Pollo Alla Cacciatora (ईटॅलियन हंटर चिकन)
साहित्यः
५०० ग्राम चिकन तुकडे करुन घेणे (हाडांसकट तुकडे घेतले तरी चालेल )
२ कांदे बारीक चिरून
४-५ टोमॅटो बारीक चिरून
३-४ लसुण पाकळ्या
२ वाट्या रंगीत भोपळी मिरच्या बारीक चिरुन (भोपळी मिरच्यांऐवजी मश्रुम, सेलेरी वापरली तरी चालेल )
७-८ पाने बेसीलची
१ टेस्पून रोझमेरी हर्ब बारीक चिरून
२-३ टीस्पून काळीमिरीपूड
१/२ टीस्पून ड्राईड हर्ब्स
मीठ चवीनुसार
३-४ टेस्पून मैदा
१/२ -३/४ कप वाईन (तुम्ही कोणतीही वाईन वापरु शकता रेड किंवा व्हाईट)
ऑलिव्ह ऑईल
पाकृ:
चिकनच्या तुकड्यांवर थोडा मैदा, मीठ व काळीमिरीपूड घालून नीट एकत्र करावे.
एका भांड्यात २-३ टेस्पून तेल तापवून त्यात चिकनचे तुकडे घालून सीयर करून घेणे.
तयार चिकन दुसर्या प्लेटमध्ये काढून ठेवणे. त्याच भांड्यात थोडे तेल तापवून बारीक चिरलेला लसुण घालून परतणे.
त्यातचं बारीक चिरलेला कांदा घालणे. कांदा मऊ झाला की त्यात बारीक चिरलेल्या भोपळी मिरच्या घालून परतणे.
आता बारीक चिरलेला टोमॅटो घालणे व टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत परतणे.
टोमॅटो नीट शिजले की त्यात परतलेले चिकनचे तुकडे, बारीक चिरलेली बेसीलची पाने, रोझमेरी, काळीमिरीपूड, ड्राईड हर्ब्स व मीठ घालावे. थोडे पाणी घालून शिजवणे.
त्यात वाईन घालावी व शिजु द्यावे.
पोलो अला कॅच्छियातोरा चिकन तुम्ही कुठल्याही पास्ताबरोबर किंवा साध्या भाताबरोबर सर्व्ह करु शकता :) आवडत असल्यास थोडे पारमेझान चीज वरुन भुरभुरु शकता.

वाचन
5514
प्रतिक्रिया
14