Tiramisu (Italian Dessert) - तिरामिसु

Mrunalini's picture
Mrunalini in पाककृती
1 Jun 2011 - 2:34 am

साहित्यः

तिरामिसु बिस्किट्स (French Fingers) किंवा Sponge cake पण वापरु शकता.
Mascarpone Cheese - २ Packets
पिठीसाखर - १ १/२ कप
अंडी - ६
Cognac किंवा Rum - ४ चमचे
कॉफी - ४ चमचे
कोको पावडर - ४ चमचे
व्हॅनिला इसेन्स - २-३ थेंब

कृती:
१. चीज हे normal temp ला आणावे.

Cheese

२. अंड्यांचे पांढरे व बलक वेगळे करावे.
३. अंड्यांच्या बलक मधे ६ चमचे साखर टाकुन Hand mixer ने मिक्स करावे.

egg yoke mix

४. ह्यात मऊ झालेले क्रिम चीज टाकुन हलक्या हाताने मिक्स करावे.
५. दुसर्‍या भांड्यामधे अंड्याचे पांढरे घेउन त्यात Cognac किंवा Rum व व्हॅनिला इसेन्स टाकावे.

cognac

६. ह्यात राहिलेली साखर थोडी थोडी टाकुन खुप मिक्स करावे. हे मिश्रण hard pick येई पर्यंत beat करावे.
egg white

७. हे मिश्रण वरील चीज मधे हलक्या हाताने एकत्र करावे व फ्रिज मधे ठेवावे.
८. पातेल्यामधे ३ कप पाणी गरम करुन, त्यात कॉफी व २ चमचे साखर टाकुन २-३ मिनिटे उकळुन घ्यावे.
९. हे कॉफीचे पाणी गार झाल्यावर त्यात तिरामिसु बिस्किट्स बुडवुन, ज्या भांड्यामधे केक करायचा आहे, त्यात एक layer बनवुन घ्यावा.

buscuits

१०. त्यावर अंड्याचे मिश्रण टाकुन वरतुन गाळणीतुन कोको पावडर sprinkle करावी.

1st

११. हिच कृती परत एकदा करावी.

2nd

१२. अशाप्रकारे अजुन १ layer झाल्यावर केक ७-८ तास फ्रिज मधे ठेवावा.

final

f2

१३. केक सेट झाल्यावर तुकडे कापुन serve करावा.

टिपः

१. आवडत नसल्यास Cognac किंवा Rum नाही टाकले तरी चालते.

f3

प्रतिक्रिया

तिरामिसू आवडत नसलेला माणूस विरळा!
फोटो चविष्ट आहेत.;)

हो गं, अगदी खर. तसे मी हे तिरामिसु भारतात तरी कधी खाल्ला नव्ह्ता. इथे आल्यावर पहिल्यांदा try केला. आता माझे सगळ्यात आवडते dessert आहे हे. yummm yummm :)

निवेदिता-ताई's picture

1 Jun 2011 - 8:29 am | निवेदिता-ताई

अहाहा....मस्तच ग....करुन पाहिलेच पाहिजे..मुलीला खूप आवडेल..आणी आम्हाला पण.

स्वाती दिनेश's picture

1 Jun 2011 - 11:57 am | स्वाती दिनेश

तिरामिसु= पिक मी अप... :)
अगदी सार्थ नाव आहे.
हे आमचे तिरामिसु
आणि ही आमचीच अजून एक तिरामिसु पाकृ
स्वाती

मस्तच गं स्वाती....
तुझ्या दोन्ही पाकृ वाचल्या... एकदम मस्त आहेत.... खुपच छान..... :)

सानिकास्वप्निल's picture

1 Jun 2011 - 3:06 pm | सानिकास्वप्निल

माझे आतिशय आवडते डेझर्ट आहे :)
फोटो व पाकृ एकदम छान :)

संपत's picture

8 Jun 2011 - 3:17 pm | संपत

तिरामिसुमध्ये भेंडी (lady finger) वापरतात असे ऐकले होते.

तिरामिसु मधे जे बिस्किट्स वापरतात त्यांना lady fingers पण म्हणतात.

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jun 2011 - 3:31 pm | परिकथेतील राजकुमार

तिरामिसु पाहून वेडापिसु झालो.

बाकी पाकृ बघून इतकच म्हणेन... सॉलीड डेझर्ट आहे.