यशोदे कसा गं बाई
श्याम तुझा मातला
ओलेती तनु कोमल माझी
अन द्वाडाने रंग टाकला
अंग अंग माझे जाळी
होळीच्या रंगेल ज्वाला
अंगांगाची होय काहिली
कान्ह्याने गं डाव साधला
गोपाळांचा जमवून मेळा
चहाटळ अडवी पांदणीला
लोण्याची त्यां लाच हवी
अन रंगाचा तो हाती बुधला
नंदाचा पोर्या गाली हसला
मैय्या, मी गं अगदीच भोळा
गोपी सार्या एक होवूनी
उगाच करती बघ कागाळ्या
माय यशोदा त्रासुन गेली
बांधुन घातला सावळा
धास्तावल्या गौळणी सार्या
बंधन कृष्णा अन आम्हां कळा !
विशाल
प्रतिक्रिया
5 Mar 2015 - 12:17 pm | एक एकटा एकटाच
नेहमीप्रमाणेच उत्तम
विशालदा........
:-)
5 Mar 2015 - 2:39 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
मस्तच..
5 Mar 2015 - 3:10 pm | अत्रुप्त आत्मा
@धास्तावल्या गौळणी सार्या
बंधन कृष्णा अन आम्हां कळा !>>> ह्हे ह्हे ह्हे! मस्तच!
5 Mar 2015 - 3:54 pm | विशाल कुलकर्णी
:)
6 Mar 2015 - 5:20 am | रुपी
मस्त..
6 Mar 2015 - 6:16 pm | चाणक्य
'पांदणीला' म्हणजे काय? ऎकला नाही कधी हा शब्द.
9 Mar 2015 - 11:00 am | विशाल कुलकर्णी
'पांदण' म्हणजे लहानशी वाट, पायवाट किंवा पाऊलवाट म्हणतो आपण. पांदण हा शब्द बहुदा मालवणी भाषेत /गोव्यात वापरला जातो. (रच्च्याक केळुसकरांची 'झिनझिनाट ऐकलीय का? त्यात पांदणीचा उल्लेख आहे ;) )
धन्यवाद मंडळी !
9 Mar 2015 - 5:29 pm | चाणक्य
नाही झिनझिनाट नाही वाचली / ऎकली. वाचतो मिळवून.
11 Mar 2015 - 5:13 pm | विशाल कुलकर्णी
'पांदणीत'भेटलस अंगाक खेटलस काळोख किनाट
खसकन हात हातात घेतलस, झालो झिनझिनाट ;)
12 Mar 2015 - 5:26 pm | चुकलामाकला
क्या बाात! जुन्या आठवणी जाग्या झाल्या हो , च्च च्च च्च!
6 Mar 2015 - 8:07 pm | सौन्दर्य
क्या बात है ! मस्तच.
9 Mar 2015 - 12:04 pm | ज्योति अळवणी
खूप सुंदर
11 Mar 2015 - 5:46 pm | सांजसंध्या
खासच. विकु टच आहे.
11 Mar 2015 - 9:10 pm | विशाल कुलकर्णी
अरे व्वा , तू आहेस काय इथे? किती दिवसांनी दिसत्येयस...
धन्स बादवे _/\_