राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्या तिसर्या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे.
ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो.
मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते.
या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात?
(डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
प्रतिक्रिया
19 Jun 2015 - 4:39 pm | बबिता बा
दाउद गुन्हेगार आहे म्हणुन त्याच्या व्हाह्याला विसा नाकारायचा का ?
उद्या तुमच्या व्याह्याचा मिपा आयडी ब्लॉक झाला तर तुमचाही घालवायचा का ?
19 Jun 2015 - 4:42 pm | मंदार दिलीप जोशी
तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत
2 Jul 2015 - 2:32 pm | llपुण्याचे पेशवेll
दाउद हा मियाँदादचा व्याही होण्याआधीपासून भारताचा मोस्ट वाँटेड आहे. तो अंडरवर्ल्ड डॉन आहे या गोष्टींबाबत मियाँदाद अनभिज्ञ नव्हते हे महत्वाचे आहे. किंवा ते अपघाताने दाऊदचे व्याही झाले नव्हते.
बाकी जालावर प्रतिसाद देणे आणि मुंबईमधे सुपारी घेऊन मर्डर करणे सारखे आहे का?
17 Jun 2015 - 3:59 pm | टवाळ कार्टा
दुसरी जास्त वायझेड आहे
17 Jun 2015 - 3:38 pm | पैसा
सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद! बरीच माहिती दोन्ही बाजूंनी मिळाली. मिपावर ट्रोलिंग किंवा शिवीगाळ न होता राजकीय चर्चा होऊ शकते हे या धाग्यावर आतापर्यंत दाखवून दिल्याबद्दल सर्वांनाच मनापासून धन्यवाद!
राजकीय चर्चा असूनही अजूनपर्यंत एकही प्रतिक्रिया अप्रकाशित करावी लागलेली नाही. अशाच खेळीमेळीच्या वातावरणात आणि वैयक्तिक न होता चर्चा चालू ठेवा! धन्यवाद!
सुषमा स्वराज कार्यक्षम आहेत, भारतातल्या रात्री एक वाजता कोणी परदेशात अडकलेल्याने मदत मागितली तरी ती लगेच मिळते, पंतप्रधानांनी सुषमा स्वराज यांचे खुल्या दिलाने कौतुक केले आहे इ. बातम्या वाचायला मिळत होत्या त्यातच हे प्रकरण उभे झाल्यामुळे वाईट वाटले. भले स्वराज किंवा वसुंधरा राजे यांचे ललित मोदीशी वैयक्तिक संबंध जुने असतील, पण त्यांनी अशा परिस्थितीत पंतप्रधानांकडे निर्णय सोपवायला हवा होता हे नक्कीच वाटले. कारण सत्तेवर असलेल्यांनी आपल्या गोतावळ्याच्या बाबत जरा जास्त कडक असले पाहिजे असे मला वाटते.
17 Jun 2015 - 9:32 pm | यशोधरा
पैताय, मी पण प्रतिसाद दिलेत हं. मलाही पार्टी हवी!
17 Jun 2015 - 3:42 pm | नाखु
दिवसात शतकी धाग्याबद्दल पुणेरी कट्टा आयोजन समीती पिंचीसहीत पैसा ताईंचा सत्कार पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची),५०० फुल्वातीं वळण्यासाठी कापूसगड्डा व गहुंजे येथे होणार्या सामन्याची २ तिकिटे देऊन करण्यात येत आहे.
अभामिपामांकामिमसंचालीत
सत्कार वस्तू पोच व्यवस्थेबाब्त सूड यांची सूचना आम्हाला कायम शिरोधार्थ आहे.
वस्तू मिळताच तपासून घेणे (नंतर बदलून मिळणार नाही)
17 Jun 2015 - 3:59 pm | खटपट्या
गहुंजे कुठेशीक आले ??
17 Jun 2015 - 4:04 pm | काळा पहाड
कात्रज-आंबेगाव-नर्हे-वारजे-चांदणी चौक-बावधन-पाषाण-सुसरोड-बाणेर-बालेवाडी-वाकड-ताथवडे-पुनावळे-रावेत-गहुंजे
17 Jun 2015 - 4:09 pm | खटपट्या
वोके, मध्यवर्ती ठीकाण नाहीये थोडक्यात..
17 Jun 2015 - 4:08 pm | टवाळ कार्टा
आणखी कोणती मस्तानी मिळते पुण्यात???
17 Jun 2015 - 4:14 pm | नाखु
चवक्शीची अपेक्षा असल्याने पूर्वानुलक्षी खुलासा करणेत आला आहे.
तस्मात आपली आप्ली मस्तानी त्या त्या बाजीरावाने शोधावी.
खुलासादार
मिपा पुणे महानगर कट्टा मित्रमंडळ
17 Jun 2015 - 4:18 pm | काळा पहाड
कोल्हापूर पासून धुळ्यापर्यंत आणि मालवणपासून चंद्रपूर पर्यंत बहुतांश मस्तान्या सध्या पुण्यातच पडिक असतात. वेगवेगळ्या एम एच नंबरच्या अॅक्टीव्या, स्कूट्या, अॅक्सेश्या घेवून हिंजवडी (प्रतिकात्मक) किंवा सिंबायोसिस (पुन्हा प्रतिकात्मक) ला बाजीराव्यांना भेटणं हे मुख्य काम आणि नोकरी किंवा शिकणं हे उपकाम असे दुहेरी श्रमही करतात.
17 Jun 2015 - 4:39 pm | अत्रुप्त आत्मा
पायजे का? ;-)
17 Jun 2015 - 4:58 pm | टवाळ कार्टा
पैला मस्तानीचा टैप सांगा...इंट्रेस्टिंग वाट्ली तर पुढे बघू
17 Jun 2015 - 6:02 pm | अत्रुप्त आत्मा
@पैला मस्तानीचा टैप सांगा...इंट्रेस्टिंग वाट्ली तर पुढे बघू>>
अस्सं काय रे टवाळा!? तू ये..तुला फुकट देइन. 

.....................
बघू येतो का आता हां! ;)
एक यांच्याच शेजारचा अज्जिबात येत नै,याच मस्तानीसाठी नंबर लावलेला.
17 Jun 2015 - 6:28 pm | टवाळ कार्टा
इतक्या लौकर तयार झालात म्हणजे नक्कीच कैतरी घोळ अस्णार
llllluuuuuulllllluuuuu
बाकी ते माझे शेजारीपण तुम्चेच शीष्य
17 Jun 2015 - 8:45 pm | अत्रुप्त आत्मा
नाही मू बोली पुत्र तिष्य
तो कुणाचाच नाही(होऊ शकत नाही! ;-) ) शिष्य! :-D
17 Jun 2015 - 4:36 pm | अत्रुप्त आत्मा
@ पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची),५०० फुल्वातीं वळण्यासाठी कापूसगड्डा>> :-D बरोबर तुळशि बागेतून ते वळण्यासाठि 1 पाट.. आणि थोड़ी रांगोळि.
17 Jun 2015 - 4:41 pm | काळा पहाड
त्यो सवताचा सवता आणायचा. मंडळ त्यासाटी जबाब्दार नाय.
1 Jul 2015 - 11:10 pm | dadadarekar
वाती वळायला दूधही लागते ना ?
17 Jun 2015 - 4:02 pm | निनाद मुक्काम प...
अनेक खतरनाक क्रिमिनल भारताला युके मधून हवे आहेत हे वरच्या एका प्रतिसादात नमूद केले आहे. त्यात मयत इक्बाल मिर्ची चे नाव सुद्धा होते अश्यावेळी फक्त ललित मोदी वर एवढा रोष का
ललित मोदीचे सुनंदा ठरूर च्या आय पी ल प्रवेशाला नकारघंटा देणे मग त्या वरून उठलेल्या वादंगावरून शशी शरूर चे मंत्रिपद जाणे व त्यानंतर ललित मोदी ची गच्छति
त्यावेळी ललित मोदी ला भाजपने एक पक्ष म्हणून काँग्रेस वर विशेतः थरूर वर निशाणा साधला का
आय पिल ल हे मोदी च्य जाण्याने साफ झाले का
त्यांनतर आय पिल ल चे श्रीशांत ते श्रीनावसन प्रकरण घडले
दुसरे महत्त्वाचे सामान्य माणसांच्या दृष्टीने ललित मोदी चे काय मत आहे कारण नैतिक मुद्द्यावरून राजीनामा लोकांच्या भावना लक्षात घेऊन दिला जातो
ह्या देशात दालमिया डॉलर मिया झाले पुढे ते भ्रष्टाचाराच्या आरोपाने बी सी सी आय मधून गेले आज ते परत आले
त्यांच्या जाण्याने येण्याने क्रिकेट रसिकांना शष्प फरक पडला नाही
नैतिकतेचा मुद्दा विरोधी पक्षांनी उचलावा हाच मोठा विनोद आहे
ह्याचे भारतीय जनतेला भान आहे.
कायद्याच्या दृष्टीने हा गुन्हा नसेल तर मु ऑन एवढेच विरोधी पक्षांना मला सांगावेसे वाटेल.
गेल्या चार वर्षात आघाडी सरकार कडून ललित मोदिवर
फक्त चिदंबरम अर्थ मंत्री युकेत कडक भाषा वापरतो हा प्रश्न सलमान खुर्शीद च्या परराष्ट्र खाते काय निकामी झाले होते का
17 Jun 2015 - 5:32 pm | स्पंदना
एकतरी प्रतिसाद दिलाच पाहिजे म्हणुन हा प्रतिसाद.
तरीही हे प्रकरण पेपरात सुरु झाल्यापासून उलट्सुलट बातम्या वाचून जीव कळवळतो आहे. निदान आत्तातरी अशी एखादी सत्ता येउदे भारतात जी फक्त देशाचा विचार करेल. स्वतःसाठी थोडफार खातील तर काही हरकत नाही, पण परकियांच्या घशात देश घालू नये, निदान थोडीतरी भारत म्हणुन काही किंमत यावी देशाला अस वाटत्य. असो. चर्चा वाचून बरीच माहीती समजली. पत्नी, तिचा कॅन्सर, राजकिय ओळखी आणी परदेशस्थ गुन्हेगारी!! झोपायला हरकत नाही आता. लय शिक्षान झालं.
17 Jun 2015 - 6:03 pm | विकास
(आम्ही खर्या अर्थाने झोपलेलो असताना हा धागा निघाल्याने) जरा उशीराच बघत आहे. :) मी कुठल्याही राजकारण्याला तांदूळ धुतल्यानंतर जे पाणी उरते, त्या पाण्याइतका स्वच्छ मानतो. ;) फरक इतकाच की नक्की ओव्हरऑल काम कसे करत आहेत आणि देशाबद्दलची (त्यात नागरीक देखील आले) हेतू कसे आहेत हे पहातो. त्यामुळे स्वराज बाईंच्या बाजूने अथवा विरोधात असा मुद्दा नाही... मात्र त्या आल्यापासून पासपोर्ट आणि इतर कटकटी बर्याच कमी झाल्या आहेत हे स्पष्टपणे जाणवत आहे. तसेच पंप्र मोदींच्या संपूर्ण परराष्ट्रनितीच्या यशापयशामाग स्वराज बाई आहेत. त्या मुकाट्याने काम करून बर्याच गोष्टी करत आहेत. म्हणूनच त्यांच्या मोदींहून अधिक परदेशवार्या ही सार्वजनिक माहिती असली तरी माध्यमात बातमी होत नाही. यावर अधिक नंतर लिहीता येईल. पण थोडक्यात त्यांना धक्का लावण्यामधे अनेकांना फायदा असू शकतो असे वाटते. - त्यात अंतर्गत आणि बाह्य (इतर पक्षिय आणि इतर देशीय सुध्दा) आले.
पण जो प्रमुख मुद्दा डोक्यात आला होता तो श्रीगुरूजींनी वर मांडलेला आहे. मला ललीत मोदी हे नाव मधल्या घोटाळ्याच्या वेळेस एखादी उडत उडत बातमी वाचावी त्याहून अधिक माहीत नव्हते. तरी देखील एक प्रश्न पडला ब्रिटन मधे काश्मिरी अतिरेकी (नुसतेच तत्वतः अलगतावादी नाही) आधी जाहीर रहायचे, अमेरीकेने मुंबई हल्ल्यासंदर्भातला (पाकीस्तानी) डेव्हीड हॅडली ह्याला आपल्या ताब्यात दिले नाही, असे अजून बरेच काही जगभर असेल...
तरी देखील कधी या देशांना कधी संबंध दुरावतील म्हणून दम भरला नव्हता. मग असे या ललीत मोदींमधे काय आहे की जेणे करून असला अल्टीमेटम द्यावा लागला? एक तर खरेच काहीतरी गंभीर असावे अथवा त्यांच्यामुळे आधीच्या युपिए सरकार मधील स्वार्थांना धक्का बसला असेल. शक्यता दुसर्या गोष्टीचीच अधिक आहे. कारण जर काही गंभीर असते तर कोर्टाने पासपोर्ट द्यायला लावला नसता.
ललित मोदींचा वकील म्हणतो की त्यांच्या विरोधात इंटरपोल कडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस नाही. जर ते खोटे असेल तर ते खोटे आहे असे म्हणायच्या ऐवजी, राजकारणी जाउंदेत, पण पत्रकार पण कसे काय अजून त्या नोटीसच्या नावाने स्वराज च्या नावानी ओरडत बसले आहेत?
ज्या पद्धतीने सामान्य एन आर आयंना मदत केली आहे, त्यावरून स्वराज यांनी नैतिक / राजकीय (राजनैतिक नाही) चूक केली असेल पण गुन्हा केला आहे असे वाटत नाही...
17 Jun 2015 - 7:48 pm | सव्यसाची
मलाही गुन्हा केला आहे असे वाटत नाही. म्हणजे कायदेशीर रित्या काय चूक आहे ते कळले नाही. तिकडे कॉंग्रेस वाले म्हणताहेत कि CrPC च्या अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो. पण तेही सांगेना झालेत कोणता गुन्हा ते.
17 Jun 2015 - 6:24 pm | तिमा
कुठल्याही राजकीय पक्षाचे सरकार प्रामाणिक असेल आणि ते आपल्या सगळ्यांना अच्छे दिन आणेल, या भाबड्या समजुतीतून आता भारतीयांनी बाहेर यावे व वास्तव स्वीकारावे. त्यांतल्या त्यांत जो कमी घोटाळे करेल त्यास पुढच्या निवडणुकीत निवडावे. अन्याथा कायम शंख करत बसावे.
17 Jun 2015 - 7:36 pm | बबिता बा
मोदी सर्कारने बिडी सिग्रेट तंबाखू दारु यावरचे ट्याक्सेस कमी करायचा निर्णय घेतलाय म्हणे.
आता त्यावर धागा काढा.
17 Jun 2015 - 7:46 pm | सव्यसाची
कधी? संदर्भ देउ शकाल का?
17 Jun 2015 - 10:54 pm | बबिता बा
http://www.ichowk.in/humour/rajasthan-government-slashes-tax-on-cigarett...
17 Jun 2015 - 11:15 pm | सव्यसाची
हा निर्णय राजस्थान सरकारचा आहे. यात केंद्र सरकारचा काही संबंध नाही. तसेच VAT हा राज्याचा कर आहे. केंद्राचा नाही.
18 Jun 2015 - 5:50 am | बबिता बा
It is difficult to prove, whether it (smoking) causes cancer or not. Whether smoking, tobacco is cancerous or not or whether it contains any herbal medicine also, it has to be found out.
!!
http://www.dnaindia.com/india/report-now-another-bjp-mp-says-no-link-bet...
18 Jun 2015 - 1:04 pm | पुण्याचे वटवाघूळ
अहो बबिता बा, तुम्ही दिलेली साइट अनरिअल्टाईम्स किंवा फेकिंगन्यूज सारखी हिंदी साईट आहे. असल्या ठिकाणी आलेल्या बातम्युआ पुरावे म्हणून ग्राह्य धरता का तुम्ही?
18 Jun 2015 - 2:09 pm | बबिता बा
http://indianexpress.com/article/india/india-others/in-public-interest-r...
19 Jun 2015 - 3:19 am | विकास
यासंदर्भात बोलता आहात का?
Maharashtra govt's new anti-spitting law: Offenders to sweep govt offices, pay upto Rs 5,000 fine
अवांतरः किमान जालीय संदर्भात पुर्नजन्म, नवीन अवतार धारण करणे (reincarnation) वगैरे शब्द नक्की खरे आहेत असे वाटते. असो.
17 Jun 2015 - 10:05 pm | रमेश आठवले
स्वराज यांच्या विषयीची बातमी येण्या आधी प्रणव मुखर्जी यांनी वरिष्ठ मंत्री असताना आणि राष्ट्रपति असताना आपल्या पदाचा उपयोग आपला नातेवाईकाला इंग्लंड मध्ये आणि ओळखीच्या व्यक्तीला कोलकत्त्यात एस्सार कंपनीत नोकरी मिळवून देण्या साठी केला होता- अशा माहितीच्या एस्सार कंपनीच्या अंतर्गत इ मेल बाहेर आल्या आहेत.
हे प्रकरण स्वराज यांच्या केस पेक्षा जास्त गंभीर मानावे लागेल.
कॉंग्रेस प्रणव मुखर्जींचा राजीनामा मागून राष्ट्रपति भवनावर मोर्चा का बरे नेत नाहीये ?
17 Jun 2015 - 10:15 pm | संदीप डांगे
पैतैंनी आयोजित केलेला कार्यक्रम कुठलाही गालबोट न लागता व्यवस्थित सुरू आहे. आनंद वाटला.
रच्याकने, ते ललित मोदींवर नेमके काय गुन्हे आहेत आणि त्याची तीव्रता मुंबै बॉम्बस्फोटवैगेरे इतकी कशी याचं काय कोडं उलगडलं नाय. काय की पैसाताई फार रागावल्या आहेत आमच्या लाडक्या मोदीवर (ललित हो) पण त्यांच्या रागाचं नेमकं कारण काय केल्या सापडंना बगा...
कुणी नीट सांगेल काय..?
17 Jun 2015 - 10:23 pm | पैसा
ललित मोदी कुठे का जाईना, सुषमा स्वराज यांचं नाव आलं म्हणून वाईट वाटलं जरा. बाकी माहितीसाठी सगळे प्रतिसाद वाचले असतीलच! :)
चांगल्या चर्चेसाठी मिपाकरांचं कौतुक आहेच. लौ यू ऑल!
17 Jun 2015 - 11:15 pm | संदीप डांगे
हो. माहिती वाचली आणि इतर ठिकाणीही खोदकाम केलं.
ललित मोदींवर कुठलेही गंभीर्/देशद्रोही स्वरुपाचे गुन्हे नाहीत. जे आहेत ते आरोप आहेत, पैशाच्या अफरातफरीचे आहेत. त्या सगळ्या प्रकरणांमधे प्रचंड गुंतागुंत आहे. मोदी भारतातून पळून जायचे कारण त्याचे इतरांशी (राजकारणी व उद्योजक) बिघडलेले संबंध. ह्या बिघडलेल्या संबंधांमुळे एका उद्योजकाला देश सोडावा लागला. पण ही त्याची आणि इतरांची अंतर्गत बाब आहे. देशाचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. मोदींचे इतरांशी वाजण्याचे कारण फार वैयक्तिक आहे. बीसीसीआयशी संबंधीत लोकांचा इगो प्रॉब्लेम व प्रॉफिट शेअरिंग हा त्या सगळ्या आरोप--तमाशा-गुन्ह्यांचे मूळ आहे. फेमा अंतर्गत नोटीसा म्हणजे फार कावेबाज योजना आहे. मोदीला पद्धतशीर अडकवण्यात आले आहे. म्हणजे मोदी फार धुतल्या तांदळाचा, गरिब गाय आहे असे नाही. पण दाऊदवैगेरेंशी तुलना म्हणजे कैच्या कैच. नेमक्या त्याच काळात मी तिथे होतो त्यामुळे नक्की काय झाले ते कधी सवड मिळाली तर (कदाचित) सविस्तर लिहिन.
पण जेवढ्या मोठ्या कॅनव्हासवर हे (सुषमा-मोदी) चित्र रंगवायचा प्रयत्न लोक करतायत त्यांच्याकडे तेवढे मोठे ब्रश आणि तितकेसे रंगही नाहीत हे ते साफ लपवतायत. जनतेने शहाणे व्हावे हेच उत्तम.
काँग्रेसः ज्या आविर्भावात आणि उच्चरवात ही मंडळी ओरडत आहेत ते बघून स्वराज (पर्यायाने नमों) यांना कोंडीत पकडण्याची संधी मिळाली तर घ्या धोपाटून याच विचारात आहेत असं दिसतंय. पण खरं तर ज्याला साप समजून ते धोपटतायत तो साधा रीळाचा दोराही नाही. पण वातावरण तर असं तापवलंय की जणू हाफिज सईदला सुषमाजींनी घरी बोलावून न्हाऊ-माखू घातलंय.
पत्रकार : (विकेसिंगांच्या भाषेत 'ते') नुसते नेहमीप्रमाणे आग सोडा, धूरही जिथे अतिविरळ आहे त्यावरच असं रान माजवतायत की जणून सारं जंगल वणव्याने पेटलंय.
जनता: नेहमीप्रमाणे दोन बाजूंनी फाडल्या जाऊन आपल्याला छटाक माहिती नसलेल्या गोष्टींवर 'बघा, बघा ते कसे एकमेकांना मदत करतात, सारेच नालायक आहेत मेले, राजकारणी आणि उद्योजक यांची अभद्र युती यांच्या सरकारातही कायमच आहे' 'मग त्यांनी तेव्हा नाही का असे केले, याला सोडले त्याला सोडले'. अशा भयाण डोळे फिरवणार्या चर्चा करता आहेत (मिपा नाही, इतर ठिकाणी) भाजपविरोधक आणि समर्थक दोन्ही या इवल्याशा बीजाचे वटवृक्ष करण्याच्या मागे आहेत. भाजप-समर्थकांनी हा मुद्दा अनुल्लेखाने मारायची गरज होती. पण नेहमीच्या चवताळून जायच्या सवयीने यावेळेस नेमके तोंडघशी पडल्यासारखे वाटत आहेत.
(ढीस्क्लेमरः माझ्या या प्रतिसादात मिपावरच्या चर्चेचा, चर्चेत भाग घेतलेल्या सदस्यांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कुठलाही उल्लेख नाही. तसेच मिपासदस्यांच्या पक्षीय आवडी-नावडीची कुठेही खिल्ली उडवलेली नाही.)
18 Jun 2015 - 5:57 am | बबिता बा
..
19 Jun 2015 - 9:30 am | टवाळ कार्टा
आणि लगेच "डोळे पाणावणे" याचा मिपार्थ समजला???
19 Jun 2015 - 2:03 pm | हाडक्या
तुमचे ड्वाळे पाणावायला किती वेळ जावा लागला हो टकाशेठ.. ;)
21 Jun 2015 - 11:46 am | टवाळ कार्टा
आम्ही वेळ घेतलेला
पेहले बात...फिर मुलाकात...फिर हळूच लात ;)
19 Jun 2015 - 8:54 am | बबिता बा
भारताला भारतातच राहुन लुबाडणारे राजकारणी धोकादायक आहेत.
कारण असे राजकारणी असतात त्यांच्या जिवावरच दाउद जगत असतो.
जर स्वार्थी राजकारणी नसते तर कदाचित दाउद निर्माण व्हायला चान्स मिळालाच नसता.
19 Jun 2015 - 12:31 pm | संदीप डांगे
चालु द्या...
17 Jun 2015 - 10:54 pm | सव्यसाची
नेमके आठवत नाही पण सौथ आफ्रिकेमधील आयपीएल संदर्भात जे काही violations झाले त्याबद्दल केस आहे. FEMA अंतर्गत केस सुरु आहे. २०१० मध्ये नोटीस बजावण्यात आल्या होत्या पण ते उपस्थित राहिले नाहीत म्हणून तत्कालीन सरकारने पासपोर्ट काढला.
दिल्ली उच्च न्यायालयाने यावर आक्षेप घेत पासपोर्ट परत दिला. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयातील काही परिच्छेद नक्कीच महत्वाचे आहेत.
18 Jun 2015 - 6:21 am | स्पंदना
17 Jun 2015 - 11:00 pm | अनिरुद्ध.वैद्य
'ललित मोदी-सुषमा स्वराज प्रकरणी विनाकारण वाद रंगवला जातेय. यानिमित्ताने काँग्रेसला आयतं कोलीत मिळालं आहे. त्यामुळे काँग्रेस त्याचं राजकारण करते आहे' ... पवारसाहेब योग्यच सांगत आहेत.
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/met-lalit-modi...
17 Jun 2015 - 11:06 pm | बबिता बा
म्हणुन सु**बाई ( सुसरबाई ) तुझी पाठ म उ असेच ते बोलणार .
19 Jun 2015 - 7:24 pm | पैसा
तुम्ही जामोप्या ऊर्फ हितेश असलात तर धन्यवाद! तुमच्या अशा प्रतिसादांमुळे माझा धागा ३०० काय ४०० पर्यंत जाऊ शकेल. मात्र आमचे लक्ष आहे. आतापर्यंत उत्तम झालेली चर्चा तशीच राहू दे.
17 Jun 2015 - 11:16 pm | खटासि खट
तुम्हाला म्हणून सांगतो (कुठं बोलू नका )
आमच्या गणपती मंडळानं दिवसरात्र अर्धखेळपट्टी चेंडूफळी सामने ठेवले होते. त्याचं आयोजन मी केल होतं. आता मंडळाच्या अध्यक्षाला सोंशय आहे की मी गफला केला. त्यानं कोतवालचावडीत तक्रार गुदरल्याने मला प्रभाग सोडून जाता येणार नाही असा हुकूम कोतवाल साहेबाने काढला आहे. माझी पत्नी संशयकल्लोळाने आजारी असून तिला बायजाबाचा माळ (चौफुल्यानजीक) उपचारार्थ घेऊन जाणे गरजेचे आहे.
तरी माझ्या घरी येऊन गेलेले नगरसेवक, गटनेते, सभागृहनेते, स्थायीसमिती अध्यक्ष, महापौर, उपमहापौर, पीम्टीचे वेवस्थापक, महाराष्ट्र वादी पक्शाचे ध. न. दांडगेसाहेब, कमळाबाईंच्या माहेरची थोर मंडळी यांच्यापैकी कोन मानुसकी दाखवुण मदत करील का ?
18 Jun 2015 - 1:18 pm | आनन्दा
तुमच्या त्यांच्याशी असलेल्या "सम्बंधांवर" अवलंबून आहे
17 Jun 2015 - 11:26 pm | अवतार
आजकाल बऱ्याच क्षेत्रात विशेषत: राजकारण ह्या क्षेत्रात होतांना दिसतात. ह्याचे मुख्य कारण म्हणजे उपयुक्ततावादी विचारसरणीचा अतिरेक.तू माझी पाठ खाजव मी तुझी खाजवतो. स्वातंत्र्योत्तर काळातील राजकारणी देखील परस्परांवर अनेक आरोप करत होते. पण उठसूट भ्रष्टाचाराचे आरोप लावणे हे शक्य होत नसे. कारण अक्षरश: हिमालयाएवढ्या उत्तुंग चारित्र्याची व्यक्तिमत्वे. माणूस हिंदुत्ववादी असो की कॉंग्रेसचा किंवा आंबेडकरी चळवळीचा; विरोध व्हायचा तो वैचारिक भूमिकांना.
पण गेल्या दोन दशकांमधील परिस्थिती पाहिली तर माणूस हिंदुत्ववादी असो की कॉंग्रेसचा किंवा आंबेडकरी चळवळीचा; भ्रष्टाचाराच्या आरोपांतून कोणतीही संघटना सुटलेली नाही. हा प्रश्न केवळ राजकारण्यांच्या डोक्यावर खापर फोडून सुटणारा नाही. पक्षीय अभिनिवेशातून बाहेर पडून तटस्थ दृष्टीकोनातून वास्तव अनुभवणे हे अत्यावश्यक आहे. ह्या सततच्या आरोप-प्रत्यारोप ह्या दुष्टचक्राला कंटाळलेल्या देशाची वाटचाल नकळत अराजकाच्या दिशेने चालू असते.
चारित्र्य घडवण्यासाठी तेवढीच उत्तुंग प्रेरणा असावी लागते. ही प्रेरणा मिळण्याचे स्त्रोतच समाजातून नष्ट होऊ लागले आहेत. रेताड जमिनीत पीक येत नाही. आधी पिकाऊ जमीन तयार करावी लागते. तेव्हा मिळतील फळे रसाळ गोमटी.
If you don't stand for something you will fall for anything
19 Jun 2015 - 12:27 am | चिगो
अत्यंत समर्पक, उत्तम प्रतिसाद..
हे कुणालाच मान्य नाहीय आजकाल असं वाटतं.. Objectivity नावाची चीजच जणू संपायला लागलीय.. म्हणून मग सेक्युलॅरीझ्म बद्दल बोललं, की लगेच काँग्रेसी-बगलबच्चा पासून आयसीस-समर्थक पर्यंत ताणतात लोक.. मोदींच्या एखाद्यापण गोष्टीची स्तुती केली, की लगेच तो संघिष्ठ.. केजरीवालच्या आक्रस्तळेपणाबद्दल बोललं, की तुम्ही भ्रष्टाचारीच..
खुप कलकलाट, कल्ला सुरु आहे सगळीकडे.. I am craving to hear a voice of reason. म्हणूनच मिपावर तुमच्यासारखे काही प्रतिसाद वाचले की बरं वाटतं..
19 Jun 2015 - 11:49 am | अवतार
मलाही असे सहप्रवासी भेटले की बरे वाटते.
The voice of reason is not always reasonable for the rich and the powerful
19 Jun 2015 - 2:26 pm | हाडक्या
अवतार साहेब, मस्त प्रतिसाद.. :)
हे कधी नव्हे ते अति-आवश्यक बनलेय असे वाटतेय.
19 Jun 2015 - 2:33 pm | मंदार दिलीप जोशी
सॉरी, पण हे नेमकं भाजप सत्तेत आल्यावरच आवश्यक का बनलं असावं?
20 Jun 2015 - 12:17 pm | बबिता बा
आपण पार्टी विथ डिफ्रन्स आहोत असे भाजपावाले सांगत होते म्हणुन
20 Jun 2015 - 12:11 pm | सुधीर
आपल्यापैकी बहुतेक जण पॉलिटिकल पार्टी सेंट्रीक असतात. त्यामुळे आपल्या पार्टीचे सगळेच निर्णय एकतर सपोर्ट करणं वा विरुद्ध पार्टीचे सगळेच निर्णय चुकीचे ठरवणे हा भाग बनून जातो. तसही स्वत:ला या सगळ्यांपासून तोडून, स्वतंत्र विचार करण्याची कला कठीणच आहे. कारण कुठल्यातरी एका विचारसरणीचा प्रभाव आपल्यावर नाही म्हाणायला असतोच. त्यामुळे जरी आपण आपल्या परीन तटस्थ विचार केला तरी लोकं पार्टीचं लेबल लावायला तयार असतात. पॉलिटीक्स मधला माझा इंटरेस्ट अलिकडचाच. बघू मीही शिकतोय तटस्थ होणं.
20 Jun 2015 - 6:35 pm | अवतार
बांधिलकी विचारांशी आहे की व्यक्तींशी हे एकदा ठरवून घेतले की मग तटस्थ राहावे की नाही हे निर्णयस्वातंत्र्य मिळू शकते. विचारसरणी ही क्यालीडोस्कोपसारखी असते. प्रत्येकाच्या नजरेला दिसणारे आकृतिबंध हे वेगवेगळे असू शकतात. अशा वेळी स्वत:च्या नजरेतून बघायचे की इतरांच्या हा निर्णय महत्वाचा ठरतो.
तसेही पक्षीय राजकारण ही राजकारणाची पहिली पायरी आहे. अंतिम नव्हे.
18 Jun 2015 - 12:35 am | रमेश आठवले
या चर्चेत भाग घेणार्या सर्वांनी ऐकावी आणि पहावी अशी जवळ जवळ ४४ मिनिटे चालणारी ललित मोदी यांची राजदीप सरदेसाई यांनी घेतलेली मुलाखत---
http://indiatoday.intoday.in/story/lalit-modi-exclusive-interview-sushma...
18 Jun 2015 - 2:25 am | विकास
एकदम इंटरेस्टींग आहे! किती भांडतोय हा! त्याला इथे पण चर्चेत भाग घेयला बोलवायला हवे! एकदम रंगत येईल! ;)
18 Jun 2015 - 12:55 pm | चिनार
संधी मिळालीच आहे तर माझ्या एका धाग्याची जाहिरात Karun टाकतो .
ललित मोडी या महापुरुषावर मागे मी एक धागा लिहिला होता .
http://www.misalpav.com/node/३०९४१
(आतातरी शतकी प्रतिसादाची अपेक्षा !!)
18 Jun 2015 - 12:57 pm | चिनार
http://www.misalpav.com/node/30941
18 Jun 2015 - 2:06 pm | बबिता बा
मटा ऑनलाइन वृत्त । जयपूर
ललित मोदी आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे अगदी मैत्रीचे संबंध होते. वसुंधरा राजे यांच्या पहिल्या कार्यकाळात (२००३-२००८) प्रशासकीय अधिकारी असलेल्या ललित मोदी यांची 'वठ' होती. राजे यांच्यासमोर ललित मोदी चक्क टेबलवर पाय ठेवून बसायचे, अशी माहिती एका प्रशासकीय अधिकाऱ्याने दिली.
मात्र २०१३ मध्ये राजस्थान विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध बिघडले आणि ललित मोदी हे राजेंपासून दुरावले. ललित यांच्या समर्थकांना याचा प्रचंड धक्का बसला. ललित मोदी यांनी राजस्थान क्रिकेट असोसिएशनची निवडणूक जिंकून देखील जिल्हा असोसिएशनने त्यांच्या जागी भाजपच्या अल्पसंख्याक विभागाचे नेते अमीन पठाण यांना बॉस केले. आरसीएचे अधिकारी देखील या बदलामुळे आश्चर्यचकित झाले. राजे यांच्या हस्तक्षेपाशिवाय हे शक्य नाही असेच त्यांना वाटत होते. सध्या मात्र हाय कोर्टाच्या स्थगितीमुळे आरसीए निष्क्रिय आहे.
जयपूर येथे नवे क्रिकेट स्टेडिअम बनवण्याची कल्पना ललित मोदी यांची होती. आरसीएकडून त्यासाठी चोप गावातील १८ हेक्टर जमीन आरक्षित करण्यात आली होती. मात्र याला देखील वसुंधरा राजे यांनी थारा दिला नाही. हा प्रोजेक्ट राजे यांनी रद्द केला. त्यानंतर नाराज मोदी यांनी अरुण जेटली यांचे अत्यंत निकटचे नेते भूपेंद्र यादव यांच्यावर निवडणुकांच्या आधी तिकीट विकण्याचे आरोप लावले. मात्र असे असताना देखील भाजपने २०० पैकी १६३ जागांवर विजय मिळवला. त्यामुळे मोदी यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निकटचे असलेले भूपेंद्र यादव यांना राजस्थानातील भाजपचे अंतर्गत वाद मिटवण्यासाठी बोलवण्यात आले होते. त्या काळातच राजे-ललित मोदी यांच्या मैत्री संबंधातील शेवटच्या आशाही मावळल्या.
या साऱ्याचा बदला घेण्यासाठी म्हणून ललित मोदींनी आता राजेंविरोधात मोर्चा उघडला आहे, असे एका भाजपच्या नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केली असल्याने मोदी त्यांना नाराज करू इच्छित नाही. मात्र वसुंधरा राजे यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांनाही ललित मोदी या प्रकरणात अडवून बदला घेऊ पाहात असल्याचे या नेत्याने सांगितले.
'मी वसुंधरा राजे सिविल लाइन्स १३ जयपूर, राजस्थान, भारत येथील नागरिक. ललित मोदी यांच्या इमिग्रेशन अर्जाला पाठिंबा देते. मात्र यासाठी एक अट आहे की, ही माहिती भारतीय अधिकाऱ्यांपासून गुप्त ठेवण्यात यावी',
18 Jun 2015 - 2:14 pm | श्रीगुरुजी
सुषमा स्वराजान्चे स्पष्टीकरण -
'Some time on July 14, Lalit Modi spoke to me that his wife was suffering from cancer and surgery was fixed on August 4 in Portugal. He told me that he had to be present in the hospital to sign the consent papers. He informed me that he had applied for travel documents in London and the UK government was prepared to give him the travel documents. However, they were restrained by the United Progressive Alliance government communication that this would spoil Indo-UK relations. Taking a humanitarian view, I conveyed to British high commissioner that British government should examine the request of Lalit Modi as per British rules and regulations and that if the British government chooses to give travel documents to Lalit Modi, that will not spoil our bilateral relations.'
I genuinely believe that in a situation such as this, giving emergency travel documents to an Indian citizen cannot and should not spoil relations between two countries.
सुषमा स्वराजान्नी ललित मोदीला प्रवासाची कागदपत्रे मिळण्यास मदत केली असे दिसत नाही. ब्रिटिश सरकारने त्याला कागदपत्रे द्यावीत का नाही यावर आपले कायदे व नियमानुसार निर्णय घ्यावा असेच त्यान्नी सान्गितले आहे. त्याला कागदपत्रे द्या असे सान्गितलेले दिसत नाही.
19 Jun 2015 - 4:29 am | स्पंदना
हे ऐकणार कोण?मुद्दा न ऐकता नुसते ढोल बडवत फिरणे आणि त्या आवाजात सत्य दडपुन टाकणे एव्हढी एकच कर्तबगारी आहे आजच्या मिडियाची.
19 Jun 2015 - 2:32 pm | संदीप डांगे
खरे आहे.
त्यामुळेच सोशल मीडीयाचे महत्त्व पटतं, असत्य फार काळ लादल्या जाऊ शकत नाही आजकाल..
19 Jun 2015 - 11:35 pm | prasadnene
Nice
20 Jun 2015 - 2:55 pm | कवितानागेश
काय ठरले शेवटी?
सुषमा स्वराज चूक की बरोबर?
थोडक्यात सांगा रे कुणीतरी.
20 Jun 2015 - 10:33 pm | सव्यसाची
ताई,
एवढ्या प्रतिसादानंतरही कोणत्याही एका निर्णयाला नाही पोहोचता येणार. कायदेशीर दृष्ट्या, वरकरणी काही गडबड दिसत नाहीये.
बाकी राजीनाम्याचे म्हणाल तर राजीनामा घेतील असे अजिबात वाटत नाही. कालच भारतातर्फे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये योग दिवसासाठी सुषमा स्वराज गेल्या आहेत. शिवाय आताच टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष आले होते त्यांच्या सोबतच्या मीटिंग मध्ये पण सुषमा स्वराज यांनी सहभाग घेतला आहे. त्यामुळे पंतप्रधान जरी अजून काही बोलले नसले तरी त्यांचा सुषमा स्वराज यांच्यावर विश्वास आहे असे म्हणण्याजोग्या घटना घडल्या आहेत आणि याचमुळे राजीनामा येईल असे दिसत नाही. वसुंधरा राजे यांच्या केस मध्ये भाजपा ने वेळ घेतला त्यांना साथ द्यायला पण शेवटी सपोर्ट दिलाच. त्यामुळे तिकडून पण राजीनामा येईल असे वाटत नाही.
अजून मान्सून सत्र लांब आहे. या महिन्या-दीडमहिन्यामध्ये काही दाखवण्याजोगी कारवाई ललित मोदी यांच्याविरुद्ध होइल असे दिसते.
20 Jun 2015 - 9:29 pm | पुतळाचैतन्याचा
भोपाल गैस दुर्घटनेच्या दिवशी युनियन कर्बयिड च्या भारतातील अध्यक्षाला पळून जायला कोणी मदत केली होती ते जर आथवले तर बरे होइल
20 Jun 2015 - 9:39 pm | सचिन
त्यांनी चूक केली म्हणून यांच्या चुका माफ होत नाहीत. त्यामुळे अशी तुलना करण्यात अर्थ नाही.
़खरं तर सुषमाताईंचं नाव आल्यामुळे वाईट वाटले.
वरकरणी काही दोष दिसत नाही त्यांचा .... परंतु त्यांनी जरा विचारपूर्वक हाताळायला हवे होते असे वाटते..
21 Jun 2015 - 3:21 pm | भक्त प्रल्हाद
आपल्या ओळ्खीच्या लोकांचं सुद्धा काम करता येत नसेल तर त्या सत्तेचा काय उपयोग ? शेवटी माणुसकी नावाची पण काही गोष्ट असते.
21 Jun 2015 - 4:14 pm | टवाळ कार्टा
२०० :)
22 Jun 2015 - 7:25 pm | विकास
यशस्वी धागा काढण्यासाठी श्रेय कुणाला द्यावे? - पैसा ताईंना का सुषमा ताईंना? ;)
22 Jun 2015 - 7:38 pm | पैसा
कुठच्या तरी ताईंना द्या म्हणजे झाले. तरी अजून तिसर्या ताईंचा उल्लेख इथे फारसा आला नाही. अजून कोणाला पाहिजे तर ऑप्शन खुला आहे! =))
सीरियसली, शिवीगाळ, वैयक्तिक आरोप न झालेली, एकही प्रतिसाद अप्रकाशित न झालेली ही पहिलीच राजकीय चर्चा असावी. सर्व मिपाकरांना धन्यवाद!
23 Jun 2015 - 2:33 pm | नाखु
२०० पार केल्याबद्दलचा सत्कार जेपीआल्यावर केला जाईल (सत्कार सामानाची खोली-किल्ली त्याने टक्याला दिली का हे माहीत नाही)
पै ताईंचा सत्कार एक दिवसाचा पीएम्पीलचा पुणे दर्शन बस पास्,दोन मोठ्या ताडपत्री पिशव्या## (पुढच्या वेळी पुण्याला मानाकुराद आंबे आणायला उपयोगी पडाव्यात म्हून),आणि पुष्करणी भेळ देऊन करण्यात येईल.
अभामिपामांकामिमसंचालीत
सत्कार वस्तू पोच व्यवस्थेबाब्त सूड यांची सूचना आम्हाला कायम शिरोधार्थ आहे.
वस्तू मिळताच तपासून घेणे (नंतर बदलून मिळणार नाही)
ताडपत्री पिशव्या## भगदे आणि कंपनीच्या असतील त्याची जिम्मेदारी बुवांकडे आहे.
1 Jul 2015 - 5:35 pm | होबासराव
हे बेण तिथे बसुन रोज नव्या नेत्याला भेटल्याचा गौप्यस्फोट करतेय... आज वरुण गांधि आणि त्याचि काकु (राजमाता) ह्यांचा उल्लेख केलाय.. ललित मोदि एक fugitive आहे आणि इथले राजकारण त्याला चांगले माहित आहे त्याशिवाय का इतक्या कमि अवधीत तो एवढया उंच पोहोचला होता.
हम तेरे दर पे सनम रोज आयेंगे
हम तेरे दर पे सनम रोज आयेंगे
घंटि बजायेंगे और भाग जायेंगे
1 Jul 2015 - 5:55 pm | dadadarekar
वरुण्गांधी ललित मोदीला मद्त करणार होता म्हणे.
किती स्वच्छ सरकार हे !
आणि मद्त क्णाकडुन घेणार होता म्हणे ? सोनियाकाकूंकडुन !
माय मरो पण काकू जगो !
1 Jul 2015 - 6:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
ज्या प्रकारे ललित मोदी एकेक नावे उघड करतोय ते पाहता ललित मोदी सुनंदा पुष्कर ह्यांच्या वाटेने जाणार असे दिस्तेय. 'अपघाती मृत्यु' व्हायची शक्यता नाकारता येत नाही असे ह्यांचे मत.
1 Jul 2015 - 6:28 pm | कपिलमुनी
कुठं गेला होता माई !
लेकरांनी रडू रडू वात आणला होता.
1 Jul 2015 - 6:35 pm | dadadarekar
माई ! आल्या !
1 Jul 2015 - 7:36 pm | राघवेंद्र
:)
1 Jul 2015 - 7:58 pm | विकास
लेकरांनी रडू रडू वात आणला होता.
चुकलिया माये ।
बाळ हुरुहुरु पाहे
जीवनावेगळी मासोळी ।
तैसा मिपा(कर) तळमळी
1 Jul 2015 - 11:01 pm | श्रीगुरुजी
माई नी माई
मुंडेर पे तेरे,
रो रहा है नाना!
पहला आयडी,
डीलीट हो गया,
नवीन आयडीसे,
फिरसे जागा!
टूड्डूsss टुडुडुडु डुडुडुडु डु,
टूड्डूsss टुडुडुडु डुडुडुडु डू
(चित्रपट - नाना माईके है कोन)
1 Jul 2015 - 11:21 pm | dadadarekar
भुताचा आयडी ...
की
आयडीचे भूत ?
1 Jul 2015 - 7:56 pm | gogglya
गोंधळात भुजबळ प्रकरण मागे पडले आहे, आणी त्यामागे घड्याळ कांकाचा 'हात' आहे अशीही एक वन्दता आहे.
2 Jul 2015 - 2:47 pm | पिलीयन रायडर
खुपच जोरदार चर्चा.. पै तै चे अभिनंदन!
मला समजलेली गोष्ट अशी की ललिअ मोदींच्या बायकोच्या ऑपरेशनसाठी त्यांना ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स हवे होते. भारताकडुन त्यास आक्षेप नाही एवढेच स्वराज ह्यांनी कळवले.
तरीही लोक मोदींना (पक्षी - गुन्हेगाराला ) मदत केली असं म्हणत आहेत.
एखाद्या व्यक्तिने अगदी फासावर चढवण्यालायक गुन्हा जरी केलेला असला तरी नवर / बाप म्हणुन त्याची सही / कायदेशीर परवानगी / त्याची उपस्थिती अत्यावश्यक असेल तर दुसर्या निरपराध माणासाच्या जीवासाठी तशी परवानगी देणे हे चुक कसे काय ठरु शकते?
खरं तर ही मदत मोदींच्या बायकोला केली गेली आहे, ललित मोदींना नाही.
2 Jul 2015 - 2:59 pm | dadadarekar
किती माणुसकी ती !
ललोत मोदीच्या तंबाखू कंपनीला फायदा व्हावा म्हणुन ट्याक्सेस कमी केले गेले.
http://www.thenewsminute.com/article/swamped-too-many-developments-heres...
The tobacco connection: Congress leader Jairam Ramesh has reportedly said that he wondered whether the Vasundhara Raje government slashed the taxes on tobacco products in Rajasthan to help the Modi owned tobacco manufacturing company.
2 Jul 2015 - 3:08 pm | पिलीयन रायडर
ओ.. मुद्द्यावर बोलुया का?
तुम्चं म्हणणं हो किंवा नाही मध्ये मांडा
ललित मोदींच्या बायकोला नीवन मरणाच्या स्थितीमध्ये ऑपरेशनसाठी नवर्याची गरज असेल तर तशी परवानगी द्यावी की नाही?
हे जमत नसेल तर सोडा..
3 Jul 2015 - 11:13 am | कपिलमुनी
हे पाँईटाच ! पण इथे तसा कुणीच बोलत नाही.
१. ललित मोदींच्या बायकोला नीवन मरणाच्या स्थितीमध्ये ऑपरेशनसाठी नवर्याची गरज असेल तर तशी परवानगी द्यावी की नाही? : द्यावी
२. एखाद्या गुन्हेगाराने एका मंत्र्याशी संपर्क साधला असेल तर त्याची माहिती संबंधित खात्यांना कळवावी का ??
हो की नाही??
3 Jul 2015 - 11:27 am | dadadarekar
पासपोर्ट रद्द झालेल्याला कशी परवानगी देणार बुवा ?
हे म्हणजे शाळेतुन काढुन टाकलेल्या पोराने मला सहलीला जाऊ द्या अशी परवानगी मागायला हेडमास्तरला फोन केल्यागत नाही का ?
आमचा पासपोर्ट नाही . म्हणजे त्यावर विसाही नाही.
आता त्याने कसेही व कुठेही फिरावे.
3 Jul 2015 - 1:00 pm | श्रीगुरुजी
>>> ललिअ मोदींच्या बायकोच्या ऑपरेशनसाठी त्यांना ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स हवे होते. भारताकडुन त्यास आक्षेप नाही एवढेच स्वराज ह्यांनी कळवले.
एक दुरूस्ती.
ललित मोदींना ट्रॅव्हल डॉक्युमेंट्स द्यावेत की नाही हा निर्णय ब्रिटिश सरकारने स्वतःचे कायदे, नियम व प्रोसिजर्स यानुसार घ्यावा. कोणताही निर्णय घेतला तरी त्यामुळे द्विपक्षीय संबंधांवर परीणाम होणार नाही. असे सुषमा स्वराज यांनी कळविले होते. त्यांना ते पेपर्स द्या अशी कोणतीही विनंती/सूचना स्वराज यांनी केलेली नव्हती.
3 Jul 2015 - 1:12 pm | कपिलमुनी
एखाद्या गुन्हेगाराने एका मंत्र्याशी संपर्क साधला असेल तर त्याची माहिती संबंधित खात्यांना कळवावी का ??
हो की नाही??
3 Jul 2015 - 2:24 pm | श्रीगुरुजी
संबंधित खात्यांना म्हणजे नक्की कोणाकोणाला?
3 Jul 2015 - 2:38 pm | सव्यसाची
अजून एक प्रश्न मला पडलाय.
ललित मोदी गुन्हेगार आहेत हे एखाद्यातरी कोर्टात सिद्ध झाले आहे का? आणि कोर्टाने त्यांना फरारी घोषित केले आहे का?
3 Jul 2015 - 3:08 pm | कपिलमुनी
ललित मोदी गुन्हेगार आहेत हे एखाद्यातरी कोर्टात सिद्ध झाले आहे का ? नाही
त्याम्च्यावर आरोप आहेत आणि त्यांना समन्स काढले आहे.
कोर्टाने त्यांना फरारी घोषित केले आहे का? : हो.
3 Jul 2015 - 3:40 pm | सव्यसाची
समन्स कोणत्या कोर्टाचे आहेत?
कोणत्या?
3 Jul 2015 - 3:07 pm | कपिलमुनी
ईडी , अर्थ खाते , गृह खाते आणि परराष्ट्र खात्यामध्ये याची नोंद हवी होती.
हे नैतिकतेला धरून झाले असते.
3 Jul 2015 - 3:20 pm | श्रीगुरुजी
नैतिकता वगैरे सापेक्ष गोष्टी आहेत.
या खात्यांना कळविणे हे कायदयाने किंवा नियमानुसार बंधनकारक आहे का?
या खात्यांना कोणीकोणी कायकाय कळविले किंवा कायकाय कळविले नाही जनतेला उघडपणे सांगितले जाते का?
त्यांनी तसे कळविले असेल सुद्धा, इतरांना या सर्व गोष्टी जाहीर केल्या जातात का?
3 Jul 2015 - 3:37 pm | कपिलमुनी
ही शुद्ध पळवाट आहे.
मंत्रीपद ही सार्वजनिक जबाबदारीचे काम आहे.
भाजपा नैतिकतेच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात . आता सोयीस्कररीत्या मौन का ? आणि नियमावर बोट का ?
"त्यांनी तसे कळविले असेल सुद्धा" कळविले असते तर आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या डीफेन्समध्ये ही गोष्ट सांगितली असती.
बाकी माझा प्रश्न साधा आणि अगदी सरळ होता .
3 Jul 2015 - 4:27 pm | अस्वस्थामा
+१
आक्षेप पटला. उगी तार्किक तसेच तांत्रिक कीस पाडण्यापेक्षा आणि इतर सबबी शोधण्यदेण्यापेक्षा या अगदी फंडामेंटल प्रश्नाचे उत्तर स्वतःच स्वतःस द्यावे हे महत्त्वाचे.
इतरांनी काय केले (काय करतायत), इतर काय म्हणतायत, मोट्ठा/छोटा गुन्हेगार यापेक्षा, एक भारतीय नागरीक की ज्यास गेल्या सरकारच्या पद्धतीचा वीट आलेला होता या दृष्टीने पहावे.
बाकी नैतिकता सापेक्ष हे मान्यच.. :)
3 Jul 2015 - 9:03 pm | श्रीगुरुजी
>>> ही शुद्ध पळवाट आहे.
कशी काय?
>>> मंत्रीपद ही सार्वजनिक जबाबदारीचे काम आहे.
बरोबर
>>> भाजपा नैतिकतेच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारतात . आता सोयीस्कररीत्या मौन का ? आणि नियमावर बोट का ?
कारण प्रशासन हे नियम व कायद्यानुसार चालते. नियम डावलून किंवा कायदा मोडून काम केले तर ठपका येऊ शकतो.
>>> "त्यांनी तसे कळविले असेल सुद्धा" कळविले असते तर आतापर्यंत त्यांनी स्वतःच्या डीफेन्समध्ये ही गोष्ट सांगितली असती.
प्रत्येक गोष्ट जाहीररित्या सांगितली जाते का?
>>> बाकी माझा प्रश्न साधा आणि अगदी सरळ होता .
एखाद्या गुन्हेगाराने एका मंत्र्याशी संपर्क साधला असेल तर त्याची माहिती संबंधित खात्यांना कळवावी का ??
हो की नाही??
१) ललित मोदी हा अजूनपर्यंत संशयित आहे. तो गुन्हेगार आहे हे अजून सिद्ध झालेले नाही.
२) गुन्हेगाराने/संशयिताने मंत्र्याशी नक्की कशासाठी संपर्क साधला आहे व अशा बाबतीत जे नियम/कायदे/प्रोसिजर्स आहेत त्यानुसार ही माहिती संबंधित खात्याला कळवावी का नाही हा निर्णय मंत्र्याने घ्यावा. संबंधित खात्यांना कळविले असले किंवा नसले तरी ती माहिती सार्वजनिक करायची का नाही हे देखील अशा बाबतीत जे नियम/कायदे/प्रोसिजर्स आहेत त्यानुसार ठरवावे.
3 Jul 2015 - 3:20 pm | कोंकणी माणूस
ज्या वेळी हा ललित मोदी म्हणेल कि , मी शरद पवारांना सूधा अमुक तमुक कारणासाठी भेटलो किवा यांनी मला मदत केली वैगरे .
तेव्हाच हा खेळ बंद होयील , कारण एकदा का शरद पवार हे नाव आल कि सगळच (चौकशी, पत्रकारिता ,पुरावे आणि इतर ) संपत.
3 Jul 2015 - 5:41 pm | विकास
येकदम बराबर! १००००% सहमत!
3 Jul 2015 - 8:04 pm | संदीप डांगे
@कपिलमुनि,
तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे: हो.
पण ललित मोदी गुन्हेगार आहेत हे कुठे सिद्ध झालंय याचं उत्तर देऊ शकाल काय? मुळात सरकारतर्फे त्यांच्यावर काय आरोप आहेत याच्यातच एकवाक्यता नाही. कारण हितशत्रूंनी सरकारी नियम वापरून मोदीला अडकवायचा प्लान बनवला होता. त्यात बरेच लूपहोल्स आहेत. जिथे आरोपच निश्चित नाहीत तिथे थेट गुन्हेगार ठरवण्याची गरज काय? कोर्टाने आरोपी हजर नाही म्हणून कार्यवाही केली आहे. ते कोर्टाचे नियमानुसार होणारे काम आहे. समन्स बजावणे म्हणजे आरोप सिद्ध होऊन शिक्षा ठोठावणे होत नाही. एखाद्या केसमधे आरोपीवरचे आरोप सिद्ध झालेत म्हणून आरोपीला समन्स धाडले जात नाहित तर आपली बाजू मांडायला आरोपीने कोर्टात हजर राहावे, कामकाज न्याय्य पद्धतीने व्हावे म्हणून हे सगळे सोपस्कार असतात. आरोपी हजर राहिला नाही तर त्याला फरार घोषित करून पोलिसांना त्याला पकडून कोर्टासमोर हजर करण्याचे आदेश देते. तेव्हाही तो गुन्हेगार आहे असे मानुन कोर्ट असे आदेश देत नाही. खटल्याच्या अंतिम निर्णयाच्या वेळीच आरोपी दोषी आहे की नाही हे कोर्ट सांगतं. मोदीप्रकरणात असे काही झालंय का? सामान्य माणसाच्या दारावर समन्स घेऊन बेलिफ्/पोलिस उभे राहिले की जसे शेजारी त्याच्याकडे बघतात तसे आपण ललित मोदीकडे बघू नये असे वाटते.
सगळा गोंधळ तांत्रिक मुद्द्यांमुळेच आहे. तिथे तांत्रिक मुद्देच उत्तरादाखल प्रतिसादात मांडले तर तुम्ही 'ते सोडा' असे का म्हणताय?
एक उदाहरण घेऊया: दाऊद छोटा राजनच्या जीवावर उठलाय. त्याच्या जीवाला धोका आहे म्हणून त्याने पोलिसांकडे संरक्षण मागितले तर ते दिले जावे काय? कारण राजन हा एक दाऊदसारखाच गुन्हेगार आहे. त्याच्या नावावर मोठे खटले आहेत. त्याने कित्येकांचे खून पाडले आहेत. हे सगळे सत्य आहे असे जनतेला माहित आहे पण न्यायालयात सिद्ध झाले असेलही किंवा नाही. असं असतांना पोलिसांनी राजनला 'तुझं तू बघ' असं म्हणून संरक्षण नाकारावे का?
ललित मोदी प्रकरणात सगळेच गुंतलेले आहेत. शिवाय ते प्रकरण मीडीयाने केले तेवढे मोठे नक्कीच नाही. जर तांत्रिक मुद्द्यावरून स्वराज यांच्यावर आरोप केले जात असतील तर तांत्रिक मुद्द्यांनीच बचाव केला तर समस्या कुठे आहे?
नैतिक अनैतिक चे चोचले पुरवायला देशात इतक्या समस्या आहेत. नैतिकतेच्या बाबतीत म्हणाल तर ललित मोदी प्रकरण त्यांच्यापुढे फारच पुचाट आहे. जर ते कायदेशीर प्रकरण आहे तर कायदेशीर पद्धतीनेच बघितले जावे. उठसूठ ज्यात त्यात सिद्ध न होणारी नैतिकता-अनैतिकता आणणे माझ्यामते योग्य नव्हे.
3 Jul 2015 - 8:41 pm | सव्यसाची
मी पण वरती हाच प्रश्न विचारला आहे.
मला तर कोर्टाने समन्स बजावले आहेत असेही वाटत नाही. एडीने प्रत्यक्ष येउन प्रश्नांना उत्तरे द्यावीत यासाठी बोलावले होते. त्याला ते हजार राहिले नाहीत.
मग एडीने पासपोर्ट रद्द करण्यासाठी सांगितल्याचे कळते. त्यामुळे पासपोर्ट रद्द झाला. पुढे कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने पासपोर्ट रद्द करणे चुकीचे आहे असे सांगत पासपोर्ट परत दिला.
यामध्ये अशी काही गोष्ट आहे का ज्यात कोर्टाने त्यांना फरारी घोषित केले आहे??
3 Jul 2015 - 9:15 pm | संदीप डांगे
ललित मोदीविरूद्धच्या 'कोर्ट केसेस' बद्दल खात्रीलायक जालावर कुठेच मिळत नाहीये. ऑनलाईन वृत्तपत्रांमधे फारच गोंधळून टाकणारी भाषा वापरली जात असून नुसता धूर निर्माण करून खरी आग काय आहे, आहे की नाही हेच कळत नाही आहे. त्यामुळे खरंच ललित मोदी काय स्वरूपाचा खटला आहे याचे चित्रच उभे राहत नाही.
कोणते आरोप आहेत ते या लिंकवर सांगितलंयः http://indiatoday.intoday.in/story/lalit-modi-court-cases-charges-agains...
ही एक लिंक आहे ज्यात कोर्टाने काय म्हटलंय ते दिलंय.: http://www.ndtv.com/india-news/why-court-said-lalit-modis-passport-had-b...
हा एक अजून लेख : http://articles.economictimes.indiatimes.com/2015-06-27/news/63886107_1_...
परत तोच प्रश्न आहे: ललित मोदीवर कोणते आरोप आहेत आणि कोर्टाची काय कारवाई झाली आहे त्याच्याबाबतीत?
पासपोर्ट रद्द केला, केस आहे, फरार आहे, भगोडा आहे, खूप पैसेवाला आहे, मोठ्यामोठ्या लोकांशी संबंध आहेत वैगेरे शब्द वापरून जनतेला गुंडाळणे सुरु आहे असं वाटतं. प्रत्यक्षात अंदरकी बात भन्नाट वेगळीच आहे.
4 Jul 2015 - 8:59 am | सव्यसाची
संदीपजी,
मी तो प्रश्न कपिलमुनींना विचारला होता कारण ते म्हणताहेत कि कोर्टाने त्यांना फरारी घोषित केले आहे आणि समन्स पण जारी केले आहेत. या दोन्हींमध्येही मला तथ्य वाटत नाही.
माध्यमांचे म्हणाल तर 'फरारी', 'मोस्ट वाँटेड' हा शब्द सर्रास वापरला आहे. बर्याचजणांनी ती काळजी घेतली नाही.
बाकी कोर्टात या केसेस गेल्याच नाहीत असे मला वाटते. एडी ही क़्वासि ज्युडीशियाल बॉडी आहे. तीच सध्या नोटीस पाठवते आहे असे दिसते.
कदाचित पुढे जाउन केस दाखल होईलही.
8 Jul 2015 - 12:20 pm | कपिलमुनी
http://www.timesnow.tv/articleshow/4361457.cms
या प्रतिसादामध्ये
लिहिल्याप्रमाणे ललित मोदी गुन्हेगार आहेत हे एखाद्यातरी कोर्टात सिद्ध झाले आहे का ? नाही
त्याम्च्यावर आरोप आहेत आणि त्यांना समन्स काढले आहे.
8 Jul 2015 - 12:54 pm | सव्यसाची
कपिलजी,
तुम्ही जी लिंक दिली आहे त्यात असे म्हटले आहे कि सवाल-जबाबासाठी त्यांना बोलावले आहे. जर ते आले नाहीत तर मात्र आम्हाला अरेस्ट वॉरंट 'काढावे लागेल'. ते काढले आहे कि नाही याबद्दलची माहिती मला जालावर नाही मिळाली.
ही मुलाखत वाचा. इंटरपोल च्या सचिवाची आहे जो २०१४ पर्यंत तिथे होता.
http://indianexpress.com/article/india/india-others/ed-will-need-to-prove-lalit-modi-wanted-for-arrest-former-interpol-sec-general-ronald-noble/
त्यामधील या अरेस्ट वॉरंट संबंधीचा भाग.
कदाचित अरेस्ट वॉरंट असेलही.जर तसे असेल तर इडी ने पब्लिश करावे.
3 Jul 2015 - 8:56 pm | श्रीगुरुजी
सहमत
योग्य उत्तर.
8 Jul 2015 - 12:27 pm | कपिलमुनी
तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे: हो.
प्रथम माझ्या एखाद्या गुन्हेगाराने एका मंत्र्याशी संपर्क साधला असेल तर त्याची माहिती संबंधित खात्यांना कळवावी का ?? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर तुम्ही दिलाबद्दल धन्यवाद !
हो की नाही??
वर लिहिल्याप्रमाणे अजून ते गुन्हेगार नाहीत आरोपी आहेत.
पण ज्या प्रकारचे गंभीर आरोप आहेत ते पहाता स्वराज यांनी संबंधित खात्याना कळावायला हवे होते.
माझ्या दृष्तीने मुद्दा तांत्रिक नसून तत्वाचा किंवा शुचितेचा आहे.
8 Jul 2015 - 12:00 pm | dadadarekar
http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=47984060§ion=top-sto...
ललित मोदीना पद्म देण्याची भाजपाची शिफारस होती.
8 Jul 2015 - 9:27 pm | विकास
कुठल्या साली ललित मोदीना पद्म देण्याची भाजपाची शिफारस होती?
२००७.
त्यावेळेस ललित मोदींच्या विरोधात काय गुन्हा होता?
काहीच नाही...
ललित मोदींना आयपिएल मधून कधी काढले?
२०१० ला
त्याच्या आधी नक्की काय झाले होते?
२०१० सालीच त्या आधी त्यांनी शशी थरूर यांचे नाव गोत्यात आणले होते.
वगैरे वगैरे...
यात ललित मोदी अथवा वसुंधरा राजे यांची बाजू घेण्याचा प्रश्न नाही. जे काही आणि जो कोणी चूक असेल त्यांना शिक्षा करा. तो मुद्दा वेगळा आहे. पण असंदर्भ बातम्या देऊन काहीतरी निगेटीव्ह एक्साईटमेंट तयार करणे हे देखील गुन्हा करण्यासारखेच आहे असे वाटत नाही का?
9 Jul 2015 - 1:27 am | सव्यसाची
२००७ साली शिफारस केली.मग पुढे?
9 Jul 2015 - 12:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
वाचतेय. ललितला मिळालेले काही पुरस्कार(संदर्भ विकिपिडिया).
In October 2011, Lalit Modi was bestowed the 'Outstanding Contribution Award' at the 2011 International Sports Event Management (ISEM) Awards[59]
In February 2010, Sports Illustrated named Lalit Modi as the 2nd Most Powerful Person in Indian Sports[60]
On 28 December 2009, Business Standard named Lalit Modi as one of the ‘Game Changers of the Decade’[61]
On 26 September 2009, Lalit Modi was presented with the ‘Brand of the Year’ award by India Leadership Conclave[62]
In August 2009, Forbes magazine described the IPL as ‘the world's hottest sports league’ – a remarkable accolade from a US magazine less than a year after the IPL’s launch[63]
On 22 January 2009, Lalit Modi was given the ‘Sport Business Leader’ award by CBNC-TV18[64]
On 30 December 2008, SportzPower ranked Lalit Modi No. 1 in their annual Top 20
In July 2008, Time magazine ranked Lalit Modi 16th in a list of the world’s best sports executives
आणखीही काही आहेत.
वसुंधरेची चौकशी झालीच पाहिजे पण त्याबरोबर बिझिनेस स्टॅन्डर्ड,टाईम साप्ताहिक्,सी.एन.बी.सी.ह्यांचीही चौकशी करावी असे ह्यांचे मत.
9 Jul 2015 - 8:05 pm | विकास
वसुंधरेची चौकशी झालीच पाहिजे पण त्याबरोबर बिझिनेस स्टॅन्डर्ड,टाईम साप्ताहिक्,सी.एन.बी.सी.ह्यांचीही चौकशी करावी असे ह्यांचे मत.
"ह्यांच्या"शी सहमत. :)
9 Jul 2015 - 10:29 pm | dadadarekar
खाजगी पेपरवाल्यानी एक तांब्यापितळेचा पुतळा किंवा स्टीलचा गणपती देऊन पुरस्कृत करणं आणि सरकारने पद्म देणं दोन्ही सारखेच काय गं ?
10 Jul 2015 - 12:14 am | विकास
सरकारने पद्म देणं
कधी दिला? ते देखील २००७ साली?
10 Jul 2015 - 12:25 am | सव्यसाची
हेच म्हणतो.
9 Jul 2015 - 12:37 pm | ईश्वरसर्वसाक्षी
:)
9 Jul 2015 - 11:55 pm | कपिलमुनी
माईचा टोन आजकाल बदलला आहे
10 Jul 2015 - 12:05 am | dadadarekar
माई कमळीच्या प्रेमात पडली वाटतं .
माई जरा जपून ( कमळाचा ) दांडा धर !
10 Jul 2015 - 2:38 am | विकास
तसे देखील पद्म म्हणजे कमळ. थोडक्यात हे काँग्रेसवाले भाजपाच्या जन्माच्या आधीपासूनच त्यांना (भाजपाला) मिळालेले होते हे यातून सिद्ध होते.
14 Jul 2015 - 4:18 pm | अस्वस्थामा
माई लॉजिकल बोलते हो कधी कधी.. लोकंच उगी त्यांना नानावळीत घालतेत असं वाटतं.
(पण टोन बदललाय हे पण जाणवलंय. कदाचित बोलविते "हे" बदलले असतील, नै तर नानांचे जे झाले त्याचा विचार करुन जपून, तोलून मापून बोलत असतील आता.. ;) )
13 Aug 2015 - 1:52 pm | श्रीगुरुजी
शेवटी काल लोकसभेत ललित मोदी या नॉनइश्यूवर अनेक तास घणाघाती चर्चा होऊन पडदा पडला. एका फुसक्या विषयावर कॉंग्रेसने तब्बल एक संपूर्ण अधिवेशन वाया घालविले. अत्यंत अपरिपक्व आणि पोरकट विधाने करणार्या पप्पूच्या बालहट्टामुळे सगळी संसद वेठीला धरली गेली.
सुषमा स्वराज, शिवराजसिंग चौहान व वसुंधराराजे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय संसद चालून देणारच नाही, निलंबित केलेल्या २५ काँग्रेस खासदारांचे निलंबन रद्द व्हायलाच पाहिजे व त्याशिवाय कोणतीही चर्चा करणार नाही, No discussion without resignations असे कॅमेर्यांसमोर संतप्त मुद्रेने तावातावाने सांगणार्या पप्पूला शेवटी वरील नेत्यांच्या राजीनाम्याशिवायच चर्चेत सामील व्हावे लागले. पंतप्रधान मोदींनी या विषयावर स्वतःच उत्तर दिले पाहिजे असा आग्रह धरणार्या काँग्रेसला सुषमा स्वराज आणि अरूण जेटलींच्या चौफेर टोलेबाजीने इतके गलितगात्र केले की पंतप्रधान संसदेत येतात की नाही याची वाट न बघताच लोकसभेतून काँग्रेसवाले निघून गेले. चर्चोत्तर मतदानाची तरतूद असलेल्या स्थगन प्रस्तावाखालीच चर्चा करण्याचा आग्रह धरणार्या काँग्रेसने मतदानापूर्वीच चर्चेतून व लोकसभेतून काढता पाय घेतला.
सुषमा स्वराजांनी अत्यंत आक्रमक स्वरूपात घणाघाती भाषण करून काँग्रेसचा सर्व काळा इतिहास खणून काढून काँग्रेसचे पुरते वस्त्रहरण केले. ललित मोदी देशाबाहेर पळून जाण्यास व त्याच्यावर कोणतीही कारवाई न होण्यास तत्कालीन संपुआ ची राजवटच कशी पूर्ण जबाबदार होती हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. त्यांनी बोलू नये यासाठी काँग्रेसने अत्यंत खालची पातळी गाठली. सुषमा स्वराजांपूर्वी काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंनी जवळपास ६५ मिनिटे अत्यंत नीरस भाषण करून स्वराजांवर बेलगाम आरोप केले. त्यांचे भाषण सुरळीत पार पडले. त्यांचे भाषण सुरू असताना बहुतांश वेळ भाजप सदस्यांनी ते शांतपणे ऐकून घेतले. परंतु सुषमा स्वराज उत्तर देण्यासाठी उठताच काँग्रेसी खासदारांनी वेलमध्ये जाऊन जोरजोरात घोषणा देण्यास सुरूवात केली व स्वराजांचे भाषण संपेपर्यंत घोषणा सुरू होत्या. त्यांच्यावर वाटेल ते निराधार आरोप करायचे आणि त्यांनी उत्तर देऊ नये यासाठी मोठमोठ्याने घोषणा देऊन त्यांचा आवाज दाबून टाकायचा ही अत्यंत चुकीची कृती काँग्रेसवाल्यांनी केली. परंतु खमक्या असलेल्या स्वराजांनी त्या परिस्थितीत सुद्धा अत्यंत आक्रमक भाषण करून काँग्रेसींचा डाव हाणून पाडला.
नंतर पप्पूने आपल्या भाषणात काहीही नवे न सांगता अनेक दिवसांपासून कॅमेर्यासमोर तो जी मुक्ताफळे उधळत होता तेच पालुपद लावले. कोणतेही पुरावे नाहीत, वस्तुस्थिती माहित नाही, आपल्या पक्षाच्या राजवटीत केलेल्या चुकांची खंत नाही आणि तरीसुद्धा बेलगाम आरोप करणे हेच त्याचे धोरण होते.
आपल्याला काल संसदेच्या लॉबीत सुषमा स्वराज कशा भेटल्या, त्यांनी आपला हात कसा धरला, "बेटा, मैने तुम्हारा क्या बिगाडा है" असे त्यांनी कसे विचारले, हे विचारल्यावर "मी सत्य बोलत आहे" असे मी ताठ मानेने त्यांच्या डोळ्यात डोळे घालून कसे सांगितले आणि हे सांगितल्यावर त्यांची नजर कशी जमिनीकडे झुकली कारण त्यांची बाजू असत्य होती ... हे साभिनय पप्पूने सांगितल्यावर त्याच्या बालबुद्धीची आणि पोरकटपणाची कीव आली. "मी सत्य बोलत आहे" या पप्पूच्या दाव्यावर तर अखिल ब्रह्मांड खदखदून हसले असेल.
पोरकटपणे बोलण्याची ही पप्पूची पहिली वेळ नाही. २ महिन्यांपूर्वी मोदी व मनमोहन सिंग यांची भेट झाल्यावर "मनमोहन सिंगांनी मोदींची अर्थशास्त्र या विषयावर शिकवणी घेतली" असे अत्यंत अज्ञानी आणि बालिश विधान पप्पूने २ महिन्यांपूर्वीच केले होते.
नंतर जेटलींनी सरळ बॅटने फलंदाजी करताना अत्यंत प्रभावी शब्दात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगितली. ललित मोदी लंडनला गेल्यावर संपुआच्या काळात त्याच्यावर फेमांतर्गत दावा दाखल केल्याने त्याला फक्त आर्थिक दंड होऊ शकतो, परंतु त्याला तुरूंगवास होऊ शकत नाही किंवा त्याच्याविरूद्ध वॉरंट सुद्धा निघू शकत नाही. गुन्हेगार हस्तांतरण कायद्याखाली त्याची मागणी करण्याऐवजी चिदंबरम यांनी त्याला इंग्लंडहून डीपोर्ट करावे अशी मागणी केली आणि अर्थातच इंग्लंडने ती धुडकावली. अंमलबजावणी संचलनालयाने तब्बल २०१०-२०१४ या तब्बल ४ वर्षात कोणतीही कारवाई केली नाही. त्याच्याविरूद्ध रेड कॉर्नर नोटीस (ज्यामुळे जगातील कोणत्याही विमानतळावर त्याला अडकवून ठेवता येते) जारी करण्याऐवजी लाईट ब्ल्यू कॉर्नर नोटीस (ज्यामुळे फक्त भारतातील कोणत्याही विमानतळावर त्याला अडकवून ठेवता येते) जारी केल्यामुळे तो सापडणे अशक्य होते. त्यामुळेच त्याला परत आणणे अवघड झाले आहे. परंतु आता नवीन कलमाखाली त्याच्यावर दावा दाखल केल्याने त्याच्याविरूद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट ५ ऑगस्ट २०१५ ला निघाले आहे.
जेटलींनी ही सर्व माहिती देताना काँग्रेसचे जोरदार वाभाडे काढले. पप्पू हा कोणतेही ज्ञान नसलेला विद्वान आहे, असे उपरोधिक उद्गारही जेटलींनी काढले. शेवटी स्थगन प्रस्तावावर मतदान होताना काँगेसने आधीच सभात्याग केलेला होता.
पप्पूच्या बालहट्टामुळे संसदेचे एक संपूर्ण अधिवेशन एका नॉनइश्यूपायी काँग्रेसने वाया घालविले. यातून काँग्रेसची वैचारिक व बौद्धिक दिवाळखोरी समोर आली. तसेच पप्पूची अपरिपक्वता आणि पोरकटपणा पुन्हा एकदा दृग्गोचर झाला. लोकसभा सभापती सौ. सुमित्रा महाजन यांच्या घरासमोर ढेरपोट्या, थुलथुलीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी उघडेबंब अशा असभ्य अवस्थेत निदर्शने करून अजून खालची पातळी गाठली. काँग्रेस हा देशाच्या प्रगतीत मोठा अडथळा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
भाजपने अत्यंत योजनाबद्द पावले आखून संसद न चालण्याचा सर्व दोष काँग्रेसवरच जाईल अशी रणनीती आखून पार पाडली. संसदेत येऊन उत्तर देण्याच्या काँग्रेसच्या मागणीला मोदींनी धुडकावून लावले. सेहवाग आणि द्रविड गोलंदाजांची पिसे काढत असताना सचिनची गरज नसते. तसेच सुषमा स्वराजांनी आणि जेटलींनी काँग्रेसला इतके धुवुन काढले की मोदींना यायची गरजच पडली नाही.
13 Aug 2015 - 6:32 pm | विकास
अत्यंत अपरिपक्व आणि पोरकट विधाने करणार्या पप्पूच्या बालहट्टामुळे सगळी संसद वेठीला धरली गेली. ....
तुम्ही ते काही म्हणा...
आमचा पप्पू हा women empowerment चा खंदा समर्थक आहे. म्हणून त्याने सुषमाजींना बोलण्याची संधी दिली आणि स्वतःकडे कमीपणा घेतला. ;)
13 Aug 2015 - 2:09 pm | श्रीगुरुजी
काल पप्पूने आपल्या हिंदी भाषणातील आपले मुद्दे रोमन लिपीत लिहून आणले होते. ते मधूनमधून बघून तो बोलत होता. त्याची आंतरजालावर फिरत असलेली प्रत -
13 Aug 2015 - 2:13 pm | प्यारे१
हस्ताक्षर कुणाचं आहे?
चांगलं आहे.
13 Aug 2015 - 4:27 pm | खटपट्या
हावर्ड विद्यापिठात असताना हींदीत नापास झाला होता अशी माहीती आहे.
13 Aug 2015 - 5:23 pm | होबासराव
बकरुद्दीन द रेकर (बांग्लादेश रीटर्न) बरोबर आहेत करा ह्या नॉन-मॅट्रिक पास पप्पु ला पंतप्रधान :)
हा मागे एकदा नेपाळ दुतावासात जाउन सुध्दा कॉपी करुन आला होता..आता तर संसदेत सुध्द्दा !!
काय लायकी चे लोक भारतीय राजकारणात आहेत अरा रा रा.
14 Aug 2015 - 9:14 pm | कोमल
:)) यावरच आज ब्रिटिश नंदीने सॉलिड ढिंग टांग लिहिलं आहे.
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=JKSXi
हे सुषमा स्वराजचे संपूर्ण भाषण..
मुख्य म्हणजे काँग्रेस अध्यक्ष महोदयांनी या विडिओ मधे २१:३० ला, जेव्हा स्वराज राजीव गांधी बद्दल बोलत असतांना "और करो" म्हणून गोंधळ वाढवायलाही सांगीतला आहे.
उत्तम विरोधीपक्ष नेते..
13 Aug 2015 - 4:20 pm | अजया
यावरून पप्पुला वाचता येतं हे तरी सिध्द झालं!
13 Aug 2015 - 6:29 pm | विकास
यावरून पप्पुला वाचता येतं हे तरी सिध्द झालं!
:) सहमत!
तरी देखील तो सुषमा स्वराज यांच्या समोर "वाचला" नाही!
13 Aug 2015 - 6:53 pm | राघवेंद्र
:) प्रचंड सहमत
14 Aug 2015 - 3:54 pm | कपिलमुनी
PM Modi reads M-R-S Sirisena
17 Aug 2015 - 1:47 pm | श्रीगुरुजी
ललित मोदी प्रकरणात पावले पडायला सुरूवात झाली आहे. ललित मोदीची सिंगापूरमधील बँक खाती गोठविण्यात आली आहेत.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/red-corner-notice-likely-to-be-...
यपीएल माजी प्रमुख ललित मोदी यांच्या अडचणीत वाढ झाली असून अंमलबजावणी संचलनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाच्या(सीबीआय) मागणीची दखल घेत सिंगापूर सरकारने ललित मोदी यांची दोन बँक खाती गोठविण्यात आली आहेत. तसेच तेथील सरकारने ललित मोदींविरोधात आणखी माहितीची मागणी भारताकडे केली आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, ललित मोदी प्रकरणावरून सिंगापूर सरकारच्या अधिकाऱयांमध्ये गेले काही दिवस चर्चा सुरू होती. या चर्चेनंतर मोदींची दोन बँक खाती गोठवण्यात आली. दरम्यान, सीबीआयने इंटरपोलला पत्रव्यवहारकरून ललित मोदी यांच्याविरोधात रेट कॉर्नर नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता असून ही नोटीस जारी करण्यात आल्यास ललित मोदींना अटक होऊ शकते. याआधी केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही ललित मोदी यांचे प्रत्यार्पण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असून त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावली जाऊ शकते, असे विधान केले होते. यूपीएच्या कार्यकाळात मोदी यांच्याविरुद्ध फक्त 'फेमा' चे प्रकरण दाखल करण्यात आले, ज्यात अटकेची तरतूद नसून जास्तीत जास्त शिक्षा फक्त दंडाची आहे. त्यांच्याविरुद्ध जी 'लाइट ब्ल्यू कॉर्नर नोटीस' जारी करण्यात आली, ती केवळ क्षेत्रीय विमानतळांसाठी लागू आहे. असे असताना लंडनमध्ये बसलेल्या कुणा व्यक्तीला परत कसे आणता येईल, असा प्रश्न देखील राठोड यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे रेड कॉर्नर नोटीस बजावून ललित मोदींना भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असल्याचे समजते.
18 Aug 2015 - 2:52 pm | अमित मुंबईचा
https://www.youtube.com/watch?v=1m-4J-61Qxg