मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

हाइड अँड सिक चॉकलेट केक

स्वाती दिनेश · · पाककृती
एकाच इमारतीत राहत असूनही गेला जवळजवळ महिनाभर केसु आणि आमची भेट फेसबुकावर होत होती. त्यांच्या ह्यापी बड्डेच्या निमित्ताने मग शेवटी हाइड अँड सिक चॉकलेट केक करायचे ठरवले. आता गेला महिनाभरच्या आमच्या आणि केसुंच्या लपाछपीमुळे ह्या केकचे 'हाइड अँड सिक चॉकलेट केक' असे बारसे मीच केले आहे. केकमध्ये लपलेल्या चॉकलेटची चव मध्येच जिभेवर रेंगाळते, हे कारण तर आहेच. साहित्य- २५० ग्राम साखर, ३०० ग्राम मैदा, २५० ग्राम लोणी/तूप, ५ अंडी २ चहाचे चमचे बेकिंग पावडर,१ चिमूट मीठ, २ चहाचे चमचे वॅनिला अर्क, १ वाटी चॉकलेट किसून किवा बारीक तुकडे करुन कृती- लोणी/तूप भरपूर फेटणे,नंतर साखर घालून फेटणे,मीठ घालून फेटणे,अंडी घालून फेटणे. वॅनिला इसेन्स घालून फेटणे. मैदा+बेकिंग पावडर+मीठ एकत्र करणे व ते घालून फेटणे. किसलेले चॉकलेट घालून नीटपणे मिक्स करणे. केक च्या साच्याला बटर लावून घेणे व त्यात ते मिश्रण ओतणे. अवन प्रिहिट करणे, १८० अंश सेल्सिअस वर ३५ ते ४० मिनिटे बेक करणे. केक तयार झाला की मोल्डमधून बाहेर काढणे व जाळीवर ठेवणे म्हणजे वाफ धरणार नाही. ह्यापी बड्डे केसु! असं म्हणत (रंगाशेठच्या भाषेत) केक चापणे.. :)

वाचन 7263 प्रतिक्रिया 0