Pollo Alla Cacciatora (ईटॅलियन हंटर चिकन)

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
28 Jan 2012 - 5:10 pm

साहित्यः

५०० ग्राम चिकन तुकडे करुन घेणे (हाडांसकट तुकडे घेतले तरी चालेल )
२ कांदे बारीक चिरून
४-५ टोमॅटो बारीक चिरून
३-४ लसुण पाकळ्या
२ वाट्या रंगीत भोपळी मिरच्या बारीक चिरुन (भोपळी मिरच्यांऐवजी मश्रुम, सेलेरी वापरली तरी चालेल )
७-८ पाने बेसीलची
१ टेस्पून रोझमेरी हर्ब बारीक चिरून
२-३ टीस्पून काळीमिरीपूड
१/२ टीस्पून ड्राईड हर्ब्स
मीठ चवीनुसार
३-४ टेस्पून मैदा
१/२ -३/४ कप वाईन (तुम्ही कोणतीही वाईन वापरु शकता रेड किंवा व्हाईट)
ऑलिव्ह ऑईल

.

पाकृ:

चिकनच्या तुकड्यांवर थोडा मैदा, मीठ व काळीमिरीपूड घालून नीट एकत्र करावे.

.

एका भांड्यात २-३ टेस्पून तेल तापवून त्यात चिकनचे तुकडे घालून सीयर करून घेणे.

.

तयार चिकन दुसर्‍या प्लेटमध्ये काढून ठेवणे. त्याच भांड्यात थोडे तेल तापवून बारीक चिरलेला लसुण घालून परतणे.

.

त्यातचं बारीक चिरलेला कांदा घालणे. कांदा मऊ झाला की त्यात बारीक चिरलेल्या भोपळी मिरच्या घालून परतणे.

.

आता बारीक चिरलेला टोमॅटो घालणे व टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत परतणे.

.

टोमॅटो नीट शिजले की त्यात परतलेले चिकनचे तुकडे, बारीक चिरलेली बेसीलची पाने, रोझमेरी, काळीमिरीपूड, ड्राईड हर्ब्स व मीठ घालावे. थोडे पाणी घालून शिजवणे.

.

त्यात वाईन घालावी व शिजु द्यावे.

.

पोलो अला कॅच्छियातोरा चिकन तुम्ही कुठल्याही पास्ताबरोबर किंवा साध्या भाताबरोबर सर्व्ह करु शकता :) आवडत असल्यास थोडे पारमेझान चीज वरुन भुरभुरु शकता.

.

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

28 Jan 2012 - 5:30 pm | सुहास झेले

मास्टर शेफ ..... :) :)

स्मिता.'s picture

28 Jan 2012 - 6:11 pm | स्मिता.

मस्तच दिसतंय... शेवटचा फोटो बघून तर आता जेवायलाच सुरुवात कराविशी वाटतेय :)

चिंतामणी's picture

28 Jan 2012 - 6:23 pm | चिंतामणी

ठ्ठो.

खल्लास.

(सा.स आणि गणपाचे धागे उघडल्यावर आपोआप प्रतिक्रीया नोंदली जाण्याची सुचना मिपाच्या मालक/संपादकांनी अजून मनावर घेतली नाही का?) :( :-( :sad:

जाई.'s picture

28 Jan 2012 - 7:36 pm | जाई.

झकास

रेवती's picture

28 Jan 2012 - 8:14 pm | रेवती

एकदम हंटर पाकृ!
यातल्या चिकनला जरा शाकाहारी (आणि वाईनला सोज्वळ) पर्याय द्या ना!
ही दारूयुक्त पाकृ बर्‍याचजणांना आवडेल.;)

चिकनचे तुकडे घालून सीयर करून घेणे.

सीयर म्हणजे अर्धवट शिजवणे का?

सॉल्लिड आहे पाकृ.

सुनील's picture

29 Jan 2012 - 2:14 am | सुनील

सीयर म्हणजे अर्धवट शिजवणे का?

नाही. सियर म्हणजे पदार्थाचा पृष्ठभाग अती तपमानला चटकन शिजवणे जेणेकरून पदार्थ बाहेरून खरपूस पण आतून नरम राहील. परंतु, ही पद्धत पदार्थ बनविताना अगदी शेवटी शेवटी वापरावी असे सांगितले जाते.

पाकृ दिसते आहे छानच.

अवांतर - मराठी भाषा फारच बदलत चालली आहे आजकाल,.सियर सोडा, कदाचित त्याला मराठी पर्याय नसेल, पण पूर्वी घरोघरी आढळणार्‍या तुळशीलादेखिल आजकाल बसिल म्हटल्या जाते! :(

प्राजु's picture

29 Jan 2012 - 7:46 am | प्राजु

सियर साठी धन्यवाद सुनिल. :)

>>>>घरोघरी आढळणार्‍या तुळशीलादेखिल आजकाल बसिल म्हटल्या जाते!<<<

मान्य आहे. पण इटालियन पदार्थात वापरण्यासाठी ज्या प्रकारची तुळस (बेसिल) इथे मिळते त्याला तुळस म्हणवत नाही. कारण तुळस म्हणजे नाजूक आणि कडेने कातरलेली (थोडीशी गुलाबाच्या पानासारखी) अशीच डोळ्यापुढे येते. त्यामुळे इथल्या तुळशीला (बेसिल) ना तसा वास असतो ना रंग आणि ना चव. त्यामुळे बेसिल म्हणणेच योग्य वाटते.

बेसिल म्हणून अमेरिकेत जे मिळतं (प्राजुने 'इथे' म्हंटलंय त्यावरून अमेरिकन बेसिल अभिप्रेत असावं असं धरून चालतो) ते म्हणजे Ocimum basilicum या प्रकारचं Italian Sweet Basil हे रोप आहे {Basil 'Genovese'}:

तर भारतीय तुळस ही त्याच वर्गातली पण वेगळ्या species ची वनस्पती आहे, Ocimum tenuiflorum

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2012 - 2:09 pm | प्रभाकर पेठकर

'बेसिल' ही तुळस कुटुंबातील वनस्पती आहेसे वाटते. पण, रंग,रुप, गंध, चव वेगळी आहे.

रेवती's picture

29 Jan 2012 - 8:04 pm | रेवती

असंच म्हणते. बरं झालं बहुगुणींनी सांगितलं.
माझे टंकनकष्ट वाचले.;)
बेसील ही तुळसवर्गीय वनस्पती आहे पण बेसीलमुळे अन्नाला जो स्वाद अपेक्षित असतो तो तुळस घालून येईल का? मला नाही वाटत.

सानिकास्वप्निल's picture

29 Jan 2012 - 12:53 pm | सानिकास्वप्निल

हेच म्हणते मी
धन्यवाद प्राजु :)

प्रभाकर पेठकर's picture

29 Jan 2012 - 1:13 am | प्रभाकर पेठकर

तोंडाला पाणी सुटले आहे. पाककृती झकासच आहे.

वाईन किंवा इतर कुठलेही अल्कोहॉलीक द्रव्य पाककृतीत वापरतात ते 'फ्लेमिंग' प्रोसेससाठी. म्हणजेच गरम गरम पदार्थात अल्कोहॉलीक द्रव्य वापरले की त्यातील अल्कोहॉल बाष्पीभूत होतो आणि ती वाफ, फ्राय पॅन, वोक किंवा कढई जरा तिरपी केली असता, पेट घेते. त्याची एक वेगळीच चव पदार्थास येते.

गणपा's picture

29 Jan 2012 - 1:32 am | गणपा

आवडली. :)