शक्याशक्यता प्रवादात (प्रॉबेबिलिटी थियरी), "अनंत माकड प्रमेय" नावाचे एक प्रमेय आहे.
थोडक्यात सांगायचे तर हे प्रमेय असे:
अनंत (म्हणजे इन्फायनाईट) माकडे टाईपरायटर बडवत बसलीत, तर शेक्सपीयरचे वाङ्मय टंकू शकतात.
ह्याची सिद्धता तशी सोपी आहे. टाईपरायटरच्या कळा सांत (फायनाईट) आहेत, त्यामुळे माकडाने एक विशिष्ट कळ दाबण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेक्सपियरच्या हॅम्लेट मधली अक्षरे एका माकडाने एकामागोमाग एक टंकित करण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे, अशी अनंत माकडे टाईपरायटर घेऊन बसवली, तर त्यातले एखादे माकड तरी नक्कीच हॅम्लेट टाईप करेल.
असो, गणित गेलं चपला घालून "तिकडे" (आतापर्यंता सगळ्यांना "तिकडे" म्हणजे कुठे ते माहीत असेलच.)
हे प्रमेय वाचून आम्ही विचार मग्न झालो. हॅम्लेट लिहायला अनंत माकडे खरेच लागतील का ? उत्तर अर्थातच "नाही" असे आहे. कारण एक माकड अनंत काळासाठी जरी टंकन करीत बसले, तरी हॅम्लेट निर्माण होऊ शकते.
मिसळपावाशी ह्या सगळ्याचा संबंध काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेलच. (फारच "प्रश्नखोर" बॉ तुम्ही!)
सांगतो, सांगतो.. (ह्याला नीरगाठउकल तंत्र म्हणतात. नाना आणि घाटपांडेकाका ह्यालाच नीरगाठउकल तंत्र म्हणतात. ह्यातला सूक्ष्म फरक सूज्ञ वाचकांच्या लक्षात येईलच.)
अनंत माकडे हॅम्लेट लिहू शकत असतील, तर मिसळपावाच्या प्रत्येक लेखासाठी, कौलासाठी, प्रतिसादासाठी, किती माकडांना किती वेळ टंकन करावे लागेल, ह्यासंबंधी आमचे संशोधन आहे. ह्या संशोधनाचे प्राथमीक काम आम्ही नुकतेच संपवले आहे. (पुढील सखोल कामासाठी जीएमआरटी किंवा आयुका ह्या संस्थांना आर्थिक पाठबळ मागावे, ह्या विचारात आहे. मिसळपावावर कंपूबाजी करण्यासाठी ह्या संस्था कुणालातरी आर्थिक पाठबळ पुरवतात, असे कळले.)
संशोधनाचे प्राथमिक निकाल अशा प्रकारे:
लेखन-प्रकार (टाईपरायटर वाल्या माकडांची संख्या, लागणारा वेळ)
एका ओळीचे कौल (१ माकड, २ मिनिटे)
गटणेचे प्रतिसाद (१ माकड, ५ सेकंद)
सहमत, +१, असेच म्हणतो (१ माकड, १० सेकंद)
विरजण घालणारे प्रतिसाद (१ माकड, ५ मिनिटे)
विकासचे प्रतिसाद (१००० माकडे, १ दिवस)
विकासच्या प्रतिसादावर विकीचे प्रतिसाद (१, २ मिनिट)
धनंजयचे प्रतिसाद (१००० माकडे, १ महिना)
धनंजयच्या प्रतिसादावर "सहमत आहे" प्रतिसाद (१ माकड, ०.०१ सेकंद)
शरदिनीताईंची कविता (१ माकड, १० मिनिटे)
रंगाशेठचे विडंबन (१०० माकडे, १ तास)
इतरांची विडंबने (१ माकडे, १० मिनिटे)
शरदिनीताईंच्या कवितेचे रसग्रहण (१००००० माकडे, १ महिना)
आजोबांचा लेख - भाग १ ते चार (१० माकडे, १० दिवस)
कोदाचे निबंध - भाग १ ते अनंत (१० माकडे, बारावीची चार वर्षे)
टार्याचे उत्तर/विडंबन (१ माकड, १० मिनिटे)
नानाचा वैचारिक लेख (१ माकड, १० मिनिटे)
प्रभूंचा क्रिप्टिक लेख (१० माकडे, १ दिवस)
प्रभूंच्या लेखावर नानाचा वैचारिक प्रतिसाद (१००००० माकडे, १ वर्ष)
इतर लेखनाचे विश्लेषण अद्याप पूर्ण व्हायचे आहे. आपल्यापैकी कुणाला ह्या संशोधनात आम्हाला मदत करायची असल्यास, प्रतिसादात आपापल्या संशोधनाचे निकाल लिहावेत. (संशोधनाला आर्थिक पाठबळ पुरवण्यासाठी वरील संस्थांना केलेल्या अर्जात, आपले नाव अंतर्भूत करण्यात येईल.)
धन्यवाद.
(सदर काथ्याकूट ब्रिटिश टिंग्याला अर्पण. ह्या म्यान ने मला लिहिलेली खरड अशी: "काय मिभो, येवु द्या काहीतरी खुसखुशीत्/तिरकस्/खाजवुन खरुज काढलेले इत्यादी इत्यादी.... " खाजव लेका आता...)
वाचने
20592
प्रतिक्रिया
62
मिसळपाव
प्रतिक्रिया
वरचा लेख टंकायला किती माकडे लागली??
थांबा
In reply to वरचा लेख टंकायला किती माकडे लागली?? by लवंगी
काही आंतरशाखीय निष्कर्ष
In reply to वरचा लेख टंकायला किती माकडे लागली?? by लवंगी
अर्रे वा ..
In reply to काही आंतरशाखीय निष्कर्ष by अक्षय पुर्णपात्रे
अभ्यास
In reply to अर्रे वा .. by टारझन
ते पौराणिक
In reply to अर्रे वा .. by टारझन
एक
गूड क्वश्चन
In reply to एक by विंजिनेर
त्यांच्या
In reply to गूड क्वश्चन by मिसळभोक्ता
अपूर्ण संशोधन?
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मेहनताना
In reply to अपूर्ण संशोधन? by नंदन
विचारप्रवर्तक
रामोन ल्युलची "चरम कला" - माकडांसाठी समयसाधक यंत्र
In reply to विचारप्रवर्तक by विकास
असेच म्हणतो
In reply to विचारप्रवर्तक by विकास
(विषय दिलेला नाही)
चालू द्या!
अंमलाखालील माकडे
In reply to चालू द्या! by विसोबा खेचर
अधिक माहिती
In reply to अंमलाखालील माकडे by मिसळभोक्ता
नवा विषय
निषेध
सहजा, लेका
In reply to निषेध by सहज
डसली??
In reply to सहजा, लेका by मिसळभोक्ता
हुश्श
In reply to डसली?? by सहज
आजकाल १४
In reply to डसली?? by सहज
नावातच
In reply to सहजा, लेका by मिसळभोक्ता
डार्विनचा
एक माली दो फूल
In reply to डार्विनचा by दशानन
>>एका आद्य
In reply to एक माली दो फूल by मिसळभोक्ता
चांगले
नानाशी
In reply to चांगले by अवलिया
चांगले निरीक्षण
In reply to चांगले by अवलिया
स्वारी
In reply to चांगले by अवलिया
अमेरिका,
सदर माकडे
In reply to अमेरिका, by भोचक
साला
(२ माकडे, १
In reply to साला by विसोबा खेचर
हा हा हा
In reply to (२ माकडे, १ by मिसळभोक्ता
मिल्या,
In reply to (२ माकडे, १ by मिसळभोक्ता
>>शाटमारी
In reply to मिल्या, by विसोबा खेचर
१० लाख माकडे, १००० वर्षे
In reply to मिल्या, by विसोबा खेचर
>>>एवढे सगळे
In reply to १० लाख माकडे, १००० वर्षे by मिसळभोक्ता
कशाला?
In reply to >>>एवढे सगळे by दशानन
ते बरोबर
In reply to कशाला? by सहज
जय
In reply to ते बरोबर by दशानन
मग तो इकडे
In reply to जय by सहज
गंजलेले शोधयंत्र
In reply to मिल्या, by विसोबा खेचर
वा वा!
छान छान
काही नीरिक्षणे
त्याला
In reply to काही नीरिक्षणे by प्रकाश घाटपांडे
बाकी या
In reply to त्याला by विकास
:)
In reply to बाकी या by विंजिनेर
वरील प्रतिसाद
In reply to त्याला by विकास
खारीज
In reply to वरील प्रतिसाद by ब्रिटिश टिंग्या
जबरी!! पुढच
आधीच माकड
निशब्ध !!
In reply to आधीच माकड by निमीत्त मात्र
शंकर
हुप्प हुप्प हुप्प..***** पावशेर तुप
गंमतीशीर सिद्धांत....
सध्या मि.पा. वर माकडांची
>>>>सध्या मि.पा. वर माकडांची
In reply to सध्या मि.पा. वर माकडांची by ज्ञानोबाचे पैजार