लोकसभा निवडणुक २०१४ निकाल - १

विकास's picture
विकास in राजकारण
16 May 2014 - 5:55 am

नमस्कार मंडळी!

आज अनेक वर्षांनी आणि अनेक निवडणुकांंनंतर आधी निवडणुक आणि आता निकालांबाबत उत्सुकतेचे वातावरण आहे. काही ठिकाणी ही उत्सुकता ही उत्साहाने भरलेली आहे तर काही ठि़काणी चिंतेने ग्रासलेली आहे. नक्की काय होत आहे हे अजून काही तासात समजेल. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार भाप्रवे ९:३० पर्यंत सुरवातीचे ट्रेंड्स समजतील. पण दुपारी १२ पर्यंत चित्र स्पष्ट दिसेल.

हा धागा निवडणुक निकालांवर चर्चा, अपडेट्स करण्यासाठी काढत आहे.

आयबीएन ने गेल्या सर्व निवडणुकांवर आधारीत इन्फोचार्ट तयार केला आहे. तो माहितीसाठी येथे डकवत आहे.

Election Result History

सर्व उमेदवारांना आणि त्यांच्या समर्थकांना शुभेच्छा!

प्रतिक्रिया

बाकी, केजरेवाल फॅक्टर भाजपाला फायद्यात जातो की तोट्यात हे आता कळेच. घोडा मैदान जवळ आहे.

श्रीरंग_जोशी's picture

16 May 2014 - 7:18 am | श्रीरंग_जोशी

आज जे निकाल लागण्याची शक्यता आहे त्याची मी गेल्या दहा वर्षांपासून वाट पाहत आहे. २००४ व २००९ मध्ये निकाल (लोकसभा व महाराष्ट्रातील विधानसभा) बघतांना माझा चांगलाच हिरमोड झाला होता.

व्यक्तिशः आजचे निकाल तेवढे उत्कंठावर्धक वाटत नाहीयेत. विविध माध्यमांनी व्यक्त केलेले अंदाज प्रत्यक्ष निकालांच्या जवळ जाणारे असतील याची खात्री आहे.

अजून ५ महिन्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल मात्र आजपेक्षाही अधिक उत्कंठावर्धक असतील. महाराष्ट्रातील मतदारांची काही खात्री वाटत नाही (गेल्या ३ निवडणुकांवरून), विधानसभेसाठी फारच क्षमाशीलपणे मतदान करतात :-).

धर्मराजमुटके's picture

16 May 2014 - 7:37 am | धर्मराजमुटके

१. आमचा मतदारसंघ - प्रिया दत्त वि. पुनम महाजन.
२. वाराणसी (मोदी वि. केजरीवाल)
३. निलेश राणे (कोकण)
४. छगन भुजबळ (नाशिक)
५. किरीट सोमैया वि. मेघा पाटकर वि. संजय पाटील
६. शिरुर ( आढाळराव वि. देवदत्त निकम

शिरुरमधुन आढळरावच येतील अशी शक्यता आहे.

भीडस्त's picture

16 May 2014 - 4:17 pm | भीडस्त

आढळराव पाटील २८६००० पेक्षा जास्त मतांनी आघाडीवर
अजून एक फेरी बाकी आहे.
कैबिनेट स्तरावरचे मंत्रीपद मिळणार असं दिसतंय आमच्या मतदारसंघाला....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 May 2014 - 7:51 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

जजमेंट डे.
अबकी बार "अच्छी" सरकार =))

ऑफिसमध्ये सगळे जण आत्ता एकाच विषयावर बोलताहेत - नि आणि नि - निवडणूका आणि निकाल. टीव्ही चॅनेल (सीएनबीसी सुरु असतं हो आमच्या हापिसात! ) सकाळपासून निकालाच्या प्रोजेक्शनच्या बातम्या दाखवत आहे. खरं सांगू तर कंटाळा आला ह्याचा आता.

विकास's picture

16 May 2014 - 8:33 am | विकास

सुरवातीचा व्होट शेअर

BJP {58.2%,18508}
INC {25.7%,8155}
NPF {11.6%,3692}
AAAP {1.6%,505}
NOTA {1.4%,440}
IND {0.6%,176}
JD(U) {0.3%,84}
BSP {0.2%,72}
SP {0.2%,54

आयच्यान इतका टेन्शन स्वतःच्या कुठल्या निकालावेळी सुद्धा आलं नव्हतं!

किपींग फिंगर्स क्रॉस्ड!! अबकी बार सचमुच अच्छी सरकार ! :)

विकास's picture

16 May 2014 - 8:49 am | विकास

=))

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

16 May 2014 - 8:37 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

सद्ध्या तरी एन.डी.ए. आघाडीवर आहे. =))

अजूनतरी भाजपा आघाडीवर आहे पुण्यात.

विकास's picture

16 May 2014 - 9:15 am | विकास

महाराष्ट्रात मोदींची लाट. सुशीलकुमार शिंदे, निलेश राणे, छगन भुजबळ, विश्वजित कदम, विजयससिंह मोहिते-पाटील पिछाडीवर.

भुजबळ १४,००० मतांनी पिछाडीवर *wacko*

पवारांचं नाकच कापलं जाईल नाशिक हातचं गेलं तर!!

llपुण्याचे पेशवेll's picture

16 May 2014 - 3:30 pm | llपुण्याचे पेशवेll

हारले दीड लाख मतांनी भुजबळ

बहिरुपी's picture

16 May 2014 - 5:57 pm | बहिरुपी

विजयसिंह मोहिते-पाटील निवडुन आले.

बहिरुपी's picture

16 May 2014 - 6:00 pm | बहिरुपी

विजयसिंह मोहिते-पाटील निवडुन आले.

आनन्दिता's picture

16 May 2014 - 9:22 am | आनन्दिता

झी मिडीया ने असले आकडे कुठुन आणलेत!, बा़कीचे चॅनल अजुन ५०-६० च्या घरात आहेत तोवर यांनी एनडीए ला २१३ पर्यंत आघाडी दाखवलिये..

पैसा's picture

16 May 2014 - 9:26 am | पैसा

आणखी पुढे. २५५/६९/११३

आनन्दिता's picture

16 May 2014 - 9:36 am | आनन्दिता

पहीला निकाल आला, बागपत मधुन भाजपाचे सत्यपाल सिंह विजयी! *clapping*

बाळ सप्रे's picture

16 May 2014 - 9:49 am | बाळ सप्रे

एक्झिट पोल च्या अंदाजानुसार वाटचाल सुरु आहे.. २७२ चा जादुई आकडा पार होण्याची चिन्हे आहेत..

मदनबाण's picture

16 May 2014 - 9:54 am | मदनबाण

अच्छे दिन आयेंगे... :)
अबकी बार १००% मोदी सरकार. ;)

आत्मशून्य's picture

16 May 2014 - 10:07 am | आत्मशून्य

नितिन थत्ते's picture

16 May 2014 - 10:08 am | नितिन थत्ते

ट्रेण्डवरून तर एकट्या भाजपलाच बहुमत मिळू शकते असए दिसत आहे.

अभिनंदन.

मंदार कात्रे's picture

16 May 2014 - 10:09 am | मंदार कात्रे

भाजप+ = ३०५+

स्रोत- एनडीटीव्ही

मोदी त्सुनामी मध्ये सगळे पक्ष वाहुन गेले!

मंदार कात्रे's picture

16 May 2014 - 10:10 am | मंदार कात्रे

मोदी लाट नव्हे मोदी त्सुनामी !!!

विकास's picture

16 May 2014 - 10:12 am | विकास

एनडीए ३०४ आणि भाजपा २५५

उन्नाव मधुन भाजपाचे साक्षी महाराज विजयी. अनु टंडन पराभुत

अक्शु's picture

16 May 2014 - 10:15 am | अक्शु

३००+
नमो नमो

आनन्दिता's picture

16 May 2014 - 10:16 am | आनन्दिता

मनसे फॅक्टरची यावेळी ऐसी की तैसी झालिये. मुंबई सहाच्या सहा जागा युतीकडे जाणार बहुतेक.

निलेश राणे चा पराभव व्हायचेच चान्सेस जास्त वाटतायत. *yahoo*

खबो जाप's picture

16 May 2014 - 10:22 am | खबो जाप

Alliance Lead+Results Change
BJP+ 307 +166
Cong+ 72 -160
Others 157 -6
Awaited 7

http://www.ndtv.com

काँग्रेसने हार मान्य केली! मात्र त्याला राहूल कारणीभूत नाही हे देखील स्पष्ट केले. :)

बाळ सप्रे's picture

16 May 2014 - 10:36 am | बाळ सप्रे

काँग्रेसचे निदान बरोबर आहे.. कारणीभूत आहेत.. सोनिया, मनमोहनसिंग, कलमाडी, राजा, कन्निमोळी, वद्रा..इ. इ.
बिचार्‍या राहुलचा काय दोष?? :-)

आनन्दिता's picture

16 May 2014 - 10:42 am | आनन्दिता

नै नै नरेंद्र मोदी कारणीभुत आहेत असं कबुल करायला हवं खरंतर काँग्रेस ने .!!

भाजपाचे हार्दिक अभिनंदन. कॉंग्रेसचा पार बोऱ्या वाजला हे सर्वात उत्तम झाले. पण हे मिळालेले संपूर्ण बहुमत भाजपने राम मंदिरासारख्या प्रश्नांवर वापरण्यापेक्षा विकासासाठी वापरावे. आपचे काय होतंय ते बघुया.

llपुण्याचे पेशवेll's picture

16 May 2014 - 9:01 pm | llपुण्याचे पेशवेll

मतदारांनी भाजपाला मत विकास आणि सामाजिक न्यायासाठी दिलेले आहे. तस्मात भाजपाने दिलेली सर्व आश्वासने पाळावीत, राम मंदिरासह.

विकास's picture

16 May 2014 - 10:37 am | विकास

याचा अर्थ मोदी लाट आहे असा समजायचे का?

संपत's picture

16 May 2014 - 10:38 am | संपत

अर्थातच :)

वडोदरा मधुन मोदी पावणेतीन लाख मतांनी विजयी.

बारीकसारी बातम्यासाठी खरडफळा पहात राहा.

बाळ सप्रे's picture

16 May 2014 - 10:47 am | बाळ सप्रे

नाय.. आज हाच खरडफळा!!!

इकडेच खरडा सगळ्यांनी काय ते!!

विकास's picture

16 May 2014 - 10:55 am | विकास

सहमत!

आनन्दिता's picture

16 May 2014 - 11:20 am | आनन्दिता

राखी सावंत ला फक्त ५८ मतं पडलीयेत. =)) विक्रम करणार बहुतेक !

विकास's picture

16 May 2014 - 11:38 am | विकास

बिच्चारी! =))

टवाळ कार्टा's picture

16 May 2014 - 11:42 am | टवाळ कार्टा

जाहिर सत्कार करायला पाहिजे "त्या" ५८ जणांचा =))

सुहासदवन's picture

16 May 2014 - 11:46 am | सुहासदवन

स्वतः राखी सावंत आणि तिच्या पक्षाचा उमेदवार हे दोघे सोडून बाकी ते कोण "अब तक छप्पन्न" आहेत, ज्यांनी तिला मत दिले?
त्यांना काय शिक्षा द्यावी बर्रर्रर्र>>>>

टवाळ कार्टा's picture

16 May 2014 - 12:59 pm | टवाळ कार्टा

त्यांना काय शिक्षा द्यावी बर्रर्रर्र

राखी सावंत बरोबर लग्न लावुन दिले तर??? =))

नेत्रेश's picture

16 May 2014 - 1:33 pm | नेत्रेश

एवढ्या छोट्या गोष्टीसाठी त्यांना आयुष्यातुन उठवायचे काय?

१) तिच्याकडे कोटयावधी रुपयांची मालमत्ता आहे.
२) ती निरक्षर आहे. :)

बॅटमॅन's picture

16 May 2014 - 12:19 pm | बॅटमॅन

निरक्षर? ते कसे काय बुवा?