माझं खोबार... भाग १

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
3 Oct 2008 - 5:16 am

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५ , ... भाग ६ , ... भाग ७ , ... भाग ८

*************

मंडळी, काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक अगदीच अनपेक्षित वळण आले. ध्यानी मनी नसताना किंवा कुठल्याही प्रकारचे प्लॅनिंग नसताना मला परदेशात नोकरी करायचा योग आला. आणि तो परदेश पण साधासुधा असातसा नाही, चक्क 'सौदी अरेबिया', ज्या देशाबद्दल आपल्याला नेहमीच एक भीती वाटत असते आणि कुतूहल पण तेवढेच असते. तर माझ्या या सौदी गमन आणि वास्तव्याबद्दल माझे काही अनुभव आहेत ते इथे मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.

मी इथे जे काही लिहिणार आहे ते पूर्णपणे सत्य असणार आहे, त्यात कुठल्याही प्रकारची काल्पनिक पात्रं किंवा घटना नसतील. मी आयुष्यात हा पहिलाच लिहिण्याचा प्रयत्न करतो आहे. ऑल सजेशन्स आर वेलकम. (एक वाक्य पुलंचं उधार - या लिखाणात साहित्यिक मूल्यं वगैरे शोधू नका, नाही म्हणजे मिळणार नाहीत म्हणुन सांगितलं आपलं, उगाच तुमची निराशा ;) )

*************

१९९८ चा सप्टेंबर - ऑक्टोबर महिना असेल. दसरा जवळ आला होता. तेव्हा मी भारतातिल एका 'चिकट पदार्थ' बनवणार्‍या प्रसिद्ध कंपनीत 'Every Day Problem' म्हणजेच इडिपी डिपार्टमेंट मधे काम करत होतो. तेव्हा आपल्याकडे ERP प्रकारची सॉफ्टवेअर्स नुकतीच आली होती. आमच्या कंपनीतही असेच एक सॉफ्टवेअर बसवायचे काम चालले होते. आमची भरती पण होतीच इंप्लिमेंटेशन टीम मधे. सॉफ्टवेअर व्हेण्डर च्या टीम मधल्या लोकांशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित झाले होते.

अशातच एक दिवस, त्यांच्या पैकी एक वरिष्ठ मला 'विश्रांतिगृहातील' महत्त्वाचे काम करत असताना हळूच म्हणाला "लंच के बाद नीचे मिल मेरेको". मला टेंशन. म्हणलं काल एका डिलिव्हरेबल बद्दल काही वाद झाला त्यात काही कमीजास्त बोलणं झालं काय आपल्याकडून? पण तसा धोकाही नव्हता म्हणा. तो होता गुज्जु आणि प्रकृतिने किरकोळ. काय ४-५ श्या दिल्या असत्या तरी कानाला गोडच वाटलं असतं. ठरल्याप्रमाणे त्याला खाली जाऊन भेटलो लंच नंतर. मला चक्क नोकरीची ऑफर देत होते साहेब. आणि माझ्या कंपनीत कोणाला संशय येऊ नये म्हणून मला खाली बोलवून वगैरे बोलणं चाललं होतं. त्यानंतरच्या दसर्‍याच्या मुहुर्तावर त्याला माझ्या सी.व्ही. ची प्रत दिली आणि अश्या प्रकारे माझ्या आयुष्यातल्या सौदी प्रकरणाला सुरुवात झाली.

**************

आता सगळ्यात पहिले काम काय तर, आमच्या नविन कंपनीच्या दुबईस्थित बड्या लोकांना टेलिफोनिक इंटरव्ह्यू द्यायचा आणि खुंटा बळकट करायचा. दिवस ठरला, वेळ ठरली. आता मात्र मनात एक धाकधूक व्हायला लागली होती. इतके दिवस परदेशगमनाचे काहीच प्लॅन्स नव्हते पण अशी एक संधी समोर दिसायला लागली आणि मनात एक अपेक्षा निर्माण झाली. बरं माझी जरी रास कन्या नसली तरी माझ्या आई-वडिलांची रास कन्या आहे ना... त्या मुळे वाण नाही पण गुण लागलाच थोडासा. खूपच नर्व्हस झालो होतो. ठरल्या दिवशी काही कॉल झालाच नाही. असं अजून १-२ वेळा झालं, आता मात्र माझी खात्री झाली की हे काम काय पुढे जात नाही. मग मी परत निश्चिंत, होतच नाहिये तर कशाला काळजीने मरा? एक दिवस अचानक फोन आला की तो इंटरव्ह्यू घेणारा भाऊ उद्या मुंबईतच येतोय आणि त्याला तुला प्रत्यक्ष भेटायचं आहे. मी परत नर्व्हस. तसाच गेलो त्याला भेटायला त्याच्या हॉटेलवर. बघतो तर साहेब टी.व्ही. वर चक्क क्रिकेट ची मॅच बघत होते. पुढचा अर्धा तास मग नुसत्या गप्पा आणि क्रिकेट बद्दल बोलणं. मला खरंच खूप टेंशन आलं की हा कामाचं का नाही बोलत आहे. थोड्या वेळाने त्याने मला अचानक विचारलं, "तुला तर फायनान्स डोमेन चा काहीच अनुभव नाही". मी गप्पच, काय बोलणार, तो म्हणत होता ते खरंच होतं. मग त्याने विचारलं, "तुला बॅलन्स शीट बद्दल काय माहिती आहे?" आता मी थोडं विचार करून उत्तर देणार तेवढ्यात माझ्यातला प्रामणिक बंडू लगेच उत्तरला, "डेबिट शुड बी इक्वल टू क्रेडिट" आता वाचा जायची पाळी त्याची होती. तरी तोच पुढे म्हणाला, "पाण्यात फेकला तुला तर पोहशील की बुडशील?". मला त्याचा रोख कळला, मी पण त्याला उलटा प्रश्न केला, "मला पाण्यात फेकताना पाठीला डबा बांधणार की तसंच फेकणार?" मी बोललो खरा पण बोलल्यानंतर लक्षात आलं की आपण काय बोलून बसलो. पण तो खूप हसला आणि म्हणाला "तुझा हजरजबाबी पणा आवडला, पण ऑफकोर्स डब्याशिवाय फेकणार". तो पर्यंत माझाही धीर चेपला, मलाही अंदाज आला होता की हा खरंच इंटरव्ह्यूच चालू आहे आणि मला ही पध्दत आवडली होती. मी त्याला उत्तर दिले, "ऑफ कोर्स, आय विल स्विम. हाऊ टू अचिव्ह दॅट इज माय प्रॉब्लेम, बट आय ऍम कॉन्फिडंट" हे सगळं आज लिहिताना एवढा वेळ लागतो आहे पण तेव्हा हे सगळं अक्षरशः क्षणार्धात घडलं. नंतर माझ्या लक्षात आलं की मला काय येतंय किंवा येत नाहिये याच्या मधे फारसा रस त्याला नव्हताच. ते सगळं त्याने आधीच मला ओळखणार्‍या निरनिराळ्या टीम मेंबर्सना गाठून काढून घेतलं होतं. त्याला फक्त माझी पर्सनॅलिटी टेस्ट घ्यायची होती. आणि त्या क्रिकेटच्या गप्पा वगैरे सगळं त्याच एका हेतूने चाललं होतं. त्याने पुढचा प्रश्न विचारला "सौदी अरेबियात काम करशील, की दुबईच पाहिजे?" मला कुठं काय कळत होतं तेव्हा दुबई काय आणि सौदी अरेबिया काय. मी म्हणलं, "माझा असा काही प्रेफरंस नाहिये."

आणि मंडळी अश्या रितीने माझी पहिली परदेशातील नोकरी पक्की झाली.

क्रमशः

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

3 Oct 2008 - 5:21 am | मुक्तसुनीत

अरे वा ! माझाच पहिला प्रतिसाद ! (हे क्वचित होते; आमचे एरवी नेहमी वरातीमागून घोडे असते :-) )

बिपिनराव , शुद्ध मराठीत सांगायचे तर एकदम इंटरेष्टींग सुरवात आहे. तुम्हाला मिसळपाववरचे येलोनॉटी माहिती आहेत काय ? त्यांच्या ष्टोर्‍या अशाच झकास असतात ! त्यांना कुणीतरी चेला मिळतोयसे दिसते आहे.

बाकी क्रमशः बघून तेव्हढे लोक वैतागणार. कायतरी महत्त्वाचे येते आणि क्रमशः चा मक्षिकापात होतो ! आम्ही वाट पहातो :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Oct 2008 - 5:32 am | बिपिन कार्यकर्ते

यलोनॉटी आमच्या आदरस्थानांपैकी एक आहेत हो... त्यांच्याशी तुलना डायरेक्ट? ये तो आपका बड़प्पन है वर्ना... कसचं कसचं :)

बिपिन.

पिवळा डांबिस's picture

4 Oct 2008 - 10:08 pm | पिवळा डांबिस

बिपिनराव, सुरवात चांगली केली आहे....
छान लिहिताय तुम्ही. आगे बढो फुल कॉन्फिडन्स के साथ!!

आणि मुक्तसुनीतराव तुमची फिरकी घेतायत!:)
त्या साल्या येलोनॉटीला आदरस्थान (कै. झाल्यासारखं वाटतं!!!) वगैरे करू नका, फारतर मित्र समजा....
अवजड शब्दजंजाळ ही मुक्तसुनितांची स्पेश्यालिटी आहे, तुमची-आमची नाही!!!! (मुसू, ह. घे!!)
:)

बाकी क्रमशः टाकणारे लेखक भेटले की त्या येलोनॉटीच्या प्रेमाला खूप भरती येते (असं ऐकून आहे हो.....:))

भाग्यश्री's picture

3 Oct 2008 - 5:25 am | भाग्यश्री

वा काय सही सुरवात आहे.. खूप आवडलं.. येऊदे पटापट आता! :)

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Oct 2008 - 5:33 am | बिपिन कार्यकर्ते

येतांव हां, येतांव... जरा दम धरा... ;)

टारझन's picture

3 Oct 2008 - 3:08 pm | टारझन

काय बिप्पिन भौ ... तुम्ही पण इंप्लिमेंटेशननेच सुरूवात केली का ? वा वा वा !!
आता आम्हाला करियर गायडंस (इंग्रजीत समुपदेशन) करा .... जबरा ... तसा मी ही हल्ली युरोप-अरब कंट्रीज मधे पोहायचं म्हणतोय ..
तुमच्याकड जॅक लावायला हवा ... फक्त टेस्ट मधे सेम प्रश्न विचारा .... नाय तर लोचा ..

:)

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

प्रियाली's picture

3 Oct 2008 - 5:27 am | प्रियाली

सुरुवात चांगली झाली. सौदीला गेलास का काय?

पु.ले.शु.

स्वप्निल..'s picture

3 Oct 2008 - 5:36 am | स्वप्निल..

बाकी खोबार म्हणजे काय मलापण नाही समजले.

बिपिन,

सुरुवात चांगली झालेली आहे..तेव्हा पुढच्या भागासाठी जास्त वाट बघायला नको लाउ..

स्वप्निल

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Oct 2008 - 5:34 am | बिपिन कार्यकर्ते

ऑफकोर्स... :) :) :)

मदनबाण's picture

3 Oct 2008 - 5:51 am | मदनबाण

बिपिनजी मस्त.. पुढचा भाग लवकर लिहा.. :)

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

गणा मास्तर's picture

3 Oct 2008 - 6:45 am | गणा मास्तर

चांगल लिहितो आहेस
क्रमश करावेच लागेल पण भाग तरी मोठे आणि भरभर टाक
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

विसोबा खेचर's picture

3 Oct 2008 - 8:02 am | विसोबा खेचर

बिपिनकाका,

मस्त सुरवात बरं का! म्होरलेही भाग येऊ द्यात पटापट... :)

तात्या.

सहज's picture

3 Oct 2008 - 8:11 am | सहज

सुरवात आवडली. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

आता पुढील भाग वेळेवर आणा.

अनिल हटेला's picture

3 Oct 2008 - 8:18 am | अनिल हटेला

मला आधी वाटल माझ खोबर नावाचा काही पोपट झाल्याचा अनुभव वगैरे आहे की काय !!

बिपिन भो एकदम सही सुरुवात ,काय !!!

>>या लिखाणात साहित्यिक मूल्यं वगैरे शोधू नका, नाही म्हणजे मिळणार नाहीत म्हणुन सांगितलं आपलं, उगाच तुमची निराशा
साहित्यीक मुल्य वगैरे शोधण्या साठी आम्ही नाही आहोत मिपा वर !!

आम्हाला निर्भेळ आणी दर्जेदार लिखाण हव , आणी ते नक्कीच इथे वाचायला मिळतये ...

अवांतरः क्रमशः चा प्रादूर्भाव सौदी पर्यंत पोचला की काय .....जरा मोठे भाग लिहा प्लीज .....
अर्धवट पोटी ताटावरून उठवल्याच पातक लागेल नाय तर तुम्हा क्रमशः मंडळींना !!!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

नंदन's picture

3 Oct 2008 - 8:57 am | नंदन

सुरुवात तर झकास झालीय. पुढच्या भागांची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सखाराम_गटणे™'s picture

3 Oct 2008 - 9:03 am | सखाराम_गटणे™

बिपिनराव सुरवात चांगली केली आहे.

काय ४-५ श्या दिल्या असत्या तरी कानाला गोडच वाटलं असतं.
हे वाक्य आवडले आणि पाण्यात पोहणे पण आवडले.

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची.
:)

प्रमोद देव's picture

3 Oct 2008 - 9:09 am | प्रमोद देव

सुरुवात आवडली. आता पुढचे भाग वाचायला उत्सुक आहे .
शेख-अल्-बिपिन असेच 'कार्य'कर्ते राहा.

ऋषिकेश's picture

3 Oct 2008 - 9:11 am | ऋषिकेश

ऑफ कोर्स, आय विल स्विम. हाऊ टू अचिव्ह दॅट इज माय प्रॉब्लेम, बट आय ऍम कॉन्फिडंट

शाबास रं मर्दा! :)

सुरवात अतिशय मस्त! पुढचे भाग येऊ देत लवकर :)

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

वैशाली हसमनीस's picture

3 Oct 2008 - 11:24 am | वैशाली हसमनीस

मस्त ! पुढील भाग वाचण्यास उत्सुक.केव्हां लिहीता ?

आनंदयात्री's picture

3 Oct 2008 - 11:32 am | आनंदयात्री

कार्यकर्ते पण घुसले की !!
येउद्या साहेब .. पहिला भाग इंटरेश्टिंग झालाय.

अवलिया's picture

3 Oct 2008 - 11:44 am | अवलिया

बिपिन शेठ

मस्त

पण पुढचे भाग पटापट येवुद्या

सुरुवात दमदार झाली आहे! मिसळपावात मुटका मारलाच आहे ना तर आता येऊद्यात भराभर!
हजरजबाब तुमच्यातला आत्मविश्वास दाखवतो. अल्-खोबर ला प्रयाण कधी झाले ते ऐकायचे आहे. आने दो और भी!
(मिपाकर मराठी पहिलीत नाहीत त्यामुळे क्रमशः थोडं जास्त ओळींनंतरही चालेल! ;)

(खुद के साथ बातां : इतके दिवस फक्त प्रतिक्रियेतून दिसणारे बिपिनराव लिहू लागले हा 'मिपा' इफेक्ट म्हणायचा का? ;))

चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2008 - 4:30 pm | बिपिन कार्यकर्ते

रंगाशेठ,

मिपाचे हे ऋण मलाच नाही तर बर्‍याच लिहित्या झालेल्यांना मान्य करावेच लागेल. नाहीतर मी शाळेत असताना निबंध लिहिले होते तेवढेच. इथे लिहिणार्‍या काही दिग्गजांचं लिखाण वाचून खूप छान वाटायचं. तसेच काही मित्र भेटले इथे मिपावर जे खरोखरच छान लिहायचे, गप्पा होत होत्या. म्हणून आपण पण प्रयत्न करावा असे वाटले. मला उणिवा कळत आहेत पण बहुतेक प्रतिसाद उत्साहवर्धक होते. मी खरंच ऋणी आहे.

बिपिन.

विनायक प्रभू's picture

3 Oct 2008 - 1:11 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
प्रामाणिक बंडू आवड्ले रे बि.का.

मनस्वी's picture

3 Oct 2008 - 2:14 pm | मनस्वी

सुरुवात छान. पुढचा भाग लवकर येउदेत!

मनस्वी
*डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*

गणपा's picture

3 Oct 2008 - 1:41 pm | गणपा

मस्त लिहिलयस बिपिन, लगे रहो...

बापु देवकर's picture

3 Oct 2008 - 2:14 pm | बापु देवकर

सुरवात मस्तच आहे....अजुन येवू देत...

सुनील's picture

3 Oct 2008 - 2:16 pm | सुनील

छान सुरुवात. अजून येऊध्यात पण भाग जरा मोठे करा.

पु ले शु
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विजुभाऊ's picture

3 Oct 2008 - 2:20 pm | विजुभाऊ

क्रमशः सोसायटीत स्वागत.
उत्तम ल्हिताय की
माझं खोबार हे शीर्षक वाचुन थोडा चक्रावलो. खोबार चे खोबरे झाले आणि लेख ज्योतिबा / खंडोबा या देवस्थानावर असेल असे वाटले.

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

ऍडीजोशी's picture

3 Oct 2008 - 3:58 pm | ऍडीजोशी (not verified)

परत कधी येताय बँगलोर ला??

धमाल मुलगा's picture

3 Oct 2008 - 4:15 pm | धमाल मुलगा

बिपीनभौ,
सह्हीच!

नाही नाही म्हणत होता, एकदम धक्काच दिलात की फटकन एक लेख टाकून. तोही असा झकास :)
येऊ द्या...

बाकी, इतके दिवस आपली लेखनप्रतिभा का बरं दाबुन ठेवली होती?
वर विजुभौ शः नीं तुमचं सोसायटीत स्वागत केलेलंच आहे तेव्हा क्रमशःची चिंता नको.
फक्त आमचा चक्का करु नका म्हणजे मिळवली :)

आयला, ह्या क्रमशःवरुन आठवलं,

ओ तात्याबा,
रोशनीचा पुढचा भाग कधी मिळेल हो वाचायला?

मुक्तसुनीत's picture

3 Oct 2008 - 4:20 pm | मुक्तसुनीत

धमु,
तुमने हमारे मुंह की बात छिन ली !! :-)

>>> नाही नाही म्हणत होता, एकदम धक्काच दिलात की फटकन एक लेख टाकून. तोही असा झकास
बाकी, इतके दिवस आपली लेखनप्रतिभा का बरं दाबुन ठेवली होती?
वर विजुभौ शः नीं तुमचं सोसायटीत स्वागत केलेलंच आहे तेव्हा क्रमशःची चिंता नको.
फक्त आमचा चक्का करु नका म्हणजे मिळवली

च्या मारी आम्ही नेमके हेच म्हणून राह्यलो व्हतो.

लोकांना टाकण्याकरताच्या कौलासाठी थोडे अवांतर : धमु , बर्‍याच दिवसानी तुला पहातोय. बरे वाटतेय :-)

धमाल मुलगा's picture

3 Oct 2008 - 4:28 pm | धमाल मुलगा

>>लोकांना टाकण्याकरताच्या कौलासाठी थोडे अवांतर :
=)) आयला, झालं! संपलं आता. आली तुमच्यावर करडी नजर.

>>धमु , बर्‍याच दिवसानी तुला पहातोय. बरे वाटतेय
हल्ली हापिसात काम अंमळ वाढलं होतं हो, त्यात अगदीच डोकं भणाणलेलं, प्रतिसादही मनासारखे देता येत नव्हते. उगाच द्यायचे म्हणुन काय द्यायचे? म्हणुन शांत बसायचो. आज जरा वेळ मिळालाय तर घालतोय धुडगुस :)

बाकी, मंडळी, असाच लोभ ठेवा ह्या अजाण लेकरावर. मग मला जगच जिंकल्यासारखं आहे.

असो, अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमस्व!

टारझन's picture

3 Oct 2008 - 4:40 pm | टारझन

धमुला वाढदिवसाच्या ऍडव्हांस शुभेच्छा ! आणि बाकी मिपाकर ज्यांचे ज्यांचे वाढदिवस जेंव्हा असतील त्याच्या शुभेच्छा आत्ताच ..

घ्या अजुन मटेरिल कौलं फोडायला

-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

मेघना भुस्कुटे's picture

3 Oct 2008 - 8:27 pm | मेघना भुस्कुटे

=))
=))
=))

काय बिशाद परत मिपावर कुणी रिक्कामपणीचे कौल टाकील! जबरा टारू.... नातू शोभतोहेस हो!

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Oct 2008 - 11:59 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

>> काय बिशाद परत मिपावर कुणी रिक्कामपणीचे कौल टाकील! जबरा टारू.... नातू शोभतोहेस हो!
उगाच माझं नाव मधे आणून तू असा जो माझ्या मैत्रीचा अपमान केला आहेस आणि टारूबाळावर असणार्‍या माझ्या आज्जी-प्रेमाचा जो अपमान केला आहे ... X( ..त्याबद्दल तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
संपादकांचं याकडे लक्ष दिसत नाही की तू मुद्दाम मला यात घुसडत आहेस ...
जाऊ दे मेघना, फार पकवलं नाही मी सगळ्यांनाच ... होतं असं कधीकधी ... ;-)
(ह. घ्या असं सांगायची गरज नसावी)

(अवांतरः बिपीनभौंकडे तक्रार केली क्रमशः लवकर टाकलं म्हणून, मला स्वतःला सातवा भाग लिहिला पाहिजे)

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Oct 2008 - 4:32 pm | बिपिन कार्यकर्ते

रौशनी...

धम्या, तात्याला आता बहुतेक किडनॅपच करावं लागेल नाही तर खूप मोठ्ठं काहितरी घबाड प्रॉमिस करावं लागेल. तो ते रौशनीचं काय मनावर घेईना झालाय. प्लॅन करुया?

बिपिन.

प्रभाकर पेठकर's picture

3 Oct 2008 - 4:43 pm | प्रभाकर पेठकर

बिपिन राव
स्वागतम. मस्त सुरुवात. पण...

१) 'खोबार' ह्या शीर्षकाचा अर्थ कळला नाही.

२) लेख जरा आकाराने मोठा हवा. बा़जूला जो स्क्रोल-बार दिसतो त्याचा आकार साधारपणे १ सें.मी. होईपर्यत लिहीत राहा आणि उत्कंठावर्धक बिंदूजवळ 'क्रमशः' हाणा.

अभिनंदन.

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

बा़जूला जो स्क्रोल-बार दिसतो त्याचा आकार साधारपणे १ सें.मी. होईपर्यत लिहीत राहा आणि उत्कंठावर्धक बिंदूजवळ 'क्रमशः' हाणा ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायची काय गॅरेंटी हो पेठकर काका ..

आणि बा़जूला जो स्क्रोल-बार दिसतो त्याचा आकार साधारपणे १ सें.मी.

त्यांचा मॉनिटर ६४०x४८० असेल तर बरे आहे त्यांना. १९२०x१२०० वगैरे सारखा High resolution असेल तर बाकीची कार्ये सोडून दिवसभर लेखच लिहीत बसावे लागेल ना.

मग पुढच्या लेखात आणि मंडळी अश्या रितीने १ सें.मी. स्क्रोल-बार च्या नादात माझी परदेशातील नोकरी गेली. असा समारोप. :P

(स्वगत: एक तर कधी तरी प्रतिक्रिया देतोस, आणि त्या पण अवांतर :s )

प्रभाकर पेठकर's picture

4 Oct 2008 - 12:01 am | प्रभाकर पेठकर

ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळी व्हायची काय गॅरेंटी हो पेठकर काका ..
हे जुळवून आणण्याची हातोटी आत्मसात करणे कठीण नाही.

त्यांचा मॉनिटर ६४०x४८० असेल तर बरे आहे त्यांना. १९२०x१२०० वगैरे सारखा High resolution असेल तर बाकीची कार्ये सोडून दिवसभर लेखच लिहीत बसावे लागेल ना.
ही टेक्नीकल बाजू माझ्या मतीमंद मेदूत आलीच नाही.

आणि मंडळी अश्या रितीने १ सें.मी. स्क्रोल-बार च्या नादात माझी परदेशातील नोकरी गेली
लोकं ऑफिसात ऑफिसचीच कामे करतात अशी माझी भाबडी समजूत. पण तसे करत नसतील आणि नोकरी गेली तर त्याला सर्वस्वी तेच जबाबदार राहतील.

तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..

टारझन's picture

4 Oct 2008 - 12:01 am | टारझन

(स्वगत: एक तर कधी तरी प्रतिक्रिया देतोस, आणि त्या पण अवांतर )
अर्रे स्वगत घाबरतोस काय ? बिंद्धास्त प्रतिक्रिया दे ..वांतर असो वा अवांतर ...
असो तु अवांतर प्रतिक्रिया दिल्याबद्दल तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

तात्या थोडी माफी द्या हो
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Oct 2008 - 4:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

ऑफ कोर्स, आय विल स्विम. हाऊ टू अचिव्ह दॅट इज माय प्रॉब्लेम, बट आय ऍम कॉन्फिडंट

बिपीनचंद्ररावजी कार्यकर्तेसाहेब, मस्त लिहिताय. पण पॉज फारच लवकर घेतलात, आता पटापट टाका पुढचे भाग नायतर ऍसिडीटी वाढेल!

अदिती

अभिज्ञ's picture

3 Oct 2008 - 7:37 pm | अभिज्ञ

बिपीनदा,
मस्त सुरुवात.
फक्त पुढचे भाग मोठे येउ द्यात. :)

अभिज्ञ.

संदीप चित्रे's picture

3 Oct 2008 - 8:17 pm | संदीप चित्रे

बिपीनराव...
वाचतोय .. लवकर पुढचे येऊ दे.
आशा आहे सौदी अरेबियाबद्दलचे काही समज / गैरसमज क्लिअर होतील.

मेघना भुस्कुटे's picture

3 Oct 2008 - 8:23 pm | मेघना भुस्कुटे

सहिये....
पण एका दमात लिहायला काय होतं हो तुम्हां लोकांना?
क्रमश:चं शेपूट डकवून ठेवता ते?
असो -
मजा येतेय. 'डबा बांधून फेकणार की असंच फेकणार?' हे तर जबराच आहे! आपल्याला नसतं ब्वॉ सुचलं.
लवकर लवकर लिहा. यमीचा आदर्श ठेवून. ;)

सखी's picture

3 Oct 2008 - 9:17 pm | सखी

लेख आवडला - अजुन मोठा भाग चालला असता.
डेबिट शुड बी इक्वल टू क्रेडिट - हे तर खासच :) पु. ले. शु.

यशोधरा's picture

3 Oct 2008 - 11:48 pm | यशोधरा

>>मग पुढच्या लेखात आणि मंडळी अश्या रितीने १ सें.मी. स्क्रोल-बार च्या नादात माझी परदेशातील नोकरी गेली. असा समारोप.

=))

लिहा हो क्रमशः जमातीचे नवे पाईक!! लवकर लवकर लिहा!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Oct 2008 - 11:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बीपीन,
अनुभव कथन मस्त रंगतय रे !!! तितकं क्रमशः लांबवू नको यार :)

सुचेल तसं's picture

3 Oct 2008 - 11:53 pm | सुचेल तसं

चांगल चालू आहे बिपिनराव,

पुढचे भाग लवकर टाका....

Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

प्राजु's picture

3 Oct 2008 - 11:58 pm | प्राजु

परवाच मला तू खरड पाठवली आहेस की, क्रमशः चा कंटाळा येतो म्हणून.
आता तुझे क्रमशः वाचायला आवडतील तरीही.. जास्ती नको क्रमशः घेऊ बाबा. २-३ भागातच संपव..
सुरूवात आवडली हे मनापासून सांगते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ब्रिटिश टिंग्या's picture

4 Oct 2008 - 3:21 am | ब्रिटिश टिंग्या

पहिला छोटेखानी भाग आवडला! पुढचा भाग अंमळ मोठा असेल अशी आशा करतो!
असो, पुढिल भागाच्या प्रतिक्षेत! :)

- अल् टिंग्या!

शितल's picture

4 Oct 2008 - 3:43 am | शितल

लेखाची सुरूवात मस्तच झाली आहे.
बाकीच्या सारखे माझे ही म्हणणे आहे, पुढिल भाग लवकर वाचायला द्या. :)

भिंगरि's picture

4 Oct 2008 - 4:50 am | भिंगरि

सुरुवात आवडलि. असा जॉब इंटर्व्ह्यु मिळायला पण भाग्य लागत :). पुढचे भागहि लवकर टाका.

जैनाचं कार्ट's picture

4 Oct 2008 - 5:28 pm | जैनाचं कार्ट (not verified)

सुरवात अतिशय मस्त! पुढचे भाग येऊ देत लवकर

हे क्रमशः चे लपडं कोणी चालू केलं बॉ ?
पकडा व धुवा त्याला व घाला वाळत कट्यावर :D

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग