साहित्य :२ वाट्या बास्मति तान्दुळ. खडा मसाला,बिर्यानि मसाला, मटार्,टोफु, तळलेकान्दा,काजु,मनुके,चिरलेला कान्दा ,चि. टोम्याटो दहि १ वाटिं, तेल.पानि,मिठ,थोडे दुध आनि केशर,कोर्न फ्लोर अर्धा चमचा.
क्रुति: प्रथम सर्व खडा मसाला,मिठ आवडिनुसार घालुन बास्मति भात तयार करावा. मग एका भान्ड्यात तेल टाकुन त्यात
कान्दा टमाटा पर्तुन घ्या.मग त्यात बिर्यानि मसाला टाका.मग मटार आनि टोफुचे काप टाका. मिठ व एक वाटि दहि आनि थोडे पाणि घाला. व एक उकळि येउ द्या.आता अर्धा चमचा कोर्न फ्लोर मधे थोडे पाणी घालुन निट मिक्स करुन वरिल उकळत्या भाजित टाका आणि उकळू द्या. भाजि घट्ट्सर झालि कि ग्यास बन्द करा.
आता एका भान्ड्यला साजुक तुपाचा हात लावुन घ्या. मग त्यात सर्वात खालि भात त्यावर भाजि असे २ थर करावेत. नन्तर शेवट्च्या भाताच्या थरावर तळलेला कान्दा ,त.काजु,मनुके,कोथिम्बिर टाकावे.व मधे चमच्याने खड्डे करुन त्यात
केशराचे दुध घालवे.
आता हे भान्डे बारिक गॅस वर तवा ठेवुन त्यावर घट्ट झाकन लावुन त्यावर वजन ठेवुन २० मि. वाफु द्या.
२० मि.नन्तर टोफु बिर्यानि तयार.
प्रथमच लिहिले आहे.काहि चुक असल्यस माफ करावे.
सोबत बुन्दि रायता आनि आवडिचे सॅलद करावे.
प्रतिक्रिया
14 Feb 2014 - 3:11 pm | जेपी
व्हेरी गुड . शिकलात तर .
14 Feb 2014 - 3:15 pm | आरोही
हो शेवटि जमवलेच मि.पण अजुन खुप वेळ लागतो टाइप करायला. पण जमेन मला...
14 Feb 2014 - 3:18 pm | प्रचेतस
मस्तच.
पहिला फोटो कातिल आलाय.
14 Feb 2014 - 4:06 pm | विटेकर
असेच म्ह्णतो..
14 Feb 2014 - 4:01 pm | अत्रुप्त आत्मा
टोफु मंजे काय???
14 Feb 2014 - 4:05 pm | विटेकर
हेच विचारायचे आहे .. आणि हे प्रकरण शाकाहारी आहे का?
14 Feb 2014 - 4:14 pm | खान्देशी
सोयबीन दुधापासून बनवलेला पनीर हो ....लै हलक आसत आसा म्हणतात ...
http://vegetarian.about.com/od/glossary/g/Tofu.htm
14 Feb 2014 - 4:17 pm | अत्रुप्त आत्मा
आसं व्हय! मंजी त्ये चौकोनी टुकडं दिस्त्यात त्ये त्याचं हाय म्हनायचं! :)
14 Feb 2014 - 5:16 pm | गणपा
वाह !!!
बिर्याणी एकदम फक्कड दिसतेय.
14 Feb 2014 - 5:46 pm | शिद
झक्कास्स जमली आहे टोफु बिरयानी... शेवटच्या फोटोत बिरयानी, सलाड व रायताची मांडणी पन सुंदर.
14 Feb 2014 - 5:46 pm | सूड
चटावरलं श्राद्ध उरकल्यागत वाटली रेशिपी!! फोटो बर्यापैकी बरे.
15 Feb 2014 - 10:50 am | अनुप ढेरे
व्वा,,, काय दाद दिलिये
:D
14 Feb 2014 - 6:29 pm | मुक्त विहारि
मस्त फोटो
सुंदर फोटो
अप्रतिम फोटो....
(हं आता जरा थोडे मन शांत झाले... आता रेशीपी वाचतो.)
14 Feb 2014 - 6:33 pm | मुक्त विहारि
अवांतर....
हे टोफू काय आहे?
अतिअवांतर....
ऐसा भात मेरे डोंबिवली में मिळता हय क्या?
14 Feb 2014 - 6:34 pm | अनन्न्या
टोफूची चव पनीरसारखी लागते का?
14 Feb 2014 - 9:45 pm | सानिकास्वप्निल
टोफू बिर्याणी आवडली
पहिला फोटो मस्तं.
14 Feb 2014 - 9:47 pm | आयुर्हित
जबरा दिसतेय बिर्याणी फोटोमध्ये!
उत्तम पाकृ आहे, हम तो फिदा हो गये रे !!!!
धन्यवाद
15 Feb 2014 - 8:24 am | कच्ची कैरी
मस्त मस्त !!
15 Feb 2014 - 11:45 am | आरोही
सर्वांचे आभार , माझ्या पहिल्याच प्रयत्नासाठी दिलेली दाद मनापासून आवडली .धन्यवाद .
आणि टोफू म्हणजे सोयामिल्क पासून बनवलेले पनीर.हे फार पौष्टिक असते.
याची चव मला तर पनीर पेक्षा किंचित वेगेलि वाटली. पण वाईट नाही हा.छान च होती.हा पदार्थ शाकाहारी च आहे.
आणि मूवी काका डोंबिवली मध्ये मिळते का नाही ते माहित नाही पण तुम्हाला बनवून बघायला काही हरकत नाही . फार कठीण नाहीये बिर्याणी.

15 Feb 2014 - 11:50 am | मुक्त विहारि
३ वेळा प्रतिसाद....
धन्यवाद...
16 Feb 2014 - 11:54 am | दिपक.कुवेत
पण प्रत्येक पदार्थाचं प्रमाण दिलत तर बनवायला सोपं जाईल असं वाटतय.