चैतन्य दीक्षित in जे न देखे रवी... 6 Mar 2012 - 4:21 pm पालखी काळाची थांबली एकदा, बदलण्या खांदा भोईयांचा | त्याच क्षणी माझ्या-समोर ती होती, पेटवून ज्योती, अंतरात | पालखी काळाची गेली निघोनिया, ज्योत ठेवोनिया तेवतीच | आता वाट आहे पहायाची फक्त, 'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी | -चैतन्य कविता प्रतिक्रिया छान 6 Mar 2012 - 4:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी रचना छान झाली आहे. त्याच क्षणी माझ्या-समोर ती होती, पेटवून ज्योती, अंतरात | इथे वृत्त गंडले आहे काय? :) 6 Mar 2012 - 4:53 pm | राघव मस्त लिहिलं आहेस.. क्लास! :) स्वगतः स्साला हा चैतन्य मधूनच असलं भारी लिहून जातो ना की ज्याचं नाव ते.. राघव व्वाह,,,व्वा..व्वा... मित्रा 6 Mar 2012 - 7:31 pm | अत्रुप्त आत्मा व्वाह,,,व्वा..व्वा... मित्रा ,थोडकेच पण काय समर्पक काव्य लिहिलयस रे... सलाम सलाम सलाम आपला तुला खूपच छान आहे. 6 Mar 2012 - 8:02 pm | सांजसंध्या खूपच छान आहे. वाह खूपच सुंदर !! 6 Mar 2012 - 11:21 pm | हारुन शेख कविता खूप आवडली. छोटसच विरहगीत पण मनाला स्पर्श करून गेलं -------------------------------------------------------------------------------------------- क्या बात है!! 7 Mar 2012 - 12:02 am | शुचि क्या बात है!! धन्यवाद 7 Mar 2012 - 10:47 am | चैतन्य दीक्षित प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार. काव्यप्रेमी, वृत्त गंडले नाही. ६,६,६,४ असं अभंगाचं वृत्त आहे. त्याच क्षणी माझ्या (६) समोर ती होती (६) पेटवून ज्योती (६) अंतरात (४) (माझ्यासमोर हा एकच शब्द आहे, पण वृत्ताच्या हिशोबाने माझ्या-समोर असा लिहिला आहे) धन्यवाद, चैतन्य. आता वाट आहे पहायाची फक्त, 29 Oct 2015 - 8:38 pm | प्रसाद गोडबोले आता वाट आहे पहायाची फक्त, 'क्षणा'तून मुक्त होण्यासाठी | अप्रतिम ! 'काही निमित्ताने' आज बरेच दिवसांन्नी ही कविता आठवली म्हणुन धागा वर काढत आहे :) वाह.. 30 Oct 2015 - 11:40 am | विशाल कुलकर्णी वाह.. धन्स रे प्रगो हि कविता वर काढल्याबद्दल !
प्रतिक्रिया
6 Mar 2012 - 4:47 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
रचना छान झाली आहे.
इथे वृत्त गंडले आहे काय?
6 Mar 2012 - 4:53 pm | राघव
मस्त लिहिलं आहेस.. क्लास! :)
स्वगतः स्साला हा चैतन्य मधूनच असलं भारी लिहून जातो ना की ज्याचं नाव ते..
राघव
6 Mar 2012 - 7:31 pm | अत्रुप्त आत्मा
व्वाह,,,व्वा..व्वा... मित्रा ,थोडकेच पण काय समर्पक काव्य लिहिलयस रे... सलाम सलाम सलाम आपला तुला
6 Mar 2012 - 8:02 pm | सांजसंध्या
खूपच छान आहे.
6 Mar 2012 - 11:21 pm | हारुन शेख
कविता खूप आवडली. छोटसच विरहगीत पण मनाला स्पर्श करून गेलं
--------------------------------------------------------------------------------------------
7 Mar 2012 - 12:02 am | शुचि
क्या बात है!!
7 Mar 2012 - 10:47 am | चैतन्य दीक्षित
प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.
काव्यप्रेमी,
वृत्त गंडले नाही.
६,६,६,४ असं अभंगाचं वृत्त आहे.
त्याच क्षणी माझ्या (६) समोर ती होती (६)
पेटवून ज्योती (६) अंतरात (४)
(माझ्यासमोर हा एकच शब्द आहे, पण वृत्ताच्या हिशोबाने माझ्या-समोर असा लिहिला आहे)
धन्यवाद,
चैतन्य.
29 Oct 2015 - 8:38 pm | प्रसाद गोडबोले
अप्रतिम !
'काही निमित्ताने' आज बरेच दिवसांन्नी ही कविता आठवली म्हणुन धागा वर काढत आहे :)
30 Oct 2015 - 11:40 am | विशाल कुलकर्णी
वाह..
धन्स रे प्रगो हि कविता वर काढल्याबद्दल !