परिपूर्ण एकटेपणा

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in जनातलं, मनातलं
22 Sep 2014 - 5:51 pm

जी ए कुलकर्णी यांच्याबद्दल आणि त्यांच्या एकांतप्रियतेबद्दल बद्दल अनेक कथा ऐकल्या आहेत . मुंबई पुणे सारखी जागा सोडून त्यांनी धारवाड या छोट्या जागी राहणे पसंद केले . त्याना भेटायला अनेक लोक राज्याच्या कानाकोपर्यातून यायची . त्यांना ते फारस आवडायचं नाही . म्हणून ते बाजूला खेळणाऱ्या मुलाला बोलावून त्याला घराला बाहेरून कुलूप लावायला सांगत आणि स्वतहा आत बसून राहत . एका creative genius ची फ़क़्त एक लहर म्हणून त्याकडे बघतात का ? मुळात तुमचा हक्काचा एकांत मिळवण्यासाठी तुम्हाला जी ए सारख creative genius असणेच आवश्यक आहे का ? अनेकदा १० ते ५ नौकरी करणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या लोकांची पण ती गरज असतेच की . हि गरज दाबून बहुतेक लोक जगतात .

मी एका nuclease मध्यमवर्गीय कुटुंबातल अपत्य . एकुलता एक मुलगा . आई बाबा दोघेही नौकरीला . त्यामुळे मला लहानपणा पासूनच एकटे राहावे लागले . पण माझ आणि एकटे पणाच भन्नाट जुळून आल . एकटे पणा आणि त्यातून येणार स्वातंत्र्य मला जाम आवडल . नंतर नंतर तर मला आजू बाजूच्या गर्दीचा जाचच होऊ लागला . शाळेतून पटकन घरी पटकन कधी येतो अस मला व्हयाच . फ़क़्त गणित आणि विज्ञान मध्ये चांगले मार्क येणे म्हणजे हुशार अश्या भंपक कल्पना असणाऱ्या शाळेत असाही जीव घुसमट करायचा . नंतर शिक्षणासाठी बाहेर गावी आल्यावर मी होस्टेल मध्ये राहायला लागलो . पण एका रूम ची एवढी छोटी जागा ३ लोकांनी शेयर करायची हि कल्पना मला रानटी वाटली . म्हणजे तुम्ही कधीही काहीही करत असलात तर किमान चार डोळे , दोन खिडक्या आणि एक दरवाजा ते बघत असतो हे मला तरी inhuman वाटायचं . मुंबई मधल्या लोकल प्रवासासारख . होस्टेल मध्ये बरीच धमाल केली असली तरी मी माझी स्पेस कायम मिस करायचो . जेंव्हा मला पहिला जॉब मिळाला तेंव्हा मी लगेच flat भाड्याने घेतला . आणि तिथे एक टीवी . माझ्या पगाराचा निम्म्याहून जास्त हिस्सा भाड देण्यात जायचा पण प्रत्येकाला आपली स्पेस घेण्याची किंमत चुकवावी लागते .

आतापर्यंत माणुसघाणा म्हणून माझी बर्यापैकी बदनामी झाली होती . नातेवाईक 'तू आमच्याकडे येतच नाहीस ' म्हणून माझ्या नावाने ओरडायचे . पण सगळ्या नातेवाईक नि जमून काही धार्मिक विधी करायचे , एकमेकांची package विचारायची , कुणाची एकाची ठरवून क्रूर पणे खेचायची आणि इतर बर्याच निरर्थक गोष्टी फ़क़्त पिढ्यान पिढ्या चालू आहेत म्हणून करायच्या या गोष्टीं मध्ये मला रस नव्हता . म्हणजे मी एकटा असताना काही भव्य दिव्य करायचो अशातला भाग नाही पण मला माझी पुस्तक , माझा टीवी , आणि माझा परिपूर्ण एकटे पणा जास्त आवडायचा . आम्ही मित्र ट्रीप ला गेलो कि २ दिवस तरी घरापासून दूर राहायचो . तेंव्हा पण मित्रांसोबत धमाल करून झाली की मी एक तास तरी beach वर माझ एकटेपणा शोधण्यासाठी निघून जायचो .

लग्नानंतर माझ्या या मनमुराद एकटेपणावर गदा आली . तेंव्हा पण माझी बायको आणि मी बसलो असताना मध्येच laptop उचलून मधल्या खोलीत निघून जायचो . बायको च्या चेहऱ्यावरचे हिरमुसलेले भाव अजून पण कधी कधी मला guilt देतात . नंतर नंतर या एकटे पणा पायी मी माझ्या जवळच्या मित्राना अतिशय क्रूर पणे कटवायला लागलो . आणि माझी मला च या अतिरेकाची जाणीव झाली . आणि मी माझ्यात थोडे बदल केले . पण ते फ़क़्त जवळच्या लोकांसाठीच .

आपल्या समाजात एकटे राहण्याबद्दल आणि हक्काने स्वतःची स्पेस घेण्यार्या लोकांबद्दल काही जबरी गैरसमज आहेत . म्हणजे एखादा माणूस एकटा राहात असेल तर आजू बाजू च्या लोकाना ह्याच्या आयुष्यात काही तरी tragedy असेल असा समज होतो . म्हणजे एकट राहणे हे by choice असूच शकत नाही अस काही वाटत असेल काय ? स्वतःच्या स्पेस बद्दल भारतीय समाजा इतका उदासीन समाज दुसरा नसेल . आपल्या लोकाना कायम उत्सवप्रिय , गलबल्यात राहाण्याच brainwashing झाल असत कि काय असा प्रश्न पडतो . म्हणजे खूप लोक परिस्थितीमुळे (आर्थिक आणि सामाजिक ) स्वतःची स्पेस नाही घेऊ शकत हे मान्य पण ज्याना शक्य आहे ते पण आपली मुलभूत गरज पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात का हा प्रश्न आहे . आपण एकटे झालो म्हणजे समाजाच्या सुरक्षा चक्राबाहेर आलो . आपण लोकाना भेटायला नाही गेलो तर आपल्याला प्रसंगात कुणी येणार नाही या भावनेने अनेक लोक आपली स्पेस नाकारून पुन्हा लोकांच्या घाण्यात इच्छा नसताना घुसतात (वैयक्तिक sample survey मधून काढलेला निष्कर्ष : त्यामुळे बरोबर असेलच याची खात्री नाही ) एकटे राहणे ज्या समाजाच्या चौकटीत बसत नाही तिथे आपण misfit आहोत हि भावना कधी कधी बळावते . सतत स्वतःची स्पेस नाकारण्याचे काही वैयक्तिक / सामाजिक परिणाम होऊ शकतात का ? आपल्या समाजात स्वतःची स्पेस घेणाऱ्या लोकांवर ठप्पे मारणे समाज थांबवेल का ?
समाज नावाच्या जनावराशी मुकाबला करणे मुळातच अवघड . झु मधल्या प्राण्यांसारखे compartment करून श्रेण्या देणाऱ्या समाजात तर ते अजूनच अवघड .

मुळात स्पेस ची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असते . वयाच्या तिसाव्या वर्षी माझी स्वतःची एक व्याख्या आहे ( ३ वर्षापूर्वी ती drastically वेगळी होती ) माझी व्याख्या विचाराल तर एक आळशी दिवस . कुठेही जायचे नाही . कुणीही येणार नाही . फ्रीज मध्ये २ बियर आहेत . घरात कुणी हि नाही . अगदी बायको पण नाही . टीवी चालू आहे . नेट पण एकदम फास्ट चालू आहे . वेळ दाखवणाऱ्या सगळ्याच साधनांमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे . आणि मनमुराद एकटेपणा प्यायचा आहे . कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये . मस्त पैकी कुठला तरी nostalgia आहे सोबतीला . बस्स . अजून काय पाहिजे .

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

उगाच जास्त प्रतिसाद देऊन इथली 'स्पेस' अडवत नाही. :-)

(कृहघे)

आदूबाळ's picture

22 Sep 2014 - 6:03 pm | आदूबाळ

असं कसं दादा असं कसं?

टीव्ही आहे इंटरनेट वापरायचंय म्हणजे एकटेपणा नाही.

आजानुकर्ण's picture

22 Sep 2014 - 6:19 pm | आजानुकर्ण

टीव्ही आहे इंटरनेट वापरायचंय म्हणजे एकटेपणा नाही.

+१. सहमत. जितकं लिहिलंय त्यावरुन तुम्हाला लॅपटॉपवरील सोशल साईट्सवर भेटणारे मित्र हवेसे वाटताहेत व आईवडील-बायको यांची सोबत नकोशी वाटते आहे असं दिसतंय

प्यारे१'s picture

22 Sep 2014 - 6:35 pm | प्यारे१

+२

पिंपातला उंदीर's picture

22 Sep 2014 - 7:35 pm | पिंपातला उंदीर

तस नाही . नेट वर असणे म्हणजे सोशल networking site वर असणे च अस काहीस गृहीत धरत आहात का ? आणि सोबत नकोशी वाटत नाही . पण सगळ्यांपासून एका ठराविक वेळेने ब्रेंक मात्र घ्यावासा वाटतो

खरंच की...नेट आणि टिवी चालू ठेवून एकटेपणा कसा जपणार?

मृत्युन्जय's picture

22 Sep 2014 - 6:03 pm | मृत्युन्जय

पटतय पटतय अगदी पटतय. मला सण समारंभा, मित्रांच्या भेटीगाठी इत्यादी प्रचंड आवडते. पण मला हा पर्सनल माझा स्वतःचा वेळ सुद्धा अतीप्रिय आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Sep 2014 - 6:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

खयाल अपना अपना !

मला अनोळखी जागेतल्या अनोळखी लोकांच्या गर्दीत केलेल्या भटकंतीत मजा वाटते. तसेच, दम्मामला कधीकधी एकटा असताना कित्येक विकांताना कामावरून बुधवारी संध्याकाळी ५ वाजता परतल्यावर बंद केलेला फ्लॅटचा दरवाजा (फक्त टिव्ही आणि आंतरजालाच्या सोबतीत काढलेल्या ६२ तासांनंतर) परत कामावर जायलाच शनिवारी सकाळी ७ वाजता उघडला आहे. त्यातही मजा होती.

गर्दीने भरलेल्या शहरांच्या मुख्य रस्त्यावर भटकायला मजा आली, तेवढीच मजा उघड्या आकाशाखाली भ्रमणध्वनीच्या लहरी पोचू शकणार इतक्या खोलवर वाळवंटात रात्र काढतानाही आली.

कोणतेही एकच टोक पकडण्यापेक्षा जीवनातल्या विविधतेच्या रंगपटाची मजा घ्यायला मला आवडते.

पिंपातला उंदीर's picture

22 Sep 2014 - 7:36 pm | पिंपातला उंदीर

To each his own : )

बहुतांशी सहमत आहे. एकटेपणाची मलाही प्रचंड आवड आहे. पण आपला समाज एकुटघाणा आहे, त्याला हे कधी झेपणार नाही.

साती's picture

22 Sep 2014 - 7:09 pm | साती

एकुटघाणा समाज शब्द छान आहे.
पण समाज म्हटला की एकुटघाणाच असायला हवा ना!

पण समाज म्हटला की एकुटघाणाच असायला हवा ना!

असं नाय वाटत ओ. विरोधाभास पायजेच असं जरूरी नाय वाटत.

पिंपातला उंदीर's picture

22 Sep 2014 - 7:37 pm | पिंपातला उंदीर

अगदी अगदी

सुबोध खरे's picture

22 Sep 2014 - 6:40 pm | सुबोध खरे

अमोल साहेब
एखाद्या समुद्रकिनारी एकटे राहायला जा.
आपल्याला बोलायला माणूस नाही, टीव्ही, रेडियो, अंतरजाल भ्रमणध्वनी असे काहीच नाही फक्त मोकळे आकाश आणि सभोवती पाणी असे सात दिवस काढून पहा. दिवसात तीन वेळा आपल्या जेवण खाण्याची व्यवस्था करणारा माणूस येउन जेवढ्यास तेवढे बोलेल.
असे सात दिवस काढून पहा आणि तरीही आपल्याला अशा ठिकाणी परत जावेसे वाटले तर तो खरा परिपूर्ण एकटेपणा.
(असे काही महिने थोड्या थोड्या फरकाने मी स्वतः नौदलात असताना काढलेले आहेत. यात आपल्या पायाखालचे जहाज पूर्णवेळ हलत असल्याने पोटात ढवळत असल्याचे मी म्हणत नाही)
खरया एकटेपणाचा आनंद तुम्हाला गर्दीत राहूनही स्वतःची वेगळी जागा ठेवता आली तरच उपभोगता येते अन्यथा तो एकांतवास ठरतो.

पिंपातला उंदीर's picture

23 Sep 2014 - 9:02 am | पिंपातला उंदीर

कसला भन्नाट अनुभव असेल . अजून विसकटून सांगा की

सुबोध खरे's picture

23 Sep 2014 - 10:15 am | सुबोध खरे

अमोल साहेब
माझे अनुभव परत केंव्हातरी.
पण आपण म्हणता तसे मला पण आपली स्वतः ची एक पोकळी (स्पेस) असावी हे पटते आणि त्यात थोड्याशा काळापुरते कोणीच नको. तसा मी लहानपणी खूप अबोल होतो आणि कुणाच्याही घरी गेलो कि मी पुस्तक घेऊन वाचन करीत बसे. माझा भाऊ याच्या विरुद्ध होता.(आता आम्ही दोघे उलट स्वभावाचे झालो आहोत). तेंव्हा मी तासान तास पुस्तके वाचीत एकटा बसत असे.यामुळे प्रत्येक माणसाला आपले एक आकाश असावे हे मला पटते. आणि एखाद्या वेळेस त्याला/ तिला थोडा काळ संपूर्णपणे स्वतः साठी हवा आहे हे सुद्धा मान्य आहे.( यात माझी बायको किंवा मुले सुद्धा येतात) माझी मुलगी अशी काही वेळेस एकटी असते आणि तिच्या कोशात प्रवेश केल्यास ती हळूच चिडचिड करते. मी तेंव्हा समजतो कि तिला थोडा वेळ एकांत हवा आहे.
आता मी आणि माझी बायको एकमेकांत इतके मिसळून गेलो आहोत कि आम्ही दोघेच तासन तास काय दिवसेंदिवस एकत्र राहून समाजापासून दूर राहू शकतो. पण त्यात तिसरा माणूस( आमची मुले सोडून) नको वाटतो. कदाचित आम्ही आमच्या पोकळीत एकमेकांचे अस्तित्व स्वीकारलेले आहे आमचे दवाखाने बाजूबाजूला आहेत आणि आमच्या वेळा पण सारख्या आहेत. रुग्ण आले तर त्यात वेळ जातो नाही तर आम्ही दवाखान्याच्या आजूबाजूस फिरायला जातो जर एखादे दिवशी रुग्ण फार झाले आणि आम्हाला एकमेकांशी बोलण्यास वेळ मिळाला नाही तर कसेसेच होते. चोवीस पैकी बावीस ते तेवीस तास आम्ही एकत्र असतो. तरीही अजून आम्हाला एकमेकांचा कंटाळा आलेला नाही. यामुळे कदाचित आम्ही आमच्या मित्रांपासून लांब गेलो आहोत.
पण आम्ही माणूसघाणे नक्कीच नाही.

पण लोकाना भेटायला नाही गेलो तर आपल्याला प्रसंगात कुणी येणार नाही या भावनेने अनेक लोक आपली स्पेस नाकारून पुन्हा लोकांच्या घाण्यात इच्छा नसताना घुसतात (वैयक्तिक sample survey मधून काढलेला निष्कर्ष : त्यामुळे बरोबर असेलच याची खात्री नाही ) एकटे राहणे ज्या समाजाच्या चौकटीत बसत नाही तिथे आपण misfit आहोत हि भावना कधी कधी बळावते . >>>

सहमत होतो आहे !! पण अपवाद आहेत त्यालाही ..काही लोकांचा स्वभाव असा असतो ( एकदम पाणी ) की ते असो वा नसो ते कुठल्या समाजात मस्त पैंकी मिसळुन जातात ...आणी कुठला ही अंहभाव न ठेवता ..एक उत्तम उदाहरण म्हणुन मिपावरचाच धम्या च म्हणेन ...(सध्या कुठतरी कनेटिकट मध्ये बुध्दीला धार लावतय म्हणे) ...उलट काही असतात त्यांना एक चौकटीमधल्या ( कंपु ) मध्ये रमणे पसंतच नसते, केवळ गरजे पुरत ...अगदी ओळखीच हास्य देखील रोजानं लावल्यालारख ;) ..त्यांची स्वता: चीच एक चौकट असते , ती चौकट मात्र ते कधी सोडत नाहीत :)

सतत स्वतःची स्पेस नाकारण्याचे काही वैयक्तिक / सामाजिक परिणाम होऊ शकतात का ? >>>
होतात , दुरगामी ही !! अर्थात तुम्ही जे अनुभव लिहीले आहे, म्हणजे एकांताची अनुभुती घेण्याचा प्रत्येकाचा वेगळा प्रकार/व्याख्या असु शकतो ..त्यात..सार्वजनी़क ठिकाण ही शामील असु शकते. आमचा एक मित्र असाच एखाद्या तुडुंब भरलेल्या बार मध्ये जिथुन संपुर्ण हॉल दिसेल अश्या अवस्थेत, मार्लबॉरो एक एक अख्खं पाकीट, चार ते पाच पेग स्कॉच, कानात मंजुळ स्वरात चाललेली लता असा बसायचा ...ते केले की अजुन पंधर-एक दिवस फ्रेश असायचा ..जसजसे दिवस ढळायचे ( त्या पंधरा दिवसानंतरचे ) तस-तसा चिडचिड पणा वाढायचा, मग पुन्हा आठवण झाल्यासारखा परत बसायचा :)

जाता जाता : आताच्या टेक्नो मुळे परिपुर्ण एकटेपणा मिळणे जरा दुरापास्त च आहे ...अर्थात ज्याला जसा वेळ/चान्स मिळेल, त्याने तो घेत चलावा असे माझे ठाम मत आहे :)

पिंपातला उंदीर's picture

22 Sep 2014 - 7:38 pm | पिंपातला उंदीर

@सुहास : भन्नाट प्रतिक्रिया . आवडल

लिंक द्यायची राहिली ..असा ही एक अनुभव !

http://yedchap.blogspot.in/2010/07/blog-post.html?m=1

उगा काहितरीच's picture

22 Sep 2014 - 11:01 pm | उगा काहितरीच

ब्लॉग एकच नंबर ... खुप आवडला.

कंजूस's picture

22 Sep 2014 - 7:15 pm | कंजूस

आम्ही त्यातलेच.

नाव आडनाव's picture

22 Sep 2014 - 7:35 pm | नाव आडनाव

चांगलं लिहिलंय. आवडलं. मला पण एकटेपणा आवडतो. प्रत्येकाची एकटेपणाची व्याख्या वेगळी असेल, जसं मी सोशल नेटवर्किंग साइटस वर नाही (मिसळपाव सोडून), सुटी च्या दिवशी अख्खा दिवस घरी बसणं, टीव्ही वर डॉक्युमेंटरी बघणं आवडतं. एक पण फोन नाहि आला तर सगळ्यात चांगलं.

बाबा पाटील's picture

22 Sep 2014 - 7:54 pm | बाबा पाटील

भरल्या गोकुळात नांदणारा बाबा पाटील - च्यायला चुकुन शेतीच्या सिझनला आईबाप आज्जी आणी माझ्या लेकींसह जर पुण्यातुन गावाला गेले तर आम्ही दोघही नवरा बायको त्या बंगल्यात पाउल ठेवत नाही राव . माणस अशी माणुसघाणी कशी असु शकतात ? एकदा तर असेच आई दादांची आठवन आली म्हणुन पहाटे चार वाजता आम्ही नवरा बायको शेतावर जावुन पोहचलो होतो. आपल्याला तर बायकोच्या कुशीत शिरल्याशिवाय झोप लागत नाही,माणुस असा एकटा कसा राहु शकतो ?

बॅटमॅन's picture

22 Sep 2014 - 7:57 pm | बॅटमॅन

एकटेपणा आवडणे म्हणजे माणूसघाणेपणा काय ओ?

पण ते ज्याप्रकारे वर्णन करतायेत त्यावरुन दुसरा काय शब्द सुचतो.

पिंपातला उंदीर's picture

22 Sep 2014 - 8:10 pm | पिंपातला उंदीर

@निट वाचा कि पाटिल. अस काय करता राव

प्रभाकर पेठकर's picture

22 Sep 2014 - 8:45 pm | प्रभाकर पेठकर

बापरे! मला एकटेपणा अजिबात झेपत नाही. सतत कोणीतरी गप्पा मारायला असावे आणि मनमुराद सहवासाचा आनंद लुटावा ह्या परती जीणं नाही.

बाबा पाटील's picture

22 Sep 2014 - 8:45 pm | बाबा पाटील

तुम्ही ज्या वातावरणात वाढले त्यात तुमचा एकटेपणाच तुमचा साथीदार होता,पण आतातरी माणसात या हो,जग खुप सुंदर आहे. जगुन घ्या,न जाणो परत हा मनुष्यजन्म मिळेल न मिळेल. कधी आपल्या न बोलण्यानेही जवळची माणस तुटतात्,दुखावतात, आयुष्यात सगळ कमवता येत हो,पण माणस कमवण आणी ती टिकवन फार अवघड असत.बघा पटल तर घ्या,आपल तर असच आहे.

पिंपातला उंदीर's picture

22 Sep 2014 - 8:54 pm | पिंपातला उंदीर

पाटील तुम्हाला असे का वाटत आहे कि माझे जग सुंदर नाही ? तुम्हाला अस वाटत आहे का मला मित्र नाहीत आणि मी एकाकी आहे ? तस नाहीये . माझा अनुभव असा आहे कि मला जेवढे जवळचे लोक आहेत तितके मिळायला नशीब लागत . आपला समाज (सगळ्या गुण दोषासकट ) एकलकोंड्या लोकांची लई काळजी घेतो .

कवितानागेश's picture

22 Sep 2014 - 8:45 pm | कवितानागेश

हम्म्म..
एकटं- फक्त स्वतःबरोबर रहायला छान वाटतं हे अगदी खरं आहे.
पण मी तर एकटेपणाची फार सवय लागू नये म्हणून नेट वापरते. :)

माम्लेदारचा पन्खा's picture

22 Sep 2014 - 10:44 pm | माम्लेदारचा पन्खा

स्वभावाला औषध नसते... अमोल यांच्या बाबतीत तरी असं वाट्तंय की एका अर्थाने लादलेला एकटेपणा सुसह्य करण्यासाठी त्यांनी स्वभावाला एवढी मुरड घातलेली दिसते की तोच एक वेगळा स्वभाव बनलाय त्यांचा...वाईट काही नाही त्यात पण जर जवळच्यांना त्याचा त्रास होत असला तर पुन्हा जाणीवपूर्वक बदलायला हरकत नाही...कारण आता एकटे पडायची भीती नाहीये...

चित्रगुप्त's picture

22 Sep 2014 - 11:56 pm | चित्रगुप्त

लेखन आवडले.
मला स्वतःला एकटेपण प्रचंड आवडते. रात्री वा अगदी पहाटे तीनेक वाजता गच्चीवर अंधारात अगदी काहीही न करता नुस्ते बसून राहण्यातला आनंद मी अनेकदा उपभोगत असतो.

कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये

...कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हीही कुणाला जज करत नाहीये ... असे हवे होते ना ?

विलासराव's picture

22 Sep 2014 - 11:59 pm | विलासराव

मी तर परीक्रमेवरुन घरी आल्यावर २०-२१ दिवस घराबाहेर पडलोच नव्हतो. नेट असुनही विशेष वापरले नव्ह्ते. १-२ पुस्तके वाचली, खाणे-पिणे आन झोपा काढणे एवढाच कार्यक्रम होता.

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 8:46 am | पिवळा डांबिस

धागा उत्तम आणि आवड ज्याची त्याची...
त्याबद्दल आक्षेप नाही.
पण एकटेपणाची जर इतकी आवड आहे तर लग्न कशाला केलं?
तिला तुमच्या आवडीची शिक्षा का?
आणि त्याहून महत्वाचा प्रश्न...
उद्या दोन पोरं झाल्यावर मग तुमच्या एकटेपणाबद्दल काय करणार आहांत?

माम्लेदारचा पन्खा's picture

23 Sep 2014 - 9:05 am | माम्लेदारचा पन्खा

असेच म्ह्णतो..

पैसा's picture

23 Sep 2014 - 10:44 am | पैसा

संपूर्ण सहमत आहे. खाजगी गोष्तीत नाक खुपसतेय असं वाटेल, पण आपल्याला पाहिजे तेव्हा बायकोने जवळ यावे, किंवा बोलावे अशी अपेक्षा करणे अन्याय्य आहे. तिला काय हवं आहे, तिला कधीतरी ऑफिसच्या घरच्या ताणाबद्दल बोलावंसं वाटत असेल, किंवा नुसतंच जवळपास अरहायला हवं असेल या गोष्टींचा कधी विचार करता का? तसं नसेल तर तो स्वार्थीपणा झाला. लग्न करताना तुम्ही एका जिवंत माणसाला आपल्या घरात आणलं आहे. घर साफ करणारं किंवा स्वयंपाक्पाणी, मुलं सांभाळणारं यंत्र नव्हे इतकं लक्षात ठेवलं तरी पुरे. कधीतरी तिच्या भूमिकेत जाऊन विचार करून बघा. प्रत्येक ठिकाणी मी हा असाच आहे, पटलं तर घ्या असं करून चालत नाही. तेवढी तयारी असेल तर लग्न बिग्नाच्या भानगडीत न पडता हिमालयात जाऊन रहावे. तुम्हाला नेटवरचा मानवी संपर्क हवा आहे, पण जिवंत माणसे जवळ नकोत यात काही प्रॉब्लेम आहे असे वाटत नाही का? हे सगळे कृपया पर्सनल घेऊ नये, प्रत्येक गोष्टीला एकच बाजू नसते तर आणखी अनेक बाजू असतात हे कृपया लक्षात घ्यावे.

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 10:52 am | पिवळा डांबिस

आग्गो माझी बाये!!!
ड्वाळे घळघळा वाहून त्यात माझे शरीर हे संपूर्ण पूरग्रस्त काश्मीर झाले आहे!!!!
(आणि आता जोताय मला अनाहिता सेंटलमध्ये (ठाणे मेंटलच्या धर्तीवर!!) अ‍ॅडमिट करेल की काय अशी भीती वाटते आहे!!!!
:)

ह्यां पिडां काकूंक इच्यारून लिव्हलांस मां? आधी तेंका अनाहितात अ‍ॅडमिट करून घेतलंय.

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 11:20 am | पिवळा डांबिस

आमी मिपावर एकटेपणान असतोंव!
बायलेक विचारून प्रतिक्रिया लिवणोंव नाय!!!!
:)

पिंपातला उंदीर's picture

23 Sep 2014 - 10:55 am | पिंपातला उंदीर

लग्न करताना तुम्ही एका जिवंत माणसाला आपल्या घरात आणलं आहे. घर साफ करणारं किंवा स्वयंपाक्पाणी, मुलं सांभाळणारं यंत्र नव्हे इतकं लक्षात ठेवलं तरी पुरे. कधीतरी तिच्या भूमिकेत जाऊन विचार करून बघा. प्रत्येक ठिकाणी मी हा असाच आहे, पटलं तर घ्या असं करून चालत नाही.

काही तरी गैर समज होत आहे का ? एवढी पण भयानक परिस्थिती नाही आहे . माझ आणि माझ्या बायको च शेयारिंग अतिशय उत्तम आहे . Consultant असल्याने मी घरीच असतो आणि आम्ही दोघ अक्षरशः २४ तास एकत्र असतो आणि जगातल्या प्रत्येक गोष्टीवर आम्ही बोलत असतो . पण मला काही वेळ माझा एकट्याचा लागतो आणि ती मला देते . एकूण सगळ उत्तम आहे . पण मूळ लेखाचा मुद्दा तो नाही अस मला वाटत .

पैसा's picture

23 Sep 2014 - 11:11 am | पैसा

तेंव्हा पण माझी बायको आणि मी बसलो असताना मध्येच laptop उचलून मधल्या खोलीत निघून जायचो . बायको च्या चेहऱ्यावरचे हिरमुसलेले भाव अजून पण कधी कधी मला guilt देतात . नंतर नंतर या एकटे पणा पायी मी माझ्या जवळच्या मित्राना अतिशय क्रूर पणे कटवायला लागलो

लेखात तुम्ही इतकंच लिहिलं आहे. त्यावरून कोणाचाही असा समज होईल. आता जे स्पष्टीकरण लिहिलंत त्यावरून तुम्ही संपूर्ण नॉर्मल दिसताय! इतपत एकटं रहावंसं वाटणं हे विशेष नव्हे. मात्र पुन्हा पर्सनल घेऊ नका, जे कोणी बायकोचा विचार न करता मला एकटंच रहायला आवडतं असे म्हणतील त्यांना मात्र नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे.

विलासराव's picture

23 Sep 2014 - 11:21 am | विलासराव

प्रत्येक ठिकाणी मी हा असाच आहे, पटलं तर घ्या असं करून चालत नाही.

बरं!!!! मी पण असंच म्हणतो.

तेवढी तयारी असेल तर लग्न बिग्नाच्या भानगडीत न पडता हिमालयात जाऊन रहावे.

तेवढी तयारी आहे म्हणुनच तर लग्नही केले नाहीय. पण हिमालयात का म्हणुन पाठवताय हे काय कळले नाही बॉ? मला तर हा अन्यायच वाटतोय आमच्यावर कारण आमचा हिमालय आमच्या आतच आहे. पाहीजे तेंव्हा आम्ही हिमालयात जातो पाहीजे तेंव्हा या जगात (बाजारात) येतो.

प्रत्येक गोष्टीला एकच बाजू नसते तर आणखी अनेक बाजू असतात हे कृपया लक्षात घ्यावे.

म्हनुनच तर आमची बाजु स्पष्ट केली. तरीही हिमालयात जावेच लागेल काय???

पिवळा डांबिस's picture

23 Sep 2014 - 11:26 am | पिवळा डांबिस

हिमालयात एक बंगला नांवाची भाड्याची चाळ बांधायचा माझा विचार बळावतो आहे!!!!
:)

विलासराव's picture

23 Sep 2014 - 11:35 am | विलासराव

म्हनुनच तर आमची बाजु स्पष्ट केली. तरीही हिमालयात जावेच लागेल काय???

याचं उत्तर पैसाताईंनी होय असं दिलं तर मी तुमच्या बंगल्याचा आजीवन भाडेकरु होउन जाईल.
बाकी तुमच्या विचारातील बंगला चाळीत येण्याच्या काही अटी असतील तर कळवा, म्हणजे माझी पात्रता तपासुन घेतो.

एकतर बॅचलर असल्याने रुम मिळवणे यासाठी अनेक दिव्यातुन जावे लागते आनी आतातर हिमालयात निघा असा फतवा निघालाय. जैसी करणी वैसी भरणी दुसरं काय?

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 Sep 2014 - 12:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

है है. अदुगरच बांदलिय कुनीतरी. ही बगा...

अधिक माहिती इथे मिळेल :)

प्यारे१'s picture

23 Sep 2014 - 12:40 pm | प्यारे१

हेचा मालक 'रेन्ट' आहे? असणारच असा अंदाज आहे. हिमालयाला पोखर तात भो*डीचे.

पैसा's picture

23 Sep 2014 - 11:34 am | पैसा

आमचा हिमालय आमच्या आतच आहे. पाहीजे तेंव्हा आम्ही हिमालयात जातो पाहीजे तेंव्हा या जगात (बाजारात) येतो.

हे आवडलं.

बाकी हिमालयात जा म्हणायची पद्धत हो! सगळेच हिमालयात जायला लागले तर हिमालयाची मुंबै होईल ना!

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 12:55 pm | बॅटमॅन

जरा जास्तच ओव्हर लिहिलाय प्रतिसाद. याची गरज नव्हती- अगदी फक्त लेखावरून मत बनवलं असतं तरीही.

प्यारे१'s picture

23 Sep 2014 - 12:59 pm | प्यारे१

+१.

आशेच म्हन्तो. (पैक्काच्या प्रतिसादाबद्द्ल आहे.)

पैसा's picture

23 Sep 2014 - 2:26 pm | पैसा

या या!

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 2:44 pm | बॅटमॅन

बरं मग?

पैसा's picture

23 Sep 2014 - 2:46 pm | पैसा

असू दे असू दे!

कवितानागेश's picture

23 Sep 2014 - 2:49 pm | कवितानागेश

अस्सं होय!

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 2:53 pm | बॅटमॅन

बरं मग?

पैसा's picture

23 Sep 2014 - 2:53 pm | पैसा

असोच!

बॅटमॅन's picture

23 Sep 2014 - 5:30 pm | बॅटमॅन

बरं मग?

कापूसकोंड्याची गोष्ट आठवायला लागलीये.

कोण सांगतंय का?

रजनीकांतला माहितीये म्हणे. त्याला विचारून सांगतो.

विजुभाऊ's picture

24 Sep 2014 - 12:39 pm | विजुभाऊ

ते का म्हणे?

>>जरा जास्तच ओव्हर लिहिलाय प्रतिसाद. याची गरज नव्हती- अगदी फक्त लेखावरून मत बनवलं असतं तरीही.

त्यांच्या लेखावरुन एकूण असंच वाटलं की त्यांना एकटं'च'राह्यला प्रचंड आवडतं. 'पत्नीच्या चेहर्‍यावरचे केविलवाणे भाव', 'जवळच्या मित्रांना कटवणे' हे तसं मत आणखीच पक्कं करतं. असं असेल तर मग लग्न तरी का करायचं असा प्रश्न वाचकांच्या मनात येणं साहजिक आहे.

प्रभाकर पेठकर's picture

23 Sep 2014 - 8:50 pm | प्रभाकर पेठकर

हा विचार दोन्ही बाजूंनी होणं आवश्यक असतं. (म्हणजे तुम्ही तो केलेला नाही असा माझा आरोप नाहिए.)
धागाकर्ता पुरुष असल्या कारणाने त्याच्याच वागण्याचे विश्लेषण होणार हे साहाजिक आहे. पण काही केसेस मध्ये पत्नीसुद्धा अशा स्वभावाची असू शकते. तिला शांतता, एकटेपणा जिवापाड आवडत असतो. घरातील बाकीचे सदस्य हॉल मध्ये टिव्हीवर कांही कार्यक्रम बघत किंवा गप्पा मारीत बसले असतिल तरी एखाद्या बाईला बेडरुमात किंवा गॅलरीत एकट्याने राहणे आवडते. पण तिची इच्छा असते तेंव्हा पतीने संभाषणाला तयार असले पाहिजे नाहीतर रुसव्याफुगव्यांना, वादावादीला आणि वातावरण बिघडायला सुरुवात होते.
दोघांपैकी कोणी कोणाला गृहीत धरू नये. सर्वांसाठी वेळ द्यावा. नवर्‍याने बायकोला, बायकोने नवर्‍याला आणि दोघांनीही मुलांना तसेच मुलांनी आईवडिलांना वेळ हा दिलाच पाहिजे. सहजीवन म्हणजे दुसरे काय असते?

सूड's picture

23 Sep 2014 - 9:52 pm | सूड

प्रतिसाद आवडला.

माझी व्याख्या विचाराल तर एक आळशी दिवस . कुठेही जायचे नाही . कुणीही येणार नाही . फ्रीज मध्ये २ बियर आहेत . घरात कुणी हि नाही . अगदी बायको पण नाही . टीवी चालू आहे . नेट पण एकदम फास्ट चालू आहे . वेळ दाखवणाऱ्या सगळ्याच साधनांमध्ये काहीतरी बिघाड झाला आहे . आणि मनमुराद एकटेपणा प्यायचा आहे . कुणीही तुम्हाला जज करत नाहीये आणि तुम्हाला कोणी जज करत नाहीये . मस्त पैकी कुठला तरी nostalgia आहे सोबतीला . बस्स . अजून काय पाहिजे .

गेली दोन वर्षे अशीच काढलीत. आणि आता मला हे आवडू लागले आहे. फ्रिज मध्ये बियर नसेल तरी चालेल. कारण त्याची सवय अजुन लागली नाहीये. मस्तपैकी अतिजलद इन्टरनेट असेल तर तीन तीन दीवस कोणाशीही न बोलता काढ्तोय... आली परीस्तीथी आपलीशी करायची सवय लागली आहे...

माम्लेदारचा पन्खा's picture

23 Sep 2014 - 9:50 am | माम्लेदारचा पन्खा

आली परीस्तीथी आपलीशी करायची सवय लागली आहे

हा स्वभाव नक्कीच नाही तर केवळ तडजोडीतून केलेला प्रकार वाटतो… पिंजरयातल्या पोपटालासुद्धा कालांतराने पिंजार्याचीच सवय होते याचा अर्थ असा नव्हे की त्याला जन्मापासून पिंजर्यातच राहायला आवडत असते.

खटपट्या's picture

23 Sep 2014 - 11:32 am | खटपट्या

असंच काहीसं !!!

मदनबाण's picture

23 Sep 2014 - 10:55 am | मदनबाण

कामाच्या स्वरुपामुळे एकटेपणाची जाणिव,सवय आणि थोड्या फार प्रमाणात आवड आणि त्रास देखील झाला.
जेव्हा ऑनसाईटला होतो तेव्हा तिकडे नाइट शिफ्ट करताना संपूर्ण वेअर हाउस मधे मी,लॅपटॉप आणि फोन या पलिकडे कोणीच नसायचे ! अगदी कंटाळा आला तर... वेअर हाउस मधे एकाटाच फिरायचो, तिथे एक फ्रिझ आणि कॉफी मेकर होता त्या पैकी एकाचा उपयोग करायचा हाच काय तो विरंगुळा असायचा ! इकडे हिंदुस्थानात सुद्धा १२-१२ तास संपूर्ण फ्लोअरवर एकट्याने बसुन काम केले आहे, मग शनिवार-रविवार असो वा दिवाळी-दसरा सर्व एकट्यानेच. अर्थात वेळ घालवण्यासाठी मिपाने आणि मिपाकरांनी प्रचंड मदत केली.अनेक मिपाकरांशी मनमुराद गप्पा हाणल्या आहेत,आणि त्यात पहिला क्रमांक रामदास काकांचा आहे. :) कधी कधी रात्री २:३० वाजता देखील मी इथे एकटाच ऑनलाईन असायचो. ;) मला एकटेपणा आजिबात आवडत नाही,पण अती गोंगाटाने आणि मोनोटोनस लाईफ स्टाइलने कधी कधी पूर्णपणे शांत एकटे बसुन रहावे वाटते,स्वतः बद्धल विचार करावासा वाटतो...वाडीला गेल्यावर कधी कधी नदीच्या पाण्यात पाय बुडवुन मी हा अनुभव घेतो,अर्थात तिथे वर्दळ असतेच. जेव्हा कामाच्या स्वरुपाने मिळालेला एकांतवास संपला तेव्हा काही दिवस जुळवुन घ्यायला लागले,कारण फ्लोवर इतकी माणसे पाहण्याची डोळ्यांना सवयच नव्हती !
असो... पिडांकाकांच्या प्रतिसादाशी पूर्णपणे सहमत !

जाता जाता :- माणुस या जगात एकटाच येतो आणि एकटाच जातो असे म्हणतात !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस्रोनं रचला इतिहास, मंगळयानाच्या इंजिनची टेस्ट यशस्वी!

विजुभाऊ's picture

24 Sep 2014 - 12:42 pm | विजुभाऊ

जाता जाता :- माणुस या जगात एकटाच येतो आणि एकटाच जातो असे म्हणतात !

श्री श्री श्री मदनबाण सो! या सोबत आणखी एक अ‍ॅड करा. माणूस या जयात एकटाच येतो. एकटाच ऑफिसात बसतो आणि एकटाच जातो असे म्हणा ;)

पिंपातला उंदीर's picture

23 Sep 2014 - 11:23 am | पिंपातला उंदीर

दुसऱ्या एका संकेतस्थळावर एक interesting प्रतिक्रिया आली . घासकडवी यांची . ती अशी :

मला वाटतं अशांचा परिस्थितीची तुलना नास्तिक किंवा समलैंगिकांच्या परिस्थितीशी करता यावी. ज्या समाजात देवावरचा विश्वास किंवा विषमलैंगिकता हीच नॉर्म असते, आणि त्याविरुद्ध वर्तन हे टॅबू असतं तिथे असे लोक 'कपाटात' राहताना दिसतात. त्यामुळेच असे गैरसमज पसरतात, आणि ते खोडून काढण्यासाठी कपाटाबाहेर कोणी येत नाही.

म्हणजे आम्ही भारी आहोत आणि अख्ख जग आम्हला त्रास द्यायला टपले आहे असे नाही पण मुद्दा विचार करण्यासारखा आहे

प्यारे१'s picture

23 Sep 2014 - 12:38 pm | प्यारे१

एकटेपणा मलाही प्रचंड आवडतो. ह्या एकटेपणामध्ये मला स्वतःला सुद्धा विसरावंसं वाटत असतं.
तुम्ही म्हणताय ती स्थिती 'एकलकोंडेपणा' ह्या शब्दाशी जास्त जवळची आहे. एकटेपणाशी नाही.
त्यात परिपूर्णता कुठल्याही साधनाशिवायच येऊ शकते असं माझं मत. बिअर, टीव्ही, नेट हे गुंगी आणणारे पदार्थ.
टीव्ही, इन्टरनेट सुद्धा नको. खरंतर बर्‍याचदा नको त्या विचारांचा प्रवेश ह्यांच्याच माध्यमातून होत असतो. तो विषय आत्ता नाही.

पण जेव्हा एकटेपणा हवा असतो तेव्हा तो स्वतःची गरज भागवण्यासाठी स्विकारला जात असेल तर तो दुसर्‍यांसाठी, विशेषत: कुटुंबासाठी अन्यायकारक ठरु नये एवढं बघून शोधावा. किमान त्यांना कल्पना देऊन शोधावा.

बाकी विलासराव म्हणतात तसं सगळ्यांच्यात बसून सुद्धा हिमालय आत आणता येत असेल तर बाहेरच्यांचा त्रास न व्हावा. अन्यथा हिमालया मध्येच उत्त रा खंडासारखी पूरपरिस्थिती सारखीच यायची. मागच्या वर्षी उत्तराखंड, यंदा काश्मीर, पुढच्या वर्षी आसाम. सुरुवात हिमालयातूनच.

बाळ सप्रे's picture

23 Sep 2014 - 1:22 pm | बाळ सप्रे

Myers-Briggs Type Indicator मधे व्यक्तिमत्वाचे ४ मितीमधे वर्गीकरण केले आहे..
त्यातील एक अंतर्मुख / बहिर्मुख - एक चांगला दुसरा वाईट असं काही नाही.. फक्त प्रत्येक प्रकारच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये त्यात चांगल्या प्रकारे सांगितली आहेत..
http://en.wikipedia.org/wiki/Myers-Briggs_Type_Indicator

विलासराव's picture

23 Sep 2014 - 1:29 pm | विलासराव

बाकी विलासराव म्हणतात तसं सगळ्यांच्यात बसून सुद्धा हिमालय आत आणता येत असेल तर बाहेरच्यांचा त्रास न व्हावा.

खरंय.

  • प्यारे हे जे जग आपण पाहातो ते आपल्या अंतरात जे आहे त्याचे प्रतीबींब आहे. एकदा आतले सगळे विकार संपले की प्रतीबींब आपोआप नाहिसे होते. मग जे उरते त्याला बरीच नावे आहेत जसे की निर्वान,आत्मा,परमात्मा,परमेश्वर्,अल्लाह्,जिझस्,मोक्ष्,मुक्ती आणखीही बरेच आहेत . त्यामुळे आणायची -न्यायची भानगडच नाही.त्याकरता आपल्या अंतर्मनात उतरायची कला शिकलं म्हणजे झालं. बाकी यावर मिपावर बराच काथ्या कुटला गेलाय.

आत्ता त्या प्रांतात मुद्दाम नाही घुसलो.

माणसाला बराच काळ एकटं राहण्याची सवय लागली की त्याची माणसांमध्ये चिडचिड होते. कधीकधी मूळ स्वभाव अबोल, शांत राहण्याचा असतो. माझा एक मित्र मेडीकल ट्रान्सक्रिप्शनची कामं करतो. रात्रभर हेडफोन कानाला. त्याला हेडफोन काढल्यावर कुणाशी बोलावंसं वाटत नाही हे त्याच्या जॉबचं बायप्रॉडक्ट.
हॅपन्स.

बाकी आतली शांतता वेगळीच असते. असो!

विजुभाऊ's picture

23 Sep 2014 - 1:45 pm | विजुभाऊ

मी एकटा असलो की सुखी असतो
कशाला कोण पाहीजे. सम्गीताची साठवण असलेली एक झकास सी डी खूप पुरते.
गाडी चालवताना तर कोणी सोबत असण्यापेक्षा एकटेच खूप बरे वाटते

दिपक.कुवेत's picture

23 Sep 2014 - 2:22 pm | दिपक.कुवेत

मलाहि एकटं रहायला खुप आवडतं. ईकडे कधी कधी मुद्दाम मेडिकल घेउन घरात पडून असतो. लेखातला शेवटचा पॅरा खुप आवडला. चिल्ड बियरच्या साथीने मी एकटा कुठेहि/कितीहि दिवस राहिन.

>>पण सगळ्या नातेवाईक नि जमून काही धार्मिक विधी करायचे , एकमेकांची package विचारायची , कुणाची एकाची ठरवून क्रूर पणे खेचायची आणि इतर बर्याच निरर्थक गोष्टी फ़क़्त पिढ्यान पिढ्या चालू आहेत म्हणून करायच्या या गोष्टीं मध्ये मला रस नव्हता
अगदी मनातलं बोललात..
बाकी एकटेपणा मलाही आवडतो. पण लोकं बरेच अर्थ काढतात. स्थळं बघताना एका मुलीने हा प्रश्न विचारला होता.मी म्हणलं आवडतं कधी कधी एकटं (एकांतात) राहायला. तेव्हा फारच विचित्र प्रतिसाद दिला होता तिने. असो... पण माझ्यामते प्रत्येकाने आठवड्यातुन थोड वेळ तरी एकांतात घालवावा.बरं वाटतं.

काउबॉय's picture

23 Sep 2014 - 3:49 pm | काउबॉय

जिथे माझे विचार व कृती स्वातंत्र्य बर्यापैकीअबाधित आहे अशी सर्व ठिकाणे मला पसंत आहेत
मग एकांतवास असो वा नसों... फार फरक पडत नाही. फ़क्त वरील स्वातंत्र्य अड़चनीत आणनारे घटक मी आयुष्यात कटाक्षाने दूर ठेवतो. बाकी प्रत्येकाची असे स्वातंत्र्य उपभोगायची क्षमता व पध्दत वेगवेगळी असते याची जाण असल्याने... याबाबत माझे कोणतेही ठाम मत होत नाही ज्याचा पुरस्कार करावा.

किल्लेदार's picture

23 Sep 2014 - 10:22 pm | किल्लेदार

माझे ठाम मत आहे की माणसाने काही काळ स्वतः बरोबर घालवावा. स्वतः बरोबर चांगला वेळ घालवणे म्हणजे एकटेपणा नक्कीच नव्हे.

हेन्री डेवीड थोरो हा प्राणि तब्बल २ वर्ष वाल्डेन नावाच्या तळ्याकाठी स्वतः घर बांधून एकटा राहिला. वाल्डेन नावाचे त्याचे पुस्तक वाचनीय आहे. किंवा गो. नी. दांडेकर यांच्या दुर्गभ्रमणगाथा मधील त्यांची प्रस्तावना वाचा. केवळ अफलातून आहे.

स्वतः ची कंपनी आवडणे नक्कीच वाईट नाही पण फक्त "स्वतः चीच" कंपनी आवडणे हे ही पटत नाही.

मी नेहमीच वर्षातले काही दिवस एकट्याने प्रवास करतो. अशा ठिकाणी जातो की कोणी मला ओळखत नाही. मग भर गर्दीतही एकांत मिळतो. बीअर किंवा स्कॉच (स्थलकालपरत्वे) बरोबर बंद खोलीत पुस्तकाऐवजी माणसांची गर्दी वाचण्यातही मजा आहे. रम चे घोट घेत मी हिमालयात एकांत अनुभवला आहे किंवा बीअर चाखत गोव्याच्या बीचवर सुद्धा.

असा अनुभव गप्पा मारायला नेहमीचेच कोणी असेल तर नक्कीच घेता येत नाही.

पिंपातला उंदीर's picture

24 Sep 2014 - 8:50 am | पिंपातला उंदीर

@किल्लेदार साहेब- प्रतिसाद आवडला

किल्लेदार's picture

24 Sep 2014 - 10:19 am | किल्लेदार

:)

मित्रहो's picture

23 Sep 2014 - 10:24 pm | मित्रहो

कठीण आहे बुवा,
सतत मुल काहीतरी मागायला लागली, बायको चिडायला लागली ऐकू येत नाही का वेगेरे तर वाटते एकटेपणा हवा. सारेच गावाला गेले तर मग मात्र तो एकटेपणा नकोसा वाटतो.
स्पेस प्रत्येकाला हवी असते, फक्त त्याची प्रत्येकाची आपली व्याख्या आणि गरज. मला तरी दिवसातून अर्धा ते एक तास एकटेपणा पुरे होतो.

vikramaditya's picture

23 Sep 2014 - 10:48 pm | vikramaditya

आपण लेखाची सुरुवात जी एं चे उदाहरण देवुन केलीत. जी एं नी जरी लोकांशी प्रत्यक्ष संपर्क टाळला तरी ज्यांच्याशी 'सुर' जुळले त्यांच्याशी प्रदीर्घ काळ मनमोकळा पत्रव्यवहार केला. स्वतःसाठी काही वेळ राखणे जरुरी त्याचबरोबर ज्यांच्याशी 'संवाद' साधण्यात आनंद मिळतो तर तोही साधावा असे वाटते.
शेवटी 'टु ईच हिज ओन'
प्रत्येकाचा स्वभाव डीनए सारखा युनिक! त्याचे किती आणि कसे विष्लेषण करणार?

किल्लेदार's picture

24 Sep 2014 - 2:59 pm | किल्लेदार

निदान अशी सोबत चालेल का ?

Bhoot upload copy

तुमचे जुने धागे चाळताना हा फोटो पाहीला होता.

मस्तच जमला आहे इफेक्ट.

सूड's picture

24 Sep 2014 - 3:16 pm | सूड

एकच नंबर !!

प्यारे१'s picture

24 Sep 2014 - 3:21 pm | प्यारे१

हा हा. आधी पण दाखवलेला काय एकदा?

मस्त आहे. :)

किल्लेदार's picture

24 Sep 2014 - 3:23 pm | किल्लेदार

इफेक्ट ??? अहो खरंच असेल कुणितरी =-O