हि कमळफुले लहान मोठे सगळ्यांनाच आवडतात्.बाहेरचे खाणे आणण्यापेक्षा घरगुती खाणे केव्हाही चांगले. मी ही पाकृ.
कै.कमलाबाई ओगले यांच्या 'रुचिरा' या पुस्तकात बघून केली आहे.
साहित्यः-एक वाटी मैदा.
दोन चमचे तापलेले तुप.
चिमूटभर खायचा सोडा.
४-५ चमचे साखर.
चवीपुरते मीठ.
एक अंडे(optional)
कमळफुलांचा साचा.
कृती :-मैदा घेऊन त्यात तापलेले तुप,सोडा, साखर व चवीपुरते मीठ घालावे.पाहिजे असल्यास अंडे फेतून घालावे.
(अंड्यामुळे कमळफुले कुरकुरीत होतात.)नंतर पाणी घालून पीठ पातळसर भिजवावे.एक खोलगट कढई
घेऊन त्यात तेल घालून तापवावे.तापलेल्या तेलात साचा बुडवून ठेवावा.तेल चांगले तापले की साचा काढून
तो पिठात अर्धा बुडेल इतकाच बुडवावा व काढून घेऊन लगेच तेलात धरावा.किंचित तळून झाले की साच्याचा
दांडा हलवावा.म्हणजे फूल साच्यापासून सुटून येईल. फूल चांगले तळून बाहेर काढावे.साचा सतत गरम
तलातच ठेवावा.खंग व कुरकरीत कमळफुले खाण्यासाठी तयार.
(साचा बेताचाच तापू द्यावा,नाहितर कमळफुले साच्यापासून सुटणार नाहित.)
प्रतिक्रिया
3 Sep 2012 - 4:43 pm | सविता००१
मस्त दिसताहेत.
छानच. :)
3 Sep 2012 - 5:40 pm | सानिकास्वप्निल
छान दिसत आहे :)
आवडता प्रकार आहे
मी केलेले कमळफूल / अचप्पम
3 Sep 2012 - 7:03 pm | उदय के'सागर
सानिका मीही तुमच्याच त्या धाग्याची लिंक इथे देणार होतो... अगदी त्या धाग्याचिच आठवण झाली ही पाकृ पाहून :)
बाकी ज्योति प्रकाश जी ही पाकृही भारीच दिसतेय :)
3 Sep 2012 - 6:06 pm | अत्रुप्त आत्मा
छान हाय...! पण मध्यंतरी कुणीतरी हाच पदार्थ सादर केलावता...
3 Sep 2012 - 6:59 pm | प्रभाकर पेठकर
कमळफुले फार आकर्षक दिसत आहेत. दुपारी चहा बरोबर तर मस्तंच सोबत आहे.
3 Sep 2012 - 7:50 pm | नूतन
पुस्तकात मीहि वाचली होती पण फोटो बघुन नीट कळली .
छान
25 Oct 2012 - 11:24 pm | सुरेखा अरुण साळुन्खे
दीसत नहित कश्यआएहएत ते.