Saint आधी की संत आधी?

चिगो's picture
चिगो in काथ्याकूट
19 Nov 2014 - 2:31 pm
गाभा: 

नमस्कार मंडळी.. आजच इथं शिलाँगात एका सेंट पिटर्स नावाच्या शाळेत गेलो आणि डोक्यात सहज एक किडा वळवळला.. संत आणि Saint ह्यातील कुठला शब्द आधी आला? एक शब्द दुसर्‍यावरुन उचलला किंवा रचला आहे का? असल्यास कुठला?

मला नेहमीच दोन भिन्न भाषांतील समानार्थी शब्दसाधर्म्याचे कुतूहल वाटत आले आहे. त्यामुळेच जेव्हा अहोमियात आई, भात, खेदणे इत्यादी शब्द मराठी शब्दांसारखेच अर्थ असलेले आहेत हे कळलं, तेव्हा त्या भाषेशी सख्य वाढले. "नमस्ते लंडन"मध्ये जेव्हा अक्षयकुमार कोण्या इंग्रजाला मातृ, भ्रातृ, त्रिकोणामिती पासून मदर, ब्रदर, ट्रिगोनामेट्री हे शब्द कसे बनलेत हे ठासून सांगतो, तो प्रसंग मला आवडतो. (भुरभुरत्या केसांच्या, आंग्लाळलेली हिंदी बोलणार्‍या कट्रीनाचाही प्रसंग आवडण्यात लै मोठा वाटा आहे.. ;-) ) हे असले प्रसंग आमच्या उसवत्या देशप्रेमाला भाषाभिमानाची ठीगळं लावतात..

तर मुळ प्रश्न असा, की "सेंट" आणि "संत" ह्यातला कुठला शब्द आधी आला? माझ्यामते सेंट असावा, आणि त्यावरुन "संत" हा शब्द शिक्षणखात्याने उचलला असावा.. "संतपदाला पावते झाले" कींवा "संतपदाची प्राप्ती झाली" म्हणजे नेमके कुणी हे पद दिले? जनमानसाने का? हा प्रश्न विचारण्याचे कारण हे, "सेंट" ही पदवी/उपाधी कॅथलिक चर्च देते, त्याप्रमाणे "संत" पदवी देणारे कुठले धर्मगुरु किंवा राजे असल्याचा उल्लेख कुठे आहे का? म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ह्यांचा संत म्हणून उल्लेख तत्कालीन साहीत्यात आहे का?

मिपावर अनेक संतसाहीत्य तसेच इतिहासाचे जाणकार आहेत, त्यांनी ह्यावर प्रकाश टाकावा ही विनंती..

(अवांतर : "ह्या माहितीचे तुम्ही काय करणार" हा प्रश्न विचारणार्‍यांसाठी डिस्क्लेमर. हा प्रश्न "जिज्ञासाकंडूशमनार्थ" विचारला आहे.. ;-) )

प्रतिक्रिया

सुनील's picture

19 Nov 2014 - 2:38 pm | सुनील

म्हणजे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम ह्यांचा संत म्हणून उल्लेख तत्कालीन साहीत्यात आहे का?

त्यांच्याबद्दल ठाऊक नाही पण,

साधू संत येती घरा
तोचि दिवाळी दसरा

हे संत तुकारामांचेच काव्य ना?

सुनील's picture

19 Nov 2014 - 2:40 pm | सुनील

थोडक्यात काय तर, मराठी संत आणि इंग्रजी सेन्ट हे दोन्ही समानार्थी शब्द स्वतंत्रपणे अस्तिवात आले असावेत. एकावरून दुसरा असे नव्हे.

सव्यसाची's picture

19 Nov 2014 - 2:39 pm | सव्यसाची

संत शब्द आधी कि नंतरचा हे माहिती नाही. परंतु संत हा शब्द अभंग, हरिपाठ या सगळ्यामध्ये आढळतो.
ही हरिपाठा मधील एक अभंगाची सुरुवात.

संतांचे संगती मनोमार्ग गती । आकळावा श्रीपती येणे पंथे।

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम असा उल्लेख आढळतो का हे पाहावे लागेल.

माहितगार's picture

19 Nov 2014 - 3:05 pm | माहितगार

saint शब्द लॅटीन sanctus वरून आल्याचे ऑनलाईन संदर्भ दर्शवतात. रेकॉर्डेड दस्तएवजांनुसार संस्कृत दस्तएवजातील "सन्त" शब्दाचा वापर जुना असण्याची निश्चित शक्यता वाटते. असे प्रसंग आलेकी संस्कृत आणि लॅटीन सहसा दोन्ही बाजुचे पंडीत त्यांच्या त्यांच्या भाषेपर्यंतच जाऊन थांबतात. इंडोयुरोपीय भाषात त्यांचे एकसारख्या उच्चारण आणि अर्थांबद्दल जाणून घ्यावयास आवडेल

हिंदू विश्व राष्ट्राचा इतिहास हे श्री पु.ना.ओक यांनी लिहीलेले पुस्तक वाचा...त्यात बरेचसे असे शब्द सापडतील जे संस्कॄत आणि ईग्रजी मधील साम्य दाखवतील...
मातृ, भ्रातृ, त्रिकोणामिती पासून मदर, ब्रदर, ट्रिगोनामेट् या शिवाय मला खालील शब्द आठवतात...
सिंग = king
फलतिईती = fertility
क्रुष्णनिती = christnity

अवांतर : गंमत म्हणून पु.ल.नी एका लेखात खालीलप्रमाणे लिहीले होते..
इटली या मूळ विठ्ठली देश. "वॅटीकन" हे मूळातच विठू आणि कान्हा यांच्या नावामुळे "विठूकान्ह" असे होते. त्याचे नंतर वॅटीकन असे झाले.

क्लिंटन's picture

19 Nov 2014 - 3:36 pm | क्लिंटन

सिंग = king

अच्छा म्हणजे सिंग इज किंग इतके जुने आहे तर.

पु.ना.ओकांनी अशा अनेक हास्यास्पद गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांच्या मते आंग्ल भाषाच संस्कृतोद्भव आहे. व्हॅटिकन सिटी म्हणजे वेदवटी, लँकेशायर म्हणजे लंकेश्वर आणि जर्मनीतील हॅम्बुर्ग म्हणजे हेमदुर्ग आहे. केवळ असे ओढूनताणून दिसणारे उच्चारातील साम्य असेल तर सगळीकडे हिंदू संस्कृतीच होती हे अनुमान कसे काढता आले हे ते पु.ना.ओकच जाणोत.

योगी९००'s picture

20 Nov 2014 - 9:08 am | योगी९००

मी सुद्धा चेष्टेतच लिहीले आहे. पु.ना.ओकांनी लिहीलेल्या या पुस्तकातले विचार मला पटले नाहीत.
(त्यात त्यांनी रामायण कसे घडले असावे हे लिहीले आहे. ते मात्र आवडले.).

माहितगार's picture

19 Nov 2014 - 3:26 pm | माहितगार

क्रुष्णनिती = christnity

निती शब्दाशीच संबंध दाखवायचा तर unity शब्द अधीक जवळ जातो . christnity मध्ये nity येते ते human - humanity या पद्धतीने येते म्हणून वेगळे असावे. क्रुष्णनिती = christnity मात्र सध्यातरी अतर्क्य वाटते आहे.

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2014 - 5:00 pm | प्रसाद गोडबोले

कितिही अतर्क्य वाटत असले तरीही तेच अंतिम सत्य आहे ... हिंदु धर्म आधी जगभर पसरला होता त्याकाळी मध्यपुर्वेतील एका ब्राह्मणाने चार्वाका सारखे हिंदुधर्माविरुध्द बोलायला सुरुवात केली मग त्याला लोकांनी धर्म बहिष्कृत केले अन त्याला अब्राह्मण म्हणु लागले हाच तो अब्राहम ज्याच्या पासुन ज्यु ख्रिश्चनादी अब्राहमिक धर्मांचा उदय झाला :D

बॅटमॅन's picture

19 Nov 2014 - 5:26 pm | बॅटमॅन

अब्राहम =)) =)) =))

हाडक्या's picture

19 Nov 2014 - 6:05 pm | हाडक्या

हा हा हा .. जबरीये.

योगी९००'s picture

19 Nov 2014 - 10:59 pm | योगी९००

अब्राहम ......हँ हँ हँ

सर्व प्रतिसाद वाचल्यावर बँटमन यांना संत उपाधी द्यावी असा ठराव मी मांडतो.

हरकाम्या's picture

20 Nov 2014 - 8:44 am | हरकाम्या

या सूचनेला माझे " पुर्ण अनुमोदन " आहे. ( हे अनुमोदन मी कुठलेही उत्तेजक द्रव सेवन न करता दिलेले आहे याची
नोंद घ्यावी )

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2014 - 9:34 am | टवाळ कार्टा

माझा "बाहेरून" बिनशर्त पाठिंबा ;)

hitesh's picture

21 Nov 2014 - 8:02 pm | hitesh

मिपाच्याच्पहिला सन्ताला पहिला प्रणाम.

हायला पण त्या नादात संत संता झाली की !

लॅटिन आणि संस्कृत या दोन्ही भाषा एकमेकींच्या 'मेळ्यात बिछडलेल्या' बहिणी आहेत. बॉलीवुडमध्ये पाहिल्यास दिसेल की पोरं हरवतात अन नंतर भेट होते इ.इ. इथे पोरं हरवून मग भेटली, बहिणी-बहिणी असल्याची खात्रीही पटली. फक्त फरक इतकाच की बॉलीवुडात आईही भेटते, इथे आईचा पत्ता नाही, पण दोघींची आई एकच होती हे आता खात्रीलायकपणे ठाऊक आहे.

तर लॅटिनमध्ये सेंट हा शब्द दीडदोन हजार वर्षे जुना आहे.

संस्कृतात हा शब्द कालिदासाच्या काव्यात सापडतो, म्हणजे इ.स. ५०० च्या अगोदर हा वापरात होता. शिवाय महाभारतातही सापडतो, त्यामुळे अजून ४००-५०० वर्षे मागे जायला अडचण नाही. मनुस्मृतीतही हा शब्द आढळतो.

आता दोन्ही भाषांत हा शब्द आहे हे तर सिद्ध झाले. पण यावरून एकीकडून दुसरीकडे तो शब्द गेलाय हे सिद्ध होत नाही. लॅटिनचा प्रभाव असायला भारतात रोमराज्य कधीच नव्हते. (स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४ ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा) शिवाय भारतावर ग्रीक वंशाच्या क्षत्रपांनी राज्य केले विशेषतः पश्चिम भागात तरी त्यांनी ग्रीक वा लॅटिन भाषा लादली नाही. रोमन काळात भारताशी रोमन लोकांचा व्यापार असला तरी प्रभुत्व नव्हते. त्यामुळे लॅटिनचा संबंध नव्हता. शिवाय भारत पूर्वेकडे असल्याने बरेच ग्रीक येत, तुलनेने इटालियन येत नसत.

दोन्ही भाषा मुळात एकसारख्या असल्याने त्यांतील शब्दही कैक सारखे आहेत हे मेन. ते साधर्म्य या केसमध्ये कॉमन वारशाचा परिणाम आहे, देवाणघेवाणीचा नाही. उदा. मी जातो आणि मैं जाता हूँ या वाक्यांत पाहिले तर असे शब्दप्रयोग मराठीतून हिंदीत गेले की हिंदीतून मराठीत आले? दोन्हीही नाही. संस्कृत-प्राकृतकडून हा कॉमन वारसा दोन्ही भाषांना मिळालेला आहे आणि त्यामुळे स्लाईट फरक होऊन तेच ते शब्द दोन्हीकडे आलेत. संस्कृत अन लॅटिनमध्येही तोच प्रकार आहे.

नाखु's picture

19 Nov 2014 - 4:21 pm | नाखु

काय करावे आता !!! जरा लोक तारे तोडतायत (अकलेचे) तर आला संदर्भासह स्पष्टीकरण द्यायला!
मूळ अवांतरः छान उपयुक्त माहीती, पण चेंगटपणा करून फक्त प्रतिसाद-फुले वाहू नका जरा क्रमशःवाली माला गुंफा जरा! चार माहीतीच्या गोष्टी आम्हाला तरी कळतील!!!

hitesh's picture

21 Nov 2014 - 8:07 pm | hitesh

स्टार ... स्टारे.. तारे ..

प्रचेतस's picture

19 Nov 2014 - 4:21 pm | प्रचेतस

मस्त प्रतिसाद.

ह्यावरून अरेबिक किंवा इंडो अरेबिक न्यूमरल्स आठवले. जे आज सर्व जगात सर्रास वापरले जातात.
उदा. १, २, ३,...,१०

हे क्रमांक भारतात तयार झाले व पुढे त्याचा प्रसार अरबांनी केला हे खूप कमी जणांना माहित असेल.

बॅटमॅन's picture

19 Nov 2014 - 4:40 pm | बॅटमॅन

ते नोटेशन तयार झाले ते भारतात. विशेषतः शून्यवाले. बाकी इतके शोध लावणारे ग्रीक अन रोमन्स शून्याची बस कशी काय चुकले काय माहीत! असो.

एक पोकळ सर्कल म्हणजे शून्य अशी जी खूण आज आपण लिखाणात वापरतो, तिचा शिलालेखांतील सर्वांत जुना पुरावा ग्वाल्हेरच्या किल्ल्यातील शंकराच्या देवळातील शिलालेखात सापडतो. वर्ष आहे इ.स. ८७६. त्या देवळाचे नाव खरेतर 'शून्येश्वर महादेव मंदिर' असे बदलावयास हवे आता.

केदार-मिसळपाव's picture

19 Nov 2014 - 5:08 pm | केदार-मिसळपाव

तु महान आहेस रे.

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2014 - 5:14 pm | प्रसाद गोडबोले

बाकी इतके शोध लावणारे ग्रीक अन रोमन्स शून्याची बस कशी काय चुकले काय माहीत!

ह्याचे अतिषय सुंदर स्पष्टीकरण ( फिलॉसॉफी / मायथॉलॉजी च्या अँगलने ) देवदत्त पटनाईक http://en.wikipedia.org/wiki/Devdutt_Pattanaik ह्यांच्या एका टेड टॉल्क्स मधे ऐकले आहे .

बाकी शुन्याचा शोध नक्की कधी लागला असावा ?

बॅटमॅन's picture

19 Nov 2014 - 5:26 pm | बॅटमॅन

धन्स रे. पाहतो.

तदुपरि शून्याचा शोध दोनेक हजार वर्षांपूर्वी तरी लागला असावा असे म्हणण्यास हर्कत नाही. आर्यभट (इ.स. ४७६ च्या आसपास) त्या संकल्पनेचा उल्लेख करतो, पोझिशनल नंबर सिस्टिमचे काहीसे अस्पष्ट उदा. अगदी उत्तर वैदिक काळातही सापडते. छन्दःशास्त्रकार पिंगल (२०० इ.स.पू. ते २०० इ.स. मध्ये त्याचा काळ धरतात) हाही शून्याचा उल्लेख करतो. त्यामुळे दोनेक हजार वर्षे असावासे वाटते.

प्रचेतस's picture

19 Nov 2014 - 7:48 pm | प्रचेतस

शून्याचा शोध २००० वर्षांपेक्षाही बहुत जुना दिसतो.
सातवाहन आणि क्षत्रपांच्या कित्येक लेखात कालगणना देताना १० (+) २, ४० (+) ४ म्हणजेच १२, ४४ असे क्रमांक आढळतात. अर्थात
ह्यातील शून्य हां आकड़ा सध्याच्या देवनागरीतील वर्तुळासारखा नसून ब्राह्मी लिपीत लिहिला जात असे. हे लेख किमान २२०० वर्षे जूने आहेत.

बाकी सध्याच्या शून्यासंबंधी तू उल्लेख केलेल्या महादेव मंदिर शिलालेखाबद्दल माहीत नव्हते.
अर्थात तो सगळ्यात जुना लेख असू शकतो कारण तेव्हा नुकतीच ब्राह्मी लयास जाऊन देवनागरीला सुरुवात झाली होती.

बॅटमॅन's picture

19 Nov 2014 - 8:07 pm | बॅटमॅन

ही माहिती नवीन आहे. बहुत धन्यवाद!!!

हाडक्या's picture

19 Nov 2014 - 8:10 pm | हाडक्या

या विडिओ मध्ये पहा ते मंदिर आणि तो शिलालेखदेखील.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Nov 2014 - 5:50 pm | डॉ सुहास म्हात्रे


(जालावरून साभार)

वरच्या चित्रातील इंग्लिश भाषेतील (European) आकड्यांना "अरेबिक" न्युमरल्स म्हणतात तर अरेबिक भाषेतील आकड्यांना "अरेबिक-इंडिक", "हिंदू-अरेबिक" अथवा "हिंदी" न्युमरल्स असे म्हणतात.

शुन्यासह इतर आकडे लिहिण्याची प्रचलित दशमान अथवा स्थानीय मान पद्धत (Positional notation or place-value notation) पद्धत भारतातून अरेबियात आणि तेथून पश्चिमेत गेली हे आता सर्वमान्य झाले आहे.

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2014 - 4:29 pm | प्रसाद गोडबोले

भारतावर ग्रीक वंशाच्या क्षत्रपांनी राज्य केले विशेषतः पश्चिम भागात तरी त्यांनी ग्रीक वा लॅटिन भाषा लादली नाही

ग्रीकांचा लॅटीनशी काय संबंध ? आमच्या ऐकीव माहीती नुसार लॅटीन रोमन साम्राज्यात उदयास/ भरभराटीस आली .... तोवर ग्रीकांचे सारे प्रस्थ संपले होते .

जरा अजुन डीटेल मधे लिहि रे ब्यॅटा आमची टाईमलाईन क्लीयर होवुदे ....

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2014 - 4:30 pm | प्रसाद गोडबोले

(स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४ ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा)

=))))

रीकांचा लॅटीनशी काय संबंध ? आमच्या ऐकीव माहीती नुसार लॅटीन रोमन साम्राज्यात उदयास/ भरभराटीस आली .... तोवर ग्रीकांचे सारे प्रस्थ संपले होते .

होय, बरोबरे, फक्त ग्रीक वा लॅटिन भाषा भारतात शिरकाव होण्याचा एकमेव पॉसिबल रूट सांगितला इतकेच. त्यातही ग्रीकांनी लॅटिनला हिंगललं नाही हे आहेच म्हणा- यद्यपि रोमनांनी ग्रीक म्हणजे लै भारी असे समजून त्यांन बरेच पेट्रनाईझ केले.

क्षत्रपांना केवळ ग्रीक वंशाचे ठरवणे चुकीचे आहे. मध्य आशियातील ह्या रानटी शकांच्या टोळ्या. ग्रीकांबरोबरच पर्शियन आणि कुशाणांनीही ह्यांना आपल्या प्रांतावर अधिकारी म्हणून नेमले.
ह्या धर्मविहीन, चंचल टोळ्या जिथे जातील तिथले धर्म आपलेसे करून राहत असत.

अगदी सहमत. केवळ ग्रीक नव्हतेच, पण काहीजण ग्रीक होते. शिवाय वायव्य भागात इंडोग्रीक राजेही होतेच. त्या 'ग्रेको-लॅटिन' कल्चरशी दूरान्वयानेही संबंध असलेल्या जमातीचा भारतातला व्याप किती होता इतकेच फक्त सांगायचे आहे.

प्रचेतस's picture

19 Nov 2014 - 4:58 pm | प्रचेतस

ते आहेच.
बाकी ह्या क्शत्रपांबद्दल जितके लिहावे तितके कमीच.
इतकेच काय शालिवाहन शकाची जी कालगणना आज प्रचलित आहे ती ह्या शकांमुळेच. कुशाणांनी सुरु केलेली ही कालगणना प्रचलित ठेवली ती ह्या क्षत्रपांनी.

बॅटमॅन's picture

19 Nov 2014 - 5:28 pm | बॅटमॅन

अगदी सहमत!

स्वप्नज's picture

19 Nov 2014 - 4:33 pm | स्वप्नज

>>>>> (स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४
ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा)<<<<

लय भारी.... हसणारी स्माइली

चिगो's picture

19 Nov 2014 - 4:56 pm | चिगो

धन्यवाद, बॅटमॅनराव..

लॅटिनचा प्रभाव असायला भारतात रोमराज्य कधीच नव्हते. (स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४ ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा)

=)) हे भारीच !

आता एक उपप्रश्न : "संत" ही उपाधी "श्री", "मिस्टर", "मिस" सारखी नावापुढे लावण्याची पद्धत भारतात आधीपासून होती की ती फारीनरांकडून उचलण्यात आली? (खरंतर हाच मुळ मुद्दा होता, पण हुकला नेम च्यामारी.. ;-) )

बॅटमॅन's picture

19 Nov 2014 - 5:28 pm | बॅटमॅन

"संत" ही उपाधी "श्री", "मिस्टर", "मिस" सारखी नावापुढे लावण्याची पद्धत भारतात आधीपासून होती की ती फारीनरांकडून उचलण्यात आली?

रोचक प्रश्न आहे. संत हा शब्द जुन्या काळापासून वापरात असला तरी उपाधी म्हणून लावण्याची प्रथा नवीन असावीसे वाटते. पण नक्की माहिती नाही, पाहिले पाहिजे.

आता एक उपप्रश्न : "संत" ही उपाधी "श्री", "मिस्टर", "मिस" सारखी नावापुढे लावण्याची पद्धत भारतात आधीपासून होती की ती फारीनरांकडून उचलण्यात आली? (खरंतर हाच मुळ मुद्दा होता, पण हुकला नेम च्यामारी..

अरेच्चा! हा मूळ प्रश्न होता होय? आणि इथे चर्चा संस्कृत-लॅटीन-ग्रीक-अरब झालच तर पुना ओक इथपर्यंत फिरून आली! ;)

माझ्या मते, नावाआधी उपाधी लावण्याची पद्धत मूळातच भारतीय नाही. भारतात उपाधी ही नावानंतर लावतात. म्हणून तुकारामांना "संत तुकाराम" असे म्ह्णीत नसावेत. मात्र त्यांना "तुकारामबुवा" म्हणीत असण्याची शक्यता जास्त.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Nov 2014 - 5:58 pm | डॉ सुहास म्हात्रे

(स्वातंत्र्योतर काळात काही काळ होते अन मे २०१४ ला खालसा झाले असे म्हणतात तो भाग वेगळा)

 अत्याधुनिकैतिहासाचार्य वाघूळगुरुजींचा विजय असो !

बॅटमॅन's picture

19 Nov 2014 - 4:20 pm | बॅटमॅन

लेखात दिलेली अन्य शब्दसाधर्म्याची उदाहरणेही मुळात त्या भाषा एकसारख्या असण्याचाच परिणाम होत. संस्कृत आणि लॅटिनने परस्परांवर प्रभाव टाकलेला नाहीये.

कपिलमुनी's picture

19 Nov 2014 - 4:36 pm | कपिलमुनी

आता कुटं काडी टाकल्याली लगीच विझवून ग्येला

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Nov 2014 - 6:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

आत्ता ! इंडो-युरोपियन प्रोटो-ल्यांगवेज नावाच्या आयीचं आयकून आयकून तिच्या पोरी-नाती-पनती येकसारकं नाय बोलनार क्का ? ;)

बॅटमॅन's picture

19 Nov 2014 - 6:07 pm | बॅटमॅन

अगदी अगदी!!! :)

धाग्याचं नाव वाचल्यानंतर राम पालाबाबत काही आहे का काय असं वाटलेलं. पण धागालेखकाचं नाव पाहिल्यावर कुतुहल जागं झाअलं नि धागा उघडला. प्रतिसाद वाचून मिळालेल्या माहितीनंतर बॅट्या, वल्ली आणि इतर माहितगारांना (आयडी नव्हे) एक पार्टी लागू झाली. :)

प्रगो, इए नि चिगो ह्यांचं नाव नुसतं माहितगार म्हणून न थांबता विशेषत्वानं घेतोच. ;)

या दोघांना एखादे खापर सापडले की तिकडे खोदून खोदून आख्खे मोहनजोदडो बाहेर येते आणि धाग्याचा गुत्ता करणारे मागच्यामागे पळ काढतात .

प्यारे१'s picture

19 Nov 2014 - 6:37 pm | प्यारे१

+१११. अगदी अगदी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Nov 2014 - 6:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

सॉलिड ! डोळ्यासमोर चलत्चित्र उभे केलेत :)

विवेकपटाईत's picture

19 Nov 2014 - 7:38 pm | विवेकपटाईत

मानव आफ्रीकेतूनच भारत आणि युरोपात गेला. काही सरळ गेले काही भारताच्या मध्य आशिया मार्गे गेले. त्या मुळे मानवीय भाषेच्या विकासात अनेक समानार्थी किंवा समान शब्द विभिन्न भाषेत सापडणे साहजिक आहे. त्या मुळे कुणाची भाषा जास्त जुनी किंवा जास्त श्रेष्ठ ठरत नाही. या चर्चा व्यर्थ आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

19 Nov 2014 - 7:44 pm | प्रसाद गोडबोले

त्या मुळे कुणाची भाषा जास्त जुनी किंवा जास्त श्रेष्ठ ठरत नाही.

असं कसं असं कसं ? कंची भासा स्रेस्ट यावर वाह व्हयलाच पायजेल येकदा ...

श्रेष्ठपणाची चर्चा व्यर्थ आहे, मात्र जुनी भाषा कुठली ही चर्चा व्यर्थ नाही. तसे वैयर्थ्य काढावयाचे असेल तर कुठल्या ना कुठल्या कलमाखाली प्रत्येक गोष्टच व्यर्थ आहे असे म्हणता येईल.

चिगो's picture

19 Nov 2014 - 9:31 pm | चिगो

त्या मुळे कुणाची भाषा जास्त जुनी किंवा जास्त श्रेष्ठ ठरत नाही. या चर्चा व्यर्थ आहेत.

चर्चा व्यर्थ असेलही.. पण श्रेष्ठ-कनिष्ठतेचा प्रश्न कुठून आला? मला कुतूहल वाटले म्हणून हा प्रश्न विचारला..

सहजच : आसामात आधी शैवांचे प्राबल्य होते. १६-१७व्या शतकात श्री शंकरदेवांनी तिथे वैष्णव धर्माचा प्रसार केला. त्यांनी महाराष्ट्रात भरपुर भ्रमण केले आणि "भक्ती चळवळी"चा त्यांच्यावर प्रभाव होता, असे म्हणतात. कदाचित त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी मराठीतले समानार्थी शब्द अहोमियात पेरले असावेत. म्हणूनच अख्खा मध्य आणि पुर्व भारत पार केल्यावर आसामात मराठी-समान शब्द आढळतात. किंवा उलटेही असेल. आता ह्यातही लगेच मराठी विरुद्ध अहोमिया येणार का?

माहितगार's picture

19 Nov 2014 - 9:57 pm | माहितगार

+१

पैसा's picture

19 Nov 2014 - 10:24 pm | पैसा

मस्त धागा आणि प्रतिसाद!

स्वाती दिनेश's picture

21 Nov 2014 - 3:53 pm | स्वाती दिनेश

पैसा सारखेच म्हणते,
स्वाती

मुक्त विहारि's picture

19 Nov 2014 - 10:41 pm | मुक्त विहारि

धन्यवाद....

संतांकडून शून्याकडे तरीही असा मीच श्रेष्ठ.

अमेरिकन त्रिशंकू's picture

20 Nov 2014 - 2:31 am | अमेरिकन त्रिशंकू

भारतीय गणित, संख्या आणि शून्य आणि बक्षाली मॅन्युस्क्रिप्ट यावरचे हे दुवे बघा

http://www-history.mcs.st-and.ac.uk/HistTopics/Indian_numerals.html
http://www-history.mcs.st-and.ac.uk/HistTopics/Zero.html
http://www-history.mcs.st-and.ac.uk/HistTopics/Bakhshali_manuscript.html

वा!मजा अाली . बर्याच दिवसांनी वल्ली अाणि बॅट्याची जुगलबंदी वाचायला मिळाली.माहितीत भर पडली.मस्त धागा,प्रतिसाद सर्वच.

प्रमोद देर्देकर's picture

20 Nov 2014 - 8:50 am | प्रमोद देर्देकर

नेहमी प्र्माणे श्री बॅटमन अणि आणि वल्लीशेठ यांचे माहितीपुर्ण प्रतिसाद.
बाकी चिगो हे मिस्टर", "मिस" या उपाधी विषयी मला वाटतं मी स्व. राजीव दिक्षीत यांच्याकडुन काहीसे स्पष्टीकरण ऐकले होते.

काळा पहाड's picture

20 Nov 2014 - 1:33 pm | काळा पहाड

चला आता देवता आणि deity खेळूया.

चिगो's picture

20 Nov 2014 - 3:38 pm | चिगो

मला "संत" ही पदवी "सेंट" सारखी नावासमोर लावण्याबद्दल शंका होती. मी विचारली. तुम्ही तुमचा खेळ खेळु शकता. रच्याकने, देवता आणि deity मध्ये मला फार समानता वाटत नाही.. चालु द्या..

बॅटमॅन's picture

20 Nov 2014 - 4:14 pm | बॅटमॅन

देव आणि deus, dei हेदेखील संत आणि सेंट प्रमाणेच आहेत.

प्रसाद गोडबोले's picture

20 Nov 2014 - 4:38 pm | प्रसाद गोडबोले

पन मग स्रेस्ट कोन ? :D

तुम्हाला स्रेस्ट कोण पायजे ते सांगा, अलम दुनियेत ते आणि तेच स्रेस्ट हायेत ह्ये समजावून सांगू आपण, हाकानाका.

टवाळ कार्टा's picture

20 Nov 2014 - 7:19 pm | टवाळ कार्टा

=)) =)) =))

प्रसाद गोडबोले's picture

20 Nov 2014 - 7:24 pm | प्रसाद गोडबोले

तुम्हाला स्रेस्ट कोण पायजे ते सांगा,

>>>
आमी नार्शिशिष्ट हावोत :D

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Nov 2014 - 7:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

मंग ठरलं तर, तुमीच आक्क्या जगात सर्वस्रेस्ट ! :)

(मात्र तुमाला कोणी पर्तीस्पर्दी आसला / निगाला तर तुम्च तुमी सांबाळून घ्या. आमी चाल्लो ;) )

प्रसाद गोडबोले's picture

20 Nov 2014 - 7:41 pm | प्रसाद गोडबोले

मग ठरलं तर, तुमीच आक्क्या जगात सर्वस्रेस्ट !

>>> हिप हिप हुर्रे !!

(मात्र तुमाला कोणी पर्तीस्पर्दी आसला / निगाला तर तुम्च तुमी सांबाळून घ्या. आमी चाल्लो Wink )

इतं मिपावरच येक लई जबरी परतीस्पर्दी हाय त्येवडे सोडले तर बाकी आमाला सांबाळायला जड न्हायीत ... :D

माहितगार's picture

20 Nov 2014 - 4:52 pm | माहितगार

मूळ शब्द गो तीच झाली आमची गोमाता तीच दूध लै ग्वाड म्हणून लोक गोमातेस म्हणू लागले गोड>गॉड, काही लोक गाईच्या दूधाला म्हणू लागले गोडेओ आणि गोडईई त्यातल्या गो चा लोप झाला डेओ व डेई झाले.

आम्ही खेळलो, आता तुमची बारी :)

बॅटमॅन's picture

20 Nov 2014 - 5:51 pm | बॅटमॅन

इतरांना केवळ माहितीने गार करणारा तो माहितगार हा समास सार्थ ठरवलात बघा.

(प्रेरणा: एका श्लोकात समोरच्याचा बोर्‍या वाजवणारा कवी म्ह. भास्करभट्ट बोरीकर- गाळीव इतिहास बाय पु.लं.)

माहितगार's picture

20 Nov 2014 - 7:01 pm | माहितगार

इतरांना केवळ माहितीने गार करणारा तो माहितगार हा समास सार्थ ठरवलात बघा.

गार हा शब्द आईस एज मध्ये गोर पासून तयार झाला असावा म्हणून एस्कीमोही गेर शब्द वापरतात म्हणे माहितगेर चे मग गार गार माहितगार झाले असावे ! :)

क्या बात है! नवीन माहितीकरिता गारगार धन्यवाद!

नाखु's picture

21 Nov 2014 - 12:29 pm | नाखु

सल्ला देऊन "गार" करणारा तो सल्लागार किंवा गार (पार फाफल्यावर) झाल्यावर सल्ला देणारा तो सल्लागार
या धर्तीवर वरील शब्द्-उकल रोचक आणि स्प्रुहणीय आहे.

तिमा's picture

20 Nov 2014 - 6:28 pm | तिमा

आणि गोडईई त्यातल्या गो चा लोप झाला डेओ व डेई झाले.

कुणा फिरंग्याला वाटले की एतद्देशीय लोक बोबडे बोलतात म्हणून डेई चं झालं, डेअरी! मेरा देश महान!

आता तुकारामाचं पुष्पक विमान यायचं बाकी आहे.परदेशियांनी "आम्ही तुमच्याकडूनच सर्व शिकलो"असं एकदा प्रमाणपत्र मोदींच्या हस्ते भारतात पोहोचवलं की धाग्याची इतिश्री. अजूनही मूढ जन सर्वाचा उगम पामिरच्या पठारावर झाला असं समजून आहेत बिच्चारे.एकदा मिपाकटट्यावर या म्हणजे शमज्यावून शांगू.

चिगो's picture

21 Nov 2014 - 12:12 pm | चिगो

हा जो बहुमोल प्रतिसाद आपण दिलाय, तो माझ्यासाठी आहे का? असल्यास, इतके ग्गोड गैरसमज नका ठेऊ हो इतरांच्या अज्ञानाबद्दल. उगाच शुगर-बिगर वाढायची तुमची..

मराठे's picture

21 Nov 2014 - 9:04 pm | मराठे

शून्याच्या शोध माया (मेक्सिकोवाले) संस्कृतीत सुद्धा लागला होता. ते लोक बेस २० पद्धत वापरत.

maya numerals

शून्यासाठी शिंपल्याचं चित्र वापरत असत. एक ते एकोणीस आकडे टींब आणि रेषा वापरून दाखवत असत.

मी जेव्हा फिरायला म्हणून तिथे गेलो होतो तेव्हा जगातले जवळ जवळ सगळेच शोध माया संस्कृतीने लावल्याचा साक्षात्कार तिथल्या गाईडने करून दिला. :) थोडक्यात काय 'माझीच लाल' संकृती सगळीकडे सारखीच !

संस्कृत आणि इतर युरोपियन भाषांमधली समानता शास्त्रीय पध्द्तीने शोधण्याचे काम १७८६ मधे भाषाशास्त्री Sir William Jones नी सुरु केले होते.त्याच्या ही आधी १७६८ मधे फ्रेंचविद्वान व ख्रिस्तीधर्म प्रचारक Gaston-Laurent Coeurdoux नी ह्या भाषासमानते बद्दल French Academy कडे काही नोंदी नमुद केल्या होत्या.त्यच्याही मागे जऊन बघितले तर गोव्यातला ख्रिस्तीधर्म प्रचारक Thomas Stephens चे १५८३ मधले एक पत्र उपलब्ध आहे ज्यात त्यानी ह्या समानतांचा उल्लेख केलाय.ह्या सर्वाची परीणीती पुढे the theory of Indo-European linguistics मधे झाली. ज्यामधे प्रसिध्द जर्मन भाषाशास्त्री Franz Bopp नी १९व्या शतकात केलेला भाषांच्या व्याकरणाचा तुलनात्मक अभ्यास मैलाचा दगड मानला जातो.खाली काही समान शब्द दिलेत -

Root Sanskrit Word | Median Word in Latin,Greek,Arabic | English Word
Gau (meaning Cow) Bous (G) Cow
Matr (meaning Mother) Mater (L) Mother
Jan (meaning Generation) Genea (G) Gene
Aksha (meaning Axis) Axon (G) Axis
Navagatha Navigationem (L) Navigation
(meaning Navigation)
Sarpa (meaning Snake) Serpentem (L) Serpent
Naas (means Nose) Nasus (L) Nose
Anamika (means Anonymous) Anonymos (G) Anonymous
Naama (means Name) Nomen (L) Name
Manu (means First Human) ?? Man/Men/Human
Ashta (meaning Eight) Octo (L) Eight
Barbara (meaning Foreign) Barbaria (L) Barbarian
Dhama (meaning House) Domus (L) Domicile
Danta (meaning Teeth) Dentis (L) Dental
Dwar (meaning Door) Doru Door
Dasha (meaning Ten) Deca (G) Deca
Madhyam (meaning Medium) Medium (L) Medium
Kaal (meaning Time) Kalendae (L) Calendar
Kri (meaning To Do) Creatus (L) Create
Mishra (meaning Mix) Mixtus (L) Mix
Ma (meaning Me/My) Me (L) Me
Pithr (meaning Father) Pater (L) Father
Bhrathr (meaning Brother) Phrater (G) Brother
Loka (meaning Place) Locus (L) Locale
Maha (meaning Great) Magnus (L) Mega
Makshikaa (meaning Bee) Musca (L) (Meaning Fly) Mosquito
Mrta (meaning Dead) Mortis (L) Murder
Na (meaning No) Ne No
Nakta (meaning Night) Nocturnalis (L) Nocturnal/Night
Paad (meaning Foot) Pedis (L) Ped as in Pedestrial
Pancha (meaning Five) Pente (G) Penta, Five
Parah (meaning Remote) Pera (G) Far
Patha (meaning Path) Pathes (G) Path
Raja / Raya (meaning King) Regalis (L) Royal
Sama (meaning Similar) Similis (L) Similar
Sapta (meaning Seven) Septum (L) Seven
Sharkara (meaning Sugar) Succarum Sugar/Sucrose
Smi (meaning Smile) Smilen (L) Smile
SthaH (meaning Situated) Stare (L) (meaning To Stand) Stay
Svaad (meaning Tasty) Suavis (L) Sweet
Tha (meaning That) Talis (L) That
Tva (meaning Thee) Dih Thee
Vachas (meaning Speech) Vocem (L) Voice
Vahaami (meaning Carry) Vehere (meaning to Carry) (L) Vehicle
Vama/Vamati (meaning Vomit) Vomere (L) Vomit
Vastr (meaning Cloth) Vestire (L) Vest
Yauvana (meaning Youth) Juvenilis (L) Juvenile
Narangi (meaning Orange) Naranj Orange
Pippali (meaning Pepper) Piperi (G) Pepper
Chandana (meaning Sandalwood) Santalon (G) Sandalwood
Chandra (meaning Moon) Candela (L) (meaning light/torch) Candle
Chatur (meaning Four) Quartus (L) Quarter
Nava (meaning New) Novus (L) Nova – New
Kafa (meaning Mucus) Coughen Cough
Mithya (meaning Lie) Mythos (G) Myth
Thri (meaning Three) Treis (G) Three
Mush (meaning Mouse) Mus (L) Mouse
Maragadum (meaning Emerald) Smaragdus (L) Emerald
Srgalah (meaning Jackal) Shagal (Persian) Jackal
Man (meaning Mind) Mens (L) Mind
Upalah (meaning Precious Stone) Opalus (L) Opal
Vrihis (meaning Rice) Oriza (L) Rice
Upalah (meaning Precious Stone) Opalus (L) Opal
Barbar (meaning stammering) Barbaros (G) Barbarian
Jaanu (meaning knee) Genu (L) Knee
Sunu (meaning Offspring) Sunu (German) Son
Ghas (meaning eat) Grasa (German) Grass
Samiti (meaning Committee) committere (L) Committee
Sama (meaning Same) Samaz (Proto Germanic) Same
Lubh (meaning Desire) Lubo (Latin and Proto Germanic) Love
Agni (meaning Fire) Ignis (L) Ignite
Hrt (meaning Heart) Herto (Proto Germanic) Heart
Yaana (meaning journey, wagon) Wagen (German) Van,Wagon
Nara (meaning Nerve) Nervus (L) Nerve,Nervous
Prati per (L) per
Prati Shat (percent) per centum (L) percent

हुश्श दमलो राव लिहुन! बॅटमॅन साहेब, वल्ली साहेब आम्हाला पण तुमच्यात घ्या की...इतिहास अम्हाला सुध्दा फार्फार आवडतो...

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Nov 2014 - 12:43 pm | डॉ सुहास म्हात्रे

*ok*

सव्यसाची's picture

22 Nov 2014 - 12:51 pm | सव्यसाची

जबरदस्त..

पैसा's picture

22 Nov 2014 - 1:29 pm | पैसा

हे सगळे एकत्र इथे देण्यासाठी खूप धन्यवाद!

चिगो's picture

22 Nov 2014 - 3:20 pm | चिगो

आयला.. भारीये हे..

पामर's picture

22 Nov 2014 - 3:29 pm | पामर

सगळं रामायण लिहिलं पण नेमकं मुद्द्याचं विसरलो..संत व saint हे दोन शब्द व्युत्पती शास्त्रामधे (Etymology) मधे छद्म-आत्मीय (False cognates) मानले जातात. छद्म-आत्मीय शब्द म्हणजे दोन वेगवेगळ्या भाषांमधील एक सारखे किंवा एकाच अर्थाचे पण वेगवेगळे उपत्ती केंद्र असलेले शब्द.
saint हा शब्द लॅटीन Sancus ह्या प्राचिन रोमन देवतेच्या नावावरुन आलेला आहे असे मानतात. ह्याचा अर्थ पवित्र,इतरांपेक्षा वेगळा, देवाची सेवा करणारा असा आहे तर संत हा शब्द संस्कृत शब्द 'सत्'वरुन तयार झाला मानतात म्हणुन त्याचा अर्थ 'परमात्म्याची अनुभुती झालेला' असा होतो.
जगातल्या वेगवेगळ्या संबंध नसलेल्या भाषांमधले हे छद्म-आत्मीय शब्द मानवाच्या समान विकसित झालेल्या मेंदु चा व त्यामुळे विकसित झालेल्या भाषिक कौशल्याचा परिणाम मानला जातो. ह्या विषयावर दोन भाषाशास्त्रींच एक पुस्तक आहे
The Sants: Studies in a Devotional Tradition of India,Karine Schomer; W. H. McLeod (1987). ह्यात कदचित काही अजुन महिती मिळु शकेल.

अजया's picture

22 Nov 2014 - 4:39 pm | अजया

असे प्रतिसाद वाचले की मिपावर असल्याचं सार्थक झाल्यासारखे वाटते.
यावर स्वतंत्र लिखाण वाचायलादेखिल आवडेल आपलं.

माहितगार's picture

22 Nov 2014 - 4:53 pm | माहितगार

मानवाच्या समान विकसित झालेल्या मेंदु चा व त्यामुळे विकसित झालेल्या भाषिक कौशल्याचा परिणाम मानला जातो.

saint आणि संत करता लागू असू शकेल ?

मानवाची भाषा ही खुप जटिल व इतर प्राण्यांच्या मानानी खुपच अत्याआधुनिक म्हणावी लागेल. ईतकच नाही तर मानवानी इतर मानव समुहाची भाषा सुद्धा शिकुन घेण्याची क्षमता विकसित केलीये ही गोष्ट आपण सहज सोडुन देतो.मानवाचे भाषिक कौशल्य पराकोटीचे विकसित झाले आहे. तरिही मानवी भाषेमधे काही समान धागा सापडतोच!

Etymology मधे False cognate(खोटे सजातीय)शब्दांचा एक खास वर्ग आहे ज्याला नवजात-बालकांची भाषा (Lallname)म्हणतात. मानवी बाळं जन्माला आल्यावर काही विशिष्ट आवाज काढतात जे जगाच्या पाठीवर कुठेही खुपच सारखे असतात हे निरिक्षण रशियन भाषाशास्त्री Roman Jakobson नी १९६२ मधे नोंदवलं.त्यालाच तो mama and papa class म्हणतो.जगातल्या बहुतेक सर्व प्राचीन व प्रचलीत भाषांमधे मा,माँ,ममा,ममी,मातृ,मदर इ. शब्द आई साठी व पा,पापा,अप्पा इ.शब्द वडिलांसाठी वापरले जातात.

ह्यात अजुन एक गम्मत आहे.बाळांच्या बोलण्यात येणारे शब्द दरवेळी सारखेच मानले जातिल असे नाही. उदा.जुन्या जापानी मधे आईला पापा म्हणतात आणि स्लाविक मधे आजी ला बाबा म्हणतात तर ज्योर्जियन भाषेत वडिलांना मामा म्हणतात व आई ला डेडे !!

प्रचेतस's picture

22 Nov 2014 - 6:21 pm | प्रचेतस

धन्यवाद.
आपले सर्वच प्रतिसाद आवडले.

माहितगार's picture

22 Nov 2014 - 6:45 pm | माहितगार

क्षमा असावी, मानवाच्या काही नैसर्गीक उच्चारणांमुळे समान उच्चारणे समान गोष्टींसाठी होऊ शकतील नाही असे नाही. परंतु saint आणि संत ही एक सारखा अर्थ विशीष्ट एकसारखी उच्चारणे नैसर्गीकपणे होऊ शकतील या बद्दल खूपच अधिक साशंकता वाटते.

आपण थोडं याकडे वेगळ्या मार्गानी बघुयात. हे सुत्र बघुयात- अ आणि ब हे दोन शब्दांचे उच्चार व अर्थ दोन्ही साधारण समान आहेत पण त्यांची मूळ संकल्पना किंवा व्युत्पतीच्या दृष्टीकोनातुन ते वेगवेगळे आहेत तर ते एकमेकांचे false cognate (खोटे सजातीय) शब्द आहेत.
काही भाषाशास्त्री मानतात की अतीप्राचीन काळी एकच भाषा असावी व मानवाच्या स्थलांरतरा मुळे सध्याच्या सर्व भाषा तयार झाल्या असाव्यात. त्याला theory of Nostratic languages म्हणतात.पण हा जरा वादाचा विषय आहे.

आपण जगातील ईतर भाषांमधील false cognate (खोटे सजातीय) शब्द बघु -

१.English मधला aye जापानी च्या hai (はい) व चायनीज च्या hai (係) शी अफाट जुळतो.
२.पैशाच्या थैलीसाठी फ्रेंचचा caisse व ईटालियन cassa हे तामिळच्या कासु शी जुळतात.
३.तामिळमधे वडीलांसाठीचा अप्पा (அப்பா) शब्द कोरियन अप्पा (아빠) शी तंतोतंत जुळतो.
४.अरेबिक मधला 'मी' साठीचा अना (أنا) हा भारतातल्या आदिवासी गोंड जमाती पण वापरतात!
५.आफ्रिकेतल्या घाना अदिवासींच्या गा-भाषेमधे बा म्हणजे ये इकडे! तो कानडी बा (ಬಾ) शी जुळतो.
६.मँडेरिन चायनीज मधे 'she is' साठी वापरतात ता-शी (她是) आणि आयरिश मधे म्हणतात ताह-शी (tá sí)!
७.रशियनमधे आजी साठीचा बाबा (баба) शब्द जापानीमधे बाबाच आहे (祖母/ばば)
८.English मधला मारणे या अर्थीचा बीट शब्द रशियनमधे (бить) पण वापरतात
९.ऑस्टेलियाच्या उत्तर क्विंन्स्लॅण्ड प्रांतामधल्या मुळनिवासींच्या Mbabaram (बाबाराम) भाषेत कुत्र्याला 'डॉग'च म्हणायचे.(ती आता लुप्त भाषा झाली आहे) जिचा English शी कधीही संपर्क आला नाही!

*आंतर जालाचे आभार!

माहितगार's picture

23 Nov 2014 - 9:17 am | माहितगार

saint आणि संत हा मुख्य विषय आहे. अपवादावरून नियम सिद्धकरण्याच्या प्रयासात मुख्य विषय भरकटून काही तार्कीक उणीवा तर आल्या नाहीएत ना अशी साशंकता वाटते.

नाण्याच्या दुसर्‍या बाजूंचा आपणच शोध घेऊन पहा. आपल्या अर्ग्यूमेंट मधील तार्कीक उणीवांच्या संदर्भाने सवडीने मांडणी करेन.

याला म्हण्टात नॉलेज! मुद्दा सोडून सगळं सांगितलंत तरी लोक टाळ्या वाजवतायत बघा आधीच.... ;-)

(कृ. ह. घ्या. हो.)

बाकी अप्रतिम माहितीकरता धन्यवाद!!

माहितगार's picture

22 Nov 2014 - 5:47 pm | माहितगार

व्यक्तीशः मला 'सन्त' शब्दाची व्युत्पत्ती 'नत' (स्+नत = नम्रता दर्शवणे) पासून आला असण्याची शक्यता वाटते. वृद्ध/ज्ञानी व्यक्तींना मान देण्यासाठी नत होणे हि मानवी परंपरा जुनी असावी.

लॅटीन मध्येही senatus (वेगळ्या अर्थाने) असा शब्द आहे आणि senex हा शब्द वृद्ध व्यक्तींसाठी वापरला जात असावा असे दिसते.

माहितगार's picture

22 Nov 2014 - 6:50 pm | माहितगार

मी संस्कृत भाषेस सहज क्रेडीट देणार्‍यांपैकी नाही, पण saint विरुद्ध सन्त शब्दजोडीत माझ्याकडून क्रेडीट संस्कृतला !

कपिलमुनी's picture

26 Nov 2014 - 3:24 pm | कपिलमुनी

चांगला तर्क

बॅटमॅन's picture

23 Nov 2014 - 4:16 am | बॅटमॅन

रोचक!

हा तर्क नवीनच आहे. पाहिले पाहिजे.

चिगो's picture

23 Nov 2014 - 6:49 pm | चिगो

मनःपुर्वक धन्यवाद ह्या माहितीसाठी..

प्यारे१'s picture

22 Nov 2014 - 3:35 pm | प्यारे१

__/\__

यसवायजी's picture

22 Nov 2014 - 7:13 pm | यसवायजी

हुश्श दमलो राव लिहुन
नक्की??? ;)
मग Dt 23.12.13. कायाय आँ?

.खुप दिवसानी मराठी कळफलकावर लिहील म्हणुन हो दमलो..जोडाक्षर जोडता जोडता नाकी नऊ आले माझ्या

अजया's picture

22 Nov 2014 - 2:15 pm | अजया

दंतपासुन डेंटल शब्द आलाय हे मला डेंटिस्ट असून माहिती नव्हतं!

कपिलमुनी's picture

26 Nov 2014 - 3:25 pm | कपिलमुनी

मग गाडीला येणारा डेंट (dent) कुठुन आला असेल बरे ? ;)

माहितगार's picture

26 Nov 2014 - 4:14 pm | माहितगार

dent बद्दल चांगला प्रश्न विचारलात. एटीमॉनलाईनवर येथे तपासला खालील प्रमाणे व्याख्या दिली आहे. मुख्य म्हणजे लॅटीनच कनेक्श्न दिल नाहीए (लॅटीन मध्न लोप पावला ही शक्यता राहतेच तरीही) प्रोटो इंडो युरोपीयन म्हणजे संस्कृत +लॅटीनचा संयोग असल्याचा जो अविर्भाव दोन्ही भाषा समर्थकात असतो तो पुन्हा तपासण्यास अशा अधीक उदाहरणांची गरज आहे.
dent early 14c., "a strike or blow," dialectal variant of Middle English dint (q.v.); sense of "indentation" first recorded 1560s, apparently influenced by indent.

donate आणि दानत हे शब्द पहा 'नत' हा शब्द सध्याच्या प्रोटो युरोपीयन शब्द यादीत मला दिसला नाही (चुभूदे.घेणे) माझे मत तो एक प्रोटो इंडो युरोपीयन शब्दच आहे. प्रोटो इंडो युरोपीयन 'नत' म्हणजे मुलत शिकारीसाठी जाळे टाकून शरण आणणे असे काही असावे. (या 'नत/नेट' शब्दाने पुढे बर्‍यापैकी वेगवेगळ्या दिशांनी उत्क्रांती केली आहे त्या संबंधाने स्वतंत्र लेख सवडीने निहीण्याचा मनोदय आहे. माझे व्युत्पत्तींबद्दलचे लेखन काही माहिती माझा स्वतचा कॉपीराईट राखण्यासाठी हातची राखूनच करत आहे नत/नेट हिच उच्चारणे का आणि कशी आली ते माहिती देत नाहीए पण ती मला बर्‍या पैकी खात्रीशीर गवसली आहेत असे वाटते)

धर्मराजमुटके's picture

22 Nov 2014 - 10:40 pm | धर्मराजमुटके

संतांच्या वचनांचा / सुवास (सेंट) सर्वत्र दरवळला म्हणून संत प्रथम व सेंट नंतर.
आता हा saint वेगळा व तो scent वेगळा असे आम्हास समजवू नये.
काय समजलें :)

जेपी's picture

23 Nov 2014 - 6:19 am | जेपी

(सेंट मारुन पंत आणी संत ची बेमालुम भुमिका करणारा )जेपी

माझ्या मताशी सहमत असे काही संदर्भ खाली देतोय, कदाचित तिकडुन काही अधिक माहिती मिळु शकेल-

1.Gandhi's Experiments with Truth: Essential Writings by and about Mahatma Gandhi edited by Richard L. Johnson, page 290
2.Performing the Sacred: Song, Genre, and Aesthetics in Bhakti By Jacqueline Jones, page 7(footnote)
3.The Sants: Studies in a Devotional Tradition of India edited by Karine Schomer, W. H. McLeod, page 3
4.Saints and Virtues,Hawley, John Stratton, University of California Press, ISBN 9780520061637, page 57

आपल्याला ह्या उलट मत असलेले जर काही संदर्भ सापडले तर कृपया शेअर करा मला नक्की आवडेल!

वरिल सर्व पुस्तक books.google.co.in/ वर बघायला उपलब्ध आहेत!

जे एस सर्वेश्वर's picture

24 Nov 2014 - 10:08 pm | जे एस सर्वेश्वर

एक स्त्रोत असे हि सांगतो कि जेव्हा सर्व जग मागासले होते तेवा आपल्याकडे नालंदा तक्षशिला सारखी विश्वविद्यालये होती जेथून सर्व ठिकाणचे(अरब, चीन, रशिया) सारख्या देशांमधली मुले येऊन शिकत असत. त्यावेळी प्रत्येक देशातील शिकलेल्या लीकांनी त्यांच्या प्रदेशातीला बोलीभाषेत अनेक संस्कृत शब्दांची भर घातली आणि व्यापारानिमित्त अरब युरोपीय देशात गेले आणि त्यांनी संस्कृतचा त्या देशात प्रसार केला. त्यातूनच लॅटिन, ग्रीक सारख्या तत्कालीन युरोपीय भाषांचा उगम आणि विकास झाला. आणि भारतातील सर्व भाषांचे उगम हि संस्कृत भाषाच असल्याचे तुम्हाला माहित असेलच. म्हणूनच संत हा मुळात संस्कृत त्यानंतर प्राकृत आणि पर्यायाने मराठीत आलेला शब्द हाच सेंट या शब्द पेक्षा पुरातन असावा.

तुम्ही पु ना ओकांचे शिष्य का हो?

सर्वेश्वरकाका, तुमची प्रतिक्रिया वाचताना मला पु.ना.ओकांची पुन्हा पुन्हा आठवण येत होती! दरवेळी जगातल्या प्रत्येक गोष्टीं मागे ओधुन ताणुन महान प्रचीन भारतीय संस्कृती कशी असते हे फार लहानपणापासुन मला पडलेलं कोड आहे त्यावर काही अजुन प्रकाश टाकु शकाल काय?

गजानन५९'s picture

25 Nov 2014 - 1:26 pm | गजानन५९

साला परिस्थिमुळे खूप आवडणार्या इतिहास विषयापासून दूर गेलो त्याचा आज खर्या अर्थाने पश्चाताप होतोय ब्याटम्यानराव, वल्लीशेठ मले तुमचा शिष्य करून घेतव का?