धा खुर्शिद यांनी त्याला बोलाविण्याचे जोरदार समर्थन केले होते. परंतु भारतातील विरोधाच्या बातम्या ऐकून तो शेवटी आलाच नाही.
ही दोन प्रकरणे आणि सुषमा स्वराज - ललित मोदी प्रकरण यात काही साम्य आढळते का?