तुम्ही मिपा विश्रांती अवस्थेत असताना काय करता ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
26 Jun 2014 - 12:49 pm
गाभा: 

गेल्या काही काळापासून मिपाच्या डेटाबेस (विदा) ला काही अडचणी येत आहेत. आजपासून त्याच्या दुरूस्तीचे काम सुरू करीत आहोत. मिपा विश्रांती अवस्थेत जाणार असल्यास काही वेळे आधी कळवण्यात येईल मात्र तरी सुध्दा सर्व लेखकांनी आपल्या लेखनाची एक प्रत साठवून ठेवावी ही विनंती.

अशी सूचना मिपाच्या मुखपृष्ठावर दिसते आहे. माझे एक सहकारी जो कागद जी फाईल गेल्या सात दिवसात उघडली नाही ती प्रत्येक शनीवारी पुन्हा उघडून न पाहताच नष्ट करतात. गेल्या सात दिवसात ज्याची गरज पडली नाही ती कशाला सांभाळायची असा साधा सरळ हिशेब. मला एकही चिठोरा सुद्धा नष्ट करणे आवडत नाही पण त्यातल्या महत्वाच्या चिठोर्‍यांची दुसरी प्रत करून ठेवण्या पेक्षा मोठे इंटरेस्ट मला असतात त्यामुळे दुसरी प्रत वगैरे बनवणे अस्मादिकांकडून काही ठिकसे होत नाही. लेखनाची एक प्रत साठवून ठेवणे हा माझ्या सवयीचा भाग होण्याची शक्यता कमीच असणार आहे. म्हणूनच बहुतांश लेखन मुक्तस्रोतात करण्याचा प्रयास ठेवतो म्हणजे कुठे ना कुठे डाटा मिररींग होईल. नाही झाले तर तो मजकुर तेवढा महत्वाचा नव्हता अशी आम्ही आमच्या मनाची समजूत घालून घेतो.

बाय द वे अजून एक प्रश्न पडला मिपा विश्रांती अवस्थेत असते तेव्हा मिपा चाहते वेळ कसा कसा घालवतात ?

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

26 Jun 2014 - 12:57 pm | प्रसाद गोडबोले

हा प्रश्न बहुतेक आधी चर्चिला गेलाय ... मिपा बंद असताना मी इतर संकेतस्थळांवरचे लेखन वाचतो ... मनोगत आणि मायबोली विषेष करुन :)

एस's picture

26 Jun 2014 - 1:39 pm | एस

प्राडाँचा धागा होता. कुणीतरी लिंक द्या.

भाते's picture

26 Jun 2014 - 1:43 pm | भाते

हा घ्या प्रा. डॉ. बिरुटे सरांचा तो धागा.

माहितगार's picture

26 Jun 2014 - 3:50 pm | माहितगार

तरीच आमची आणि सरांची माहिती काढण्याची श्टाईल कुठे कुठे जमते तर !

मी अन्य संस्थळे वाचतो. एकूण फार फरक पडत नाही असे निरीक्षण आहे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

27 Jun 2014 - 10:28 am | विश्वनाथ मेहेंदळे

मेलास रे, आपल्या कर्माने मेलास. आता तू **** सर्टीफाईड मिपाद्वेष्टा झालास.

**** च्या जागी कुठली नावे घालायची ते एव्हाना समजले असेलच ;-)

बॅटमॅन's picture

27 Jun 2014 - 2:23 pm | बॅटमॅन

हा हा हा, अगदी अगदी =))

माहितगार's picture

27 Jun 2014 - 10:54 am | माहितगार

अंशतः मान्य पण मी सहसा स्पेसीफीक ऑडीअन्स डोळ्या समोर ठेऊन लिहितो आणि त्या लिहिण्यालाही मूड लागतो. आणि नेमका लिहिण्याचा मूड असताना संकेतस्थळ बंद असेल तर हिरमोड व्हावयास होते.

प्रभाकर पेठकर's picture

26 Jun 2014 - 2:01 pm | प्रभाकर पेठकर

मिपा उघडण्याची वाट पाहतो.

कवितानागेश's picture

26 Jun 2014 - 2:11 pm | कवितानागेश

मी कामं करते, घरातली आणि बाहेरची. ;)

पैसा's picture

26 Jun 2014 - 2:22 pm | पैसा

मी पण!

एस's picture

26 Jun 2014 - 3:57 pm | एस

If p -> q then ~q -> ~p ?

मिपा चालू असताना कामे बंद असतात. ;-)

पैसा's picture

26 Jun 2014 - 9:38 pm | पैसा

कधी कधी माझा नवरा सांगतो पण, आता काहीतरी जेवण तयार कर म्हणून! ;)

एस's picture

26 Jun 2014 - 11:20 pm | एस

अहो त्यात काय! मिपा उघडलेलं असतंच. एखादी पाककृती टेकवायची आणि म्हणायचं नाउ ऑल द बेस्ट!

पैसा's picture

26 Jun 2014 - 11:25 pm | पैसा

आयडिया चांगली आहे! पण बहुतेक "हा कॉम्प्युटर स्क्रीन कूकरमधे कसा घालू?" असं उत्तर येईल! *new_russian*

नवर्‍याचं कुकिंग आणि माझा अनुभव असं काहीतरी ट्राय करा. दोनशेतर कुठेच गेले नाही. *aggressive* *blum3*

मिपा विश्रांती अवस्थेत असते तेव्हा आम्ही ऑफिस मधलं काम करतो . :-P

>>तुम्ही मिपा विश्रांती अवस्थेत असताना काय करता ?

तुम्हाला का चवकश्या? ;)

तुम्हाला का चवकश्या? -> स्वतःचेच प्रतिसाद न मिळणारे धागे पाहून वैतागलो होतो म्हटले एखादा तर शतकी धागा व्यायला पाह्यजेल. आधी चर्चा झालीए सांगत सुद्धा कसे प्रतिसाद येतायत बघा. आम्ही सर्वनामांचा जप केला तेव्हा कोणी म्हणून फिरकले नव्हते; तेव्हाच प्रश्न पडला होता की हे मिपाकर आमच्या धाग्यांवर येत नाहीत तेव्हा जातात कुठेशीक पण तसे विचारणे औचीत्याला सोडून आणि कदाचित आ बैल मुझे मार झाले असते! अनवधानात असताना अप्रत्यक्ष माहिती काढण्याची युक्ती समजा हवे तर, कसें ? (ह.घ्या.हेवेसानल) ;) चव+ कशी = चवकशी :) अनुभवी लोकांच मार्गदर्शन पाह्यजेना !

>>आम्ही सर्वनामांचा जप केला तेव्हा कोणी म्हणून फिरकले नव्हते;

तो बर्‍यापैकी अभ्यासाचा विषय आहे, हो. आणि अर्थातच स्तुत्य आहे. बादवे तुम्ही लिस्टवलेल्या भाषांत एक आणखी भाषा अ‍ॅडवा. सामवेदी!! ही भाषा वसई आणि आजूबाजूच्या भागातले ब्राह्मण, पाचकळशे ज्यांना पोर्तुगीजांनी धर्मांतरित केलं अशा ख्रिस्ती लोकांत बोलली जाते. या भाषेवर आणखी माहिती मिळवायची आहे. तुम्हाला आणखी माहिती मिळवता आली तर बघा.

माहितगार's picture

26 Jun 2014 - 5:07 pm | माहितगार

हम्म माझ्याही आंतरजालावरील पहिल्या शोध फेरीत फारशी माहिती उपलब्ध झाली नाही.(मराठी विकिपीडियावर लेख चालू करतो आहे.) सर्वच बोली भाषांची आंतरजालावर माहिती नसल्यातच जमा आहे (छापील माध्यमात सुद्धा कमीच असणार आहे). असंख्य छोट्या बोली भाषांचा अजून वीस वर्षांनंतर मागमूसही आढळणे कठीण जाणार आहे. भटकंती प्रेमी मराठी मंडळींनी थोडासा अधीक वेळ काढून जुन्या पिढीतील लोकांकडून महाराष्ट्रातील बोली भाषांची माहिती मिळवून आंतरजालावर टाकल्यास बरे पडेल असे वाटते.

टाकणकार नावाच्या छोट्या समाज गटातील तरुण मंडळी आंतरजालाच्या माध्यमातून आपल्या भाषेची जपणूक करण्याच्या प्रयत्नात दिसतात किमान तेवढीतरी इतरांनी करावी असे वाटते.

बादवे (माझ्या अज्ञाना साठी माफ करा) हे सामवेदी ब्राह्मण चित्पावनींपेक्षा वेगळे होते ना ? विचारण्याचा उद्देश चित्पावनी बोली आणि सामवेदी बोलीत काही समानताही असतील का त्या वेगळ्याच असण्याची शक्यता अधीक असेल ?

प्रचेतस's picture

26 Jun 2014 - 5:13 pm | प्रचेतस

कोर्लई कोळीवाड्यातले लोक मराठी-पोर्तुगीज अशा मिक्स 'क्रिऑल' भाषेत बोलताना मी स्वतः पाहिले आहे. जाम भारी वाटते त्यांची भाषा ऐकतांना.

माहितगार's picture

26 Jun 2014 - 5:43 pm | माहितगार

पुन्हा संधी मिळाल्यास आंतरजालावर मिपा किंवा विक्शनरीवर अधिक माहिती नक्की द्यावी. आजकाल मोबाईलवरही चटकन रेकॉर्डींग घेता येते. मला जमत नाही पण माझ्या मुलींना इतरांचे बोलणे अनपेक्षीत रेकॉर्ड करून नंतर खिदी खिदी हसण्याची सवय बरेच दिवस होती :)

>>चित्पावनी बोली आणि सामवेदी बोलीत काही समानताही

बालकांड मध्ये वाचलेली चित्पावनी आणि थोडीफार कानावर पडलेली सामवेदी यात भेद्/समानता शोधणे अजून शक्य झालेले नाहीये. पण आलो, जेवलो ही क्रियापदे सामवेदीत 'आलॉ','जिवलॉ' अशी होतात. 'च' चा 'स' होतो. जेवणं उरकायची असतील तर जेवलात का या प्रश्नाचं उत्तर सामवेदीत 'जिव्यासा हाय' असं येतं. तूर्तास येवढंच. अजून किती माहिती मिळतेय बघू.

माहितगार's picture

26 Jun 2014 - 5:50 pm | माहितगार

आलो, जेवलो ही क्रियापदे सामवेदीत 'आलॉ','जिवलॉ' अशी होतात. 'च' चा 'स' होतो. जेवणं उरकायची असतील तर जेवलात का या प्रश्नाचं उत्तर सामवेदीत 'जिव्यासा हाय' असं येतं.

आपले हे वाक्य मराठी विकिपीडिया सामवेदी बोली लेखात आपल्या या प्रतिसादाचा संदर्भ जोडून च्योपपेस्त केले. आपला प्रतिसाद प्रताधिकारमुक्त होतो आहे हे वाक्य रिट्रोस्पेक्टीव्हली जोडतो आहे. :) (अर्थात च्योपपेस्त नको असल्यास सांगावे माझ्या शब्दात पुन्हा लिहिन)

आपल्या परवानगीशिवाय सदर लेखात काही मला योग्य वाटलेले बदल केले आहेत. न रुचल्यास पुन्हा पूर्वीप्रमाणे करावे. :)

म्हणूनच विकिपेडिया मला आवडत नाही. माहितीची अचूकता किती ह्याची ग्यारंटी नाही.
हे अर्थात तुम्हा दोघांस उद्देशून नाही पण कोणीही कसेही बदल करू शकतो यावर आहे.

.....पण कोणीही कसेही बदल करू शकतो यावर आहे..........माहितीची अचूकता किती ह्याची ग्यारंटी नाही

वल्ली, आपल्या मनमोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद. या विषयावर पाच-सहावर्षापुर्वी मनोगतावर चर्चा केली होती.(हि मिपा चालू होण्या पुर्वीची गोष्ट) त्यावेळी विकिपीडियावर अशीच मनमोकळी टिका करणार्‍या मंडळीं सावकाशीने मराठी विकिपीडियावर येऊन खूप नाही पण थोडी थोडी संपादने करून गेली. मनोगतावरील चर्चेत तात्या अभ्यंकर आघाडीचे टिकाकार होते पण तेही लेखन,संपादने करून गेले (मनोगत चालू झाल्यानंतर मनोगतावर विकिविषयक चर्चा करण्याचे अगत्याने आमंत्रणही देऊन गेले), बिरुटेसरांनीही लेखन केले इतरांनीही केलेच (आपणही केले असल्यास कल्पना नाही). तुम्ही त्या मंडळींचा अनुभव विचारा की त्यांनी केलेल्या लेखनात किती चूकीचे बदल जोडले गेले. सामजिक-राजकीय विषयांवरील लेखांना स्थैर्य प्राप्त होण्यास विकिपीडिया रचनेत दीर्घ कालावधी लागतो हे मान्य. इंग्रजी विकिपीडियात सामजिक-राजकीय विषयांवर अती कडकपणाचा राग इतर लेखांवर काढला जातो तसे मराठी विकिपीडियावर होत नाही मराठी मंडळी चर्चा पानांवर आवाज करतील पण सामाजिक-राजकीय विवाद्य विषय त्यांच्या विभूती पुजा असे अपवाद सोडले तर ज्ञानविषयक लेखात येऊन लोकांनी चूका जोडल्या उत्पात माजवले असे फारसे पाहण्यात नाही. उलट मराठी माणसाला विकिपीडिया प्रकल्पाने मराठी भाषेस होणार्‍या फायद्याच्या जाणीवेने सर्वसाधारण मराठी माणूस मराठी विकिपीडियाच्या बाबतीत अत्यंत जबाबदारीने वागतो असा अनुभव आहे. अर्थात विश्वास ठेऊन विश्वास संपादन करण्यात मराठी विकिपीडियाचे यश मलातरी समाधानकारक वाटत आले आहे.

अख्ख्या दहा वर्षांच्या १३ लाखांवरून संपादनात लेखपानात जाणीवपुर्वक उत्पात संपादनांची संख्या पन्नास शंभरच्या पलिकडे गेली नाही. लेखपानांमध्ये उत्पात केला म्हणून दोन पेक्षा अधिक सदस्यांना तेही एकवर्षापेक्षा अधिक काळा करता ब्लॉक करण्याची वेळ मराठी विकिपीडियावर अद्याप आलेली नाही. आकडेवारी माहित नाही मराठी विकिपीडिया पेक्षा कितीतरी अधिक संख्येने मराठी संकेतस्थळांवर ब्लॉकींग होत असेल. हा प्रत्यक्ष अनुभवाचा सकारात्मक भाग झाला.

लोक रस्त्यावर कचरा टाकतील किंवा तलावात खडा फेकतील म्हणून रस्त्याच्या/तलावाच्या बांधकामासाठी सार्वजनिक सहभागाचे आवाहन असेल तर आपण पाठ फिरवू का ? गांधीगिरीने रस्ता तलाव निर्मळ ठेवत राहण्याचा प्रयत्न आपण करू; विकिपीडियाचेही असेच असावे असे मला वाटते.

सामाजिक-राजकीय विवाद्य आणि विभूतीपूजा लेखांना फाट्यावर मारा, इतर ज्ञानविषयक लेखात लेखन संपादने करून पहा आणि पाच-दहा वर्षांनी आपणच पहा की किती तुमच्या लेखनात किती चुकीचे बदल केले गेले ते अनुभवून पहा. मला वाटत नाही की फारसे व्हावेत.

मनमोकळ्या प्रतिसादासाठी पुन्हा एकदा धन्यवाद.

प्रचेतस's picture

27 Jun 2014 - 11:20 am | प्रचेतस

सविस्तर प्रतिसादाविषयी धन्यवाद.

अख्ख्या दहा वर्षांच्या १३ लाखांवरून संपादनात लेखपानात जाणीवपुर्वक उत्पात संपादनांची संख्या पन्नास शंभरच्या पलिकडे गेली नाही

आपल्या प्रतिसादावरून विकीवर लोक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहेत असा माझा समज असल्याचे तुम्ही गृहित धरलेले दिसतेय.
मला जाणीवपूर्वक उत्पात अभिप्रेत नसून अजाणतेपणी होणार्‍या चुका अभिप्रेत आहेत. कित्येक लोक पुरेशा माहितीअभावी किंवा विकीवर माहिती चढवण्याच्या उत्साहापोटी अजाणता चुकीची माहिती घुसडत आहेत.
उदा. गौतमीपुत्र सातकर्णी हे विकीपान पहा.

यातील काही चुकीचे मुद्दे बघा

१. शालिवाहन हे शक सातवाहन राजांशी संबंधित आहे
योग्य उत्तर: हा शक कुशाणवंशीय कनिष्काने प्रचलित केला आणि त्याच्या क्षत्रपांनी प्रचलित ठेवला म्हणूनच पुढे याचे नामकरण शक संवत असेच झाले. पुढे कधीतरी ९व्या १० व्या शतकात ह्याला शालिवाहन नाम चिकटले. (हे डॉ. वा. वि.मिराशी, डॉ. शोभना गोखले आणि इअतर्ही कित्येक संशोधकांच्या संशोधनातून व्यक्त केले आहे.)

२. त्यामुळे महाराष्ट्र, व शेजारील प्रदेशावरील सातवाहनांचे वर्चस्व संपले आणि त्यांना दक्षिणेत जावे लागले
योग्य उत्तरः सातवाहनांची उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रावरील सत्ता संपुष्टात आली होती मात्र पैठण आणि त्या खालचे परिसरात अजूनही ह्यांची राजवट होतीच.

३. सातवाहन राजांमध्ये मातृसत्ताक पद्धत होती
मातृसत्ताक ह्याचा अर्थ म्हणजे स्त्री हीच राज्यावर असणे. निव्वळ नावापुढे आईचे नाव लावणे म्हणजे मातृसत्ताक पद्धती नव्हे.

अशा प्रकारच्या इतरही अनेक ढोबळ चुका मराठी विकीवरील इतर विकीपानांमध्येही आहेत. अर्थात ह्याला जाणीवपूर्वक उत्पात म्हणता येत नाही पण त्याचबरोबर विकीवर पूर्णपणे अवलंबून राहणे शक्य नाही हे पण सांगता येते.

मी विकीचा विरोधक अथवा टीकाकार नव्हे. फक्त माहितीच्या अचूकतेची खात्री नाही इतकेच माझे म्हणणे आहे. अर्थात 'नोबडी इज परफेक्ट' हे आहेच. :)

सहमत, साधारणता हाच उद्देश ठेऊन खात्रीशीर माहिती सांगा हा धागा मिपावर चालू केला. त्यात आदूबाळ यांना एक प्रतिसाद दिला आहे त्यात आपण म्हणता त्याचा अंशतः उहापोह झाला आहे. कुणीतरी पर्वतापाशी यावे का पर्वताने कुणापाशी जावे अशा अर्थाची म्हण आत्ता नेमकी आठवत नाही आहे पण तसा मराठी विकिपीडियावर लिहिण्याच विशीष्ट आवाहन अथवा जाहीरात न करता केवळ माहिती घेण्या साठी विवीध धागे घेऊन मीच सध्या मिपावर पोहोचतो आहे.

एका मराठी संस्थे मार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलेल्या उपक्रमात सध्याच्या लेखातील संदर्भ तपासणे आणि तज्ञांसोबत लेखन (एडीट वीथ एक्सपर्ट) असे दोन उपक्रम सुचवलेत. पाहू महाविद्यालयीन विद्यार्थी यात किती रस घेतील ते येत्या काळात कळेलच. ऑनलाईन संदर्भ स्रोतांची मराठी भाषेत कमतरता हाही मोठा प्रश्न आहे. मराठी विकिस्रोतसारखा प्रकल्प या दृष्टीने महत्वाचा आहे.

बाकी आपल्या प्रतिसादातील आक्षेप संबंधीत लेखपानाच्या चर्चा पानावर नोंदवेन. लक्षवेधण्यासाठी धन्यवाद

राजेंद्र मेहेंदळे's picture

26 Jun 2014 - 3:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

ऑफिसात चेपु, तुनळी आणि जीमेल ब्लॉक केलेय त्यामुळे http://www.batmya.com/ हे संस्थळ उघडतो आणि सगळे पेपर वाचुन काढतो...बाकी ऑनलाईन पेपरात मटा बेस्ट वाटतो.

बाकी ऑनलाईन पेपरात मटा बेस्ट वाटतो.

सहमत आहे. मात्र मटाची ऑनलाईन एडीशन जितकी चांगली आहे, तितकीच भंगार प्रिंट एडीशन.

ऋषिकेश's picture

26 Jun 2014 - 5:05 pm | ऋषिकेश

मिपा विश्रांती अवस्थेत जाणार असल्यास काही वेळे आधी कळवण्यात येईल मात्र तरी सुध्दा सर्व लेखकांनी आपल्या लेखनाची एक प्रत साठवून ठेवावी ही विनंती.

प्रशासनाला विनंती की त्यांनी विदागाराचाच तात्पुरता ब्याकप घेऊन ठेवावा.
इतक्या वर्षातील इतक्या लेखनाची प्रत साठवणे आवाक्या बाहेरचे आहे. शिवाय चोप्य पस्ते करून एकवेळ लेख साठवायचा विचार करता यावा. प्रतिसाद!

माहितगार's picture

26 Jun 2014 - 5:57 pm | माहितगार

व्वा, आमच्या अगदी मनातलं बोललात, या प्रित्यर्थ आपणास आमच्याकडून घी सक्खर ! आमचा हा धागा काढण्याचा खरा उद्देश हेच नमुद करण्याचा आहे. मराठीतील संकेतस्थळ मालकांनी आपापसात सहकार्य करून काही मार्ग शोधायला हवा असे वाटते.

मराठीतील संकेतस्थळ मालकांनी आपापसात सहकार्य करून

असाच निरागसपणा जप हो, श्याम!

प्यारे१'s picture

26 Jun 2014 - 8:33 pm | प्यारे१

आ बा भारीच्च!

डॉ सुहास म्हात्रे's picture

26 Jun 2014 - 9:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

एस's picture

26 Jun 2014 - 11:17 pm | एस

गार झालो. :-D

माहितगार's picture

27 Jun 2014 - 9:16 am | माहितगार

=)) अहो कधी कधी असा (आमचा संभावित) निरागसपणाच कामास येतो की. शॅम पेक्षा श्याम बराना ! ;) (मराठी संकेतस्थळ मालकांनो ह. घ्या. वरीजनल श्यामनी असं दुख्ररं वाक्य लिहिल नसतना म्हणून आम्ही.. )

-पुन्हा एकदा शॅम (माहितगार)

टवाळ कार्टा's picture

27 Jun 2014 - 9:23 am | टवाळ कार्टा

मराठीतील संकेतस्थळ मालकांनी आपापसात सहकार्य करून

=)) मराठी माणसे खेकड्यासारखी वागायची कधीच सोडणार नाहीत...अगदी स्वता त्यावर तावातावाने बोलूनसुध्धा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jun 2014 - 9:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमचा धागा हायजॅक केल्याबद्दल आपला निषेध व्यक्त करतो. :) मिपा विश्रांती अवस्थेत जातंच कशासाठी असं वाटतं. काय काम करायचं ते मिपा चालु असतांनाच केलं पाहिजे. पण, मालकाचं कोणी मालकं असतं का ? नै ना. मग सोसा. :)

-दिलीप बिरुटे

केदार-मिसळपाव's picture

27 Jun 2014 - 12:59 pm | केदार-मिसळपाव

मि.पा. जागृत आवस्थेत येण्याची वाट बघतो.