लेमन राईस

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
5 Jun 2012 - 1:12 pm

साहित्यः

२ वाट्या शिजवलेला भात (शिळा भात वापरला तरी चालेल)
१/४ वाटी लिंबाचा रस
२ हिरव्या मिरच्या चिरून
१-२ लाल सुक्या मिरच्या तोडून
कढीपत्ता
१ टेस्पून शेंगदाणे
१ टीस्पून मोहरी
१/४ टीस्पून मेथीदाणे
१ टीस्पून चणा-डाळ
१ टीस्पून उडदाची डाळ
१/४ टीस्पून हींग
१/२ टीस्पून हळद
मीठ चवीनुसार
तेल

.

पाकृ:

पॅनमध्ये तेल गरम करून मोहरी, मेथीदाणे, उडदाची डाळ व चण्याची डाळीची फोडणी करावी.

.

डाळी लालसर रंगावर परतल्या गेल्या की त्यात कढीपत्ता, हींग, हिरव्या व लाल सुक्या मिरच्या घालाव्या.

.

थोडे परतल्यावर त्यात हळद व शेंगदाणे घालावे. शेंगदाणे खमंग परतून घ्या.

.

आता त्यात शिजवलेला भात व मीठ घालावे. मिश्रण हलक्या हाताने एकत्र करावे.

.

त्यात लिंबाचा रस घालून गॅस बंद करावा व सगळे नीट मिक्स करून घ्यावे. लेमन राईस तयार.

.

तुम्ही कुठल्याही रायत्यासोबत किंवा पापडासोबत सर्व्ह करू शकता.

.

प्रतिक्रिया

स्मिता.'s picture

5 Jun 2012 - 1:19 pm | स्मिता.

लेमन राईस फार-फार आवडतो. करून पाहिला जाईल :)

धनुअमिता's picture

5 Jun 2012 - 1:19 pm | धनुअमिता

मस्त

पियुशा's picture

5 Jun 2012 - 1:21 pm | पियुशा

फोटो कसले टेंम्प्टींग दिसताहेत :)
अतिशय सोप्पा प्रकार्,आवड्ला :)

प्रास's picture

5 Jun 2012 - 1:22 pm | प्रास

वाचला गेला आहे.

सध्या असल्या धाग्यांसाठी ही सामायिक प्रतिक्रिया असेल याची पाकृकारांनी नोंद घ्यावी ही विनंती.

छळ मांडतात ही लोकं.... :-(

निवेदिता-ताई's picture

5 Jun 2012 - 2:05 pm | निवेदिता-ताई

अतिशय सुंदर नेहमीप्रमाणेच..:)

प्रभाकर पेठकर's picture

5 Jun 2012 - 2:09 pm | प्रभाकर पेठकर

आकर्षक छायाचित्रं आणि चविष्ठ वर्णन. मस्तं पाककृती.

ह्यात जरा लिंबाची साल किसून घातली तर स्वाद अजून वाढतो.

प्यारे१'s picture

5 Jun 2012 - 2:10 pm | प्यारे१

जेवल्यावर बघितल्याने ०.१ % कमी जळजळ झाली.

पाकृबद्दल... असो. :)

प्रचेतस's picture

5 Jun 2012 - 2:12 pm | प्रचेतस

खल्लास.

सुहास झेले's picture

6 Jun 2012 - 2:09 pm | सुहास झेले

+१

नेहमीप्रमाणे :) :)

अमृत's picture

5 Jun 2012 - 2:17 pm | अमृत

हा लेमन राइइस खाताना नेमके ते मेथीचे दाणेच चावले जातात आणि तोंड कडू होतं :-( इकडे दक्षिणेत लेमन राइस देवळात प्रसाद म्हणून सुद्धा वाटला जातो.

अमृत

१०० पैकी १००.

शाळेत असताना डब्यातला हमखास पदार्थ. ;)

मनीषा's picture

5 Jun 2012 - 3:05 pm | मनीषा

साधी , सोपी आणि रुचकर पाककृती.
आवडली !
फोटोपण सुरेख आहेत.

jaypal's picture

6 Jun 2012 - 11:15 am | jaypal

१+

खुपच छान!!नक्की करुन बघते व फोटो टाकते..

ओह्ह वॉव सानिका थॅंक्स ..
मला ह्याची साधी सोपी पद्धत हवी होती
नक्क्की बनवेन ...:)

पिंगू's picture

5 Jun 2012 - 6:46 pm | पिंगू

फक्त आणि फक्त.. लय भारी.

- पिंगू

रेवती's picture

5 Jun 2012 - 7:33 pm | रेवती

छान सादरीकरण.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jun 2012 - 9:16 pm | अत्रुप्त आत्मा

शेवटचा फोटू... आणी फोटुंचा शेवट... अगदी मस्त! :-)

दिपक's picture

6 Jun 2012 - 2:25 pm | दिपक

काय ती सजावट. काय ते वर्णन अन्‌ काय ते फोटू.

राजमुद्रा२१'s picture

6 Jun 2012 - 3:14 pm | राजमुद्रा२१

वा झकास :)

पैसा's picture

6 Jun 2012 - 6:14 pm | पैसा

माझा आवडता पदार्थ आणि सोपा! फोटो बघून आत्ता पाहिजेच असं वाटायला लागलंय!

आदित्यराजे's picture

6 Jun 2012 - 8:12 pm | आदित्यराजे

करून बघण्यात येईल. आणखी काही असे सोपे प्रकार असतील तर आम्हास पा कृ चे धागे देणे. फार भारी नसले तरी चालतील सध्या एकटे आहोत, फक्त उदरभरणाची सोय तेवढी बघायचीय.

श्रीरंग_जोशी's picture

7 Jun 2012 - 10:37 am | श्रीरंग_जोशी

छायाचित्रे फारच सुरेख आहेत.
अनेक दक्षिण भारतीय पदार्थांपैकी हा सर्वाधिक सुटसुटीत. बनवायला अन खायलाही.

ऋषिकेश's picture

7 Jun 2012 - 10:45 am | ऋषिकेश

वा वा वा!

गोंधळी's picture

7 Jun 2012 - 2:07 pm | गोंधळी

वा छान.

पण सध्या फोटो बघुनच पोट भरत आहे.

जाई.'s picture

7 Jun 2012 - 3:38 pm | जाई.

मस्तच

किलमाऊस्की's picture

8 Jun 2012 - 5:23 pm | किलमाऊस्की

या कृतीने. मस्त झालेला. धन्यवाद. :-)

सानिकास्वप्निल's picture

11 Jun 2012 - 12:27 am | सानिकास्वप्निल

मस्तच!!

खूप खूप धन्यवाद हेमांगी :)

मदनबाण's picture

9 Jun 2012 - 10:09 am | मदनबाण

पाकॄ वाचली नाहीये... फक्त फोटु पाहुनच समाधान झाले ! :)

नीधप's picture

12 Jun 2012 - 1:29 pm | नीधप

हा माझा लेमन राइस

प्रभाकर पेठकर's picture

12 Jun 2012 - 2:06 pm | प्रभाकर पेठकर

व्वा....' हा माझा लेमन राइस' सुद्धा आवडला. आता कधीतरी करून पाहीन.

चिंतामणी's picture

12 Jun 2012 - 6:09 pm | चिंतामणी

पण फटुंशीवाय मजा नाही.

नीधप's picture

17 Jun 2012 - 8:47 pm | नीधप

आहेत की फटु..

चिंतामणी's picture

12 Jun 2012 - 4:22 pm | चिंतामणी

XXXXXXXXXXXXXXXX

XXXXXXXXXXXXXXXXXXX

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

XXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXXX

हरिप्रिया_'s picture

12 Jun 2012 - 4:41 pm | हरिप्रिया_

कालच बनवून पाहिला.मस्त झाला.
धन्स..

परवा करुन पाहिला सानिकातै,
पण चण्याची डाळ आणि ऊडीद यांच समीकरण चावता चावलं जाईना.. बाकी चव मस्त आली पण पुढच्या वेळी डाळी न घालताच करु म्हणतो.. आणि हो लसणाशिवाय या भाताला मी तोंडी घेत नाही, त्यामुळे लसूण घातला होता भरपूर खरपूस तळून :)