डोंबिवली कट्टा वृत्तांत

भाते's picture
भाते in जनातलं, मनातलं
5 Apr 2014 - 10:45 am

कट्टा ऊत्त्सवमुर्ती निनादने सुचवल्याप्रमाणे दरवेळी एकानेच संपुर्ण वृत्तांत लिहिण्याच्या प्रथेला छेद देऊन कोणीतरी एकाने सुरुवात करून बाकीच्यांनी त्या वृत्तांतांत प्रतिसादांमधुन भर घालायची असे ठरल्याने वृत्तांतांची सुरुवात करण्याचे काम माझ्यावर ढकलण्यात आले.

साडेसातच्या सुमारास नंदी पॅलेस येथे जमायचे ठरले असल्याने मी हॉटेलसमोर जाऊन इतरांची वाट पहात ऊभा होतो. माझ्या समोरच आणखी एक गृहस्थ इतर कोणाचीतरी वाट पहात ऊभे होते. निनाद आल्यावर एकमेकांची ओळख करून घेऊन आम्ही दोघे आतमध्ये शिरलो.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधला चेंडूफळीचा ट-२० विश्वचषक स्पर्धेचा उपांत्य सामना मोठया पडद्यावर पहायची सोय हॉटेलवाल्यांनी आधीच आमच्यासारख्या क्रिडारसिकांसाठी करून ठेवलेली बघुन हा कट्टादेखिल नेहमीप्रमाणे रंगणार याची खात्री झाली.

मी आणि निनादने स्थानग्रहण केल्यावर आम्ही इतर मिपाकरांची वाट पहात होतो. मघाशी बाहेर ऊभा असलेला इसम मला अस्वस्थ करत होता. निनादला सांगुन मी पुन्हा बाहेर आलो व सरळ त्या गृहस्थांसमोर जाऊन ऊभा राहिलो. त्यांच्याकडे विचारपुस केल्यावर ते गृहस्थ मिपावरचे कंजूस काका आहेत हे समजले. मग त्यांना माझी ओळख करून देऊन मी पुन्हा त्यांच्याबरोबर आतमध्ये गेलो. मग निनादबरोबर ओळख झाल्यावर, आम्ही तिघेही पक्के डोंबिवलीकर असल्याने, आमच्या डोंबिवलीविषयी गप्पा चालु झाल्या. इतक्यात भ ट क्या खे ड वा ला यांचे आगमन झाले. नेहमीप्रमाणे त्यांनी आम्हा सर्वासाठी कुपीतुन कुठलेसे अत्तर आणले होते. इतक्यात मुक्तविहारि यांच्याशी आधीच भमणध्वनीवरून संभाषण झाले असल्याचे निनादने आम्हाला सांगितले. तेव्हाच एका युवकाचे आगमन झाले. जिजामाता ऊद्यान कट्टा चुकवल्यामुळे तो युवक म्हणजे ज्यु. मुवि आहे याची मला कल्पना नव्हती. भ ट क्या खे ड वा ला यांनी आम्हाला त्याची ओळख करून दिली.

(च्यायला, मिपावर सुध्दा घराणेशाही!) आपण येऊ शकत नसल्याने आपला प्रतिनिधी म्हणुन ज्यु. मुवि! कट्टयाला मुविंची भासत असलेली उणिव त्यांच्या सुपुत्राने भरून काढली.

इतक्यात निनादच्या भमणध्वनीवर साक्षात मुक्तविहारि यांच्याकडुन बोलावणे आले. हे साहेब म्हणे तिकडे उंटावर बसुन शेळ्या हाकत… सॉरी, गप्पा मारत होते. मग निनादकडुन कट्टा सुरळीत चालु असल्याची खात्री करून झाल्यावर मुवि भ ट क्या खे ड वा ला यांच्याशी बोलले.

आमच्या गप्पा चालु असताना विनोद१८ यांचे आगमन झाले. पुन्हा एकदा ओळख परेड झाल्यावर आमच्या गप्पा रंगल्या. कुठलाही कट्टा सुबोध खरे यांच्याशिवाय अपुर्णच! आमच्या गप्पा चालु असताना डॉक्टरसाहेब आल्यावर आमचा कट्टा पुढे चालु झाला...

वरती लिहिल्याप्रमाणे कट्टा वृत्तांत अपुर्ण आहे. मधल्या गाळलेल्या जागा आणि पुढचा वृत्तांत इतर कट्टेकरी पुर्ण करतीलच. (तेव्हा प्रतिसाद देताना बोंबा मारू नयेत. शिमगा नुकताच झाला असल्याने ती संधी गेली आहे.)

या वृत्तांतांत मुद्दामुन खादाडीचा ऊल्लेख टाळला आहे. खादाडीचे फोटो घेण्याचा मोह टाळुन इतर फोटो विनोद१८ यांच्याकडुन येतीलच.

इस्पिकचा एक्का काका, जे.डी., हेमांगी के, दिपक कुवेत यांच्यासारख्या ऊत्त्सवमुर्ती बरोबर कट्टे साजरे केल्यानंतर 'निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी' समावेत हा माझा आणखी एक कट्टा!

मुक्तकविरंगुळा

प्रतिक्रिया

पैसा's picture

5 Apr 2014 - 10:54 am | पैसा

भाते, मस्त लिहिताय तुम्ही. आता फक्त कट्ट्याचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया एवढ्यावर थांबू नका!

मुक्त विहारि's picture

5 Apr 2014 - 2:43 pm | मुक्त विहारि

सहमत

आत्मशून्य's picture

5 Apr 2014 - 2:43 pm | आत्मशून्य

ज्युमुवींची उपस्थिती मनाला आनंद देउन गेली.

प्रचेतस's picture

5 Apr 2014 - 11:04 am | प्रचेतस

मजा करा लेको.

दिव्यश्री's picture

5 Apr 2014 - 11:07 am | दिव्यश्री

छान लिहिलंय . :)

आता फक्त कट्ट्याचे वृत्तांत आणि प्रतिक्रिया एवढ्यावर थांबू नका!>>>++++++ १

खटपट्या's picture

5 Apr 2014 - 12:00 pm | खटपट्या

फोटोची प्रतीक्षा

मुक्त विहारि's picture

5 Apr 2014 - 2:42 pm | मुक्त विहारि

लगे रहो....

पैसा ताईंच्या प्रतिसादाशी सहमत.

(मुलाने कट्टा एंजॉय केला, असे सौ.मुविंकडून समजले.)

स्वप्नांची राणी's picture

5 Apr 2014 - 2:54 pm | स्वप्नांची राणी

नंदी पॅलेस म्हणजे अगदी आमच्या अंगणात कट्टे करताय कि तुम्ही लोक!! यापुढे मला अक्षतांसकट आमंत्रण न आल्यास नंदी पॅलेस मधे कट्टा करता येणार नाही हे वेगळे सांगणे न लगे... कळावे, लोभ असावा..!!

अजया's picture

5 Apr 2014 - 3:18 pm | अजया

:-/

कळ्ळं का मध्यवर्ती ठिकाणवाले लोक्स !

अजया's picture

5 Apr 2014 - 3:18 pm | अजया

:-/

कळ्ळं का मध्यवर्ती ठिकाणवाले लोक्स !

कट्टयाचा काही उद्देश असावा असं मला नेहमी वाटते .त्यात आपल्या छंदाचीच आवड असणाऱ्यांशी ओळखी आणि खादाडीची भर पडते .घारापुरीला ही हेच झाले .
निनाद जर्मनीला स्थायिक असल्यामुळे फारच उत्सुकता होती .तिथले जीवन ,आहार ,आचार ,शिक्षणपध्दती या सर्वांचीच त्याने पटापट उत्तरे दिली .ज्यु० मुविला त्याने मार्गदर्शन केले .क्रिकेट आणि निवडणूका या {कंटाळवाण्या}विषयांना कल्टि मारण्यात आली .पूर्ण चार तास चर्चा झाली .शेवटी निनादने स्वत:चे बालपण ,शिक्षण ,व्यवसाय याबद्दल सांगितले .भारतीयांना परदेशांत संस्कृतीबदलामुळे बऱ्याच अडचणी येतात अथवा तडजोडी कराव्या लागतात .रुळायला थोडा वेळ लागतो ।
शुक्रवार असल्यामुळे फारशी गर्दी नव्हती .

ठरल्याप्रमाणे हा आमचा कट्टा अगदी व्यवस्थित पार पडला. निनाद्बरोबर परिचय झाला वर भाते व कंजुस यांनी लिहील्याप्रमाणे भरपूर गप्पागोष्टी केल्या त्याचबरोबर नेहमीसारखे खाणेपिणे होतेच, आम्ही उपस्थितांनी या कट्ट्याचा अगदी मनमुराद आनंद घेतला. खाली मी काढलेल्या फोटोंची लिंक देत आहे, हे अशा पद्धतीने मी प्रथमच देत आहे, मला वाटते ते आपण सर्व पाहु शकाल.

https://plus.google.com/photos/118210940635598474000/albums/599914396535...

@....स्वप्नांची राणी पुढ्च्यावेळी तुमच्या अंगणात नंदी पॅलेस मधे कट्टा करण्याअगोदर तुम्हाला अक्षतांसकट आमंत्रण नक्कीच देण्यात येइल त्याचा मान आपण राखावा अशी आशा व्यक्त करतो सर्व मिपाकर कट्टेकरांच्या वतीने.

विनोद१८'s picture

6 Apr 2014 - 5:47 pm | विनोद१८

जरा तज्ञांनी मदत करावी.

पैसा's picture

6 Apr 2014 - 6:00 pm | पैसा

आता पब्लिक अ‍ॅक्सेस नाहीये. सगळ्यांबरोबर शेअर करा म्हणजे सगळ्याना दिसतील.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Apr 2014 - 6:53 pm | अत्रुप्त आत्मा

आद्दी द्या फोटू! :-/ मंगच आमी कट्टेकर्‍यांना भेटू! http://www.freesmileys.org/smileys/smiley-happy010.gif

मुक्त विहारि's picture

6 Apr 2014 - 7:36 pm | मुक्त विहारि

त्यासाठी तुम्हाला पुणे सोडून मध्यवर्ती ठिकाणाला म्हणजेच, डोंबिवलीला यावे लागेल.

सस्नेह's picture

6 Apr 2014 - 10:23 pm | सस्नेह

छोटासा पण चटपटीत !
फोटोंच्या प्रतिक्षेत.

भ ट क्या खे ड वा ला's picture

6 Apr 2014 - 10:40 pm | भ ट क्या खे ड वा ला

असं म्हणतात कि जिथे रामकथा सुरु असेल तिथे हनुमान उपस्थित असतो.
त्याप्रमाणे जिथे मिपा करांचा कट्टा असतो तिथे मुक्तविहारी हजर असतात.(तसे ते मंगळावर देखील जाऊन आले आहेत) त्यांचा फोन आला होता आणि चि. निहार सुद्धा हजर होता. निनाद यांच्याकडून जर्मनी बद्दल बरीच माहिती मिळाली. निनाद यांनी, ते काम करीत असलेले क्षेत्र का आणि कसे निवडले, हे तरुण पिढीने ऐकण्यासारखे आहे. चेंडू फळी च्या सामन्याकडे मुद्दाम पाठ करून बसल्यामुळे कट्ट्याचा पूर्ण आनंद घेता आला. कंजूस यांची प्रथमच भेट झाली. शनि, रवि वार सोडून ट्रेक करण्याची त्यांची कल्पना खूपच आवडली. डॉक्टर खरे यांनी नेहमी प्रमाणे गप्पांमध्ये जान भरली. विनोद १८ यांनी फोटो काढले आहेत ते दिसतीलच. भाते यांनी वृत्तांताची सुरवात छान करून दिली आहे.
आणि शेवटी डोंबिवली स्टेशन वर निनाद आणि डॉक्टर खरे यांनी ज्या त्वरेने गाडी साठी धाव घेतली त्यावरून डॉक्टरांचा फिटनेस दिसतो त्यापेक्षा खूपच उच्च दर्जाचा आहे याही खात्री पटली.

सही >शुद्ध लेखनाच्या सर्व चुका मायमराठी च्या लेकरांनी माफ केल्या नाही तरी माय मराठी नक्की माफ करेल. याची खात्री असलेला<

विनोद१८'s picture

6 Apr 2014 - 11:53 pm | विनोद१८

जरा॑ फोटो लोड करण्यात घोटळा झाला हे खरे, पण लौकरच फोटो दिसतील.

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 12:16 pm | सुबोध खरे

.

हे काय भाते नी मिशी उडवलेली दिसतेय ! इ नॉय चॉलबे ! ;)
और फोटु आनदो...

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 12:21 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 12:22 pm | सुबोध खरे

,

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 12:23 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 12:24 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 12:25 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 12:25 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 12:25 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 12:26 pm | सुबोध खरे

junior muvi

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 12:27 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 12:27 pm | सुबोध खरे

.

प्यारे१'s picture

7 Apr 2014 - 1:37 pm | प्यारे१

संघ.... विकीर!

ब़जरबट्टू's picture

8 Apr 2014 - 10:58 am | ब़जरबट्टू

जवळ कुठे राष्ट्रगीत सुरु होते का हो ?
स्गळेच सावधान दिसताहेत.. +)) :))

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 12:28 pm | सुबोध खरे

.

सुबोध खरे's picture

7 Apr 2014 - 12:28 pm | सुबोध खरे

.

पिलीयन रायडर's picture

7 Apr 2014 - 2:14 pm | पिलीयन रायडर

हे फोटो वरच नाव टाकायची आयडिया छान आहे.. आवडली!!

वृतांतही मस्त! छान लिहीत आहात भाते..

हे फोटो वरच नाव टाकायची आयडिया छान आहे.. आवडली!!

+१००... असेच म्हणतो.

अवांतरः फोटो मध्ये सगळ्यांचे डोळे बरेच जड झालेले दिसताहेत. ;)

आता निनादबरोबर 'पक्षी तिर्थ कट्टा' असल्यामुळे ते तर होणारच होते. म्हणुनच इतरांची जळजळ होऊ नये याची काळजी घेऊन खादाडीचा ऊल्लेख आणि फोटो या वृत्तांतांत दिसत नाही आहे.

प्रभाकर पेठकर's picture

7 Apr 2014 - 3:16 pm | प्रभाकर पेठकर

डॉ. सुहास खरे आणि डॉ. सुबोध खरे ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत का?

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Apr 2014 - 3:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

जुळे भाउ !? मग मी नक्की कोणाला भेटलो होतो???

(डॉ ह घ्या)

स्वप्नांची राणी's picture

7 Apr 2014 - 6:24 pm | स्वप्नांची राणी

डोळे जड झाल्यामुळे नीट दिसलं नसावं बहुतेक.... *crazy* *CRAZY* :crazy:

डॉ सुहास म्हात्रे's picture

7 Apr 2014 - 8:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

नाय हो. मी त्या "डोळे जड" वाल्या पार्टीत नव्हतो. मी ज्या वेगळ्या कट्ट्याला हजर होतो तो भर दुपारचा कोरडा कट्टा होता :(

मनातल्या मनातः ओळख करून घेण्याच्या अगोदर डोळे जड होण्याइतकी परिस्थिती बिघडली नाही असा अंदाज आहे ;)

स्वप्नांची राणी's picture

7 Apr 2014 - 3:22 pm | स्वप्नांची राणी

ज्यु.मुवि एकदम अनुष्का शर्मा चा भाउ असल्यासारखे दिसतायेत.

म्मस्स्त वृत्तांत हो भातेसाहेब!! आणि खरच ती फोटोवर नाव घालायची आयडिया भारिये! उगाचच ते 'डाविकडुन तिसरे आणि उजविकडुन पाचवे' ची गरज नाहि.

प्रभाकर पेठकर's picture

8 Apr 2014 - 1:33 am | प्रभाकर पेठकर

मुविंना भेटलो आहे मी. ते कांही अनुष्काचे 'बाबा' वाटत नाहीत.

विनोद१८'s picture

7 Apr 2014 - 3:55 pm | विनोद१८

डॉ. सुहास खरे आणि डॉ. सुबोध खरे ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्ती आहेत का ? नाही

बरोबर आहे तुमचे, ही माझ्याकडून चूक झाली मान्य आहे. ते 'डॉ. सुबोध खरे' असेच हवे होते. पुढच्यावेळी असे होणार नाही याची काळजी घेइन.

@...डॉ. सुबोध खरे : क्षमस्व.

चूक लक्षात आणुन दिल्यबद्दल धन्यवाद.

शैलेन्द्र's picture

8 Apr 2014 - 10:17 am | शैलेन्द्र

वा , मस्त झाला कट्टा, माझा चुकला, पुण्यात अडकलेलो :(

मुक्त विहारि's picture

8 Apr 2014 - 11:57 pm | मुक्त विहारि

जून मध्ये भेटलो की परत कट्टा करू.

सूड's picture

8 Apr 2014 - 11:10 am | सूड

ह्म्म!!

समीरसूर's picture

8 Apr 2014 - 11:51 am | समीरसूर

मजा आली वाचून. फोटो छान!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

9 Apr 2014 - 1:23 am | निनाद मुक्काम प...

कट्ट्याचा वृत्तांत व प्रतिसाद आवडले. हा माझा मिपाचा दुसरा कट्टा होता.
माझ्या जन्मगावात हा कट्टा असल्याने तिथे जाण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. डॉ खरे वगळता इतर मिपाकारांशी मी पहिल्यांदा भेटत होतो. आदल्या दिवशी मूवी ह्यांनी खास सौदी अरेबियातून मला फोन केला होता.
मूवी कंजूस काका.भ ट क्या खे ड वा ला ,विनोद१८ ,
सर्वांशी मनोसोक्त गप्पा झाल्या.
कट्टा संपला तेव्हा नुसते डोळे नाही तर अंत करण सुद्धा जड झाले होते.
ज्यांच्याशी आपण आभासी जगतात संपर्क साधतो , पुढे लिखाण व प्रतिसादातून एकेक व्यक्ती व त्यातील वल्ली आपल्यापुढे उलघडत जातात. पुढे ही सर्व मंडळी आपल्या भाव विश्वाचा एक भाग बनून जातात.
मूवी सारखा एक कलंदर स्वतः भारतात नसले तरी माझ्या सारखा एक डोंबिवलीकर परदेशातून येउन डोंबिवलीत कट्टा करण्याची इच्छा मिपावरील एका धाग्यात व्यक्त केली म्हणून पुढाकार घेऊन कट्टा आयोजित करतात.
स्वतः फोन करून आपली कट्ट्यात हजेरी लावतात हे सारे विलक्षण आहे.
कट्ट्याच्या सुरवातीला भाते व माझी डोंबिवली ह्या विषयावर चर्चा झाली. पण पूर्वीचे डोंबिवली आता राहिले नाही असे चुकून सुद्धा आमच्या तोंडातून आले नाही.
डॉ ह्यांचे त्यांच्या शेत्रातील अनुभव त्यांच्या तोंडून ऐकल्यावर त्यांच्या अनेक धाग्यांवर मी जी मतांतरे व्यक्त केली होती त्या बद्दल काही अंशी माझे मत परिवर्तन झाले हे ह्या निमित्ताने जाहीररीत्या मी कबूल करतो.
एक डोंबिवलीकर व मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान हृदयात दृढ करून मी डोंबिवली स्टेशन वरून प्रयाण केले.