फायनल ड्राफ्ट : एक नितांत सुंदर नाटक.

तर्री's picture
तर्री in जनातलं, मनातलं
21 Apr 2012 - 6:00 pm

हे नाटक खूप दिवस हातास लागत नव्हते. एका मित्राने “जरूर बघ “ अशी शिफारस केली होती. गेल्या गुरुवारी रंगायतनला प्रयोग होता. हल्ली फोन करून तिकीट मिळवता येते. त्यामुळे दूरच्या नाट्यगृहातही “एकाच” खेपेत नाटक पहाणे शक्य होते.

नाटक सुरु होण्यापूर्वी तिकीट खिडकीशी प्लान वरून गर्दीचा अंदाज घेण्याची मला नेहमीच उत्सुकता असते. “प्लान तर रिकामाच दिसत होता”. अर्थात नाटकाचा दर्जा आणि होणारी गर्दी ह्यांचा काही सम्बंध नसतो . हाच अनुभव चारचौघी ( सुरवातीला) , किरवंत , आत्मकथा , लग्न हया नाटकांना आला होता.

फायनल ड्राफ्ट हे एका साध्या कथेवर बेतलेले नाटक आहे . बीज कथा साधीच असली तरी नाटकाची संहिता अव्वल व अस्सल ! गिरीश जोशी हे हया नाटकाचे लेखक आहेतच शिवाय दिग्दर्शन व प्रमुख भूमिका त्यांचीच आहे. हया तीनही आघाडयांवर त्यांना पैकी च्या पैकी मार्क मिळावेत.

गिरीश च्या जोडीला मुक्ता बर्वे ही समर्थ अभिनेत्री आहे. सम्पूर्ण नाटकात दोनच पात्रे आहेत. गिरीश आणि मुक्ताचा वैयक्तिक आणि परस्पर पूरक अभिनय हया मुळे प्रेक्षकांना एका दर्जेदार नाट्यानुभव मिळतो. हया दर्जाचे लेखन , दिग्दर्शन व अभिनय गेल्या काही वर्षात अभावानेच पहायला मिळाले आहे.

हया नाटकातील भूमिकांना नावे नाहित आणि म्हणून त्यांचा उल्लेख गिरीश / मुक्ता असाच केला आहे.

दूरच्या खेड्यातून एक मुलगी-मुक्ता शहरात येते. पुण्यामध्ये तिची बहीण आहे. तिच्याकडे राहुन ती काहीतरी फालतू कोर्स करत / शिकत असते. अतीसामान्य रूप व बुद्धी ह्यामुळे आत्मविश्वास नसलेली ही मुलगी “कथालेखन” करायला एका अकादमी मध्ये प्रवेश घेते. हया अकादमीचे काथालेकानाचे प्रशिक्षक गिरीश असतात. पहिल्या दिवसापासूनच मुक्ताचे
अभ्यास क्रमात लक्ष नसते. तिची प्रगती (?) लक्षात घेवून गिरीश तिला आपल्या घरी बोलातात. पुण्यात कुटुंब असूनही गिरीश मुंबई मध्ये जास्त रहात असतात. मुक्ता , गिरिश च्या घरी येते आणि त्यांच्या संवादातून कथेचे तत्वज्ञान , कथा लेखन प्रक्रिया आणि नाटक फुलत जाते. मुक्ता हया बावळट भूमिकेत रंगमंचावर येते आणि नाटकाचा ताबा घेवून जाते
गिरीश तिला कथा लिहून आणायला सांगतात. ती अतिशय सामान्य कथा की जी तिच्याच आयुष्यावर बेतली आहे अशी वाटावी , लिहून आणते. गिरीश तिला कथा लेखन परत परत शिकवतात पण मुक्तामध्ये प्रगती होत नाही.

गिरीशची (नाटकातते पात्र) पार्श्वभूमी थोडी विचित्र आहे .गिरीशचे त्याच्या पत्नी बरोबर पटत नसते. तसेच तो एक चांगला पण अपयशी लेखक असतो. ७ कादंबर्या , चार नाटके लिहिलेला लेखक पुढे अपयशी ठरतो..चांगले वाचन असलेली मुक्ता त्याच्या लेखनाची चाहती असते. अपाशाने पराभूत गीरीश एका चांगल्या कथालेखकाचा बुरखा पांघरून वावरत असतो. हा बुरखा मुक्ता टराटरा फाडते. एका बुजाऱ्या मुलीचा गिरीश ला बेनकाब करण्यापर्यंत प्रवास हेच हया नाटकाचे सार आहे. नाटकाचा शेवट हा मात्र प्रत्यक्ष रंगमंचावर अनुभवावा असाच.

मुक्ता बर्वे व गिरीश जोशी ह्यांचे विनोदी , आशय पूर्ण संवाद हाही हया नाटकाचा आणि एक विशेष.

आजच्या नाटकात विक्षिप्त चाळे , द्वयर्थी कोट्या आणि लैंगिकता सूचक संवाद ईतके असतात की संपूर्ण कुटुंबाबरोबर नाटक पहाणे अवघड होवून जाते. हया पार्श्वभूमीवर हया नाटकाचे संवाद बावन कशी सोन्यासारखे शुद्ध आहेत. दूरान्वये सुध्धा हया नाटकात असे काहीही नाहे , हे ही मुद्दाम लिहावेसे वाटते.

राजन भिसे यांचे नाटकाचे नेपथ्य , नरेंद्र भिडे यांचे संगीत व गीता गोडबोले यांची वेशभूषा नाटकास साजेसी.

हया नाटकाचा दोष दाखवायचाच तर तो म्हणजे नाटकाची भाषा “थोडी” जड आहे. पण ती संहितेची मागणीच आहे हे समजून तो दोष ही माफ करावा व सहकुटुंब आस्वाद घ्यावा.

मराठी रंगभूमी भारात्तात का नाव राखून आहे ? हया प्रश्नाचे उत्तर “फायनल ड्राफ्ट “ सारख्या नाटककांच्या संदर्भानेच धावे लागेल.

नाट्यआस्वाद

प्रतिक्रिया

हो. हो. मी सहमत आहे. मलाही हे नाटक आवडले आहे.

रेवती's picture

22 Apr 2012 - 12:42 am | रेवती

थोडंफार ऐकलं होतं या नाटकाबद्दल.
बरं झालं लिहिलत.

भडकमकर मास्तर's picture

22 Apr 2012 - 2:33 pm | भडकमकर मास्तर

याच नाटका च्या ओळखीचा हा पूर्वीचा धागा...
http://www.misalpav.com/node/2654

अन्यथा तुमच्याच धाग्यावर लिहिले असते.

दोन्हीही परीक्षणे आवडली.
आता पहायलाच हवे..