गोलमाल कटलेट

खादाड अमिता's picture
खादाड अमिता in पाककृती
8 Jan 2011 - 8:30 pm

हि पाककृती म्हणजे एक 'classified' सिक्रेट आहे. पण आत्ता पर्यंत हे कटलेट एवढ्या लोकांनी आवडीने खाल्ले आहे कि आता ह्याचं गुपित सांगायला काहीच हरकत नाहीये. हि पाककृती म्हणजे एक saviour आहे. उ.दा. गेला पूर्ण आठवडा आमच्या कडे पाहुणे आणि रिलेटेड फिस्ट चालू आहे. रोज केलेल्या पदार्थातून काही न काही थोड्या फार प्रमाणात उरतं. आणि मग अचानक फ्रीज मधली सगळी जागा गायब होते. अश्या वेळी, हे गोलमाल कटलेट एक उत्तम ब्रेकफास्ट किंवा उपाहार ऑप्शन ठरतं. नेहमीच्या वेगेताब्ले कटलेट ची कृती तर सर्रास मिळते पण हि वेगळी 'kitchen solution' कृती करून बघा. आणि हो, सगळ्यांचा खाऊन झालं कि मग 'guess the ingredients' चा गेम खेळायला पण मजा येते. :)

सामग्री: (१० कट्लेट करता)
एक वाटी किंवा अधिक उरलेला भात
दोन वाट्या उरलेले उपमा/सांजा/पोहे
१/२ वाटी उरलेल्या वर्णाचा गोळा
दोन उकडलेले बटाटे
एक वाटी उरलेली भाजी (कोबी/फ्लॉवर/गाजर/शिमला मिरची)
एक वाटी ब्रेंड क्रंब
तळायला तेल
मीठ आणि काळी मिरी पूड चवीनुसार

कृती:

सर्व जिन्नस (तेल आणि ब्रेड क्रंब वगळून) एका मोठ्या भांड्यात घेऊन निट मळून एक जीव होईल असे कालवा.
जर हे मिक्स सैल झालं असेल तर त्यात अर्धी वाती कॉर्न फ्लोर मिसळून निट कालवा. मिश्रणाची चव घेऊन बघा (हे थोडा अवघड जाईल. मी हा स्टेप श्वास रोखून करते). मग त्याचे एका अंड्या च्या आकाराचे गोळे करा. प्रत्येक गोळ्याला ब्रेंड क्रंब मध्ये घोळवून बाजूला ठेवा. सगळे गोळे अशा प्रकारे तयार झाल्यावर त्याला तेलात मंद आचेवर तळा.
केचप, मायोनेस, हिरवी चटणी- ह्या बरोबर सर्व्ह करा.
ह्या कटलेट ला अजून चविष्ट करायला ह्यात चीज पण किसून घालता येते.

प्रतिक्रिया

डावखुरा's picture

8 Jan 2011 - 11:06 pm | डावखुरा

कट्लेट तर जीव की प्राण ...त्यात तो फोटु पहुन तर जीभ लपलपाई..पण आत्ताच जेवण झाले ते पण मस्त आईच्या हातची.. पाव भाजी..पण रविवारी मेनु फिक्स..
अमितातै परत एकदा भारी पाकृती..
लगे रहो...येउ द्या अजुन...
फोटो पाहुन किंवा प्रत्यक्ष पाहुनही कोणी त्या 'गेस द ईंग्रिडियंटस' या खेळात जिंकणार नाही..
आणि काहि उरले नसेल तर अशा पदार्थसाठी मुद्दाम जास्त बनवुन उरवायला हरकत नाही.. ;)

चिंतामणी's picture

8 Jan 2011 - 11:16 pm | चिंतामणी

'classified' सिक्रेट share केल्याबद्दल thanks.

पण हे "वेगेताब्ले कटलेट" काय प्रकार आहे???

(चौप्य सारखे काहीतरे असावे असे वाटते ;))

खादाड अमिता's picture

10 Jan 2011 - 10:43 am | खादाड अमिता

:D अहो घाई घाईत इन्ग्रजी शब्द टाईप केला.. माफ करा! :)

गवि's picture

10 Jan 2011 - 11:36 am | गवि

अच्छा.. आधी मला वाटलं , "वैतागले बाई.." किंवा वैताग्लेबै असा काही उदगार असावा.

मग कळाले.. चोप्य पस्ते प्रकार झालाय ते..

:)

चालायचंच. सुरुवातीला असं होणं नतुरल आहे. प्रच्तिसे केलीस की होईल चोर्रेक्त.

निवेदिता-ताई's picture

9 Jan 2011 - 12:53 pm | निवेदिता-ताई

अमिता....मस्त मस्त....घरातले उरलेले अन्न कोणी खात नाही...

हा उत्तम पर्याय आहे...मस्त आज्च करते, कालचे काय काय बरेच राहिले आहे फ्रिजमधे....;)

नन्दादीप's picture

9 Jan 2011 - 1:32 pm | नन्दादीप

अग ग्ग..ग्ग..ग्ग
काय ती सामग्री...!!! फार भयानक बॉ....ती गोळा करायला आधी ते पदार्थ बनवा, ते उरवा, आणि मग ते कटलेट बनवा....मोठ्ठी प्रक्रिया आहे बुवा.

असो, पण अमिता छान. अन्न फेकुन न देता त्याचा वापर कसा करायचा हे शिकायला मिळाले...मस्त....

टातून्टिचा उपाय आवडला..

शिल्पा ब's picture

10 Jan 2011 - 4:36 am | शिल्पा ब

<<टातून्टिचा उपाय म्हणजे काय?

नन्दादीप's picture

10 Jan 2011 - 12:51 pm | नन्दादीप

टाकाऊ तून टिकावू.....

सहज's picture

9 Jan 2011 - 3:46 pm | सहज

सुरेख फोटो! गुड जॉब!

धनंजय's picture

10 Jan 2011 - 6:18 am | धनंजय

आणि तळलेले कोफ्ते दिसतायतही अगदी देखणे!

(चुरचुरीत तळली तर मी कसलीही भजी, कसलाही वडा खाईन! मग कालच्या वरण-भात-भाजीचा फन्नाच उडवायची ही युक्ती छानच आहे...)

कच्चा पापड पक्का पापड's picture

10 Jan 2011 - 12:41 pm | कच्चा पापड पक्क...

मी अशा उरलेल्या भाज्या मिक्सरमधुन काढुन त्यामधे ज्वारिचे पीठ घालुन घटोत्कच थालपीठ बनविते.

नन्दादीप's picture

10 Jan 2011 - 12:53 pm | नन्दादीप

बापरे काय भयानक नाव आहे - " घटोत्कच थालपीठ"

फोटो आणि रेसिपी दोन्ही मस्तच.

शिल्लक पदार्थांतुन रुचकर पदार्थ दाखवल्याबद्दल धन्स.

खादाड अमिता's picture

10 Jan 2011 - 1:26 pm | खादाड अमिता

एव्ढ्या प्रोत्साहनाबद्दल

वहिनी's picture

17 Jan 2011 - 1:44 pm | वहिनी

छा न आहे ?