संत्र्याची खीर / कमलालेबु खीर (बंगाली पा़कृ)
साहित्यः
१ लिटर दूध
४ टेस्पून साखर (आवडीप्रमाणे कमी - जास्त)
२ छोटी संत्री
१ टीस्पून वेलचीपूड
१/२ टीस्पून केशर
सजावटीसाठी बदाम-पिस्त्याचे काप
पाकृ:
प्रथम दूध एका नॉन-स्टीक भांड्यात तापवायला ठेवावे.
दूधाला एक उकळी आली की गॅस मंद आचेवर ठेवून दूध आटु द्यावे. मधे-मधे डावाने ढवळत रहावे.
दूध निम्मे झाले, जरा घट्ट झाले की त्यात वेलचीपूड, केशर व साखर घालावे व ढवळावे.
साखर विरघळली की त्यात थोडे बदाम-पिस्त्याचे काप घालावे व गॅस बंद करावा.
संत्र्याची साले काढून ठेवावी. फोडींमधील बिया व वरचा पातळ पांढरा भाग काढून गर वेगळा करावा.
दूध पूर्ण गार झाले की त्यात संत्र्याचा गर घालावा व खीर फ्रिजमध्ये ३-४ तास थंड होण्यासाठी ठेवावी. (दूध गरम असताना संत्र्याचा गर घालून नये दूध नासेल.)
आदल्या रात्री करुन ठेवली तर संत्र्याचा स्वाद आणखीन खीरीत उतरेल.
ही मस्त, चविष्ट खीर थंड सर्व्ह करावी :)

वाचन
9347
प्रतिक्रिया
0