Skip to main content

भाताचे पकोडे

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 29/06/2012 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः १ वाटी शिळा भात २-३ टेस्पून बारीक चिरलेला कांदा २ टेस्पून बारीक चिरलेली कोथींबीर १ टीस्पून जीरे १ टीस्पून बारीक चिरलेली हिरवी मिरची (आवडीप्रमाणे कमी-जास्त) १ टीस्पून बारीक चिरलेले आले १ टीस्पून बारीक चिरलेला कढीपत्ता मीठ चवीनुसार २-३ टेस्पून बेसन तेल तळण्यासाठी . पाकृ: एका बाऊलमध्ये भात, कोथींबीर, कांदा, हिरवी मिरची, कढीपता, जीरे, आले व मीठ एकत्र करा. हाताने चांगले ५-७ मिनिटे एकत्र कालवा म्हण्जे थोडा चिकटपणा येईल. . त्यात लागेल तसे २-३ चमचे बेसन घाला.कोरडे वाटल्यास थोडे पाणी शिंपडून चांगले मळा. मिश्रणाचे चपटे पेढे करून घ्या. . मध्यम आचेवर तेलात सोनेरी रंगावर डीप फ्राय करा. . कुरकूरीत असे भाताचे पकोडे टोमॅटो सॉस किंवा कुठल्याही चटणी बरोबर सर्व्ह करा. .

वाचने 11171
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

छान! अता पावसाळ्यात भजी/पकोडे प्रकारात एक नविन 'अ‍ॅडिशन - फॉर अ चेंज' :) पावसाळ्याची सगळी तयारी झाली पण पावसाचाच पत्ता नाहि... ये रे बाबा अता.. ( @पाऊस : तुला नेहमी कंटाळा येतो ना त्याच त्याच पावसाळ्यातल्या कांदा/बटाटा भज्यांचा म्हणुन बघ सानिकाने ह्यावेळेस छान 'भाताचे पकोडे' केले आहेत.. अता तरी ये ना! :( )

छान आयडिया..ट्राय करणारच.. पण भात तेल नाही पीत? शिवाय भात कढईत पटकन जळण्या-करपण्याची भीती नसते का? त्यासाठी काही खास खबरदारी/


ओ सानिका तै, मागच्या वेळच्या प्रश्नाचे उत्तर द्या ना.. मी तुमच्याकडे पाहुणा म्हणुन येऊ का? थोडेच दिवस गॉड प्रॉमिस :)

यावेळचे सादरीकरण मजेदार. पाकृ छान आणि सोपी. पूर्वी (आमच्याकडे फ्रीज नसताना)उन्हाळ्यात भात उरला की जेवणे झाल्यावर आजी असा भात कुस्करून त्यात मीठ, जिरे घालून ताटात सांडगे घालायची . दोन दिवसात वाळले की छान कुरकुतीत तळून नवे तोंडीलावणे तयार. तुझ्या पाकृने त्या आठवणीला उजाळा मिळाला.

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXX XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX असो. शेवटच्या फटुतील हात स्वप्नीलचा आहे का?