आयुष्यः एक मृगचक्र!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
27 Oct 2014 - 5:50 pm

आयुष्य हे मृगजळाचे चक्रव्यूह (मृगचक्र) असते असे मला वाटते म्हणजे नेमके काय?

जे आयुष्य आपल्याला मिळते ते असते एक आभासी तात्पुरते जग...
त्यात आपण फ़क्त काही काळासाठी आलेलो असतो...
आज आपण जगण्यासाठी काम करतोय की काम करण्यासाठी जगतोय अशी स्थिती अनेक क्षेत्रात आहे. जगण्यासाठी आपण पैसा कमावातोय की पैसा कमावण्यासाठी जगतोय तेच समजत नाही.
आज जगच असे बनले आहे की आपण या आभासी कर्माच्या चक्रव्युहातून मरेपर्यंत सुटत नाही...

जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत हे जग आहे आणि आपण नाही तेव्हा जगही नाही.
निदान आपण जगातून गेल्यानंतर आपल्यासाठी तरी ते जग अस्तित्वात नसतं.
किंवा मग जगासाठी आपण अस्तित्वात नसतो!

यापैकी जे खरे असेल ते असो, पण आपण या जगात अस्तित्वात असेपर्यंत इतरांनी आखून दिलेल्या किंवा नियतीने आखलेल्या त्या चक्रव्यूहात गुरफटत जातो...
सतत हे चालू असते. चोवीस तास, सातही दिवस!
तुम्ही म्हणाल अर्धा दिवसा तर आपण झोपतो...

पण आपण का झोपतो?
अहो पुन्हा दुसऱ्या दिवशी त्याचा चक्रव्यूहाचा प्रवास पुढे चालू ठेवण्यासाठी विश्रांती मिळावी म्हणून..

काही जण तर झोपेचे तास सुद्धा कमी करतात या चक्रव्युहा साठी!!!

आणि ते सुद्धा अशा गोष्टींच्या मागे धावण्यासाठी की ज्या आपल्याला या जगाताच सोडून जाव्या लागणार आहेत हे आधीपासून माहीत असते...

तरीही त्या आपण मिळवण्यासाठी धडपड करतो..
नाही केली तरी हे जग आणि त्यातले लोक आणि त्यांचे नियम हे सगळे आपल्याला तसे करायला भाग पाडते...
म्हणजे मृगजळा च्या मागे धावायला भाग पाडते...
त्या चक्रव्यूहात गुरफ़टायला भाग पाडते...

काही जण चक्रव्युहाच्या ध्येयापर्यंत म्हणजे मृगजळापर्यंत पोहोचातात...
काही वाटेतच हार मानतात...
काही तेथे योग्य वा अयोग्य मार्गानी पोहोचतात...
तर काहीजण चक्रव्युहाची रचनाच बदलायला निघतात...
यातून सुरु होतो जीवघेणा प्रवास, जीवघेणी स्पर्धा..एकमेकांचा छळ किंवा वापर....!!!

मग ते एकमेकांचे मित्र, ऑफिस मधले सहकारी, बॉस असोत की मंत्री, कार्यकर्ता, सामान्य जनता असो की मग पती पत्नी, बहिण भाऊ, मुलगा सून जावई सासू सासरे असो...

सगळेच धावत आहेत त्या आपापल्या मृगजळा च्या मागे!!

राहणीविचार

प्रतिक्रिया

प्रसाद१९७१'s picture

27 Oct 2014 - 5:58 pm | प्रसाद१९७१

कोणी मराठी मधे अनुवाद करेल का ह्या लेखाचा?

अत्रन्गि पाउस's picture

27 Oct 2014 - 6:01 pm | अत्रन्गि पाउस

++++१

निमिष सोनार's picture

27 Oct 2014 - 6:01 pm | निमिष सोनार

जोक आवडला

जेपी's picture

27 Oct 2014 - 6:04 pm | जेपी

*boredom*

पिंपातला उंदीर's picture

27 Oct 2014 - 6:16 pm | पिंपातला उंदीर

अरे भई कहना क्या चाहते हो

टवाळ कार्टा's picture

27 Oct 2014 - 6:39 pm | टवाळ कार्टा

midlife crisis???

वरील सर्वांशी सहमत. लेख वाचला तेव्हा अगदी हेच प्रश्न मनात आले होते.

निमिष सोनार साहेब, ह.घ्या.

काकाकाकू's picture

27 Oct 2014 - 6:48 pm | काकाकाकू

भावना पोहोचल्या. परंतू या चक्रव्युहामधून जिवंतपणी बाहेर पडण्याचा मार्ग अजूनतरी कोणालाच कळलेला नाही. मग त्याचा त्रागा करण्यात शक्ति कशाला घालवा?

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 7:03 pm | सतिश गावडे

छान गोल गोल लिहिलं आहे. मी अकरावीला वगैरे असताना अशाच कविता लिहित असे.

जेपी's picture

27 Oct 2014 - 7:21 pm | जेपी

छान गोल गोल लिहीलय

सगा जिलबी मनायच हाय का ?

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 8:31 pm | सतिश गावडे

तुम्हाला त्यातून जिलबीचा बोध होत असेल तर ते तसे नाही.
माझा रोख कवीच्या "आयुष्य हे चक्रव्युहाप्रमाणे गोल आहे" या तत्वज्ञानाकडे होता.

अत्रुप्त आत्मा's picture

27 Oct 2014 - 9:22 pm | अत्रुप्त आत्मा

@माझा रोख कवीच्या "आयुष्य हे चक्रव्युहाप्रमाणे गोल आहे" या तत्वज्ञानाकडे होता.>>> =))

आजूबाजूचे एकमेकांच्या तोंडाकडे बघायचे... तसंच काहीसं चाललंय इथे !

आदूबाळ's picture

27 Oct 2014 - 8:35 pm | आदूबाळ

पण आपण का झोपतो?

या प्रश्नाचं उत्तर मात्र मला मिळालं...

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 8:40 pm | सतिश गावडे

आम्हाला पण सांगा ना. प्लिज...

पहिल्यापासून या वाक्यापर्यंत धागा वाचत आलो. मग... (अ आ फेम स्मायली)

विवेकपटाईत's picture

27 Oct 2014 - 9:27 pm | विवेकपटाईत

वर्तुळाचे दुसरे टोक सापडत नाही त्या प्रमाणेच आयुष्य आहे, केंव्हा काय होईल सांगता येत नाही. चार्वाकचा आदर्श समोर ठेऊन जागा. मस्त मजा येईल.

सतिश गावडे's picture

27 Oct 2014 - 9:47 pm | सतिश गावडे

>> चार्वाकचा आदर्श समोर ठेऊन जागा.
म्हणजे कसं?

निमिष सोनार's picture

29 Oct 2014 - 3:37 pm | निमिष सोनार

त्याबद्दल नीट सांगा.

मदनबाण's picture

29 Oct 2014 - 4:51 pm | मदनबाण

निमिषराव मी काय म्हणतो... कशाला उगाच टकुर्‍याला त्रास करुन घ्यावा ? निमिषा मधे जग बदलत ! कशा कशाचा इचार करुन राह्यचा ? सो चील माडी !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Global consumer confidence improves, India most bullish - Nielsen