उडदाच्या डाळीचे वडे / भजे अन सांबार
सांबर
साहित्य :
तुरीची डाळ १ वाटी.
२ छोटी वांगी .( काप )
१ बटाटा ( काप )
१ शेवग्याची शेंग .( तुकडे करून )
२ कांदे चिरून
२ टोमॅटो चिरून
चिंचेचा कोळ १ चमचा.
गुळ छोटासा तुकडा .
सांबर मसाला ३ चमचे ,
गरम मसाला १ चमचा
तेल ३ चमचे
धणेपूड १ चमचा
मीठ चवीनुसार .
फोडणीसाठी : कढीपत्ता , मोहरी १ स्पून , हिंग अर्धा छोटा चमचा ,हळद एक छोटा चमचा , लाल सुक्या मिरच्या ३-४ ,
कृती : प्रथम तुरीची डाळ कुकरमध्ये मऊसर शिजवून घ्यावी .
एका कढईत ३ चमचे तेल घालून मोहरी ,कढीपत्ता ,हिंग ,लाल मिरच्याची खमंग फोडणी करून घ्यावी
आता यात कांदा घालून परतून घ्यावं ,
कांदा लालसर गुलाबी झाला की टोमॅटो घालावं
आता यात वरील भाज्यांचे काप घालावेत. छान परतून घ्यावं
आता यात थोड पाणी घालून झाकून थोड शिजवून घ्यावं
तुरीची डाळ घोटून घ्यावी
आता शिजत आलेल्या भाज्यांत सांबर मसाला , गरम मसाला ,धणेपूड अन चवीनुसार मीठ घालावं
आता घोटलेली डाळ घालावी
चिंचेचा कोळ अन गुळाचा एक छोटासा तुकडा घालावा
काहीना सांबार घट्ट तर काहीना पातळ हवा असतो त्यानुसार पाण्याच प्रमाण ठेवावं
गरम गरम सांबर इडली / डोसा / भाताबरोबर चापायला तय्यार आहे
(टीप : तुम्हाला जर सांबराला लालेलाल कलर हवा असेल तर फोडणी घालताना त्यात लाल-तिखट घालावं १ चमचा ,त्याने छान रंग येतो )
उडीद डाळीचे वडे / भजे
साहित्य :
उडीद डाळ १ वाटी ( करावयाच्या आदल्या दिवशी पाण्यात भिजू घालणे )
हिरव्या मिरच्या ५-६
लसून पाकळ्या ७-८ .
कोथिंबीर आवडीनुसार.
मीठ चवीनुसार.
कढीपत्ता पाने ८-९.
तळण्यासाठी तेल .
कृती :
भिजवलेली उडदाची डाळ चाळणीत निथळून घेणे.
वरील साहित्य अन उडदाची डाळ याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणे
वड्यांचे / भज्यांचे मिश्रण तयार आहे .
एका कढईत तेल तापवून हि भजी / वडे चमच्याच्या सहाय्याने किंवा बोटांना तेल लावून सोडवीत.
( उडदाची डाळ चिकट असते म्हणून )
हि भजी सांबार बरोबर अप्रतिम लागतात .
In reply to ताटात काही इडल्याही दिसत by अन्या दातार
वडे हे जर्रातरी नावाला शोभावेत इतके मोठे असावेत.आर अन्या तिनं वडे/ भजे लीव्हलंय की. ;) (बाकी पोरगी 'तयार' झाली आहे तुमच्या टोमण्यांनी ;)) आवांतर : आम्हाला आमच्या वड्यांच्या प्रयोगाची आठवण झालीच.
In reply to वडे हे जर्रातरी नावाला by गणपा
आर अन्या तिनं वडे/ भजे लीव्हलंय की.मालक, कृतीचे नाव वड्यांचे एक स्टँडर्ड आहे हो. नुसतं नाव जरी काढलं की डोळ्यापुढे काही गोष्टी उभ्या राहतात. काय करावे याला??? :( आणि हे असे स्टँडर्ड्स सेट करण्यात तुमचेही योगदान आहे बरं का गणपाशेठ!!
बाकी पोरगी 'तयार' झाली आहे तुमच्या टोमण्यांनीआमचे टोमणे असतातच मुळी खुसखुशित. एकदा खाल्ले तरी पुन्हापुन्हा खावे वाटतात. काही अपवाद असतात, पण शेवटी आवड आपली आपली ;)
आवांतर : आम्हाला आमच्या वड्यांच्या प्रयोगाची आठवण झालीच.झैरात झैरात ;)
In reply to आर अन्या तिनं वडे/ भजे by अन्या दातार
झैरात झैरात ;)=)) माताय अगदी मनकवडे तुम्ही. ;)
In reply to झैरात झैरात =)) माताय अगदी by गणपा
माताय अगदी मनकवडे तुम्ही. Winkइथे पण वडे परत आणलेच ब्वॉ तुम्ही. ;)
In reply to माताय अगदी मनकवडे तुम्ही. by प्रचेतस
In reply to ताटात काही इडल्याही दिसत by अन्या दातार
वडे हे जर्रातरी नावाला शोभावेत इतके मोठे असावेत.अन्याभौ, पाकृ नीट वाचली नाहीत का? वडे/भजे असे स्पष्ट लिहिलेले आहे. वाचक काय समजेल ते समजून घ्या असाच पियुशाबैंचा होरा दिसतोय.
भाकरीसदृश्य दिसतंय ते.पोळ्या असाव्यात त्या, पण त्याची पाकृ लिहिलेली दिसली नाही कुठं.
In reply to आणखी by पैसा
In reply to मस्त.. by प्रभाकर पेठकर
In reply to व्वा व्वा... ट्रेकला दिप्या by सुहास झेले
In reply to सुगरण पणाची झैरात झैरात. by गणपा
In reply to सुगरण पणाची झैरात झैरात. by गणपा
रेवती आज्जेच्या मंडळात नावं नोंदवलेलं दिसतय पियुबैंनी.नक्की का? कारण सध्या काम्पिटीशन लै जोरात चाललीये असं रेवतीआज्जीच कुठेतरी म्हणाल्याचे आठवतेय ;)
In reply to सगळं छान जमलय.. फक्त एक by अत्रुप्त आत्मा
सांबारमधे डाळ घालुन झाल्यावर पुढे जे पाणी घातलं जातं त्या जागी जर भाताची पेज घातली तर सांबार येकदम टेसदार होतं
In reply to भरलेलं ताट बघायला आवडलं. by प्रास
In reply to जमलं हो! by स्मिता.
In reply to जमलं हो! by स्मिता.
पानभर पदार्थ बनवायला जमलं हो पियु!नक्की कसले पान? वहीचे की अजुन कुठल्याश्या झाडाचे? झाडाचे असल्यास कोणत्या झाडाचे? वहीचे असल्यास एकरेघी की दुरेघी?
In reply to पानभर पदार्थ बनवायला जमलं हो by अन्या दातार
In reply to पान by स्मिता.
In reply to आमच्या मंडळात नाव नोंदवल्यास by ५० फक्त
In reply to आमचा नवरा त्या थाळीत खायाचा by सूड
In reply to @ सुडचुप्प बैस @ ५० फक्त" by पियुशा
In reply to ताटाबरोबर पेले पण मोफत मिळतात by प्रचेतस
In reply to मा. पियुषातै, अहो ते आमचा, by ५० फक्त
In reply to _/\__/\__/\_ आपल्या निरागस by प्रचेतस
जेब्बत पियुशा.. किप इट