साहित्यः
१ लिटर दूध
४ टेस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी - जास्त)
२ छोटी संत्री
१ टीस्पून वेलचीपूड
१/२ टीस्पून केशर
सजावटीसाठी बदाम-पिस्त्याचे काप
पाकृ:
प्रथम दूध एका नॉन-स्टीक भांड्यात तापवायला ठेवावे.
दूधाला एक उकळी आली की गॅस मंद आचेवर ठेवून दूध आटु द्यावे. मधे-मधे डावाने ढवळत रहावे.
दूध निम्मे झाले, जरा घट्ट झाले की त्यात वेलचीपूड, केशर व साखर घालावे व ढवळावे.
साखर विरघळली की त्यात थोडे बदाम-पिस्त्याचे काप घालावे व गॅस बंद करावा.
संत्र्याची साले काढून ठेवावी. फोडींमधील बिया व वरचा पातळ पांढरा भाग काढून गर वेगळा करावा.
दूध पूर्ण गार झाले की त्यात संत्र्याचा गर घालावा व खीर फ्रिजमध्ये ३-४ तास थंड होण्यासाठी ठेवावी. (दूध गरम असताना संत्र्याचा गर घालून नये दूध नासेल.)
आदल्या रात्री करुन ठेवली तर संत्र्याचा स्वाद आणखीन खीरीत उतरेल.
ही मस्त, चविष्ट खीर थंड सर्व्ह करावी :)
प्रतिक्रिया
29 Feb 2012 - 7:00 pm | गणपा
एकदम झँटॅमॅटीक पाककृती.
29 Feb 2012 - 7:07 pm | अन्नू
आज सानिकाजींची नवीन पाकृ आली रे आली.....
29 Feb 2012 - 7:25 pm | कॉमन मॅन
छान सजावट..
1 Mar 2012 - 11:18 am | पियुशा
सॉल्लीड , नविन प्रकार कळ्ला खीरीचा ,धन्स ग
आजच करुन खीरीचा लुफ्त उठ्वन्यात येइल :)
29 Feb 2012 - 7:42 pm | अन्या दातार
सध्या मिपावरच्या सुगरणी व बल्लवांनी आपापले झारे , पळ्या कुठं लपवून ठेवलेत का? पाकृ कशी नाही आली इतके दिवसात??
असा विचार काल आला, अन आत्ता तुमची ही पाकृ! क्या बात है!
29 Feb 2012 - 7:44 pm | उदय के'सागर
गेल्या ३-४ दिवसांपासुन पाकृ विभागात नविन काहि भर नव्हतीच... आणि भर पडली ते एकदम सानिका-ताईंच्या पाकृतिनेच .. व्वा ..क्या बात!!!
नेहमी प्रमाणे "झकास" !!! ... उन्हाळा सुरु झालाच आहे... तेव्हा अश्याच 'थंडगार' पाकृ येउ द्या! :)
29 Feb 2012 - 7:44 pm | स्मिता.
ही संत्र्याची खीर की बासुंदी गं? फोटो तर छान दिसताय... गणपाभाऊ म्हणतात तसे झँटॅमॅटीक :)
पण चव आवडेल की नाही साशंक आहे.
29 Feb 2012 - 8:09 pm | सानिकास्वप्निल
ही संत्र्याची खीर आहे बंगाल मध्ये ही खीर बनवली जाते :)
आपण दूधपाक जसा साधारण घट्ट बनवतो तसचं ह्या खीरीला दाटपणा असतो...बासुंदी इतका नाही :)
चवीचं तर तू बनवून , खाऊन बघीतल्याशिवाय नाही समजणार पण स्वादीष्ट बनते इतके नक्की :)
धन्यवाद
29 Feb 2012 - 10:07 pm | निवेदिता-ताई
चव मस्तच असणार......
ही संत्र्याची खीर प्रथमच पहाते आहे....तो.पा.सु..
29 Feb 2012 - 7:45 pm | नगरीनिरंजन
अहाहाहा....
29 Feb 2012 - 8:16 pm | सुहास झेले
सादरीकरण आणि पाककृती नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट ..... तोंडाला पाणी सुटले :) :)
29 Feb 2012 - 8:17 pm | अत्रुप्त आत्मा
हाय,हाय,हाय...
पाणी सुटल्यालं हाये...
29 Feb 2012 - 8:20 pm | रेवती
अगं बाई तुझे (पाय नव्हे) हात कुठं आहेत.
जरा फोटू पाठवून दे.
मला शंका होतीच की दूध नासणार नाही का?
पण गार दुधात संत्रं मिसळल्याने आल इज वेल रहात आहे असे दिसते.
29 Feb 2012 - 8:58 pm | पिंगू
जे ब्बात.. बर्याच दिवसांनी सानिकातायने जबरा एन्ट्री मारली आहे. मी अशी खीर एकदा माझ्या ओळखीच्या बंगाली काकांकडे खाल्लेली आहे, तिची आठवण झाली.
- पिंगू
29 Feb 2012 - 10:10 pm | कौशी
पाककृती नेहमीप्रमाणेच मस्तच...
आवडली.
29 Feb 2012 - 10:34 pm | मराठे
कीलर !!
29 Feb 2012 - 11:33 pm | JAGOMOHANPYARE
ते शेवटच्या फोटोत संत्र्याच्या मोकळ्या सालीचे फूल केले आहे.. ते कसे केले हेही लिहा.
1 Mar 2012 - 12:24 am | इन्दुसुता
दिसला दिसला .. सानिकातैंचा गुबाली ( !) चमचा दिसला. आता ५०फक्त यांना हायसं होईल अगदी.... :)
पाकृ अतिशय देखणी आहे, स्वादिष्ट ही असणारच. नेहमी प्रमाणेच करून बघणार. ( हेच काय दरवेळी लिहायचं .. पण वेगळं लिहिणार तरी काय? :) )
वर जामोप्या ह्यांनी लिहिल्याप्रमाणेच म्हणते... संत्र्याच्या सालीची फुले कशी केलीत ते सांगावे...
2 Mar 2012 - 7:41 am | ५० फक्त
अरे हायसे म्हणजे काय, केवढं टेन्शन होतं मला,
असो, पाकृ बद्दल जास्त काही लिहिणे नाही, पण मला आश्चर्य वाटतं ते स्वप्निलच्या संयमाचं, हे एवढं समोर दिसत असताना गप्प उभे राहुन एवढे छान फोटो काढ्णे ही साधी गोष्ट नाही, माझा घरी तर हल्ली बायको शेंगा सुद्धा मी झोपल्यावर भाजते.
1 Mar 2012 - 4:00 am | प्राजु
मला वाटलं तू संत्रही शिजवून किंवा वाफवून घेशिल. पण ते तसंच घातलेलं दिसतंय.
दूध एकदम थंड झाल्यावर घातलंस का?
पण नासलं नाही.. जरा आश्चर्यंच वाटलं. :)
मस्त आहे रेसिपी.
1 Mar 2012 - 4:03 am | प्राजु
ती संत्री म्हणजे क्लॅमेंटाईन्स आहेत का?
कारण इथे ऑरेंजिस म्हंटले कि सणसणीत मोठी संत्री मिळतात.
1 Mar 2012 - 4:53 pm | सानिकास्वप्निल
अगं मी पाकृत तसे लिहिले आहे
दूध पूर्ण गार झाले की त्यात संत्र्याचा गर घालावा व खीर फ्रिजमध्ये ३-४ तास थंड होण्यासाठी ठेवावी. (दूध गरम असताना संत्र्याचा गर घालू नये दूध नासेल.)
आणी ही खीर थंडचं सर्व्ह करावी , संत्र्याचा गर घातल्यामुळे त्याला जो स्वाद येतो तो एकदम भन्नाट लागतो :)
हो ती संत्री म्हणजे क्लॅमेंटाईन्स आहेत पण भारतात कुठे क्लॅमेंटाईन्स मिळणार म्हणून मी संत्री लिहिले आहे आणी तशी पण क्लॅमेंटाईन्स हे आपल्या भारतात मिळणार्या संत्र्याच्या चवीसारखीच लागतात :)
1 Mar 2012 - 5:03 pm | गणपा
चला संत्राला अजुन एक समानअर्थी शब्द मिळाला.
बाकी आमच्या ईथे त्याला टँजरीन म्हणतात.
ऑरेंज म्हटलं की ही भली मोठ्ठी मोसंबी सदर्यात* टाकतात.
*आम्हाला पदर कुठला?
(अभ्यासु) - गणा
7 Mar 2012 - 3:02 am | बहुगुणी
टँजेरीन आणि क्लेमेंटाईन ही दोन्ही फळं दिसायला सारखी असली आणि मँडॅरिन ऑरेंजेस या प्रकारात मोडत असली तरी त्यांत थोडा फरक आहे; आधिक लालसर असलेलं टँजेरिन हे पिवळसर क्लेमेंटाईन पेक्षा थोडंसं आंबट पण संत्र्यापेक्षा गोड असं, बिया असलेलं फळ आहे, तर टँजेरिन मध्ये बहुतेक वेळा बिया नसतात. (खालील चित्रे विकीवरून साभार)
क्लेमेंटाईन
'सास्वं'च्या पाककृतीविषयी काय लिहावं! उच्च कोटीची मांडणी, आणि नवीनच पदार्थाची ओळख झाली, मस्त!
1 Mar 2012 - 7:33 am | सूड
दिसतंय झकास पण बरं लागतं का हो हे ? मी काय म्हणतो धाग्यावर रिप्लाय दिलेल्यांसाठी तरी निदान बनवून पाठवाच. ;)
1 Mar 2012 - 10:10 am | Pearl
खूप सही दिसत आहे. तों.पा.सू. ;-)
कधी येऊ खीर खायला :-)
1 Mar 2012 - 10:48 am | मराठमोळा
अरेवा.. ही डिश आधी कधी पाहिली नाहिये.. पण एका नागपुरी मित्राने आणलेली संत्र्याची बर्फी चाखली होती - एकदम सुपर्ब होती.. :)
फोटु अॅज युजवल झकास!!
1 Mar 2012 - 4:55 pm | सानिकास्वप्निल
नागपुरची संत्रा बर्फी नुकतीच खालेल्ली आहे त्यामुळे त्याची चव जीभेवर तरळते आहे :)
धन्यवाद :)
1 Mar 2012 - 11:38 am | अमृत
सुद्धा आवडली. . .अर्थातच खीरीवर आणखी वेगळी प्रतिक्रिया काय देणार? वरिल सर्व प्रतिक्रियांना अनुमोदन.
(नागपुरी) अमृत
1 Mar 2012 - 11:39 am | चिगो
धन्य आहात ताई.. नागपुर(जवळ)चा असून कधी कुणी हे कठीण कार्य सिद्धीस नेल्याचं पाहीलेलं नाही.. च्यायला, येवढी संत्री रिचवली तरी "संत्र्याने दुध फाटेल" म्हणून कुणाला ही खीर करायला सुचलंच नसेल..
पाकृ आवडलेली आहे.. करण्यात येईल. धन्यवाद..
1 Mar 2012 - 12:11 pm | Maharani
खुपच छान!!
2 Mar 2012 - 12:21 am | जयवी
क्या बात है......... !!
नागपूरकरांनी आवर्जून करायलाच हवी ही पाककृती :)
अतिशय देखणी आहे ही पाकृ. संत्र्याच्या सालीची फुलं पण सही आहेत !!
2 Mar 2012 - 11:12 am | हसरी
छान! नेहमीप्रमाणेच सुरेख सादरीकरण :-)
2 Mar 2012 - 11:16 am | sneharani
मस्त फोटो दिसतायेत, पाकृ करून बघण्यात येईल!!
:)
2 Mar 2012 - 6:14 pm | स्वाती२
वेगळीच पाकृ! फोटो नेहमीप्रमाणेच जीवघेणे!
4 Mar 2012 - 5:54 pm | शरभ
छान पाकृ....धन्यवाद.
आमच्या version मध्ये आम्ही mashed केळं देखील वापरलं थोडसं, दुध जाड करायला आणि flavour साठी .
7 Mar 2012 - 12:45 pm | प्रभाकर पेठकर
गोड पदार्थ वर्ज्य आहेत. पण करून पाहायला हरकत नाही. इतरांना खाऊ घालेन.
फ्रूट सलाडचाच प्रकार वाटतो आहे.
5 Apr 2012 - 9:14 am | डावखुरा
लय म्हण्जे लयच भारी....
वरील सर्व प्रतिसादांना अनुमोदन..