नमस्कार मंडळी
मी तसा आळशी या सदरात मोडणारा,त्यांमुळे एक सोपी पाकृ ईथे देत आहे.
भारतात वेगवेगळ्या प्रांतात भाताचे अनेक प्रकार प्रचलित आहेत त्यापैकी एक हा टोमॅटो भात.
साहीत्य---शिजवलेला भात ,४ टोमॅटो,१ मध्यम आकाराचा कांदा ,कडीपत्ता,कोथिंबीर, थोडे शेंगदाणे,उडीद डाळ, मुगडाळ
कृती--भात शिजवुन घ्यावा. (कालचा शिळा असल्यास उत्तम :) . दाणे व डाळ भिजत घालावी. कांदा व टोमॅटो बारीक चिरुन घ्यावे. कढीपत्ता, कोथिंबीर व ईतर तयारी करुन घावी.
एका पातेल्यात (नॉन- स्टीक असल्यास बरे) तेल तापत ठेवावे. तेल तापल्यावर जिरे,मोहरी व हिंगाची फोडणी करावी. त्यावर कांदा कढीपत्ता परतावा.
कांदा गुलाबी झाल्यावर त्यावर आधीच भिजवलेले डाळदाणे परतावे.काही वेळाने त्यावर चिरलेला टोमॅटो घालुन मंद गॅसवर एकत्र करत राहावे .
थोडेसे बुडबुडे येईपर्यंत (टॉमॅटो शिजेपर्यंत) आचेवर ठेवावे.
शेवटी गॅस बंद करुन आधी शिजवलेला भात मिक्स करावा.
प्रतिक्रिया
8 Feb 2014 - 4:39 pm | जेपी
पाक्रु आवडली .
एक शंका उडीद मुग डाळ किती घ्यायची ?
का भिजवायची ?
डायरेक्ट फोडणीत टाकलीतर (न भिजवता )
8 Feb 2014 - 6:11 pm | भावना कल्लोळ
छान पाकृ
8 Feb 2014 - 6:31 pm | बॅटमॅन
छान पाकृ. करून बघतो.
8 Feb 2014 - 9:37 pm | लॉरी टांगटूंगकर
भारीच!!!
आणि ब्याट्या पाकृ करून पहातो म्हणजे कुछ तो ङ्डबड है दया!!!!
9 Feb 2014 - 8:20 pm | राजेंद्र मेहेंदळे
@जेपी--डाळ न भिजविता परतली तर चावायला त्रास होईल. साधारण ४ माणसांच्या भाताला मुठभर डाळ+दाणे पुरे होतील
9 Feb 2014 - 9:23 pm | मुक्त विहारि
आवडली पा.क्रु.
फोटोमुळे जास्त उत्तम रीत्या समजली...
10 Feb 2014 - 1:41 am | राघवेंद्र
आज करुन बघितला. छान झाला.

10 Feb 2014 - 2:42 am | रेवती
योग्य सादरीकरणाने एकदम मस्त दिसतोय.
10 Feb 2014 - 6:31 am | राघवेंद्र
धन्यवाद !!!
12 Feb 2014 - 9:07 am | पैसा
झटपट होणारा मस्त प्रकार! छानच आहे!