मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पनीर बटर मसाला

सानिकास्वप्निल · · पाककृती
पियुशाची फर्माईश होती पनीर बटर मसाला ची पाकृ द्यायला....तीच देत आहे :) Image removed. साहित्यः १०० ग्राम पनीर चे तुकडे हलक्या सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घेणे. (तुम्हाला जर का तळायचे नसतील तर तुम्ही असेच वापरु शकता, तळले की चवीत फरक पडतो .) २ मध्यम कांदे उकडून घेणे व त्याची वाटून पेस्ट करणे. ३ मध्यम टोमॅटो उकडून घेणे व त्याची प्युरे करणे. ३ टेस्पून काजु गरम पाण्यात भिजवून त्याची घट्टसर पेस्ट करुन घेणे. १ टेस्पून आले+लसूण पेस्ट. ३ टेस्पून काश्मिरी लाल-मिरची पावडर. २ टेस्पून गरम-मसाला. १ टेस्पून धणेपूड. १/२ टेस्पून जीरेपूड. १ टीस्पून जीरे. १ टेस्पून कसूरी मेथी. मीठ चवीनुसार. ४-५ टेस्पून बटर. (आवडीप्रमाणे कमी-जास्त) २-३ तमालपत्र, १ मसाला वेलची, २-३ लवंगा, २-३ हिरवी वेलची. Image removed. पाकृ: कढईत बटर गरम करुन घेणे व त्यात जीरे, २-३ तमालपत्र, १ मसाला वेलची, २-३ लवंगा, २-३ हिरवी वेलची घालून परतणे. Image removed. त्यात आले+लसूण पेस्ट घालून चांगले परतणे. Image removed. मग त्यात वाटलेली कांदे-पेस्ट घालणे. पेस्ट चांगली ब्राऊन परतली गेली पाहीजे. Image removed. त्यात टोमॅटो प्युरे घालून एकत्र करणे. नीट एकजीव झाले की त्यात २-३ चमचे काजु-पेस्ट घालणे. (आपण ह्यात फ्रेश क्रिमचा वापर अजिबात करत नसल्यामुळे काजु-पेस्ट तुम्ही २-३ चमचे घालू शकता त्यामुळे ग्रेव्हीला क्रिमी टेक्सचर येईल.) Image removed. आता त्यात काश्मिरी लाल-मिरची पावडर, गरम-मसाला, धणेपूड व जीरेपूड घालून एकत्र करणे. चवीप्रमाणे मीठ घालणे. Image removed. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून उकळी आणणे. Image removed. उकळी आली की त्यात कसूरी मेथी चुरडून घालणे. Image removed. त्यात आता तळून ठेवलेले पनीरचे तुकडे घालणे व झाकून ५-६ मिनिटे शिजवणे. Image removed. ग्रेव्ही शिजली की त्यात वरून बटर सोडणे. गार्निशींग करता त्यावर थोडे पनीर किसून घालणे व थोडीशी कसूरी मेथी घालणे. (आवडत असल्यास थोडे फ्रेश क्रिम ही घालू शकता.) पनीर बटर मसाला तुम्ही नान, रोटी बरोबर सर्व्ह करु शकता....मग वाट कसली बघता येताय ना जेवायला :) Image removed.

वाचन 14398 प्रतिक्रिया 26