सणांचे नैवेद्य आणि फराळ ३) गोकुळ अष्टमी - तांदळाचे/कुरमुर्‍याचे/कुटयाचे लाडू

जागु's picture
जागु in पाककृती
23 Aug 2011 - 3:55 pm

गोकुळ अष्ट्मिला हे लाडू नैवेद्य म्हणून दाखवण्याची प्रथा आहे.

तांदूळ
गुळ
वेलची, जायफळ पुड
ड्राय फ्रुट्स आवडीनुसार
तुप
मिठ
थोड सुक खोबर किसुन भाजुन

डिटेल प्रमाण पाककृतीत देत आहे.

पाककृती:
साधारण १ किलो किंवा आपल्या गरजेनुसार तांदुळ घेउन ते रात्री धुवुन पाणी व थोडे मिठ घालुन भिजत घाला.

सकाळी हे तांदुळ निथळवा.

आता लगेच निथळवलेले तांदुळ भांड्यात मिडीयम गॅसवर खरपुस तांबुस रंग येईपर्यंत परतवा. करपु देउ नका.

तांदुळ जर जास्त प्रमाणात असतील तर गिरणीत चरट दळून आणा. जर कमी असतील तर मिक्सरमध्येच पिठ करा. मिक्सरमध्ये एकदम पिठ होत नाही जरा रवाळच राहत.

आता थोडे पिठ बाजुला काढुन ठेवा. हे चहात टाकुन किंवा दुधात साखर घालुन फुगवुन खायला छान लागत. लहान मुलांना फेव्हरेट व पौष्टिक होउन जात. त्याचा खमंग वासच एक प्रकारची चव आणते.

आता हवे तेवढ हे पिठ एका भांड्यात घ्या.

जेवढ पिठ घेतल असेल त्याच्या अर्धा गुळ सुरीने बारीक चिरुन घ्या. सुक खोबर कुस्करुन घ्या. थोडी वेलची व जायफळ पुड घ्या. पिठाच्या पाव पट तुप वितळवुन घ्या.

आता सगळे जिन्नस एकत्र करुन गुळाच्या गुठळ्या हातावर मोडा. (हेच मिश्रण मोठ्या खलबत्यात कुटून कुटुनही केले जाते. त्याची एक वेगळीच चव येते.)

सगळे मिश्रण व्यवस्थित मिक्स करुन लाडू वळायला घ्या. जर लाडू वळायला त्रास होत असेल तर अजुन थोडे तुप मिसळा व लाडू वळा.

तयार आहेत खमंग कुरमुर्‍याचे उर्फ कुट्याचे उर्फ तांदळाचे लाडू.

अधिक टिपा:
पुर्वी हे लाडूचे मिश्रण खलबत्त्यात कुटून कुटुन केले जात म्हणून त्याला कुट्याचे लाडू म्हणत.
ओले तांदूळ भाजुन घेतल्यावर ते मस्त कुडकुडीत होतात. तेच नुसते खाल्ले जातात.
पिठी साखर घालुनही हे करता येतात.
वर उल्लेख केल्याप्रमाणे ह्या लाडूचे पिठ चहात व दुधात साखर घालुन खातात. दोन चमचे एका कपात पण खुप होतात. लगेच पिठ फुगुन येत.

प्रतिक्रिया

विशाखा राऊत's picture

23 Aug 2011 - 5:12 pm | विशाखा राऊत

मस्त वाटत आहे.. करुन बघावे लागेल :)

स्पंदना's picture

23 Aug 2011 - 5:23 pm | स्पंदना

जागु तुझे मोदक पाहुनच तुला सलाम ठोकला गेला आहे.
काय ती एक एक पाकळी जणु मोगर्‍याची उमलणारी कळी. अन आता हे लाडु!! सोप्पे वाटताहेत. थोडे करुन पाहेन.

वा वा. हेच तंबिटाचे लाडू का?

तेही तांदळाच्या पिठाचे असतात वाटते.

पण ते भरड नसतात. बारीक पीठ असते. हे तू इथे दिलेले जास्त छान होत असावेत.

इरसाल's picture

23 Aug 2011 - 5:39 pm | इरसाल

मस्तच.रवाळपणा जिभेवर रेंगाळायला लागला.तुरंत ...अत्यंत.

कदी हाटील बिटील टाकायचा इचार हाय काय. पार्टनरशिप करू म्हन्तो.
आमचे येथे शाकाहारी आणि शुद्ध मांसाहारी तसेच माश्यांचे विविध पदार्थ मिळतील
II "तै" "गुजा" किचन्स II

पल्लवी's picture

23 Aug 2011 - 5:59 pm | पल्लवी

>>मस्तच.रवाळपणा जिभेवर रेंगाळायला लागला.
स्स्स्स्स्स्स्स्स्प्प्प्प्प्प्प्प्प्प्प.

>>पार्टनरशिप करू म्हन्तो
मलाबी घेनान का ? म्हण्जे मी पदार्थ छान, की खुप छान, की खुप खुप खुप छान झालाय ते सांगेन की चव घेउन. टेष्टर म्हून घ्या..

इरसाल's picture

23 Aug 2011 - 9:33 pm | इरसाल

किती पर्शेंट घेनार ? कि फकस्त खान्यावर भागून जैल ?

पल्लवी's picture

24 Aug 2011 - 8:49 am | पल्लवी

..तुमी जे खुशीनी द्यान ते घीन, वांदा नाय. पन माज्या कामात काम्प्रमायस आन ढ्वळाढवळ नाय पायजेन हा. मी 'नीट' टेष्ट करनार सगळं माजी खात्री हुईपरेंत आन मंग काय उरलंच तर करा त्याचा बिजनस तुमी मोठी मानसं. कसं म्हनता ? डील फाय्नल मंग ?

यो बबो!!!!
हे म्हंजी असा झाला पघा, घरचं झालं थोड याह्यानं धाडलं घोडं.
असा बिज्णेस कसा हुईल ?

आता तोंड गोड झाले. एखादी झटका मासा पाकृ अपेक्षित..

रेवती's picture

23 Aug 2011 - 6:07 pm | रेवती

पहिल्यांदाच हे लाडू बघतिये.
अगदी वेगळी पाकृ!
@गवि, तंबिटाचे लाडू देते आहे, जरा थांबा.
कृती साधारण अशीच असते पण थोडे थोडे फरक आहेत.

अरे वा.. वेगळीच पाकृ.. माहित नव्हती हि पाकृ ... धन्स जागु ताई.. :)

रेसिपी आवडल्या गेली आहे.

स्वैर परी's picture

23 Aug 2011 - 6:52 pm | स्वैर परी

हे लाडू माझे फेवरेट आहेत! आई करते घरी! १ दिवसात संपतात! ;)

गणपा's picture

23 Aug 2011 - 7:02 pm | गणपा

या तांदळांच्या लाडवां बद्दल पहिल्यांदाच एकतोय/ पहातोय.

कोण करुन खायला घालणार असेल तर ठीक.
अन्यथा इतके कष्ट उपसायची तयारी नाही.

सानिकास्वप्निल's picture

23 Aug 2011 - 7:37 pm | सानिकास्वप्निल

वेगळेच लाडू...मी ही कधी ऐकले नाही याआधी.... पण छान दिसत आहेत , पाकृ पण सोप्पी दिसत आहे....करून बघायला हवेत एकदा :)

जाई.'s picture

23 Aug 2011 - 10:54 pm | जाई.

सोपी रेसिपी
तोंडाला पाणी सुटले

मस्त वाटताहेत. ओह माय गॉड .... खूप छान वाटताहेत :(
व्हॉट अ टॉर्चर!!!

प्राजु's picture

24 Aug 2011 - 6:00 am | प्राजु

वाह!! काय सॉल्लीड फोटू!
पहिल्यांदाच पहाते आहे अशाप्रकारचे लाडू!

उदय के'सागर's picture

24 Aug 2011 - 10:21 am | उदय के'सागर

तांद्ळाचे पदार्थ माझा विक पोंइंट, त्यात नविन काय करता येइल हे मि नेहमिच शोधत असतो. हि पाककृती तर खुपच नविन अणि विशेष म्हणजे तांद्ळाचि स्विट डिश मधे मोडणारी, खुपच मनापासुन धन्यवाद :)

सविता००१'s picture

24 Aug 2011 - 11:02 am | सविता००१

मी पण पहिल्यांदाच पाहिले हे लाडू. नक्की करणार. आणि तुमचे भाजलेले तांदूळ पण मस्तच दिसतायत......एकदम नाजूक.

स्वाती दिनेश's picture

24 Aug 2011 - 11:47 am | स्वाती दिनेश

छानच दिसत आहेत ग लाडू.. वेगळेच आहेत, मी पहिल्यांदाच ऐकले, पाहिले हे लाडू..
स्वाती

जागु's picture

24 Aug 2011 - 12:30 pm | जागु

सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद.

ईरसाल हॉटेलचे नाव भारी आहे. शिवाय श्लोगनही.

इरसाल's picture

28 Aug 2011 - 11:41 am | इरसाल

मग डील पक्की का जागुताई ?
पल्लविजी पण बसल्यात डील ची वाट पाहत.(फ्रेशली प्रीपेर्ड हायजेनिक वेज/नोन्वेज/सी फूड कालीटी/कांटीटी टेस्टिंग कंट्री म्यानेजर) हूशश्श्श हि पोस्ट चालल ना ?
बिज्णेस डील बनवू काय ?

दिपाली पाटिल's picture

24 Aug 2011 - 10:38 pm | दिपाली पाटिल

मस्त पाकृ , मी खाल्लेयत हे लाडू, छान लागतात, या पीठाला कोकणात पोह्यांचं पीठ म्हणतात कां?

नक्की बनवून बघेन... पण ते तांदळाचं पीठ अंदाजे बारिक रव्यासारखं हवं की अजून बारिक हवं?

दिपाली नाही ग अजुन बारीक हव होत. माझ्या मिक्सरच्या ब्लेडची धार कमी झाल्याने ते निट बारीक झाले नाही.