उडदाच्या डाळीचे वडे / भजे अन सांबार

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
8 Jan 2012 - 2:53 pm

उडदाच्या डाळीचे वडे / भजे अन सांबार


सांबर

साहित्य :
तुरीची डाळ १ वाटी.
२ छोटी वांगी .( काप )
१ बटाटा ( काप )
१ शेवग्याची शेंग .( तुकडे करून )
२ कांदे चिरून
२ टोमॅटो चिरून
चिंचेचा कोळ १ चमचा.
गुळ छोटासा तुकडा .
सांबर मसाला ३ चमचे ,
गरम मसाला १ चमचा
तेल ३ चमचे
धणेपूड १ चमचा
मीठ चवीनुसार .
फोडणीसाठी : कढीपत्ता , मोहरी १ स्पून , हिंग अर्धा छोटा चमचा ,हळद एक छोटा चमचा , लाल सुक्या मिरच्या ३-४ ,

कृती : प्रथम तुरीची डाळ कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावी .
एका कढईत ३ चमचे तेल घालून मोहरी ,कढीपत्ता ,हिंग ,लाल मिरच्याची खमंग फोडणी करून घ्यावी
आता यात कांदा घालून परतून घ्यावं ,
कांदा लालसर गुलाबी झाला की टोमॅटो घालावं
आता यात वरील भाज्यांचे काप घालावेत. छान परतून घ्यावं
आता यात थोड पाणी घालून झाकून थोड शिजवून घ्यावं
तुरीची डाळ घोटून घ्यावी
आता शिजत आलेल्या भाज्यांत सांबर मसाला , गरम मसाला ,धणेपूड अन चवीनुसार मीठ घालावं
आता घोटलेली डाळ घालावी
चिंचेचा कोळ अन गुळाचा एक छोटासा तुकडा घालावा
काहीना सांबार घट्ट तर काहीना पातळ हवा असतो त्यानुसार पाण्याच प्रमाण ठेवावं
गरम गरम सांबर इडली / डोसा / भाताबरोबर चापायला तय्यार आहे
(टीप : तुम्हाला जर सांबराला लालेलाल कलर हवा असेल तर फोडणी घालताना त्यात लाल-तिखट घालावं १ चमचा ,त्याने छान रंग येतो )

उडीद डाळीचे वडे / भजे
साहित्य :
उडीद डाळ १ वाटी ( करावयाच्या आदल्या दिवशी पाण्यात भिजू घालणे )
हिरव्या मिरच्या ५-६
लसून पाकळ्या ७-८ .
कोथिंबीर आवडीनुसार.
मीठ चवीनुसार.
कढीपत्ता पाने ८-९.
तळण्यासाठी तेल .
कृती :
भिजवलेली उडदाची डाळ चाळणीत निथळून घेणे.
वरील साहित्य अन उडदाची डाळ याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणे
वड्यांचे / भज्यांचे मिश्रण तयार आहे .

एका कढईत तेल तापवून हि भजी / वडे चमच्याच्या सहाय्याने किंवा बोटांना तेल लावून सोडवीत.
( उडदाची डाळ चिकट असते म्हणून )
हि भजी सांबार बरोबर अप्रतिम लागतात .

प्रतिक्रिया

गणपा's picture

8 Jan 2012 - 2:55 pm | गणपा

जेब्बत पियुशा.. किप इट अप.

पहिला फोटु एकदम कलरफुल्लं आहे. :)

अन्या दातार's picture

8 Jan 2012 - 3:12 pm | अन्या दातार

ताटात काही इडल्याही दिसत आहेत. त्यासुद्धा वड्यांच्या पिठापासून केल्या का?? त्याची वेगळी कृती दिसली नाही म्हणून विचारले. वडे हे जर्रातरी नावाला शोभावेत इतके मोठे असावेत. त्यासाठी थोडा मोठा हात किंवा डाव वापरला तर काही हरकत नसावी.
इडल्यांच्या बाजूला काय आहे ते?? भाकरीसदृश्य दिसतंय ते.

असो, हा आपला एक आवडता प्रकार आहे यात शंका नाही. फोटो सुधारलेले बघून बरे वाटले.

(खादाडखाऊ) अन्या

वडे हे जर्रातरी नावाला शोभावेत इतके मोठे असावेत.

आर अन्या तिनं वडे/ भजे लीव्हलंय की. ;)
(बाकी पोरगी 'तयार' झाली आहे तुमच्या टोमण्यांनी ;))

आवांतर : आम्हाला आमच्या वड्यांच्या प्रयोगाची आठवण झालीच.

अन्या दातार's picture

8 Jan 2012 - 3:34 pm | अन्या दातार

आर अन्या तिनं वडे/ भजे लीव्हलंय की.

मालक, कृतीचे नाव वड्यांचे एक स्टँडर्ड आहे हो. नुसतं नाव जरी काढलं की डोळ्यापुढे काही गोष्टी उभ्या राहतात. काय करावे याला??? :( आणि हे असे स्टँडर्ड्स सेट करण्यात तुमचेही योगदान आहे बरं का गणपाशेठ!!

बाकी पोरगी 'तयार' झाली आहे तुमच्या टोमण्यांनी

आमचे टोमणे असतातच मुळी खुसखुशित. एकदा खाल्ले तरी पुन्हापुन्हा खावे वाटतात. काही अपवाद असतात, पण शेवटी आवड आपली आपली ;)

आवांतर : आम्हाला आमच्या वड्यांच्या प्रयोगाची आठवण झालीच.

झैरात झैरात ;)

झैरात झैरात ;)

=))
माताय अगदी मनकवडे तुम्ही. ;)

प्रचेतस's picture

8 Jan 2012 - 3:46 pm | प्रचेतस

माताय अगदी मनकवडे तुम्ही. Wink

इथे पण वडे परत आणलेच ब्वॉ तुम्ही. ;)

वडे म्हण्लं की लोकांना झैरात का वाटते ? माताय, लोक झैरात झैरात बोंबलायले आन आमी आमच्या रेशिप्याच बंद केल्या राव.

प्रचेतस's picture

8 Jan 2012 - 3:21 pm | प्रचेतस

वडे हे जर्रातरी नावाला शोभावेत इतके मोठे असावेत.

अन्याभौ, पाकृ नीट वाचली नाहीत का? वडे/भजे असे स्पष्ट लिहिलेले आहे. वाचक काय समजेल ते समजून घ्या असाच पियुशाबैंचा होरा दिसतोय.

भाकरीसदृश्य दिसतंय ते.

पोळ्या असाव्यात त्या, पण त्याची पाकृ लिहिलेली दिसली नाही कुठं.

पैसा's picture

8 Jan 2012 - 3:16 pm | पैसा

बरेच प्रकार दिसतायत, त्यांची कृती क्रमशः का?

पियुशा's picture

8 Jan 2012 - 3:52 pm | पियुशा

@ पैसा ताई
तो कालचा मेन्यु होता ग ईड्ली / डोसा/भजी अन साम्बार
पाक्रु. तीला हा फोटो द्यायचा विचार नव्हता केला, पण कलरफुल आहे म्हणुन दिलाय एव्हढ्च :)

प्रचेतस's picture

8 Jan 2012 - 3:17 pm | प्रचेतस

यावेळचे फोटो ठळक आलेत एकदम. शुद्धलेखनात तर खूपच सुधारणा आहे.
त्या चांदण्या सांबारात तरंगत असलेल्या पाहून डोळे पाणावले.
पाकृ बेस्ट.

प्रभाकर पेठकर's picture

8 Jan 2012 - 3:23 pm | प्रभाकर पेठकर

वडे आणि सांबाराच्या ताटलीत इतर पदार्थांची गर्दी का आहे?

वडे तेलात सोडताना हाताला तेल लावायची गरज नाही. पाण्यात हात बुडवून वडे सोडावेत. ओल्या हातालाही उडीदाचे पीठ चिकटत नाही.

सांबार आणि वड्यांची पाकृ मस्त दिसते आहे. करून पाहिली पाहिजे.

उडदात प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि प्रथिनांमुळे स्नायुंना ताकद मिळते तसेच, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. लहान मुलांना दुधा बरोबरच (निदान आठवड्यातून २ वेळा तरी) उडदाचे पदार्थ खाऊ घालावेत. उडीदात अपुर्ण प्रथिने असल्याने त्या सोबत तांदूळ वगैरे वापरून इडल्या, सेट डोसा इ. पदार्थ केल्यास प्रथिनांना पुर्णता येते.

ह्या माहीतीसाठी धन्यवाद. मुलीला काय चांगलं खायला देउ हा प्रश्न नेहमी पडतो.

@पियु,
नेहेमी इड्ल्या डोसे करण्यापेक्षा हे वडे / भजे नक्की ट्राय करेन. मस्तच रेसिपी आहे.

सुहास झेले's picture

8 Jan 2012 - 3:38 pm | सुहास झेले

व्वा व्वा... ट्रेकला दिप्या ही भजी/हे वडे नेहमी आणतो. पाककृती आणि फोटो झक्कास.

त्या भरलेल्या ताटाचे प्रयोजन कळले नाही. सांबर आणि वडे/भजी ठेवायचे होते की फक्त :) :)

सुगरण पणाची झैरात झैरात. ;)

रेवती आज्जेच्या मंडळात नावं नोंदवलेलं दिसतय पियुबैंनी. :)

सुहास झेले's picture

8 Jan 2012 - 3:51 pm | सुहास झेले

:)

:)

अन्या दातार's picture

8 Jan 2012 - 3:51 pm | अन्या दातार

रेवती आज्जेच्या मंडळात नावं नोंदवलेलं दिसतय पियुबैंनी.

नक्की का? कारण सध्या काम्पिटीशन लै जोरात चाललीये असं रेवतीआज्जीच कुठेतरी म्हणाल्याचे आठवतेय ;)

अत्रुप्त आत्मा's picture

8 Jan 2012 - 4:36 pm | अत्रुप्त आत्मा

सगळं छान जमलय.. :-)
फक्त एक अ‍ॅडिशन- सांबारमधे डाळ घालुन झाल्यावर पुढे जे पाणी घातलं जातं त्या जागी जर भाताची पेज घातली तर सांबार येकदम टेसदार होतं...आणी सहज दाटपण होतं

मेघवेडा's picture

11 Jan 2012 - 5:47 pm | मेघवेडा

सांबारमधे डाळ घालुन झाल्यावर पुढे जे पाणी घातलं जातं त्या जागी जर भाताची पेज घातली तर सांबार येकदम टेसदार होतं

ट्राईड एन' (सक्सेसफुली अ‍ॅण्ड वंडरफुली) टेस्टेड!

बाकी पहिला फोटू बेश्ट! मस्त दिसतंय भरलेलं ताट! :)

भरलेलं ताट बघायला आवडलं. पहिला फोटो छान.
पदार्थ चवीनी उत्तम असतील अशी आशा आहे.
स्वतः चव न घेता 'पाकृ'सेक्शनमधल्या 'पाकृं'च्या चवीबद्दल निर्णय घेणे थांबवण्यात आलेले आहे याची सर्व पाककृतिकर्त्यांनी नोंद घ्यावी (पियुबैसकट) ही नम्र विनंती.

चिंतामणी's picture

8 Jan 2012 - 5:45 pm | चिंतामणी

>>>स्वतः चव न घेता 'पाकृ'सेक्शनमधल्या 'पाकृं'च्या चवीबद्दल निर्णय घेणे थांबवण्यात आलेले आहे याची सर्व पाककृतिकर्त्यांनी नोंद घ्यावी.

१०० % सहमत.

निवेदिता-ताई's picture

8 Jan 2012 - 5:55 pm | निवेदिता-ताई

मस्तच.................:)

स्मिता.'s picture

8 Jan 2012 - 6:22 pm | स्मिता.

पानभर पदार्थ बनवायला जमलं हो पियु!
उडदाच्या डाळीचे वडे मला लहानपणापासून खूप आवडतात. पाकृ आवडली.

या आशीर्वादाचा अर्थ समजुन घ्या हो. ;) ;-) :wink:

अन्या दातार's picture

8 Jan 2012 - 6:33 pm | अन्या दातार

पानभर पदार्थ बनवायला जमलं हो पियु!

नक्की कसले पान? वहीचे की अजुन कुठल्याश्या झाडाचे? झाडाचे असल्यास कोणत्या झाडाचे?
वहीचे असल्यास एकरेघी की दुरेघी?

स्मिता.'s picture

8 Jan 2012 - 6:39 pm | स्मिता.

तुझी रेवतीआज्जेकडे नाव नोंदवायची वेळ आली की बरोबर कळेल कसले पान ते! तोवर कोणतंही समजलास तरी काही हरकत नाही ;)

प्यारे१'s picture

9 Jan 2012 - 9:56 am | प्यारे१

बोलल्या. काकू बोलल्या. 'आनभवाचे' बोल काय काकू? ;)

सुहास..'s picture

9 Jan 2012 - 10:58 am | सुहास..

वडे आवडले !

स्पा's picture

9 Jan 2012 - 12:43 pm | स्पा

कोण पिव्षा का?

ब्वार्र्र

वा मस्तच पाक्रु
फोटो अप्रतिम....
मजा आली...
येत्या विकांताला आता करून बघेन
पु पा शु

:D

सविता००१'s picture

9 Jan 2012 - 1:49 pm | सविता००१

जबराट वेग पकडलेला दिसतोय पाककलेने. बेष्ट्म बेष्ट.

रेवती's picture

9 Jan 2012 - 8:16 pm | रेवती

चला, एक मुलगी लग्नाळू झाली.
आमच्या मंडळात नाव नोंदवल्यास सहा स्टीलच्या ताटांचा संच मोफत अस्तो हे लक्षात राहू द्या.;)

आमच्या मंडळात नाव नोंदवल्यास सहा स्टीलच्या ताटांचा संच मोफत अस्तो हे लक्षात राहू द्या. -

पण रेवती आजै, ती आमाला ही असली कप्पेवाली ताटं पायजेल, निसत्या थाळ्या नकं, आमी एकदाच ४-६ गोष्टी करणार, आमचा नवरा त्या थाळीत खायाचा कसा अन काय, गोपाळकाला करुन ?

असो, आता अवांतर - आहाहा काय तो थाट काय ते ताट,

आमचा नवरा त्या थाळीत खायाचा कसा अन काय, गोपाळकाला करुन ?
आमचा नवरा ?? सहकार क्षेत्राचा इथेही शिरकाव झाला तर !! ;)

पियुशा's picture

10 Jan 2012 - 9:55 am | पियुशा

@ सुड
चुप्प बैस ;)
@ ५० फक्त
" निदान पिवशीचा भावी नवरा " अस तरी लिहायचत ना ?
" आमचा नवरा " काय हे ? ;)
@ रेवती काकु
चला, एक मुलगी लग्नाळू झाली.
आमच्या मंडळात नाव नोंदवल्यास सहा स्टीलच्या ताटांचा संच मोफत अस्तो हे लक्षात राहू द्या.

हे लक्षात ठॅवीन आठ्वणीने
आहेर चुकायला नक्को ;) कसे ? ;)

ताटाबरोबर पेले पण मोफत मिळतात का हो?

५० फक्त's picture

10 Jan 2012 - 10:06 am | ५० फक्त

मा. पियुषातै, अहो ते आमचा, आदरार्थी आहे बहुवचनी नाही, छे छे काय दिवस आले आहेत....
.
.
.
.
.
.
आचारसंहितेचे
@ मा. सुड, एका ताटात कप्पे करुन सांबार, वडा, भजी पक्षी बिघडेड वडे इ.इ. गुण्यागोविंदानं राहु शकतात तर मग .... असो,
@ मा. वल्ली, हे पहा लग्नानंतर पेल्यांची गरज आहे / नाही. हे ज्याचे त्याला माहित असते , मग जो तो करतो सोय पेल्यांची, पण निरागस अव्याज नयनमधुर, स्वर्गिय प्रेमळ संसाराच्या सुरुवातीनंतर भुक लागते आणि जेवणासाठी ताटच लागते, हा व्यवहार आहेर करणा-यांनीच शिकवावा लागतो, म्हणुन पेले मिळणार नाहीत. अर्थात मा. सुड व मा. पियुषा यांच्या मध्यस्थीने तुमच्या साठी रेवतीआजै कडे रदबदली केली जाउ शकते, हा भाग निराळा.

प्रचेतस's picture

10 Jan 2012 - 10:12 am | प्रचेतस

_/\__/\__/\_
आपल्या निरागस लेखनशैलीला.

५० फक्त's picture

10 Jan 2012 - 10:34 am | ५० फक्त

आता जपा निरागसता सप्ताह असल्याने आणि सकाळ झाली हे कळाल्यावर आम्ही सध्या आमच्या लेखणीचे टोक निरागस करुन घेतले आहे, त्यात शाई पण निरागस कंपनीची भरतो आहे, अजुन काय काय निरागस करता येइल याचे काम गुगलला ऑफशोअर केले आहे, पण त्याचा रिझल्ट युबिस्लेट ७+ वर पाहता येईल, म्हणुन निरागस स्पा बरोबर निरागस मैत्री वाढवावी काय असा निरागस धागा काढणार आहे आता.

प्रकाश१११'s picture

10 Jan 2012 - 10:39 am | प्रकाश१११

पियुशा -अग, काय काय करतेस..?.कसे जमते हे सगळे. ..?
एवढे सांग्र संगीत. आणि एवढे भन्नाट ...!!
तुझ्या मेहनतीला [मला चित्र छापता येत नाही]
सा..न.