अनंत माकड प्रमेय : एक विचार मंथन

मिसळभोक्ता's picture
मिसळभोक्ता in काथ्याकूट
24 Oct 2009 - 5:24 am
गाभा: 

शक्याशक्यता प्रवादात (प्रॉबेबिलिटी थियरी), "अनंत माकड प्रमेय" नावाचे एक प्रमेय आहे.

थोडक्यात सांगायचे तर हे प्रमेय असे:

अनंत (म्हणजे इन्फायनाईट) माकडे टाईपरायटर बडवत बसलीत, तर शेक्सपीयरचे वाङ्मय टंकू शकतात.

ह्याची सिद्धता तशी सोपी आहे. टाईपरायटरच्या कळा सांत (फायनाईट) आहेत, त्यामुळे माकडाने एक विशिष्ट कळ दाबण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेक्सपियरच्या हॅम्लेट मधली अक्षरे एका माकडाने एकामागोमाग एक टंकित करण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे, अशी अनंत माकडे टाईपरायटर घेऊन बसवली, तर त्यातले एखादे माकड तरी नक्कीच हॅम्लेट टाईप करेल.

असो, गणित गेलं चपला घालून "तिकडे" (आतापर्यंता सगळ्यांना "तिकडे" म्हणजे कुठे ते माहीत असेलच.)

हे प्रमेय वाचून आम्ही विचार मग्न झालो. हॅम्लेट लिहायला अनंत माकडे खरेच लागतील का ? उत्तर अर्थातच "नाही" असे आहे. कारण एक माकड अनंत काळासाठी जरी टंकन करीत बसले, तरी हॅम्लेट निर्माण होऊ शकते.

मिसळपावाशी ह्या सगळ्याचा संबंध काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेलच. (फारच "प्रश्नखोर" बॉ तुम्ही!)

सांगतो, सांगतो.. (ह्याला नीरगाठउकल तंत्र म्हणतात. नाना आणि घाटपांडेकाका ह्यालाच नीरगाठउकल तंत्र म्हणतात. ह्यातला सूक्ष्म फरक सूज्ञ वाचकांच्या लक्षात येईलच.)

अनंत माकडे हॅम्लेट लिहू शकत असतील, तर मिसळपावाच्या प्रत्येक लेखासाठी, कौलासाठी, प्रतिसादासाठी, किती माकडांना किती वेळ टंकन करावे लागेल, ह्यासंबंधी आमचे संशोधन आहे. ह्या संशोधनाचे प्राथमीक काम आम्ही नुकतेच संपवले आहे. (पुढील सखोल कामासाठी जीएमआरटी किंवा आयुका ह्या संस्थांना आर्थिक पाठबळ मागावे, ह्या विचारात आहे. मिसळपावावर कंपूबाजी करण्यासाठी ह्या संस्था कुणालातरी आर्थिक पाठबळ पुरवतात, असे कळले.)

संशोधनाचे प्राथमिक निकाल अशा प्रकारे:

लेखन-प्रकार (टाईपरायटर वाल्या माकडांची संख्या, लागणारा वेळ)

एका ओळीचे कौल (१ माकड, २ मिनिटे)
गटणेचे प्रतिसाद (१ माकड, ५ सेकंद)
सहमत, +१, असेच म्हणतो (१ माकड, १० सेकंद)
विरजण घालणारे प्रतिसाद (१ माकड, ५ मिनिटे)
विकासचे प्रतिसाद (१००० माकडे, १ दिवस)
विकासच्या प्रतिसादावर विकीचे प्रतिसाद (१, २ मिनिट)
धनंजयचे प्रतिसाद (१००० माकडे, १ महिना)
धनंजयच्या प्रतिसादावर "सहमत आहे" प्रतिसाद (१ माकड, ०.०१ सेकंद)
शरदिनीताईंची कविता (१ माकड, १० मिनिटे)
रंगाशेठचे विडंबन (१०० माकडे, १ तास)
इतरांची विडंबने (१ माकडे, १० मिनिटे)
शरदिनीताईंच्या कवितेचे रसग्रहण (१००००० माकडे, १ महिना)

आजोबांचा लेख - भाग १ ते चार (१० माकडे, १० दिवस)
कोदाचे निबंध - भाग १ ते अनंत (१० माकडे, बारावीची चार वर्षे)
टार्‍याचे उत्तर/विडंबन (१ माकड, १० मिनिटे)

नानाचा वैचारिक लेख (१ माकड, १० मिनिटे)
प्रभूंचा क्रिप्टिक लेख (१० माकडे, १ दिवस)
प्रभूंच्या लेखावर नानाचा वैचारिक प्रतिसाद (१००००० माकडे, १ वर्ष)

इतर लेखनाचे विश्लेषण अद्याप पूर्ण व्हायचे आहे. आपल्यापैकी कुणाला ह्या संशोधनात आम्हाला मदत करायची असल्यास, प्रतिसादात आपापल्या संशोधनाचे निकाल लिहावेत. (संशोधनाला आर्थिक पाठबळ पुरवण्यासाठी वरील संस्थांना केलेल्या अर्जात, आपले नाव अंतर्भूत करण्यात येईल.)

धन्यवाद.

(सदर काथ्याकूट ब्रिटिश टिंग्याला अर्पण. ह्या म्यान ने मला लिहिलेली खरड अशी: "काय मिभो, येवु द्या काहीतरी खुसखुशीत्/तिरकस्/खाजवुन खरुज काढलेले इत्यादी इत्यादी.... " खाजव लेका आता...)

प्रतिक्रिया

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 5:33 am | मिसळभोक्ता

थांबा, मोजून सांगतो...

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 8:42 am | अक्षय पुर्णपात्रे

लवंगी, कदाचित श्री मिसळभोक्ता योग्य उत्तर देऊ शकणार नाहीत. काही जैव आणि रसायन वैज्ञानिकांच्या मते माकडाच्या शरीरातून प्रसवणारे एक द्रव्य नियमीत घेतल्यास अशा प्रकारची प्रमेये सर्वत्र दिसू लागतात. भारतीय उपखंडात उगम झालेल्या माकडांतच असे प्रयोग यशस्वी झाल्याचेही या संशोधनात स्पष्ट झाले आहे. हे संशोधन नुकतेच प्रकाशित झाल्याने शोधनिबंध उपलब्ध नाही. क्षमस्व. (या प्रयोगासाठी एनसीएल या संस्थेने आर्थिक पाठबळ पुरवले.) ही माकडे प्रयोगशाळेतून काढून जंगलात (हाकलून) दिल्यास पुन्हा प्रयोगशाळेत येऊन धुडगुस घालतात असेही आढळून आले आहे. सांख्यिकीच्या दृष्टीकोनातुन पुरेसा विदा न मिळाल्याने हे निष्कर्ष 'पुढील संशोधनाच्या दिशा' या सदरात टाकण्यात आले आहे.

हे प्रमेय ज्या शोधनिबंधात प्रसिद्ध झाले आहे, त्या शोधनिबंधावर वाङ्मयचौर्याचे आरोप करण्यात आले आहेत. एकाच अक्षराने बनलेल्या नावाच्या व्यक्तिने माकडांची संख्या तसेच वेळ वाढवून दाखवण्यात यावी यासाठी भक्कम लाच दिल्याचीही वदंता आहे. (बातमीत वाङ्मयचौर्य आणि या व्यक्तिचा उल्लेख हे एकाच परिच्छेदात येणे हा निव्वळ योगायोग आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.)

भारतीय शास्त्राज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधात वारंवार आढळणार्‍या वाङ्मयचौर्याबद्दल येथे वाचता येईल.

टारझन's picture

24 Oct 2009 - 9:47 pm | टारझन

अर्रे वा .. पाच दिवसाचा आय.डी. बराच पोपटासारखा बोलतोय की :)
ते पौराणिक सिरियल्स मधे राक्षस लोकांची पोरं जलमल्या जलमल्या हिहिहॉहॉ करत काही क्षणात मोठी होऊन एकदम झिंगालाला झिंगाला करतात त्याची आठवण झाली

अवांतर : मिभो.. लेख तर फक्कड्/खुसखुशीत/तिरकस/खाजवून खरूज काढणारा झालाच आहे .. पण षिर्शक जर " माकड प्रणाली" असं ठेवलं असतं तर अधिक भारी वाटलं असतं .. नाही नाही .. ह्या शिर्षकाचं बोट काकांकडे आहे .. काकुंकडे नाही :)

-- अतिशय घाणपाद्रे

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 9:52 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री टारझन, अभ्यासाने सर्व साद्य होते.

ते पौराणिक सिरियल्स मधे राक्षस लोकांची पोरं जलमल्या जलमल्या हिहिहॉहॉ करत काही क्षणात मोठी होऊन एकदम झिंगालाला झिंगाला करतात त्याची आठवण झाली

पुराणकथांचा अभ्यास दुरचित्रवाहिनीच्या मालिकांमधुन होणे हे या मालिकांचे यशच आहे.

भडकमकर मास्तर's picture

31 Oct 2009 - 9:36 am | भडकमकर मास्तर

ते पौराणिक सिरियल्स मधे राक्षस लोकांची पोरं जलमल्या जलमल्या हिहिहॉहॉ करत काही क्षणात मोठी होऊन एकदम झिंगालाला झिंगाला करतात त्याची आठवण झाली
हाहाहा

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

विंजिनेर's picture

24 Oct 2009 - 5:46 am | विंजिनेर

एक शंका:
तुम्हीच ही अनंत माकडे मिसळपाववर प्रतिसाद द्यायला बसविली तर तुमच्या राज्यात अंमळ दक्षिणेला मान्नीय मिपाकरांना "औषध निर्मिती आणि संशोधनात" प्रयोगांसाठी माकडांची उणीव भासेल की त्याचं कसं (का तिथे मिपाकरांना पाठविणार ? );)

(खाजवून खरूज काढणारा)विंजिनेर

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 5:49 am | मिसळभोक्ता

पण, त्यांच्या संशोधनावर देखरेख ठेवायला सरकारने काही माकडे आधीच नेमली आहेत, त्यामुळे सरकारी माकडांना टाईपरायटर दिला जाणार नाही.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

पिवळा डांबिस's picture

25 Oct 2009 - 8:44 pm | पिवळा डांबिस

त्यांच्या संशोधनावर देखरेख ठेवायला सरकारने काही माकडे आधीच नेमली आहेत
वरील वाक्य ज्याला "विदारक सत्य" की काय म्हणतात त्यापैकी आहे...
तिथे ती माकडं आणि इथे मिपावर आलो तर इथे ही माकडं!!!!
साला, मला तर आपण "प्लॅनेट ऑफ एप्स" मध्येच असल्यागत वाटतंय!!!
:)
बाकी विंजिनेरसायेब, आम्हाला संशोधनासाठी माकडांचा तुटवडा भासण्याची काळजी नसावी....
आमच्याकडून 'टोचून' घेतलेली काही माकडं इथे मिपावरच टंकन करीत नसतील कशावरून?
काही झालं तरी आम्ही धूर्त, कावेबाज, निर्दय, नफेबाज आणि साम्राज्यखोर पाश्चिमात्य औषध कंपन्या आहोत म्हटलं!!!!
:)

-अंमळ दाक्षिणात्य

नंदन's picture

24 Oct 2009 - 6:04 am | नंदन

माकडांमध्येही जुन्या जगातले (आशिया, आफ्रिका खंड) आणि नव्या जगातले (अमेरिका खंड) असे दोन ठळक उपप्रकार आहेत म्हणे. प्रत्येक लेखनप्रकाराला कुठल्या प्रकारची किती माकडे लागली (आणि त्यांना रोजी किती मेहनताना देण्यात आला) हे स्पष्ट झाल्याशिवाय प्रस्तुत संशोधन अपूर्ण ठरेल असे आमचे नम्र मत आहे. शिवाय अनंत माकड प्रमेयात शुद्धिचिकित्सक आणि मुद्रितशोधन अंतर्भूत नसावे असा एक प्राथमिक अंदाज आहे. त्याबाबतही तळटीपांत काही खुलासा व्हावा. (तळटीपांशिवाय कुठलेही संशोधन ओकेबोके वाटते असे एक सामान्य निरीक्षण आहे)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 9:53 am | मिसळभोक्ता

नंदनजी,

आमच्या संशोधनाविषयी आपण विचारलेले प्रश्न जायज (उर्दू शब्दांचे अर्थ सांगणारे विद्वान हल्ली इकडे, तिकडे, किंवा त्यांच्या स्वतःच्या हास्यमंदिरी पण फारसे दिसत नाहीत, त्यामुळे जकार्ताच्या काकाला अर्थ विचारा) आहेत.

परंतु सदर माकडांना कुठल्याही प्रकारचा मेहनताना देण्यात आलेला नाही. कारण स्पष्ट आहे. सदर माकडे फक्त टंकनासाठी वापरण्यात आली. संपादनासाठी अथवा मुद्रितशोधनासाठी नाही. (संपादनासाठी वापरलेल्या माकडांनी दर २-३ कळांमागे डिलीट बटनाचा वापर केला. त्यामुळे त्यांना टंकनकार्यात बसवण्यात आले.)

सुरुवातीला शुद्धिचिकीत्सक वापरण्यात आला, परंतु, सदर शुद्धिचिकीत्सक वापरून सर्व माकडे वेळोवेळी "प्रशासकीय अनुमतीची गरज" आणि "आधी शुद्धलेखन तपासा" असे टंकू लागल्याने शुद्धिचिकीत्सक काढून टाकला.

सर्व माकडे त्यांच्या निवासीपणाची खात्री न करता निवडण्यात आली. त्यामुळे, काही माकडे इकडची, तर काही माकडे तिकडची, असे होते. पूर्वचाचणीनुसार सुमारे ५० टक्के माकडे हळवी आढळली, त्यावरून हे अनुमान बांधण्यात आले आहे.

धन्यवाद.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विकास's picture

24 Oct 2009 - 6:11 am | विकास

विचारप्रवर्तक लेख आणि क्रांतिकारी संशोधन आहे. या अनुमानाप्रमाणे, मिपावरील लेख लिहीणे हे शेक्सपिअरचे नाटक लिहीण्यापेक्षा सोपे आहे असे दिसते अथवा मिपावर लिहू शकणारी माकडे ही हॅम्लेट लिहणार्‍या माकडांपेक्षा जास्त स्मार्ट असावीत... आत्ताच हे संशोधन वाचले, त्याप्रमाणे साधे, "TO BE OR NOT TO BE, THAT IS THE QUESTION." इतके लिहीण्याची शक्यता ही ३२^४१ इतकी आहे, अर्थात माकडाला 5.142201741629e+061 इतक्या वेळेस कळफळक बडवावा लागेल!

रामोन ल्युल या १३व्या शतकातील विचारवंताने माकडांची सोय करण्यासाठी टंकलेखकाऐवजी एक चांगले यंत्र (कल्पनेत) बनवले. त्यात एक चक्र फिरवले की कुठलेही नाम, एक चक्र फिरवले की कुठलेही क्रियापद... अशा प्रकारे शब्द निवडून वाक्य तयार होते.

या प्रकारे अगदी बिनडोक पद्धतीने तयार केलेले वाक्यही "अर्थपूर्ण" निघेलच अशी व्यवस्था होते. अशा प्रकारे हॅम्लेट लिहिण्यासाठीचा वेळ थोडा कमी होईल. कदाचित "टु बी ऑर नॉट टु बी" वाक्य शंभरएक वर्षांत लिहूनही होईल.

एक वाक्याचे कौल तर चुटकीत बनतील.

धनंजय's picture

25 Oct 2009 - 3:58 am | धनंजय

अ म्ह
(१, ०.५)

सुहास's picture

24 Oct 2009 - 6:12 am | सुहास

:)

विसोबा खेचर's picture

24 Oct 2009 - 7:56 am | विसोबा खेचर

चालू द्या! :)

मिभोचं पिणं हल्ली वाढलं आहे असं देवकाका म्हणतात तेच खरं! :)

तात्या.

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 9:44 am | मिसळभोक्ता

आम्ही अद्याप आमचे पूर्ण संशोधन प्रकाशित केलेले नाही. त्यामुळे "चालू" राहणारच.

आमचे काही अप्रकाशित निकालः

बरीचशी माकडे बुधवारी आणि शनिवारी अधिकाधिक कळा दाबतात, त्यामुळे बरेच लेखन होते.

काही माकडे टी-० ला टी-१ विषयी अधिक टंकन करतात.

काही माकडांना हाकलून लावल्यानंतरही वेगळ्याच रंगाचे ढुंगण धारण करून येतात. वेगळ्या रंगाचा पृष्ठभाग धारण केल्यावर त्यांचे टंकन अधिकाधिक प्रमाणात होते. (वर प्रतिसाद देणार्‍या श्री. अक्षय पूर्णपात्रे, ह्यांना विचारा. त्यांना अधिक माहिती आहे.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 9:56 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री मिसळभोक्ता, आमच्याकडे संशोधनाची काही माहिती आहे पण ते तुम्ही केलेले नाही. हाकललेल्या माकडांविषयी तुम्हाला व श्री सहज यांना अधिक माहिती असल्याचे कळते. पार्श्वभाग निरीक्षणासंदर्भात आपले कौशल्य जगन्मान्य आहे. अपुर्ण विदावर संशोधन प्रकाशित न करणे हे योग्यच आहे.

आनंद घारे's picture

24 Oct 2009 - 10:22 pm | आनंद घारे

किती ^किती वेळा कळफलक बडवल्यानंतर माकडाचा माणूस होईल (किंवा विपरीत होईल) या विषयावर संशोधन करायला हवे.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

सहज's picture

24 Oct 2009 - 9:16 am | सहज

सर्वप्रथम जय हनुमान!!!

लायक वानरांना संशोधनात समाविष्ट न केल्याबद्दल निषेध!

तमाम टंकनमर्कटांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!!

पुढल्या संशोधनात - खालील माहीती वाचायला आवडेल.

वार लावलेली माकडे

दर दोन महिन्यांनी मोठी सुटी घेणारी, तसेच वार (मंगळ, बुध, शनि इ) व वेळ लावून अंमळ अमलाखाली लेख लिहणारी , अन्य वेळात विदा संकलन करणारी, इतिहास शिकवणारी, अतिशय चाणाक्ष कापुचीन माकडे

दुखरी नस घेउन "विना"कारण इतरांच्या नसा दाबु बघणारी म्हणून हाकलली जाणारी पण परत वेगळे "गणीत" घेउन येणारी रोगिष्ट प्रोबोस्कीस माकडे

जंगलातील भयानक अड्डे चुकवत जगणारी हनुमान लंगुर, काळतोंडी माकडे

वानरे

आपल्या भव्य दिव्य आकाराने इतरांना दया दाखवणारी पण वेळोवेळी छाती बडवून गर्जना करणारी सिल्वरबॅक गोरीला माकडे

कळपाने हल्ले करणारे कंपुबाज चिंपांजी

शांत काव्य धमाल करणारी स्वतंत्र ओरांग उटान

प्रत्येक घटकांवर वेगळे संशोधन व्हावे.

(वैश्वीक वानर व माकड एकात्मता परिषद सदस्य) सहज

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 10:00 am | मिसळभोक्ता

दुखरी नस घेउन "विना"कारण इतरांच्या नसा दाबु बघणारी म्हणून हाकलली जाणारी पण परत वेगळे "गणीत" घेउन येणारी रोगिष्ट प्रोबोस्कीस माकडे

ही माकडे, दहाजणीत तुलाच कारे डसली ???

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

सहज's picture

24 Oct 2009 - 10:04 am | सहज

चुकीची माहीती. रोगराई आटोक्यात रहावी इतकीच इच्छा. असो काळजी नसावी रेबीजचे इंजेक्शन आहे.

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 10:07 am | मिसळभोक्ता

असो काळजी नसावी रेबीजचे इंजेक्शन आहे.

त्याची खात्री होतीच म्हणा....

आधी (रे)बीज एकले म्हणताना ऐकलाय तुला... :-)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

दशानन's picture

24 Oct 2009 - 10:09 am | दशानन

आजकाल १४ ची गरज नसते ना :?

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 10:06 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री मिसळभोक्ता, सहज easy आहे.

दशानन's picture

24 Oct 2009 - 10:02 am | दशानन

डार्विनचा सिध्दांत काय म्हणतो मग ह्या माकडाबद्दल :?

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 10:05 am | मिसळभोक्ता

एका आद्य प्राण्यापासून विकसीत होत माकड बनले. जेनेटिक म्युटेशन होऊन दुसरी एक शाखा बनली. त्याला हल्ली मानव म्हणतात. हे प्राणी संकेतस्थळांवर टंकन करतात.

जेनेटिक म्युटेशन मुळे टंकन क्षमतेत काय फरक पडलेला आहे, ते अभ्यासण्याचा हा एक प्रयत्न समजा.

(बाय द वे, राजः १०, २)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

दशानन's picture

24 Oct 2009 - 10:08 am | दशानन

>>एका आद्य प्राण्यापासून विकसीत होत माकड बनले. जेनेटिक म्युटेशन होऊन दुसरी एक शाखा बनली. त्याला हल्ली मानव म्हणतात.

ते मानव नावाचा जीव माकडासारखा दिसतो की माकड मानवासारखा दिसतो हा गहन प्रश्न बाजूलाच पडतो आहे, म्हणजे डार्विने माकडाला पाहून सिध्दांत माडला की मानवाला :?

>>हे प्राणी संकेतस्थळांवर टंकन करतात.

हॅ हॅ हॅ. काही जण ब्लॉग वर पण टंकतात असे वाचून आहे, ह्या बाबत काही तुमचा प्रकाशझोत ???

>>जेनेटिक म्युटेशन मुळे टंकन क्षमतेत काय फरक पडलेला आहे, ते अभ्यासण्याचा हा एक प्रयत्न समजा.

आमच्या शुभेच्छा आहेतच.

>>>(बाय द वे, राजः १०, २)

=))

लेट करंट !

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

अवलिया's picture

24 Oct 2009 - 11:08 am | अवलिया

चांगले संशोधन.

पण तुमच्या माकडांनी कितिही टंकन केले तरी रोशनीचा एक भाग सुद्धा करु शकणारच नाहीत. हे आधीच सांगुन ठेवतो.

कोण रे कोण तिकडे माकडं आणि गोरिलात फरक असतो म्हणुन पुटपुटतोय! गप्प बसा रे.. !

आणि काय हो मिभो काका .. हल्ली काही माकडं माकडीणीचा वेष घालुन फिरतांना आम्हाला दिसत आहेत तुमची नजर नाही पडली का अजुन ???

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन's picture

24 Oct 2009 - 11:12 am | दशानन

नानाशी सहमत,
व ह्याच विभागात शिकारी माकडं पण मोडतात ह्या कडे ही तुमचे लक्ष वेधावे म्हणून हा प्रतिसाद.

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

अक्षय पुर्णपात्रे's picture

24 Oct 2009 - 11:12 am | अक्षय पुर्णपात्रे

हल्ली काही माकडं माकडीणीचा वेष घालुन फिरतांना आम्हाला दिसत आहेत तुमची नजर नाही पडली का अजुन ???

श्री अवलिया, कृष्णाच्या अभावाने फारच उठून दिसतात त्या.

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 1:16 pm | मिसळभोक्ता

पण तुमच्या माकडांनी कितिही टंकन केले तरी रोशनीचा एक भाग सुद्धा करु शकणारच नाहीत. हे आधीच सांगुन ठेवतो.

अर्थातच ! जिथे टंकनप्रेमी माकडे संपतात, तिथे रोशनी सुरू होते.. पण संपत मात्र नाही. अनेक माकडे रोशनीची वाट पाहून थकली. तिचे फोटो आले, तिच्या मुलीचे आले, नातीचेही येतील. पण माकडांच्या नशीबी रोशनी नाही ती नाहीच. आम्च्या संशोधनातील सर्व माकडांनी एकदा ह्याच कारणाने संप पुकारला होता. विजुभाऊंची रोशनी दाखवली, तरी टंकन करायला तयार नाहीत. शेवटी, "तुम्ही टाईपरायटरचे मालक झालात, तर.." अशी लालूच दाखवली, आणि मग काय म्हणता ! टंकटंकटंक..

आणि काय हो मिभो काका .. हल्ली काही माकडं माकडीणीचा वेष घालुन फिरतांना आम्हाला दिसत आहेत तुमची नजर नाही पडली का अजुन ???

स्वारी, अंमळ माकडटंकनदर्शनात मग्न होतो. काय म्हणालात ? माकडे माकडिणींचा वेष घालून फिरतात ?

अहो नानाशेठ, माकडांना वेष असता, तर त्यांच्या फुलांचा असा चेंदामेंदा झाला असता का ?

उगाच काहीही ! माकडे ही नागडी, माकडिणींचा तर प्रश्नच नाही !

माझे ऐका, उगाच असा लिंगभेद करू नका. इतकाच त्रास होत असेल, तर अमृतांजन लावा. कसे ?

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

भोचक's picture

24 Oct 2009 - 12:25 pm | भोचक

अमेरिका, पाकिस्तान (जमल्यास इतर मुस्लिम राष्ट्रे (आणखीच जमले तर तो समाजही) ), चीन वगैरे 'शत्रू'राष्ट्रांविरोधात लिहिण्याठी 'तशी' लेखनभूमिका असणार्‍या माकडांचा वेगळा वर्ग असेल नाही? ही माकडे म्हणे पश्चिमेकडून पूर्वेकडे गेली असे नुकतेच वाचनात आले. यांच्या म्हणे मनोभूमिकाच स्पष्ट असल्याने टंकनाचा वेगही सर्वसामान्य माकडांपेक्षा जास्त असतो असे ऐकिवात आले आहे.

अदितीने यावर अधिक प्रकाश टाकल्यास उत्तम.

(भोचक)
मी पत्रकार आहे. कारण जगातील यच्चयावत ज्ञान 'फक्त' मलाच आहे, याची मला खात्री आहे.
हा आहे आमचा स्वभाव

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 1:07 pm | मिसळभोक्ता

आमच्याकडे सदर माकडांचा विदा (काय श्री. पूर्णपात्रे? जमलंय ना ? आम्हालाही हे "विदा" वगैरे शब्द माहिती आहेत, म्हटलं!) अद्याप पूर्णपणे जमायचा आहे. त्यामुळे सदर शोधनिबंधात त्याचा समावेश नाही.

परंतु अपूर्ण विदा असतानादेखील, आम्ही ८५% खात्रीने सांगू इच्छितो, की मुस्लिमबहुल देशांतली माकडे उजवीकडून टंकनाला सुरुवात करतात (त्यामुळे त्यांच्याकडून ळ, प, ल, ओ, क, न अशीच सारखी अक्षरे टंकल्या जातात.). आम्ही आमच्या संशोधनासाठी माकडांची निवड करताना जसा निवासी-अनिवासी असा भेद ठेवला नाही, तसाच डावे-उजवे हादेखील भेद ठेवलेला नाही. (काही माकडांनी चुकून भोंदू असा शब्द टंकला, आणी लगेच दोनदा डिलीट दाबून पुसला, तरी त्यांना आम्ही सदर संशोधनातून खारीज केले नाही, ह्यावरून आमची धर्मनिरपेक्षता लक्षात यावी.)

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विसोबा खेचर's picture

24 Oct 2009 - 1:38 pm | विसोबा खेचर

साला अडाणचोट धागा आहे! दुसरं काही नाही! :)

(भिकारचोट) तात्या.

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 1:43 pm | मिसळभोक्ता

(२ माकडे, १ मिनिट)

दुसरे काही नाही.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

दशानन's picture

24 Oct 2009 - 1:49 pm | दशानन

=))

=))

हा हा हा

विसोबा खेचर's picture

24 Oct 2009 - 1:51 pm | विसोबा खेचर

मिल्या, भोसडीच्या अंगी असलेल्या मूळच्या अतिहुशारीमुळे अलिकडे तू फुकट जाऊ लागला आहेस आणि तुझ्या डोक्यावर अंमळ परिणामही होऊ लागला आहे!

पहिली गोष्ट म्हणजे मनातले परस्त्रीबद्दलचे येणारे विचार थांबव. आंतरजालावरच्या सार्‍या काकांविषयी मनात केवळ प्रेम आणि माया बाळग! आंतरजालावरच्या काही कविता वाचणे थांबव.. शाटमारी काही कळणार नाही अश्या आशयाचे उपक्रमावरले लेख वाचणे थांबव. त्यामुळे तुला न्यूनगंड आला आहे तो निघून जाईल.. आणि मुख्य म्हणजे चार दिवस विल्मिंगटनला विनायककाकांकडे जाऊन हवापालट करून ये, गृहिणीच्या हातची थालिपिठे खा!

काय म्हणालास? मिपाच्या मुखपृष्ठावरची खातो? नको! सोबत परस्त्री आहे! :)

तुझा,
तात्या.

दशानन's picture

24 Oct 2009 - 1:54 pm | दशानन

>>शाटमारी काही कळणार नाही अश्या आशयाचे उपक्रमावरले लेख वाचणे थांबव. त्यामुळे तुला न्यूनगंड आला आहे तो निघून जाईल..

=))

देखो शेट ने भी बोला ना लास्ट... !

( ११, १)

मिसळभोक्ता's picture

24 Oct 2009 - 2:00 pm | मिसळभोक्ता

आता कसा छान लिहिलास प्रतिसाद! (पण कुणाला उद्देशून लिहिलायस रे?) एवढे सगळे संदर्भ शोधून लिहायचे म्हणजे किमान १० लाख माकडे, आणि हजार वर्षे लागतील !!!

(बाबा रे, तिकडे हल्ली दंगली व्हायला लागल्यामुळे, माकडे टंकनासाठी तिकडेच जायला लागलीत. एक शिग्रेट आणि एक चाय मिळतो म्हणे टंकनसाठी तिकडे. २००७, २००८ वगैरे सगळ्या दिवाळ्यांच्या खपल्या निघताहेत तिकडे. भळाभळा रक्त वाहतेय. माकडांचे काय, रक्तासाठी चटावलीत साली. इकडे एवढे महत्वाचे संशोधन चालू आहे, तर माकडांची उणीव जाणवते. तरी बरे, हल्ली विडंबनासाठी का होईना, इकडल्या संख्येत थोडी भर पडली.)

म्म्म्म्म्म.. थालिपीठ.....

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

दशानन's picture

24 Oct 2009 - 2:08 pm | दशानन

>>>एवढे सगळे संदर्भ शोधून लिहायचे म्हणजे किमान १० लाख माकडे, आणि हजार वर्षे लागतील !!!

अरे बाप रे !

मग नवीन सर्वर घेणार की... सगळी हॉटेलं मर्ज करुन विदा गोळा करणार ;)

सहज's picture

24 Oct 2009 - 2:12 pm | सहज

डिस्ट्रीब्युटेड कॉम्प्युटिंग , *डू* ऐकले नाय का कधी राजे?

दशानन's picture

24 Oct 2009 - 2:14 pm | दशानन

ते बरोबर आहे पण,

१०००० माकडे ??
कुठून गोळा करणार ??

सगळी माकडं गोळा केली तरी पण नाही जमणार दहा हजारचा आकडा ;)

सहज's picture

24 Oct 2009 - 2:16 pm | सहज

जय हनुमान!!!

"सुपर एप" विसरु नका!!

दशानन's picture

24 Oct 2009 - 2:18 pm | दशानन

मग तो इकडे कामाला लागला तर शक्ती वेलू... स्वारी रामाच्या ड्युटीवर कोण जाणार :?

चित्रा's picture

26 Oct 2009 - 7:07 pm | चित्रा

पहिली गोष्ट म्हणजे मनातले परस्त्रीबद्दलचे येणारे विचार थांबव. आंतरजालावरच्या सार्‍या काकांविषयी मनात केवळ प्रेम आणि माया बाळग! शाटमारी काही कळणार नाही अश्या आशयाचे उपक्रमावरले लेख वाचणे थांबव.

सध्या मि. भो. यांचे शोधयंत्र गंजलेले दिसते आहे.

Nile's picture

24 Oct 2009 - 2:37 pm | Nile

वा वा! प्रमेय आवडले! अत्यंत रोचक विषय आहे.

माकडांचा नंबर आणि टंकायचा वेळ कमी करायचा असेल तर एक युक्ती सुचवतो. माकडांना ज्याप्रकारचे लेखन करायचे आहे त्याप्रकारच्या व्यक्तीच्या सहवासात काही दिवस ठेवा. माकडे हुशारीने 'गुण' लवकरच उचलतात असे संशोधन आहे. (लि़ंक फक्त 'सीलेक्टेड' माकडांना दिली जाईल) उदा. एखाद्या साउथ इंडिअन अंमळ स्थुल नटीवर लिहावयाचे असेल तर त्या माकडांना फोरास रोड वर पाठवा.

सविस्तर कल्पना हवी असल्यास चहा अन सिग्रेटीची व्यवस्था करावी, माकडे तयार आहे टंकुन पाठवायला फार वेळ लागणार नाही. ;)

गणपा's picture

24 Oct 2009 - 3:56 pm | गणपा

छान छान चालुद्या आद्यप्रवर्तक मर्कटांचे चाळे.
आम्ही नवशीकी माकडे वाचतोय इतिहास.
बरेच टाके जुळलेत (का उसवलेत :? ) बाकिच्यांची उकल चालु आहे ;)

- (१/२ माकड, ३० सेकंद)

प्रकाश घाटपांडे's picture

24 Oct 2009 - 2:42 pm | प्रकाश घाटपांडे

डार्विनच्या सिद्धांतानुसार जर काही माकडांचे उत्क्रांतीतुन माणसात रुपांतर झाले असेल तर मिभो यांना काही माणसांचे नीष्क्रांतीतुन माकडात रुपांतर झाले नसेल कशावरुन असा प्रश्न विचारायच आहे काय?
काही माकडांनी जंगलात भरपुर द्राक्षे खाल्ल्यानी नी त्याचे पोटात द्राक्षासव तयार झाल्यानी आनी त्याचा अंमल वाढल्यानी त्यांनी मेंदुनी टंकनीचा वापर केला नी त्यातुन हॅम्लेट तयार झाले ही शक्यता आमाला अधिक वाटते.
आम्ही हे नीरिक्षन नीरगाठकलतंत्रानी मांडले आहे. पण काही लोक आमचा नीरक्षीर विवेक ढासळल्यानी ही मांडनी केली आहे असे म्हंतात. असो !
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विकास's picture

24 Oct 2009 - 5:03 pm | विकास

डार्विनच्या सिद्धांतानुसार जर काही माकडांचे उत्क्रांतीतुन माणसात रुपांतर झाले असेल तर मिभो यांना काही माणसांचे नीष्क्रांतीतुन माकडात रुपांतर झाले नसेल कशावरुन असा प्रश्न विचारायच आहे काय?

त्याला मराठीत वानराचा-नर आणि नराचा नारायण होण्याऐवजी, (अजून नारायण झालो नसलो तरी) नराचा वानर झाला असे म्हणता येईल. :-)

बाकी या संशोधनात "सुडो"माकडांबद्दल काय माहीती मिळते?

विंजिनेर's picture

24 Oct 2009 - 5:45 pm | विंजिनेर

बाकी या संशोधनात "सुडो"माकडांबद्दल काय माहीती मिळते?

मला वाटतं ते त्या-त्या माकडाच्या चड्डीच्या रंगावर अवलंबून आहे. शिवाय भगवा चांगला की तिरंगी हा सुद्धा एक मुद्दा होऊ शकेल. हे आपले माझे मत्त. पीहेचडी (शिवाजी युनीवर्स्टीतून नाही बर्रका...)वालेच खरे काय ते सांगू शकतील..

ब्रिटिश टिंग्या's picture

24 Oct 2009 - 6:33 pm | ब्रिटिश टिंग्या

पीहेचडी म्हणजे डब्बल डिग्री काय रे भौ?

अवांतर : कोण रे ते डब्बल बॅरल ओरडतयं?

ब्रिटिश टिंग्या's picture

24 Oct 2009 - 6:09 pm | ब्रिटिश टिंग्या

२ माकडे,१०००००० प्रकाशवर्षे

मिसळभोक्ता's picture

26 Oct 2009 - 10:08 pm | मिसळभोक्ता

प्रकाशवर्षे, हे अंतराचे एकक आहे, वेळेचे नाही. त्यामुळे वरील प्रतिसाद खारीज समजला जावा.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

शक्तिमान's picture

24 Oct 2009 - 6:13 pm | शक्तिमान

जबरी!!
पुढच्या नोबेल पुरस्कारासाठी मिभोंचे नामांकन होणार यात तीळमात्र ही संशय नाही!!

निमीत्त मात्र's picture

24 Oct 2009 - 10:22 pm | निमीत्त मात्र

आधीच माकड त्यात दारू प्याला...त्यात त्याच्या हातात कळफलक दिला.. मग होणारच की संशोधन! :)

चालू द्या..

टुकुल's picture

25 Oct 2009 - 12:44 am | टुकुल

=)) =))

-- टुकुल

JAGOMOHANPYARE's picture

25 Oct 2009 - 10:13 am | JAGOMOHANPYARE

शंकर पाटलांची 'शिरगणती ' कथा आठवते का कुणाला? त्यात माकडांची शिरगणती करतात बहुतेक..

:)

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

हर्षद आनंदी's picture

31 Oct 2009 - 9:22 am | हर्षद आनंदी

इति श्रीमिभोउवाच मर्कटंक्लेखनाकृत अध्याय संपुर्ण्म!!

अंमळ जास्त झाली की माकड माणसात येतात आणि टंचलेखन करु पहातात.

गंमतीशीर सिद्धांत.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Apr 2012 - 3:33 pm | ज्ञानोबाचे पैजार

सध्या मि.पा. वर माकडांची संख्या फारच वाढलेली आहे.

प्यारे१'s picture

30 Apr 2012 - 4:28 pm | प्यारे१

>>>>सध्या मि.पा. वर माकडांची संख्या फारच वाढलेली आहे.

कधी नव्हती?????

-प्यारे वानर!