गव्हाची खीर

wrushali kulkarni's picture
wrushali kulkarni in पाककृती
11 Dec 2013 - 8:56 am

साहित्य :-१/२ कप दलिया,१/२ कप गूळ, १/४ कप ओले खोबरे, थोडी वेलची पुड,पाणी.

कृती:- प्रथम दलिया भाजून घ्या.
आता हा दलिया कुकर मध्ये शिजवून घया.
जास्त पाणी घालून भरपुर शिट्या करा (१/२कप दलिया साठी दिड कप पाणी)म्हणजे दलिया छान शिजेल.
आता या शिजालेल्या दलिया मध्ये गूळ ,वेलची पुड आणि खोबरे घाला.
आणि थोडावेळ मंद आचेवर ढवळा. आता गरमागरम खीरीवर तूप घालून खायला दया.

ही खीर काही वेळाने घट्ट होते तर काही लोक त्यावर दूध घालूनही खातात.
p1

प्रतिक्रिया

उद्दाम's picture

11 Dec 2013 - 10:04 am | उद्दाम

दूध घालुनही खीर छान लागते.

१. गहू धुवून घेणे
२. ते पसरून ठेवणे (३० ते ४० मिनिटे)
३. मग ते सडायचे
४. पाखडूब घ्यायचे
५. पाखडलेले गहू १ तास भिजत घालणे. त्याच वेळी त्यात २ चमचे चणा डाळ आणि ४ चमचे तांदूळाच्या कण्या घालणे.
६. एका तासाने ह्या भिजवलेल्या गव्हात गूळ ,वेलची पुड,खसखस,(आणि सुकामेवा) आणि खोबरे घाला.
७. कूकर मध्ये ठेवा आणि ३ शिट्या काढा.
८. थंड करायला शीतकपाटात ठेवा.

शक्यतो आदल्या रात्री करा आणि शीतकपाटात ठेवून दुसर्‍या दिवशी खा.

काका, मला कोल्हापूरातल्या गणेश चतुर्थीची खीर आठवली.
गणपती बसतात त्या दिवशी अगदी अशीच खीर पातेलं भरून बनवतात.
गणपतीच्या स्वागत मिरवणूकीत हाडं मोडेपर्यंत नाचायचं, अन् घरी येऊन खीर खाऊन मस्त ताणून द्यायचं..
अहाहा.. स्वर्ग..

wrushali kulkarni's picture

12 Dec 2013 - 3:01 am | wrushali kulkarni

ही खरी पारंपारिक खीर आहे. मी दिलेली शॉर्टकट आहे. खास भारताबाहेर जे आहेत त्यांच्यासाठी...

अर्धवटराव's picture

11 Dec 2013 - 11:15 am | अर्धवटराव

पण हि खीर पौष्टीक आहे काय? गूळ, खोबरं वगैरे ठीक, पण कुकरमध्ये शिट्ट्या देऊन त्या दलीयात काय सत्व उरणार ?

wrushali kulkarni's picture

12 Dec 2013 - 3:05 am | wrushali kulkarni

हो...दलिया हा पौष्टिक असतो त्याची खिचडी ही करून खातात.

अभ्या..'s picture

11 Dec 2013 - 2:49 pm | अभ्या..

दलिया म्हणजे काय?
जोडगहु ???
हुग्गी आवडतेच त्याची. :)

सूड's picture

11 Dec 2013 - 3:04 pm | सूड

लापशी रे..गव्हाची भरड!! आता हे हुग्गी काय असतं ते माहीत नाही.

उद्दाम's picture

12 Dec 2013 - 7:39 pm | उद्दाम

गव्हाच्या या खिरीला कोल्हापूर - कर्नाटक या भागात हुग्गी असे म्हणतात.

ही खीर होते झकास. आमची पद्धत म्हणजे गहू भरड दळून, ती भरड एक दोनदा नीट धुवून घ्यायची. पातेल्यात भरडीच्या वर पाणी येईल इतपत पाणी ठेवून चारेक तास भिजवायची. कोरडं वाटलं तर थोडं पाणी घालत राहायचं. खीर करायला घेताना, जास्तीचं पाणी वेळून काढायचं. साजूक तूपावर ही ओली भरड खरपूस परतायची. हे परतणं चालू असताना शेजारच्या शेगडीवर एका पातेल्यात पाणी उकळत ठेवायचं. पाणी भरडीच्या दुप्पट असलं पाहिजे, थोडं जास्त चालेल पण कमी नको. खरपूस वास यायला लागला की थोडं उकळतं पाणी ओतून ढवळायचं आणि झाकण ठेवायचं. लागत नाही हे पाहायला अधून मधून ढवळत राहायचं. आळत चाललंसं वाटलं की पालेल्यातलं गरम पाणी ओतत राहायचं. नीट शिजलं म्हणजे गूळ, वेलची पूड घालायची.

इथल्या मेस मध्ये ही खीर खायला मिळाली, चव थोडी निराळी. ती बडीशेपेमुळे असल्याचं कळलं. घरी प्रयोग करुन पाह्यला आणि प्रचंड आवडलं. मात्र बडीशेपेचं प्रमाण बिघडायला नको. साधारण दीड वाटी गहू भरडून घेणार असाल तर जेमतेम दोन चहाचे चमचे बडीशेप खीर उतरता उतरता त्यात कुटून घालायची.

कवितानागेश's picture

11 Dec 2013 - 5:34 pm | कवितानागेश

ओली भरड तुपावर परतून चिकट होत नाही का?
शाधा लापशी रवा एकदा शिजवून नंतर तुपावर परतून पस्तावलेय मी.
सत्त्व तयार होते गव्हाचे... चिक्कट चिक्कट.

>>ओली भरड तुपावर परतून चिकट होत नाही का?
नाही होत. पाणी सगळं वेळून घ्यायचं. मंद आचेवर परतत राहायचं. तूप मात्र उजव्या हाताने घालायचं ते घालताना हात आखडता नको. आणि हो पातेलं थोडं जाड बुडाचं बघायचं.

वैदेही बेलवलकर's picture

11 Dec 2013 - 5:20 pm | वैदेही बेलवलकर

हुग्गी अहाहा… आठवूनच तोंडाला पाणी सुटले. त्यासाठी खपली गहू वापरतात.

मस्त फोटो आणि छान पदार्थ दिला आहे .

दत्तजयंतीचा प्रसाद .

#अर्धवटराव ,पौष्टीक म्हणजे त्यातले घटक गहू ,
दूध ,तूप ,गुळ ,खसखस आणि खोबरे (शर्करा ,नत्र आणि
स्निग्ध) अधिक छान थंडी .
इतकेच .
शिजवलेल्या अन्नात जीवनसत्वे vitamins नसतात .त्यासाठी दूध ,बोरे ,पेरू ,पपई ,आवळा ,मुळयाची पाने ,माठ यांना पर्याय नाही .

आयला . एवढी सोपी पाककृती? (भरड विकत आणली तर :-)). ह्या weekend ला करणार
बरं ते गुल घालून जास्त चांगलं लागत का साखर घालुन ?

गुल घालण्यापेक्षा गुळ घालून पहा, चविष्ट होईल.

गुळ घालण्यापेक्षा गूळ घाला. अजून चविष्ट होईल. ;)

सूड's picture

13 Dec 2013 - 6:52 pm | सूड

अगदी अगदी !! =))

प्यारे१'s picture

13 Dec 2013 - 7:52 pm | प्यारे१

बेष्ट! आवडली.