कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
22 Feb 2013 - 6:15 pm
गाभा: 

नमस्कार,

हा मिपावर मी सुमारे ५ वर्षांपुर्वी काढलेला चर्चा धागा . पाच एक वर्षे उलटून गेली आहेत तेव्हा चर्चेचा अजून एक राउंड करुन पाहू , या वेळी विकि हे टार्गेट नाही मिपाच राहू देऊ,

'रचनात्मक टिका कशी स्विकारावी' (How to accept constructive criticism) आणि 'रचनात्मक टिका कशी करावी' (How to do constructive criticism) या बद्दल आंतरजालावर इंग्रजी भाषेत बरच मार्गदर्शन उपलब्ध दिसत, पण कठोरतेचा टच कसा द्यावा या बद्दल फारशी माहिती वाचण्यास मिळाली नाही.

रागावल्या नंतर व्यक्तिगत टिका (आपल्या मराठी) संस्कृतीचा भागही आहे. अशा रागावलेल्या व्यक्तींना उपयोगी पडेल असा त्यांचा राग मनमोकळेपणाने व्यक्त करू देणारे "कठोर टीकात्मक लेखन", सभ्यतेच्या (संसदीय) मर्यादेत पुर्णतः राहून आणि व्यक्तिगत रोख टाळून कसे करावे ? या बद्दल 'कठोर पण सभ्य टिका कशी करावी' असा लेख 'मराठी विकिबुक्सवर' लिहिण्यात सक्रीय सहभाग अथवा या विषयाच्या अनुषंगाने चर्चा अथवा मराठी शब्द, शब्द समूह, वाक्यरचना तुमच्या अनुभवातून किंवा मराठी साहित्यातील उदाहरणे हवी आहेत.

चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.

प्रतिक्रिया

तर्री's picture

22 Feb 2013 - 6:21 pm | तर्री

सौम्य : १. तुमच्या कडून ही अपेक्षा नव्हती / जास्त अपेक्षा होती.
कठोर : २.हया वेळी जरा तुम्ही कमी पडलात - पुढच्या वेळी जास्त प्रयतन अपेक्षित आहेत - अन्यथा काही पर्याय शोधावा लागेल.
कर्णकर्कश्य : तू नेहमीप्रमाणे घाण घातली आहेस.

मिपावर प्रतिसाद वेगाने मिळताहेत तुम्हा सर्वांचेच धन्यवाद.

खटासि खट's picture

22 Feb 2013 - 8:53 pm | खटासि खट

विचारलाय प्रश्न, पण प्रश्नाआडून केलेली सूचना वाटतेय ही..

कणखर मराठी मित्राचा प्रतिसाद मराठमोळे पणाची चुणूक दाखवतानाच आंतरजालावरील संसदीय सभ्यतेच्या परिघाच्या अपेक्षा कशा सांभाळायच्या हा मराठी आंतरजालावरील व्यवस्थापनांपुढचा हा प्रश्न जुनाच आहे आम्ही वाचा फोडली एवढेच.

खटासि खट's picture

27 Feb 2013 - 1:29 pm | खटासि खट

तुम्हाला उदाहरण दिलं हो

नाना चेंगट's picture

22 Feb 2013 - 6:24 pm | नाना चेंगट

आपण विचारवंत दिसता.

माहितगार's picture

23 Feb 2013 - 9:00 am | माहितगार

सध्यातरी विचारवाँटाच्या भूमीकेत विचार घेण्याकरता आलो आहोत. वाफेच थंड पाणिही होऊ नये आणि ती योग्य मार्गाने कुणाला न दुखावता कशी बाहेर पाडता येईल याचा शोध घेणारा - आपला विचारवाँट

मन१'s picture

22 Feb 2013 - 6:24 pm | मन१

सदर लेख पुरेशा लांबीचा नाही. त्यातून अधिक सविस्तर अपेक्षा समजल्या असत्या तर बरे झाले असते.
धागाकर्त्याने स्वतः एखादे उदाहरण देउन सुरुवात केली असती तर चर्चेची नेमकी अपेक्षित दिशा अधिक अचूक पकडली गेली असती.
अर्थात धागाकर्त्यास याहून अधिक चांगले नक्कीच लिहिता येते ह्याची आम्हास खात्री नसली तरी आशा आहे.
पुढील सर्व लेखनासाठी शुभेच्छा.
.
.
.
हुश्श. दिला बुवा एकदाचा रचनात्मक टिकेचा नमुना. :)
आता कुणीतरी माझी समस्या सोडवा प्लीझ.
.

कपिलमुनी's picture

22 Feb 2013 - 6:30 pm | कपिलमुनी

चित्रपटामध्ये 'क्ठोर' शब्द बर्याच वेगळ्या अर्थांनी वापरला आहे ..
त्या बद्दल जास्त माहीती कळेल का

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2013 - 6:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नमस्कार, मिपावर स्वागत आहे.

शास्त्रीय टीका, आस्वादक टीका, निर्णायक टीका, असे माहित आहे. चांगल्या टीकाकाराची लक्षणे सांगता येतील. पण, 'कठोरतेचा टच' असलेली टीका म्हणजे नेमकं समजलं नाही. कारण टीकेत 'कठोरता' असतेच तसे टीकाकारांकडे काही पूर्वग्रहही असतात. असं काही चालेल का ?

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

22 Feb 2013 - 6:52 pm | माहितगार

'कठोरतेचा टच' असलेली टीका म्हणजे नेमकं समजलं नाही.
नुसत्या रचनात्मक टिका कशी करावी बाबत आंतरजालावर इंग्रजीत जे लेखन (How to do constructive criticism) गूगल सर्च ने मिळत त्यात थोडक्यात सँडवीच थेरपी सांगीतली आहे.म्हणजे आधी कौतुक मग खुपणारा भाग शेवट पुन्हा कौतुकाने. ह्याचही महत्व आहे पण फारच गोड गोड होत.

कठोर मध्ये खणखणीत सूर अपेक्षीत आहे.

-माहितगार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2013 - 7:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

''अनिल, हे एक प्रयोगशील कवी आहेत, त्यांनी सतत निरनिराळे प्रयोग केले आहेत, त्यांनी काव्यात 'दशपदी' हा एक नवीन रचनाप्रकार आणला आहे.''

आता यात कौतुक आहे आणि टीकाही आहे. (अनिलांना असं बोलणं खूपलेलं दिसतं) आपल्या दशपदी काव्यसंग्रहात कवी अनिलांनी म्हटलं होतं की 'प्रयोगशील कवी' म्हणून टीकाकारांना टीका करायची असेल तर खुशाल करु द्या. (शरद सर बरोबर ना ?)

-दिलीप बिरुटे

श्री गावसेना प्रमुख's picture

22 Feb 2013 - 6:41 pm | श्री गावसेना प्रमुख

तुमच नाव माहीतगार आहे तरी विचारता राव.

-प्रतिसादाकरता धन्यवाद

प्यारे१'s picture

22 Feb 2013 - 6:43 pm | प्यारे१

इग्नोअर करा...!
अर्थात हे पर्करन नवीनच शिकतोय आम्हीपण. हुच्च लोक्स आधीपासून वापरतात म्हणे!

नाना चेंगट's picture

22 Feb 2013 - 7:23 pm | नाना चेंगट

काय आधीपासून वापरतात म्हणे?

पैसा's picture

22 Feb 2013 - 6:51 pm | पैसा

मोठे व्हा!! :P

(साभार श्रामो)

हात पाय गाळू न देता टीका जमली पाहीजे :)

टीका करणे येरा गबाळ्याचे काम नोहे हे कळून चुकलेली (शुचि)

आइला स्वाक्षरीतला सूर्य उगवला की :)

नाना चेंगट's picture

22 Feb 2013 - 7:21 pm | नाना चेंगट

उगवणारच... मालकांना कोंबड विकत घ्यायला लावलं होतं

पैसा's picture

22 Feb 2013 - 7:22 pm | पैसा

स्पष्ट बोलल्याबद्दल माफ करा, पण तुमच्या लिखाणात मला अपेक्षित उंची आढळली नाही. काही तरी नवे मिळेल या आशेने लेख वाचायला सुरुवात केली होती, परंतु तेच घासून गुळगुळीत झालेले शब्दप्रयोग आणि कंटाळवाणी वाक्यरचना पाहून निराशा झाली.

तुमच्यासारख्या नवोदित लेखकांना प्रथितयश व्हायचे असेल तर याहून जास्त गांभीर्याने लिहावे लागेल आणि तुम्हाला त्याहून जास्त वाचनाची आवश्यकता आहे हे नमूद करते. यापुढील लेख जास्त वाचनीय असेल अशी आशा व्यक्त करते.

(हुश्श्य! जमलं का? कठोर टीका करणे हे फारच कठीण आहे ब्वॉ! :P)

नाना चेंगट's picture

22 Feb 2013 - 7:23 pm | नाना चेंगट

बकवास प्रतिसाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2013 - 7:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीका ज्यावर होते तो व्यक्ती चांगलाच संवेदनशील असावा. म्हणजे समजा मिपावर एखादे लेखन आले की त्याला टीका इतकी लागली पाहिजे की तो रात्रभर या कुशीवरुन त्या कुशीवर वळला पाहिजे. माझे मुद्दे असे भर घाला.

१] प्रचंड आक्रमक लिहिलं पाहिजे. शब्द, वाक्य, उतारे अगदी उच्च दर्जाचे.
२] झोंबणारी टीका केली पाहिजे, व्यक्तिगत सोडून देऊ.
३] आस्वादाचा आवाका नाही, आणि लेखन करत आहात तेव्हा काय काय वाचले पाहिजे. [प्रचंड यादी सांगायची]
४] किरकोळ गोष्टींचे ज्ञान नाही. असा सूर टीकाकाराकडे असला पाहिजे. आणि तो उत्तम व्यक्त झाला पाहिजे.[शुद्धलेखन नाही, वाक्यरचना बरोबर नाही, आशय तर लेखनातून अजिबात पोहचत नाही]
५] उगाच बालकवी वाचलाय ? मुक्तीबोध वाचलाय ? किमान तुकारामाचे अभंग चाळले आहेत ? कर्‍हेचं पाणी माहिती आहे ? वर्डस्वर्थ नाव ऐकलंय ? उगा असं जे लेखकानं वाचलं नसेल त्याची नावे घ्यायची. हे एकदा वाचा आणि मग लिहा म्हणायचं.
६]
७]
८]
९]
१०]

सवडीने भरतो. :)

-दिलीप बिरुटे

वेताळ's picture

22 Feb 2013 - 7:38 pm | वेताळ

त्याचे सभासदत्व कायम राहिल ह्याची काय गॅरटी आहे?

म्हणूनच संसदीय परिघाची मर्यादाही दिली आहे सोबत

नाना चेंगट's picture

22 Feb 2013 - 7:40 pm | नाना चेंगट

६]
७]
८]
९]
१०]

सवडीने भरतो. smiley

जमत नाही असं सरळ सांगावं, उगाच काय सवडीच्या सबबी. तसंही प्राध्यापकांना हल्ली काही काम तरी कुठे असतं.

नाना ज्यांच्यात्यांच्यावर का टीका करुन राहीलायत बे? ;)

नाना चेंगट's picture

22 Feb 2013 - 7:43 pm | नाना चेंगट

वेळ घालवायला ;)

माहितगार's picture

22 Feb 2013 - 7:48 pm | माहितगार

:: बे?
::पुरेस सभ्य आहे ? संसदीय शीष्टाचारास सोडून नाही ना ?

नानांना आदरार्थी संबोधलय हो. नाना माझ्या फेव्ह सदस्यात सर्वात वरचे (टॉपमोस्ट) आहेत. :)

माहितगार's picture

22 Feb 2013 - 7:56 pm | माहितगार

आपापसातल आदर आहे तर,तर होऊन जाऊ द्या , पण आमच्या प्रस्तावित लेखात न बसवता येणारा शब्द दिसला म्हणून आठवण दिली.

अहो पण "नागपूर्कर" बोलीत तर पुलंनी हा शब्द सर्रास वापरलाय. खरं तर मी त्या चालीवरच वापरला.

माहितगार's picture

23 Feb 2013 - 9:05 am | माहितगार

सर्वात वरचा सूर हवाय....पण चाल संसदीय पण चाल संसदीयच भाषेचीच हवी

धन्या's picture

23 Feb 2013 - 10:25 am | धन्या

कुणीतरी काहीतरी लिहितं आणि पब्लिक लगेच कीबोर्डवर बोटं आपटायला सुरुवात करतं. लिहिलेलं चुक आहे बरोबर आहे याचा पडताळा घेण्याच्याही भानगडीत कुणी पदत नाही.

नाना ज्यांच्यात्यांच्यावर का टीका करुन राहीलायत बे?

हे वाक्य नागपूरी भाषेतलं आहे असं जर लेखिकेचं म्हणणं असेल तर ते चुक आहे. प्रतिसादकर्तीस नाना चेंगट या आयडीस आदरार्थी संबोधावयाचे असल्याने तिने "राहीलायत बे" असा शब्दप्रयोग केला आहे. मुळात "बे" हा शब्द सलगीदर्शक आहे. आणी तो एकेरी संबोधन असेल (किंवा ज्यांना एकेरी संबोधता येईल अशा अनेक जणांना एकाच वेळी संबोधले जात असेल) तरच वापरला जातो.

प्रतिसादकर्तीचा "राहीलायत" हा शब्दच चुकीचा आहे. बहूधा तो प्रतिसादकर्तीने नाना चेंगट या आयडीस अहो जाहो (अनेकवचनी आदरार्थी) करण्यासाठी निर्माण केला असावा. जर मुळ वाक्य बरोबर लिहायचं असेल तर असं लिहिता येईल:

१. नाना ज्यांच्यात्यांच्यावर का टीका करुन राहीला बे? - सलगीदर्शक एकेरी संबोधन
२. नाना ज्यांच्यात्यांच्यावर का टीका करुन राहीला? - अनेकवचनी आदरार्थी

(च्यायला, पब्लिकसारखं चावणं मलाही जमायला लागलं तर.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Feb 2013 - 7:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>जमत नाही असं सरळ सांगावं, उगाच काय सवडीच्या सबबी. तसंही प्राध्यापकांना हल्ली काही काम तरी कुठे असतं.
मस्त जमलंय अजून येऊ दे.

[माझ्या मागं नगं लागू. ] :)

-दिलीप बिरुटे

नाना चेंगट's picture

22 Feb 2013 - 10:47 pm | नाना चेंगट

तुमच्या मागे लागावं असं तुमच्यात काही आहे असं मला वाटत नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2013 - 9:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद.

नाना चेंगट's picture

23 Feb 2013 - 11:26 am | नाना चेंगट

आभारी आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2013 - 9:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद.

::>>जमत नाही असं सरळ सांगावं, उगाच काय सवडीच्या सबबी.
::हे मस्त आहे.
::>>तसंही प्राध्यापकांना हल्ली काही काम तरी कुठे असतं.
::हे एक वाक्य व्यक्तिगत होतय का ? ठिक आहे ?

वेताळ's picture

22 Feb 2013 - 7:54 pm | वेताळ

::>>तसंही प्राध्यापकांना हल्ली काही काम तरी कुठे असतं.
अहो नानांनी ते वाक्य समस्त प्राध्यापक वर्गाबद्दल वापरले आहे.
बिरुटे सर मिपावर संपादक देखिल आहेत.

नाना चेंगट's picture

22 Feb 2013 - 11:18 pm | नाना चेंगट

>>>बिरुटे सर मिपावर संपादक देखिल आहेत.

त्यामुळे बाय डीफॉल्ट त्यांना शिव्या देण्याचा अधिकार आहे.

नाना चेंगट's picture

22 Feb 2013 - 11:19 pm | नाना चेंगट

वरील वाक्यात डीफॉल्ट नंतर आम्हाला हा शब्द घालावा आणि मग प्रतिसाद वाचावा.

नाना चेंगट's picture

22 Feb 2013 - 11:21 pm | नाना चेंगट

बा ! नील्कांता सिग्नेचरची सोय दिली तशीच प्रतिसाद संपादनाची पण सोय मिळाली तर बरे होईल.

च्यामारी संपादक, सल्लागार आणि तंत्रज्ञ त्यांचे त्यांचे प्रतिसाद संपादीत करु शकतात पण आमच्यासारखे सामान्य सदस्य मात्र या साध्या सोईपासून वंचित रहातात हे पाहून जीव तीळ तीळ तुटतो.

असो, बदलीन.

मि.पाव चा विकि. पाव होतो

नाना चेंगट's picture

23 Feb 2013 - 11:27 am | नाना चेंगट

तुम्ही सल्लागारांपैकी दिसता

शुचि's picture

27 Feb 2013 - 3:34 am | शुचि

नाही तर काय माहीतगार, स्वयंसंपादनाच्या मागणीत उगाच आडवे पडताय हं तुम्ही :(

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Feb 2013 - 11:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विकिपाव आवडेश. :)

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

22 Feb 2013 - 7:37 pm | माहितगार

वर अशाच स्वरूपाचा मन१ यांचा प्रतिसाद छाल आहे , पण आपला हा सूर खणखणीत आहे. धन्यवाद

कशामुळे?

अजून थोडा खणखणीत करता येईल ? धन्यवाद

शुचि's picture

22 Feb 2013 - 7:48 pm | शुचि

आजकाल जो तो उठतो तो मिपाकरांना कामाला लावतो. मला एक सांगा तुम्ही काय उदाहरण दिलत म्हणून इतर सदस्यांनी उदाहरणे द्यावीत? का उगा आपलं अमकं पाश्चात्य पुस्तक वाचलं न टमकं वाचलं ची फुका झैरात?
२ आठवड्यात तुम्ही मिपा किती वाचलंत, प्रतिसाद किती दिलेत? ट्रॅक तर कोरा दिसतोय. तुम्हीच उलट सांगा - सदस्यांनी हा धागा का म्हणून एन्टरटेन करावा???

माहितगार's picture

22 Feb 2013 - 7:52 pm | माहितगार

::>>तुम्हीच उलट सांगा - सदस्यांनी हा धागा का म्हणून एन्टरटेन करावा???
::हे जमल ,
::बाकीच सूर बरोबर आहे , पण अजून थोडं खणखणीत जमवता येईल ?

धन्या's picture

23 Feb 2013 - 10:31 am | धन्या

आजकाल जो तो उठतो तो मिपाकरांना कामाला लावतो. मला एक सांगा तुम्ही काय उदाहरण दिलत म्हणून इतर सदस्यांनी उदाहरणे द्यावीत? का उगा आपलं अमकं पाश्चात्य पुस्तक वाचलं न टमकं वाचलं ची फुका झैरात?
२ आठवड्यात तुम्ही मिपा किती वाचलंत, प्रतिसाद किती दिलेत? ट्रॅक तर कोरा दिसतोय. तुम्हीच उलट सांगा - सदस्यांनी हा धागा का म्हणून एन्टरटेन करावा???

एक निरीक्षण नोंद ईच्छितो, तुम्हीही अगदी हेच करता. आपल्याला स्पर्धक निर्माण होत आहे या भीतीने तुम्ही हा प्रतिसाद दिला आहात का?

ही टीका जर तुम्हाला कठोर वाटत असेल तर तसे स्पष्ट सांगा. या धाग्यातील त्यातला त्यात माहितीपुर्ण प्रतिसाद वाचून ती शक्य तेव्हढी सभ्य शब्दांत (सदस्यांना स्वसंपादनाची सूविधा नसल्यामुळे) पुन्हा करण्यात येईल. ;)

धनाजीराव तुम्ही सर्वात "वीक" सदस्य पाहून हे जे टीकेचं मोहोळ उठवलं आहेत ना ते आक्षेपार्ह आहे. आपल्या कोत्या मनोवृत्तीचा त्रिवार निषेध करावा तरी थोडाच आहे! चूझ योर ओन साइझ!!! =))

या विषयात डॉक्टरेट मिळवलेले रारा परिकथेतील राजकुमार आणि नाना चेंगट यांच्या प्रदिर्घ प्रतिसादांच्या प्रतिक्षेत.
नाना तू वर ते दिलेत तसे चाराणे छाप प्रतिसाद द्यायचं सोडून एक छानसा प्रतिसाद दे पाहू.

नाना चेंगट's picture

22 Feb 2013 - 10:48 pm | नाना चेंगट

विनंती फाट्यावर मारली आहे.

माहितगार's picture

22 Feb 2013 - 8:12 pm | माहितगार

::>>प्रदिर्घ प्रतिसादांच्या प्रतिक्षेत
::सहमत
::>>चाराणे छाप प्रतिसाद
::'रदिर्घ प्रतिसादांच्या प्रतिक्षेने बावरल्यामुळे सहमती देत नाही :) पण, बाकी,आमच्या प्रस्तावित लेखात वापरण्या करता वाक्यप्रयोग छान आहे. धन्यवाद

मला टीका अशी कोणाची करताच आली नाही कधी, त्यामुळे काहीच सांगू शकत नाही. कोणी या विषयावर क्लासेस घेतं का?

माहितगार's picture

23 Feb 2013 - 9:10 am | माहितगार

साहित्य शोधतोय , म्हणजे क्लास कशे शिष्टीमनी होतील :)

तुमचा अभिषेक's picture

22 Feb 2013 - 9:17 pm | तुमचा अभिषेक

एखाद्या व्यक्तीवर टीका न करता त्या व्यक्तीच्या श्रद्धास्थानांवर करावी. हा वार कधीच खाली जात नाही.
फक्त अश्यावेळी आपली स्वताची श्रद्धास्थाने असू नयेत किंवा ती उघड करू नयेत किंवा खोटीच पसरवावीत.

श्रद्धास्थाने ढळली तर चालतील (नव्या श्रद्धास्थानांचे ऑप्शन देता आलेच पाहिजेत असे नाही,पण देता आले तर मेहनत फळाला येते नाहीतर नाही) पण हे करताना श्रद्धास्थानांची अवहेलना हा उद्देश मात्र मुळीच असू नये.

गविंनी सांगितलेला जळ.लि आणि मिळ.लि फॉर्म्याट विसरले का बे सगळे? त्या साच्यात हे टीकाप्रकरण चपखल बसवता येईल.

माहितगार's picture

23 Feb 2013 - 9:23 am | माहितगार

आम्ही मि.पा. वर नवीन आहोत .कृ. जरा विस्तारकरून मिळावा .

अग्निकोल्हा's picture

22 Feb 2013 - 11:26 pm | अग्निकोल्हा

कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?

तथाकथित विचारवंत, कंपुबाज यांना सोडुन कोणाला कशाही पध्दतिने घातलेल्या उभ्या आडव्या शिव्या म्हणजे कठोर व सभ्य टिका होय.

::>>उभ्या आडव्या शिव्या म्हणजे कठोर व सभ्य टिका होय.
::हे रात्रीला दिवस आणि दिवसाला रात्र म्हटल्या सारखे नाही ना ? ...हे बदलणे या चर्चा प्रस्तावाचे प्रयोजन आहे.
::>>तथाकथित विचारवंत, कंपुबाज यांना सोडुन
::विचारवाँटाच्या विचारानंतर कंपूबाजाकडून बर्याचदा अपेक्षीत नसलेल्या भाषेत जो धूरळा उडतो तो धूरळा रचनात्मक टिकेच्या मार्गाने नेता येईल किंवा कसे हा या चर्चेचा विचारवाँट आहे

पैसा's picture

22 Feb 2013 - 11:33 pm | पैसा

दुसर्‍या संस्थळांवर तुमच्या कसल्याही लिखाणाला वाहवा मिळते म्हणून कृपया तुमचे सगळे लिखाण इथे आदळू नये. एक मित्रत्वाचा सल्ला म्हणून सांगते, इथल्या चोखंदळ वाचकांना कृपया गृहीत धरू नये आणि यापुढे किमान शुद्धिचिकित्सक तरी वापरून लिहाल अशी आशा आहे. तुमची मध्यमवर्गीय मानसिकता त्या मध्यमवर्गीय संस्थळावर सोडून आलात तर फार बरे. अशा मध्यमवर्गीय कूपंमंडूक वृत्तीचा आम्ही सर्वतोपरि निषेध करतो.

(यात काही वैयक्तिक नाही ना? जल्लां कोणावर टीका करायची म्हणजे लैच विचार करावा लागतो. चांगलं, छान छान म्हणायला काय त्रास नाय!)

अविनाशकुलकर्णी's picture

22 Feb 2013 - 11:34 pm | अविनाशकुलकर्णी

मुळात टिका का करावी??
लेखक व कलाकृति लक्षात रहाते..
टिकाकार नाहि..

श्रीरंग_जोशी's picture

22 Feb 2013 - 11:45 pm | श्रीरंग_जोशी

लेखक व कलाकृति लक्षात रहाते..
टिकाकार नाहि..

माहितगार's picture

23 Feb 2013 - 9:20 am | माहितगार

...अनुमान आणि नकार या पद्धतीतून जाईल तेव्हाच सत्य जाणता येते. सत्य जाणायचे असेल, तर प्रत्येक प्रस्थापित सत्याला आपण नकार देणे अपेक्षित आहे. त्यासाठी आपण मनाने व बुद्धीने मुक्त असणे आवश्‍यक आहे. समाजव्यवस्थादेखील मुक्त असली पाहिजे.... [१];वादे वादे जायते तत्व(/शास्त्र) बोध ज्याचा अर्थ वाद विवादानेच सत्याचा बोध होतो.

::>>लेखक व कलाकृति लक्षात रहाते..टिकाकार नाहि..
::सहमत

हा उतारा कोणत्या पुस्तकातून ढापलात तुम्ही? तुमचा ओरिजिनल उतारा असेल तर तुम्ही लेखक बनायला हरकत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

23 Feb 2013 - 10:34 am | परिकथेतील राजकुमार

सदर लेखाचे व लेखाच्या लेखकांच्या प्रतिसादांचे सुगम मराठी भाषांतर देखील 'विकी' वरती दिल्यास काही उमाज पडेल असे वाटते.

अगंबै ! मलासुद्धा हे समजलं तर बरं होईल. मला तर बै टीकाच करता येत नै.
एखाद्याला फुकटात निरुपद्रवी सल्ला दिला तरी अंगावर भुंकत थयथयाट करत राहतात मग टीका तर लांबच राहीली.
विकीच्या पानाच्या अपेक्षेत आहे. इथेच लिंकवलं तरी चालेल.

परिकथेतील राजकुमार's picture

27 Feb 2013 - 11:08 am | परिकथेतील राजकुमार

अत्यंत वेडझवा धागा आणि त्याहून वेडझव्या प्रतिक्रिया.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2013 - 11:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कठोर टीका आहे पण रचनात्मक काही दिसत नाही.

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

27 Feb 2013 - 11:17 am | परिकथेतील राजकुमार

तसे लिहिण्यासाठी आजूबाजूला रचनात्मकता समजणारी लोकं असायला नकोत का? गाढवांपुढे गीता कशाला ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2013 - 11:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टीका रचनात्मक आहे किंवा नाही तो ते समजून घेणे हे लेखकावर अवलंबून आहे. गाढवापुढे गीता कशाला यातही कठोरपणाच आहे. कठोर टीका करणे सोपं आहे, पण त्यातून रचनात्मक संदेशही गेला पाहिजे, ते बहूतेक होत नाही. अमूक अमूक लिहिणारा फाल्तू लिहितो तेव्हा ते फाल्तूपणा कुठे कसा आहे हे सांगितलं पाहिजे, म्हणजे हे 'खर्रच हे लिहिण्यात नको होतं का ' असा विचार लिहिणार्‍याच्या मनात आला पाहिजे, लिहिण्यापासून नाऊमेद करणं म्हणजे कठोर टीका नव्हे. असो.

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

27 Feb 2013 - 11:30 am | परिकथेतील राजकुमार

नुसत्या टिकेने कोणी लिहिण्यापासून नाऊमेद होत असेल तर त्या मनुष्याची किव वाटते.

प्रतिसादकाने लेखक / लिखाणाला फाट्यावरती मारले की मग लेखकाने प्रतिसादक / प्रतिसादाला फाट्यावरती मारावे.

हाय काय आन नाय काय !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2013 - 11:47 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माणसं हळवी असतात, माणसं कठोर असतात. काहींना मोजक्या शब्दांचा मार पुरेसा असतो, काहींना कितीही लिहा काहीही फरक पडत नाही. चर्चाप्रस्तावकाने म्हणूनच म्हटलं असावं की 'रचनात्मक टीका स्वीकारताही आली पाहिजे' टीका करणार्‍याने काही कठोर टीकेबरोबर रचनात्मक टीकाही केली पाहिजे, इतकेच म्हणायचे होते. बाकी, फाट्यावर मारणे, अनुल्लेखाने मारणे, दुर्लक्ष करुन निव्वळ समाचार घेणे, टोमणे, येता-जाता ढुसण्या, चिमटे, मला वाटतं हे केवळ कठोर टीकेत येतं. कठोर टीकेबरोबर 'रचनात्मक टीकेवर' फार काही प्रतिसादाता आलं नाही.

बाय द वे, इंग्रजी साहित्यावर आपलं चांगलं वाचन आहे, तेव्हा रचनात्मक टीकेवर कै पुस्तक-बिस्तक आहे का ? काही मराठीत अनुवाद-बिनुवाद ?

-दिलीप बिरुटे

परिकथेतील राजकुमार's picture

27 Feb 2013 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार

संपादकाच्या झूलीआडून प्राध्यापकांनी दिलेला प्रतिसाद वाटला.

जलमं का हो आता ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Feb 2013 - 11:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आता जमलं :)

-दिलीप बिरुटे

माहितगार's picture

2 May 2018 - 6:34 pm | माहितगार

नमस्कार,

हा मिपावर मी सुमारे ५ वर्षांपुर्वी काढलेला चर्चा धागा . पाच एक वर्षे उलटून गेली आहेत तेव्हा चर्चेचा अजून एक राउंड करुन पाहू , या वेळी विकि हे टार्गेट नाही मिपाच राहू देऊ. माझे कठोर टिकेचे अधिकतम स्वातंत्र्य जपण्यासाठी धागा वर जाढत आहे,

तुम्ही टार्गेट द्यायचे आणि इतरांनी बोंब मारायला निदान शिमग्याला तरी धागा वर काढायचात. वर्षभर शंखध्वनी करणारे त्या दिवशी तोंड दाबून बसतात.
बादवे लै काय काय लिहायची न तेच तेच उकरु उकरु काढायची दांडगी हौस ब्वा तुम्हाला.

माहितगार's picture

2 May 2018 - 7:17 pm | माहितगार

...बादवे लै काय काय लिहायची न तेच तेच उकरु उकरु काढायची दांडगी हौस ब्वा तुम्हाला.

असे करनारा मी येकला न्हाई आनी समद्यात म्होर बी न्हाई , बाकीच्ये बी करत्यात पन त्याम्चे त्यान्चे वीषय लावून धरत्यात !

...वर्षभर शंखध्वनी करणारे त्या दिवशी तोंड दाबून बसतात.

संक्रांतीला घाबरत्यात ! ...... :) ) आमी बी घाबरतो म्हना