अनंत माकड प्रमेय : एक विचार मंथन
शक्याशक्यता प्रवादात (प्रॉबेबिलिटी थियरी), "अनंत माकड प्रमेय" नावाचे एक प्रमेय आहे.
थोडक्यात सांगायचे तर हे प्रमेय असे:
अनंत (म्हणजे इन्फायनाईट) माकडे टाईपरायटर बडवत बसलीत, तर शेक्सपीयरचे वाङ्मय टंकू शकतात.
ह्याची सिद्धता तशी सोपी आहे. टाईपरायटरच्या कळा सांत (फायनाईट) आहेत, त्यामुळे माकडाने एक विशिष्ट कळ दाबण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे शेक्सपियरच्या हॅम्लेट मधली अक्षरे एका माकडाने एकामागोमाग एक टंकित करण्याची शक्यता शून्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे, अशी अनंत माकडे टाईपरायटर घेऊन बसवली, तर त्यातले एखादे माकड तरी नक्कीच हॅम्लेट टाईप करेल.
असो, गणित गेलं चपला घालून "तिकडे" (आतापर्यंता सगळ्यांना "तिकडे" म्हणजे कुठे ते माहीत असेलच.)
हे प्रमेय वाचून आम्ही विचार मग्न झालो. हॅम्लेट लिहायला अनंत माकडे खरेच लागतील का ? उत्तर अर्थातच "नाही" असे आहे. कारण एक माकड अनंत काळासाठी जरी टंकन करीत बसले, तरी हॅम्लेट निर्माण होऊ शकते.
मिसळपावाशी ह्या सगळ्याचा संबंध काय, असा तुम्हाला प्रश्न पडला असेलच. (फारच "प्रश्नखोर" बॉ तुम्ही!)
सांगतो, सांगतो.. (ह्याला नीरगाठउकल तंत्र म्हणतात. नाना आणि घाटपांडेकाका ह्यालाच नीरगाठउकल तंत्र म्हणतात. ह्यातला सूक्ष्म फरक सूज्ञ वाचकांच्या लक्षात येईलच.)
अनंत माकडे हॅम्लेट लिहू शकत असतील, तर मिसळपावाच्या प्रत्येक लेखासाठी, कौलासाठी, प्रतिसादासाठी, किती माकडांना किती वेळ टंकन करावे लागेल, ह्यासंबंधी आमचे संशोधन आहे. ह्या संशोधनाचे प्राथमीक काम आम्ही नुकतेच संपवले आहे. (पुढील सखोल कामासाठी जीएमआरटी किंवा आयुका ह्या संस्थांना आर्थिक पाठबळ मागावे, ह्या विचारात आहे. मिसळपावावर कंपूबाजी करण्यासाठी ह्या संस्था कुणालातरी आर्थिक पाठबळ पुरवतात, असे कळले.)
संशोधनाचे प्राथमिक निकाल अशा प्रकारे:
लेखन-प्रकार (टाईपरायटर वाल्या माकडांची संख्या, लागणारा वेळ)
एका ओळीचे कौल (१ माकड, २ मिनिटे)
गटणेचे प्रतिसाद (१ माकड, ५ सेकंद)
सहमत, +१, असेच म्हणतो (१ माकड, १० सेकंद)
विरजण घालणारे प्रतिसाद (१ माकड, ५ मिनिटे)
विकासचे प्रतिसाद (१००० माकडे, १ दिवस)
विकासच्या प्रतिसादावर विकीचे प्रतिसाद (१, २ मिनिट)
धनंजयचे प्रतिसाद (१००० माकडे, १ महिना)
धनंजयच्या प्रतिसादावर "सहमत आहे" प्रतिसाद (१ माकड, ०.०१ सेकंद)
शरदिनीताईंची कविता (१ माकड, १० मिनिटे)
रंगाशेठचे विडंबन (१०० माकडे, १ तास)
इतरांची विडंबने (१ माकडे, १० मिनिटे)
शरदिनीताईंच्या कवितेचे रसग्रहण (१००००० माकडे, १ महिना)
आजोबांचा लेख - भाग १ ते चार (१० माकडे, १० दिवस)
कोदाचे निबंध - भाग १ ते अनंत (१० माकडे, बारावीची चार वर्षे)
टार्याचे उत्तर/विडंबन (१ माकड, १० मिनिटे)
नानाचा वैचारिक लेख (१ माकड, १० मिनिटे)
प्रभूंचा क्रिप्टिक लेख (१० माकडे, १ दिवस)
प्रभूंच्या लेखावर नानाचा वैचारिक प्रतिसाद (१००००० माकडे, १ वर्ष)
इतर लेखनाचे विश्लेषण अद्याप पूर्ण व्हायचे आहे. आपल्यापैकी कुणाला ह्या संशोधनात आम्हाला मदत करायची असल्यास, प्रतिसादात आपापल्या संशोधनाचे निकाल लिहावेत. (संशोधनाला आर्थिक पाठबळ पुरवण्यासाठी वरील संस्थांना केलेल्या अर्जात, आपले नाव अंतर्भूत करण्यात येईल.)
धन्यवाद.
(सदर काथ्याकूट ब्रिटिश टिंग्याला अर्पण. ह्या म्यान ने मला लिहिलेली खरड अशी: "काय मिभो, येवु द्या काहीतरी खुसखुशीत्/तिरकस्/खाजवुन खरुज काढलेले इत्यादी इत्यादी.... " खाजव लेका आता...)
वाचन
20581
प्रतिक्रिया
0