(हुच्च माझा बोका)

सूड's picture
सूड in जे न देखे रवी...
27 Mar 2012 - 7:30 pm

आमची प्रेरणा- शीर्षकगीत

काही न चाहूल होती..माझिया पावली
मी जरा गुरगुरले अन दूर गेली छोटुकली

चुलीवरी होते पय..त्यास दाट होती साय
हावर्‍या मनात माझ्या..भरे तयाचा विषय

थबकले उंबर्‍यात मी..येई मालकीण आत
जरा धावले कडेने..फेकिले तो फळकूट

मार वाचवू मी कसा, साथ देईना हा सखा
उभा समोर बोळीत..बघा हुच्च माझा बोका

विडंबन

प्रतिक्रिया

पैसा's picture

27 Mar 2012 - 7:35 pm | पैसा

म्याव म्याव म्याव
म्याव म्याव म्याव म्याव म्याव म्याव
म्याव म्याव म्याव

अन्या दातार's picture

27 Mar 2012 - 7:45 pm | अन्या दातार

एका बोक्याने नक्की कुणाचे मनोगत लिहिलय म्हणायचे? ;)

चौकटराजा's picture

27 Mar 2012 - 7:51 pm | चौकटराजा

जाणु मन दुसर्‍याचे तदा गीत मग साकारते
हे विडंबन नाही रे ओरीजिनल गीत आहेच ते

माउच्या विश्वात जाऊन कविने एक सुंदर चित्र रेखाटले आहे.
सूड भाउ , गीत सुघटले आहे.
पुलेशु

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Mar 2012 - 1:43 pm | विश्वनाथ मेहेंदळे

सहमत आहे. एकदम असेच म्हणायचे होते.

सुहास झेले's picture

27 Mar 2012 - 8:34 pm | सुहास झेले

हा हा हा ..... लैच !!

म्याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽव!!!!!!!!!!

=)) =)) =))

अप्रतिम!

अत्रुप्त आत्मा's picture

27 Mar 2012 - 10:54 pm | अत्रुप्त आत्मा

मार वाचवू मी कसा, साथ देईना हा सखा
उभा समोर बोळीत..बघा हुच्च माझा बोका >>> शेवटी मारलेल्या तडाख्यानी खपलेलो आहे

स्पा's picture

28 Mar 2012 - 8:54 am | स्पा

मेलो मेलो ... :D
चालीत म्हणून पाहिल्यावर अजूनच वारल्या गेलो

=))
=))

अफाट.
च्यायला हा बोका लिहितो फार कमी, पण जे लिहितो ते लै भारी.

प्यारे१'s picture

28 Mar 2012 - 2:30 pm | प्यारे१

मग्ग्ग्ग्ग!

उगाच मोकाट वळूसारखे काय लिहायचे आहे कारण नसताना नको तिथे नको ते? ;)

वल्ली अन प्यारे दोहोंशी शमत...

चिंतामणी's picture

29 Mar 2012 - 9:01 am | चिंतामणी

मी जरा गुरगुरले

थबकले उंबर्‍यात मी

असे वाचल्यावर हे "मांजरीचे मनोगत" वाटले.

प्रचेतस's picture

29 Mar 2012 - 9:05 am | प्रचेतस

मनोगत मांजराचंच आहे, पण मांजराने कदाचित धाक दाखवून बोक्याकडून लिहून घेतलं असावं.

जयवी's picture

28 Mar 2012 - 12:18 am | जयवी

:)

नंदन's picture

28 Mar 2012 - 12:54 am | नंदन

खी: खी: खी:, मस्त! 'माझ्या मनीचे हितगुज सारे' हे शीर्षकही चालून जाईल :)

रमताराम's picture

28 Mar 2012 - 4:56 pm | रमताराम

त्या बोक्याला ती अजून 'माझा होशील का बोका?' न म्हटल्याने तो अंमळ रुसला आहे.

:)
आवडेश.

आत्ताच प्रेरणा ही ऐकली.

मेघवेडा's picture

28 Mar 2012 - 2:55 am | मेघवेडा

हा हा हा .. मस्त! :)

सांजसंध्या's picture

28 Mar 2012 - 5:18 am | सांजसंध्या

मस्त विडंबन आहे..

मदनबाण's picture

28 Mar 2012 - 8:06 am | मदनबाण

खी खी खी... ;)
मस्तच ! :)

(प्रेमळ बोका) ;)

५० फक्त's picture

28 Mar 2012 - 8:23 am | ५० फक्त

सुंदर कविता, मुक्या प्राण्यांचे मनोगत टिपणे ही एक अवघड कला आहे आणि ते जमलंय मस्तपैकी.

हेहेहेहे

बोके असेच असतात ,साथ द्यायच्या नावाने शिमगा ,बोळात फिराया सांगा नुसतं.. :P
तेवढ भारि जमतं.

सुडोपंत ...मस्त लिहिलयं. :)

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2012 - 10:41 am | अत्रुप्त आत्मा

@साथ द्यायच्या नावाने शिमगा ,बोळात फिराया सांगा नुसतं.. >>>

सूड's picture

28 Mar 2012 - 1:46 pm | सूड

>>बोके असेच असतात ,साथ द्यायच्या नावाने शिमगा ,बोळात फिराया सांगा नुसतं..
तेवढ भारि जमतं.

ओ तै, काहीतरी चुकतंय तुमचं बरं का !! बोक्यांना सत्य परिस्थितीची जाणीव असते. उगाच कोणाच्या घरात डल्ला मारण्यापेक्षा पुढ्यात येईल ते गप गुमान खातात बिचारे. मांजरी मात्र खाईन तर तुपाशी प्रवृत्तीच्या असतात आणि एखादं फळकूट पेकाटात बसलं की मग बोक्यांच्या नावाने शिमगा करतात, चौर्यकर्मात मदत करत नाहीत म्हणून.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Mar 2012 - 3:36 pm | विश्वनाथ मेहेंदळे

आले हे बोके शोवार्निस्त पिग्स. जरा कुठे बिचाऱ्या मांजऱ्या व्यक्त होऊ पाहताहेत तर लगेच दोष दाखवायला लागले. अशाने मांजऱ्या नाउमेद होतात माहित आहे ?

असो, तर सुड्पंत, मांजर हा अत्यंत इमानी प्राणी म्हणून प्रसिद्ध आहे माहित नाही ? मांजरासारखा प्रेमळ प्राणी अजिबात मिळणार नाही. इतर काही प्राणी असतात आपल्याला हवे तेव्हा जवळ येणारे आणि मनात नसेल तेव्हा फिस्कारून पंजा मारणारे... पण मांजर ???छे छे, अजिबात नाही !!!

जेनी...'s picture

28 Mar 2012 - 10:16 pm | जेनी...

छे छे, अजिबात नाही !!! :D

काहितरीच काय ,तुमच पण :P

बिच्चारी मांजर ...:(

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Mar 2012 - 10:33 pm | विश्वनाथ मेहेंदळे

नक्की भावना काय आहेत ? मांजरीच्या बिचारेपणाबद्दल सहमत आहात की नाही ?
०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====
मंद्रमवंध तेंड्रलिक मंजम वर नेन्जम इल्लीयो अंबे एन अंबे

मांजर नेहेमी समोरची परिस्थिती बघुन बिच्चारं रहायच कि गुर्र गुर्रायच हे ठरवते.;)

आता तुमच तुम्हीच ठरवा :P..कि मा़ंजर कशी असते ते....:D

विश्वनाथ मेहेंदळे's picture

29 Mar 2012 - 2:02 pm | विश्वनाथ मेहेंदळे

बोके पण नेहमी समोरची परिस्थिती बघून ठरवतात. साथ द्यायची की शिमगा करायचा ;-)

असो, इथे फार अवांतर नको. पुढे अजून चर्चा करायची असेल तर खरड/व्यनित बोलू शकतो. नाही तर सुडोपंत फळकुट घेऊन मारायला येतील.

०====०====०===०====०====०====०====०====०====०====०====
कडकट्ट कडकट्ट .. कडकट्ट कट्टकड ... कडकडकड कट्ट कड कड....

धन्या's picture

28 Mar 2012 - 10:52 am | धन्या

शीर्षकगीताची प्रेरणा असली तरी स्वतंत्र कविता म्हणूनही हे मांजरीचे मनोगत छान आहे.

(तुमच्या मनीम्यावने खटयाळपणे केलेली तक्रार समजायची का? ;) )

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Mar 2012 - 4:12 pm | विश्वनाथ मेहेंदळे

शीर्षकगीताची प्रेरणा असली तरी स्वतंत्र कविता म्हणूनही हे मांजरीचे मनोगत छान आहे.

+१

(तुमच्या मनीम्यावने खटयाळपणे केलेली तक्रार समजायची का? )

थोडी सुधारणा सुचवतो. "तुमच्या अनेक मन्यांपैकी एकीने खटयाळपणे केलेली तक्रार समजायची का?" असे म्हणा.

रसप's picture

28 Mar 2012 - 11:49 am | रसप

लै भारी!!

हुच्च दर्ज्याचे विडंबन!!

सूड साहेब, भारी मस्त कविता

कवितानागेश's picture

28 Mar 2012 - 2:59 pm | कवितानागेश

लै भारी.
:D

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Mar 2012 - 3:42 pm | बिपिन कार्यकर्ते

माऊला आवडला बोका.

रेवती's picture

29 Mar 2012 - 8:22 am | रेवती

ए काय रे!
मूळ कवी मिपावरच आहेत बरं का.

मैत्र's picture

29 Mar 2012 - 5:28 pm | मैत्र

झकास माऊ :)

(एक बोका)

प्रसाद गोडबोले's picture

30 Jun 2014 - 2:12 pm | प्रसाद गोडबोले

=))
हे भारी होतं =))

सौंदाळा's picture

30 Jun 2014 - 2:18 pm | सौंदाळा

अमुल्य रत्नच आहे हे.
वर आणल्याबद्दल धन्यवाद

दिपक.कुवेत's picture

30 Jun 2014 - 4:18 pm | दिपक.कुवेत

चालीत तर अगदि फिट्ट बसतयं

बॅटमॅन's picture

30 Jun 2014 - 2:22 pm | बॅटमॅन

च्यायला =)) सुडक्याने असली रत्नंही प्रसवलीत हे ठौक नव्हतं. जबराटच =))

पिलीयन रायडर's picture

30 Jun 2014 - 4:28 pm | पिलीयन रायडर

चालीत आणि बॅकग्राऊंड म्युझिक सकट म्हणुन पाहिलं.. फारच भारी झालंय!!!

निखळानंद's picture

30 Jun 2014 - 4:36 pm | निखळानंद

मनीच्या मनीच्या गुजगोष्टी !

यसवायजी's picture

30 Jun 2014 - 5:46 pm | यसवायजी

लै भारी..
खोक्यावर खोका डब्बल खोका, तू माझी मांजर अन मी तुझा बोका ;)