स्वरालीताई, एकदोन ओळींचा धागा सुरु करायला मनाई आहे.
तुम्हाला कदाचित माहित नसल्याने असे झाले, तरी या पदार्थाबद्दल कुठे ऐकले, चव बघितली, त्यानिमित्ताने एखादी आठवण असे देवून पाकृ हवी असल्याचे शिर्षक देवू शकता. आत्ता शिर्षक वाचून "अय्या, नवीन पदार्थ!" असा जो गैरसमज होतो ते टळेल.;) बाकी हलके घ्या. मिपावर अशी मस्करी (कधी कधी कुस्करी होइपर्यंत) चालतेच.:)
या पदार्थाचे घटक पदार्थ माहित आहेत काय? जी माहिती असेल ती लिहून धागा माहिती(अ)पूर्ण कसा होइल ते बघा.
तुम्हाला 'कांद्याची भाकरी हा पदार्थ हवाय की 'कांद्याच्या चटणीची' पाकृ हविये?
एकदोन ओळींचा धागा सुरु करायला मनाई आहे.
हे मला माहीत नव्हते, खरोखर अशी काहीच कल्पना नव्हती हो.
तरी या पदार्थाबद्दल कुठे ऐकले, चव बघितली, त्यानिमित्ताने एखादी आठवण असे देवून पाकृ हवी असल्याचे शिर्षक देवू शकता.
पुढच्या वेळेस हे नक्की ध्यानात ठेवीन. ही भाकरी माझ्या नवर्याने ठाणे ला खाल्ली होती (लहान असताना), त्यांच्या बाजूला एक खानदेशी कुटुंब राहत असे, त्या काकी अशी भाकरी बनवायच्या असे त्याने सांगितले. नेट वर पण शोधली पण मीळाली नाही, म्हणून म्हटले इथे कोणाला माहीत आहे का बघू?
बाकी हलके घ्या. मिपावर अशी मस्करी (कधी कधी कुस्करी होइपर्यंत) चालतेच.
हो हो अगदी हलकेच घेतले आहे, काळजी नसावी.
या पदार्थाचे घटक पदार्थ माहित आहेत काय?
मला काहीच कल्पना नाही. कारण माझ्या नव्याने टेस्ट केली.

अहो ताई, मला कडण्याची भाकरी हवी आहे.....कांद्याची नाही. आणि त्याबरोबर खायची एक चटणी असते त्याची पण पाकृ हवी आहे.
एकोळी प्रश्नांसाठी खरड्फळा वापरा , जर तीथून फायदा झाला नाही की याचा कसा मनस्ताप झाला यावर लेखन करून लेखाच्या शेवटी तूमची मागणी (जी पाकृ हवीय ती) मांडावी.. हमखास उत्तर मिळेल.
साहीत्यः
२ मोठे कांदे,
४ वाट्या ज्वारीच पीठ,
२ सुक्या लाल मिरच्या,
अर्धा चमचा धणे,
चिमुट्भर खस खस,
पाव चमचा जीरे
पाकृ
कांद्यांचे उभे काप करून घ्यावेत. खस खस, धणे, जीरे मिक्सर मधून बारीक करून घ्या. कढई गरम करून त्यात हे मिक्सर मधील मिश्रण ५ मिनिटे मध्यम आचेवर भाजून घ्या. मग ते बाजूला काढून २ चमचे तेल टाकून कांदा परतून घ्या. भाकरी कधी खाणार त्यावर कांदा किती परतायचा ते ठरते. कमी परतला तर भाकरी वातट होते. लगेच खाणार असाल तर गुलाबी होईपर्यन्त परता पण ३-४ तासांनंतर खाणार असाल तर लालसर परतून घ्या. कांदा मनासारखा परतला की वरचे मिश्रण त्यात टाकून ढवळून घ्या. २ मिनिटांनी गॅस बंद करून मिश्रण मुरत ठेवा. ज्वारी मध्ये किंचित पाणी घालत घालत गुठळ्या सोड्वून घ्या. खूप पाणी एकदम भस्सकन ओतू नका. ज्वारी ची पेस्ट तयार झाली (पेस्ट ईतपतच सैल करा की तिला आकार दिल्यावर १० सेकंदांनी ती आपल्या वजनानी तो आकार मोडेल). आता वरचे मिश्रण घालून पुन्हा एकदा नीट मळून घ्या. मिश्रण पिठात सगळीकडे नीट पसरलय ना ते बघा. हे मळलेले पीठ १० मिनिटे मुरत ठेवा. आता त्या पीठाचे ५ गोळे मळू घ्या. प्लॅस्टीक च्या पिशवीने हलक्या हाताने तव्यावर थापून दोन्ही बाजूने लालसर होईपर्यन्त भाजून घ्या. मग तवा बाजूला काढून निखार्यावर भाजा. खरपूस भाजून झाल्यावर दही आणि मिरचीच्या गोळ्या बरोबर सर्व्ह करा.
स्वरालीताईंना 'कळण्याची' भाकरी म्हणायचे असावे असे गृहीत धरून त्याचीच पाकृ देतेय. (गोगोलची पाकृ वाचून ह ह पु वा :D)
१. ज्वारी आणि उडिद ३:१ या प्रमाणात घेऊन एकत्र दळून आणावे आणि त्या पिठात चवीनुसार मीठ घालावे. याला खान्देशात कळणा असे म्हणतात.
२. परातीत हवे तेवढे पिठ घेऊन बेताबेताने पाणी घालत ते भाकरी थापायला सोपे जाईल इतके मऊ मळून घ्यावे. मळलेला गोळा हाताने जरा दाबून त्याला थोडे पिठ लावावे.
३. पोळपाटावर थोडे पिठ भुरभुरवून त्यावर गोळा थापून त्याची भाकरी बनवावी आणि खालची बाजू म्हणजे जास्त कोरडे पिठ असलेली बाजू वर ठेऊन गरम तव्यावर टाकावी. लागलीच त्यावर हाताने पाणी पसरावे. फार पाणी ओतायची गरज नाही, घोटभर पुरे.
४. भाकरी थोडीशी भाजली गेली की उलटवावी आणि दुसरी बाजू तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यावी.
५. त्यानंतर तवा गॅसवरून बाजूला करून पुन्हा पहिली बाजू डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यावी.
अश्याप्रकारे जात्यापासून ताटापर्यंतची कळण्याच्या भाकरीची कृती आहे.
ही भाकरी, ठेचा/ओली चटणी, सोबतीला कांदा... काय मस्त लागते म्हणून सांगू. भाजलेल्या वांग्यांचं भरीत आणि कळण्याची भाकरी हे तर माझे जीव की प्राण!
सध्या माझ्याकडे कळण्याचे पिठ नसल्याने फोटो देता येणार नाही.
१. ज्वारीचे आणि उडदाचे वेगवेगळे पीठ मिसळून तशीच चव येईल की नाही याची खात्री नाही. टिपिकल कळणा बनवताना घेतलेले उडीद सालासकट असतात, मात्र वेगळे उडदाचे पीठ हे बिनसालीच्या उडदाचे असते. पण प्रयत्न करून बघायला हरकत नाही. चवीत थोडा फरक पडेल एवढंच.
२. ही भाकरी अगदी ज्वारी/बाजरीच्या भाकरी सारखीच होते. व्यवस्थित पापुद्रा सुटतो.
मी अलिकडेच भुसावळला कळण्याची भाकरी - हिरव्या वांग्याचे भरीत आणि तेलात घोळलेला हिरव्या मिरचीचा ठेचा हादडला.
उडदाच्या डाळीबरोबरच आणखी पण एक दोन डाळी थोड्या थोड्या मिक्स करतात, असे ऐकले. त्याने लज्जत वाढते. ज्वारी आणि उडीदापेक्षा डाळींचे प्रमाण कमीच ठेवायचे असते. नाहीतर हळूहळू थालपीठाच्या भाजणीकडे प्रवास व्हायचा. (ही आपली गंमत :))
इरसाल साहेब,
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. वांगे बामणोदचेच होते. भुसावळात कुठून होणार?
जामनेर रोडवर नहाटा कॉलेजकडून गावात येताना लगेचच चौफुल्यावर एक महिला बचत गट केंद्र आहे. तेथे बाराही महिने कळण्याची भाकरी मिळते. भरीत मात्र वांग्याच्या सीझनमध्येच असते. एरवी भाकरीबरोबर शेवभाजी व इतर पदार्थ मिळतात. ठेचा कायम असतो.
आम्ही तिथूनच आणली कळण्याची भाकरी-भरीत :)
साहेब अगदी बरोबर. अहो त्याच नहाटा कॉलेज मध्ये दोन वर्षे खर्डेघाशी केलीय. आणि त्याच दोन वर्षात भरीत, दाय-गंढोरी (खरा शब्द) आणि शेवभाजी ह्यांच्यावर किती ताव मारलाय विचारू नका.
भरीत खावे ते लेवा-पाटील लोकांनी बनवलेले..............बाकी सब झूट.
भाकरी हा माझा आवडता पदार्थ. या प्रतिसादापूर्वीचा माझा प्रत्येक प्रयत्न फसलेला होता.
ही भाकरी मी आता अनेकदा केलेली आहे. (२:१ ज्वारी:उडीद असे मी साधारणपणे वापरतो. शिवाय पीठ मळताना मीठ अजिबात घालत नाही. भिजवायचे पाणी बहुतेक वेळा उकळते घेतो. क्वचित चिरलेल्या भाजीतून निथळलेले पाणी सुद्धा घेतो. सर्वच प्रकार छान झाले आहेत. रागी+उडदाचे पीठ अशी सुद्धा केलेली आहे.)
पदर सुटून, बाहेरून कुरकुरीत, आतून ओलसर अशी मस्त भाकरी झालेली आहे.
कळण्याची भाकरी:हा प्रकार खान्देशात मोस्टली थंडीच्या दिवसात करतात.
साहित्यः २ किलो ज्वारी + १किलो आख्खे उडीद दळून आणावेत.
काही ठिकाणी नुसत्या उडदाच्याच भाकरीही करतात...त्यासाठी १ किलो उडीदमधे एक मध्यम वाटी ज्वारी टाकावी.
तर हे कळण्याचे पीठ तयार झाले. त्यात जेवढ्या भाकरी करायच्यात तेवढे पीठ घेउन चवीप्रमाणे मीठ टाकावे. कोमट पाण्यात व्यवस्थित रगडुन पीठाचा गोळा तयार करावा. कुठल्याही भाकरीच्या पीठाला जेवढे रगडले तेवढे ते एकजीव होते आणी भाकरीला तडे जात नाहीत. सुरवातीला हातावर कोरडे पीठ घेउन या मळलेल्या पीठाचा छोटा गोळा दोन्ही तळहाताच्या खोलगट भागातच फिरवावा... मधे जाड आणि कडेला बारीक असा हा गोळा नंतर परातीत खाली थोडे कोरडे पीठ पसरावून त्यावर टाकावा व एका हातानेच गोल गोल फिरवत थोडा मोठा करावा.....परातीला भाकरी चिटकु देउ नये...! (भाकरी करण्याच्या टिपिकल पद्धतीत, खाली बसुन दोन्ही पायाच्या अंगठ्यात परातीची कडा धरुन पीठ रगडतात म्हणजे जोर चांगला लागतो असे म्हणतात तसेच भाकरी मोठी करायलाही सोपे जाते). आता एका बाजुने भाकरी हळुच उचलुन दोन्ही तळव्यांवर खालच्या कोरड्या पीठाचा भाग वरती येइल अशा रितीने उचलावी (भाकरीचे पीठ नीट रगडले गेले आहे की नाही हे इथेच पहिल्यांदा कळते आणि तव्यावर थोडे तेल पसरुन टाकावी...म्हणजे भाकरीला फुगे येत नाहीत. आता भाकरीच्या वरच्या बाजुला पाणी गोल फिरवत लावावे...म्हणजे आणि ते पाणी वाळायच्या आत ती भाकरी उलथावी...(पाणी वाळल्यावर भाकरी उलटवली तर तडे जातात) गॅस जोरातच असावा...आता भाकरी त्या बाजुने थोडीशी शेकली की तवा काढुन टाकावा....भाकरी त्याच अवस्थेत उलथणे आणि सांडशी (किंवा दुसरे उलथणे)यावर पेलत डायरेक्ट गॅसवर शेकावी...म्हणजे छान पोपडा येतो! सांडशी आणि उलथणे यावर ती भाकरी शेकत जाईल तशी तशी पेलवत फिरवावी...सगळ्या बाजुने झाल्यावर टोपलीत टाकावी.... हो डब्याऐवजी काड्यांच्या टोपलीत भाकरी ठेवतात. आता भाकरीचा पोपडा एका बाजुने मोकळा करावा...म्हणजे आतील वाफ रिलीज होते.
या भाकरीचा पिज्झा करायचा असेल तर तव्यावरच पोपडा काढुन त्यावर लाल तिखट + लसुण +जिरे कांडुन (ठेचुन) केलेला तिखटाचा गोळा टाकावा तो तेल टाकुन व्यवस्थित पसरावा.वरुन पुन्हा पोपडा दाबुन टाकावा...थंडीमधे नाष्ट्यालाच काय रात्रीच्या जेवणालाही हा गावरान पिज्झा मस्त लागतो.
कळण्याच्या भाकरीबरोबर, शेंगदाण्याची हिरवी चटणी करतात.
शेंगदाण्याची हिरवी चटणी: थोडे शेंगदाणे भाजुन आणी हिरव्या मिरच्या थोड्या तेलात शेकुन कोथिंबिर, लसुण जि-याबरोबर मिक्सरमधे थोड्या पाण्यात फिरवाव्या. यात चवीप्रमाणे मीठ घालावे. ही चटणी मिक्सरमधे करण्यापेक्षा वरवंटा पाट्यावर वाटलेली असेल तर अजुनच टेस्टी!
आर्या, कळण्याच्या भाकरीची अगदी डिट्टेलवार पाकृ आवडली.
एक सूचना अशी की पूर्ण वेळ गॅस जोरात ठेवण्यापेक्षा आधी तवा गरम करून त्यावर भाकरी टाकल्यावर मध्यम आचेवर ठेवावा. अन्यथा केवळ बाहेरचा भाग पटकन भाजला जातो आणि आतून जरा कच्चे राहते. अशी भाकरी नंतर चिवट होते.
तसेच कळण्याची भाकरी थंडीच्या दिवसात करतात हे माझ्या तरी पाहण्यात नाही. ही भाकरी खाणार्या बहुतेक लोकांकडे वर्षभर हे पीठ असतेच आणि अधूनमधून भाकरी करून खाल्ली जाते. त्याउलट बाजरीची भाकरी मोस्टली हिवाळ्यात केली जाते असे वाटते.
------------------------------------------------------------
अवांतरः खान्देशात बर्याच ठिकाणी 'सटवाई'च्या भाकरींची प्रथा आहे. लग्नकार्य बहुदा उन्हाळ्यात होत असल्याने अचानक वादळ-पावसाने घोळ घालू नये म्हणून कार्याच्या आधीच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी कळण्याच्या भाकरी, अंबाडीची भाजी आणि लाल ओली चटणी यांचा नैवेद्य सटवाईला दाखवला जातो. देवीची पूजा नैवेद्य झाल्यावर कुटुंबातील नातेवाईक तिथेच आवारात बसून हसत-खेळत या सणसणीत, गावराण पक्वान्नाचा फडशा पाडतात.
>>>तव्यावर थोडे तेल पसरुन टाकावी..म्हणजे भाकरीला फुगे येत नाहीत.
भाकरीला तेल लावत नाही. भाकरी एका तळहातावर घेऊन धप्पकन तव्यात टाकली तर हे फुगे येतात. त्याऐवजी थापलेली बाजू खाली आणि कोरड्या पिठाची बाजू वरती अशी दोन्ही हातांवर पेलून हलकेच तव्यावर सोडली की ते फुगे/फोड येत नाहीत आणि भाकरी नीट भाजली जाते.
अर्थात अशी दोन्ही हातांवर घेऊन भाकरी सोडताना हातांचा तव्याला स्पर्श होऊ न देणं तितकंच महत्वाचं आहे.
आयशप्पथ, काय आठवण काढलीत इरसाल भौ! :)
कोरड्या लाल मिरच्या पाण्यात कुस्करुन, भरपुर लसुण, जीरं नि मीठ तेल घालुन करतात ना? सही लागतं ते कळण्याच्या भाकरीबरोबर.
प्रतिक्रिया
13 Jun 2011 - 8:34 pm | शिल्पा ब
अय्या!! संपुर्ण दीड वाक्य!! कमाल ए नै!! कसं बाई सुचतं देव जाणे.
13 Jun 2011 - 8:42 pm | स्वरालि
काही कळले नाही शिल्पा, तुम्हाला काय बोलायचे आहे ते ?
13 Jun 2011 - 10:06 pm | रेवती
स्वरालीताई, एकदोन ओळींचा धागा सुरु करायला मनाई आहे.
तुम्हाला कदाचित माहित नसल्याने असे झाले, तरी या पदार्थाबद्दल कुठे ऐकले, चव बघितली, त्यानिमित्ताने एखादी आठवण असे देवून पाकृ हवी असल्याचे शिर्षक देवू शकता. आत्ता शिर्षक वाचून "अय्या, नवीन पदार्थ!" असा जो गैरसमज होतो ते टळेल.;) बाकी हलके घ्या. मिपावर अशी मस्करी (कधी कधी कुस्करी होइपर्यंत) चालतेच.:)
या पदार्थाचे घटक पदार्थ माहित आहेत काय? जी माहिती असेल ती लिहून धागा माहिती(अ)पूर्ण कसा होइल ते बघा.
तुम्हाला 'कांद्याची भाकरी हा पदार्थ हवाय की 'कांद्याच्या चटणीची' पाकृ हविये?
14 Jun 2011 - 8:58 am | टारझन
काही कळले नाही रेवती, तुम्हाला काय बोलायचे आहे ते ?
- वारलि
14 Jun 2011 - 7:06 pm | स्वरालि
धन्यवाद रेवती,
एकदोन ओळींचा धागा सुरु करायला मनाई आहे.
हे मला माहीत नव्हते, खरोखर अशी काहीच कल्पना नव्हती हो.
तरी या पदार्थाबद्दल कुठे ऐकले, चव बघितली, त्यानिमित्ताने एखादी आठवण असे देवून पाकृ हवी असल्याचे शिर्षक देवू शकता.
पुढच्या वेळेस हे नक्की ध्यानात ठेवीन. ही भाकरी माझ्या नवर्याने ठाणे ला खाल्ली होती (लहान असताना), त्यांच्या बाजूला एक खानदेशी कुटुंब राहत असे, त्या काकी अशी भाकरी बनवायच्या असे त्याने सांगितले. नेट वर पण शोधली पण मीळाली नाही, म्हणून म्हटले इथे कोणाला माहीत आहे का बघू?
बाकी हलके घ्या. मिपावर अशी मस्करी (कधी कधी कुस्करी होइपर्यंत) चालतेच.
हो हो अगदी हलकेच घेतले आहे, काळजी नसावी.
या पदार्थाचे घटक पदार्थ माहित आहेत काय?
मला काहीच कल्पना नाही. कारण माझ्या नव्याने टेस्ट केली.
तुम्हाला 'कांद्याची भाकरी हा पदार्थ हवाय की 'कांद्याच्या चटणीची' पाकृ हविये?
अहो ताई, मला कडण्याची भाकरी हवी आहे.....कांद्याची नाही. आणि त्याबरोबर खायची एक चटणी असते त्याची पण पाकृ हवी आहे.
13 Jun 2011 - 10:29 pm | आत्मशून्य
एकोळी प्रश्नांसाठी खरड्फळा वापरा , जर तीथून फायदा झाला नाही की याचा कसा मनस्ताप झाला यावर लेखन करून लेखाच्या शेवटी तूमची मागणी (जी पाकृ हवीय ती) मांडावी.. हमखास उत्तर मिळेल.
13 Jun 2011 - 10:46 pm | निवेदिता-ताई
तुम्हाला 'कांद्याची भाकरी हा पदार्थ हवाय की 'कांद्याच्या चटणीची' पाकृ हविये?
तिला...कडन्याची भाकरी हवी आहे...सांगतेस???
13 Jun 2011 - 11:53 pm | रेवती
हा प्रकार पहिल्यांदाच ऐकतिये.
कांद्याची चटणी मात्र माहितिये.
14 Jun 2011 - 12:58 am | कुंदन
कळण्याची भाकरी.
असो , लवकरात लवकर माहिती काढुन कळवायची येवस्था करीन.
14 Jun 2011 - 3:04 am | रेवती
अच्छा!
हा शब्दच पहिल्यांदा ऐकला. आधी वाटलं या ताई नवीन दिसताहेत म्हणून 'कांद्याची' हा शब्द लिहिता आला नाही कि काय?
14 Jun 2011 - 7:08 pm | स्वरालि
हो हो कळण्याची / kadnyachi भाकरी...तुम्ही ऐकला आहे का ?
14 Jun 2011 - 12:03 am | ५० फक्त
+१००० टु आत्मशुन्या, तुझ्या खात्यावर अजुन एक नोंद होणार असं दिसतंय.
14 Jun 2011 - 3:44 am | गोगोल
साहीत्यः
२ मोठे कांदे,
४ वाट्या ज्वारीच पीठ,
२ सुक्या लाल मिरच्या,
अर्धा चमचा धणे,
चिमुट्भर खस खस,
पाव चमचा जीरे
पाकृ
कांद्यांचे उभे काप करून घ्यावेत. खस खस, धणे, जीरे मिक्सर मधून बारीक करून घ्या. कढई गरम करून त्यात हे मिक्सर मधील मिश्रण ५ मिनिटे मध्यम आचेवर भाजून घ्या. मग ते बाजूला काढून २ चमचे तेल टाकून कांदा परतून घ्या. भाकरी कधी खाणार त्यावर कांदा किती परतायचा ते ठरते. कमी परतला तर भाकरी वातट होते. लगेच खाणार असाल तर गुलाबी होईपर्यन्त परता पण ३-४ तासांनंतर खाणार असाल तर लालसर परतून घ्या. कांदा मनासारखा परतला की वरचे मिश्रण त्यात टाकून ढवळून घ्या. २ मिनिटांनी गॅस बंद करून मिश्रण मुरत ठेवा. ज्वारी मध्ये किंचित पाणी घालत घालत गुठळ्या सोड्वून घ्या. खूप पाणी एकदम भस्सकन ओतू नका. ज्वारी ची पेस्ट तयार झाली (पेस्ट ईतपतच सैल करा की तिला आकार दिल्यावर १० सेकंदांनी ती आपल्या वजनानी तो आकार मोडेल). आता वरचे मिश्रण घालून पुन्हा एकदा नीट मळून घ्या. मिश्रण पिठात सगळीकडे नीट पसरलय ना ते बघा. हे मळलेले पीठ १० मिनिटे मुरत ठेवा. आता त्या पीठाचे ५ गोळे मळू घ्या. प्लॅस्टीक च्या पिशवीने हलक्या हाताने तव्यावर थापून दोन्ही बाजूने लालसर होईपर्यन्त भाजून घ्या. मग तवा बाजूला काढून निखार्यावर भाजा. खरपूस भाजून झाल्यावर दही आणि मिरचीच्या गोळ्या बरोबर सर्व्ह करा.
14 Jun 2011 - 7:11 pm | स्वरालि
हे थालीपीठ आहे कि भाकरी ?.... पण नक्की करून बघते.
धन्यवाद
14 Jun 2011 - 4:55 am | स्मिता.
स्वरालीताईंना 'कळण्याची' भाकरी म्हणायचे असावे असे गृहीत धरून त्याचीच पाकृ देतेय. (गोगोलची पाकृ वाचून ह ह पु वा :D)
१. ज्वारी आणि उडिद ३:१ या प्रमाणात घेऊन एकत्र दळून आणावे आणि त्या पिठात चवीनुसार मीठ घालावे. याला खान्देशात कळणा असे म्हणतात.
२. परातीत हवे तेवढे पिठ घेऊन बेताबेताने पाणी घालत ते भाकरी थापायला सोपे जाईल इतके मऊ मळून घ्यावे. मळलेला गोळा हाताने जरा दाबून त्याला थोडे पिठ लावावे.
३. पोळपाटावर थोडे पिठ भुरभुरवून त्यावर गोळा थापून त्याची भाकरी बनवावी आणि खालची बाजू म्हणजे जास्त कोरडे पिठ असलेली बाजू वर ठेऊन गरम तव्यावर टाकावी. लागलीच त्यावर हाताने पाणी पसरावे. फार पाणी ओतायची गरज नाही, घोटभर पुरे.
४. भाकरी थोडीशी भाजली गेली की उलटवावी आणि दुसरी बाजू तव्यावर व्यवस्थित भाजून घ्यावी.
५. त्यानंतर तवा गॅसवरून बाजूला करून पुन्हा पहिली बाजू डायरेक्ट गॅसवर भाजून घ्यावी.
अश्याप्रकारे जात्यापासून ताटापर्यंतची कळण्याच्या भाकरीची कृती आहे.
ही भाकरी, ठेचा/ओली चटणी, सोबतीला कांदा... काय मस्त लागते म्हणून सांगू. भाजलेल्या वांग्यांचं भरीत आणि कळण्याची भाकरी हे तर माझे जीव की प्राण!
सध्या माझ्याकडे कळण्याचे पिठ नसल्याने फोटो देता येणार नाही.
14 Jun 2011 - 8:51 am | धनंजय
१. दीड वाटी ज्वारीचे आणि अर्धी वाटी उडदाचे पीठ मिसळून कळणाचे पीठ बनवता येईल का?
२. या भाकरीला पापुद्रा सुटतो का? की थालीपीठासारखी होते?
14 Jun 2011 - 1:44 pm | स्मिता.
१. ज्वारीचे आणि उडदाचे वेगवेगळे पीठ मिसळून तशीच चव येईल की नाही याची खात्री नाही. टिपिकल कळणा बनवताना घेतलेले उडीद सालासकट असतात, मात्र वेगळे उडदाचे पीठ हे बिनसालीच्या उडदाचे असते. पण प्रयत्न करून बघायला हरकत नाही. चवीत थोडा फरक पडेल एवढंच.
२. ही भाकरी अगदी ज्वारी/बाजरीच्या भाकरी सारखीच होते. व्यवस्थित पापुद्रा सुटतो.
14 Jun 2011 - 4:24 pm | कुंदन
पीठाच्या प्रमणासाठी धन्यवाद.
दातारांच्या अदिल मध्ये आज जाउन बघतो , मिळत्येय का पीठ.
14 Jun 2011 - 12:51 pm | गोगोल
ह ह पु वा? ह ह पु वा??
याच एकदा जेवायला. अशा गरमा गरम कांद्याच्या भाकर्या करून पानात वाढ्तो की बोट पण चावून खाल.
14 Jun 2011 - 1:48 pm | स्मिता.
माफ करा, तुमच्या पाकृला हसले ;)
तुम्ही एवढ्या आग्रहाने जेवायला या म्हणताय म्हणजे तुमची कांद्याची भाकरी छानच लागत असणार. मी येणारच... तुम्ही लिस्टमध्ये टाकून ठेवा.
14 Jun 2011 - 1:44 pm | योगप्रभू
कळण्याच्या भाकरीची कृती चांगली सांगितली.
मी अलिकडेच भुसावळला कळण्याची भाकरी - हिरव्या वांग्याचे भरीत आणि तेलात घोळलेला हिरव्या मिरचीचा ठेचा हादडला.
उडदाच्या डाळीबरोबरच आणखी पण एक दोन डाळी थोड्या थोड्या मिक्स करतात, असे ऐकले. त्याने लज्जत वाढते. ज्वारी आणि उडीदापेक्षा डाळींचे प्रमाण कमीच ठेवायचे असते. नाहीतर हळूहळू थालपीठाच्या भाजणीकडे प्रवास व्हायचा. (ही आपली गंमत :))
14 Jun 2011 - 3:52 pm | इरसाल
साहेब भुसावळात कुठे ? वांगे बामणोदचेच असणार.
14 Jun 2011 - 6:57 pm | योगप्रभू
इरसाल साहेब,
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. वांगे बामणोदचेच होते. भुसावळात कुठून होणार?
जामनेर रोडवर नहाटा कॉलेजकडून गावात येताना लगेचच चौफुल्यावर एक महिला बचत गट केंद्र आहे. तेथे बाराही महिने कळण्याची भाकरी मिळते. भरीत मात्र वांग्याच्या सीझनमध्येच असते. एरवी भाकरीबरोबर शेवभाजी व इतर पदार्थ मिळतात. ठेचा कायम असतो.
आम्ही तिथूनच आणली कळण्याची भाकरी-भरीत :)
15 Jun 2011 - 9:50 am | इरसाल
साहेब अगदी बरोबर. अहो त्याच नहाटा कॉलेज मध्ये दोन वर्षे खर्डेघाशी केलीय. आणि त्याच दोन वर्षात भरीत, दाय-गंढोरी (खरा शब्द) आणि शेवभाजी ह्यांच्यावर किती ताव मारलाय विचारू नका.
भरीत खावे ते लेवा-पाटील लोकांनी बनवलेले..............बाकी सब झूट.
14 Jun 2011 - 7:16 pm | स्वरालि
धन्यवाद स्मिता,
करून बघते.
पण उडीद पीठ आणि ज्वारी पीठ एकत्र करूनच करावी लागणार, राणीच्या देशात कुठे पीठ दळून मिळणार?....
26 Sep 2011 - 4:14 am | धनंजय
भाकरी हा माझा आवडता पदार्थ. या प्रतिसादापूर्वीचा माझा प्रत्येक प्रयत्न फसलेला होता.
ही भाकरी मी आता अनेकदा केलेली आहे. (२:१ ज्वारी:उडीद असे मी साधारणपणे वापरतो. शिवाय पीठ मळताना मीठ अजिबात घालत नाही. भिजवायचे पाणी बहुतेक वेळा उकळते घेतो. क्वचित चिरलेल्या भाजीतून निथळलेले पाणी सुद्धा घेतो. सर्वच प्रकार छान झाले आहेत. रागी+उडदाचे पीठ अशी सुद्धा केलेली आहे.)
पदर सुटून, बाहेरून कुरकुरीत, आतून ओलसर अशी मस्त भाकरी झालेली आहे.
कृती देण्याबाबत अनेकानेक धन्यवाद.
14 Jun 2011 - 3:12 pm | आर्या१२३
कळण्याची भाकरी:हा प्रकार खान्देशात मोस्टली थंडीच्या दिवसात करतात.
साहित्यः २ किलो ज्वारी + १किलो आख्खे उडीद दळून आणावेत.
काही ठिकाणी नुसत्या उडदाच्याच भाकरीही करतात...त्यासाठी १ किलो उडीदमधे एक मध्यम वाटी ज्वारी टाकावी.
तर हे कळण्याचे पीठ तयार झाले. त्यात जेवढ्या भाकरी करायच्यात तेवढे पीठ घेउन चवीप्रमाणे मीठ टाकावे. कोमट पाण्यात व्यवस्थित रगडुन पीठाचा गोळा तयार करावा. कुठल्याही भाकरीच्या पीठाला जेवढे रगडले तेवढे ते एकजीव होते आणी भाकरीला तडे जात नाहीत. सुरवातीला हातावर कोरडे पीठ घेउन या मळलेल्या पीठाचा छोटा गोळा दोन्ही तळहाताच्या खोलगट भागातच फिरवावा... मधे जाड आणि कडेला बारीक असा हा गोळा नंतर परातीत खाली थोडे कोरडे पीठ पसरावून त्यावर टाकावा व एका हातानेच गोल गोल फिरवत थोडा मोठा करावा.....परातीला भाकरी चिटकु देउ नये...! (भाकरी करण्याच्या टिपिकल पद्धतीत, खाली बसुन दोन्ही पायाच्या अंगठ्यात परातीची कडा धरुन पीठ रगडतात म्हणजे जोर चांगला लागतो असे म्हणतात तसेच भाकरी मोठी करायलाही सोपे जाते). आता एका बाजुने भाकरी हळुच उचलुन दोन्ही तळव्यांवर खालच्या कोरड्या पीठाचा भाग वरती येइल अशा रितीने उचलावी (भाकरीचे पीठ नीट रगडले गेले आहे की नाही हे इथेच पहिल्यांदा कळते आणि तव्यावर थोडे तेल पसरुन टाकावी...म्हणजे भाकरीला फुगे येत नाहीत. आता भाकरीच्या वरच्या बाजुला पाणी गोल फिरवत लावावे...म्हणजे आणि ते पाणी वाळायच्या आत ती भाकरी उलथावी...(पाणी वाळल्यावर भाकरी उलटवली तर तडे जातात) गॅस जोरातच असावा...आता भाकरी त्या बाजुने थोडीशी शेकली की तवा काढुन टाकावा....भाकरी त्याच अवस्थेत उलथणे आणि सांडशी (किंवा दुसरे उलथणे)यावर पेलत डायरेक्ट गॅसवर शेकावी...म्हणजे छान पोपडा येतो! सांडशी आणि उलथणे यावर ती भाकरी शेकत जाईल तशी तशी पेलवत फिरवावी...सगळ्या बाजुने झाल्यावर टोपलीत टाकावी.... हो डब्याऐवजी काड्यांच्या टोपलीत भाकरी ठेवतात. आता भाकरीचा पोपडा एका बाजुने मोकळा करावा...म्हणजे आतील वाफ रिलीज होते.
या भाकरीचा पिज्झा करायचा असेल तर तव्यावरच पोपडा काढुन त्यावर लाल तिखट + लसुण +जिरे कांडुन (ठेचुन) केलेला तिखटाचा गोळा टाकावा तो तेल टाकुन व्यवस्थित पसरावा.वरुन पुन्हा पोपडा दाबुन टाकावा...थंडीमधे नाष्ट्यालाच काय रात्रीच्या जेवणालाही हा गावरान पिज्झा मस्त लागतो.
कळण्याच्या भाकरीबरोबर, शेंगदाण्याची हिरवी चटणी करतात.
शेंगदाण्याची हिरवी चटणी: थोडे शेंगदाणे भाजुन आणी हिरव्या मिरच्या थोड्या तेलात शेकुन कोथिंबिर, लसुण जि-याबरोबर मिक्सरमधे थोड्या पाण्यात फिरवाव्या. यात चवीप्रमाणे मीठ घालावे. ही चटणी मिक्सरमधे करण्यापेक्षा वरवंटा पाट्यावर वाटलेली असेल तर अजुनच टेस्टी!
फोटोसाठी हे पहा:
http://khandeshkanya.blogspot.com/2011_04_01_archive.html
14 Jun 2011 - 3:35 pm | स्मिता.
आर्या, कळण्याच्या भाकरीची अगदी डिट्टेलवार पाकृ आवडली.
एक सूचना अशी की पूर्ण वेळ गॅस जोरात ठेवण्यापेक्षा आधी तवा गरम करून त्यावर भाकरी टाकल्यावर मध्यम आचेवर ठेवावा. अन्यथा केवळ बाहेरचा भाग पटकन भाजला जातो आणि आतून जरा कच्चे राहते. अशी भाकरी नंतर चिवट होते.
तसेच कळण्याची भाकरी थंडीच्या दिवसात करतात हे माझ्या तरी पाहण्यात नाही. ही भाकरी खाणार्या बहुतेक लोकांकडे वर्षभर हे पीठ असतेच आणि अधूनमधून भाकरी करून खाल्ली जाते. त्याउलट बाजरीची भाकरी मोस्टली हिवाळ्यात केली जाते असे वाटते.
------------------------------------------------------------
अवांतरः खान्देशात बर्याच ठिकाणी 'सटवाई'च्या भाकरींची प्रथा आहे. लग्नकार्य बहुदा उन्हाळ्यात होत असल्याने अचानक वादळ-पावसाने घोळ घालू नये म्हणून कार्याच्या आधीच्या मंगळवारी किंवा शुक्रवारी कळण्याच्या भाकरी, अंबाडीची भाजी आणि लाल ओली चटणी यांचा नैवेद्य सटवाईला दाखवला जातो. देवीची पूजा नैवेद्य झाल्यावर कुटुंबातील नातेवाईक तिथेच आवारात बसून हसत-खेळत या सणसणीत, गावराण पक्वान्नाचा फडशा पाडतात.
14 Jun 2011 - 4:40 pm | मस्त कलंदर
>>>तव्यावर थोडे तेल पसरुन टाकावी..म्हणजे भाकरीला फुगे येत नाहीत.
भाकरीला तेल लावत नाही. भाकरी एका तळहातावर घेऊन धप्पकन तव्यात टाकली तर हे फुगे येतात. त्याऐवजी थापलेली बाजू खाली आणि कोरड्या पिठाची बाजू वरती अशी दोन्ही हातांवर पेलून हलकेच तव्यावर सोडली की ते फुगे/फोड येत नाहीत आणि भाकरी नीट भाजली जाते.
अर्थात अशी दोन्ही हातांवर घेऊन भाकरी सोडताना हातांचा तव्याला स्पर्श होऊ न देणं तितकंच महत्वाचं आहे.
14 Jun 2011 - 7:25 pm | स्वरालि
धन्यवाद आर्या,
कुठल्याही भाकरीच्या पीठाला जेवढे रगडले तेवढे ते एकजीव होते आणी भाकरीला तडे जात नाहीत.
पाणी वाळल्यावर भाकरी उलटवली तर तडे जातात.
- तरीच माझ्या तांदळाच्या भाकरीला नेहमी तडे जायचे. बरे झाले हे सांगितले ते.
शेंगदाण्याची हिरवी चटणीची पाकृ तर मस्तच. मम्मी करायची घरी...आठवण झाली.
नक्कीच करून बघेन.
26 Sep 2011 - 4:18 am | धनंजय
मनापासून धन्यवाद +१
येथील सुचवणीसारखीच जवसाची चटणी भाकरीचा पोपडा काढून भुरभुरली. छानच लागली.
14 Jun 2011 - 3:45 pm | सुहास..
धन्स स्मिता , धन्स आर्या !!
मला ही पाकृ हवी होती
14 Jun 2011 - 3:55 pm | इरसाल
ह्या लोके वल्ल तिखट इसरी जायेल दिखी ऱ्हायनात ?
14 Jun 2011 - 5:12 pm | आर्या१२३
<<ह्या लोके वल्ल तिखट इसरी जायेल दिखी ऱ्हायनात ?<<<
आयशप्पथ, काय आठवण काढलीत इरसाल भौ! :)
कोरड्या लाल मिरच्या पाण्यात कुस्करुन, भरपुर लसुण, जीरं नि मीठ तेल घालुन करतात ना? सही लागतं ते कळण्याच्या भाकरीबरोबर.
14 Jun 2011 - 7:36 pm | अतुल पाटील
वल्ली तिखट आनि कयनानी भाकर!!!! गावनी याद उनी भो. मी जठे रहास तठे नही भेटत. पण आठे वाल मार्ट मा 'हमस' नाव ना पदार्थ भेटस. तेनी तेस्ट वल्ली तिखट सारखी लागस थोडीबहुत. तेनामाच भागाळी लेतस. पण कयनानी भाकर पोपडा येलच मस्त लागस.
15 Jun 2011 - 9:55 am | इरसाल
आठे बठ्ठा घरतून लयन पडस. काही भेटाले मांगत नही.कायनान पीठ आनी मिरच्या शेंगदाना भी घरूनच लयाले लागी र्हयान.
16 Jun 2011 - 11:36 am | जासुश
कयना नि भाकर ,तिखे,पापडन कूसमूर..माले गची आवडस पण काय करो बनवता येस नई..
21 Jun 2011 - 3:07 am | चटोरी वैशू
कळ्न्याचि भाकरी..... दाळ गंडोरी.... आंबाडी चि भाजी ...काय काय आठवण काढतात लोक.... तोंडाला पाणी येतेय माझ्या तर...
वैशाली उन्हाळे - नारखेडे
22 Jul 2011 - 2:20 pm | धिन्गाना
दाल गन्दोरि कशि बनवतात? कोणि सान्गेल काय?