एकाच इमारतीत राहत असूनही गेला जवळजवळ महिनाभर केसु आणि आमची भेट फेसबुकावर होत होती. त्यांच्या ह्यापी बड्डेच्या निमित्ताने मग शेवटी हाइड अँड सिक चॉकलेट केक करायचे ठरवले.
आता गेला महिनाभरच्या आमच्या आणि केसुंच्या लपाछपीमुळे ह्या केकचे 'हाइड अँड सिक चॉकलेट केक' असे बारसे मीच केले आहे. केकमध्ये लपलेल्या चॉकलेटची चव मध्येच जिभेवर रेंगाळते, हे कारण तर आहेच.
साहित्य-
२५० ग्राम साखर, ३०० ग्राम मैदा, २५० ग्राम लोणी/तूप, ५ अंडी
२ चहाचे चमचे बेकिंग पावडर,१ चिमूट मीठ, २ चहाचे चमचे वॅनिला अर्क, १ वाटी चॉकलेट किसून किवा बारीक तुकडे करुन
कृती-
लोणी/तूप भरपूर फेटणे,नंतर साखर घालून फेटणे,मीठ घालून फेटणे,अंडी घालून फेटणे. वॅनिला इसेन्स घालून फेटणे.
मैदा+बेकिंग पावडर+मीठ एकत्र करणे व ते घालून फेटणे.
किसलेले चॉकलेट घालून नीटपणे मिक्स करणे.
केक च्या साच्याला बटर लावून घेणे व त्यात ते मिश्रण ओतणे.
अवन प्रिहिट करणे, १८० अंश सेल्सिअस वर ३५ ते ४० मिनिटे बेक करणे.
केक तयार झाला की मोल्डमधून बाहेर काढणे व जाळीवर ठेवणे म्हणजे वाफ धरणार नाही.
ह्यापी बड्डे केसु! असं म्हणत (रंगाशेठच्या भाषेत) केक चापणे.. :)
प्रतिक्रिया
4 Jul 2011 - 11:49 am | मी ऋचा
वा वा! केक तर झक्कास दिस्तोय! करून बघायला हवा!
केसुंना हॅप्पी बड्डेच्या हार्दिक शुभेच्छा!
4 Jul 2011 - 12:12 pm | परिकथेतील राजकुमार
मस्त ग केकतै.
कशाला कशाला ? केसुंना मधुमेह आहे ;)
4 Jul 2011 - 2:41 pm | केशवसुमार
:D
5 Jul 2011 - 11:03 am | छोटा डॉन
हेच्च म्हणतो ना.
एवढी ऽऽऽऽ साखर असलेला केस केसुशेठ यांनी खायला नको होता, बड्डे आहे म्हणुन उगाच शास्त्रापुरते उगाच एखादा तुकडा खाल्ला असता तरी चालले असते ;)
बाकी नेहमीप्रमाणे उत्तम, पाकृ आणि फोटो दोन्हीही :)
- छोटा डॉन
5 Jul 2011 - 2:04 pm | धमाल मुलगा
बर्याच दिवसांत पकाकाकांची आणि केसुंची भेट कुठे झालीये? अगदी शास्त्रापुरती म्हणावी अशीदेखील.. ;)
13 Jul 2011 - 4:10 am | पंगा
केसुशेठ बड्डेला केस खातात??? तोही साखर घालून?????? (म्हणूनच 'केसु' म्हणतात वाटते...)
शास्त्राप्रमाणे केसाचे तुकडे किती लांबीचे करायचे?
4 Jul 2011 - 2:22 pm | कच्ची कैरी
व्वा !!!!! केकच नाव वाचुनच तोंडाला पाणी सुटले ,पाकृंएहमीप्रमाणेच झकास !
@केसु -वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
4 Jul 2011 - 2:27 pm | जागु
सह्हीच.
4 Jul 2011 - 2:28 pm | स्मिता.
हाइड अँड सिक चॉकलेट केक!! नावच मस्त आहे... त्यामुळे केक छान असणारच :)
4 Jul 2011 - 2:33 pm | गणपा
हे असे केक आम्ही फक्त चित्रातच पहायचे. :(
स्वाती ताईला वाढदिवसाच्या आणि केसुंना बिलेटेड बड्डेच्या खर्या खुर्या शुभेच्छा !!!
4 Jul 2011 - 2:33 pm | इरसाल
केक छानच .
एक इचारू का ? (दिनेश दिसायला म्हंजी, अस पघा मला, हे इचारायचे आहये कि, ते बघा कि गोलमटोल तर न्हाय ना ?)
4 Jul 2011 - 2:35 pm | केशवसुमार
स्वातीतै,
बाकी हाइड आणि सिक नावा मागचे कारण जब्रा.. :D
केक एकदम झेनटामॅटीक झाला होता हे वे.सां.न (लगेच संपला :( )
(आभारी)केशवसुमार
4 Jul 2011 - 2:38 pm | मी ऋचा
स्वातीताइ तुम्च्या इमारतीत एखादा फ्लॅट आहे का रिकामा? ;)
4 Jul 2011 - 3:20 pm | आत्मशून्य
:)
4 Jul 2011 - 3:24 pm | सुनील
हाइड अँड सीक मस्तच!
केसूंना शुभेच्छा!
प्लम केक (प्रकार २) कधी?
4 Jul 2011 - 8:02 pm | रेवती
केसूंना वाढदिवसाच्या खर्या शुभेच्छा!
स्वातीताई, केक मस्तच!
माझा वाढदिवस जवळ आला की कळवीनच.;)
4 Jul 2011 - 8:11 pm | धमाल मुलगा
स्वातीताई नेहमीप्रमाणे अल्टीमेट :)
पण्ण...
लोणी/तूप भरपूर फेटणे,नंतर साखर घालून फेटणे,मीठ घालून फेटणे,अंडी घालून फेटणे.
+
किसलेले चॉकलेट घालून नीटपणे मिक्स करणे.
+
साच्याला बटर लावून घेणे
=
केसूअंकलचं वर्षाभराचं डाएटिंग बोंबललं का? ;)
अवांतरः ते केसूअंकल एकदम अंमळ इटालियन माफियाचे मेंबर असल्यागत का दिसतायत? ;)
4 Jul 2011 - 8:18 pm | रेवती
केसूअंकल एकदम अंमळ इटालियन माफियाचे मेंबर असल्यागत का दिसतायत?
इथेच चुक्तोस तू धम्या!
त्यांना केक मिळाला याकडे झालं ना दुर्लक्ष!;)
दिखावेपे मत जाव| ;)
4 Jul 2011 - 8:22 pm | धमाल मुलगा
एकतर आधीच मी त्यांना घाबरतो. त्यात ते इटालियन माफियामध्ये सामिल झाले की काय ह्या भितीनं मुळातच नसलेली अकल आणखी कुठे लगावणार? ;)
च्च! पण केककडं दुर्लक्ष झालंच खरं. आता प्रायश्चित्त म्हणून क्यांपातल्या कयानीकडचे केक खावे लागतील.
4 Jul 2011 - 10:50 pm | प्राजक्ता पवार
मस्तं !
4 Jul 2011 - 11:02 pm | चतुरंग
हम्म्म्..सध्यातरी हा केक आमच्यासाठी हाईडच आहे, सीक कधी होईल माहीत नाही! :(
बाकी स्वातीतैच्या केकच्या पाकृबद्दल म्या पामराने काय बोलावे?
-केकरंग
4 Jul 2011 - 11:26 pm | श्रावण मोडक
केसुबुवा, वजन किती कमी केलं? अभिनंदन.
वाढदिवसाच्या शुभेच्छाही.
5 Jul 2011 - 12:28 pm | प्यारे१
स्वातीतैचा नेहमीप्रमाणे णिषेढ....
केसुच्या चेहर्यावरचे भाव एकंदर 'केक बघायचे (पक्षी:खायचे/चापायचे) सोडून फटुसाठी का होईना पण कॅमेराकडे बघायचा
'क्काय्य छळ आहे र्राव्व' असा असल्याचे प्रथमदर्शनी जाणवते.
5 Jul 2011 - 9:09 pm | प्रभो
केक भारी गं ताई!!!
केसुसरांना ह्याप्पी बड्डे!!
12 Jul 2011 - 9:36 pm | स्वाती दिनेश
खवय्यांनो, धन्यवाद.
स्वाती
12 Jul 2011 - 10:55 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वातीताई, कुठे वाढदिवसाची निमित्त शोधायची? मी अशीच येते, आपण केक करून खाऊ.
केसुंना वाढदिवसाच्या थोड्या उशीरानेच शुभेच्छा.
13 Jul 2011 - 8:39 am | मदनबाण
वाह... :)