स्वसंरक्षणासाठी फुलपाखराची युक्ती

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in जनातलं, मनातलं
21 Oct 2011 - 4:16 pm

|| श्री गुरवे नम: ||

फुलपाखराचे कोष

एकदा असेच निसर्गभ्रमंतीला गेलो होतो. सकाळची वेळ. वाटेत एका उपाहारगृहात चहा-न्याहारीसाठी थांबलो. निसर्गप्रेमी शोधक नजर सभोवती भिरभिरत होतीच. जवळच एक रुईचं झुडूप दिसलं. त्याची बरीचशी पानं कुरतडलेली होती. फुलपाखराने या झुडपावर नक्कीच अंडी घातली असणार. त्याच्या अळ्यांनी पानांचा फराळ केला असणार.
झुडपाच्या अगदी जवळ गेल्यावर, एका पानाच्या आड लपलेला कोष दिसला. त्याच्या मागे एक रिकामा फाटका कोषही दिसला, काही दिवसांपूर्वीच त्यातून फुलपाखरू उडून गेलं असणार.

थोडासा शोध घेतल्यावर दुसऱ्या एका पानाआड लपलेला आणखी एक कोष दिसला. या कोषातल्या फुलपाखराची वाढ पूर्ण झाली आहे. त्याचं आवरण पारदर्शक झालेलं दिसतंय. त्यातून फुलपाखराचे रंगीत पंखही दिसतायंत. म्हणजे थोड्या वेळानं (किंवा दुसऱ्या दिवशी) त्यातून फुलपाखराचा जन्म होईल असं वाटतं.

प्लेन टायगर, स्ट्राईप्ड टायगर या जातीची फुलपाखरं रुईच्याच झाडावर अंडी घालतात. याचं एक खास कारण आहे. रुईच्या पानामध्ये एक अतिशय कडवट आणि विषारी अल्कलॉइड असतं. अंड्यातून बाहेर आल्यावर खादाड अळ्या ही पानं फस्त करतात, त्याबरोबर हे विषारी अल्कलॉइडही त्यांच्या पोटात जातं. त्यातलं अल्कलॉइड सहन करण्याची क्षमता अळ्यांमधे विकसित झाल्यामुळे त्याचा विषारी परिणाम अळ्यांवर होत नाही. ते अळ्यांच्या शरीरात तसंच साठून राहातं. नंतर अळीचं रुपांतर कोषामध्ये होऊन काही दिवसानंतर त्यातून फुलपाखरू बाहेर येतं. या सर्व अवस्थांतरामध्ये विषारी कडवट रसायन त्याच्या शरीरात तसंच राहातं.

या ‘विषारी कडवट’ फुलपाखराला एखाद्या भक्षकानं खाण्याचा प्रयत्न केला, तर त्याला खूप त्रास होतो. म्हणूनच भक्षक त्याच्या नादी लागत नाहीत. ही फुलपाखरं विषारी, कडवट आहेत हे भक्षकांना ओळखता यावं, यासाठी या जातीच्या फुलपाखरांचे रंगही भडक (इशारा देणारे) असतात. त्यामुळे ही फुलपाखरं बिनधास्त उडत असतात.

या युक्तीचा फायदा काही इतर जातीची फुलपाखरंही करून घेतात. विषारी नसलेली डॅनिड एग फ्लाय या जातीच्या फुलपाखराची मादी अगदी हुबेहूब टायगरसारखी दिसते. त्यामुळे भक्षक तिला विषारी समजतात आणि तिच्यापासून लांबच राहतात. या प्रकाराला ‘बेटेशियन नक्कल (Betesian mimicry)’ म्हणतात.

निसर्गाची ही नवलाई अजबच आहे, नाही का ?

छायाचित्रणप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

डॅनाईड एगफ्लाय आणि स्ट्राईप्ड टायगर या दोघांनाही घरी हॅच केलं आहे. त्या दिवसांची जबरदस्त आठवण झाली.

ब्लू मॉर्मॉनचा कॅटरपिलरही राधानगरीच्या जंगलात एका दरीत सापडला होता. रानटी लिंबाच्या झाडावर. तो घरी घेऊन आलो आणि घरच्या लिंबाच्या पानांवर वाढवला. नुसता वाढवला असंच नव्हे तर ब्लू मर्मॉन बाहेर आले तेव्हा आजुबाजूच्या गावातले एक दोन फोटोग्राफर तो मोका टिपायला पहाटेपासून बसले होते.

माझ्या गावाच्या परिसरात दिसणार्‍या जातींपैकी जवळजवळ सगळ्या मी घरी हॅच केल्या होत्या, कॉलेजच्या तीनचार वर्षांत.

लेख खूप मस्त आहे. डॅनाईड एग फ्लायचा नर आणि मादी त्यामुळेच इतके वेगळे दिसतात की त्यांच्या मेटिंगच्या वेळी "आँ या दोन वेगवेगळ्या जातींचा संकर कसा होतोय?" असं नवीन माणसाला वाटतं.

नरः

मादी:

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Oct 2011 - 5:32 pm | विश्वनाथ मेहेंदळे

गवि, तुम्ही नक्की कुठल्या क्षेत्रात हात नाही घातलात अजून ??

पेट्रोलियम उद्योग, मसाज, स्कूबा डायव्हिंग, योगासने, फिलाटेली, पोल्ट्री आणि असे तीनेक लाख विषय राहिलेत हात घालण्याचे.. ;)

जोक्स अपार्ट..

छंद होता हो कॉलेजात लागलेला. मोकळा वेळ भरपूर. पानं संपली की दुसरी ठेवायची असा आणि इतका वेळ होता. म्हणजे बघा..

आता मुंबईत आणि रुटीनच्या रगाड्यात कसलं जमतंय.. पण यांनी जुनी आठवण ताजी केली...

कमाल आहे राव, आम्ही हात घालायचा प्रयत्न केला की हाताला कायम एकच विषय लागतो....

मन१'s picture

21 Oct 2011 - 10:40 pm | मन१

मूळ लेख आणि गविंचा आवाका ह्यांनी नव्याच बाबींना हात घातलाय.
आवडलं.
ओ गवि, वेगळं फिल्ड आहे, ह्याबाबतीत लिहा की अजून काही.

गणेशा's picture

21 Oct 2011 - 6:02 pm | गणेशा

लेख आवडला , गवि मस्त प्रतिसाद..

मुळ लेखातील फोटो दिसले नाहित.
आणि गवि फक्त नराचाच फोटो दिसला..
(अवांतर : बहुतेक माद्यांचे फोटो कंपणीत ब्लॉक केलेत म्हणायचे )

प्रशांत's picture

21 Oct 2011 - 6:50 pm | प्रशांत

मस्त..!
लेख आवडला

लेखन माहितीपूर्ण.
तुम्ही आणि गवींनी दिलेले फोटू आवडले.
रुईची पाने म्हणजे शनीला वाहतात तीच का?
ज्यातून पांढरा चीक येतो.
(शनिवारी शनीच्या देवळासमोरून जाताना तेलाचे ओघळ आणि वाहिलेल्या रुईच्या पानातून चीक असे दृष्य आठवते.)

पैसा's picture

21 Oct 2011 - 7:14 pm | पैसा

असेच आणखी येऊ द्या. सगळेच फोटो मस्त!

विकास's picture

21 Oct 2011 - 10:28 pm | विकास

मस्त लेखन, माहिती आणि प्रकाशचित्रे (गविंनी काढलेली पण)!

लोकहो. फुलपाखरांचा छंद मला जबरदस्त होता.पण या प्रतिसादात फोटो इंटरनेटवरुन लिंक केले आहेत. डॅनाईड एगफ़्लाय नरमादी किती वेगळे असतात ते हायलाईट करण्यासाठी.
ते मी काढलेले नाहीत. पण आता इतकी कौतुकाने चर्चा झाली आहे तर माझ्याकडचे काही स्कॅन करुन टाकतो.
सर्वांची माफ़ी.

As images are in only reply, I didnt write specifically that they are taken from Google search.
The links to photos make clear they are not by me.

प्रचेतस's picture

21 Oct 2011 - 8:58 pm | प्रचेतस

मस्त लिहिलय नूलकरसाहेब. तुमची सूक्ष्म निरीक्षणशक्ती जबरदस्त
आणि गवि अ‍ॅ़ज युज्वल रॉक्स्.

५० फक्त's picture

22 Oct 2011 - 5:58 am | ५० फक्त

हेच टाइपतो झालं,

अवांतर - कुत्रे, फुलपाखरं आता नंबर कोणाचा ?

सुधांशुनूलकर's picture

22 Oct 2011 - 10:00 pm | सुधांशुनूलकर

गवि, मन१, गणेशा, प्रशांत, रेवती, विकास, पैसा, वल्ली, ५०फक्त,
प्रतिसादासाठी सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद.

मन१, पैसा : या विषयावर आणखी लिहायला.मला खूप आवडेल. आमच्या घरी झालेला फुलपाखराचा जन्म आणि त्यामुळे झालेली छोट्या मुलांशी दोस्ती यावर लिहिणार आहे. निसर्ग आणि त्यावरचं ले़खन हे तर माझे अत्यंत आवडीचे विषय.

रेवती : होय, शनीला वाहतात तेच हे रुईचं पान. त्याचा पांढुरका चीक डोळ्यात गेला तर अंधत्व येऊ शकतं, असं म्हणतात.

वल्ली : एक तर मला 'साहेब' म्हणू नका हो...! दुसरं म्हणजे, निसर्ग निरिक्षणाच्या खूप जुन्या छंदामुळे सूक्ष्म निरिक्षण ही एक सवयच होऊन बसली आहे. त्यात काय विशेष.....

५०फक्त : कुत्रा, फुलपाखरु यानंतर फ्लेमिंगो आणि इतर काही पक्षी....डिसेंबरमधे.

गवि : तत्पर प्रतिसाद आला तुमचा !

जाता जाता : लेखातले दोन्ही फोटो स्वानंदीने (माझ्या लेकीने - इ. ८वीत आहे ती) काढले आहेत.

सुधांशु

सुधांशू खुप सुंदर माहीती. ह्याच अळ्या निगडी( निर्गुडी/वनई) च्या पानांनाही चिकटलेल्या असतात ना ? ते झाड तर इतके भरलेले असते की आपण बाजूने गेले तरी एखादी अळी अंगाला चिकटते.

माझ्या माहेरी कृष्णकमळाची वेल होती. त्या कृष्णकमळालाही ह्या अळ्या पानांची जाळी करुन तिथे उदरनिर्वाह करायच्या. त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा नव्हता नाहीतर फोटो काढून ठेवला असता.

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे निर्गुडी मध्येही ती द्रव्ये असायला हवीत कारण वनईसारखीच निर्गुडीही पांढरट आणि विशिष्ट वासाची असते.

काही दिवसांपुर्वी आमच्या घराच्या परीसरात ब्राऊन कलरची फुलपाखरे फिरत होती. कदाचीत नुकतीच जन्माला आली असतील. ती आमच्या बेडरुमची खिडकी उघडी असली की बेडरुमध्ये घुसायची.

सुधांशुनूलकर's picture

23 Oct 2011 - 2:03 pm | सुधांशुनूलकर

जागुताई, मनःपूर्वक धन्यवाद.

निर्गुडी / कॄष्णकमळ यावर दिसणार्‍या अळ्या टायगर्सच्या अळ्या नसतात, दुसर्‍या जातीच्या फुलपाखराच्या / कीटकाच्या असतात.

निर्गुडीमधे दुसरं एक द्रव्य असतं, ते विषारी नसून त्यात औषधी (अँटीबायोटिक) गुणधर्म असल्यचं आढळलं आहे, यावर अधिक संशोधन सुरू आहे.

तुमच्या घराजवळ फिरणारं ब्राऊन रंगाचं फुलपाखरु आकाराने मोठं असलं तर 'कॉमन इव्हनिंग ब्राऊन' / ''कॉमन बॅरन' , किंवा आकाराने छोटं असलं तर एखादं 'स्किपर' जातीचं (पाम बॉब / चेस्टनट बॉब / कॉमन ऑल इ.) असू शकेल. फोटो काढता आला तर जरूर ओळख पटवता येईल.

सुधांशु

सुधांशूजी खुप रंगतदार माहीती.
कढीपत्त्याची पाने फस्त करून टुमटुमीत होणार्‍या हिरव्या रंगाच्या अळ्या या कोणत्या किटकाच्या/फुलपाखराच्या असतात?

भारतात तरी कढीपत्त्यावर वाढणारे सुरवंट म्हणजे सर्वात जास्त शक्यता कॉमन मॉरमॉन :

A

विकीपीडियावरुन चित्र साभार

हिरवा सुरवंट असा दिसतो याचा:

B

पुन्हा एकदा विकीपीडियावरुन साभार.

ब्लू मॉरमॉन आणि एकूणच मॉरमॉन प्रकारची फुलपाखरं सिट्रस (लिंबू, संत्रं वगैरे गटातल्या झाडांवर त्याची पानं खाऊन) सुरवंटावस्थेत जगतात. कढीपत्ता हे थेट अशा प्रकारचं नसलं तरी त्याची फॅमिली ही सिट्रस झाडांचीच आहे.

कढीपत्त्यावर आणखी एक लाईम स्वॅलोटेल हे फुलपाखरुही अळी अवस्थेत खाऊन जगतं.

खाली त्याच्या अवस्था पहा. एकाच गटातली असल्यामुळे अळी आणि स्टेजेस मॉरमॉनसारख्याच.

C

सर्व चित्रं विकीपीडिया. फुकट चित्रं आणखी कुठे मिळणार.. ? ;-)

नूलकरसरांचा धागा हायजॅक केल्याबद्दल सॉरी.. :(

सुधांशुनूलकर's picture

3 Feb 2016 - 4:30 pm | सुधांशुनूलकर

तुम्ही धागा हायजॅक वगैरे केला नाही. अशा आदान-प्रदानात्मक प्रतिसादांमुळेच तर लेखाची मजा वाढते.

कॉमन मॉरमॉन नर आणि जोडी : 'फुकट' फोटो (मीच काढलेले)

कॉमन मॉर्मॉन नर कॉमन मॉर्मॉनची 'जोडी नं. १'

मयुरMK's picture

3 Feb 2016 - 11:46 am | मयुरMK

छान माहिती दिली आहे
:)

कविता१९७८'s picture

3 Feb 2016 - 12:49 pm | कविता१९७८

मस्त माहीती, छान लेख

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Feb 2016 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

नूलकरसाहेब, तुमच्या निसर्गप्रेमाला आणि बारीक निरिक्षणांना सलाम !

तुमचे अनुभव व ज्ञान इथे असेच आमच्याबरोबर वाटून घेत जा. खूपच रोचक आहे हे सगळे !

भ ट क्या खे ड वा ला's picture

25 Jul 2017 - 12:27 pm | भ ट क्या खे ड वा ला

नूलकरसाहेब, तुमच्या निसर्गप्रेमाला आणि बारीक निरिक्षणांना सलाम !

तुमचे अनुभव व ज्ञान इथे असेच आमच्याबरोबर वाटून घेत जा. खूपच रोचक आहे हे सगळे !