कालच एक मला मिपा का आवडते? ह्या विचारांवर धागा काढला होता.
त्या लेखाला प्रतिसाद म्हणून "बिरुटे सरांचे" एक वाक्य होते.
"मिपा" हे पण एक आभासी जग आहे.
मला तर कधीच ते आभासी जग वाटले नाही.त्यामुळे वेळ मिळाला की मी सरळ मिपाकरांशी गाठभेट घ्यायचा प्रयत्न करतो.
स्नेहांकिता ताईंचा प्रतिसाद आला, की "एक जोरदार मिपा कट्टा व्हायला पाहिजे." त्याला मितान आणि अजया ह्यांचे अनुमोदन पण मिळाले.
तर मिपाकरांनो, एक जोरदार मिपाकट्टा करू या का?
कट्ट्याला आम्ही कधीच नाही म्हणत नाही.
कट्टा कुठेही असला आणि मला वेळ असेल तर, घरदार सोडून मी कट्ट्याला हजेरी लावतो.
एक ठिकाण सुचवतो,
कर्जत जवळ "कशेळी" म्हणून एक गांव आहे.
बर्यापैकी झाडी आहे, छान पैकी ४०-५० माणसे बसू शकतील अशी जागा आहे.जवळच एक छोटे तळे आणि बाजूला लेणी-गुंफा पण आहेत.आधी ऑर्डर दिली तर तिथेच जेवणाची सोय पण होवू शकते.
मी कंजूस ह्यांचा हात धरून गेलो होतो.त्यामुळे कुणी कुठून कसे यायचे ते माझ्या पेक्षा कंजूसच जास्त सांगू शकतील.
एका दिवसात होणारी ट्रिप असल्याने, मुंबईत आणि पुण्यात , राहणार्या सर्व मिपाकरांना एकदम योग्य जागा.माणशी जास्तीत जास्त २०० ते २५० रुपये खर्च होतील आणि ते पण येण्या-जाण्याच्या खर्चासकट.
हा धागा फक्त ठिकाण निश्र्चीती आणि दिनांक ठरवायलाच आहे.
मला २८ फेब्रुवारी किंवा १ मार्च चालेल.
धागा काथ्याकुटातला असल्याने भरपूर काथ्या कुटावा.
इथे माझा सहभाग संपला.
विषय आणि माझा प्रतिसाद मूळ धाग्यातच गुंफला आहे.ह्या चर्चेच्या गुर्हाळातून जे काही ठिकाण आणि दिनांक ठरवल्या जाईल, त्याला माझी मान्यता आहे.
कशेळी बद्दलची जास्तीची माहिती कंजूस सांगतील.
प्रतिक्रिया
25 Dec 2014 - 7:30 am | सस्नेह
शब्द दिल्याप्रमाणे धागा आला की !
कशेळी इथे बसने कसे जायचे व पुण्याहून किती वेळ लागतो ? आणि तारीखही ठरवा पटापट .
25 Dec 2014 - 7:30 am | अत्रुप्त आत्मा
येणार !
25 Dec 2014 - 8:25 am | त्रिवेणी
येणार.
25 Dec 2014 - 8:25 am | प्रचेतस
शक्यतो येईनच.
25 Dec 2014 - 8:40 am | अजया
तारीख थोडी अलिकडे घेता येईल का? बोर्ड एक्झाम सुरु होतात ३ मार्च पासुन.
कशेळी वनविहार का? कर्जत मुरबाड रस्ता?कोंडाणे लेण्याजवळ?छान जागा अाहे.पण स्वतःचे वाहन असल्यास सोयीचे होईल असे वाटते.
25 Dec 2014 - 8:44 am | प्रचेतस
राजमाचीवरुन उतरताना एकदा कोंडाणे लेणी पाहिली होती.
25 Dec 2014 - 10:56 am | मुक्त विहारि
बोर्ड एक्झाम सुरु होतात ३ मार्च पासुन."
नक्कीच घेता येईल.
कारण मी माझी साधारण तारीख सांगीतली.
इतर मिपाकर काय म्हणतात ते बघू.
25 Dec 2014 - 8:46 am | चौकटराजा
अशा कट्ट्याची कल्पना मी मा. इस्पिक एक्का यांच्याकडे बोललो होतो. सोयिस्कर प्रवास , जवळचे ठिकाण व मर्यादित खर्च हे एकत्र आले तर अनेक मिपाकर हौशीने येतील.
25 Dec 2014 - 11:21 am | डॉ सुहास म्हात्रे
असे मिपाकट्टे वारंवार होवो व या विश्वे प्रेमभाव वाढो ही तो श्रींची इच्छा आहे... आम्ही केवळ ती परत सांगणारे आणि सहमत होणारे भारवाही हमाल, बस. :)
अवांतर : "मा. इस्पिक एक्का" मधले ते "मा." काय आहे ??? त्या शब्दाने अनेक श्या सुरू होतात, म्हणून आम्हाला शिंपल "इस्पीकचा एक्का" किंवा अतिशिंपल "एक्का"च ज्यास्त आवडते याची माननियांनी दखल घ्यावी. ;)
25 Dec 2014 - 11:34 am | टवाळ कार्टा
हेच विचारणार होतो =))
ते "मा." पुढारीलोकांसाठीच असूदे ;)
25 Dec 2014 - 6:57 pm | चौकटराजा
ते टंकायला चुकलेले दिसतेय मागे अशा शब्द लिहिताना मा. असे आली आरे हां स्वारी बरं का !
25 Dec 2014 - 10:25 pm | डॉ सुहास म्हात्रे
आता ही स्वारी कशाला ? तुमी स्वारी घोड्या-उंटावर करा, नायतर हत्तीवर. आमाला नको तुमची स्वारी. ;) पुढच्या कट्ट्याला लवकरच भेटू आणि मस्त गफ्फा मारू, वाटल्यास दोन दोन कालसर्पनिवारक फलरस पिऊ, काय म्हंताव ? :)
25 Dec 2014 - 9:43 am | कंजूस
ठिकाण :वनविहार ,
ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात.
काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला).
प्रवेश फी :नाही.
जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज).
पार्किँग :भरपूर.
राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु.
संपर्क 9226093034 शिवाजी
0214683313
जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार.
पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल.
पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल.
मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत.
कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता.
राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे.
कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.
25 Dec 2014 - 11:33 am | टवाळ कार्टा
मी नक्की येणार...रात्रीचा मुक्कामाचा बेत असेल तर मग धमाल
25 Dec 2014 - 11:39 am | मुक्त विहारि
ओके
हा पण मुद्दा विचारात घेण्याजोगा आहे.
पण तिथल्या खोल्या फार सुंदर नाही आहेत.
त्यामुळे राहण्याची फार अपेक्षा करू नकोस.
पण जेवण मस्त असते.
25 Dec 2014 - 11:48 am | टवाळ कार्टा
मिपाकर असताना कोण खोल्यांची रंगसंगती बघतोय (वल्लीबुआंबद्दल माहित नाही ब्वॉ)
पत्त्यांचे क्यॅट...चिकन...रंगीत पेय (हे असावेच असे काही नाही)...गप्पा...आणखी काय हवे रात्र जागवायला
25 Dec 2014 - 11:56 am | मुक्त विहारि
मस्त झब्बु, चॅलेंज खेळत बसू...
एखादी शेकोटी पेटवू...
अजुन कुणी येणार असेल तर फारच उत्तम...
25 Dec 2014 - 12:03 pm | टवाळ कार्टा
आयला मला वाटले तुम्ही मेंढीकोट, रम्मी, पोकर अशी नावे घ्याल ;)
25 Dec 2014 - 12:12 pm | मुक्त विहारि
मला नाही येत...
मला शिकव
25 Dec 2014 - 12:51 pm | टवाळ कार्टा
शिकवतो की
25 Dec 2014 - 12:12 pm | कंजूस
पुण्याचे दोन चारजण अगोदर येऊन पाहून गेलात तर कल्पना (=IDEA) येईल आणि कायमचं एक {गुप्त}कट्टयाला ठिकाण 'भेटेल'. धडपड्यांसाठी पेठचा किल्ला ,भिमाशंकर आहेच. फोटोग्राफीसाठी रानपक्षी(नंदन नाचण ,भृंगराज मोठा शेपटीवाला कोतवाल कांचन, टकाचोर सोनपाठी सुतार )आहेतच.
25 Dec 2014 - 12:16 pm | विजुभाऊ
लै भारी. तारीख सांगा आपली हजेरी आत्ताच पक्की समजा.
25 Dec 2014 - 12:19 pm | मुक्त विहारि
तुम्ही तुमच्या सोयीची एखादी तारीख सांगा की...
25 Dec 2014 - 12:54 pm | अजया
८ किंवा१५ फेब्रुवारी? रविवार आहे.
25 Dec 2014 - 1:04 pm | पैसा
मुलांच्या परीक्षा कधी असतील माहित नाही. पण तसे काही नसेल तर नक्की येणार!
25 Dec 2014 - 4:31 pm | विजुभाऊ
७ फेब्रुवारी किंवा १४ फेब्रुवारी चालेल. दोन्ही दिवशी शनिवार ला जोडून रविवार आहे आहे.
25 Dec 2014 - 8:20 pm | भाते
शनिवारला जोडुन फक्त रविवारच येतो असे किमान आमच्यातरी शाळेत शिकवले होते. रविवार सोडुन आणखी कुठला वार येऊ शकतो हे माहितच नव्हते!
विजुभाऊ, कृ. ह. घ्या. :)
25 Dec 2014 - 10:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
शनिवारला जोडून शुक्रवार पण असतो असे आमच्या शाळेत आम्हाला शिकवले होते ;) :)
26 Dec 2014 - 11:36 am | विजुभाऊ
बरोब्बर. दुसरी एक शक्यता म्हणजे एखादे दिवशी तिथी लय असेल तर,,,,,,,,,,,,WinkSmile
25 Dec 2014 - 4:50 pm | टवाळ कार्टा
१४ फेब्रुवारीला आधीच ठरलेले प्लान्स असणार बावा ;)
26 Dec 2014 - 11:44 am | सस्नेह
मिळाली वाट्टं कंपनी ?
कृपया विनोद ह घेणे ! *biggrin*
25 Dec 2014 - 5:24 pm | बोका-ए-आझम
येणार म्हणजे येणार!
25 Dec 2014 - 10:12 pm | मुक्त विहारि
मग हीच तारीख नक्की करू या का?
25 Dec 2014 - 10:21 pm | टवाळ कार्टा
नक्को...मग माझे नक्की नाही ;)
25 Dec 2014 - 10:30 pm | अनुप ढेरे
हॅहॅहॅ...
व्यालेंटाइन डेला मिपाकरांबरोबर टीपी केला तर सासूबाईंना वाईट वाटेल.
25 Dec 2014 - 11:11 pm | मुक्त विहारि
उलट तुमच्या गर्ल फ्रेंडला पण मिपाकर बनवा...(आम्ही पण आमच्या बायकोला मिपाकर करून घेतले आहे.मिपा ही तिची लाडकी सवत आहे.)
आणि
सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून तिथेच तुमचा प्रेमदिवस साजरा करा...
मिपाकर कट्ट्यात दंग असल्याने तुमच्याकडे कुणाचे लक्ष जाणार नाही...
26 Dec 2014 - 8:57 am | टवाळ कार्टा
आधी बनू तर दे ;)
26 Dec 2014 - 8:58 am | टवाळ कार्टा
म्हणूनच्च मी सासूबाई बनवणारच्च नै कोणाला :P
25 Dec 2014 - 10:17 pm | दिपक.कुवेत
हे असे कट्ट्यांचे धागे काढतात, वर ते यशस्वी करुन दाखवतात आणि मग जळवणारे फोटु/वॄतांत येतात.....जल्ला ईनो चा पन काय ईफेक्ट होत नाहि. मुवि मी आल्यावर जर एखादा कट्टा केला नाहित तर याद राखा....
25 Dec 2014 - 11:13 pm | मुक्त विहारि
"मी आल्यावर जर एखादा कट्टा केला नाहित तर याद राखा...."
ह्यावेळी तुमच्याबरोबर उरण कट्टा करायचा बेत आहे.
26 Dec 2014 - 9:21 am | अजया
रविवार ठेवा मग १५ चा.हाकानाका.
26 Dec 2014 - 11:44 am | मुक्त विहारि
अजून कोणाला काही आक्षेप?
26 Dec 2014 - 11:47 am | डॉ सुहास म्हात्रे
रैवार ब्येष्ट ! सुट्टी आस्तीय सगळ्यान्ला :)
26 Dec 2014 - 11:49 am | विजुभाऊ
रैवार पेक्षा शनिवार बरा पडेल. रैवारी दंगा करून दुसर्या दिवशी हापिसाला जायाला लै वंगाळ वाटतं
26 Dec 2014 - 11:53 am | मुक्त विहारि
खरा दंगा शनिवारी रात्री करू...
हाकानाका.
तुम्ही बासरी घेवून या...
(प्लॅनिंग डॅमेजर) मुवि
26 Dec 2014 - 12:03 pm | टवाळ कार्टा
हे बेश्ट
26 Dec 2014 - 12:55 pm | कंजूस
माझं ऐका दोन चार जण येऊन तिथे पाहून गेलात तर ठरवायला सोपे जाईल. शनिवारी काही जण आलात तर खासकरून पुणेकरांस भरपूर वेळ मिळेल. मुंबईचे रविवारी सकाळी ९ वाजता येऊ शकतात.
26 Dec 2014 - 1:01 pm | मुक्त विहारि
कारण फक्त माझ्या आणि कंजूस ह्यांच्या अनुभवावर जावू नका.
कारण आमच्या कडून पण काही चूक होवू शकते.
26 Dec 2014 - 1:02 pm | मुक्त विहारि
जरा त्या टकाला विचारतो...
(नाहीतरी उगाच टाइमपास करत बसलाय...लावु या कामाला)
26 Dec 2014 - 1:07 pm | टवाळ कार्टा
चालेल की...आम्ही एक छोटा कट्टा करु ;)
26 Dec 2014 - 1:18 pm | मुक्त विहारि
तुम्ही पण टकाला घेवून जावून याल का?
26 Dec 2014 - 3:24 pm | कंजूस
नक्कीच. या रविवारी नको. छोटा ट्रेक कर्नाळा पक्का आहे. कोणाला यायचे असेल तर सांगा. भटक्या खेडवाला, हु एक्का येत आहेत.
26 Dec 2014 - 3:30 pm | सूड
१४-१५ बिझी असणार आहे, त्यामुळे शक्य नाही. त्यातही फायनल झाली तारीख की कळवा, मग मी काय ते सांगतो.
26 Dec 2014 - 6:54 pm | चौकटराजा
पंदराला बी बिजी ? का चौदाला यित्का बिजी की १५ ला येनं शक्य न्हाई ? १४ ला काय धा मईल चालनार हैस का "गड्या" ?
26 Dec 2014 - 7:34 pm | टवाळ कार्टा
अग्गागा...यावर आणखी एक लिहिले असते पण...च्यायला हा पण मधे येतो :(
26 Dec 2014 - 7:47 pm | सूड
हायला, लिव की!! पर मंग म्या काय उत्तर दिलं तं त्ये बी चालवून घ्याचं, कसं?
26 Dec 2014 - 7:52 pm | टवाळ कार्टा
लिवा की वो...हकूना मटाटा :)
26 Dec 2014 - 7:48 pm | सूड
काका, तुमास्नी आपल्या कंपूच्या व्यनित सांगतो. ;)
27 Dec 2014 - 10:43 am | इरसाल
कशेळ्यापासुन १३ किमी वर आंबिवली गाव आहे तिथेच पेठचा किल्ला आहे आणी जवळच बौद्ध कालीन स्तुप पण आहेत.
कशेळ्यासाठी नेरळ किंवा मग कर्जतही व्यवस्थित राहिल.
नेरळ-कळंब-सुगवे-कशेळे (२९ किमि)(शक्यतो टाळा)
नेरळ-कोल्हिवली-वाकस-कशेळे (१३ किमि) (विक्रम असतात खुप)
कर्जत-कडाव-कशेळे (१४ किमि)(कडाव ला गणपतीचे प्रशिद्ध मंदिर आहे एस्टी स्टँडच्या मागेच)
कशेळ्या जवळच लालवाडी आहे जिथे वेतापासुन फर्निचर बनवले जाते इच्छुक असाल तर जावु शकता तिथेच नैसर्गिक पदार्थ जसे मध वगैरे आणी तत्सम वस्तुपण मिळतात
27 Dec 2014 - 11:19 am | मुक्त विहारि
ह्या फेब्रुवारीत थोडा व्यस्त आहे.
पुढचा कट्टा बडोद्याला करायचा बेत आहे.
(कट्टेकरी) मुवि
27 Dec 2014 - 11:54 am | इरसाल
कधीही या बडोद्यात तुमचे स्वागतच आहे.
27 Dec 2014 - 12:27 pm | मुक्त विहारि
बर्याच वेळा आपण ठरवले पण राहूनच जातंय...
पण आता ह्या वर्षी भेटू याच..
27 Dec 2014 - 10:55 pm | चेतन677
हे यासाठी विचारतोय की मला असे वाटतेय की मी तुमच्यात सर्वात लहान असेल.माझे वय 23 आहे.
27 Dec 2014 - 11:00 pm | मुक्त विहारि
ये बिंधास्त...
भेटू या.
27 Dec 2014 - 11:17 pm | टवाळ कार्टा
मिपाकर शारिरीक वयाने जितके मोठे तितका जास्त दंगा करतात :)
27 Dec 2014 - 11:37 pm | मुक्त विहारि
सहमत
28 Dec 2014 - 5:37 am | कंजूस
या इथे प्रत्येकासाठी वेगळी आव्हाने आहेत.
28 Dec 2014 - 1:08 pm | hitesh
मी येणार नाही
28 Dec 2014 - 1:24 pm | टवाळ कार्टा
माहित आहे...काहितरी नवीन सांगा की राव...म्हणजे हितेस हा अवतार येणार नाही का सगळेच अवतार येणार नाहीत ;)
29 Dec 2014 - 3:27 pm | सूड
वे क्नोव थत, तेल्ल उस सोमेथिन्ग नेव दुदे!!
28 Dec 2014 - 2:03 pm | स्पार्टाकस
१५ फेब्रुवारीनंतर असेल तर अस्मादिकांची हजेरी लागू शकते.
28 Dec 2014 - 3:20 pm | मुक्त विहारि
तुम्ही केंव्हा येत आहात?
त्यावेळी परत एका कट्ट्याचे आयोजन करण्यात येईल.
28 Dec 2014 - 2:36 pm | जयंत कुलकर्णी
३० जनेवारीनंतर कुठेही केव्हाही असुदेत, यावेळी मात्र मी येणारच आहे..........
11 Feb 2016 - 7:43 am | प्रणवजोशी
मी पण येणार त्या निमित्ताने आभासी जगातील मिपाकरांची व्यक्तिशः भेट होईल
11 Feb 2016 - 1:01 pm | स्वच्छंदी_मनोज
ओ जोशी साब.. तारीख बघा की जरा...झाला की हा वनविहार कट्टा आणी वर्णने पण आली होती...
11 Feb 2016 - 2:36 pm | सूड
तात्या, दोन वर्षापूर्वीचा धागा आहे हा!!
11 Feb 2016 - 4:14 pm | माम्लेदारचा पन्खा
कंफूज झालो ना राव......