पनीर बटर मसाला

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
6 Dec 2011 - 1:55 am

पियुशाची फर्माईश होती पनीर बटर मसाला ची पाकृ द्यायला....तीच देत आहे :)

.

साहित्यः
१०० ग्राम पनीर चे तुकडे हलक्या सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घेणे. (तुम्हाला जर का तळायचे नसतील तर तुम्ही असेच वापरु शकता, तळले की चवीत फरक पडतो .)
२ मध्यम कांदे उकडून घेणे व त्याची वाटून पेस्ट करणे.
३ मध्यम टोमॅटो उकडून घेणे व त्याची प्युरे करणे.
३ टेस्पून काजु गरम पाण्यात भिजवून त्याची घट्टसर पेस्ट करुन घेणे.
१ टेस्पून आले+लसूण पेस्ट.
३ टेस्पून काश्मिरी लाल-मिरची पावडर.
२ टेस्पून गरम-मसाला.
१ टेस्पून धणेपूड.
१/२ टेस्पून जीरेपूड.
१ टीस्पून जीरे.
१ टेस्पून कसूरी मेथी.
मीठ चवीनुसार.
४-५ टेस्पून बटर. (आवडीप्रमाणे कमी-जास्त)
२-३ तमालपत्र, १ मसाला वेलची, २-३ लवंगा, २-३ हिरवी वेलची.

.

पाकृ:

कढईत बटर गरम करुन घेणे व त्यात जीरे, २-३ तमालपत्र, १ मसाला वेलची, २-३ लवंगा, २-३ हिरवी वेलची घालून परतणे.

.

त्यात आले+लसूण पेस्ट घालून चांगले परतणे.

.

मग त्यात वाटलेली कांदे-पेस्ट घालणे. पेस्ट चांगली ब्राऊन परतली गेली पाहीजे.

.

त्यात टोमॅटो प्युरे घालून एकत्र करणे. नीट एकजीव झाले की त्यात २-३ चमचे काजु-पेस्ट घालणे. (आपण ह्यात फ्रेश क्रिमचा वापर अजिबात करत नसल्यामुळे काजु-पेस्ट तुम्ही २-३ चमचे घालू शकता त्यामुळे ग्रेव्हीला क्रिमी टेक्सचर येईल.)

.

आता त्यात काश्मिरी लाल-मिरची पावडर, गरम-मसाला, धणेपूड व जीरेपूड घालून एकत्र करणे. चवीप्रमाणे मीठ घालणे.

.

त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी आणणे.

.

उकळी आली की त्यात कसूरी मेथी चुरडून घालणे.

.

त्यात आता तळून ठेवलेले पनीरचे तुकडे घालणे व झाकून ५-६ मिनिटे शिजवणे.

.

ग्रेव्ही शिजली की त्यात वरून बटर सोडणे.
गार्निशींग करता त्यावर थोडे पनीर किसून घालणे व थोडीशी कसूरी मेथी घालणे. (आवडत असल्यास थोडे फ्रेश क्रिम ही घालू शकता.)

पनीर बटर मसाला तुम्ही नान, रोटी बरोबर सर्व्ह करु शकता....मग वाट कसली बघता येताय ना जेवायला :)

.

प्रतिक्रिया

कौशी's picture

6 Dec 2011 - 2:31 am | कौशी

आवडली ,करून बघणार...

मेघवेडा's picture

6 Dec 2011 - 2:47 am | मेघवेडा

असेच म्हणतो.

हौशी

झकास.. मस्त दिसतेय आणि नेमकी रात्रपाळी. आता कुठे मिळेल हे?

- पिंगू

सुहास झेले's picture

6 Dec 2011 - 4:31 am | सुहास झेले

सहीच... रेसीपी आवडली :) :)

निवेदिता-ताई's picture

6 Dec 2011 - 5:29 am | निवेदिता-ताई

सुंदर...आजच आणते पनीर

प्रचेतस's picture

6 Dec 2011 - 8:49 am | प्रचेतस

तोंपासू.

पियुशा's picture

6 Dec 2011 - 9:45 am | पियुशा

अरे व्वा ,झक्कास :)
त्रिवार धन्यु धन्यु धन्यु ..........
मी नक्की करुन बघेन आणी स्पेशलि तुला फोटो धाडेन :)

आणि मग आम्ही काय पाप केलंय, ते फोटो पाहू न शकण्यासाठी? आँ? x-(

बाकी पनीर हा आपला वीक पॉइण्ट तेव्हा ही पाकृ नीट ध्यानात ठेवली गेली आहे.

फोटो मस्तच! तेवढी अ‍ॅक्चुअल चव घ्यायला मिळते तर..... ;-)

:-)

कपिलमुनी's picture

6 Dec 2011 - 12:13 pm | कपिलमुनी

एक नंबर आहे ..
तुमचा प्रेझेंटेशनसुद्धा नेहमीप्रमाणे सुंदर आहे

गणपा's picture

6 Dec 2011 - 1:20 pm | गणपा

पण पनीर आवडत नसल्याने त्याऐवजी कोलंबी वां चिकनचा असा बदल करणेत येईल.

मोहनराव's picture

8 Dec 2011 - 2:50 pm | मोहनराव

असंच म्हणतो बघ गणपा!!

उदय के'सागर's picture

6 Dec 2011 - 1:53 pm | उदय के'सागर

झक्कास! प्रेझेंटेशन नेहमी प्रमाणे सुदंर.

पण पनीर आवडत नाहि (म्हणजे पनीर खाउन खाऊन अता कंटाळा आलाय) आणि शाकाहारी आहे, मग अता हिच रेसीपि पनीर व मांसाहारा शिवाय कशी बनवावी त्या बद्दल कृपया मार्गदर्शन करावे. (कदाचीत 'बेबी कॉर्न' चांगले ऑप्शन असावे)

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2011 - 5:00 pm | प्रभाकर पेठकर

ह्याच रश्श्यात, चिरुन उकडलेल्या भाज्या (फ्लॉवर, गाजर, फरसबी, मटार) घालून व्हेज माखनी बनविता येते.

अत्रुप्त आत्मा's picture

6 Dec 2011 - 2:53 pm | अत्रुप्त आत्मा

---^---

रेवती's picture

6 Dec 2011 - 9:53 pm | रेवती

नेहमीप्रमाणे कॅटरिना पाकृ.
यावरून एक आठवले की गेल्या पाचेक महिन्यात कोणतीही पंजाबी भाजी खाल्लीच नाही.

इष्टुर फाकडा's picture

6 Dec 2011 - 10:26 pm | इष्टुर फाकडा

नेहमीप्रमाणेच यावेळीही :)

Pain's picture

7 Dec 2011 - 5:35 am | Pain

१) कसूरी मेथी म्हणजे काय?
२) ही भाजी करायचा प्रयत्न केल्यावर शेवटून दुसर्‍या छायाचित्रात दिसते तशी दिसते. पनीरच्या तुकड्यांमध्ये मसाला/चव उतरत नाही. ते फिके लागतात. त्यातून शेवटच्या चित्रात (हॉटेलमध्ये असते तशी) दिसते, तिथपर्यंत कसे पोचायचे?

सानिकास्वप्निल's picture

7 Dec 2011 - 6:27 am | सानिकास्वप्निल

कसूरी मेथी म्हणजे सुकवलेली मेथी.... ही बाजारात सहज उपलब्ध आहे .
ही भाजी हॉटेलमध्ये करतात तेव्हा त्यात खाण्याचा रंग घातला जातो मी तो न घालता जो रंग आला आहे तो काश्मिरी लाल-मिरची पावडरमुळे.
खरंतर ग्रेव्हीचीच स्वत:ची चव आहे की त्यात जेव्हा पनीर घालून शिजवतो तेव्हा ते वेगळे वाटत नाही... तरी ही एक टीप पनीरचे तुकडे फार जाड किंवा पातळ ठेऊ नये...मध्यम असले म्हणजे शिजतील ही आणी वातड ही होणार नाहीत. थोडे हल़क्या सोनेरी रंगावर तळणे.
वरील सांगितल्याप्रमाणे पाक्रु बनवून बघा ... हॉटेलसारखी लागेलच असं सांगु नाही शकत पण घरी बनवल्याचा (आणी तो आवडीने खाल्ल्याचा) आनंद वेगळाच असतो :)

प्रभाकर पेठकर's picture

7 Dec 2011 - 10:07 am | प्रभाकर पेठकर

कसूरी मेथी म्हणजे आपली मेथीची भाजी असते त्याची वाळवलेली पाने. पाकिस्तानातील कसूर गावच्या मेथीला विशेष चव असते. तिथे बनवणारी आणि वाळविलेली ती कसूरी मेथी.
आपल्याकडे राजस्थानात नागोरी गावात अशी मेथी बनते. त्याला नागोरी मेथी म्हणतात. अशीच असते पण कसूरी मेथी जगभर प्रसिद्ध पावली आणि ते नांव आता ह्या उत्पादनाला सर्रास वापरले जाते. आता, नागोरी मेथी सुद्धा 'कसूरी मेथी' नांवानेच बाजारात आणली जाते.

पनीर वातड होऊ नये म्हणून पनीर तळताना शेजारी पाण्याने भरलेला वाडगा ठेवावा. पनीर मध्यम आंचेवर तळावे. पनीर लवकर शिजते. कडा सोनेरी झाल्या की कढईतून काढून थेट पाण्याने भरलेल्या वाडग्यात काढावे. थंड झाल्यावर पाककृतीत वापरावे. वातड लागणार नाही.
पनीरला स्वतःची चव नसतेच. पाककृतीतील रश्शाबरोबर एकत्रित चव चांगली लागते.

फोलपट's picture

11 Dec 2011 - 3:16 pm | फोलपट

ज्ञानात भर पडली. आणि पनीर वातड होऊ नये म्हणून झकास टिप. धन्यवाद.

फोलपट's picture

11 Dec 2011 - 3:23 pm | फोलपट

घरी करून खाल्ल्याचा आनन्द काही वेगळाच. टोमॅटो प्युरी घातली तर रंग छान येतो.

५० फक्त's picture

8 Dec 2011 - 9:41 am | ५० फक्त

धन्यवाद
अजुन काय लिहिणार
वरणफळं करतात तसं पनीरच्या स्लाईस घालुन अशा प्रकारची भाजी केली होती एकदा, एवढी डिटेल मध्ये नाही पण.
आता पुन्हा या पद्धतिनं करुन पाहेन.

इरसाल's picture

8 Dec 2011 - 10:41 am | इरसाल

पनीर माझ्या मुलीला जाम म्हणजे जाम आवडते.

जागु's picture

8 Dec 2011 - 11:50 am | जागु

वा छान.

मदनबाण's picture

12 Dec 2011 - 7:51 am | मदनबाण

वाह... :)
असे त्रिकोणी पनीर पहिल्यांदाच पाहिले !

चैत्रपालवी's picture

3 Mar 2012 - 2:10 am | चैत्रपालवी

खूपच छान झाले. धन्यवाद!