गर्वास झोडपावे, हा दोष ना कुणाचा
प्रशंसुनी स्वत:ला, घ्या रोष का कुणाचा
जे काम ज्यास येते, त्यानेच ते करावे
स्नायू फुगून मेले, हा जोश का कुणाचा
माझ्याच उल्लेखाने, भरल्यात या कविता
दिसते छबी स्वत:ची , आक्रोश हा कुणाचा
सांगून ना कळाले, शब्दांतले इशारे
नादान पोर आहे, बेहोश हा कुणाचा
शब्दांत शांत माझ्या, काव्यात ली झळाळी
सहजी उठून आली, हा दोष का कुणाचा
तरवार धार ज्यांची, स्नेह्यांसही दिसावी
घायाळ तेच व्हावे, हा दोष का कुणाचा
- संध्या
(एका ठिकाणचा वृत्तभंग चालवून घ्याल ही आशा )
प्रतिक्रिया
15 Mar 2013 - 12:22 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
ह्याला तोडच नाही. __/\__
वृत्तापेक्षा, आशय महत्वाचा. अर्थगर्भ रचना.
15 Mar 2013 - 1:50 pm | आतिवास
कविता आवडली.
( पण कशाचे तरी विडंबन असल्यासारखं वाटतं आहे - तो संदर्भ लक्षात नाही आला!)
15 Mar 2013 - 5:25 pm | सांजसंध्या
विडंबन नाही. :)
15 Mar 2013 - 2:27 pm | अत्रुप्त आत्मा
सांगून ना कळाले, शब्दांतले इशारे
नादान पोर आहे, बेहोश हा कुणाचा---
15 Mar 2013 - 3:18 pm | अविनाशकुलकर्णी
आवडलि
15 Mar 2013 - 3:19 pm | प्रचेतस
आनंदकंद वृत्त का?
15 Mar 2013 - 5:26 pm | सांजसंध्या
बरोबर आहे. आनंदकंद वृत्तच आहे.
15 Mar 2013 - 5:27 pm | सांजसंध्या
आभार सर्वांचे
15 Mar 2013 - 5:28 pm | प्यारे१
छान!
16 Mar 2013 - 6:29 am | साऊ
मला वृत्त येत नाही. हे वृत्त कस लिहायच?
16 Mar 2013 - 6:32 am | किसन शिंदे
हे खासंच..
17 Mar 2013 - 1:10 am | अभ्या..
छानच आहे, आवडली. :)
13 Mar 2015 - 1:14 pm | एक एकटा एकटाच
निव्वळ सुरेख
13 Mar 2015 - 2:06 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११
पुन: पुनर्वाचनीय!
13 Mar 2015 - 2:17 pm | सांजसंध्या
ओह !
मी विसरून गेले होते.
अमोल, तृप्त आत्मा - धन्यवाद..
14 Mar 2015 - 12:53 am | ज्योति अळवणी
सुंदर