बॅचलर्स थाळी ...

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
2 Aug 2011 - 4:35 pm

बॅचलर्स थाळी ...

(मुद्दाम हे नाव दिले कारण यातील रेसेपी इतक्या सोप्प्या अन कमी साहित्य वापरून केल्या आहेत कि कुणीही (ज्यांना स्वयपाक येत नाही,अथवा कन्टाळा आहे ) बॅचलर्स/कामानिमित्त /शिक्षणानिमित्त बाहेर राहणारे लोक्स हि अगदी सहज बनवू शकतील,आणि या थाळीचा आस्वाद घेऊ शकतील )
शेवई खीर :
साहित्य ";- काश्मिरी शेवईचे पाकीट ,काजू - बदामाचे काप ३ चमचे ,मनुके ,हिरवी इलायची पूड छोटा अर्धा चमचा , दुध १ लिटर ,तूप २ चमचे ,साखर २ वाट्या ( तुमच्या आवडीप्रमाणे ),केसर (आवडीनुसार )
कृती : शेवया तुपात हलक्या भाजून घ्याव्यात . पातेल्यात तूप घालून गरम करावे त्यात इलायची पावडर घालावी
आता मनुके काजू बदाम काप घालावे ,मनुके फुलून टम्म झाले कि उकळलेले दुध घालून ढवळावे साखर घालावी
शेवया घालाव्यात ,किंचित दुध आटू द्यावं ,केसर घालावं गरम गरम खीर तय्यार !

खारी पुरी : १/२ किलो गव्हाच पीठ ,जीर १ चमचा ,लाल तिखट १ चमचा ,मीठ चवीनुसार ,१ चमचा बडीशेप
कृती : पिठात सर्व साहित्य घालून २ चमचे गरम तेलाचे मोहन घालून नेहमीसारखी कणिक भिजवावी
पुर्या लाटाव्यात आणि तळाव्यात.

शेंगदाणा चटणी : शेंगदाण्याचे कुट१ वाटी, लाल तिखट १/२ चमचा, मीठ चवीनुसार., १ चमचा साखर बस्स ..
कृती : तव्यावर २ चमचे तेल गरम करा त्यात लाल तिखट अन मीठ घालून हलवा ,जाळू देऊ नका, आणि लगेच शेंगदाण्याच कुट घाला छान मिक्स करा ,आता साखर घाला हि कुरकुरी चटणी बनवायला अगदी सोप्पी अन खायला एकदम टेस्टी !

मटकीची उसळ ;- १ वाटी मटकी , १ कांदा चिरलेला , १ टोमॅटो चिरलेला ,३-४ हिरव्या मिरच्याचे तुकडे,मीठ, हळद ,कोथिंबीर
कृती : मटकी थोडी पाचेक मिनिट पाणी घालून उकळून घ्यावी ,तेलात कांदा परतून ,हिरव्या मिरचीचे काप घालून परतावं ,टोमॅटो घालावा , हळद अन मीठ घालावे , मिश्रण एकजीव झाले कि मटकी घालावी छान परतून घ्यावी वरून कोथिंबीर घालावी


प्रतिक्रिया

इंटरनेटस्नेही's picture

2 Aug 2011 - 4:40 pm | इंटरनेटस्नेही

छान छान! क्या बात है!
(फक्त लोणचं दिसत नाही ते कुठे!)

आत्मशून्य's picture

3 Aug 2011 - 2:47 pm | आत्मशून्य

.

-"My Life is my Mess." - इंट्या.

इंटरनेटस्नेही's picture

5 Aug 2011 - 2:57 am | इंटरनेटस्नेही

"My Life is my Message." - Mahatama Gandhi.

"My Life is my Mess." - इंट्या.

=)) चान चान.. याला म्हनतात क्रिएतीव्हीती..

पंगा's picture

5 Aug 2011 - 2:59 am | पंगा

"My Life is my Message." - Mahatama Gandhi.

"महातमा" गांधी???

पंगा's picture

5 Aug 2011 - 3:05 am | पंगा

वास्तविक, "'My Life is a Mess.' - इंट्या." एवढे पुरले असते. परंतु, "'My Life is my Mess.' - इंट्या." असे म्हटल्याने याला एक निराळाच आयाम प्राप्त झाला आहे.

म्हणजे, "माझे आयुष्य हा एक घोळ आहे" एवढेच म्हणणे नसून, "माझे आयुष्य हा मी घडवून आणलेला घोळ आहे" असे सदरमजकुरांचे ठाम प्रतिपादन असावे काय?

आत्मशून्य's picture

5 Aug 2011 - 3:11 am | आत्मशून्य

आता ते ईंट्या अथवा "महातमा" गांधीच जाणोत.....

इंटरनेटस्नेही's picture

5 Aug 2011 - 3:35 am | इंटरनेटस्नेही

@आशु..

म्हणजे, "माझे आयुष्य हा एक घोळ आहे" एवढेच म्हणणे नसून, "माझे आयुष्य हा मी घडवून आणलेला घोळ आहे" असे सदरमजकुरांचे ठाम प्रतिपादन असावे काय?

उत्तर द्या आत्मशुन्य साहेब, उत्तर द्या.. जनता तुम्हाला प्रश्न विचारतेय.. :P
-
इंट्या वागळे.

@पंगा..

तुम्ही व्याकरणशास्त्रीयदृष्ट्या केलेली चिरफाड आवडली असली तरी आम्ही सध्या निरुत्तर झाल्याने मी तुम्हाला "चिल!" एवढेच सांगु शकतो! :D

इरसाल's picture

2 Aug 2011 - 4:42 pm | इरसाल

सहीईईईईइ,
पण आता आम्ही ब्याच्लर नाय ऱ्हायलो.

मग बायकोला मदतीला घेउन बनवा...आंणी आम्हालाही बोलवा...

बेत झकास आहे!!!!!

ब्याच्लर पण नको देवा,
कपडे, भांडी धुण्यासाठी आठवडा लागतोया.

त्याचं असं आहे सकाळी चहा बनवावा आणि पिवून झाल्यावर त्या पातेल्यावर झाकण ठेवून ऑफिस ला जावे संध्याकाळी येवून झाकण उचलून पाणी दुध, साखर, चहा पावडर टाकून चहा करायचा पुन्हा झाकण ठेवावे. दुसऱ्या सकाळी/संध्याकाळी वरचे सगळे रिपीट करावे. शनिवारी निवांतपणे तारेची जाळी घेवून किमान अर्धा तास रगडावे व ताजा चहा बनवून प्यावे.
कुकर आणि भाजीच्या पातेल्याला हा नियम लावू नये. म्यागीसाठी तेच पातेले* चालू शकते. (* कंडीशन एप्ल्लाय )

अवांतर: निवेदिता ताईचे बोलणे मनावर घेतले आहे लवकरच फोटो टाकण्याचा प्रयत्न करीन.
ताई कधी येताय मग घरी ?

बॅचलरनी ह्ये बनवायचं.... मग सुग्रणीनी काय करायचं?

निवेदिता-ताई's picture

2 Aug 2011 - 6:07 pm | निवेदिता-ताई

कस झाल आहे हे पहायच..
(का आमाला कामाला लावताय, आयत खाण्याचा योग जुळुन येतोय)

स्मिता.'s picture

2 Aug 2011 - 5:43 pm | स्मिता.

थाळी छानच!! लगेच जेवायला सुरूवात कराविशी वाटतेय फटु बघून.

काय गं, त्यात भात आणि बटाट्याची भाजी दिसतेय पण त्यांची पाकृ दिसत नाहीये.

वपाडाव's picture

2 Aug 2011 - 6:26 pm | वपाडाव

..........पियुशाच्या थाळीतील भात...........

कुकरच्या डब्यात उरलेला शिळा भात घ्या....
त्यात चवीपुरते मीठ घाला...
हवी असल्यास हळद घाला...(चिमुटभर, रंग अन स्वाद येण्यासाठी)....
आता त्यात दोन लहान चमचे तिखट (कश्मीरी / कुंटी लाल / घरचे उत्तम) घाला...
भात हलकेच कालवुन घ्या....
ज्यांना हिरव्या मिरच्यांची फोडणी आवडत असेल त्यांनी हे न करता ५-६ हिरव्या मिरच्यांचे तुकडे करुन ठेवा...
एक जर्मनचे पातेले धुवुन मंद आचेवर ठेवा....
भाण्डे गरम झाले की त्यात अर्धी वाटी शेंगदाणे घाला...
शेंगदाणे चटके लागुन काळे होइतोवर भाजुन घ्या...
भांडे रिकामे करुन एक-दीड चमचा तेल घालुन पुन्हा गॅसवर ठेवा....
तेल तापले आहे (पाण्याचा एक थेंब शिंतोडा मारुन चाचणी करता येते) असे वाटल्यास त्यात मोहरी (राइ), कडीपत्ता, जिरे अन २ बारीक कापलेले कांदे घाला... (मंडळींनी आता हिरव्या मिरच्या फोडणीत टाकाव्यात)
कांदा चांगला खमंग, खरपुस लाल होइतोवर परतुन घ्या...
मग त्या पातेल्यात, डब्यात कालवलेला भात घाला...
हे मिश्रण काही वेळ असेच तापु द्यावे...
हा झाला पियुशाच्या ताटातला भात तयार....

बटाट्याच्या भाजीची पाकृ लिहिण्यास टंचणिका मागौली आहे...
ती आल्या आल्या पाकृ पाडल्या जाईल...

स्मिता.'s picture

3 Aug 2011 - 2:55 am | स्मिता.

हे आस्सं डिट्टेलवार असलं की आपल्याला पाकृ नीट कळते.

जर्मनचे पातेले न वापरता हा भात करता येईल का?? तसेच काळे होइतोवर भाजुन घेतलेल्या शेंगदाण्याचा पाकृत काही उपयोग केलेला दिसत नाही. ते बटाट्याच्या भाजीकरता असल्यास हरकत नाही.

अहो, ते शेंगादाणे का़ळे झाले कि काय करणार गेले ना वाया, तेच तर मी खाली लिहिलंय या बॅचलरांना शेंगादाणे भाजले म्हंजे काय ते क्ळत नाही अन तेलाचे मोहन कळणार आहे का

अवांतर - वपाडावला पियुषाच्या भाताची पाक्र कशी काय माहित डिटेल मध्ये, बॅचलर कट्टा केला का काय सुमडीमध्ये ?

स्मिता.'s picture

3 Aug 2011 - 1:52 pm | स्मिता.

अरेरे... म्हणजे अर्धी वाटी शेंगदाणे असेच वाया जाणार??? काय माज आलाय राव लोकांना ;)
बाकी बॅचलरांना तेलाचे मोहन कळणार नाही याच्याशी सहमत!

परिकथेतील राजकुमार's picture

3 Aug 2011 - 1:56 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी बॅचलरांना तेलाचे मोहन कळणार नाही याच्याशी सहमत!

ज्यांना 'मीरा का मोहन' कळतो त्यांना 'तेल का मोहन' कळणार नाही ?

स्मिता.'s picture

3 Aug 2011 - 7:43 pm | स्मिता.

ज्यांना 'मीरा का मोहन' कळतो त्यांना 'तेल का मोहन' कळणार नाही ?

हा हा हा... फुटले!

बॅचलर पार्टी देणार असशील तर बोल.. आता येतो.. ;)

- (बॅचलर) पिंगू

कन्दा लिम्बु दिसत नाहि ते ?

अन्या दातार's picture

2 Aug 2011 - 7:22 pm | अन्या दातार

ही बॅचलर्स थाळी आहे. इथे कशाला हवं कांदा आणि लिंबू?? ;)

थाळीवरुन, थाळी करणा-यावरुन आणि थाळी स्वच्छ करणा-या बॅचलरवरुन उतरुन टाकायला.

मृत्युन्जय's picture

5 Aug 2011 - 1:04 pm | मृत्युन्जय

आयला बॅचलर लोकांनी कांदा खाउन नये की काय? ;)

५० फक्त's picture

5 Aug 2011 - 1:12 pm | ५० फक्त

करणार काय कांदा खाउन नसतं वांदे,

स्वतःच्या हाताने करुन खाणारे बॅचलर लोक 'वन पॉट मिल' च्या रेसिप्या शोधत असतात...थाळ्या कसल्या देताय !!

प्रभो's picture

2 Aug 2011 - 9:07 pm | प्रभो

ह्येच म्हणतो.

पियुशा's picture

3 Aug 2011 - 10:50 am | पियुशा

@शाहरुख
'वन पॉट मिल' खानेवाले, क्या जाने खुद अपने हातोसे बनी थाली का स्वाद ;)

''मुद्दाम हे नाव दिले कारण यातील रेसेपी इतक्या सोप्प्या अन कमी साहित्य वापरून केल्या आहेत कि कुणीही (ज्यांना स्वयपाक येत नाही,अथवा कन्टाळा आहे ) बॅचलर्स/कामानिमित्त /शिक्षणानिमित्त बाहेर राहणारे लोक्स हि अगदी सहज बनवू शकतील,आणि या थाळीचा आस्वाद घेऊ शकतील )''

मिपावरीला माननीय व तथाकथित एलिजिबल व तथाकथित बॅचलरांना फसवण्याचे दुष्ट प्रयोजन स्पष्ट दिसत आहे.

मा. पियुषा आजे, या पाक्रु जर कमी साहित्य वापरुन व सोप्प्या असतील तर मग अंडा ऑम्लेट, अंडा बॉईल, अंडा हाफ फ्राय, टोस्ट, सॅंडविच् , दुध गु़ळ पोहे, मॅगी, हे पदार्थ तर निगेटिव्ह साहित्यात तयार होतात असे म्हणावे लागेल. आणि हे एवढं करायला किमान एका रुखवतात असतात तेवढी तरी भांडी लागतील, पुन्हा ती स्वच्छ करावी लागतील ते वेगळंच.

''खारी पुरी : १/२ गव्हाच पीठ ,जीर १ चमचा ,लाल तिखट १ चमचा ,मीठ चवीनुसार ,१ चमचा बडीशेप'' - आयला काय मायक्रोस्कोपखाली बनवायच्या का काय पु-या. आणि जरी ते अर्धी वाटी गव्हाचे पिठ असेल तर मग जिरे, बडीशेप आणि तिखटाचे प्रमाण गंडलेलं आहे, अर्धी वाटी कणकेत एक चमचा जिरं आणि १ चमचा बडीशेप घातल्यावर कणिक म़ळता येईला का, आता आमच्या कडची वाटीच २ किलोची आहे असं म्हणु नका.

''२ चमचे गरम तेलाचे मोहन '' इथल्या काय कुठल्याहि किती बॅचलरना तेलाचे मोहन याचा अर्थ कळतो सांगा बरं, बॅचलर सोडा किती बायकांना नक्की कळतो याची खात्रि देता येत नाही.

''मटकीची उसळ ;- १ वाटी मटकी (कच्ची का मोड आणलेली ?) , १ कांदा चिरलेला , १ टोमॅटो चिरलेला ,३-४ हिरव्या मिरच्याचे तुकडे,मीठ, हळद ,कोथिंबीर
कृती : मटकी थोडी पाचेक मिनिट गरम घालून उकळून घ्यावी , '' - गरम काय घालायचं व्हिस्की का बिअर का वाईन का सोलकढी का असो.. .... अरे गरम स्वेटर काय म्हणतो रे, कोण आहे रे तिकडे व*.* का स*.*

शुद्धलेखनाबद्दल तर प्रश्न विचारणं सोडाच्,पण शब्द मागं पुढं झाल्यानं जे अर्थ बदलतात त्याकडं लक्ष द्या की जरा.

उदाहरण ''त्यात लाल तिखट अन मीठ घालून हलवा जाळू देऊ नका,'' चटणी मध्ये हलवा कुठुन जाळता मध्येच.

या अतिशय मुर्ख शंका विचारतोय तुम्ही अगदि स्पेशल बॅचलर थाळी म्हणताय म्हणुन, रागावलात तर रागवा पण चांगलं काहीतरि टाका, तुमच्या पाक कौशल्याबद्दल शंका नाही पण किमान फोटो तरी चांगले काढा की. (किसनने काढलेला 'स्वाद' थाळीचा फोटो 'स्वाद' वाल्यांनि मागितला आहे म्हणे, जाहिरातित टाकायला)

असो, पुन्हा एकदा अवांतर आणि आगाउ वाटेल पण पाक्रु या विभागात येणा-या पाक्रुना एक किमान दर्जा असावा, काहि विशिष्ट किंवा वेगळ्या पद्धतीनं केलेल्या नेहमीचे पदार्थ (उदा. मेदुवडे बाय गुरुवर्य गणपा) किंवा वेगळे पदार्थ द्यावेत असं माझं स्पष्ट मत आहे. वरची मटकीची उसळ ही गॅस्/चुल्/स्टोव्ह/ कोळसा / मायक्रोव्हेव/ साधा ओवन इ. व अनेक पर्याय न वापरता शिजवुन दाखवणार असाल तर टाका इथं. अगदी ते यु ट्युबला व्हिडो असतात ना मक्याचे दाणे चार मोबाईल मध्ये ठेवुन भाजल्यासारखं तसं करा आणि टाका तर ठिक आहे.

प्रचेतस's picture

3 Aug 2011 - 9:20 am | प्रचेतस

अजून एक राह्यलच,
ते काश्मिरी शेवई म्हणजे काय? काश्मिरात जाउन आणायचं की काय ते? इथे काश्मिरी शेवई मिळते का?

अवांतरः गणपा, सास्वकडे क्लास लावाच आता.

पियुशा's picture

3 Aug 2011 - 10:44 am | पियुशा

@ वल्ली , ५० फक्त
माझ्याकडे डी़जिटल क्यमेरा नाहिये मी माझ्या मोबाइलवरुन फोटो काडते हे आधिच बर्याच वेळा सान्गितले आहे
असो.
गणपा, सास्वकडे क्लास लावाच आता.
गनपा दुबैत असतो,अन सानिका ताइ लन्ड्नला ,खर्च कोन आपण करणार का जान्यायेन्याचा ;)
(ह.घे.)

प्रचेतस's picture

3 Aug 2011 - 10:49 am | प्रचेतस

अहो पियुशातै,
आजकाल बरेच क्लासेस ऑनलाइन चालतात की, शिवाय कॉरसपॉन्ड्न्स का काय ते (correspondence ) पण लावता येईल.
त्यामुळे दुबै वा लंडनला जायची जरूर नाही.

वल्ली मला ताई म्हनु नका मी फार लहान आहे तुमच्यापेक्शा :)
नवशिके आहोत आम्ही ,त्यान्च्याइतक छान जमायला थोडा वेळ लागेलच ना ;)
" एक दिन जरुर (जल्दि) आयेगा जब आप और्र ५० फक्त बोलेन्गे, " वाह पियु वाह "
क्या डिश है क्या प्रेझेन्टेशन है ,और लिखा भी बिना गलती किये " :)
असो. आता काही प्रती देत नाहि, नाही तर माझ्या प्रती ने टी आर ,पी. वाडायचा रेसेपीचा ;)

विजुभाऊ's picture

3 Aug 2011 - 2:08 pm | विजुभाऊ

वल्ली मला ताई म्हनु नका मी फार लहान आहे तुमच्यापेक्शा
ऑन्टी मत कहो ना......( पाय आपटून) हुं

विजुभाऊ's picture

3 Aug 2011 - 2:12 pm | विजुभाऊ

वल्ली मला ताई म्हनु नका मी फार लहान आहे तुमच्यापेक्शा
ऑन्टी मत कहो ना......( पाय आपटून) हुं

आत्मशून्य's picture

3 Aug 2011 - 2:51 pm | आत्मशून्य


वल्ली मला ताई म्हनु नका मी फार लहान आहे तुमच्यापेक्शा


मान आणी अपमान एकाच वाक्यात ? जबरा... पिऊशा रो़क्स.

मनराव's picture

3 Aug 2011 - 10:22 am | मनराव

एक इतिहास जमा बॅचलर चिडला.......... ;)

अवा-अंतर...... : दिलेल्या पाकृ मधे फक्त 'भात अणि वरण' कमी आहे......... ते अ‍ॅड केलं की "बॅचलर्स थाळी", राईस प्लेट मधे कन्व्हर्ट होईल.........

पियुशा's picture

3 Aug 2011 - 10:36 am | पियुशा

५० फक्त १/२ किलो गव्हाचे लिहायचे राहुन गेले होते ,चुक दुरुस्त केली आहे :)
मट्की ;- मोड आलेल्या मठलाच मट्की म्हण्तात माझ्या माहितीनुसार
आनी तुम्ही बॅचलरन लोकाना वेडे समजता असे एकुन वाट्तेय मला ;)
लहाणपासुन कधी स्वयपाकघर ,आइने ,आज्जिने बनवलेले पदार्थ बहुधा बॅचलर लोक पाहत नाही किन्वा त्याबातित ते पुर्ण अडाणी असतिल असे का बरे वाट्तय तुम्हाला :)

मट्की ;- मोड आलेल्या मठलाच मट्की म्हण्तात माझ्या माहितीनुसार

नाही हो. मटकी हो मुगासारखंच कडधान्य असतं. शाळेच्या दिवसांमध्ये मी माझ्या हाताने शेतात मटकी पेरलेली आहे...

बादवे तुम्ही म्हणताय ते "मठ" काय असतं ?

पंगा's picture

7 Aug 2011 - 8:46 am | पंगा

बादवे तुम्ही म्हणताय ते "मठ" काय असतं ?

...'दालमोठ'मधले 'मोठ' असावे काय?

(म्हणजे बायेनीचान्स मटकी का?)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

7 Aug 2011 - 10:10 am | विश्वनाथ मेहेंदळे

मटकीलाच उत्तरेत मोठ / मठ म्हटले जाते.

मठ हे एक प्रकारच कडधान्य आहे , ते आम्ही कोमट पान्यात रात्री भिजु घालतो दुसर्या दिवशी सन्ध्याकाळी किन्वा तिसर्या दिवसापर्यन्त त्याला मोड येतात त्यालाच मट्की म्हण्तो आम्ही

शैलेन्द्र's picture

8 Aug 2011 - 7:41 pm | शैलेन्द्र

बरोबर आहे तुमचं... देशावर न भिजवलेल्या मटकीला मठ(मठ- मुग या प्रकारच्या धान्यांना "कठोड- कठाण"असही नाव आहे) म्हणतात., पण कोकणात, सगळ्यालाच मटकी म्हणतात..

आत्मशून्य's picture

3 Aug 2011 - 3:08 am | आत्मशून्य

पिवशे, कोंत्या हाटीलातील फटू हायेत हे ? ताटातील प्रतीबींबामधे स्पश्ट दीसतय की ही थाळी घरामधली नाही ते :) नायतर मंग तूला आज पासून हर हायनेस वगैरे बोल्वावं म्हंतो ;)

अन्या दातार's picture

3 Aug 2011 - 4:05 am | अन्या दातार

>>ताटातील प्रतीबींबामधे स्पश्ट दीसतय की ही थाळी घरामधली नाही ते
तिसरा फटू नीट बघ. गॅस शेगडीवर पडलेले डाग "स्पश्ट" दिसत आहेत. सबब थाळी जरी बाहेरुन आणली असेल तरी फटू घरातले असावेत. ;)

आत्मशून्य's picture

3 Aug 2011 - 2:31 pm | आत्मशून्य

बाहेरून आणून गरम केलयं तर ..... डॅट्स वाय इट इज ब्याच्येलर्स फूड.... हम्म्म्म

मी-सौरभ's picture

4 Aug 2011 - 8:06 pm | मी-सौरभ

एक बॅचलर बाहेरून थळी पार्सल आणोन गरम करणे शक्य नाही.

त्यापेक्षा तो हाप प्लेट चि. लॉलीपॉप अन हाप फ्राईड राईस बरोबर एक काचेची बाट्ली आणेन असा स्वाणुभव हाये ;)

अजुन चटणी, कोशिंबिरही घाल त्यात अगदी सहज बनवता येणारे प्रकार आहेत.

कच्ची कैरी's picture

3 Aug 2011 - 12:37 pm | कच्ची कैरी

पियुशा पाककलेचे प्रयोग आणि प्रयत्न चालुच ठेव विरोधकांकडे दुर्लक्ष कर.

उद्या हिला कापुन हिच्या लोणच्याचा कोण विडा उचलतंय का हो ब्याचलर जण ???...
या आठवड्याच्या शेवटपर्यंत हिचं लोणचं घालयला आहे का कुणी तयार ???...
दवंडी पेटवा... व्यन्या, खरडींतुन संदेश जागोजागी पोचवा...
इच्छुकांनी संपर्क साधा....
(इंट्या, घे रे तुला ताटात लोणचं हवं होतं ना....)

कैरी बद्द्ल कै च्या कै बोलु नकोस व.प्या.
कुणी माझ्या फेवर मध्ये बोलल तर तुला का रे जळ्जळ ;)

प्रचेतस's picture

3 Aug 2011 - 1:30 pm | प्रचेतस

पियुशा, लोणचे खूपच आंबट असले की अ‍ॅसिडीटी वाढून जळजळ होणारच ना.

वा... थाळी बघुन अगदी लगेच खावीशी वाटतीये.... :)

परिकथेतील राजकुमार's picture

3 Aug 2011 - 2:24 pm | परिकथेतील राजकुमार

त्यातले पदार्थ तेवढे आधी काढून मला द्या हो तै.

मयुरा गुप्ते's picture

4 Aug 2011 - 2:57 am | मयुरा गुप्ते

ओ ताई.. बॅचलर्स थाळी? जास्तीत जास्त नवविवाहीतांची थाळी म्हणा (ज्याना स्वयंपाकाची खुपच आवड आहे त्यांच्या साठी).

ओ मयुरा ज्यु. ताई, उगा का नवि वळणं देताय आधीच था़ळीच्या बॅचलरपणाबद्दल वाद आहे त्यात तुम्ही कर्त्याच्या बॅचलरपणाबद्दल पण शंका घेताय, ,

आणि नवविवाहितेला स्वयंपाकाची खुप आवड असणं सहज शक्य आहे, नवविवाहितांना जॉइंटली असं असण्याची शक्यता फारच कमी,

धनंजय's picture

4 Aug 2011 - 8:30 am | धनंजय

अशा सुगरण ब्याचलर-थाळीला कोणताही एलिजिबल ब्याचलर-थाळा हटकून होकार देईल.

(स्वतःकरिता नोंद : पुरी सोडून बाकीच्या पाककृती करायला हरकत नाही. पुरी खाल्ल्याचे सुख नाही तितके तळणाचे वापरलेले तेल वाया गेल्याचे दु:ख मला होते!)

कवितानागेश's picture

5 Aug 2011 - 1:33 pm | कवितानागेश

. पुरी खाल्ल्याचे सुख नाही तितके तळणाचे वापरलेले तेल वाया गेल्याचे दु:ख मला होते!)>>
त्या गरम तेलात पटकन फोडणी करुन कान्दा परतून, फ्रीझमध्ये ठेवावा. दुसर्‍या दिवशी पोहे करताना वापरावा.

ह्या कॄतीचे आचरण करण्यात येइल अशी ग्वाही देतो....

मी-सौरभ's picture

4 Aug 2011 - 8:09 pm | मी-सौरभ

तुमी आहात का 'एलिजिबल ब्याचल''?

पल्लवी's picture

4 Aug 2011 - 8:23 pm | पल्लवी

ऐक ना पियुशा...बेत भारीच आहे.
पण बॅचलर्स साठी तू खालील पाकृ दे बै..

१)प्लेन मॅगी
२)वेज मॅगी
३)वेज फ्राईड मॅगी
४)कप्पा (cuppa) मॅगी
५)नॉर सूप्स.
६)भाजके शेंगदाणे ( मधल्या वेळचे खाणे म्हणुन)
७)बोर्न्व्हिटा / हॉर्लिक्स / बूस्ट (एकच पातेले महिनाभर चालेल किवा कसे ते सांगणे मस्ट)
८)कॉर्नफ्लेक्स / ओट्स {एकच ( (७) साठी वापरलेले) पातेले महिनाभर चालेल किवा कसे ते सांगणे मस्ट}
९)उकडलेली अंडी..जमल्यास ओम्लेट्/भुर्जी सारखे जर्रा अवघड पदार्थ.
१०)डाळ / तांदूळ / भाज्या / हातात येतील ते मसाले ह्यांचा खिचडा. (ह्याची डिफीकल्टी लेवल जास्त आहे ! जाउ दे हे नकोच.)

पियुशा's picture

5 Aug 2011 - 11:10 am | पियुशा

@ पल्लवी
हो ग, पण हे सगळे १ पॉट मिल आहेत ना ?
जरा कष्ट करु देत ना बॅचलर्सना ;)
नेहमी थोड आयत देणार आहे का कोनी?
अन आतापासुन शिकले तर पुढे फायदाच होइल ना भविष्यात ;)

५० फक्त's picture

5 Aug 2011 - 11:24 am | ५० फक्त

''अन आतापासुन शिकले तर पुढे फायदाच होइल ना भविष्यात ''' एकदम बरोबर पियुषातै, फक्त हे बॅचलरसाठी म्हणताय की स्वतासाठी ?

फक्त हे बॅचलरसाठी म्हणताय की स्वतासाठी ?
@ हर्षद भाई ,मला जमतय की थोड थोड !
मी बॅचलरसाठी म्ह्नणतेय हे, उद्या लग्न झाल्यावर गरज पड्ली तर अडायला नको ;)

पियुषातै, बॅचलर लग्न झाल्यानंतर सवाष्ण (?) ;) होतात. त्यामुळे ज्या काही बॅचलर रेशिप्या इथे डकवल्या जातात, त्या लग्नानंतर तो ब्याचलर/ ती ब्याचलरीण करेल अशी अपेक्षाच का धरावी मी म्हणतो. जे काही असेल ते बॅचलर असेपर्यंत, एकदा का ब्याचलरपण संपलं की विसरा सगळं !! :D

थाळी लैच भारी असली तरी या सगळ्या प्रकारात बॅचलर हा शब्द सोडून काहीही बॅचलर नाही हे खेदाने नमूद करावेसे वाटते आहे.

बॅचलर लोक इतके पदार्थ ३ महिन्यात मिळून पण बनवत नाहीत हो. मी सलग ३ आठवडे पोहे बनवून खाल्ले आहेत. त्यानंतर माझ्या एका मैत्रीणीच्या नवर्‍याला माझी फारच दया आल्याने त्याच्या घरी एका विकांताला मला मैत्रीणीतर्फे पानभर जेवायला मिळालं. पण ३ आठवड्यांच्या पोह्यांबद्दल माझी स्वतःची काहीच तक्रार नव्हती.
तर मुद्दा हा आहे, की मुद्दलात ब्याचलर लोक स्वत:पुरतं जेवण बनवण्याबाबतीत अतिशय आळशी असतात, सबब थाळी ही हाटेलात जाऊन खायचा पदार्थ आहे, घरी बनवण्याचा नाही.

धन्यवाद!!

--असुर