साहित्य- बेसन पिठ एक वाटी, हि. मिरच्या पाच-सहा, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य,
मिठ.कांदा एक बारीक चिरुन, जिरे - लसुण पाच सहा पाकळ्या- खोबरे एक छोटा तुकडा.थोडे लाल तिखट.
कॄती - जिरे - लसुण पाच सहा पाकळ्या- खोबरे एक छोटा तुकडा व मिरची हे सर्व मिक्सरमधुन वाटून घ्यावे.
खमंग फोडणी करावी.त्यावर वरील वाटण परतुन घ्यावे, कांदा परतावा, आता त्यात दोन वाट्या पाणी घालावे, चवीनुसार मिठ घालावे, कोथिंबीर बारीक चिरुन घालावी. चांगले उकळू द्यावे, तोपर्यंत बेसन पिठ कालवुन घ्यावे, त्यात थोडे लाल तिखट घालावेवगुठळी होवु देवु नये, हे कालवलेले पिठ आधणात घालावे, चांगले ढवळावे , चट चट आवाज येवु लागला की झाले असे समजावे, गरम गरम पिठले, त्यात साजुक तुप घालून भाकरी अथवा पोळीबरोबर (चपाती) खावे, जोडिला कच्चा कांदा घ्यावा, लसूण चटणी असेल तर झकासच.(मिरच्या आपल्याला हव्या असतिल तेवढ्याच घ्याव्यात.)
प्रतिक्रिया
8 Aug 2011 - 8:57 am | चिंतामणी
पण फटुचे काय??
8 Aug 2011 - 9:21 am | सहज
पुढील फर्माईशी
१) फडकता मसाला चहा
२) गरम मसाला दूध
३) उकडलेले अंडे चटकदार तिखट, मिरपूड पेरुन
४) उकडलेले बटाटे चटकदार तिखट, मिरपूड पेरुन (जे अंडे खात नाहीत त्यांच्याकरता. शक्यतो पाकृ ३ व ४ एकत्र नको म्हणजे श्रावण महिन्यात तरी निदान)
५) दही चमचमीत
8 Aug 2011 - 11:53 am | सुनील
६) उकळून थंड केलेले पाणी (पावसाळ्यात बरे असते!)
8 Aug 2011 - 4:14 pm | नितिन थत्ते
उकळून थंड केलेल्या पाण्याची पाकृ फोटोशिवाय टाकू नये.
डिट्टेलवार लिहावी. पण आता पावसाळा संपत आला आहे म्हणून फुडल्यावर्षी लिहावी.
8 Aug 2011 - 11:47 am | इरसाल
तव्या वरील पिठले कि कढइतले आहे.
बाकी पिठले-भात हि छान लागतो हं. अडीनडीला कामास येणारी डीश म्हणून. सोबत कांदा असला म्हणजे झाले.
8 Aug 2011 - 3:36 pm | कच्ची कैरी
फोटो असता तर मजा आली असती पण फोटो नाहीये :(
9 Aug 2011 - 10:55 am | इरसाल
हे चालल का बगा ?
9 Aug 2011 - 7:14 pm | निवेदिता-ताई
चालतय का काय?? पळतय.............धन्यवाद.
9 Aug 2011 - 7:47 pm | वेताळ
मंदीच्या काळात हीच खायची चैन परवडु शकेल.धन्यवाद ग ताई. आता भाकरी व कांदा चिरायची पाकृ तेव्हढी टाक.